स्वराज्य

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
24 Mar 2024 - 9:05 am

केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे

- चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू
- गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे
- सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे
- गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत
- १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल
- काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे
दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग )
आता तांत्रिक बाबी
चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे
वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात
पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण )
अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम

सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे

छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत )
राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका )
मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी )
टिळक
सावरकर

असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे
एक अजून प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8

प्रतिक्रिया

ज्याचे त्याचे विचार असतात...

मुद्दे संपले की, काही माणसे, व्यक्तिगत पातळीवर उतरतात...

आपण लक्ष द्यायचे नाही....

>>मुद्दे संपले की, काही माणसे, व्यक्तिगत पातळीवर उतरतात...

सहमत

आग्या१९९०'s picture

26 Mar 2024 - 7:14 pm | आग्या१९९०

आझाद हिंद सेनेतील सैनिकांना स्वातंत्र्यानंतर सरकारने पेन्शन आणि शेतजमिनी दिली होती, त्यांना वाऱ्यावर सोडले नव्हते.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 7:24 pm | मुक्त विहारि

मी तर वेगळेच वाचले आहे...

आझाद हिंद सेनेचे जे सैनिक पाकिस्तान मध्ये गेले, त्यांना पाकिस्तान सैन्य दलात नौकरी मिळाली.

पण,

भारतात मात्र, आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची भरती, भारतीय सेनेत समाविष्ट करण्यात आली न्हवती...

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2024 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

सावरकरांनी माफी मागीतली होती हे काही खोटे नाही तसेच ह्यावरून त्यांचं स्वातंत्र्यातील महत्वही कमी होत नाही. नेहरू आणी सावरकर दोघेही महानच. पण आज सावरकरांचा माफीवीर म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचार झाला तो विकृत मोदीभक्त नी संघीलोकांमूळे. कुणे एकेकाळी टीकेचा पातळी ठेवली जायची. पण माकडाच्या हातात कोलीत त्याप्रमाणे विकृत अंधंभक्तांच्या हातात फोन नी अडाणचोट नेत्यांकडे पक्षाचा ताबा आल्यापासून कुणालाच बॅधन राीले नाही. काॅंग्रेसनेही मग ताच पातळीला ऊतरून सावरकांना टार्गेट केले. ते एक बरे केले कारण विकृत अंधभक्त ना त्यांचे अडाणी नेते आता तोंडावर नी बोटांवर थोडा लगाम ठेवतात. जयराम रमेश एकदा बोलले होते की “तुम्ही आमचा खोटा ईतिहास बाहेर काढू नका नाहीतर आम्ही तुमचा खरा ईतिहास बाहेर काढू.” पण नेहरूंवर सतत विद्वेषपुर्ण टीका तीही मोदींपासून ते गल्लीतल्या अंधभक्तांकरवी झाल्यामूळे सावकरांना माफीवीर म्हणणे काॅंग्रेसने सुरू केले नी आज सावरकर त्यामूळेच जास्त प्रसिध्द होऊन बसलेत.
बाकी सिनेमाबद्दल म्हणाल तर सिनेमा जोरदार आपटलाय. रणदिप हुडाने अंधभक्त प्रचारकांकडून पैसा घेऊन बनवला असेल तर ठिकाय, जर घरदार विकून बनवला असेल तर त्याच्या सारखा मुर्ख तोच. आणा मला नाही वाटत तो ईतका मुर्ख असेल. सोशल मिडीयावर भक्तांनी सिनेमाच्या प्रचारकी पोस्ट लिहीणं सुरू केलं नी दणादण फाईव स्टार देणं सुरू केलं तेव्हाच कळालं की सिनेमात दम नाही. ( ही लोकं खरंच सिनेमा पहायला गेली होती का शंका आहे.) कारण चांगला सिनेमा आधी सिनेमगृहात तूफ्फाव कमाई करतो. ना मग लोकांचे लेख बाहेर पडतात. ईथे लेख बाहेर पडताहेत पण सिनेमा गळपटतच चाल्लाय. गांधींवरचे सिनेमे पुरस्कार मिळवतात नी रग्गड कमाई करतात कारण त्यात द्वेष नसतो. सावरकरांवरील सिनेमा ट्रेलरपासूनच गांधीद्वेष प्रकट करतो. आपली रेष मोठी दाखवायची म्हणून दुसर्याची रेष छोटी करण्याचा प्रयत्न मुर्खपणाचा आहे. असेद्वेष्टेपणेवाले सिनेमे हीट होतील ही शक्यता फार कमी असते.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 7:29 pm | मुक्त विहारि

-----नेहरूंवर सतत विद्वेषपुर्ण टीका तीही मोदींपासून ते गल्लीतल्या अंधभक्तांकरवी झाल्यामूळे सावकरांना माफीवीर म्हणणे काॅंग्रेसने सुरू केले नी आज सावरकर त्यामूळेच जास्त प्रसिध्द होऊन बसलेत.------

व्वा... काय तर्क आहे....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Mar 2024 - 10:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"नेहरूंवर सतत विद्वेषपुर्ण टीका तीही मोदींपासून ते गल्लीतल्या अंधभक्तांकरवी झाल्यामूळे सावकरांना माफीवीर म्हणणे काॅंग्रेसने सुरू केले नी आज सावरकर त्यामूळेच जास्त प्रसिध्द होऊन बसलेत"
हे खरे आहे. १९९८ पर्यंत असल्या विषयावर चर्चा सहसा होत नसे. वाजपेयी सरकार आले आणि मग अनेकानी "नेहरू गांधी वाईट' प्रचार उघडपणे चालु केला. त्यालाच कंटाळून मग काँग्रेसने हिंदु महासभेचा खरा ईतिहास काढायला चालु केला.२०१४ नंतर तर सगळ्याना ऊत आला. लालबहादूर शास्त्रींना मारले/सुभाष बाबुंवर नेहरू पाळत ठेवुन होते.. पुर्वीची कुजबुज आघाडी आता मेन स्ट्रीममध्येच आली होती. त्यामुळे दर पंधरवड्याला अशा बातम्या येऊ लागल्या. ह्याला आवर घालण्यासाठी मग माफीवीर प्रकरण चालु झाले. मतांसाठी असा ईतिहास उकरणे अंगाशी येतेच.

चौकस२१२'s picture

27 Mar 2024 - 5:26 am | चौकस२१२

काँग्रेस ने काढला तो "खरा इतिहास" आणि कोणी गांधी नेहरूंचं ( गुणबरोबरच ) दोष दाखवून द्यायला लागेल तर तो अप्रचारर .. वाह रे वाह
माईसाहेब काँग्रेस च्या कालात काँग्रेस आणि गांधी तत्वांबद्दल ब्र काढायची बंदी होती सदः आधी चित्रपटाचे उद्धरण घ्या !

