चालू घडामोडी: जानेवारी २०२६

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in काथ्याकूट
1 Jan 2026 - 12:06 am
गाभा: 

सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!

सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.

या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.

तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.

* कांदा लिंबू

प्रतिक्रिया

मणिकर्णिका घाटाची अवस्था काय आहे ते या एक वर्षांपूर्वीच्या विडिओमध्ये(१०:०० पासून पुढे) पाहता येईल. Exploring Kashi - city older than history l secrets of Manikarnika Ghat l Banaras temples and food tour.
https://youtu.be/gAdJBifdVYI?si=pzXzAQ2ERa45NvGf

युयुत्सु's picture

16 Jan 2026 - 8:09 am | युयुत्सु

गलिच्छपणा, विकृतपणा, क्रुरता यांना पावित्र्याचे मुलामे चढवायचे काम धर्म करत असतो. मग मंदबुद्धी लोकांना त्यांचा 'अभिमान' (आय मिन दुरभिमान) निर्माण होतो.

विवेकपटाईत's picture

16 Jan 2026 - 5:17 pm | विवेकपटाईत

सनातन धर्मात सर्वांना टीका टिपणी करण्याची मुभा आहे. पण अब्राहिम धर्माच्या विरुद्ध तुम्ही टिप्पणी करून पहा...

कपिलमुनी's picture

16 Jan 2026 - 2:06 pm | कपिलमुनी

पिवळा पडला तर ताजमहाल तोडणार का ?
अतिक्रमण काढून मूळ घाटाचे संवर्धन करता आले असते .

भारतीय पुरातत्व खाते नावाचे बाहुले आहे , त्यांचे काम अशा जागा संवर्धित करणे आहे , पण आले शेठच्या मना , तिथे कोणाचे चालेना.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jan 2026 - 3:58 am | हणमंतअण्णा शंकर...

कपिलमुनी,
होळकर तत्कालिन संस्थानिक म्हणजे शासन होते. त्यांनी घाट बांधतना तोडफोड केली नसेल का?
प्रत्येक शासन त्या त्या काळच्या सौंदर्य दृष्टीने तोडफोड करून नवे काहीतरी बांधत राहणारच आहे. २०० वर्षांनी तिथे ग्लास फायबरचा पारदर्शक घाट बांधतील. तेव्हा कुणीतरी म्हणेल किती सुंदर टाईल्स होत्या.

आपण कशाला इतका लोड घ्यायचा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2026 - 12:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिल्याबाई होळकरांनी अंदाजे तीन हजारांपेक्षा अधिक घाट केले आणि मंदिरे बांधली. तत्कालीन काळात नदी काठावर अशी व्यवस्था नव्हती, असे वाटते. आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवरा- गोदाकाठी संगमावर अशी सुंदर घाट आणि मंदिरे आहेत, ही घाट अठराव्या शतकात बांधलेली आहेत. आज तीनशे वर्षाहून अधिक काळ झाला पण अजिबात पडझड झालेली नाही. तत्कालीन प्रवाशांसाठी ऐतिहासिक 'बारवा' असाच विषय आहे. सद्य महाराष्ट्र सरकारने संवर्धनासाठी नुकतीच काही तरतुद केल्याचे वाचनात आले. चांगली गोष्ट आहे.

आपल्याकडे ऐतिहासिक गोष्टी संवर्धन करायची, पुरातन गोष्टी जपायची सवय नाही. उकरुन काढायची नवी परंपरा विकसीत झालेली आहे. विकासाच्या नावाखाली काही ऐतिहासिक किमान काही गोष्टी तरी सोडल्या पाहिजेत, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jan 2026 - 2:03 pm | हणमंतअण्णा शंकर...

>> अहिल्याबाई होळकरांनी अंदाजे तीन हजारांपेक्षा अधिक घाट केले आणि मंदिरे बांधली. <<

म्हणजे युटिलिटी म्हणूनच बांधली ना? त्या त्या वेळच्या समाजाच्या सोयीसाठी होळकरांनी त्यांच्या बुद्धीला पटेल रुचेल ते केले. लोकांना चॉइस देखील नव्हता.

आता सर्वांनी आनंदाने निवडून दिलेले लाडके भाऊ आणि विश्वगुरु त्यांच्या त्यांच्या बुद्धीने आणि रुचीने समाजासाठीच हे कॉरिडॉर बांधत आहेत ना?

