दिवाळी अंक २०२२ - शहाणा शेतकरी, वेडा माणूस

स्वधर्म's picture
स्वधर्म in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 9:38 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */

.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}

.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{text-align:justify;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}

.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}

@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}

.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}

.mi-image {max-width:100%;height:auto;margin-top:16px;margin-bottom:16px;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19);}

गेली १७-१८ वर्षे सेंद्रिय शेती अभ्यासगटाला माझे जाणे होते. दोन महिन्यांतून एकदा होणार्‍या या बैठकांमध्ये अनेक मित्ररत्ने भेटली. यातला प्रत्येक सेंद्रिय शेतकरी हा जणू एक पुस्तकच आहे आणि त्यांना वाचण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. गावोगावी, छोटी-मोठी सेंद्रिय शेती करत, निसर्गाच्या सानिध्यात राहणारी ही माणसे. गटाचे मुख्य प्रवर्तक शितोळेसाहेब, हे एक अफलातून रसायन. त्यांच्याविषयीही लिहिण्यासारखे खूप आहे. त्यांनी इतकी निखळ मोलाची माणसे एकमेकांशी जोडली आहेत, की आपण त्यांचे मित्र आहोत, याचा आपला आपल्यालाच हेवा वाटावा. अशाच एका बैठकीत दोन दिवस शांतपणे प्रत्येक प्रयोग, चर्चा, मांडणी ऐकत मागच्या रांगेत बसलेल्या एका व्यक्तिमत्त्वाने लक्ष वेधून घेतले. वाढलेले करडे केस, लांब दाढी आणि पायजमा शर्ट घाललेल्या त्या माणसाने जणू घोंगडीचेच शिवले असावे असे अत्यंत भरड कापडाचे जाकीट घातले होते. काहीच बोलला नसल्याने हा माणूस कोण, कसा, याची उत्सुकता मनात दाटून आली होती. येताना गाडीत शितोळेसाहेबांनी सांगितले, की मागच्या पाचगणीच्या बैठकीहून येताना त्या माणसाने त्यांना हळूच विचारले, की मी गाडीतून पुण्याला येऊ का? तो माणूस पुण्याला आला आणि मंडईतून ७५ ताटे, वाट्या, पेल्यांचा संच घेऊन गावी गेला. एवढी ताटे-वाट्या कशासाठी? तर गावातल्या शाळेतील मुलांना जेवण्यासाठी. त्याने ही आपल्या गावच्या शाळेला भेट दिली. वर वर पाहताना फाटका वाटणारा हा उमदा माणूस म्हणजे शिरीष पवार!

पुढच्या एका बैठकीत आंम्ही शिवारफेरीचे नियोजन केले होते. त्या वेळी सगळ्यांच्या शेतावर फिरत असताना, मुक्कामाच्या ठिकाणीही शिरीषजी काही बोलले नाहीत, पण मला उत्सुकता गप्प बसू देत नव्हती. त्यांना त्यांच्याविषयी काही विचारले की तेवढ्यापुरते उत्तर देऊन स्वारी गप्प गप्पच असायची. नंतर त्यांनी हातात एक कागद ठेवला. स्वत:बद्दलची ७-८ ओळी माहिती लिहिली होती त्यात. ती वाचून उडालोच!

- १९९३पासून सेंद्रिय शेती करत आहे.
- नांगरट करत नाही.
- शेतीत बैलांचा वापर करत नाही.
- गाई-म्हशी इ. जनावरे पाळत नाही.
- गेली आठ वर्षे एकच चप्पल वापरात.
- एकच बाहेर घालण्याचा पोशाख - पायजमा शर्ट
- स्वत:चे वाहन - सायकल
- घड्याळ वापरत नाही.

