ऱोबर्ट वड्रांच्या नवीनतम मुलाखती

माहितगार's picture
माहितगार in राजकारण
12 Apr 2024 - 11:56 am

कुटूंबांनीच सत्ता गाजवायच्या तर सरंजामशाही आणि राजेशाही काय वाईट आणि लोकशाहीचे नाटक खेळणे गरजेचे आहे का? मी मागच्या दाराने कुटूंबशाही राबवणे लोक्शाही तत्वांचा अपमान आहे. कोणत्याही राजकीय पक्षातल्या कुटूंबशाहीचे तसूभरही समर्थन करत नाही. पण फार प्रचंडमोठा समाज कुटूंबशाहीचे समर्थक आहे याची कल्पना आहे. असो.

गेल्या आठवड्याभरापासून समस्त काँग्रेसीयांचे जावई (किंवा जे काही नाते असेल ते) मा. रॉबर्ट वड्रा साहेब यांच्या मुलाखती माध्यमातून पेरल्या जात आहेत असे दिसते.

दुवे:

१) इंडीया टिव्ही
२) एबिपी न्यूज
३) न्युज २४ हि अधिक प्रदीर्घ आहे पण वेळ असल्यास हि मुलाखत राजकीय विश्लेषकांनी पहाणे अधिक सयुक्तिक असेल असे वाटते.

तुमच्या ऐकण्यात अजून मुलाखती आल्यास प्रतिसादातून आवर्जून नमूद कराव्यात.

शेअर मार्केट मध्ये इंटर्नल ट्रेडींग विषयी कायदे असतात तसे जमिन व्यवहाराबाबत आज पावेतो फारसे नसावेत याचा लाभ सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना होत असावा असा माझा व्यक्तिगत कयास आहे. आताच त्याची का आठवण यावी हे जाणकारास सांगणे न लगे. जेव्हा गोष्टी काय'द्याचे नुसार असतात तेव्हा सोज्वळपणे वावरणे यास वावगे म्हणावे की नाही हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत मुल्यांचा प्रश्न असावा. असो.

मा. रॉबर्ट वड्रा साहेब यांच्या मुलाखतींतून मला जाणवलेले मुद्दे १) आलेय आंगावर तर घ्या शिंगावर रंगवून अशा स्वरूपाचे परिवार वादाचे समर्थन उघडपणे रेटणे (सध्या नेपाळमध्येही राजेशाही परत आणण्यासाठी आंदोलन चालू आहे तेव्हा हे कदाचित भारतीय उपमहाद्वीपाच्या हस्तरेषांवर कोरलेले असेल?) २) राहुल गांधींच्या पंत्प्रधानपदाच्या उमेदवारीचे उघड सुतोवाच करणे ३) अधिक राजकीय भूमिकांसाठी नजिकच्या भविष्यात प्रियांका गांधी आणि स्वतः रॉबर्ट वड्राही गुडघ्यास बाशींग बांधून तयार असल्याचे सुतोवाच करणे ४) स्व कुटूंब कतृत्व आणि विरोधी पक्षांकडून होणार्‍या अनाठायी अन्यायाचे बखान करणे. ५) त्यांच्याही आजूबाजूला चापलूसांचा बर्‍यापैकी वावर असावा

मला जाणवलेली शैली मुलाखती केवळ पेरलेल्याच नाही तर तत्पुर्वी काही थोडे फार सराव झाले असावेत अर्थात राहुल गांधींचे ट्यूटरींग जाणवते तेवढे वड्रांचे चटकन लक्षात येत नाही. घरच्या वावरात इंग्रजीचा वावर अधिक असल्यामुळे का काय कोण जाणे मनातल्या मनात हिंदीत अनुवाद करत बोलल्यामुळे माध्ये मध्ये अडखळत असावेत कि विचार करत बोलल्यामुळे हे इतर श्रोत्यांनी ठरवावे.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यसाठी अनेक आभार
* उत्तरदायित्वास नकार लागू

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Apr 2024 - 7:44 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदी घराणेशाहीवर भाषणं देत फिरतात नी घराणेशाहितच उमेदवार देतात. लोकाना मूर्ख समजतात. (लोकामध्ये अंधभक्त धरले जाऊ नयेत कारण ते आधीच मूर्ख असतात)

अहिरावण's picture

14 Apr 2024 - 7:46 pm | अहिरावण

सहमत आहे.

- मुर्ख शिरोमणी

सुबोध खरे's picture

15 Apr 2024 - 10:24 am | सुबोध खरे

एवढे सगळे होऊन सुद्धा लोक श्री मोदी यांनाच मतं देऊन निवडून आणतात हि खरी जळजळ आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2024 - 1:27 pm | अमरेंद्र बाहुबली

करणी व कथणीत फरक ! लोकसभेला 29 उमेदवार घराणेशाहीचे, सर्वाधिक भाजपचेच
https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/5014

आता तरी घराणेशाहीला विरोध करा

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 6:56 pm | अमरेंद्र बाहुबली

केलाच आहे की.
पण एक आनंदाची बातमी ऐका
अजित पवार गट भुईसपाट, एकनाथ शिंदेंना जबर धक्का, महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय सांगतो?
https://www.tv9marathi.com/maharashtra/lok-sabha-election-2024-tv9-polst...

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2024 - 10:14 am | अमरेंद्र बाहुबली

पोझिटिव बातमी
घराणेशाही मार खाणार असे दिसतेय
महायुतीचे मिशन ४५+ धुळीला? सीव्होटर ओपिनियन पोलमध्ये ३० जागांचा अंदाज, दादांना भोपळा, ठाकरेंना ९ जागा
https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/c-voter-abp-news-...

अमर विश्वास's picture

17 Apr 2024 - 10:03 pm | अमर विश्वास

तोच सर्व्हे संपूर्ण भारतात NDA ३६६-४०६ आणि I.N.D.I.A. फक्त १०८ ते १२८ जागा दाखवतो आहे ...

आएगा तो मोदीही

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2024 - 10:26 pm | अमरेंद्र बाहुबली

देश की वाट पण तोच लगायेगा.

अमर विश्वास's picture

18 Apr 2024 - 9:07 am | अमर विश्वास

उगी उगी ...

आपण सर्व भाजपेयींचे घर उन्हात बांधु

PM आवास योजनेअंतर्गत

अहिरावण's picture

18 Apr 2024 - 9:59 am | अहिरावण

नेहरुंनी आधीच वाट लावलीय इतरांची गरजच काय !!