आजचा मेन्यू -२

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
7 Nov 2023 - 12:38 pm

पहिल्या मेन्यूला दिलेल्या प्रतिसादानंतर,आठवड्याचे मेन्यू सादर करावे म्हणून सजग झाले.भूक ही पोळी ,भाजी इ.खाण्याची नसते तर जास्त प्रमाणात प्रोटीन,मिनरल, व्हिटॅमिन आणि आवश्यक फैट,कार्ब मिळवण्यासाठी असते.पूर्वापार मनुष्य मांसाहारी होता पण आता काही काळापासूनच तो शाकाहारी झाला आहे.तेव्हा शरीराला आधी‌ प्रोटीनच आकर्षित करते.शाकाहारींनी डाळीचे प्रमाण अधिक ठेवावे.मिनरल आणि व्हिटॅमिनसाठी हिरव्या भाज्या ,फळ यांचे अधिक प्रमाण असावे.तसेच प्रोबायोटिक दही , प्रिबायोटिक फायबर युक्त सेलैड यांचा समावेश.आयर्नसाठी कधी गूळ तीळ-शेंगादाणा लाडू,खजूर, राजगिरा गूळ लाडू,मिलेट-गूळ लाडू यांचा समावेश असावा.

प

१.वाफवलेली कोबीची भाजी,पालकाची पोळी आणि पुर्या लेकीसाठी,तुरीचे फोडणीचे वरण आणि भात
२.भाकरी,दोडक्याची भाजी,मेथीची दाण्याच्या कुटाची भाजी

३.उकडलेले बटाटे आणि अर्धा किसलेला भोपळा २ वाटी ज्वारी१वाटी गव्हाचे पीठ,मिरची कोथिंबीर धने घालत पीठ मळले.आणि लाटून धपाटे केले.सोबत गाजराची चटणी -गाजर बारीक किसून त्यात दही तिखट साखर घातले.

४.सालीच्या मुगाचे कढण, कारल्याची भाजी-कारले चकत्या प्रमाणे चिरून लिंबू ,हळद आणि मीठ लावून ठेवले.नंतर १५ मिनिटांनी अर्धी वाटी गूळ, शेंगदाणे कूट तिखट धने पावडर टाकून तो मसाला कारल्याच्या चकत्यांबरोबर मिक्स करून घेतला आणि फोडणी देऊन भाजी परतली.भाजी परतताना त्यावर झाकण ठेवायचे नाही.भाजी कडू होतं नाही.शेंगादाणे तीळ लाडू-भाजलेले तीळ शेंगदाणे आणि आवडीनुसार गूळ टाकत मिक्सरमधून फिरवले आणि तूप न वापरता लाडू वळून घेतले.

भ

५.दोडक्याची भिजवलेल्या मूगाच्या डाळीची(पिवळी डाळ) भाजी.भेंडी फ्राय भेंडी धूवून पुसून उभी कापली आणि परत दोन उभ्या भेंडीचे आणखीन दोन आडवे काप केले.दाण्याचा कूट तिखट,गरम मसाला,धने पावडर ,मीठ,दोन मोठे चमचे तेल टाकत चिरलेल्या भेंडी सोबत मिक्स केले.जरा जास्तीच्या तेलात भेंडी मंद आचेवर परतली.लेकीसाठी इन्स्टंट धिरडे-अर्धे तांदळाचे पीठ आणि डाळीचे पीठ,दही ,तिखट,मीठ,जिरे पाणी टाकून भिजवले.पंधरा मिनिटांनी धिरडे केले.

६.भरलेली वांग्याची भाजी,भरीत,दही(प्रोबायोटिक),किसलेल्या भोपळ्याचे मिश्र पिठाचे थालिपीठ,जवसाची चटणी

७.पोडी चटणी लावून परतलेले पनीर,पालक -बटाटा मिक्स भाजी,सेलैड

८.मऊसूत आसट मूग-तांदळाची खिचडी,दोन वाटी कोथिंबीर - ७-८ मिरची,जिरे मीठ टाकून बारीक वाटले त्यात नंतर दाण्याच्या कूट,दही साखर टाकून एकत्र करत चटणी केली.तांदूळ उडीद डाळीचा डोसा.पोडी चटणी-२ वाटी हरभरा डाळ,एक वाटी उडीद डाळ,अर्धी वाटी तीळ स्वतंत्र भाजून तेलात परतलेल्या लाल मिरची सह बारीक मिक्सरमधून फिरवली.गरज पडल्यास चाळून घ्यावी.आणि डोशावर बारीक किसलेले गाजर भूरभूरले.

९.लेकीला बटाट्याची भाजी,मेदगं-हिरवे मूग भाजून कुकरमध्ये शिजवले.कांदा , टोमॅटो, लसूण यांच्या फोडणी ती डाळ परतली आवडीनुसार पातळ केली.राजगिर्याचा लाडू.

-भक्ती

प्रतिक्रिया

सर्व ताटं आवडली.

मजा आहे .

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2023 - 7:18 pm | कर्नलतपस्वी

सुगरणीचा खोपा.सगळं कसं बैजवार.

श्वेता व्यास's picture

8 Nov 2023 - 11:32 am | श्वेता व्यास

+१ हेच म्हणते

जेपी's picture

7 Nov 2023 - 9:03 pm | जेपी

मस्त...

रीडर's picture

8 Nov 2023 - 12:49 am | रीडर

आणि वैविध्य

सरिता बांदेकर's picture

8 Nov 2023 - 9:30 am | सरिता बांदेकर

मेनू छान आहेत.बघून छान वाटलं.

स्नेहा.K.'s picture

8 Nov 2023 - 4:29 pm | स्नेहा.K.

+१

अहिरावण's picture

8 Nov 2023 - 7:06 pm | अहिरावण

तुमचे नाव बदला.

भक्ती नाही.... अन्नपूर्णा !