असे काही मुद्दे. मग माझ्या लक्षात आले की चपलांच्या ढिगात हाताने शिवल्यासारखी दिसणारी, ट्रकच्या जुन्या टायरपासून बनवलेली जी चप्पल आहे, ती शिरीष यांचीच. विना-नांगरट शेती आत्ताही खूप कमी लोक करतात, तेव्हा तर हे दुर्मीळच. पण तण, गवत ही जमिनीची सख्खी लेकरे असून आपण लावलेले पीक हे तिच्यासाठी सावत्र, हे शिरीषजींना पक्के उमजलेले होते. त्यांची हत्या होऊ नये, म्हणून नांगरट न करताच पेरणी. मला वाटायचे बैल, गायी म्हशी हे तर शेतकर्‍याचा गोतावळा, त्यावर किती प्रेम असते शेतकर्‍याचे. पण शिरीषजींच्या मते शेतकरी श्रम काढून घेण्यासाठी, दूध, शेण यासाठीच गुरे पाळतो. दूध गाईच्या वासराचे. ते आपण चोरायचे? एवढीच दुधाची आस असेल, तर ज्याने त्याने आपआपल्या मादीचे दूध प्यावे, इतके कठोर मत. पुढे मग बहुतेक शेतकर्‍यांचा दुधाचा धंदा कसा आतबट्ट्याचा होतो आणि शेतकर्‍याने गाय पाळलीय की गाईने शेतकरी, हे समजत नाही, हे पाहिल्यावर गटातल्या अनेकांना ते वेगळ्या मार्गाने का होईना, पटत चालले आहे.

१९९०च्या सुमारास इंजीनिअरिंगचा डिप्लोमा झाल्यानंतर शिरीष यांनी महाराष्ट्र वीज मंडळात काही वर्षे नोकरी केली. नंतर वडिलांचे निधन झाले व घरच्या काही अडचणींमुळे ते कराडजवळच्या त्यांच्या गावी परतले आणि शेती करू लागले. त्यांच्याशी बोलताना जाणवले की त्यांना चांगली इंजीनिअरची निमसरकारी नोकरी सोडून शेतीत पडल्याची खंत अजिबात नाही. नाहीतर आजकालचे छोटे शेतकरी म्हणजे इतर काही जमले नाही, म्हणून बहुतेक नाइलाजाने शेती करणारेच फार. शेतकर्‍यांच्या मुलांनाही नोकरीचीच आस, भले त्यासाठी बापाचा एखादा जमिनीचा तुकडा विकावा लागला तरी चालेल.

दरम्यान आमच्या दोन महिन्यांतून एकदा होणाऱ्या सेंद्रिय शेती अभ्यासगटाच्या बैठका सुरूच होत्या. शिरीषजी प्रत्येक बैठकीला येत असत, पण बोलणे अत्यंत कमी. एकदा असेच कधी पोहोचलाय म्हणून विचारले, तर म्हणाले परवाच आलो. झाले असे की कराडहून सासवडला सायकलीवरून यायला दोन दिवस लागतील, मध्ये एक मुक्काम होईल असे अशा बेताने त्यांनी प्रवास सुरू केला, पण ते त्याच दिवशी संध्याकाळी बैठकीच्या जागी पोहोचले. मध्यम उंची, ६० किलोच्या आतच वजन, ५०च्या आसपास वय असलेल्या या माणसाचा फिटनेस बघून मी चाटच पडलो. नाहीतर २१ गिअर्सची सायकल पाचपन्नास किलोमीटर चालवून सोशल मीडियावर धबाधबा फोटो टाकणारे भरपूर मित्र आहेतच. जेवढे या माणसाविषयी समजेल, तेवढी उत्सुकताच वाढत चालली. पण असा माणूस समजून घ्यायचा, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातच. म्हणून त्यांच्या शेतावर एक दिवस न सांगताच हजर झालो. न सांगताच, कारण त्यांच्याकडे अजूनही मोबाइल सोडाच, लॅंडलाइनही फोन नाही. शोधत शोधत जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा शांतपणे लुंगी आणि बनियन घालून शांतपणे एक मराठी पुस्तक वाचत बसलेल्या शिरीष पवारांचे दर्शन झाले. जरी माझ्याजवळ डबा होता, तरी आग्रहाने त्यांनी भात भाजी खाऊन घातली. घरालगतची त्यांची छोटीशी शेती पाहिली. आंब्याची शंभर दीडशे झाडे चांगली लगडली होती. शेत रस्त्यालगतच होते. फळशेती म्हटले की राखण आलीच. पण यांच्या शेतीतली रस्त्याकडेची झाडे फारशी अपेक्षा न ठेवता, राखण, कुंपण न घालता त्यांनी सोडून दिली आहेत. राहतील ते आंबे आपले, असा खाक्या. काही झाडे लिंबाची. यातही सेंद्रिय शेती जगण्याचा अट्टाहास असा की फळे तोडायची नाहीत. लिंबाच्या झाडाखालून फक्त काठीने पडलेले लिंबू काढून घ्यायचे आणि कराडजवळ कडेपूरच्या स्थानिक बाजारात विकायचे. असे का? विचारले, तर म्हणाले, "फळ पिकलं की नाही, ते केव्हा तोडायचं, हे शेतकऱ्यापेक्षा झाडाला अधिक कळतं. आपलं काम फक्त फळं गोळा करणं! मी हिशोब, भाव वगैरे काही पहात नाही. ते सर्व बायकोच बघते" असे म्हणून ते पुढच्या मुद्द्याकडे वळले. आजकाल शेतीमालाचे बाजारभाव, हमीभाव, दलाल, जास्तीत जास्त माल बाहेर पाठवणे इ. कोलाहलात बाजाराकडे संपूर्णपणे पाठ फिरवून आपल्याच मस्तीत शेती करणारा माणूस लख्खपणे दिसला.

मग आम्ही जवळच्याच त्यांच्या दुसऱ्या जमिनीच्या तुकड्यांचे निघालो. तेव्हा शिरीषजींची ती प्रसिद्ध चप्पल ते आता घालतील असे वाटत होते. पण ते अनवाणीच चालू लागले. म्हणाले की "मधल्या काळात ती चप्पल फाटल्याने काही दिवस अनवाणीच चाललो आणि नंतर चपलांची गरजच वाटेनाशी झाली. आता सगळीकडे अनवाणीच हिंडत असतो." पाय पोळणार, शेतात खडे, काटे बोचणार, हे असे कसे? विचारताच एक स्मितहास्य करून ते पुढे आणि आम्ही मागे चालू लागलो. तेच कपड्यांच्या एकुलत्या एका जोडाबाबत. शेतात तर पूर्ण कपडे लागतच नाहीत, त्यामुळे एकच बाहेर घालायचा जोड पुरतो, असे म्हणणे.

त्यांच्या दिनक्रमाविषयीही जाणून घ्यायचे होते. ते सकाळी आठ साडेआठला काम सुरू करतात आणि जसे शेतात काम असेल तसे दिवसभर काम सुरू असते. मध्ये जेवायची सुट्टी. त्या वेळी आठवले की शिरीषजी घड्याळ वापरत नाहीत. त्यांनी सांगितले की पूर्वी साडेबारा-एकच्या सुमारास मी घड्याळ पाहून जेवायला सुट्टी करायचो. पण नंतर लक्षात आले, की भूक लागल्यावर जेवण्याच्या ऐवजी किती वाजले, त्यानुसार जेवायला बसू लागलो आहे. त्यामुळे जेवणे, झोपणे, उठणे यासाठी घड्याळात बघायचे सोडून दिले अन् घड्याळाची गरजच संपली. शेतकर्‍याचा दिवस म्हणजे काबाडकष्ट. त्यातून शिरीषजींसारखा माणूस असेल, जो कोणत्याही यंत्राची मदत शक्यतो न घेता काम करणार, तर खूपच कष्ट असले पाहिजेत. यावर त्यांचे म्हणणे मजेदार होते. सगळे शेतकरी रोज आपल्या शेताकडे बघतात आणि मनाशी विचार करतात, आज मला काय काम केले पाहिजे? मी शेताकडे बघतो आणि विचार करतो, आज मी काय नाही केले तर चालेल? काडातून क्रांती (One Straw Revolution) या पुस्तकात फुकिओका हेच तर सांगतात. वाटले, आम्ही महाराष्ट्राच्या फुकिओकांसमोरच उभे आहोत.

शिरीषजी नियमित अभ्यासगटाच्या बैठकांना येतात, तेव्हा भेटी होतात. दिवसभराच्या काटेकोरपणे नियोजित सत्रांनंतर रात्री आमच्या मोकऴ्याढाकऴ्या गप्पांना रंग भरतो. असेच एकदा त्यांना विचारले की "तुम्ही आस्तिक की नास्तिक?" सेंद्रिय शेतीची आराधना मोठ्या निष्ठेने करत व्रतस्थ जीवन जगणार्‍या शिरीषजींनी उत्तर दिले, "नास्तिक!" मला नेहमीच वाटायचे की आस्तिक माणसाला काही पाप घडले, तर देवाला शरण जाऊन आपली चूक देवासमोर कबूल करून अपराधभावाचे ओझे डोक्यावरून उतरवण्याची सोय असते, पण नास्तिकाचे तसे नाही. त्याची काही चूक घडली, तर जबाबदारी त्याचीच. त्यामुळे नास्तिक माणूस अधिक नैतिक असण्याची शक्यता असते. त्यामुळे शिरीषजींच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले नाही. शिरीषजींचे सगळेच विचार बर्‍याच जणांना पटणार नाहीत, ते पटले, तरी एवढी आचरणक्षमता असणारा माणूस दुर्मिळात दुर्मीळ. म्हणून मातीत राहून फायद्यातोट्याचा फार विचार न करता अतिशय नैतिक आचरण करणारा, स्वत:विषयी अजिबात न बोलणारा आणि आजूबाजूच्या माणसांचे, प्राण्यांचे, निसर्गाचे कमीत कमी शोषण करून आपले साधे जीवन अगदी ताणरहित आनंदाने जगणारा हा शहाणा शेतकरी, पण वेडा माणूस माझा मित्र आहे. केवढे भाग्य!

प्रतिक्रिया

वाह! असामान्य कर्तृत्व_/\_

स्वधर्म's picture

6 Nov 2022 - 7:49 pm | स्वधर्म

मनापासून

कुमार१'s picture

6 Nov 2022 - 8:06 pm | कुमार१

शिरीष यांचे कौतुक !
प्रेरणादायी.

चांदणे संदीप's picture

7 Nov 2022 - 8:45 am | चांदणे संदीप

लेख आवडला. शिरीष पवार यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी. खूपच भावले.

सं - दी - प

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व... छान ओळख करून दिलीत याबद्दल धन्यवाद

श्वेता२४'s picture

9 Nov 2022 - 2:13 pm | श्वेता२४

अशी माणसे व त्यांचा सहवास मिळणे भाग्याची गोष्ट. लेखाद्वारे छान ओळख करुन दिलीत.

पॉइंट ब्लँक's picture

11 Nov 2022 - 8:17 pm | पॉइंट ब्लँक

अत्यंत विलक्षण व्यक्तीम्त्वाची ओळख करून दिल्याबद्दल आभार

स्वधर्म's picture

14 Nov 2022 - 1:25 pm | स्वधर्म

कुमार, संदीप, श्वेता, पॉईंट ब्लॅंक, सुखी.

श्वेता व्यास's picture

14 Nov 2022 - 3:26 pm | श्वेता व्यास

शिरीष पवार यांचे कौतुक वाटते. त्यांना पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा.

लेखाचे शीर्षक सार्थ ठरवणारे 'शहाणा शेतकरी' असलेल्या ह्या 'वेड्या माणसाचे' व्यक्तिचित्रण खूप आवडले 👍

मुक्त विहारि's picture

14 Nov 2022 - 6:16 pm | मुक्त विहारि

बदलापूरला, बेंडशीळ, नावाच्या गावांत, राजू भट, नावाचे असेच शेतकरी आहेत...

ते पण 100% सेंद्रीय शेती करतात ...

सरिता बांदेकर's picture

14 Nov 2022 - 6:38 pm | सरिता बांदेकर

तुमचे आभार अशासाठी,
तुम्ही एका अवलियाची माहिती दिलीत.
छान लिहीलं आहे.

स्मिताके's picture

14 Nov 2022 - 10:40 pm | स्मिताके

एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा उत्तम परिचय करून दिलात. शिरीष पवार यांच्या कार्यास शुभेच्छा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Nov 2022 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार

शोधताना शिरीष पवार यांचा एक व्हिडिओ सापडला,

https://youtu.be/otiAR8dyUyY

पैजारबुवा,

Bhakti's picture

26 Nov 2022 - 8:57 pm | Bhakti

+१
अशा ऋषितुल्य व्यक्तींचे कार्य योग्य संकलित व्हायलाच पाहिजे.

स्वधर्म's picture

28 Nov 2022 - 7:31 pm | स्वधर्म

पैजारबुवा, या व्हिडिओबद्दल खूप धन्यवाद. शुभदा पांढरे/ पाटील यांचा परिचय आहें. त्यांनी चांगले दस्तऐवजीकरण केले आहे. माझ्या भेटीदरम्यान मी पण काही व्हिडिओज केले होते, पण ती हार्ड डिस्क आता चालत नसल्याने मी ते यूट्यूबवर टाकू शकलो नव्हतो.
नुकताच या शनिवार रविवारी अभ्यास गटाच्या बैठकीस गेलो होतों. तिथे शिरीष पवार भेटले. त्यांनाही लेख आवडला आहे.

तुषार काळभोर's picture

26 Nov 2022 - 2:29 pm | तुषार काळभोर

आजच्या जगात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल, याच्या स्पर्धेत शेतकरी असताना जमीन नैसर्गिक पद्धतीने देईल, तेव्हढंच घेणारा हा माणूस वेडाच म्हणायला हवा!
आणि किती साधी राहणी!
असं राहण्याचा आणि जगण्याचा विचारही करणे अवघड आहे!

शेर भाई's picture

26 Nov 2022 - 7:54 pm | शेर भाई

आज काल आधी केले मग सांगितले प्रकारातील माणसे हा फार दुर्मिळ प्रकार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे शिरीष यांच्या पत्नी (@ मित्रहो यांची बायको) त्यांचे अर्थशास्त्र सांभाळतात, ते करताना त्यांची ओढताण होते का ??

सौन्दर्य's picture

29 Nov 2022 - 11:58 pm | सौन्दर्य

अतिशय साधी राहणी, निसर्गात कोठेही ढवळाढवळ न करता शेती करणे ही काही सामान्य गोष्ट नाही, त्यासाठी ऋषितुल्य दृष्टिकोन असावा लागतो. त्यांच्या ह्या अत्यंत साध्या राहणीमुळे छोट्या-छोट्या कामांसाठी बराच वेळ व श्रम खर्च होत असणार. हीच कामे त्यांनी प्रगत तंत्रज्ञान वापरून केली तर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवांचा फायदा इतर शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला होऊ शकतो असे मला वाटते. दोन दिवस सायकल चालवून मुक्कामाला पोहोचण्यापेक्षा बसचा वगैरे उपयोग करून इच्छित स्थळाला पोहोचल्यावर हाताशी असलेला वेळ ज्ञानवृद्धीसाठी केला तर ते जास्त उपयोगी ठरेल. "ज्योत से ज्योत जलातें चलो" एक दिन पुरे दुनियामे उजाला फैल जायेगा.

ह्या असामान्य व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा.