उखाणे

राजमुद्रा's picture
राजमुद्रा in काथ्याकूट
10 Mar 2008 - 4:01 pm
गाभा: 

उखाणे, म्हटंलं की मला पु. ल. चा 'समोरच्या कोनाड्यात उभी हींदमाता, बेंबटेरावाचं नाव घेते माझा नंबर पहिला' हा उखाणा आठवतो.तसं उखाण्याचं वेड आजकाल थोडं कमीच झालं आहे. तरीही वाचायला गोड वाटतात. असे म्हणतात की चारोळ्या हा कवितेतला नवा प्रकार. पण मी म्हणेन हे उखाणे म्हणजे आपल्या जुन्या चारोळ्याच (की दोनओळ्या)की! जोडीदाराने पहिला उखाणा घेतल्यावर आपलं नाव ऍकून ज्या भावना मनात आयुष्यभर रेंगाळतात,त्याच्या जोरावर तर आयुष्यभर संसार सुरळीत चालतात किंवा चालायचे.
यातले काही उखाणे धमालसारख्या भावी वरांना(इतर कोणाचे लग्न ठरलेले असल्यास कल्पना नाही) उपयोगी ठरावेत,म्हणून हा काथ्याकूट.
बाकी विनोदी उखाणे कुणी प्रत्यक्ष घेत नसलं तरी वाचायला मजा येते. तेव्हा जरूर असे उखाणे पाठवावेत.बायकोला/नवर्‍याला विचारून सांगितले तरी चालतील, तेव्हढीच स्वतःचे नाव (प्रेमाने )त्याच्या तोंडी ऍकण्याची संधी. आपल्याकडे कित्येक कवी आहेत. पांरंपारीक नसतील तरी स्वरचित उखाणे सुध्दा चालतील. प्राजुताई आणि सर्व कविजन लागा कामाला :)
असो तर असेच काही उखाणे माझ्याकडून.

सागराला मिळते अव्खळ सरीता
---- चे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

रामसीतेचे गुणी लव-कुश पुत्र
---- च्या नावाने आज बांधले मी मंगळ्सूत्र

अंगावरच्या शेलारीला बांधून त्यांचा शेला
----चे नाव घेण्यास मी आज शुभारभ केला

पाच बोटातून होते कलेची निर्मिती
---- ची व माझी जडली प्रिती

क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास
---- ला भरवतो लाडवाचा घास

पुणं तिथ काय उणं म्हणतात सारी जणं
---- ने जोडीदार होऊन सार्थ केलं माझं जिणं

चंद्र आहे चांदणीचा सांगाती
--- आहे माझी जीवनसाथी

काही विनोदी.....

पुणे तेथे काही नाही उणे
---- गावाला गेल्यावर घर होते सूनेसूने

भूगोलाच्या पुस्तकाला ईतिहासाचं कव्हर
बाळ्याचं नाव घेते काळ्याची लव्हर

औंधमध्ये आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो ---- राव आहेत आय. टी. त

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या थोबाड कर इकडे.

समस्त जश्न-ए-बहार करणार्‍या मडळींच्या सौं उखाणा घेईल तेव्हा

सुंदर सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय
--- अजून नाही आले पिऊन पडले की काय

खास मि. पा. च्या मालकिण (सौ.अनुष्का) उखाणा घेईल तेव्हा

तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ
मी त्याची तर्री ते माझी मिसळ

राजमुद्रा :)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Mar 2008 - 4:07 pm | विसोबा खेचर

तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ
मी त्याची तर्री ते माझी मिसळ

इश्य! इश्य! कस्स! कस्स! :)

लाजलो बरं का मी! :))

आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.

धमाल मुलगा's picture

10 Mar 2008 - 4:55 pm | धमाल मुलगा

खास मि. पा. च्या मालकिण (सौ.अनुष्का) उखाणा घेईल तेव्हा
हे एकदम पेश्शल :)))))
आणि त्यावर तात्याबा॑च॑
इश्य! इश्य! कस्स! कस्स! :)

लाजलो बरं का मी! :))

लय भारी !!!!

