अननसाचा शिरा

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
18 Jun 2009 - 2:53 pm

साहित्यः-
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी अननसाच्या फोडी
अर्धी वाटी साजूक तूप
१ वाटी साखर
दीड वाटी दूध
अर्धी वाटी पाणी

कृती:-
प्रथम एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात अथवा कढईत रवा कोरडा भाजून घ्यावा.
मिक्सरच्या भांड्यात अननसाच्या फोडी घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यावी.
एका कढईत तूप घालून ते थोडे गरम झाले की त्यात अननसाची पेस्ट घालावी. दुसर्‍या गॅसवर एका पातेल्यात दूध आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. तुपात घातलेली अननसाची पेस्ट चांगली परतून घ्यावी. आता त्यात भाजलेला रवा घालून तो साधारण एक ते दोन मिनिटे परतावा. त्याला छान तांबूस रंग येईल.
तोवर पाणी+दूध याला एक उकळी आली असेल. हे उकळी आलेले मिश्रण रव्यात घालावे. रवा चांगला फुलून येईल. त्यावर झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
त्यानंतर त्यात साखर घालून चांगले ढवळावे. परत एकदा झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
अननसाचा शिरा तयार आहे. :)

शिरा थोडा कोमट असतानाच मोदकाच्या साच्यात घालून शिर्‍याचे मोदक करावेत.
अश्याच पद्धतीने आंब्याचा रस घालून केलेला 'आम्रशिरा' सुद्धा खूप चविष्ट लागतो.

--शाल्मली.

प्रतिक्रिया

काजुकतली's picture

18 Jun 2009 - 3:31 pm | काजुकतली

ऑफिसच्या फुडकोर्टमध्ये आज होता. त्यात अननसाच्या फोडी होत्या. त्यामुळे मला वाटले की फोडीच घालायच्या की काय.

पाकृ बद्दल आभार. केळ्याचा करताना असाच करायचा काय??

साधना

पर्नल नेने मराठे's picture

18 Jun 2009 - 3:38 pm | पर्नल नेने मराठे

हो, केळ्याचा करताना तुपात केळ्याचे पातळ काप परतुन घायचे. मग रवा घालायचा.
चुचु

सायली पानसे's picture

18 Jun 2009 - 3:40 pm | सायली पानसे

छान आहे रेसिपी ... करुन बघते वीकांतालाच.

टारझन's picture

18 Jun 2009 - 9:56 pm | टारझन

जीव घेतलात हो वैणी .... :( :( :( विक पाईंट आहे शिरा म्हणजे

-(शिरा प्रेमी) टारझन

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2009 - 6:40 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!!!

बिपिन कार्यकर्ते

काजुकतली's picture

18 Jun 2009 - 3:48 pm | काजुकतली

धन्यवाद चुचु.. मी गेल्या आठवड्यात केलेला तेव्हा सगळ्यात शेवटी केळ्याचे काप घातलेले, त्यामुळे नेमकी चव येत नव्हती. आता वर दिल्याप्रमाणे करेन. :)

शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!शिरा! शिरा! शिरा!
.....वाहून गेलो!! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, शिरा मोदकाच्या साच्यातून काढलाय, म्हणजे लिखाळांची तुळशीबाग सफर घडलेली दिसते! ;) )

()चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2009 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार

मार डाला ..........

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

18 Jun 2009 - 5:16 pm | निखिल देशपांडे

मस्तच आहे शिरा नुसते वाचुनच तोंडाला पाणी सुटले...
शिरा करुन बघणे तर शक्य नाही. (कधी चहा निट केला नाही शिरा काय करणार)
काय करावे कुठे मिळेल हा शिरा????

== (अननस शिर्‍याचा शोधात)निखिल

स्वाती दिनेश's picture

18 Jun 2009 - 5:52 pm | स्वाती दिनेश

शिरामोदक छान दिसत आहेत,:)
मी अननस शिरा थोड्या वेगळ्या पध्दतीने करते. फोडी +पेस्ट दोन्ही ठेवते आणि पाणी अजिबात घालत नाही. फक्त दूधात करते. तसेच आंबा शिरा करतानाही रस+ फोडी घालते.
स्वाती

शाल्मली's picture

18 Jun 2009 - 7:57 pm | शाल्मली

मागच्या वेळेला मी केला होता तेव्हा अननसाच्या आख्ख्या फोडी घातल्या होत्या. पण त्याची शिर्‍याला अननसाची अशी विशेष चव लागली नव्हती. म्हणून या वेळेस त्याची पेस्ट केली. पण आता थोड्या फोडी+पेस्ट असं करुन पाहीन.

--शाल्मली.

रेवती's picture

18 Jun 2009 - 7:59 pm | रेवती

असेच म्हणते.
आता फोडी+पेस्ट असा प्रयोग!

रेवती

सहज's picture

18 Jun 2009 - 5:17 pm | सहज

करुन पहायला हवा!

धन्यु.

