दिवाळी अंक २०२२ - स्वातंत्र्य

योगेश's picture
योगेश in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 10:11 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)

मला जेव्हा जाग आली, तेव्हा मी शासकीय रुग्णालयाच्या एका खाटेवर होतो. माझ्या अंगात रुग्णांचा गणवेश होता. हाताला प्लॅस्टर होतं. अंगावर पुष्कळ ठिकाणी छोट्या छोट्या जखमा होत्या.
बाजूच्या खाटेवर धोंड्या अजूनही बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला जास्त मार लागला होता. तिथे टाकेही पडले होते. त्याच्याही अंगावर ठिकठिकाणी जखम झाल्या होत्या. आमच्या रूमबाहेर दोन पोलीस पहारा देत उभे होते.
गेलं वर्षं माझ्यासाठी खूपच चांगलं गेलं होतं. मी जेलमध्ये मस्त मजेत राहत होतो. रोज सकाळी उठायचं.. मस्त गार पाण्याने सार्वजनिक अंघोळीची मजा घ्यायची. चहा म्हणून आनंदाने गढूळ पाणी प्यायचं. जोरजोरात रोजची ठरलेली प्रार्थना म्हणायची. मग थोडा वेळ कवायत करून व्हॉलीबॉल खेळायचं.
जेलमध्ये खाण्याचे वांदे होते, पण माझी अन्नावरची वासना उडाल्यापासून मला काही फरक पडत नव्हता. माझी पोटाची ढेरी नाहीशी होऊन माझं पोट सपाट झालं होतं.
तुरुंगातील मित्रमंडळीही एकसेएक होती.
संज्या कविता करायचा. त्याच एक पुस्तकही प्रकाशित झालं होतं. कविता लिहिली रे लिहिली की पहिले तो आम्हाला वाचून दाखवायचा.
पक्या चित्रं काढायचा. त्यांचं प्रदर्शनही लागायचं.
बारक्याला इतिहासाची आवड होती. तो इतिहासातील गोष्टी रंगवून सांगून आमचं मनोरंजन करायचा. त्याने एक ऐतिहासिक कादंबरी लिहायला घेतली होती.
लाल्या फक्त एकोणीस वर्षाचा होता. त्याला मी त्याचं शिक्षण पूर्ण करायला राजी केलं. तो अभ्यास करण्यात आपला वेळ घालवत होता. एकुणातच एवढ्या प्रतिकूल परिस्थितीही आम्ही बहुतेक जण थोडंफार आनंदात जगायला शिकत होतो. सगळी कटुता मागे सारून या नव्या विश्वात रमत होतो. जेलमध्ये वेळ जात नाही, तुम्हाला त्याला अक्षरशः घालवावा लागतो. क्षण क्षण मोजत बसावा लागतो. तिथलं वातावरण नकारात्मक गोष्टीनी भरलेलं असतं. अशा वेळी तुमचं मन कोणत्या तरी गोष्टीत रमवावं लागत. नाहीतरी भयाण एकट्या रात्रीचा लख्ख प्रकाश तुम्हाला आंधळं करून टाकतो. भिंती अंगावर येतात. तुम्ही दिवसागणिक खूप खोल खोल जात तेथेच गाडले जाता. त्यामुळे सतत चांगल्या गोष्टीचा शोध घेत राहावं लागतं. रोज रोज स्वतःला सांगावं लागतं - अजूनही आपण माणूसच आहोत. या चार भिंतीतही श्वास घेता येतो. गज सहज जगता येतं.
मी मात्र तसा कुठलाही छंद जोपासला नाही. सुरुवातीला कित्येक रात्री मी असाच बसून राहायचो. मी लवकरच आत्महत्या करणार असं पोलिसांना वाटायला लागलं. महाजनसाहेबांनी तर माझ्यासाठी समुपदेशक बोलवायची तयारीही केली होती. मी मात्र त्यांना निक्षून सांगितलं की माझा असा कोणताही विचार नाहीये. वाटल्यास माझ्या मित्रांना विचारा. जेलमधील जीवन कसं सुंदर आहे, हेच मी त्या सर्वांना सांगत होतो. सुरुवातीपासूनच मी सर्व कैद्यांत व्यवस्थित मिसळत होतो. आनंदाने गप्पा मारत होतो. फक्त मी एका स्थित्यंतरातून जात होतो. त्यामुळे सुरुवातीला मला रात्री झोप येत नव्हती. आता मात्र मी सुखाने झोपत होतो.