माझा एक ला॑बचा भाऊ (नात्याने बर॑का, नायतर उगाच चावत बसाल किती अ॑तराने अन् उत्तरेकडून का दक्षिणेकडून करत) तर हा, स्वतःच्या लग्नात भयानक कावला होता. जो उठायचा तो नाव घ्यायचा आग्रह करायचा. बर॑ हे महाराज सणकी...(भाऊ कोनाचा है म्हाराजा...म॑ग) त्यातून बिचार्‍याने काहीतरी ४-५ उखाणे कुठून-कुठून शोधून आणले होते. तर लोका॑चा आग्रह खासकरून वहिनीकडच्या॑चा, सारख॑ सारख॑ एकच्या एकच नको, नवा उखाणा हवा...हे ऐकून भाऊराया पिसाळलाच....
त्यान॑ एकच टाकला, पब्लीकची बोलतीच ब॑द.
"
पा॑ढरी को॑बडी पट्ट्या-पट्ट्याची,
अन् अनिता माझ्या एका रट्ट्याची !!!!!

आता ह्यापेक्षा वेगळा आणि नवा उखाणा हवा असेल तर मला नवी बायको आणून द्या! "

आता बोला........

अवा॑तरः राजमुद्राताई, तयारी जोरात दिसतीये...उखाणे जमवण॑ चालू झालेल॑ आहे अस॑ दिसत॑य. :)
तयारीला मदत लागेल नाही? सा॑ग हो कधी येऊ ते :)))))

राजमुद्रा's picture

10 Mar 2008 - 5:25 pm | राजमुद्रा

पा॑ढरी को॑बडी पट्ट्या-पट्ट्याची,
अन् अनिता माझ्या एका रट्ट्याची !!!!!

जबरीच उखाणा !

राजमुद्रा :)

विवेकवि's picture

10 Mar 2008 - 7:09 pm | विवेकवि

औंधमध्ये आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो ---- राव आहेत आय. टी. त

हा ऊखाणा तूला बरोबर आहे..

विवेक वि.

सृष्टीलावण्या's picture

10 Mar 2008 - 5:43 pm | सृष्टीलावण्या

श्रावणात बरसती रिमझिम धारा।
मी पिते कॉफी हे घालतात वारा ।।

*-*-*-*-*-*-*

एका हातात पिशवी, एका हातात रुमाल ।
नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल ।।
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

आनंदयात्री's picture

10 Mar 2008 - 5:44 pm | आनंदयात्री

बशीत बशी ... बशीत बशी
बशीत बशी ... बशीत बशी
माझी बायको उर्वशी ..
बाकी सगळ्या म्हशी ....

धमाल मुलगा's picture

10 Mar 2008 - 5:45 pm | धमाल मुलगा

माझी बायको उर्वशी ..
बाकी सगळ्या म्हशी ....

खल्ल्ल्ल्ल्लास्स्स्स्स !!!!!!

स्वाती राजेश's picture

10 Mar 2008 - 5:59 pm | स्वाती राजेश

समानतेचे आहे युग, कामाची करूया वाटणी
मी करेन चहा,....राव वाटतील चटणी.

राजमुद्रा's picture

10 Mar 2008 - 6:09 pm | राजमुद्रा

श्रावणात बरसती रिमझिम धारा।
मी पिते कॉफी हे घालतात वारा ।।

एका हातात पिशवी, एका हातात रुमाल ।
नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल ।।

बशीत बशी ... बशीत बशी
बशीत बशी ... बशीत बशी
माझी बायको उर्वशी ..
बाकी सगळ्या म्हशी ....

समानतेचे आहे युग, कामाची करूया वाटणी
मी करेन चहा,....राव वाटतील चटणी.

खल्लास! एक से बढकर एक :) लगे रहो!

राजमुद्रा :)

वरदा's picture

10 Mar 2008 - 7:23 pm | वरदा

एका मैत्रीणीच्या नवर्‍याने घेतला

लग्नाला झाली दोन वर्ष, आता बसतायत संसाराचे चटके
...च्या ब्युटीपार्लरच्या बिलाने, माझ्या खिशाला फटके.

आणि मैत्रीणीने घेतलेला

समुद्राकाठची आहे, मऊ मऊ वाळु
..राव दिसतात साधे, पण आहेत मात्र चालु

वरदा's picture

10 Mar 2008 - 7:24 pm | वरदा

स्टुलावर स्टुल बत्तीस स्टुल
...आहे ब्युटीफुल.

वरदा's picture

10 Mar 2008 - 7:27 pm | वरदा

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर नि माहेर
..रावांच्या संसारात, प्रेमाचा आहेर.

