पाकिस्तान आणि पाणी पुरवठ्या बद्दल माहीत मिळू शकेल ?

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
26 Apr 2025 - 11:09 pm
गाभा: 

सगळ्यात मुख्य प्रश्न
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्या सोडून अजून तिथून होत नाही का ?
३) जर चीन ने त्यांच्या नंद्याचे पाणी भारताला बंद केले तर ? तसेच दोन्ही कडे जल फुगवटा निर्माण होण्याची शकयता ?
४) कोणी सरकारी आकडेवारी माहीत करू शकते कि पाणी करार ,सोडलेले पाणी व पाणी चालू बंद करायचे निर्णय शासन स्तरावर कोण करत ?

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2025 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली

१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून

छान प्रश्न! लोकाना मूर्ख बनवने हे सरकारचे काम , दूसरे काही नाही, पानी बंद करतात म्हणजे नेमके काय करतात? नदीला नळ बसवलेला असतो का? तोटी बंद करून पाणी अडवायला? लोकानी राजीनामे मागू नये म्हणून उगाच कारवाईचा बडगा उगारल्यासारखा सरकारने देखावा केलाय. बाकी मीडिया तर सर्व ताब्यात गेला आहे खर्या बातम्या आता विरोधी पक्षांच्या मुखपत्रातून त्या काय मिळू शकतील.

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2025 - 12:28 pm | प्रसाद गोडबोले

अहो, बाहुबली , अजून किती प्रदर्शन करणार आहात स्वतः च्या अफाट बुद्धिमत्तेचे ?

=))))

धर्मराजमुटके's picture

27 Apr 2025 - 12:31 pm | धर्मराजमुटके

माहिती तीन प्रकारे मिळू शकेल
१. काँग्रेसी चष्म्यातून
२. अंधभक्त चष्म्यातून
३. तटस्थ चष्म्यातून

आपल्याला कोणत्या प्रकारची माहीती हवी आहे ? क्रमांक १ आणि २ ची माहिती आपल्याला येथील सदस्य देतील. ३ र्‍या प्रकारची माहिती आपणाला स्वत:ला शोधावी लागेल.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2025 - 12:35 pm | मुक्त विहारि

तिन्ही प्रकारची माहिती, गुगलच्या मदतीने शोधता येते...

मुक्त विहारि's picture

27 Apr 2025 - 12:33 pm | मुक्त विहारि

सुरुवात, १९४७ पासून करा.....

गुगल वर, माहिती उपलब्ध आहे.

विजुभाऊ's picture

28 Apr 2025 - 9:53 am | विजुभाऊ

१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात
पाणी पुरवठा बंद करणे हे या पूर्वी कधीच झालेले नाहिय्ये. त्याबद्दल बोलणी आणि कृती आत्ता पहिल्यांदाच होते आहे.
ही एक वस्तुस्थिती पाहिली तर तुमचे बाकीचे प्रश्न बाद होतात.

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2025 - 10:46 pm | चौथा कोनाडा

महाराष्ट्राला ज्यांनी जम्मू-काश्मीर पर्यटनाची ओळख करून दिली त्या 'राजाराणी' ट्रॅव्हल्समध्ये करियरची सुरुवात करणारे Mangesh Bendkhale यांच्याशी बोलतांना काही अत्यंत महत्वाचे मुद्दे समोर आले, ते या पोस्टमधून मांडतो आहे.

दुर्दैवाने जे काम पत्रकारांनी करायला हवं ते माझ्यासारख्या पत्रकारितेची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला करावं लागतं आहे.

----------------------------------------------

मंगेश यांनी राजाराणीमध्ये काश्मीरचे टूर मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर अनेक वर्षे स्वतंत्र व्यावसायिक म्हणूनही काम करतांना अनेक पर्यटकांना काश्मीरचे पर्यटन घडवून आणले.