पत्रकारितेवर बंदी कोणी आणली?१९७५
आज द वायर , अराफ खान शेरवानी, रवीश मुमार, राजदीप सरदेसाई , निखिल वागले / बरखा दत्त तुरुंगात आहेत कि मोकळे?
गेली ६०-७० वर्षे गांधीवाद + समाजवाद हेच फक्त सत्य बाकी झूट हि अफूची गोळी कोणी खिलवली आणि कोणी खाल्ली ?
लोकशाहीत २ वेळा तुम्हीं म्हणता तसे अप्रचार करणार्या विचारांचा पक्ष निवडून येतो तरी तुमचे हे रडगाणे चालूच

आग्या१९९०'s picture

26 Mar 2024 - 7:40 pm | आग्या१९९०

नेहरू आणी सावरकर दोघेही महानच.
महानतेचे काय निकष आहेत हे माहीत नाही. परंतु नेहरू संकुचीत वृत्तीचे नक्कीच नव्हते. आम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमात सावरकरांचा धडा होता, ' ने मजसी ने ' हे मी बालपणापासून आकाशवाणीवर ऐकले आहे. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. आकाशवाणीवर आणीबाणीत बंदी असेल कदाचीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2024 - 9:09 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

हो ना....

अगदी उदार व्यक्तिमत्व होते...

चीनला जमीन देणे.

अर्धा काश्मीर पाकिस्तानला घेऊ देणे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मदत न करणे...

सूर्हावर्डी प्रकरणात, ऐनवेळी हस्तक्षेप न करणे.

पाकिस्तान मध्ये, अल्पसंख्यांक जनतेचे हत्याकांड होत असताना देखील, त्या अल्पसंख्यांक जनतेला मदत न करणे.

तिबेटला वाऱ्यावर सोडणे...

फारच उदारमतवादी व्यक्तिमत्त्व...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Mar 2024 - 11:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"अर्धा काश्मीर पाकिस्तानला घेऊ देणे."
ईतिहास जाणणार्याकडुन खातरजमा करून घ्यावी. ज्यांना आम्ही विचारले(हे ईतिहास्कार काँग्रेसचे नव्हते वा कोणत्या पक्षाचे) ती माहिती अशी-
बैठकीत काश्मीरचा निर्णय घायची वेळ आली तेव्हा अनेकानी "कश्मीरवरील हक्क भारताने सोडुन द्यावा" असे मत व्यक्त केले होते.(ह्यात सरदार वल्लभभाई पटेलदेखील होते. जबरदस्तीने काश्मीर घेतला तर नुकसान होईल, नाव खराब होईल हा हिशोब होता. विरोध केला तो नेहरूनी. "मी कश्मीर जाउ देणार नाही. ती माझी भूमी आहे. "असे नेहरू म्हणाले. हे ऐकीव नाही. नॅशनल आर्काय्वीजमध्ये जाउन ज्यानी वाचन केले आहे, त्यांच्याकडुन खातरजमा करून घेतली आहे. ह्याचे लेखी पुरावे आहेत.)

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2024 - 1:14 am | अमरेंद्र बाहुबली

मी कश्मीर जाउ देणार नाही. ती माझी भूमी आहे. व्वाह. नेहरूंबद्दलचा आदर द्विगुणीत झाला. धन्यवाद माई.

"मी कश्मीर जाउ देणार नाही. ती माझी भूमी आहे. "असे नेहरू म्हणाले.

मग, ऐनवेळी सैन्याला थांबायला का सांगितले?

आणि नेहरू जर इतके इतरांचे ऐकत असतील तर, चीनच्या वेळी सैन्य अधिकाऱ्यांचे का ऐकले नाही?

आणि सरदार वल्लभभाई पटेल, पंतप्रधान व्हावेत हा बैठकीला निर्णय, नेहरूंनी एका प्यादाला पुढे करून का फिरवायला लावला?

बहुतेक नेहरूंना शांततेचे नोबेल पाहिजे होतं-रणदीप हुडा नेहरूंचा वागण्याचा ऊहापोह करताना मुलाखतीत म्हणाला आहे.

आग्या१९९०'s picture

27 Mar 2024 - 11:06 am | आग्या१९९०

हुडा म्हणतो म्हणजे नक्कीच खरे असेल. काळया पाण्याची शिक्षा भोगून आल्यावर आयुष्यभर शांत राहिलेल्या वीराला शांततेचे नोबेल मिळायला हवे होते, भारतरत्न तरी द्या हो.ते आपल्या हातात आहे. नुसते सिनेमे काढून पैसा काढण्याचा धंदा आहे. बोलायला काय जाते ह्यांचे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2024 - 11:25 am | अमरेंद्र बाहुबली

सावरकरांची वापर फक्त काही मूठभर मतांसाठी होतो. ते मतं नाही मिळाले तरी चालतं. भाजप नेते नितेश राणेंना घेतलंच ना भाजपात, सावरकरांवरील त्यांचं ट्वीट वाचा.

ब्रिटीशांची चार वेळा माफी मागनारे सावरकर तरूणांचे आदर्श होऊ शकत नाहीत. - माननीय आमदार नितेश राणे.

https://www.maharashtranama.com/nagpur/mla-nitesh-rane-twit-made-in-dece...

व्वा...

काय मस्त तर्क आहे..

आपण मोपल्यांचे बंड आणि माझी जन्मठेप, ही दोन पुस्तके वाचली आहेत का?

चौकस२१२'s picture

27 Mar 2024 - 5:00 am | चौकस२१२

पण आज सावरकरांचा माफीवीर म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचार झाला तो विकृत मोदीभक्त नी संघीलोकांमूळे.
काँग्रेस सावरकरांना टार्गेट करते याला भाजप जबाबदार ? व चोराच्या उलटया बोंबा
सावरकरांवरील सिनेमा ट्रेलरपासूनच गांधीद्वेष प्रकट करतो.
चित्रपट बघून ठरवला कि आधीच ?
चित्र अगदी उलट आहे गांधींच्या विचारसरणीला अतिशय सभ्य पने मांडले आहे
आणि आंबेडकरांचच्या विधान बद्दल किंवा जिन्हा खिलाफत बद्दल काय म्हणले होते त्या बद्दल काय? तेव्हा चिडीचूप ?
गांधींवरचे सिनेमे पुरस्कार मिळवतात नी रग्गड कमाई करतात कारण त्यात द्वेष नसतो.
यात हि नाहिये यात नाण्याची दुसरी बाजू दाखवली आहे कि जी तुम्च्य्सारख्यानं बघायचिच नाहीये ( सावरकर बोस टिळक पटेल यांचे कौतिक करताना गांधी नेहरूंचे योगदान कमी होत नाही पण तेवडः मनाचा मोठे पणा कुठे आहे तुमच्या कडे "

अहिरावण's picture

28 Mar 2024 - 10:41 am | अहिरावण

>>>जयराम रमेश एकदा बोलले होते की “तुम्ही आमचा खोटा ईतिहास बाहेर काढू नका नाहीतर आम्ही तुमचा खरा ईतिहास बाहेर काढू.”