माझी दुनिया's picture

12 Mar 2008 - 11:10 am | माझी दुनिया

असाच एक

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण
..............चं नाव घेते...............ची सून

शिवाय

उखाण्याची पध्दत जुनी, उखाणा मात्र हवा नवा,
रोजंच ..........., .............( टोपणनाव) करायचं तर उखाणा कशाला हवा ?

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ
मी त्याची तर्री ते माझी मिसळ

इश्य! इश्य! कस्स! कस्स! :)

लाजलो बरं का मी! :))

आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.

हे काहीतरी भलंतच घडतं आहे? तात्यांनी लाजावं??? जोक होता का?? ह्.घ्य.

माझाही एक उखाणा..

उंच उंच डोंगर हिरवे.. त्याला टेकतं आभाळ..
..... रावांचं काय नाव घेऊ.... कपाळ????????

"अ" रावांबरोबर सिनेमा पहायला गेले सायको...
"ब" रावांचे नाव घेते "क" रावांची बायको....... :))))))

एक टिपिकल उखाणा.. जो ज्यांना उखाणे रचता येत नाही अशा स्त्रिया घेतात..

निलवर्ण नभात शोभतो शशि...
... नाव घेते....... दिवशी.. (इथे मग मंगळागौरी, दिवाळी, पाडवा, संक्रांतसण असे दिवस)

सुर्यापरी रूप आणि चंद्रापरी मुख आहे...
.... माझी बायको तर हेच तर खरे दु:ख आहे..

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

10 Mar 2008 - 7:48 pm | विसोबा खेचर

मंडळी, उखाण्यांचा कार्यक्रम एकंदरीत जोरदारच सुरू दिसतोय! चालू द्या... :)

तात्या.

मदनबाण's picture

11 Mar 2008 - 9:53 am | मदनबाण

मला ई-पत्रा द्वारे आलेले काही उखाणे :--

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी कोणाकोणाचे नाव घेऊ?
------------------------------------
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय
----- अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?
------------------------------------------
गणपतीच्या देवळात शंकराची आरती
गणपतराव गेले वरती नी मी राहिले खालती
-------------------------------------------
समुद्राच्या काठावर मऊमऊ वाळु
गणपतराव दिसतात साधे,पण आतुन एकदम चालू
----------------------------------------------
रेशमी सदर्‍या ला प्लास्टिकचे बक्कल
गणपतरावांना आहे टक्कल,पण डोक्यात नाही अक्क्ल
-------------------------------------------------
पहिली सोनी,दुसरी मनी,तिसरी जनी
सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी
-------------------------------------
शिडीवर शिडी बत्त्तीस शिडी
गणपतराव ओढतात विडी न मी लावते काडी
----------------------------------------
कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र
------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र
-----------------------------------------
निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान
----- आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान
------------------------------------------

धमाल मुलगा's picture

11 Mar 2008 - 11:07 am | धमाल मुलगा

कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र
------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र

??? कुत्र॑ ??? अरे कशाला काही धरब॑ध आहे की नाही??? हा हन्त हन्त!!! धर्म बुडाला हो !!! :))))))
च्यायला हा उखाणा वाचून मी फुल्टू फ्लॅट.... अरे काय चाललय काय? मी वापरु का माझ्या लग्नात हा उखाणा?

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान
----- आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान

हा हा हा.....ए डॉन्या, हा बघ खास तुझ्या बायकोसाठी बनवलाय :)))
(ह्याला म्हणतात, "आपल॑ ठेवायच॑ झाकून अन् दुसर्‍याच॑ बघायच॑ वाकून " हा उखाणा फक्त डॉन्यासाठी काय? आमच्या वाग्दत्त पणती..आपल॑, पत्नीन॑ वाचला तर युरेका...युरेका अस॑ (स-वस्त्र !) ओरडत आख्खी सदाशिव पेठ पालथी घालेल.)

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 11:15 am | विसोबा खेचर

राम नगरकरांच्या रामनगरीतला एक उखाणा आठवत आहे. तो काहीसा असा होत--

डोक्याला फेटा अन् कमरेला शेला
बाबूराव मेला म्हणून गणपतराव केला!

आपला,
(गणपतराव) तात्या.

केशवसुमार's picture

11 Mar 2008 - 11:24 am | केशवसुमार

ऍलुमिनीयमच्या ताटलीत शिळ्या भाकरीचे तुकडे
घास भरवते मुडद्या थोबाड कर इकडे..