तिथे लेझर लाईट लागतील, घाट स्वच्छ होईल, लुबाडता येणारे पर्यटक येतील, त्यांच्या रीळा काढतील, समाजाला हेच तर हवंय.

तुमच्या सारख्या काही चुकार चार पाच लोकांना हळहळ वाटली तरी उर्वरित ९९ टक्क्यांना हेच हवं आहे.

विवेकपटाईत's picture

17 Jan 2026 - 7:39 am | विवेकपटाईत

काशीला तुम्ही गेले आहात का. नवीन कॉरिडॉर बनले तेंव्हा लोकांच्या घरात बंदिस्त केलेली, अवैध निर्माण करून लपवलेली अनेक मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला त्यातील दोन मंदिर येतात मुख्य मंदिराच्या परिसरात आहे आणि त्यांना तसेच जीर्णोद्वा रकेले आहे. जाऊ स्वतः डोळ्यांनी बघू शकता. अधिक ठिकाणी आधीच घाटांना व्यवस्थित आणि उत्तम रीतीने पुन्हा बांधते आहे लोकांच्या सोयी साठी. भारतातील मंदिरे आणि मेले समाजवादी अर्थव्यवस्थाचे प्रतिक आहे जेणेकरून काही लोकांच्या हातातील धन समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचते.

विवेकपटाईत's picture

16 Jan 2026 - 5:15 pm | विवेकपटाईत

घाट तोडलेला नाही. सर्व घाटांची दुरुस्ती सुरू आहे. तुमचे म्हणणे आहे की सरकारने घाटांची दुरुस्ती न करता त्यांना भग्न अवस्थेतच राहू द्यावे. बाकी मंदिर परिसरात माता अहिल्याबाईंची मूर्ती स्थापित करून मोदीजींनी तिचे कार्य कोट्यावती भारतीयांपर्यंत पोहोचवले. बहुतेक त्याचेच दुःख झाले असावे.

कपिलमुनी's picture

16 Jan 2026 - 10:15 pm | कपिलमुनी

उद्या मोदी पादला तरी रातराणी फुलली म्हणतील

कपिलमुनी's picture

16 Jan 2026 - 10:15 pm | कपिलमुनी

उद्या मोदी पादला तरी रातराणी फुलली म्हणतील

कपिलमुनी's picture

16 Jan 2026 - 10:15 pm | कपिलमुनी

उद्या मोदी पादला तरी रातराणी फुलली म्हणतील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2026 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाट तोडलेला नाही.

फेकाफेकी करण्यात पण 'पटाईत' आहात. गुगलवर काही सर्च केले असते तर, काही दिसले असते. घाट उध्वस्त केलेले छायाचित्रे दिसली असती. भग्न अवस्थेत वगैरे काही नव्हते. चांगल्या अवस्थेत होते. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली व्यवसायिकरणासाठी असलेली जागा सपाट केली आहे, भविष्यात काय करतील ते इथे दिले आहे.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

18 Jan 2026 - 6:07 pm | मदनबाण

अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक मनकर्णिका घाट अधर्मी , हिंदू द्वेषी सरकारने तोडला. मंदिरे, मूर्ती यांची तोडफोड केली.
मणिकर्णिका प्रश्न चिघळतोय अस संध्या तरी वाटतंय. काही एक्स हॅडल्स वर केसेस दाखल केल्या गेल्याचे समजले. (आरोप बहुतेक चुकीच्या बातम्या देणे,एआयचा वापर करुन बनवलेली चित्रे पसरवणे/ इ. काही आरोप असावेत.) मी एक व्हिडियो पाहिला ज्यात एका तोडलेल्या भागातील एका मूर्तीवर पाय ठेवून एक व्यक्ती पुढे जात होता,मूर्ती अहिल्यादेवींची सांगितले जाते आहे!
Modi’s Manikarnika Ghat 'Makeover' | Destroying Kashi To Make A Budget Disneyland? | Akash Banerjee

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack

कालच्या महापालिका निवडणुकींचे निकाल पाहता प्रश्न पडतो विविध पक्षांचे जुने मतदार का फिरले? न घाबरता मतदान केलं आणि साथ सोडली.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2026 - 5:25 pm | अमरेंद्र बाहुबली

मतदार तिथेच आहे हो, पण निवडणूक आयोगच इतर पक्षांच्या मतदारांची नावे उडवतोय, भाजपला पैसे वाटू देतोय नी खराब मशीन्स (म्हणजे जीत “चुकून” भाजपलाच मत जाते कुठलेही बटण दाबले तरी) विरोधी उमेदवारांवर चाकू हल्ले पिस्तुल हल्ले करू देतोय, तर वेगळा निकाल लागणार का?