अच्छा ! म्हणजे जयराम रमेश बोलले तर ते खरे ! आणि बाकी काही बोलले तर ते खोट्टे... भलतीच खात्री आहे तुम्हाला !!!

अगम्य's picture

27 Mar 2024 - 3:24 am | अगम्य

स्वधर्म ह्यांनी विचारलेला प्रश्न काहीसा unpopular opinion वाटत असला तरी त्यांचा प्रश्न विचारण्याचा नेमकेपणा, आणि अभिनिवेशविरहित प्रामाणिकपणा आवडला. अशा प्रकारे चर्चा मिसळपाववर झाल्या तर खूप बरे होईल.
‘सावरकर यांनी अंदमानातून सुटून आल्यावर इंग्रज सरकारविरूध्द नक्की कोणत्या कारवाया केल्या? कोणते लढे उभारले?’ ‘अंदमानच्या सुटकेनंतरचे इंग्रज सरकारची पेन्शन घेत, त्यांना कसलाही उपद्रव होऊ नये याची काळजी घेत जगलेले सावरकर’ हेच समोर येते
>> ह्यावर माझी माहिती व आकलन पुढीलप्रमाणे आहे (जसे आठवेल तसे लिहीत आहे. सगळे पुरावे हाताशी नाहीत पण इच्छुकांनी पाहिजे असेल तर शोधाशोध करावी. )
१) पेन्शनचा मुद्दा: सावरकरांची कायद्याची पदवी इंग्रजांनी रद्द केली होती. अशा प्रकारे त्यांचे चरितार्थाचे साधन काढून घेतले होते आणि त्यांना रत्नागिरीत स्थानबद्धतेत ठेवले होते. ते एक प्रकारचे कैदीच होते. ती पेन्शन नसून एक allowance होता. बऱ्याच राजकीय कैद्यांना दिला जायचा. गांधीजींना सुद्धा दिला गेला होता असे कुठेतरी वाचले आहे. त्यातून तो सावरकरांना इतरांपेक्षा अर्धाच दिला जायचा. त्यामुळे हा पैसा Quid pro Quo नव्हता. इतरांना द्यायचे तसे त्यांना दिले. सावरकर पक्के उपयुक्ततावादी होते. सरकारकडून मिळणारे पैसे सोडून विनाकारण moral high ground घेण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.
२) क्रांती कारक मार्गाने जायचे तर त्यांचा मार्ग म्हणजे all out भूमिगत होऊन काही इंग्रज अधिकाऱ्यांचे खून करून दोन-चार वर्षात पकडले जाऊन फासावर जाणे असा राहिला असता. किंवा भारताबाहेर जाऊन क्रांतिकारक कार्य करावे लागले असते. ह्याशिवाय इतर मार्ग नव्हता.ह्यात फार साध्य झाले असते असे नाही. चाळीशी उलटलेल्या, काळ्या पाण्याने शरीर पिचलेल्या सावरकरांनी, स्थानबद्धतेत इंग्रजांच्या नजरकैदेत प्रत्यक्ष क्रांतिकारक कार्य करणे प्रॅक्टिकली शक्य नव्हते. त्यांना राजकीय activities मध्ये भाग घ्यायलाही बंदी होती. गांधींइतके सावरकर काही mass following असलेले नेते नव्हते. त्यामुळे सरकार त्यांना पुन्हा दहा बारा वर्षांसाठी आत टाकायला डगमगले नसते. पुन्हा क्रांतिकार्यातच काय, सध्या सरकारविरोधी सत्याग्रहात देखील पकडले तर पुन्हा अनेक वर्षांसाठी तुरुंगात खितपत पडून देशाच्या कुठल्याही कामी येता येणार नाही ही टांगती तलवार सतत होती. त्यामुळे स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी उघड राजकीय लढ्याला लगाम घातला. रिस्क/रिवॉर्ड पाहिले तर इतर मार्गाने ते देशाच्या अधिक उपयोगी पडले असे म्हणता येईल.
३) काळ्या पाण्याहून परत आल्यावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची परिस्थिती बदलली होती. जन -आंदोलन, निवडणूका हे आधीपेक्षा जास्त परिणामकारक झाले होते. क्रांतिकारक मार्गांच्या शिवाय हाही एक मार्ग आता उपलब्ध झाला होता. ह्या बदललेल्या परिस्थितीबद्दल त्यांनी यशवंतराव चव्हाणांकडे उद्गार काढले होते असे यशवंतरावांनी त्यांच्या आठवणीत लिहिले आहे. आता लोक-समूह, त्यांची विचारसरणी, त्यांचे सिस्टीम मधले अधिकार वगैरे influence करणे महत्त्वाचे होते. ह्या बदललेल्या landscape मध्ये हिंदूंच्या हिताची काळजी वाहणारे कुणी नाही हे त्यांनी ताडले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गात आणि मिळाल्यावर त्याची फळे चाखण्यात हिंदूना परिणामकारकपणे सहभागी व्हायचे असेल तर हिंदू समाजातील वाईट गोष्टी काढून त्याला अधिक सुदृढ, एकसंघ, आणि आपल्या हिताच्या दृष्टीने जागरूक करण्याची निकड त्यांना जाणवली. एकीकडे राजकीय कार्यातील high risk /low reward आणि सामाजिक कार्यातील low risk /high reward (देशाच्या दृष्टीने ) ह्यातील दुसरा मार्ग त्यांनी स्वीकारला असे वाटते.
४) इंग्रजविरोधी कारवायांचा विचार करायचा झाला तर ह्या काळात त्यांचे क्रांतिकारकांशी गुप्त संबंध होते. भगत सिंगांनी त्यांच्या क्रांतिकारक संघटनेत सावरकरांचे पुस्तक वाचणे अनिवार्य केले होते. रासबिहारी बोस ह्यांनी १९३७ साली सचिंद्रनाथ सन्याल ह्या क्रांतीकारकांना पत्र लिहून सावरकरांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. https://rediscoveringsavarkar.wordpress.com/2022/11/22/savarkar-after-1937/
पुढे दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी भारतीयांनी (त्यात सुद्धा हिंदूंनी ) सैन्यात सहभागी व्हावे म्हणून हिरीरीने प्रचार केला. (त्यासाठी त्यांची रिक्रूटवीर म्हणून हेटाळणीही झाली). एकदा हातात बंदूक आली की त्याच्या नळी कुठल्या दिशेने फिरवायची ते आपल्याला ठरवता येईल असे त्यांचे म्हणणे होते. अशाच प्रकारे आझाद हिंद सेनेची स्थापना होऊन नळी इंग्रजांच्या विरुद्ध फिरवली गेली. आजाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस ह्यांच्याशी सावरकरांचा correspondence होता. सुभाष चंद्र बोस ह्यांनी सुद्धा सावरकरांचे आभार मानलेले आहेत.
In a broadcast on 25 June 1944 on the Azad Hind Radio, Netaji said –
“When due to misguided political whims and lack of vision, almost all the leaders of the Congress party have been decrying the soldiers in the Indian army as mercenaries, it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youths of India to enlist in the armed forces. These enlisted youths themselves provide us with trained men and soldiers for our INA.”