विवेकवि's picture

11 Mar 2008 - 11:49 am | विवेकवि

जाऊ बाई जोरात मधला एक ऊखाणा..

चा॑दीच्या ताटात जिलबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या थोबाड कर ईकडे...

समोरच्या कोनाड्यात ठेवले होते गहू
.......राव गेले दौर्यावर आता जरा ..... रावा॑कडे पाहू....

विनोदी आहेत फारसा विचार करु नये..

विवेक वि.

धमाल मुलगा's picture

11 Mar 2008 - 11:53 am | धमाल मुलगा

ऍलुमिनीयमच्या ताटलीत शिळ्या भाकरीचे तुकडे
घास भरवते मुडद्या थोबाड कर इकडे..

ह.ह.पु.वा..

आयला,केशवखुमार शेठ इथ॑ पण विड॑बन? लय म्हणजे लय जबरा आहात बॉ.
माझ्या माहितीतला उखाणा साधारणतः असा आहे..

सोन्याच्या ताटात जिलबीचे तुकडे
-----रावा॑च॑ नाव घेते, लक्ष द्या इकडे.

पाय...शेठ पाय कुठे आहेत? फोटू काढून देव्हार्‍यात..नको, फ्लेक्स मारून भर चौकातच लावतो...२० फूट x २० फूट मापात.

राजमुद्रा's picture

11 Mar 2008 - 1:53 pm | राजमुद्रा

मी उगाचच रडत होते की उखाणे घ्यायची पध्दत कमी होत चालली आहे म्हणून, इथे तर उखाण्यांवर उखाणे पडताहेत
वा वा ! लगे रहो रे बाबांनो .... :)

राजमुद्रा :)

मदनबाण's picture

11 Mar 2008 - 6:04 pm | मदनबाण

मला ई-पत्रा द्वारे आलेला अजुन एक उखाणा :--

जर ऐश्वर्या राय ने उखाणा घेतला तर तो असा असेल :--

सलमान आणि विवेक ला लग्नाचे दिले होते वचन,
दोघांना टांग देऊन धरला अभिषेक बच्चन......
---------------------------------------------
शगुन च्या मिठाईला चांदीचे कव्हर,
अभिषेक चे नाव घेते मी सलमान ची लव्हर......

मदनबाण

किशोरी's picture

11 Mar 2008 - 6:17 pm | किशोरी

अरे वा!!
लग्नाच्या मांडवात आल्या सारखे वाटते आहे :))
बाकी उखाणे तर एकदम ढिंच्याक आहेत

>>तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ
मी त्याची तर्री ते माझी मिसळ
मस्त आहे!!
>>कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र
------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र
हा तर पहील्यांदाच ऐकला,चला लग्न ठरल्यावर कुठला उखाणा घ्यायचा म्हणुन काळजी नको :))

माझा पण एक्
कोनाड्यात ठेवले होते गहु...
लग्न नाही झाल तर नाव कुनाच घेऊ...

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 6:50 pm | विसोबा खेचर

चला लग्न ठरल्यावर कुठला उखाणा घ्यायचा म्हणुन काळजी नको :))

म्हणजे?? अजून आपले लग्न व्हायचे आहे वाटतं! बरं बरं, आमच्याही मनापासून शुभेच्छा बरं का! सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवा बरं का! :)

आपला,
(अविवाहीत!) तात्या.

अवांतर - १

वरील 'अविवाहीत' हा शब्द लिहिण्यामागे कोणताही क्लू देण्याचा हेतूवजा प्रयत्न नाही! :)

अवांतर - २

अवांतर १ सकट वरील संपूर्ण प्रतिसाद स्ट्र्क्ट्ली 'हलकेच घ्या' या सदरात मोडतो/मोडावा असे आम्ही जाहीर करतो! :)

आपला,
(थोडासा मजेशीर!) तात्या.

आनंदयात्री's picture

12 Mar 2008 - 10:50 am | आनंदयात्री

उत्तम प्रतिसाद

-(आपला अविवाहित ब्राह्मण) आनंदयात्री

अवांतरः
कृपया वरिल प्रतिसादातील रेफर करावेत ;)

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 11:00 am | विजुभाऊ

अविवाहित ब्राह्मण .....लग्नाला भटजी म्हणून चालतो काय?( हे म्हणजे लग्नात गणपती ची पूजा करावी...प्र.: मग गणपतीच्या लग्नात त्याने कोणाची पूजा केली होती?...सारखे झाले)
तज्ञानी खुलासा करावा............
आपला शन्केखोर
विजुभाऊ

आनंदयात्री's picture

12 Mar 2008 - 11:03 am | आनंदयात्री

तुम्हाला तुमच्या लग्नात भटजी फुकट हवा आहे काय ??