ते म्हणतात की ज्या पहलगाममधल्या बैसरन व्हॅली (ज्याला मिनी स्विझरलँड म्हणूनही ओळखले जाते) मध्ये पर्यटकांवर जो अमानुष हल्ला झाला त्या "ठिकाणी सर्व पर्यटकांना घोड्यावरून जावं लागतं. परंतु या ठिकाणी जाण्यासाठी गाडी रस्ता सुद्धा आहे. ज्याचा वापर शासकीय यंत्रणा, तसेच भारतीय लष्कर यांच्यामार्फत केला जातो. पण एकाही वृत्तवाहिनीला हे सांगता येत नाहीये की वरती जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. प्रत्येक जण हेच सांगतो की वरती जाण्यासाठी दुसरा रस्ताच नाही."

कारण "काश्मीरमध्ये गाडी, घोडेवाले, हॉटेलवाले हाऊस बोट, आणि शिकारावाले असे प्रमुख भाग आहेत. यामध्ये गाडीवाले, घोडेवाले, शिकारावाल्यांची युनियन असते. प्रत्येक टुरिस्ट स्पॉटला त्यांचे दर सरकार बरोबर निश्चित केलेले असतात. गाडीवाल्यांना, घोडेवाल्यांच्या एकमेकांच्या व्यवसायामध्ये भाग घेता येत नसतो. उदाहरण द्यायचं झालं तर श्रीनगरवरून गाडी करून पहलगामला गेल्यानंतर त्या गाडीने पहलगाममधील जे टुरिस्ट स्पॉट आहेत, त्या ठिकाणी त्याच गाडीने जाऊन फिरता येत नाही. त्यासाठी आपल्याला पहलगाममध्ये असणाऱ्या टॅक्सी युनियनची गाडी घ्यावी लागते. तसेच ज्या ठिकाणी जास्त उंचीच्या ठिकाणी फिरायला जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी घोडे भाड्यानं घ्यावे लागतात. पण याचा अर्थ असा नसतो की तिथे जाण्यासाठी गाडी रस्ताच नसतो. ही व्यवस्था घोडेवाल्यांचा व्यवसाय आणि गाडीवाल्यांचा व्यवसाय यातील रोजगाराच्या दृष्टीने केलेली विभागणी आहे."

हे अर्थातच "हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतील वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे तथाकथित तज्ञ, यांना काश्मीर खोऱ्याबद्दल काहीही माहिती" नसल्यानं सांगितलं गेलेलं नाही.

याचे मूळ "इथले अर्थकारण, इथला पर्यटन व्यवसाय, शेती उद्योग, कसा चालतो यातून उत्पन्न कसे मिळते, याची काहीही माहिती नाही" हेच आहे.

"मुळात हे समजून घेतलं पाहिजे काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. पण तो मुख्य व्यवसाय नाही. अक्रोड, बदाम, केशर, सफरचंद, चेरी, स्ट्रॉबेरी, यासारखी नगदी पिके शेतकरी घेतात. जी हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत. तसेच कश्मिरी तांदूळ ही प्रसिद्ध आहेच. त्याचसोबत जवळपास 99% क्रिकेट बॅट्स या काश्मिरी विलो पासून बनतात आणि देशभरातील सर्व प्रमुख विक्रेत्यांच्याकडे विक्रीसाठी पोहोचतात. त्याचबरोबर फर्निचरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कश्मीरी गालिचे, पश्मीना शॉल चे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कागदाच्या गोळ्यापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात त्याचे उत्पादनही मोठे होते. वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व उत्पादनावर अवलंबून असणारी लोकसंख्या ही कमी आहे. ती उत्तर प्रदेश बिहार किंवा इतर राज्यांसारखी जास्त घनतेची नाही."

"काश्मीरमध्ये शिक्षणाचे माध्यम ही पहिलीपासून इंग्रजी आहे. त्यामुळे काश्मिरी लोक मोठ्या प्रमाणात देशभर आणि जगभरात उद्योग व्यवसायात आघाडीवर आहेत. तुम्हाला कुठेही देशभरात लेबर किंवा ब्लू कॉलर जॉब करताना काश्मिरी लोक दिसणार नाहीत. त्याचं कारण या अर्थकारणात दडलेलं आहे. जे थोडेफार लोक ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही ती लोक पर्यटन व्यवसायामधील अनेक प्रकारची कामे करतात जसे की हॉटेल रेस्टॉरंट गाडीचा व्यवसाय घोड्यांचा व्यवसाय."