महायुद्धानंतर झालेले नाविक दलातील बंड, हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. "भारतातले आपले राज्य आता टिकवायचे तरी कशाच्या बळावर असा प्रश्न इंग्रज सत्तेपुढे उभा राहिला" असे ह्या बंडाबद्दल महाराष्ट्रातल्या क्रमिक पुस्तकात वाचल्याचे आठवते. अशा प्रकारे इंग्रजी सैन्यात भारतीयांनी प्रवेश करण्यासाठी सावरकरांनी केलेले प्रयत्न भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पुढे उपयोगी ठरले. हे श्रेय त्यांचे एकट्याचे नाही. पण त्यांनी त्यांच्या परीने वाटा उचलला. सरकारने वकिलीची पदवी रद्द केलेली असल्याने आझाद हिंद सेनेचा खटला त्यांनी लढण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधांनांन तार पाठवून सैनिकांचे समर्थना साठी युक्तिवाद केला होता. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच पाकिस्तानशी युद्ध करायचा प्रसंग आला तेव्हा एका भारतीय सेनाधिकाऱ्याने सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धासाठी रिक्रुटमेंट साठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज स्वातंत्र्यानंतर लगेच भारतीय सैन्याची स्थिती बरी असण्यात मदत झाली असे म्हटल्याचे वाचलेले आठवते.

अशा प्रकारे "‘अंदमानच्या सुटकेनंतरचे इंग्रज सरकारची पेन्शन घेत, त्यांना कसलाही उपद्रव होऊ नये याची काळजी घेत जगलेले सावरकर’ हेच समोर येते" असे म्हणणे योग्य नाही. स्थानबद्धतेत देखील त्यांच्यावर इंग्रज सरकारची डोळ्यात तेल घालून नजर होती ती काही उगीच नाही. त्यांनी ह्या काळात सामाजिक सुधारणांसाठी कौतुकास्पद कार्य केले, तसेच वर सांगितल्याप्रमाणे वेगळ्या मार्गांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग दिला.

Bhakti's picture

27 Mar 2024 - 7:27 am | Bhakti

खुप छान प्रतिसाद!
एकाच व्यक्तीने आयुष्यात वयाच्या आठ वर्षांपासून क्रांतीची मशाल पेटवत पुढे जाऊन क्रांतिकारक व्हायचं,त्यांचेच कायदे शिकण्यासाठी अभ्यास करत त्यांची भूमी गाठायची, क्रांतिकारक व्हायचं,प्रेरणा देणारी संघटना उभी करायची, अतोनात हाल सहन करत देशाची सेवा उद्या करता येईल या आशेवर काळ्या पाण्यात जगायचं,तळपत्या लेखणीने इतिहास/विज्ञान/सुधारणा मांडायच्या, हिंदूत्वाला धार देत अखंड भारताचे स्वप्न पाहायचे, अस्पृश्यता निवारण करत देशहित जपायचे, स्वातंत्र्यानंतरही उपेक्षा झेलायची आणि तरीही आपण विचारायचे त्यांनी नंतर काय केले.. एकंदरीत सीमा राखून उत्तर मिळतंय का ते पाहायचं..
नाही कशाला एवढं करायचं होतं सावरकरांनी. मस्त लंडनहून बैरिस्टर होऊन आले असते तर मंत्रिमंडळात एखादे नेते झाले असते ....हो की नाही!

कर्नलतपस्वी's picture

27 Mar 2024 - 7:40 am | कर्नलतपस्वी

दिलेला प्रतिसाद. लिंक दिल्याबद्दल आभार.

अगम्य. असा प्रतिसाद असेल तर पुढे वाचन करून काही समजून घेऊन मत बदलायला जागा राहते. दुर्दैवाने इथले अनेक सावरकर प्रेमी तसे माहितीपूर्ण प्रतिसाद न देता, जी मते पटत नाहीत त्यावर आक्रस्ताळा प्रतिसाद देतात, त्यामुळे चर्चेची पातळी घसरते. आपण ती राखून प्रतिसाद लिहिल्यामुळे मिपावर चांगली चर्चाही होऊ शकते, असे वाटले.
आपण दिलेला दुवा वाचणार आहेच व अधिकही काही माहिती त्यासंदर्भात मिळते का याचा शोध नक्की घेईन. मत बनवायची घाई कशाला? शिवाय, मी सावरकर हे माझ्यासाठी एक कोडे आहेत असे म्हटले आहे व ते होईल तेवढे सोडवणार. फक्त त्यासाठी प्रचारकी चित्रपटाचा आधार घेणे मात्र योग्य वाटत नाही.

हळू हळू बाकीचे मुद्दे बघतो, पण तूर्तास एका मुद्यावर जरा खोदकाम केले. आपले लिखाण:
>> ती पेन्शन नसून एक allowance होता. बऱ्याच राजकीय कैद्यांना दिला जायचा. गांधीजींना सुद्धा दिला गेला होता असे कुठेतरी वाचले आहे. त्यातून तो सावरकरांना इतरांपेक्षा अर्धाच दिला जायचा. त्यामुळे हा पैसा Quid pro Quo नव्हता. इतरांना द्यायचे तसे त्यांना दिले. सावरकर पक्के उपयुक्ततावादी होते. सरकारकडून मिळणारे पैसे सोडून विनाकारण moral high ground घेण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.
====
यावर मी आपणच दिलेल्या साईटवर खाली दिलेल्या दुव्यावर वाचले असता,
https://rediscoveringsavarkar.wordpress.com/2022/11/23/savarkar-pension-...
गांधीजी यांच्या मेंटेनन्ससाठी रू. १०० दरमहा असे कागदपत्र दिसते. तसेच गांधीजी त्यांच्यासोबत पकडलेल्या कैद्यांसाठी रू. ४५० दरमहा असे कागदपत्र दिसते. हे पैसे तुरूंग अधिकार्याला सरकारच्या आज्ञेनुसार खर्ची दाखवता येतील असे दिसते. गांधीजींना स्वखर्चासाठी ते देण्यात यावे अशी आज्ञा असण्याची शक्यता नाही कारण पत्रव्यवहार दोन सरकारी अधिकार्यात आहे व गांधीजी हे राजकीय कैदी म्हणून तुरूंगात असताना हे पैसे खर्ची टाकता यावेत यासाठी आहे. याचप्रकारे बोस यांचे, गांधीजींचे जे कागद आहेत, त्यात रकमेचे स्पष्ट उल्लेख आहेत.
याच पानावर सावरकर यांच्याबाबत स्थानबध्दतेचे कागदपत्र आहेत, पण त्यात पेन्शनचा कुठेही उल्लेख आढळला नाही. पुढे मात्र याच पानावर सावरकर यांना ६० रू. पेन्शन मिळत होती, असे लिहिलेले आहे व त्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली असे सांगणारे कीर यांच्या पुस्तकातील पान आहे. सकृतदर्शनी गांधी बोस यांच्या बाबतचे रकमेचे उल्लेख ते ‘त्यांना देण्यात यावेत’ असे नाहीत, त्यामुळे सावरकर यांना मिळणार्या पेन्शनसारखे ते पैसे त्यांना मिळत होते असा निष्कर्ष काढता येत नाही. सावरकर यांना दिलेल्या रकमेचा उल्लेख असलेले कागदपत्र असते तर काही ठोस निष्कर्ष काढता आला असता.

दुसरे असे की १९२४ ते १९३० साली सोन्याचा दर २० रू. तोळा होता. http://www.indiabullion.com/gold.php त्त्याकाळी सावरकर यांनी कलेक्टरकडे ते वाढवून द्यावी अशी मागणी केली होती व कलेक्टरने त्यांना आपला पगार १८ रू. आहे असे सांगितले होते, असे टकले यांचे प्रतिपादन ऐकले आहे. एकंदर या काळात ६० रू. पेन्शन ही आपण म्हणता तसे केवळ चरितार्थ चालवण्यासाठी इंग्रजांनी एका कैद्याला का द्यावी असा प्रश्न निर्माण होतो.

अहिरावण's picture

28 Mar 2024 - 10:58 am | अहिरावण

>>६० रू. पेन्शन ही आपण म्हणता तसे केवळ चरितार्थ चालवण्यासाठी इंग्रजांनी एका कैद्याला का द्यावी असा प्रश्न निर्माण होतो.

तसे असेल तर सावरकर इंग्रजांच्या पैशावर मज्जा मारत होते हा विरोधकांचा दावा खोटा ठरतो.

भत्ता हा त्या व्यक्तीच्या कमाई /सांपत्तिक स्थिती/ कौटुंबिक गरज/ स्टेटस वगैरे प्रमाणे "personal wants " किंवा "support of family " साठी दिला जायचा असे दिसते. उदाहरणार्थ लिंक मध्ये दिलेल्या पुराव्यानुसार
१) सुभाषचंद्र बोसांचे भाऊ शरत्चन्द्र बोस "Mr. Sharat Chandra Bose was arrested on 4th of Febry 1932, and on recommendation of the Bengal Government a monthly allowance of Rs. 1200 was sanctioned for the support of his family with effect from that date. The recommendation was based on the fact that (1) his average annual income during the three preceeding years was Rs. 48000, (2) he had a family of 8, one of whom was studying at the Munich University, and (3) in the case of the state presioner mr. J. M. Sen Gupta, the family allowance had been fixed at Rs. 1000 per mensem."
२) नेताजी सुभाषचंद्र बोस "In the matter of maintenance allowance, I am to say that the Governor General in Council accepts the recommendation of the local Govt. and sanctions the grant of an allowance of Rs. 250/- a month. This is intended to meet all personal wants of the state prisionaer while he is detained in his brother's residence"
लंडनहून बॅरिस्टर होऊन आलेल्या सावरकरांनी वकिलीत बक्कळ पैसे कमावला असता. त्यामानाने त्यांना ६० दरमहा रुपये म्हणजे अगदीच स्वस्तात कटवले, तेसुद्धा त्यांची २७ हजारांची आणि त्यांच्या सासऱ्यांची ६ हजारांची मालमत्ता जप्त करून, आणि वकिलीद्वारे उत्पन्नाचा मार्ग बंद करून. ह्यावरून असे दिसते की सावरकरांना भरपूर पैसे चारून गप्प बसवले असा प्रकार नव्हता. हे म्हणजे सरकार मनाची नाही तरी जनाची लाज बाळगून त्यांना भत्ता देत होते, आणि चोराची लंगोटी म्हणून सावरकर तो घेत होते इतकेच.
जर थिसीस असा असेल की सरकारकडून मिळणाऱ्या दरमहा ६० रुपयांसाठी सावरकरांनी U टर्न घेतला, तर it does not have legs. बॅरिस्टर झाल्यावर सुखाने वकिली करून पैसे कमवायचे सोडून ज्या माणसाला क्रांतिकार्याचे भिकेचे डोहाळे लागतात, जो चौदा वर्षे तुरुंगात हाल अपेष्टा सहन करतो, काळ्या पाण्याच्या यातनांवर मात करणारी ज्याची इच्छाशक्ती आहे, त्याची तत्त्वनिष्ठा आणि मानसिक शक्ती दरमहा भत्त्यासाठी आपल्या स्वत्वाशी प्रतारणा करण्याइतकी तकलादू कशी असेल?
अंदमातून आल्यावर सावरकरांनी आपला फोकस नक्कीच बदलला पण त्याची करणे म्हणजे
१) पुन्हा ५० वर्षांसाठी तुरुंगात जाणे टाळणे (मग तर देशासाठी काहीही कार्य करता आले नसते). त्यातसुद्धा आधी पाच वर्षांसाठी असलेली स्थानबद्धता आणि इतर अटी सरकारने १३ वर्षे extend केल्या इतका त्यांना सावर्करांविषयी अविश्वास आणि भीती वाटत होती.
२) बदललेल्या राजकीय परिस्थितीत क्रांतिकारक मार्गांपेक्षा सामाजिक/civil मार्गांचे क्षेत्र खुले झालेले असणे, जिथे त्यांच्यासारखा intellectual suitable होता
३) समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा वगैरेंचे निर्मूलन करणे आणि हिंदू समाजाचे संघटन/ प्रबोधन हा अतिशय निकडीचा प्रश्न ज्यावर त्यांच्या कॅलिबरचे इतर कोणी त्यांच्या vision प्रमाणे काम करत नव्हते. हे एक आयतेच वाढून ठेवलेले काम available होते.
४) स्वातंत्र्यासाठी military मार्ग आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. त्यादृष्टीने त्यांनी संधी मिळाली तेव्हा कार्य केलेच.