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 11:35 am | इनोबा म्हणे

आपला भ्रमण ध्वनी क्रमांक दिलात तर बरे होईल.धोंडोपंत फार महागात पडतात हो!

(फुकट ते पौष्टीक मानणारा)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

सृष्टीलावण्या's picture

12 Mar 2008 - 12:11 pm | सृष्टीलावण्या

जाता जाता कोणीतरी धोंडोपंतसुद्धा पौरोहित्य करतात असा प्रचार करत आहे.

सावधान. हा तर marketing चा प्रयत्न दिसतोय.

(स्वस्त तेच मस्त मानणारी)
सृलाताई.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 12:39 pm | विसोबा खेचर

जाता जाता कोणीतरी धोंडोपंतसुद्धा पौरोहित्य करतात असा प्रचार करत आहे.

छ्या! धोंड्या काय पौरोहित्य करणार कप्पाळ? त्याला फोकलिच्याला अथर्वशीर्षापलिकडे काही म्हणता येत नाही! :)

तात्या.

आनंदयात्री's picture

12 Mar 2008 - 2:11 pm | आनंदयात्री

:) :) :)
कोण कुठे कशा संदर्भात शिव्या खाईल, काही भरवसाच नाही बाबा !! असो ... आहेच जिन्दादिल मिसळ्पाव आमचे !!

मिसळधर्माचा विजय असो !!
धोंडोपंतांचा,
सृष्टीलावण्येचा,
विसोबा खेचरांचा,
अन राहिलच तर आनंदयात्रीचा विजय असो !!

विजय असो !! विजय असो !! विजय असो !!

प्रमोद देव's picture

12 Mar 2008 - 2:30 pm | प्रमोद देव

:))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))

सृष्टीलावण्या's picture

12 Mar 2008 - 5:27 pm | सृष्टीलावण्या

अथर्वशीर्ष येते हेच खूप नाही का... मी तर असे गुरुजी पाहिलेत की त्यांना धड अथर्वशीर्ष पण पूर्ण येत नाही (हे मी गीतेवर हात ठेऊन म्हणायला तयार आहे) पण फक्त गणेशोत्सवात त्यांचा तोरा पाहायचा.

असो.

अवांतर:
(तात्या नोंद घ्यावी.) सहज एक विनोद आठवला. एक खेडूत प्रवचनकारांना म्हणतो, महाराज, ज्ञानेश्वरीत किती अध्याय आहेत. प्रवचनकार वसकन् ओरडतो, "ज्ञानेश्वरांनी सुरवातीलाच सांगितले आहे, ॐ न मोजी अध्याय..."

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

राजमुद्रा's picture

12 Mar 2008 - 12:11 pm | राजमुद्रा

मुग्ध करून टाकतात रातराणीच्या कळ्या
----- रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या

गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं
---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकललं

हा हा हा :)

राजमुद्रा :)

किशोरी's picture

12 Mar 2008 - 12:28 pm | किशोरी

>>म्हणजे?? अजून आपले लग्न व्हायचे आहे वाटतं! बरं बरं, आमच्याही मनापासून शुभेच्छा बरं का! सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवा बरं का! :)
धन्यवाद तात्या!! आणी लग्नाला तर बोलवणारच हो,आधी एखादा नमुना तर भेटु दे(लग्नाआधी कीतीही छान वाट्ला तरी,
लग्नानंतर आपल्याला नमुना भेटला आहे अस बरेच जण म्हणतात :))

>>वरील 'अविवाहीत' हा शब्द लिहिण्यामागे कोणताही क्लू देण्याचा हेतूवजा प्रयत्न नाही! :)
हा हा हा हा....बर झाल सांगितलत :))
अहो तात्या तुम्ही आधीच अनुष्का पसंत करुन ठेवली आहे,नाहीतर अविवाहीत शब्द क्लू म्हणुन घेतला असता :))))
(आगाऊपणाबद्द्ल माफी करा,मजेत लिहीले आहे) :)