विवेकपटाईत's picture

17 Jan 2026 - 7:44 am | विवेकपटाईत

तुमच्या मते मतदान केंद्रात असलेले पोलिंग एजंट झोपलेले असतात. फक्त जिथे ठाकरे सेना जिंकली त्या ठिकाणच्या मशीन ठीक होत्या. बहुतेक फक्त 116 जागांच्या मशीन खराब असतील. बाकी मतदान ४५ टक्के झाले असते तर महायुतीचा दारुण पराभव झाला. ६० टक्के झाला असता तर महायुतीला 175 जागा मिळाल्या असतात हे मुंबईचे वास्तव आहे.

आग्या१९९०'s picture

17 Jan 2026 - 8:29 am | आग्या१९९०

महाराष्ट्रात मतदान केंद्रावर अनेक प्रकाराच्या लबाड्या केल्या गेल्या ह्याचे शेकडो व्हिडिओ समोर आले आहे. पोलिस आणि निवडणूक कर्मचारी ह्यांचा पक्षपातीपणा स्पष्टपणे दिसून आला. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे व्हिडिओ आहेत. निवडणूक आयोगाला अजून काय पुरावे हवे?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Jan 2026 - 10:28 am | अमरेंद्र बाहुबली

+1

उद्धव सेनेला अपेक्षेप्रमाणे यश आले नाही यावर मंत्री नितीश राणे "ओक्साबोक्शी हसले " असं एका राजकीय समिक्षकाने म्हटले आहे. कारण हसावे का रडावे हा उद्धवसाहेबांना प्रश्न पडला असेल. सत्तरेक जागा जिंकल्यामुळे रडून इविएमवर खापरही फोडतात येत नाही आणि बहुमतासाठी जागा कमी पडल्याने आनंदही होत नाही अशी कुचंबणा झाली.
पुढे काय?
टोमणे मार मारून हैराण करणार. ते आजपासूनच सुरू झाले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2026 - 8:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकशाहीतील निवडणूका म्हटल्या की, कोणी हरणार कोणी जिंकणार आपण विश्लेषण करतो ते आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने. मुंबई महापालिका निवडणूका महाराष्ट्रभर चर्चेचा विषय होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, दोघे भाऊ निवडणूकीत एकत्र आले हे अनेक मराठी माणसांना सुखावणारे होते. उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्या सभा गाजल्या. निवडणूकीचे मुद्दे बिनतोड होते. अदानीने मुंबई गिळली पासून ते मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय इथपर्यंत.

उद्धवसेनेनेकडे विधानसभा निवडणूकीत पदरी आलेलं अपयश. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांच्याकडे म्हणून त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नव्हतं. गेल्या दोन वर्षात सोडून गेलेले असंख्य नगरसेवक. सत्ता संपत्तीच्या बळावर भाजप- मिंधे गटाची दहशत. सत्तेच्या बळावर धकावत, आमिषं दाखवत, उद्धवसेना खिळखिळी करुन टाकली. लढणारे कार्यकर्ते आणि हमखास निवडून येतील असे कार्यकर्ते ऐनवेळी भाजपात दाखल झाले. अशा वेळी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनापासून सोबत केली ती जिंदादिल जीगरबाज मराठी माणसाने. मराठी पट्ट्यात मराठी माणूस उद्धव सेनेच्या पाठीमागे जिद्दीने उभा राहिला, ताकद दिली. सगळं गमावलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा विश्वास मराठी माणसांनी दिला. सर्व गमावले असताना दोघांनी मिळून ६५ +०६ असे नगरसेवक निवडून आले, आपला मराठी माणसाचा बाला किल्ला राखून ठेवला. मला वाटतं इथे मराठी माणूस जिंकला उद्धव ठाकरे जिंकले.