स्वधर्म's picture

29 Mar 2024 - 11:52 pm | स्वधर्म

अगम्य, प्रथमत: प्रतिसाद द्यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व.

पेन्शन बाबत आपण म्हणता तसे बोस व गांधीजींना तुरुंगवासात असताना पैसे मिळत होते व ते सावरकर यांच्याप्रमाणेच होते. या दोन्ही नेत्यांना केवळ तुरुंगात असताना पैसे मिळत होते किंवा कसे? सावरकरांना सुटके नंतर व अटी पाळल्या तर इंग्रजी राज्य असेपर्यंत पेन्शन मिळत होती का? तुमच्या मते साठ रू. किरकोळ आहेत, पण त्याकाळच्या सरासरी वीस रू तोळा सोन्याच्या भावानुसार व कलेल्टरच्या पगारानुसार ते तसे किरकोळ वाटत नाहीत. यावर आपण आधीही म्हटले आहे की सावरकरांनी प्रॅक्टीकल विचार केला.
तसेच, आपण लिहिले आहे:
अंदमातून आल्यावर सावरकरांनी आपला फोकस नक्कीच बदलला पण त्याची करणे म्हणजे
१) *पुन्हा ५० वर्षांसाठी तुरुंगात जाणे टाळणे *

तुंरुंगात आयुष्य वाया जाईल या विचाराने या गांधी व बोस यांनी इंग्रजांकडे सुटकेची कोणतीही मागणी केली होती का? सावरकर यांनी दीड महिन्यातच अशी मागणी करणारे पहिले पत्र लिहिले होते आणि एकूण सहा माफीनामे लिहिले, असे टकले यांनी कागदपत्रांच्या आधारे सिध्द केले आहे. पण मला सावरकर यांनी स्वत:, निदान इंग्रजी राज्य गेल्यावर तरी त्याविषयी काही लिहून ठेवले आहे का, याची उत्सुकता आहे. त्यांचे माझी जन्मठेप हे पुस्तक शालेय वयात वाचले होते व भारावून गेलो होतो हे आठवते. त्या पुस्तकात हाल अपेष्टांची अनेक वर्णने आहेत, पण त्यांनी सुटके साठी सरकारकडे अर्ज केला होता, असे खुद्द सावरकर यांनी कुठे लिहिले आहे का? हे जर त्यांनी स्वत: कुठे लिहिले नसेल, व नंतर शोधपत्रकारिता करणार्यांनी शोधून काढले असेल, तर काय समजायचे? खरे तर त्याचा उल्लेख माझी जन्मठेप मध्ये असेल तर मलाही खूप आनंद होईल. आपण वाचले असेल तर जरूर सांगा.

त्याकाळी देशभक्त त्यालाच म्हणत जो तुरूंगाला भीत नसे. सरकारच्या अटी मानत नसे. आणि घरादारावर निखारा ठेऊन, परागांदा होऊन हाल अपेष्टा सोसून स्वातंत्र्यदेवीची आराधना करत असे. खुद्द सावरकर (अंदमानच्या आधीचे) यांनीच लिहून ठेवले आहे ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’. म्हणजे सावरकर म्हणतात की स्वातंत्र्यासाठी जीवही द्यावा, त्यापुढे वकीलीच्या बुडलेल्या उत्पन्नाची तमा ते कशाला बाळगतील ते लक्षात येत नाही.

मला तुमचा प्रतिसाद आणि सावरकर हे प्रॅक्टीकल विचार करणारे होते हे वाचून वाटले की सावरकर शहाणे होते. क्रांतीकार्य करण्यासाठी माणूस वेडा लागतो. बहुधा ते अंदमानच्या आधी वेडे होतेही.

कुसुमाग्रजांची वेडी मुले ही कविता आठवली:
परदास्याच्या बेड्या होत्या तव पायी जेधवा
पुत्र शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी मुले तयांची भडकूनी गेली मने
क्रांतीपूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे

बाकी कोट्यावधी शहाणे प्रॅक्टीकल विचार करत जगत होतेच की. वेडे तेच होत ज्यांनी असा विचार न करता आयुष्याची कुर्बानी दिली. टकले यांनी अंदमानहून सुटून आल्यानंतरही क्रांतीकार्यात भाग घेतलेल्या व पुन्हा शिक्षेला सामोरे गेलेल्या सशस्त्र क्रांतीकारकांची उदाहरणे व्यवस्थित रेकॉर्ड पाहून दिली आहेत.

आपण शांतपणे चर्चा करत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.

निनाद's picture

29 Mar 2024 - 7:08 am | निनाद

चांगले विवेचन. सहमत आहे.
साम दाम दंड भेद असलेल्या परिस्थितीमध्ये सगळे प्रकार वापरले पाहिजेत असे त्यांचे मत होते. त्यामुळे इंग्रज सरकार पैसे देत असेल तर ते घेतलेच पाहिजेत.
सावरकरांना मिळणारी पेन्शन ही खरं तर त्यांच्या कायद्याच्या पदवीची भरपाई होती आणि इतर राजकीय कैद्यांनाही मिळत असायची. त्यामुळे ते योग्यच होते. सावरकरांनी स्थानबद्धतेतून क्रांतिकारक कार्य करणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आणि धोकादायक होतं. त्यातही सावरकरांनी हिंदू समाजाला एकत्रित आणि जागरूक करण्यावर लक्ष केंद्रित केलं. सावरकरांचे क्रांतिकारकांशी गुप्त संबंध होते आणि त्यांनी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत योगदान दिले. सावरकरांनी भारतीयांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले आणि नाविक दलातील बंडासाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरले यात शंका नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Mar 2024 - 7:48 am | अमरेंद्र बाहुबली

आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत योगदान दिले. टकलेंच्या विडीओत तर काही वेगळंच सांगीतलंय. त्यांनी आझाद हिंदं सेनेविरूध्द लष्करात भरती व्हा असं आवाहन केलं होतं. सावरकरांचा लहान भाऊच इंग्रजांच्या रीक्रूटमेंट बोर्डात होता.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की:

  1. ना. ग. सावरकर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे व्यक्ती होते.
  2. त्यांच्या विचारांमध्ये आणि कार्यात भिन्नता होती.
  3. ना.ग. सावरकरांच्या कार्याचे मूल्यांकन स्वतंत्रपणे व्हायला हवे.