किशोरी's picture

12 Mar 2008 - 5:20 pm | किशोरी

>>गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं
---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकललं

हा हा हा हा :))))
कुठुन सुचतात हो तुम्हाला असे उखाणे,मजा आली

मदनबाण's picture

29 Mar 2008 - 8:02 am | मदनबाण

ई-पत्रा द्वारे आलेले अजुन काही नवीनउखाणे:--

१) आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार
-------------------------------------
२) लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास
-------------------------------------
३) गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास
गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास
-------------------------------------
४) विड्याच्या पानावर पाव शेर कात
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ
-------------------------------------
५) गोव्यावरुन आणले काजु
गणपतरावांच्या थोबाडात वाजवायला मी का लाजु
-------------------------------------
६) अलिकडे अमेरिका पलिकडे अमेरिका
नाव घ्यायला सांगु नका मी आहे कुमारीका
-------------------------------------

उदय सप्रे's picture

1 Apr 2008 - 9:47 am | उदय सप्रे

हा उखाणा आहे, कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा !

अगाध असते देवाची करणी निर्मितो नारळात पाणी
शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी" !

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 10:03 am | विसोबा खेचर

अगाध असते देवाची करणी निर्मितो नारळात पाणी
शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी" !

क्लास! :)

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

उखाणा मस्त आहे. पण कैरी, लिंबू अशा गोलमटोळ व्यक्तिमत्वांसाठी 'लोणच्याची बरणी'च शोभून दिसते.

nit05's picture

7 Jan 2009 - 6:20 pm | nit05

विड्याच्या पानावर पाव शेर कात
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ

एक दम क्लास आहे.

ऋचा's picture

7 Jan 2009 - 6:37 pm | ऋचा

अजुन एक...

खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका
मी तुझी मांजर तु माझा बोका

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अनिल हटेला's picture

7 Jan 2009 - 6:40 pm | अनिल हटेला

पेश है.....
हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा ,
हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा ,

हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा ,
हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा ,

आरे ते जाउ देत,
त्या हंड्याचा बॅलन्स बघा....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

योगी९००'s picture

7 Jan 2009 - 7:50 pm | योगी९००

द्रौपदी काय उखाणा घेईल ओ...?

(मला माहित आहे पण थोडा चावट आहे म्हणून येथे देत नाही). कोणाला चांगला माहित आहे का?

खादाडमाऊ

मूखदूर्बळ's picture

13 Jan 2009 - 10:42 am | मूखदूर्बळ

द्रौपदीचा उखाणा :
.
प्रेमाचा घास दिला नाही म्हणून अमूकराव भडकले
प्रत्येकाला भरवता भरवता माझेच 'पंच'प्राण अडकले
.
मल्लीकाबाईंच्या अहोंचा उखाणा :
.
सोन्याच्या चुलीवर चांदीचा तवा
मल्लीकाबाईंच्या केसात बारा गावच्या उवा
.

"चन्द्र वाढतो कलेकलेनी "
"हीचे वजन वाढते किलोकिलोनी"

(किलोकिलोनी नव्हे टनाटनानी)

सुहास.....

माहीती-त॑त्रज्ञानामधील गोदामाचा अभिया॑त्रीकी....

स्पृहा's picture

16 Jan 2009 - 4:06 pm | स्पृहा

अजुन एक...

झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
---दिसतात जसे डुकराचे पिलु

बाळु's picture

20 Jan 2009 - 1:59 am | बाळु

१ नंबर आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सध्या अच्चीत गच्चीचा उखाणा व्हॅट्सअपवर जोरात फिरत आहे... त्यामुळेच हा धागा देखील आठवला. ;)

बाकीत गच्चीत झाड हे किती लाडिक {नाटकी} पणाने म्हंटले आहे ते मला फार फार आवडले. ;)
बाकी दुसर्‍या धाग्याचाही दुवा देतो... वाचकांनी लुफ्त घ्यावा. ;)

..उखाणे (काहीच्या बाही)..

>>बाकीत गच्चीत झाड हे किती लाडिक {नाटकी} पणाने म्हंटले आहे ते मला फार फार आवडलं.
अगदी. कामतकाकूंनी ती जागा अगदी झकासच घेतलीय.

HEMALATA DHANAJI CHIPTE's picture

2 Jan 2014 - 2:50 pm | HEMALATA DHANAJ...

छान