काही राहिलेले नगरसेवक आणि नवे चेहरे ही उद्धव ठाकरेंसोबत राहिले. दोन हजार दोन ते ते दोन हजार सतरापर्यंत निवडून आलेल्या जवळ जवळ ११५ नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेतला. सत्ता नसली की लोक वेडे होतात. कायम सत्तेशी नातं असलं पाहिजे असे ज्यांना ज्यांना वाटतं ते सर्व सोडून गेले. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व, आदित्य ठाकरे यांचं नवं पाऊल आणि जे जीगरबाज कार्यकर्ते नेते उद्धवसेनेला जिंकण्यासाठी लढत ते या निवडणूकीत उतरले आणि नव्या चेह-यांसोबत जिंकले. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) यांना जवळ जवळ आठ लाख मतदान म्हणजे मतदानाच्या चौदा टक्के मतदान तर, विजयी उमेदवारांची मतदान टक्केवारी ही सत्तावीस टक्के होती. ( लोकसत्ता आकडेमोड साभार ) अशी आहे, याचाच अर्थ असा मुंबई महापालिकेच्या निवड्णूकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी माणसाने जिंदादिली दाखवून भरभरुन मतदाने केले.

आता, निवडणूकांचा घोळ, सोयीचं सगळं भाजपा सत्ता असल्यामुळे सगळं करुन घेतो. महापालिकांच्या निवडणूका झाल्या पण निवडणूकांचे चक्राकार आरक्षण सोडत अजून काढून झालेली नाही. निवडणूकीपूर्वीच हे करावे लागते, त्यामुळे सोडत निघाल्याशिवाय महापोर होणार नाही. अजून सगळ्या गोष्टीस वेळ आहे, तो पर्यंत भाजपा- आणि मिंधे गटाच्या महापोरास मुंबईच्या विकासासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jan 2026 - 8:28 am | अमरेंद्र बाहुबली

खूप छान प्रतिसाद बिरुटे सर, सगळे काही गमावले असताना ० तून सुरुवात करून ठाकरे बंधूनी ७१ नगरसेवक निवडून आणले हे खरोखर वाखणण्याजोगे आहे! इतका पैसा, संपत्ती, इडी, निवडणूक आयोग सोबत असूनही भाजपला १०० आकडा गाठता आला नाही, ईव्हीएम मशीन्सवर बारकाईने लक्ष ठेवले, डुप्लिकेट वोटिंग करणाऱ्याना जागेवर चोप दिला तर असे निकाल लागतात नाहीतर काय होते हे विधानसभेला आपण पाहिले. बाकी शिवसेना फोडून शिंदेंनी काय मिळवले?, शिंदे जिंकले असते तर वेगळी गोष्ट होती, पण “तुला नाही मला, घाल कुत्र्याला” असे करून शिंदेनी नेमके काय मिळवले हे कळत नाही, आजवर एक चांगला शिवसैनिक म्हणून शिंदेंबद्दल आदर होता, पण आता तो ही त्यांनी गमावला, शिंदेंबद्दल आता तिरस्कार वाटू लागला आहे, आजवर अनेक लोक शिवसेना सोडून गेले राणे, भुजबळ वगैरे पण शिवसेना संपवून भाजप वाढवण्यासाठी जीवाचे रान करणारा कुणी झाला नाही, मुंबईतर गेलीच पण स्वतच्या ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर अश्या भागातही भाजपला मोठे करून ठेवले आहे, उद्या हाच भाजप पक्ष आपल्या परंपरेला अनुसरून शिंदेंना राजकारणातून संपवेल, पण तो पर्यंत मराठी माणसाचे प्रचंड नुकसान शिंदेनी करून ठेवलेले असेल, बाकीच्या भिकार महापालिका भाजपकडे गेल्या ह्याचे वाईट नाही वाटले पण मुंबई पालिका शिवसेनेंकडे आणी पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका अजितदादांकडे असायला हव्या होत्या असे मनापासून वाटते, पुण्यात राष्ट्रवादीचे लोक कामे करताना रस्तोरस्ती दिसतात, भाजपचं कुत्रही दिसत नाही कुठे!
काल परवा पासून ट्विटर वगैरे सोशल मीडियावर मराठी माणसांविरुद्ध भाजपच्या परप्रांतीयांच्या पोस्टचा ऊत आला आहे, ठाकरे बंधू, शिवसेनेविरुद्ध गरळ ओकली असती तर समजू शकलो असतो पण ते सरळ मराठी माणूस हा शब्द वापरून काहीबाही लिहिताहेत, मराठी माणसाविरुद्ध भाजपेयींच्या मनात इतका कसला राग आणी द्वेष आहे कळत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2026 - 8:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादाशी सहमत.

शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचं महापालिका नगरसेवकांचे बळ पाहिले तर, आकडा शंभरी गाठतो. भाजपापेक्षा पुढे जातात. याचा अर्थ असा की मुंबईत मराठी माणूस शिवसेनेकडेच आशेने पाहतो. शिवसेनेच्या पाठीशी राहतो. शिवसेनेला बळ देतो. बाकी, आज सत्ता शिवसेनेकडे ( उद्धव ठाकरे) नाही तरी निकराची झूंज दिली. लढले. निवडणूकीत सगळीकडून सगळे शिवसेनेवर तुटून पडलेले. अशा वेळी एकटे छातीचा कोट करुन लढले मिळालेलं यश पक्षासाठी आनंदायी आहे, ठाकरेंच्या चेह-यावर तो आनंद दिसतो.

-दिलीप बिरुटे

कांदा लिंबू's picture

18 Jan 2026 - 8:40 am | कांदा लिंबू

वाह, मस्त विनोदी लिहिलं आहे; छान वाटलं. अजून येऊ द्या!

कांदा लिंबू's picture

18 Jan 2026 - 8:43 am | कांदा लिंबू

13 दिवसांचे सरकार असताना अटल बिहारी वाजपेयींनी विक्टोरीया टर्मीनस चे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्याचा जो प्रस्ताव युती राज्य सरकारकडून आला होता त्यासाठी केंद्राकडून मार्ग मोकळा करून दिला होता.
तसेच सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी अंतराष्ट्रीय विमानतळ करण्याचे काम सुद्धा अटल बिहारी वाजपेयींनी केले होते.
पहिल्यांदा भारतीय नाण्यांवर छत्रपतींची प्रतीमा छापणारे सरकार हे अटल बिहारी वाजपेयींचे होते.
नावात "बिहारी" असणाऱ्या व्यक्तीने ऐवढं केलं होतं आणि आमचे शरद पवार "संभाजीनगर" बोलायला सुद्धा नकार देतात.
ऐवढंच काय तर बॉम्बे चे नामांतरण मुंबई करण्याचा जो निर्णय झाला तो सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या युती सरकारने घेतला होता,
बहुमतासाठी लागणारे ५०% आमदार हे भाजपचे होते.
1985 चा अपवाद वगळता शिवसेनेला कधीही स्वबळावर मुंबई महानगरपालिकेवर बहुमताचा आकडा गाठता आला नाही,
1997 पासून जे काही शिवसेनेचे महापौर झाले ते भाजपच्या पाठिंब्यावर.
बाळासाहेबांनी मुंबईत मराठी माणूस टिकवला पण ते करताना भाजपच्या पाठिंब्यावर कारभार चालू होता.
आज लोकं गुजरातचं राज्य येणार अशी भिती दाखवत आहेत,
पण 80 व 90 दी च्या काळात मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत डॉन लोकांचा पलडा भारी होता,
काँग्रेसने कधीही अंडरवल्ड वर कारवाई केली नाही आणि प्रकरण शेवटी ऐवढं वाढलं की दाऊदने पाकिस्तानातून स्फोटके आयात करून मुंबईत कित्येक बॉमब्लास्ट केले,
मुंबई ही आर्थिक राजधानी ज्या व्यापारी वर्गामूळे आहे ते जीव मुठीत घेऊन जगत होते,
गुलशन कुमारची हत्या सगळ्यात मोठा इंवेट ठरला होता,
एक एक करून श्रीमंत लोकं मुंबईतून बाहेर पडत होती.
यावेळी कोणत्या व्यक्तीच्या हाती गृहमंत्रालय गेल्यावर हा सगळा प्रकार मुंबईत थांबलेला आठवतय का ?
गृहमंत्री गोपीनाथ मुंडे!
एकेकाळी आर्थिक राजधानी असल्याले कोलकत्ता हे कम्यूनीस्टांच्या सत्तेमूळे पाठी पडले तसेच या डॉन लोकांमूळे मुंबई सुद्धा पाठी पडणार होती.
तेव्हा भाजपच्या गृहमंत्र्यांनी स्वताच्या कुटूंबाची पर्वा न करता थेट नडायचा निर्णय घेतला होता.
भारतीय नौसेनेच्या झेंड्यावर ब्रिटीशांचा क्रॉस असायचा,
तो क्रॉस अटल बिहारी वाजपेयींनी काढला होता,
सोनिया गांधींनी पुन्हा तो क्रॉस बसवला आणि मराठी शरद पवार गप्प राहिले,