असो...

भारतात इंग्रज सरकारच्या राज्यात राहून आझाद हिंद सेनेत कसे काय रिक्रूट होता येईल? म्हणजे आझाद हिंद सेनेच्या रिक्रूटमेंटची पेप्रात जाहिरात देऊन त्या ठिकाणी मुलाखतींसाठी लोक जातील,आणि मग चाचण्या, प्रशिक्षण करून, बस पकडून युद्धभूमीवर जातील, आणि इंग्रज सरकार हे बघत ढिम्म बसेल, असे टकलेंना वाटते का? त्यासाठीचा मार्ग म्हणजे इंग्रजांच्या सैन्यात प्रवेश करणे, प्रशिक्षण घेणे आणि नंतर एकदा लढाईसाठी भारताबाहेर गेले की आजाद हिंद सेनेला जाऊन मिळणे असा होता. आधी बंदूक हातात मिळवा, वेळ आल्यावर नळीची दिशा फिरवता येईल अशी सावरकरांची स्ट्रॅटेजी होती. सुरुवातीला जपान्यांचा बराच जोर होता. त्यांनी इंग्रजांच्या सैन्याला आग्नेय आशियात हरवले आणि त्यांच्या बऱ्याच सैनिकांना युद्धकैदी बनवले. त्यातले बरेच सैनिक आझाद हिंद सेनेत भरती झाले. माझ्या आधीच्या प्रतिसादात प्रत्यक्ष सुभाष चंद्र बोसांच्या भाषणाचा भाग दिला आहे. आता आजाद हिंद सेनेसाठी काय चांगले हे टकलेंना नेताजींपेक्षा चांगले कळत असले तर त्यावर काही म्हणणे नाही.
In a broadcast on 25 June 1944 on the Azad Hind Radio, Netaji said –
“When due to misguided political whims and lack of vision, almost all the leaders of the Congress party have been decrying the soldiers in the Indian army as mercenaries, it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youths of India to enlist in the armed forces. These enlisted youths themselves provide us with trained men and soldiers for our INA.”

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Mar 2024 - 8:44 am | अमरेंद्र बाहुबली

नेताजींना सावरकरांबद्दल पत्रात काय लिहीलंय तेही विडीओत सांगीतलंय.

कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2024 - 8:24 am | कर्नलतपस्वी

डाॅक्टर नारायण गणेश सावरकर दंत चिकित्सक होते. इंग्रज त्यांना रिक्रुटमेन्ट बोर्डावर कशाला घेतील. नोकरी देण्या आगोदर कॅरॅक्टर ॲण्ड ॲन्टेसिडेन्ट चेक करण्याचे कायदे त्या वेळेस खुपच कडक होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Mar 2024 - 8:44 am | अमरेंद्र बाहुबली

टकलेंनी पुराव्यासह सांगीतलंय.

कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2024 - 9:06 am | कर्नलतपस्वी

त्यांचे पुरावे का ग्राह्य धरायचे,हवे तर त्यांनी कोर्टात जाऊन सिद्ध करावे मग लोकांचे मतपरिवर्तन होऊ शकेल.

इथे ISI =Indian Standered Institute असा घ्यावा. अन्यथा नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Mar 2024 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली

त्यांचे पुराव्यांसह पुस्तक येणार आहे. तसेच ते जर खोटं बोलत असतील तर सावरकर भक्त कोर्टात का जात नाहीत?? टकलेंकडे पुरावे आहेत म्हणूनच कुणी कोर्टात जायची हिंमत करत नाही.

कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2024 - 11:15 am | कर्नलतपस्वी

टकल्यांनी कोर्टात जाऊन केस जिंकल्यानंतर सावरकर विरोधी त्यांना डोक्यावर घेतील. मोठ्ठे पद देतील. इतीहासात नाव अजरामर होईल.

पेडगावकर या देशात भरपुर आहेत कुणा कुणाच्या नादी लागावं.

अहिरावण's picture

29 Mar 2024 - 1:19 pm | अहिरावण

आणि जर हरले तरी विरोधक शांत बसणार आहेत का ? ते दुसरा टकला शोधतील

सर टोबी's picture

29 Mar 2024 - 1:48 pm | सर टोबी

आवडलं! अंमळ अंधारी आलीय गगनभेदी थत्ते आणि तोरसेकर यांच्या तेजस्वी लेखणींच्या फटकाऱ्यांनी. त्यामुळे आत्ता एवढंच.

तुम्ही थत्ते आणि तोरसेकर ऐकता ? वाचता? पायाचे तीर्थ पाठवा !!

कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2024 - 5:39 pm | कर्नलतपस्वी

बादवे,
burden of proof. शाबितीची जबाबदारी
Section 101 in The Indian Evidence Act, 1872

101. Burden of proof.
Whoever desires any Court to give judgment as to any legal right or liability dependent on the existence of facts which he asserts, must prove that those facts exist.

पुराव्याचे ओझे.

ज्याला त्याने ठामपणे सांगितलेल्या तथ्यांच्या अस्तित्वावर अवलंबून असलेल्या कोणत्याही कायदेशीर अधिकार किंवा उत्तरदायित्वाचा निर्णय द्यावा अशी कोणाची इच्छा असेल, त्याने ती तथ्ये अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले पाहिजे.

तेव्हां ही जबाबदारी कुणाची हे वेगळे सांगणे न लगे.

तू नळीवर तुणतुणे वाजवणे सोपे असते.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा सख्खा शेजारी.

अगम्य's picture

30 Mar 2024 - 5:48 am | अगम्य

तुम्ही पोस्टमध्ये "माहिती पडताळून पाहून मी तरी मत बदलायला तयार आहे" असे म्हटले त्याचा आदर आहे. मी एकदा पोस्ट करून माहिती दिली, मग आणखी explanation दिलं, त्यानंतर आता पुनः तेच तेच होत आहे. तरी थोडक्यात पुन्हा एकदा लिहितो.
१) सुभाषचंद्र बोसांना त्यांच्या भावाच्या घरी स्थानबद्ध असताना २५० रुपये "personal wants " साठी मिळत होते. सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध असताना ६० रुपये मिळत होते. आपली २७ हजारांची आणि सासऱ्यांची ६ हजारांची मालमत्ता सरकारने लाटली. तर त्यांच्याकडून मिळणारे पैसे का सोडायचे? ते साठ रुपये घेतले नसते तर देशाचे काय भले होणार होते?
२) सावरकर प्रॅक्टिकल होते आणि त्यांच्या दृष्टीने देशभक्ती म्हणजे देशाच्या जास्तीत जास्त उपयोगी पडणे. म्हणूनच काळ्यापाण्यावर गेल्यावर लगेच त्यांनी तिथून बाहेर पडण्यासाठी mercy petitions लिहायला सुरुवात केली. तुरुंगात खितपत राहून ते देशाच्या काडीमात्र उपयोगी पडत नव्हते.
काळ्यापाण्यावरून बाहेर आल्यावर
Scenario १: सावरकर सरकारविरोधी मोर्चात भाग घेतात. सरकार त्यांना पुन्हा ५० वर्षांसाठी तुरुंगात टाकते. त्यांना कैदेत टाकले की देश पेटून वगैरे उठेल असे नव्हते. देशात इकडची काडी तिकडे झाली नसती. प्रॅक्टिकली सावरकर काळाच्या पडद्याआड जातात. देशाला उपयोग = शून्य.
Scenario २: जे त्यांनी केले
अ) सामाजिक कार्य - हिंदू संघटन, जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रचंड लेखन, मराठी भाषेची, साहित्याची सेवा.
ब ) देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न - स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यावर हिंदू महासभेच्या माध्यमातून राजकारण आणि निवडणुकांतून (काँग्रेसप्रमाणेच) जेवढी होईल तेवढी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न. क्रांतिकारकांशी गुप्त संधान, सैनिकी मार्गाने इंग्रज राज्य उलथवण्याच्या प्रयत्नांत रासबिहारी बोस सारख्यांशी संपर्क. इंग्रज सैन्यात तरुणांनी भरती होण्यासाठी मोहीम, ज्याद्वारे भारतीयांच्या हाती शस्त्रे आणि प्रशिक्षण आले. त्यानंतर नेताजींनीच म्हटल्याप्रमाणे सावरकरांचे प्रयत्न आझाद हिंद सेनेच्या उपयोगी पडले. नाविक दलात बऱ्याच प्रमाणात राष्ट्रप्रेमी भारतीय भरती झाले नसते, तर नाविक दलात बंड होऊ शकले नसते.

सावरकरांनी जे केले त्यावरून देशहिताच्या दृष्टीने Scenario २ चे पारडे Scenario १ पेक्षा कितीतरी जड आहे.

देशासाठी त्यांनी घरादारावर निखारा ठेवलाच, हाल अपेष्टा भोगल्याच. त्यानंतर जी परिस्थिती उद्भवली त्यात सुद्धा त्यांनी ज्या मार्गाने देशाच्या जास्त उपयोगी पडता येईल तो स्वीकारून देशाची सेवा केलीच. ह्यात टीका करण्यासारखं काय आहे हाच प्रश्न पडतो.
असो. माझा उद्देश कुणाचे मतपरिवर्तन करण्याचा नाही. ज्यांना आपल्या मताला चिकटून राहायचं असतं ते कितीही वेळ दळण दळू शकतात. मला जेवढी माहिती होती, आणि जितके स्पष्ट करून सांगता येत होते तेवढे मी केले आहे. ह्याउप्पर सांगण्यासारखे माझ्याकडे काही नाही. इतःपर ज्याचे जे मत होईल ते होवो.

अगम्य's picture

30 Mar 2024 - 6:13 am | अगम्य

"ज्यांना आपल्या मताला चिकटून राहायचं असतं ते कितीही वेळ दळण दळू शकतात." हे specifically स्वधर्म ह्यांना उद्देशून नाही, तर सोशल मीडिया वरचे जनरल निरीक्षण आहे. त्यामुळे मी जनरली शक्यतो दोन-चार प्रतिसादांपुढे (माहिती, स्पष्टीकरण) जात नाही. कारण त्यानंतर substance कमी आणि वेळेचा अपव्यय जास्त असतो. वाद घालणे किंवा आपले मत प्रस्थापित करणे हा माझा उद्देश नसल्याने शेवटचा प्रतिसाद आपलाच असा माझा अट्टाहास नाही. इत्यलम् !

चौकस२१२'s picture

27 Mar 2024 - 5:05 am | चौकस२१२

तसेच वर सांगितल्याप्रमाणे वेगळ्या मार्गांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग दिला.
अगदी उत्तम प्रतिसाद दिला आहे ... पण काय आहे म्हणतात ना खरंच झोपलेल्याला जागे करता येईल पण झोपेचे सोंग घेतलेलयाला जागे कसे करणारं
असो
सावरकरवाद काय गांधीवाद काय या दोन्ही कडे डोळस पने बघितले तर उत्तम ...

चौकस२१२'s picture

27 Mar 2024 - 6:03 am | चौकस२१२

https://www.youtube.com/watch?v=5I2vD4DpCzk
१४.१२
सावरकर =हिंदुत्व एक राजनैतिक सांस्कृतिक और भौगोलिक इतिहास है वोह किसी धर्म का नही .....
अति उजवे हिंदू = हिंदू धर्म फक्त बाकी काही नाही
काँग्रेस= हिंदू = हे काय?

विवेकपटाईत's picture

27 Mar 2024 - 11:13 am | विवेकपटाईत

सावरकर बंधूंनी एक दशक अंदमानच्या काल कोठडीत काढले. किती अनेक कैदी काही वर्षातच कष्टांना कंटाळून आत्महत्या करायचे किंवा त्यांची मृत्यू व्हायचे. दुसरीकडे गांधी आणि नेहरू जेलमध्येही फाईव्ह स्टार सुविधा भोगत असे. ब्रिटिशांचे एजंट कोण होते आणि स्वतंत्रता सेनानी कोण हे आजच्या पिढीला व्यवस्थित कळते.

आग्या१९९०'s picture

27 Mar 2024 - 11:22 am | आग्या१९९०

परंतु विश्वगुरूंना समजत नाही, अजून महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. १० वर्ष झाली ,अजून काही फरक नाही.कधी कळणार?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2024 - 11:26 am | अमरेंद्र बाहुबली

विदेशात बुध्द नी गांधीच लागतात. सावरकर वगैरे चालत नाहीत.

चौकस२१२'s picture

28 Mar 2024 - 7:44 am | चौकस२१२

च्छा हे खोटे हो... सावरकर तर अगा खान राजवाड्यात अजून भारी खोलीत राहत असत,, तुम्हाला माहित नाही का? निरंजन टाकलेना विचारा ,, त्यांच्या कडे आहे न्यानामृत

आग्या१९९०'s picture

27 Mar 2024 - 11:30 am | आग्या१९९०

भारतरत्न न देण्याचे एकच कारण आहे, विदेशातील कागदोपत्री पुरावे कसे नष्ट करणार? विरोधक वाटच बघत आहेत भारतरत्न द्यायची.