माझ्या जेलच्या बाहेरील जीवन मात्र नरक होत. जन्मतः बापाचा पत्ता नव्हता. आई फक्त नावाला होती. शिक्षणात मन रमलं नाही. लहानपणापासून नाना धंदे करून पैसे मिळवले. त्याच्यापेक्षा जास्त पटीने उधळले. अनेक कंपन्यांत हेल्पर म्हणून मर मर मेलो. शेवटी रिकामाच राहिलो. कधी कधी तर फक्त जीव जात नाही म्हणून जगत होतो.
चाळीत रोज काही न काही राडा होतच असतो. तस मी कोणाच्या मदतीला सहसा जात नाही. पण त्या दिवशी बाजूचा दुरक्या दारू पिऊन आपल्या बायकोला मारत होता. मारत कसला.. धू धू धूत होता. सर्व जण मस्त तमाशा बघत होते. माझ्या डोक्यात सणक गेली. तसाच तणतणत गेलो आणि दुरक्याला एक सणसणीत चपराक लगावली. गडी धडपडत मागे पडला. पुन्हा उठला. माझ्यावर धावून आला. माझे हात-पाय शिवशिवत होते. एक जोरदार लाथ त्याच्या छाताडावर घातली. तो जोराने मागे उडाला. त्याचं कपाळ थेट जाऊन दगडावर दणकून आपटलं. तो पुन्हा काही उठलाच नाही. सरळ मनुष्यवधाचा गुन्हा माझ्यावर लावण्यात आला. ती पतिव्रता बाईही माझ्या विरोधात
गेली. सरकारी वकील तरी जास्तीचे कशाला कष्ट घेईल! तीन वर्षांची शिक्षा झाली आणि माझं जीवनच पालटलं.

जीवनातली सगळी धावपळ नाहीशी झाली. शांत आणि संथ जीवन माझ्या वाट्याला आलं. मलाही ते आवडायला लागलं. कामाचा त्रास नाही, खाण्याचे वांदे नाहीत आणि उद्याची काळजी नाही. सुख-दुःख, जीवन-मरण असल्या कायम तुच्छ वाटणाऱ्या गोष्टींवर विचार करायला भलताच वेळ मिळायला लागला. मी अध्यात्माकडे झुकलो. अनेक आध्यात्मिक पुस्तकं वाचली. राग-लोभ-ईर्ष्या-वासना यांच्या पलीकडल्या शाश्वत समाधान देणाऱ्या विश्वात मी जगत होतो. इथल्या भौतिक कष्टापासून मी दूर दूर जात राहिलो. माझं विश्व अचानक समाधानाने भरून गेलं.

जेलमध्ये आता उलट कोणी नवीन कैदी आला की त्याला प्रवचनासाठी साहेब थेट माझ्याकडेच पाठवतात. तुरुंग हा आयुष्याचा शेवट नसून इथे एक नवीन आयुष्य उभारता येतं, हे मी त्यांना सांगतो. बाहेरच्या धकाधकीच्या जीवनातून उसंत मिळून आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन जेलमध्ये आल्यावर मिळतो. अर्थात तुम्ही तसा विचार करायला हवा.
महाजन सर वॉर्डन म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत. कैद्यांना शारीरिक आणि मानसिक सुव्यवस्थेत ठेवण्यासाठी झटत. बेरकी आणि लबाड जेलर सरवटेच्या हाताखाली काम करणं जिकरीचं होतं. तो जेलमध्ये औषधासाठी येणाऱ्या अर्ध्या पैशावर डल्ला मारत असे. उरलेल्या अर्ध्या पैशातही महाजनसाहेब सर्व कैद्यांची व्यवस्थित काळजी घेत असत. मी जेलमध्ये आल्यावर त्यांनी माझीही आस्थेने विचारपूस केली होती. माझ्या शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली होती. मी मात्र त्या फंदात पडलो नाही. पहिल्या
दिवसापासूनच मला जेलचं जीवन आवडू लागलं होतं.

“डोळे मिटून शांत पडून रहा.” धोंड्याच्या आवाजाने माझी विचारशृंखला तुटली. “आपण शुद्धीवर आलोत याचा त्यांना पत्ता लागता कामा नये.” धोंड्या हळू आवाजात कुजबुजत होता. त्याने ऑर्डर दिली की आम्हाला पाळावीच लागते. धोंड्या हा जेलमधील जहाल गटाचा मेन मेंबर होता, त्यामुळे त्याचं म्हणणं कोणीही टाळत नसे. नाहीतर जेलमध्ये मुडदा पाडायलाही तो गट मागेपुढे बघत नाही.
“आपण त्यांना जास्त वेळ फसवू शकत नाही.” धोंड्याचा नक्की काय विचार होता, मला समजत नव्हतं.
“फक्त थोडा वेळ चुपचाप पडून राहा,”
मी डोळे मिटून पडून राहिलो. मग मला झोप लागली.
मध्यरात्री कसल्यातरी चुळबुळीने मला जाग आली. धोंड्या उठून कोणाबरोबर तरी दबक्या आवाजात बोलत होता. त्या अनोळखी माणसाने हॉस्पिटलचेच कपडे घातले होते, म्हणजे तो हॉस्पिटलचाच कर्मचारी होता. मी उठून बसलो. काही बोलणार, एवढ्यात धोंड्याने माझ्या मानेवर एक धारदार सुरा ठेवला. त्याने गप्प राहून त्याच्या मागोमाग यायला सांगितलं. तो अनोळखी इसम, धोंड्या आणि मी खोलीबाहेर आलो. पहाऱ्यावरचे दोन हवालदार मस्तपैकी घोरत होते. रात्री बारानंतर हॉस्पिटलचा मेन दरवाजा कुलूप लावून बंद केला जातो, त्यामुळेच हे हवालदार निर्धास्तपणे झोपले होते. मला कसलातरी आवाज करून त्यांची झोपमोड करायची होती. मात्र धोंड्या चलाख होता. त्याने माझ्यावर करडी नजर ठेवली होती. तो पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र मला हे जेलचं सुखी जीवन सोडायचं नव्हतं.
आम्ही मोकळ्या पॅसेजमध्ये आलो. सगळीकडे सामसूम होतं. आम्ही बाथरूममध्ये शिरलो. त्या अनोळखी माणसाने एका खिडकीचे अगोदरच सैल केलेलं गज हळूच काढून टाकले आणि तिथून रस्सी खाली फेकली. आता मला त्यांचा प्लॅन हळूहळू उलगडायला लागला. मी त्या खिडकीतून डोकावून बघितलं. तिसऱ्या मजल्यावरून खाली जमीन खूप खोल वाटत होती.
“मला इथून उतरायला जमणार नाही.” मी प्लॅस्टर केलेल्या माझ्या हाताकडे त्या दोघांचं लक्ष वेधत म्हणालो.
“तुला इथून खाली फेकून देणार आहे मी.” धोंड्या माझ्यासमोर चाकू नाचवत म्हणाला.
“ए धोंड्या, गप् की लेका आणि तो सुरा आत ठेव आदी, तुझा भरवसा नाय बाबा” तो माणूस धोंड्याला म्हणाला. नंतर त्याने मोर्चा माझ्याकडे वळवला.
“मी जिथे सांगीन तिथे निवांत पडून राहायचं. नायतर हा उलट्या डोक्याचा माणूस आहे. तुझा पण मुडदा पाडायला मागे-पुढे बघणार नाही तो.” खरंच धोंड्या उलट्या डोसक्याचा होता. दोन खुनांच्या आरोपाखाली त्याला जन्मठेप झाली होती. नंतर त्याने खासगीत आम्हाला सात खून केल्याचं कबूल केलं होतं. तुरुंगातही त्याचा भलताच दरारा होता. त्याच्या वाट्याला कोणी जात नसे. आम्हीही त्याच्यापासून कायम टरकून असायचो.
नंतर त्या माणसाने आम्हाला परत मोकळ्या पॅसेजमध्ये आणलं. दबक्या पावलांनी जिने उतरून आम्ही खालच्या मजल्यावर आलो. तो पुढे जाऊन कोणी जागा तर नाही ना याची खातरी करून घेत असे. त्याच्या इशाऱ्यावर मग धोंड्या आणि मी हळूहळू खाली उतरत होतो. मी त्यांच्या प्लॅनमध्ये खोडा घालीन असं धोंड्याला वाटत असल्यामुळे माझ्यावर त्याची करडी नजर होती. असं करत करत आम्ही तळमजल्यावर आलो. तिथे हॉस्पिटलचं भांडार होतं.
त्या माणसाने चावीने कुलूप उघडून हळूच भांडाराचा दरवाजा उघडला. आतमध्ये पूर्ण काळोख होता. त्याने बॅटरी पेटवली. तो आत गेला. आम्हीही त्याच्या मागोमाग आत शिरलो. भांडाराचा हॉल फार मोठा होता. तिथे शेवटच्या कोपऱ्यातील एका जुन्या कपाटात त्याने आम्हाला लपायला सांगितलं.

“सगळे समजतील, तुम्ही दोघे बाथरूममधून उतरून पळून गेलात. कैदी हॉस्पिटलमध्येच लपून राहतील असं स्वप्नातही कोणाला वाटणार नाही. उद्या ते पाठीमागचं अख्खं जंगल शोधून काढतील. त्यांचा जंगलतपास पूर्ण झाला की मग परवा तुम्ही सहज जंगलातून पसार होऊ शकता. फक्त दिवसभर तुम्ही शांतपणे इथं पडून राहायचं. दिवसभर मी असेनच इथे, त्यामुळे घाबरायची गरज नाही.”
“वा रे चित्र्या, भारी प्लॅनिंग केलंस. ते झाडावरून पडायचा प्लॅन पण मस्त होता. मी एकटा पडलो असतो, तर सगळ्यांना वाटलं असतं मी मुद्दाम पडलो. मग हॉस्पिटलमध्येही माझ्यावर मोठा पहारा बसवला असता. म्हणूंन मग ह्यालाही पाडावं लागलं.” धोंड्या हसत म्हणाला.

बापरे! म्हणजे ह्याचं प्लॅनिंग तुरुंगापासून सुरू झालं होतं तर. आम्ही तुरुंगशेती करायला जातो, तिकडे आंब्याचं एक झाड आहे. त्याच्या कैऱ्या जेवणाबरोबर खाताना जेवण सुसह्य व्हायचं. संज्या नुकताच तापातून उठला होता. त्याच्या तोंडाला चव नव्हती. त्याच्यासाठी मला कैऱ्या तोडायच्या होत्या. त्या दिवशी गार्डच्या नकळत मी त्या झाडावर कैऱ्या काढायला चढलो, तर अचानक धोंड्याही वर आला होता. मी ज्या फांदीवर होतो, त्या फांदीवर शंभर किलोच्या धोंड्याने जोरात उडी मारली. त्याच्या वजनाने फांदीने जीव सोडला आणि आम्ही थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. म्हणजे धोंड्याने हे सगळं मुद्दाम केलं होतं तर..

तो माणूस आम्हाला भांडारात कुलूपबंद करून निघून गेला. मी जमिनीवर बसलो. धोंड्या माझ्यावर लक्ष ठेवून होता. मी काहीतरी घोळ घालीन याची त्याला भीती वाटत होती. बसून बसून मी कंटाळलो तासाभराने मला झोप लागली.
कसल्याशा आवाजाने मला जाग आली. धोंड्या घाबरून कपाटाकडे पळायला लागला. एवढ्यात ते बंद दार उघडून महाजनसाहेब दोन हवालदारांना घेऊन आत आले.
“हलू नकोस, नाहीतरी इथेच एन्काउंटर करेन.” ते धोंड्यावर बंदूक रोखत म्हणाले. हवालदारांनी येऊन त्याला बेड्या घातल्या.
“चित्र्याने भारी गेम केला.” धोंड्या छाती बडवत म्हणाला. जाता जाता त्याने चित्र्याचं नावही पोलिसांसमोर उघड केलं.
हवालदार धोंड्याला घेऊन निघून गेले.
मी भांडारातल्या घड्याळात पाहिलं. सकाळचे चार वाजले होते. माझ्यासमोर महाजनसाहेब बसले होते.
“तू पेरलेले पुरावे मिळाले, त्यामुळेच मी लगेच इथपर्यंत पोहोचलो. धोंड्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता, म्हणून मी मुद्दाम खातरी करायला रात्री हॉस्पिटलमध्ये आलो, तर तुम्ही दोघेही गायब.. तू पळून जाणार नाहीस याची खातरी होती. धोंड्याने तुला जबरदस्तीने आपल्यासोबत यायला भाग पाडलं असणार, याची कल्पना मला आली. त्यामुळे मग तू काही पुरावे मागे सोडलेच असतील, ते मी शोधले.” मी माझ्या हातावरच्या जखमेची पट्टी काढली होती आणि संपूर्ण मार्गावर दोघांच्या नकळत रक्ताचे छोटे छोटे डाग उमटवले होते. महाजन साहेब ते नक्कीच शोधून काढतील, याची मला खातरी होती.

“काहीही झालं, तरी धोंड्या सुटता कामा नये होता. माणूस नाही, सैतान आहे तो. त्यामुळे मी त्याला सहजासहजी मुक्त होऊ दिलंच नसतं.” मी म्हणालो.
“तुला आठवतंय का.. मी एकदा सर्वाना विचारलं होतं की इथून बाहेर तुम्ही पडल्यावर काय करणार? आणि तेव्हा तू म्हणाला होतास हिमालयात जाऊन शांतपाने जीवन व्यतीत करणार.” महाजन साहेब थोडं थांबून म्हणाले.
“होय सर.”
“आता हिमालयात जायची वेळ जवळ आलीय.”
“मी समजलो नाही सर” मी गोंधळून विचारलं.
“मी तुला सोडतो. तू इथून दूर हिमालयात निघून जा. त्याची सगळी व्यवस्था मी करतो.”
“कशाला तुम्ही स्वतःहोऊन आगीत उडी घेता! ते जेलरसाहेब तुम्हाला सोडणार नाहीत. तसंही मला इथलं जीवन आवडतं. मला बाहेर नाही जायचंय.”
“त्या जेलरचा विषय सोड, त्याच्याशी सौदा करायला माझ्याकडेही पुरेसा माल आहे.”
“पण माझ्यासाठी कशाला वापरता? तुम्हाला पुढे कधीतरी त्याचा वापर करता येईल.”
“तो तुझा हक्क आहे.”
“मला माहीत नाही मला बाहेर नीट जगता येईल की नाही.”
“कधीतरी बाहेर पडावंच लागणार. किती दिवस तुरुंगात राहणार! आता तुला जीवन जगण्याची नवी दृष्टी मिळालीय. तिचा वापर करून नवनवीन अनुभव घे. तुझं विश्व अधिक समृद्ध कर. ह्या जेलपुरतं स्वतःला मर्यादित करू नको. मला माहितीये, हे तू नक्कीच करशील, म्हणून मी जोखीम घेतोय.”
“मला जमलंच नाही, तर? आयुष्यातला हा मोठा बदल मला मानवला नाही, तर?”
“बदल हा आयुष्याचा नियम आहे. तो टाळता येत नाही. काही घडलं तर मी आहेच. मी तुला पुन्हा तुरुंगात डांबेन, पण अगोदरच स्वतःला मर्यादित करू नकोस. जेल तुझं घर नाहीये, हे विश्व तुझं घर आहे. तुझं घर तुला साद घालतंय. तुझं स्वातंत्र्य तुला बोलावतंय. जेलमध्ये येणं ही एक संधी होती, तिचा तू पुरेपूर वापर केला. तशीच इथून बाहेर पडणंही एक संधी आहे. हिमालयात जातो असं तू उगाचच बोलला नसशील. तशी स्वप्नही तू पहिलीच असशील.” महाजन साहेब बोलत होते ते खरंच होतं. मला हिमालयाची स्वप्नं पडत होती. तिकडे जाऊन एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली पुढचं जीवन व्यतीत करायचे विचार माझ्या मनात घोळतच होते.
आता थोड्याच वेळात नव्या दिवसाची नवी पहाट उगवणार होती आणि माझ्याही आयुष्यात एका नव्या पहाटेचं आगमन होणार होतं. येणाऱ्या नव्या दिवसाला भरभरून जगायला मी सज्ज होत होतो.

प्रतिक्रिया

सुखी's picture

10 Nov 2022 - 11:30 am | सुखी

सकारात्मक गोष्ट

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 7:59 pm | कर्नलतपस्वी

छान खुलवलीयं. चांगल्या वर्तनामुळे शिक्षा कमी करण्याचे कायद्या मधे प्रावधान आहे.
मस्तच. आवडली.

श्वेता व्यास's picture

17 Nov 2022 - 10:37 am | श्वेता व्यास

कथा आवडली.
चुकून कैदी झालेल्या पण तेच आयुष्य आवडणाऱ्या माणसाचा प्रवास छान उभा केला आहे.

आलो आलो's picture

17 Nov 2022 - 1:46 pm | आलो आलो

आता पुढील भाग हिमालयातून सुरु करता येईल त्यासाठी शुभेच्छा
कथा आवडली हेवेसांनलगे.

श्वेता२४'s picture

21 Nov 2022 - 11:11 am | श्वेता२४

ट्वीस्ट आवडला.

सौंदाळा's picture

21 Nov 2022 - 3:42 pm | सौंदाळा

खूप सुंदर कथा. वातावरणनिर्मिती भारीच.
वर म्हटल्याप्रमाणे पुढचा भागसुद्धा नक्की लिहा.

आवडली. मस्त! सकारात्मक .पुढे काय झाले .कथानायक चांगले आयुष्य जगतोय का? ऊत्सुकता वाढविणारी. पुढील भाग नक्की लिहा व हा आधीचा भागही थोडक्यात लिहिल्यास आम्हा वाचकांना खूप दिवसाचे जुने असले तरी संदर्भ लगेच लक्षात येईल.

आवडली. मस्त! सकारात्मक .पुढे काय झाले .कथानायक चांगले आयुष्य जगतोय का? ऊत्सुकता वाढविणारी. पुढील भाग नक्की लिहा व हा आधीचा भागही थोडक्यात लिहिल्यास आम्हा वाचकांना खूप दिवसाचे जुने असले तरी संदर्भ लगेच लक्षात येईल.

आवडली. मस्त! सकारात्मक .पुढे काय झाले .कथानायक चांगले आयुष्य जगतोय का? ऊत्सुकता वाढविणारी. पुढील भाग नक्की लिहा व हा आधीचा भागही थोडक्यात लिहिल्यास आम्हा वाचकांना खूप दिवसाचे जुने असले तरी संदर्भ लगेच लक्षात येईल.

चुकून तिनदा प्रकाशित झाली ते, संपादक दोन अभिप्राय क्रूपया गाळतील का?

स्वधर्म's picture

24 Nov 2022 - 2:52 pm | स्वधर्म

कथा वाचायला सुरूवात केली, अन् वाचतच गेलो. आणखी लिहाच.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2022 - 4:36 pm | मुक्त विहारि

आवडली

तुषार काळभोर's picture

27 Nov 2022 - 9:46 pm | तुषार काळभोर

एखाद्या खऱ्या कैद्याने स्वतःचे अनुभव प्रकट केल्यासारखं वाटलं. शेवटी मस्त.
या कथेचा स्पिनऑफ नक्कीच उत्कंठावर्धक होईल!

चौथा कोनाडा's picture

2 Dec 2022 - 5:55 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुपच मस्त ! छान पद्धतीने खुलवत नेलीय.
ओघवते लेखन असल्यामुळे सुरुवात केली ते शेवटालाच थांबलो !
चांगल्या वर्तन हे नेहमी कही ना काही पारितोषिक देतेच !

लगे रहो योगेश भाई +१
आणखी कथा वाचायला आवडतील !

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Dec 2022 - 8:53 am | ज्ञानोबाचे पैजार

ओघवती लेखन शैली आणि चपखल वातावरण निर्मिती यामुळे कथा आवडली
सकारात्मक असल्याने जास्तच भावली
लिहीत रहा
पैजारबुवा,