तो क्रॉस बदलून झेंड्यावर शिवरायांची राजमूद्रा असणार हा निर्णय गुजराती मोदीने घेतला.
अफजल खानाच्या कबरी भोवती भव्य दरगाह मराठी शांतीदूतांनी उभी केली होती,त्यावर चादरी टाकणे,फूल वाहणे,मन्ऩत करणे हे सर्व प्रकार चालू होते,
जेव्हा शिवप्रेमींनी ती दरगाह तोडण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी लगेच दरग्याह ला सुरक्षा पूरवली,
पण त्याच ठिकाणी गद्दार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी सगळी दरगाह तोडून फक्त कबर शिल्लक ठेवली व तीथला सगळा गैरप्रकार थांबवला.
मित्रांनो यूटूब वर जाऊन लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी वेळी लिहल्याले "माझी मैना गावाकडे राहिली" हे गीत ऐका,
त्यात अण्णाभाऊ एका कडव्यात बोलतात की रावणाची जी अवस्था झाली होती ती स.का पाटलाची झाली आहे,
कोण होते बरं हे स.का पाटील ? मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष,
काँग्रेसच्या सरकारने अधिकृत घोषणा केली होती की मुंबईला केंद्रशासीत ठेऊ आणि सर्व मराठी काँग्रेसी लोकांचा त्याला पाठिंबा होता,
यामूळे "मुंबई सकट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" हा नारा लागला होता.
जरा ईतिहास वाचून बघा की संयुक्त महाराष्ट्राचा लढा नेमका दिला कोणा विरोधात होता.
भाजप जिंकली म्हणजे हुतात्म्यांचा अपमान झाला,संयुक्त महाराष्ट्राचा लढा वाया गेला,मराठी माणूस हरला वगैरा च्या गोष्टी जे फेकत आहेत त्यांना ईतिहासच माहित नाही मुंबईचा,
खरं म्हणजे तर ते महाराष्ट्रवादी सुद्धा नाहीत.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्यावर ज्यांनी जन्मभर टीका केली,
शिवसैनिकांच्या खळखट्याक ला जे लोकं हिंसात्मक चळवळ बोलायचे,शिवसैनिकांना सडकछाप गुंडे बोलायचे,लोकशाहि ला धोका म्हणायचे,बाळासाहेब हे मुंबईचे हिटलर आहेत असं म्हणायचे,
अशा सर्व पत्रकार,विचारवंत आणि परिचित चेहऱ्यांनी जेव्हा राज ठाकरे मोदी विरोध करू लागले आणि 2019 ला युती तूटली तेव्हा अचानक ठाकरे प्रेम,मराठी माणसाचा लढा या सर्व गोष्टींना स्वताची विचारसरणी म्हणून स्विकारलं.
नसता जोपर्यंत मुंबईतला परप्रांतीय काँग्रेसच्या बाजूने होता तोपर्यंत हे लोकं महाराष्ट्रवादी नव्हते.
आज मुंबई मुंबई करत जे रडत आहेत त्यांना ऐवढंच सांगेल की मुंबई सुद्धा तुम्हाला माहित नसती फक्त बॉम्बे माहित असता जर भाजप नसती.
ईतिहास माहित नसणाऱ्या आणि फक्त राजकीय स्पेस बघून विचारधारा बदलणाऱ्या लोकांनी अम्हाला मराठी भैय्ये,गुज्जू वगैरा काहीही म्हणून हिणवलं,
तरी आमची एकच स्पष्ट भूमिका आहे.
मला संभाजीनगर बोलणारा गुजराती चालेल पण औरंगाबाद बोलणारा मराठी व्यक्ती चालणार नाही,
चार मतांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर फुले टाकणारा मराठी नेता नको पण छत्रपतींच्या समाधीवर डोकं टेकवणारा गुजराती नेता चालेल.
धर्मद्रोह करणाऱ्या मराठी गणोजी शिर्के पेक्षा अम्हाला शेवट पर्यंत धर्मासाठी हाल सोसणारा परप्रांतीय कवी कलश कधीही चालेल.
-विवेक मोरे

स्त्रोत: https://www.facebook.com/groups/314307681949215/permalink/25546709248282...