"आता प्रश्न आहे की हे अतिरेकी तिथे कसे आले. जंगलातून जवळपास तीनशे किलोमीटरहून अधिक अंतर कापून येणं मला शक्य वाटत नाही कारण या सर्व उंचीच्या ठिकाणी गुजर समाजाची लोक राहतात जी लोक काश्मीर खोऱ्यात बर्फ वृष्टी होऊ लागल्यावर जम्मू भागात जातात आणि एप्रिल महिन्यात त्यांची घर वापसी होण्यास सुरुवात होते. त्याचं कारण एप्रिलच्या मध्यानंतर उंचावरचा बर्फ वितळण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली असते. म्हणजे या ठिकाणी जो हल्ला झाला त्या ठिकाणी बर्फातून इतके अंतर चालत येणे हे अशक्य प्राय गोष्ट आहे. यांनीही अंतर रस्त्यानेच कापले आहे, हे स्पष्ट आहे. पण याची खबर आपल्या गुप्तचर यंत्रणा, विविध चेक पोस्ट यांना का लागली नाही हे एक मोठे आश्चर्य आहे. तसेच या ठिकाणी दिवसभरात पंधरा-वीस हजार लोक सहज भेट देतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना आपले सैनिक पहारा देत असतात. पण या हल्ल्याच्या वेळेला तिथे कोणीच कसं उपलब्ध नव्हतं हा एक मोठा प्रश्न आहे."

"जूनमध्ये अमरनाथ यात्रा सुरू होते. त्याची तयारी प्रशासकीय आणि सैन्य यांच्यामार्फत एप्रिलमध्ये सुरू झालेली असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही अलर्टवरच असतात. तरीही हल्ला झाला याचा अर्थ आपल्याकडून काहीतरी चूक घडली आहे हे नक्की. आपण गाफील राहिलो असे मला दुर्दैवाने म्हणावे वाटते."

"पाकिस्तान आर्थिक दृष्ट्या कंगाल झाला आहे. त्याच्यावर चीनचे पूर्ण नियंत्रण आहे आणि चीनच्या मदतीशिवाय हा हल्ला झाला आहे हे समजणे हे मूर्खपणाचे होईल कारण चीनने बांधलेला रस्ता हा पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यातून जातो. त्यामुळे खरी लढाई ही आपल्याला चीन सोबत करावी लागणार आहे आणि ती दिवाळीतील दिव्यांच्या माळांवर बहिष्कार घालून होणार नाही तर भारत चीन यातील व्यापारी तूट कमी करून करावी लागेल अन्यथा सर्व हवेतील बुडबुडे आहेत."

-------------------------------------------

उपरोक्त परिच्छेदांत अवतरण चिन्हात मंगेश यांनी मांडलेली मतं आहेत. त्याला वाचण्यासाठी सुलभ जावं यासाठी आणि थोडेबहुत व्याकरण दोष दुरुस्त करण्यासाठी कमीतकमी संपादन संस्कार केले आहेत.

- अभिषेक माळी
Abhishek Sharad Mali

सौजन्य : कायप्पा विद्यापिठ

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2025 - 10:55 pm | अमरेंद्र बाहुबली

तरीही हल्ला झाला याचा अर्थ आपल्याकडून काहीतरी चूक घडली आहे हे नक्की. आपण गाफील राहिलो असे मला दुर्दैवाने म्हणावे वाटते.

आता इथले काही लष्करी, परराष्ट्रधोरणतज्ञ, काश्मीर तज्ञ पण तरीही अंधभक्त असलेले ह्याना देशद्रोही ठरवतील, कारण जेम्स बाँड डोभाल व चाणक्य अमित शहा असताना आम्ही गाफील राहिलो असे हे कसेकाय म्हणून शकतात?

