फी फक्त १०० रुपये !
आज सकाळी ८ ला सिटी प्राईड सातारा रोड च्या समोरच्या भापकर पेट्रोल पंपावर १०० रुपयाला चुना लावून घेतला. शाईन घेऊन लाईनीत उभा होतो. दुसराच नंबर होता. माझा नंबर आल्यावर पहिल्यांदा ऑन लाईन पेमेंट घेणार ना असे विचारून खात्री करून घेतली. मग त्याला पाचशे चे पेट्रोल भरायला सांगितले. तेव्हा पेट्रोल पंप वरील डिजिटस झेरो होत्या. पेट्रोल भरणाऱ्या माणसाने नोझल माझ्या गाडीच्या टाकीत टाकला पंपावरचा कीबोर्ड असतो त्याच्या कडे वळला, आणि त्याने पाठमोरा राहूनच मला राहूनच मला पेटीएम चा स्कॅनर हातात दिला. स्कॅनर हातात घेईपर्यंत, मी डिजिट बघितल्या तर शंभर आकडा आलेला. तो माणूस माझ्या कडे मी पैसे द्यावेत म्हणून पाहू लागला. मी त्याला म्हणालो की पाचशे चे भरायचे होते पेट्रोल. मग परत त्याने ४०० रु चे पेट्रोल भरले.
गाडीच्या फ्युएल इंडिकेटर वर काटा जितका जायला पाहिजे होता तितका गेला नव्हता. मग माझ्या लक्षात आले की त्याने जेव्हा सकानेर द्यायला तो मागे वळला तेव्हाच त्याने डिजिटल मीटर वर १०० आकडा नुसता टाकलेला होता, पेट्रोल न भरता. आणि मग पाचशे चे भरायचे होते पेट्रोल म्हणल्यावर उरलेले ४०० रुचे पेट्रोल टाकले.
मी फ्युएल टॅंक वरचा काटा पहिला आणि त्याच्या कडे बघून जोरात हसलो. तो म्हणाला काय झालं?
मी म्हटले काय झाले ते तुला चांगलेच माहित आहे.
तो म्हणे, बोला सर मनात काही ठेऊ नका.
मी उत्तरलो, मी बेसावध होतो, माझीच चूक आहे. कर मजा !
आता मी तिथे कसा कांगावा करायला हवा होता, पोलीसला बोलवायला पाहिजे होते, किंवा त्याचे दात कसे घशात घालायला पाहिजे होते या गोष्टी आता बोलून काही उपयोग नाही.
आणि जे मला ओळखतात त्यांना मी वरील पैकी काहीहि करू शकत नाही हे माहित आहे.
१०० रु फी भरून काही धडे शिकलो.
१. पेट्रोल भरायला गेलात की आधी जि पे ऑनलाईन आहे का विचारू नका. कारण अशीच माझीच फसवणूक पूर्वी झाल्याचे मला आज आठवत आहे.
२. पाचशेचे पेट्रोल जेव्हा तुम्ही त्याला भरायला सांगितले असेल आणि त्याने १०० चे भरले की समजा की तुमची फसवणूक होतीये आणि सावध राहा. तिथेच कल्ला करा. वरील मुद्दा आणि हा मुद्दा यावरून हा पेट्रोल चोरीच्या फसवणुकीचा पॅटर्न आहे हे नक्की.
३. पेट्रोल भरताना पेट्रोल भरताना स्कॅनर वगैरे द्यायच्या बहाण्याने तुमच्या कडे पाठ करून काही करायला जात असेल तर ही पण एक अलार्म आहे.
४. पेट्रोल भरताना कोणी तुम्हाला स्कॅनर द्यायच्या बहाण्याने, लकी ड्राव च्या बहाण्याने तुमचे लक्ष विचलित करत असेल तर सावध राहा.
५. शक्यतो टाकी फुल्ल करायचे पेट्रोल भरा. ५००, ४०० असे पेट्रोल भरताना हा पॅटर्न वापरला जात आहे.
६. आणि सगळ्यात महत्वाचे, अशा वेळी एखाद्याचे दात घश्यात घालायची विद्या शिकून घ्या.
कौस्तुभ पोंक्षे
याद्या
2817
प्रतिक्रिया
21
वर्गीकरण
मिसळपाव
हा अनुभव मला पनवेल / तळोजा
ह्याच भापकर पंपावर मला १००
मी आधी असा फसलो आहे!!
लिंकबद्दल धन्यवाद! एक अनुभवी
In reply to मी आधी असा फसलो आहे!! by राजेंद्र मेहेंदळे
एच पी आणि बी पी पंपावरच्या
ते काय माहीत नाहे बुवा
In reply to एच पी आणि बी पी पंपावरच्या by विजुभाऊ
पेट्रोल डिझेल टाकताना 499
टाकी फुल्ल करायचे
एकदा टाकी फुल केली की कटकट नाही
In reply to टाकी फुल्ल करायचे by अनामिक सदस्य
नमस्कार
कस्टमर सर्विसला कम्प्लेंट करावी .
http://www.misalpav.com/node
अतिशय भयंकर प्रकार आहे
मापात पाप
पण ग्राहक म्हणून आपण किती
In reply to मापात पाप by स्वधर्म
पण ग्राहक म्हणून आपण किती ठिकाणी असे जागृत रहाणार हा प्रश्नच आहे.मी तर ग्राहक सेवा मंचात दणादण कंप्लेंट ठोकत असतो, आता पर्यंत ३०-३५ कंप्लेंट ठोकल्या आहेत, तिथे तक्रार दाखल करायचा सगळा फॉर्मेट माझा पाठ आहे, अतिशय चांगले अनुभव आले आहेत. सगळे अनुभव सांगितले तर एक मोठा लेख होईल. पण आयडीबीआय, एक्सिस, महिंद्रा फर्स्ट चॉईस, लेन्सकार्ट, ओला, भारतीय डाक, ह्युंदाई सगळ्यानाच ओढलं, चुपचाप मला पैसे परत देऊन त्यांनी सेटलमेंट केली, कोर्टात जायची वेळ कंपन्यानीच येऊ दिली नाही. महिंद्रा फर्स्ट चॉईस ने माझ्या काकांची आल्टो विकत घेतली पण ट्रान्सफर केली नाही दुसऱ्याच्या नावावर मेल नी फोन करून झाले पण फरक शून्य. एक कंप्लेंट टाकली नी कंपनीने १ महिन्याची मुदत मागून गाडी नावावर ट्रान्सफर केली. एक्सिस बँकेला इतके पिडले की अकाउंट बंद झाल्यावरही ते मला dd ने पैसे घरी पाठवत होते. ह्युंदाई ने अनेक कामे फुकट करून दिली, माझ्या आजूबाजूचे सर्व शोरूम्स मला ओळखतात, मी गेलो की माझ्या स्वागताला जनरल मॅनेजर येतो. :) खरं तर कंपन्याना दोष देऊन फायदा नाही, तुम्ही तक्रार करत नसाल तर ग्राहक म्हणून तुम्ही (म्हणजे जे लोक फसवले जातात) मूर्ख आहात. कुणाची अशी फसवणूक झाली असेल तर मला संपर्क करा मी मार्गदर्शनाला एका पायावर तयार आहे.वा! असं पाहिजे!!
In reply to पण ग्राहक म्हणून आपण किती by अमरेंद्र बाहुबली
१०००००+
In reply to पण ग्राहक म्हणून आपण किती by अमरेंद्र बाहुबली
खरं तर कंपन्याना दोष देऊन
In reply to १०००००+ by सोत्रि
झकास!!
In reply to पण ग्राहक म्हणून आपण किती by अमरेंद्र बाहुबली
वरील प्रतिसाद बाहुबली यांना
In reply to झकास!! by राजेंद्र मेहेंदळे
सुदैवाने मला असा अनुभव अजुन