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jan 2026 - 9:15 am | अमरेंद्र बाहुबली

ताजमहाल मधे दर शुक्रवारी नमाज पठणाला परवानगी देणारे अटलबिहारी होते, संसदेवर हल्ला झाला तरीही पाकिस्तानवर कारवाई न करणे अटल बिहारी होते, सैन्याला बॉर्डर एलआरओस करू न देता चढाईवरील कारगिल ताब्यात घेण्यासाठी दबाव टाकणारे अटलबिहारी होते त्यामुळे कित्येक सैनिकांचा जीव गेला, अतिरेक्यांच्या दबावाने मोठमोठे दहशतवादी सोडणारे अटलबिहारी होते!
तसेच मदरसांना भरघोस मदत करणारे मोदी आहेत, फक्त हिंदुत्वाचा बुरखा पांघरला म्हणजे किणी हिंदूंचा तारणहार होत नाही, त्यासाठी कृती करावी लागते! औरंगाबादचे संभाजीनगर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या पाठींब्यावर २०२१ ला केले, (२०१४ ते १९ ला तथाकथित हिंदुत्ववादीनी खुर्च्या उबवल्या त्यांनी का केले नाही?) तेच नामांतर बदलून फक्त शाहरावहे नाव संभाजीनगर करून जिल्ह्याचे नाव औरंगाबादच ठेवणारे हिंदुत्ववादी होते का?
बाकी अटलबिहारीनी १९४२ ला इंग्रजाना माफीनामा लिहून दिल्याचे कुठेतरी वाचले होते हे खरे आहे का? खरे असेल तर तिला एकट्या सावरकरांवर का केली जाते?
ह्या प्रश्नांची उत्तरे हा विवेक मोर देणार का?

कांदा लिंबू's picture

18 Jan 2026 - 10:00 am | कांदा लिंबू

ह्या प्रश्नांची उत्तरे हा विवेक मोर देणार का?

उत्तरे Bombay Scottish चे विद्यार्थी देतील.

रात्रीचे चांदणे's picture

18 Jan 2026 - 10:17 am | रात्रीचे चांदणे

ठाकरे मुळात आळशी आहेत. ह्यांना कष्ट न करता सत्ता पाहिजे असते. घेतली तर दिवसात एखादी सभा घेतात ती पण संध्याकाळी ऊन उतारली की. मुंबईत भावनिक मुद्दे मांडले नसते तर एवढेही नगरसेवक उभाटा गटाला मिळाले नसते. बाकी शहरांत तर उभाटा फिराकलेच नाहीत. विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी आणि राज्यात उभाटा कडे आशेने पाहू नये. अत्ता झालेल्या निवडणुकात कोणी किती सभा घेतल्या ह्याची आकडेवारी whatapp वर फिरत आहे. आकडे कदाचित चुकीचे असतील पन ट्रेंड मात्र सेमच असेल.
Fadanvis 33
Shinde 29
Ajit dada 25
Uddhav thakare 3
Raj thakare 4
Vijay vadettivar 25

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jan 2026 - 11:01 am | अमरेंद्र बाहुबली

सभा किती घेतल्या त्यावर मतदान होत नाही, फडणवीसांच्या सभान गर्दी कधीही नसते, मुंबईतल्या युतीच्या सभेतही गर्दी नव्हती, खुर्च्या रिकाम्या होत्या. निवडणूक आयोगाचा गैरवापर, हव्या तश्या मतदार याद्या बनवून घेणे, पुसली जाणारी मार्करची निशाणी ह्यामुळे शक्य असलेले डुप्लिकेट वोटिंग, ह्यासगळ्यासाठी मदत करणारी प्रशासकीय यंत्रणा, प्रचंड वाटला जाणारा पैसा नी ह्याकडे कानाडोळा करणारी सरकारी यंत्रणा सर्व होते म्हणून भाजपला मुंबईत इतक्या जागा नी अनेक पालिकेत सत्ता मिळाली! प्रामाणिक निवडणुका झाल्या असत्या तर भाजपला आपली लायकी कळाली असती.

रात्रीचे चांदणे's picture

18 Jan 2026 - 12:16 pm | रात्रीचे चांदणे

सभा किती घेतल्या त्यावर मतदान होत नाही
कदाचित राहुल गांधीनचाही यावर विश्वास असावा. विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रसारख्या महत्वाच्या राज्यात केवळ चार सभा घेतलेल्या. मोदी एका फेरीत दोन सभा तरी घेत होते.
सभा आणि मिळणारी मत ह्याचा कांय असेल नसेल पण कोणता नेता किती कष्ट घेतो हे तरी ह्यावरून समजतं.
उभाटा मुख्यमंत्री असताना मंत्रलयात येत न येता घरून कारभार करायचे ह्याविषयी लिहिलं आहेच. कोण कला नगर ते मंत्रालंय प्रवास करणार त्यापेक्षा घरीचं बसा असं त्यांचं गणित असणार.
ठाकरे बंधूनी घेतलेल्या तीन चार सभा तरी का घेतल्या हे समजतं नाही. त्यापेक्षा संजय राऊंतांना अजून इंटरव्हिव्ह तरी द्यायला पाहिजे होत.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jan 2026 - 12:26 pm | अमरेंद्र बाहुबली

विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रसारख्या महत्वाच्या राज्यात केवळ चार सभा घेतलेल्या. मोदी एका फेरीत दोन सभा तरी घेत होते.
तसे तर मोदी लोकसभेवेळीही फिरत होते पान काय मिळाल? प्रचंड मोठा पराभव झाला! नंतर मतदार याद्या बदलल्या, मतदार संघ पुनर्रचना केली, अनेकांची नावे उडवली. ईव्हीएम सेटिंग झाल्याचे आरोप झाले, अनेकांवर इडीच्या धाडी पडल्या त्याना पक्षात घेतले तेव्हा कुठे जाऊन विधानसभेला विजय मिळाला! नुसत्या सभांनी मोदीना यश मिळाले असते तर इतकी उठाठेव करायची गरज पडली असती का?

>> उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्या सभा गाजल्या. निवडणूकीचे मुद्दे बिनतोड होते. अदानीने मुंबई गिळली पासून ते मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय इथपर्यंत.....>>
पहिल्या प्रथम सांगायचं तर अगदी बाळासाहेबांपासून सभा गाजत आहेत, टाळ्या पडत आहेत. पण नेत्यांनी आणि पक्षाने काय केलं? कोणते आदर्श जनतेसमोर ठेवले ? बेळगांव प्रश्न, पाकिस्तानवर टीका, घराणेशाही बद्दल कॉन्ग्रेसवर टीका. हे तिन्ही गायब. मराठी शाळांतच मुलांना शिकवा दुकानांच्या पाट्या मराठीतच, बॉम्बे नको मुंबई म्हणा फक्त सभेत. बाहेर दुसरंच काही. मराठी माणसांनो { गिरणी कामगार - एका खोलीत चाळीत राहणारे लोक) तिथेच राहा मतं आम्हालाच द्या, अंबरनाथ बदलापूरला जाऊ नका हे सांगणे सोपं आहे. नवीन पिढी कशी राहणार? झुणका भाकर, वडापावचं काय झालं ? सध्या कोण या टपऱ्या चालवतात? चौपाटीवर भैयांना हाकलले तिथे मराठी भेळवाले आले का? ठाण्यात तळावपालीवर आले का? टाळ्यांची वाक्य बोलायची, एवढंच.

मदनबाण's picture

18 Jan 2026 - 5:48 pm | मदनबाण

General Category Is New Jews | What's The Problem With BJP? | BIG Mistake!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack

P1
सध्या मोदींच्या बाबतीत नवनवे वाद निर्माण होत आहेत असे दिसते.
नवा वाद : १२ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात भगवान हनुमानाचा आकार असलेला एक मोठा पतंग उडवला. बाकी,अहमदाबाद चे नामांतरण अजुनही झालेले नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack