मस्कत, ओमान येथे नोकरी निमित्त (लॉंग टर्म) जाणे आहे

शैलेश लांजेकर's picture
शैलेश लांजेकर in काथ्याकूट
21 Jan 2023 - 10:12 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

येत्या काही दिवसात (कदाचित १५-२० दिवसात किंवा एखाद दोन महिन्यात) मस्कत, ओमान येथे नोकरी निमित्त जाणे होणार आहे. दोन-तीन महिन्यांनंतर पत्नीला तिकडे घेऊन जायचा बेत आहे. ओमान हा देश माझ्या साठी संपूर्ण पणे नवीन आहे. अक्षरशः शष्प माहिती नाहीये तिथली.. २०२२ मध्ये २ महिने दुबई मधे एक ट्रिप झाल्याने थोडासा कॉन्फिडन्स आहे. सगळ्यांकडून तिथे लॉंग टर्म (५-१० वर्षे) राहायला जाताना सर्वच बाबतीत (खर्च, कागदपत्रे, खाणे पिणे, प्रकृती) काय काळजी घ्यावी, काय तयारी करावी या बाबत सूचना आणि माहिती अपेक्षित आहे. तसेच इथे भारतात घरातले ज्येष्ठ नागरीक असणार असल्याने त्या दृष्टीने सुद्धा कोणती तयारी करावी, काय काळजी घ्यावी या बाबतीत तुम्हा सर्वांकडून माहितीची अपेक्षा आहे. कृपया सर्व मिपाकरांनी शक्य तेवढी मदत करावी (माहिती च्या स्वरूपात)

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

22 Jan 2023 - 11:40 am | शानबा५१२

मी ईथे काही वेलेपासुन मिपा सदस्य आहे. मला मध्ये ओमनला नोकरीला जाण्याची लहर आली होती. माझा उद्देश तिथे जाण्याचा उद्देश तिथे राहुन नोकरी करणे व तिथली बाजारपेठ ओळखणे, निर्यात व्यवसायासाठी, असा होता. पण एका कारणामुळे मला तिथे जाणे टाळावे लागले. मला त्या परीस्थीतीत तिथे जाणे शक्य नव्हते.
हे ईथे सांगण्याचा उद्देश आपल्या लेखाच्या उद्देशाशी सुसंगत आहे. ईथे एक सदस्य 'सरनौबत' ओमनला राहुन व काम करुन आले आहेत. मी त्यांना व्यनीतुन संपर्क केला त्यांचा प्रतिसाद एक दोन महिन्यांनी मी जेव्हा ओमनला जाणे कॅन्सल केले होते तेव्हा आला.
लांजेकर, आपण कृपया माझ्या संपर्कात रहा. मी आपल्याला माझी संपर्क माहीती व्यनि करत आहे. सम्थिंग फॉर म्युच्युअल बेनेफीट, आपल्याला नक्की फायदा होईल.
आपण तिथे कुठल्या क्षेत्रात काम करणार आहात ते सांगितलेत तर व्यनितुन संपर्कात राहुन अपल्या काही मदत करु शकेन असे वाटते. ह्या लेखाबद्दल धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

शैलेश लांजेकर's picture

23 Jan 2023 - 4:00 pm | शैलेश लांजेकर

खूप खूप धन्यवाद,

आपल्या व्यनि ला उत्तर दिले आहे तसेच "सरनौबत" यांना देखील व्यनि केला आहे. आपण संपर्कात राहूच

शानबा५१२'s picture

23 Jan 2023 - 6:04 pm | शानबा५१२

नमस्कार, आपण खाली दीलेल्या युट्युब चॅनेलवरचा प्रत्येक व्हीडीओ नक्की बघा, खासकरुन जुने व्हीडिओ. प्रत्येक व्हीडिओमध्ये ओमनबद्दल, ओममला जाणे, तिथले राहणीमान,तिथले कायदे व नियम, गाडी घेणे चालवणे, लायसन्स काढणे. तिथला खर्च, तिथले सण ईत्यादी बाबत ठासुन माहीती दीली आहे. आपल्या ९०% प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळायची शक्यता वाटते.

शानबा५१२'s picture

23 Jan 2023 - 6:05 pm | शानबा५१२
सरनौबत's picture

26 Jan 2023 - 12:22 pm | सरनौबत

मी गेली दहा वर्षे मस्कत (ओमान) येथे स्थायिक आहे. मराठी मंडळाचा सभासद आणि कमिटी सदस्य देखील आहे. येत्या २-३ दिवसांत कायप्पा वर फोन करून बोलू.

शैलेश लांजेकर's picture

30 Jan 2023 - 8:23 pm | शैलेश लांजेकर

नक्की नक्की... मला कायप्पा वर आधी एक मेसेज पाठवाल का? म्हणजे तुमच्या नंबर वरून कॉल आला कि मला कल्पना येईल . आणि खूप खूप धन्यवाद ....