आज सकाळी ८ ला सिटी प्राईड सातारा रोड च्या समोरच्या भापकर पेट्रोल पंपावर १०० रुपयाला चुना लावून घेतला. शाईन घेऊन लाईनीत उभा होतो. दुसराच नंबर होता. माझा नंबर आल्यावर पहिल्यांदा ऑन लाईन पेमेंट घेणार ना असे विचारून खात्री करून घेतली. मग त्याला पाचशे चे पेट्रोल भरायला सांगितले. तेव्हा पेट्रोल पंप वरील डिजिटस झेरो होत्या. पेट्रोल भरणाऱ्या माणसाने नोझल माझ्या गाडीच्या टाकीत टाकला पंपावरचा कीबोर्ड असतो त्याच्या कडे वळला, आणि त्याने पाठमोरा राहूनच मला राहूनच मला पेटीएम चा स्कॅनर हातात दिला. स्कॅनर हातात घेईपर्यंत, मी डिजिट बघितल्या तर शंभर आकडा आलेला. तो माणूस माझ्या कडे मी पैसे द्यावेत म्हणून पाहू लागला. मी त्याला म्हणालो की पाचशे चे भरायचे होते पेट्रोल. मग परत त्याने ४०० रु चे पेट्रोल भरले.
गाडीच्या फ्युएल इंडिकेटर वर काटा जितका जायला पाहिजे होता तितका गेला नव्हता. मग माझ्या लक्षात आले की त्याने जेव्हा सकानेर द्यायला तो मागे वळला तेव्हाच त्याने डिजिटल मीटर वर १०० आकडा नुसता टाकलेला होता, पेट्रोल न भरता. आणि मग पाचशे चे भरायचे होते पेट्रोल म्हणल्यावर उरलेले ४०० रुचे पेट्रोल टाकले.
मी फ्युएल टॅंक वरचा काटा पहिला आणि त्याच्या कडे बघून जोरात हसलो. तो म्हणाला काय झालं?
मी म्हटले काय झाले ते तुला चांगलेच माहित आहे.
तो म्हणे, बोला सर मनात काही ठेऊ नका.
मी उत्तरलो, मी बेसावध होतो, माझीच चूक आहे. कर मजा !
आता मी तिथे कसा कांगावा करायला हवा होता, पोलीसला बोलवायला पाहिजे होते, किंवा त्याचे दात कसे घशात घालायला पाहिजे होते या गोष्टी आता बोलून काही उपयोग नाही.
आणि जे मला ओळखतात त्यांना मी वरील पैकी काहीहि करू शकत नाही हे माहित आहे.
१०० रु फी भरून काही धडे शिकलो.
१. पेट्रोल भरायला गेलात की आधी जि पे ऑनलाईन आहे का विचारू नका. कारण अशीच माझीच फसवणूक पूर्वी झाल्याचे मला आज आठवत आहे.
२. पाचशेचे पेट्रोल जेव्हा तुम्ही त्याला भरायला सांगितले असेल आणि त्याने १०० चे भरले की समजा की तुमची फसवणूक होतीये आणि सावध राहा. तिथेच कल्ला करा. वरील मुद्दा आणि हा मुद्दा यावरून हा पेट्रोल चोरीच्या फसवणुकीचा पॅटर्न आहे हे नक्की.
३. पेट्रोल भरताना पेट्रोल भरताना स्कॅनर वगैरे द्यायच्या बहाण्याने तुमच्या कडे पाठ करून काही करायला जात असेल तर ही पण एक अलार्म आहे.
४. पेट्रोल भरताना कोणी तुम्हाला स्कॅनर द्यायच्या बहाण्याने, लकी ड्राव च्या बहाण्याने तुमचे लक्ष विचलित करत असेल तर सावध राहा.
५. शक्यतो टाकी फुल्ल करायचे पेट्रोल भरा. ५००, ४०० असे पेट्रोल भरताना हा पॅटर्न वापरला जात आहे.
६. आणि सगळ्यात महत्वाचे, अशा वेळी एखाद्याचे दात घश्यात घालायची विद्या शिकून घ्या.
कौस्तुभ पोंक्षे
फी फक्त १०० रुपये !
गाभा:
प्रतिक्रिया
22 Dec 2025 - 10:45 pm | विजुभाऊ
हा अनुभव मला पनवेल / तळोजा परिसरात आलेला आहे.
आपण पेट्रोल २००० रुपयांचे टाक म्हंटले की पेट्रोल वाला फक्त ५०० चे टाकतो.
आपण त्याला दोन हजारचे पेट्रोल हवे होते म्हंटले की तो पुढे पंधराशे रुपये चे मीटर रिडिंग करतो आणि आपल्याला अगोदरचे ५०० + १५०० असे २००० रुपये मागतो.
एकदा अशा पद्धतीने मी ५०० रुपयाना चुना लावून घेतला होता. आणि शहाणपण शिकलो.
आता त्या परिसरात कधी गेलो की त्या पेट्रोलवाल्याला ठणकावून सांगतो की तू मीटर झेरो केले नव्हते हे मी पाहिले आहे. मी फक्त १५०० रुपयेच देणार. या अगोदर या इथेच मी असा चुना लावून घेतलाय आता शहाणा झालोय.
असे म्हंटल्यावर तो गप्प बसला आणि निमूटपणे १५०० रुपये घेतले.
22 Dec 2025 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्याच भापकर पंपावर मला १०० रुपयाचा चुना लावायचा प्रयत्न झाला होता. मी १०० चे पेट्रोल टाकायला लावले , त्याने टाकले मग म्हटले आणखी शंभराचे टाक, २०० रुपये फोन पे केले. त्याने आधी शंभराचे टाकले होते ते शंभर मीटर वर दिसत होते, त्याने मला पेमेंट चे डिटेल्स दाखवायला लावले नी काहीतरी डिप मध्ये बघतोय असे दाखवून फोन मध्ये चार दोन सेकंद मान खुपसून ठेवली. पाइप बाहेर काढला, मी बोललो की तू दुसऱ्या खेपेचे पेट्रोल भरले नाहीये हे पहिल्याच खेपेचे आहेत आकडे, अजून शंभराचे टाक, त्याने चुचाप आणलही शंभराचे टाकले, माझ्या मागच्या लोकांना झालेला प्रकार लक्षात आला, सगळे हसले.
तुम्ही आत कैबिन मध्ये जाऊन झालेला प्रकार सांगायला हवा होता. पुन्हा जाल तेव्हा तिथला मॅनेजर वगैरे जो कोणी असेल त्याला सांगा. गुगल रिव्हीव वरही हे टाका.
23 Dec 2025 - 1:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
त्यामुळे आता प्रत्येक वेळी टाकी फुल करतो. दुचाकी असो किवा चारचाकी. संशय आलाच तर मध्येच थांब म्हणुन सांगतो आणि जे काय आकडे मीटरवर दिसतील तितके पेमेंट करतो. पण सुरुवातीला टाकी फुल करच सांगतो.
जाहीरात
https://www.misalpav.com/node/29061
23 Dec 2025 - 1:35 pm | अमरेंद्र बाहुबली
लिंकबद्दल धन्यवाद! एक अनुभवी ब्याक्तीने सांगितले आहे की भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम ह्यांच्याकडे पेट्रोल भरूच नये, एस्सार, जिओ, शेल नी आयएमटीआर ह्यांच्याकडेच पेट्रोल भरावे.
23 Dec 2025 - 3:02 pm | विजुभाऊ
एच पी आणि बी पी पंपावरच्या लोकांना हे असे ट्रेनिंग दिलेले असते का?
23 Dec 2025 - 8:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
मध्यंतरी तर असेही ऐक्ले होते की डिजिटल पंपावरही मशीनमध्ये एक चिप बसवली जाते जेणेकरुन आकडे वाढतील पण पेट्रोल भरले जाणार नाही. ख खो दे जा.
23 Dec 2025 - 9:38 pm | समाधान राऊत
पेट्रोल डिझेल टाकताना 499 ,999,असे टाकत चला , म्हणजे चुकीचे ऐकलं म्हणायला जागा मिळत नाही...
25 Dec 2025 - 9:30 am | अनामिक सदस्य
टाकी फुल्ल करायचे यासाठीच ना की मधेच थाम्बून फसवायची सन्धी मिळणार नाही? का अजून काही वेगळे कारण आहे?
26 Dec 2025 - 12:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
रोज गाडी वापरत असाल तर ते परवडते, आणि दुसरा फायदा फसवायची शक्यता कमी होते.
26 Dec 2025 - 8:08 am | chetanasvaidya
नमस्कार
मी चेतना वैद्य,
मिपामध्ये नवीनच प्रवेश केला आहे.
आत्ताच शंभर रुपयांचं जीके वाढवून घेतलं.
कौस्तुभ खरच खूप छान माहिती दिलीत.
हल्ली फसवणूक टाळायची कशी पेक्षा करून घ्यायची कशी नाही हे जास्त शिकायची गरज आहे.
भेटत राहू
छान वाटलं मिपावर येऊन.
28 Dec 2025 - 8:30 am | सौन्दर्य
मी हिंदुस्थान पेट्रोलियमचा (एच पी) पूर्वाश्रमीचा मॅनेजर आहे. कधीही एच पीच्या पेट्रोल पम्पावर वाईट अनुभव आला तर सरळ सेल्सरूमच्या काचेवर कस्टमर सर्विसचा पत्ता व तेथील स्थानिक सेल्स ऑफिसरची व रिजनल ऑफिसची माहिती लिहिलेली असते, तेथे कम्प्लेंट करावी. १०० % कार्यवाही होईल.
1 Jan 2026 - 8:50 pm | पाषाणभेद
http://www.misalpav.com/node/8652#:~:text=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0...(%E0%A4%8F,%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%2C%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%20%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%20%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%87
5 Jan 2026 - 7:40 pm | स्वधर्म
खूप वर्षांपूर्वी मला कर्वे रोडच्या कासट पंपावर असा अनुभव आला होता. पेट्रोल लगेच संपले म्हणून मॅनेजरकडे तक्रार केली. त्यांनी अधिकचे पेट्रोल द्यायला सांगितल्याचे आठवते. तो त्यांचा भलेपणा होता की गैरप्रकार सुरू आहेत हे माहित असून बोभाटा होऊ नये म्हणून दाखवलेले ग्राहकप्रेम होते, माहीत नाही.
पण ग्राहक म्हणून आपण किती ठिकाणी असे जागृत रहाणार हा प्रश्नच आहे.
5 Jan 2026 - 9:01 pm | स्वधर्म
खूप वर्षांपूर्वी मला कर्वे रोडच्या कासट पंपावर असा अनुभव आला होता. पेट्रोल लगेच संपले म्हणून मॅनेजरकडे तक्रार केली. त्यांनी अधिकचे पेट्रोल द्यायला सांगितल्याचे आठवते. तो त्यांचा भलेपणा होता की गैरप्रकार सुरू आहेत हे माहित असून बोभाटा होऊ नये म्हणून दाखवलेले ग्राहकप्रेम होते, माहीत नाही.
पण ग्राहक म्हणून आपण किती ठिकाणी असे जागृत रहाणार हा प्रश्नच आहे.
5 Jan 2026 - 9:54 pm | अमरेंद्र बाहुबली
पण ग्राहक म्हणून आपण किती ठिकाणी असे जागृत रहाणार हा प्रश्नच आहे.मी तर ग्राहक सेवा मंचात दणादण कंप्लेंट ठोकत असतो, आता पर्यंत ३०-३५ कंप्लेंट ठोकल्या आहेत, तिथे तक्रार दाखल करायचा सगळा फॉर्मेट माझा पाठ आहे, अतिशय चांगले अनुभव आले आहेत. सगळे अनुभव सांगितले तर एक मोठा लेख होईल.
पण आयडीबीआय, एक्सिस, महिंद्रा फर्स्ट चॉईस, लेन्सकार्ट, ओला, भारतीय डाक, ह्युंदाई सगळ्यानाच ओढलं, चुपचाप मला पैसे परत देऊन त्यांनी सेटलमेंट केली, कोर्टात जायची वेळ कंपन्यानीच येऊ दिली नाही.
महिंद्रा फर्स्ट चॉईस ने माझ्या काकांची आल्टो विकत घेतली पण ट्रान्सफर केली नाही दुसऱ्याच्या नावावर मेल नी फोन करून झाले पण फरक शून्य. एक कंप्लेंट टाकली नी कंपनीने १ महिन्याची मुदत मागून गाडी नावावर ट्रान्सफर केली.
एक्सिस बँकेला इतके पिडले की अकाउंट बंद झाल्यावरही ते मला dd ने पैसे घरी पाठवत होते.
ह्युंदाई ने अनेक कामे फुकट करून दिली, माझ्या आजूबाजूचे सर्व शोरूम्स मला ओळखतात, मी गेलो की माझ्या स्वागताला जनरल मॅनेजर येतो. :)
खरं तर कंपन्याना दोष देऊन फायदा नाही, तुम्ही तक्रार करत नसाल तर ग्राहक म्हणून तुम्ही (म्हणजे जे लोक फसवले जातात) मूर्ख आहात.
कुणाची अशी फसवणूक झाली असेल तर मला संपर्क करा मी मार्गदर्शनाला एका पायावर तयार आहे.
5 Jan 2026 - 10:20 pm | स्वधर्म
बाहुबली, तुमचा मुद्दा अगदी योग्य. तुमच्या अनुभवांचा नक्कीच फायदा होईल.
6 Jan 2026 - 7:42 am | सोत्रि
१०००००+
तंतोतंत, सहमत!
- (जागरूक ग्राहक) सोकाजी
6 Jan 2026 - 8:14 am | गवि
याचे थोडेसे पुनर्लेखन करून अधिक मान्यता देता येईल.
खरं तर कंपन्याना दोष देण्याचं काम आपण ग्राहक वेळेवर करत नसल्याने कंपन्यांचे फावते. त्यांचे चुकते आहे आणि तो दोष त्यांच्या पदरात घालणे हे ग्राहक म्हणून तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही तक्रार करत नसाल तर ग्राहक म्हणून तुम्ही (म्हणजे जे लोक फसवले जातात) , तुमचा हक्क बजावायला विसरत आहात.
8 Jan 2026 - 2:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
या अनुभवांवर एक लेख (किवा लेखमाला) येउंद्या की!! आम्हालापण फायदा होईल.
8 Jan 2026 - 2:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
वरील प्रतिसाद बाहुबली यांना
8 Jan 2026 - 10:34 pm | चौथा कोनाडा
सुदैवाने मला असा अनुभव अजुन तरी आलेला नाही ... मी नेहमीच टाकी फुल्ल करतो म्हणून असेल कदाचित.
वारंवार पेट्रोल भरयला जायचा मला कंटाळा आहे ... आणि तिथले वातावरण नको वाटते.
इलेक्ट्रिक बाईक दुचाकी संदर्भात अश्या काही फसवणुकीच्या शक्यता असतील ? का सगळंच आलबेल ?