आग्या१९९०'s picture

28 Apr 2025 - 11:10 pm | आग्या१९९०

आपण काश्मीर पर्यटन थांबवले तर काश्मीरमधील लोकांची आर्थिक कोंडी होईल आणि दहशतवाद्यांना मदत थांबवली जाईल अशी इथल्या भाबड्या मिपाकरांची समज आहे. जणू काही पर्यटनाशिवाय दुसरे उद्योगच नाही काश्मीरमध्ये.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2025 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क!
हे तेच आहेत जे अयोध्येकरांनी भाजप्या खासदार पडल्यावर अयोध्या यात्रा करू नका म्हणून छाताड पिटत होते, जसकाही हे अयोध्यात गेले
नाही तर अयोध्येचे लोक उपाशी मरणार होते. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2025 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद... धन्स.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

28 Apr 2025 - 11:13 pm | आग्या१९९०

आठवडा होईल आता ,अद्याप दहशतवादी सापडले नाही आणि निघाले थेट पाकिस्तानवर हल्ला करायला.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2025 - 11:50 pm | अमरेंद्र बाहुबली

आणी म्हणे मोदीजींच्या हातात देश सुरक्षित आहे.

आग्या१९९०'s picture

29 Apr 2025 - 12:09 am | आग्या१९९०

सशाचं काळीज असलेल्यांना असं म्हटलं तरी सुरक्षित वाटतं. खरं तर बिळाच्या आत कसली भीती वाटते ह्यांना हेच समजत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2025 - 12:14 am | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा!

मुक्त विहारि's picture

29 Apr 2025 - 10:02 am | मुक्त विहारि

पहलगाम का बदला, आतंकवादियों के 2 मददगार गिरफ्तार, भारी मात्रा में हथियार और गोला-बारूद जब्त

https://www.prabhatkhabar.com/national/pahalgam-attack-revenge-2-terrori...

-----

"गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश नक्कीच सुरक्षित आहे .."

मोदी नक्कीच बदला घेणार....

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2025 - 10:40 am | अमरेंद्र बाहुबली

गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश नक्कीच सुरक्षित आहे .."

मोदी नक्कीच बदला घेणार....

गांधीनी इंग्रज पळवले मोदीना साधे अतिरेकी सापडेना आणी
म्हणे बदला घेणार, बदला घेणे हे आमदार फोडण्याइतके सोपे आहे का?

हा दुवा अवश्य बघावा.
यात अतिशय उत्तम रीतीने माहिती दिलेली आहे. शिवाय दोन्ही बाजू फायदे आणि तोटे तसेच व्यवहारिक बाबीं सुद्धा उत्तम नमूद केलेल्या आहेत. याने नक्कीच विषय समजून घेण्यास मदत होईल.

उथळ चर्चांसाठी सुद्धा उत्तम raw material यात आहे.ज्याने दोन्ही बाजूच्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूना एक एक सुटे लवंगी फटाके घेऊन ही खेळता येईल.

पण अर्थातच विषय गंभीरतेने सर्वबाजूने समजावून घेण्यातच अर्थ आहे.

यातील कॉटनचा पाकिस्तानातील एकूण निर्यातीतील वाटा हा माझ्यासाठी नवीन होता. तसेच basmati निर्याती मध्ये भारताने अगोदरच पाकिस्तानला धूळ चारली आहे हे माझ्यासाठी नवीन माहिती होती.

सुबोध खरे's picture

30 Apr 2025 - 12:14 pm | सुबोध खरे

Pahalgam terror attack may weigh on Jammu and Kashmir investment boom,

The value of new investment projects in J&K hit ₹31,644 crore in FY25, a 328.4 per cent year-on- year rise, according to data compiled for Business Standard by Projects Today, which tracks new and ongoing investment projects in India since 2000.

https://www.business-standard.com/economy/news/pahalgam-terror-attack-ma...