चकली's picture

18 Jun 2009 - 5:30 pm | चकली

छान पाकृ!! मस्तच झालाय शिरा

चकली
http://chakali.blogspot.com

मराठमोळा's picture

18 Jun 2009 - 6:23 pm | मराठमोळा

एकदम जबरदस्त!!!! अहाहा..
शल्मली तै. नुसता फोटो पाहुनच आनंद झाला. धन्यवाद. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती's picture

18 Jun 2009 - 6:42 pm | रेवती

आईग्ग!
कसला मस्त फोटू आलाय!
अननसाचा शिरा करावाच लागणार आता.
दोनवेळा हा शिरा ट्राय केला पण म्हणावा तसा जमला नाही आता तुझ्या पद्धतीने करून बघते.

रेवती

मदनबाण's picture

18 Jun 2009 - 8:24 pm | मदनबाण

आह्हाह्ह्ह्ह्ह्ह.....काय पण फोटो काढला आहे मस्त!!! :)
फोटो पाहुनच पोटु भरलं.
'आम्रशिरा'पण मस्तच लागतो.

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

दिपाली पाटिल's picture

18 Jun 2009 - 9:20 pm | दिपाली पाटिल

मस्त च आहे अननसा चा शिरा. माझ्या मोदक साच्या चा अजुन एक उपयोग समजला. :)

दिपाली :)

समिधा's picture

18 Jun 2009 - 9:56 pm | समिधा

खुपच मस्त दिसतोय हा शिरा करुन बघतेच. :)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राजु's picture

18 Jun 2009 - 10:04 pm | प्राजु

ज ह ब ह र्‍या!!!!!!!!!
मस्त मस्त!

:)( सगळ्यांच्याकडे मोदकाचे साचे आहेत. माझ्याकडेच नाही. २० जून ला बाबा येणार आहेत त्यांना सांगितलं तर म्हणाले ,"मी अजिबात त्या तुळशीबागेत जाणार नाही.. तू येशिल तिकडे तेव्हा तुझा तूच आण.") :(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 12:12 am | विसोबा खेचर

शाल्मली,

तुझं कौतुक करण्याकरता आणि अननसाच्या शिर्‍याला दाद देण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत!

असो...

भावजींना नमस्कार... :)

तात्या.

टारझन's picture

19 Jun 2009 - 8:29 am | टारझन

कृपया नमस्कारांसाठी खरडवह्यांची सोय केलेली आहे. मिपाच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्याबद्दल तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

-आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

(आयला टार्‍या आज खातोय फटके .. पळ पट्कन .. )

धनंजय's picture

19 Jun 2009 - 3:48 am | धनंजय

शिरा लवकरच करतो - बहुधा पिवळाधमक्क व्हावा म्हणून मक्याच्या रव्याचा करीन, म्हणतो.

मोदकाच्या साच्यासाठी घरच्यांना तुळशीबागेत पाठवावे लागेल, असे वाटते.

चित्रा's picture

19 Jun 2009 - 7:38 am | चित्रा

मोदक करणे मला कधी सुचले नसते. मग अननसाचा शिरा तर जाऊच दे.
छान पाककृती.

शितल's picture

19 Jun 2009 - 8:09 am | शितल

शाल्मली,
फोटो मस्तच आणि अननसाचा शिरा फक्त खाल्ला आहे कधी केला नाही आता तु सांगितल्या प्रमाणे करून पाहिन. :)

हरकाम्या's picture

19 Jun 2009 - 11:40 am | हरकाम्या

उत्तम.........strong>

अवलिया's picture

19 Jun 2009 - 7:06 pm | अवलिया

.

टारझन's picture

19 Jun 2009 - 12:07 pm | टारझन

केलं ... खालचं सगळं डार्क काळं केलं ह्यानं .. आर्रं हारकाम्या ... उघडला तो बंद कर की लका ..टॅग ..

क्रान्ति's picture

19 Jun 2009 - 6:48 pm | क्रान्ति

मोदकरुपातला अननसाचा शिरा खास!
अवांतर - [मिपावर नुसते फोटोच का येतात? पाकृची चव घ्यायची पण सोय हवीय!] ;)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Jun 2009 - 6:54 pm | ब्रिटिश टिंग्या

सुप्पर!

अवलिया's picture

19 Jun 2009 - 7:04 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

शाल्मली's picture

22 Jun 2009 - 2:17 pm | शाल्मली

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
आभारी आहे :)
ज्यांच्याकडे मोदकाचा साचा नाही त्यांनी तुळशीबागेसाठी अडून राहू नये. वाटीने शिर्‍याची मूद पाडावी अथवा वाटीत घेऊन तसाचा हाणावा. ;)

--शाल्मली.

रेवती's picture

28 Jun 2009 - 6:16 pm | रेवती

अननसाचा शिरा करून पाहिला. छान झाला होता.
पेस्ट व फोडी असा प्रयोग यशस्वी झाला. पेस्ट करून घातल्यामुळे अननसाचा स्वाद आला. आधी नुसत्या फोडींचा केला होता तर इतका चांगला झाला नव्हता.
धन्यवाद!

रेवती

JAGOMOHANPYARE's picture

21 Jul 2009 - 11:05 am | JAGOMOHANPYARE

हा फोटो आज डेस्क टॉपवर लावलेला आहे.... शिर्‍याची भूक फोटोवर ... ( दुधाची तहान ताकावर) .... :) .... पण एकदा करून बघेन स्वत: