आवाहन: मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती?

amit_m's picture
amit_m in काथ्याकूट
30 Nov 2011 - 2:46 pm
गाभा: 

मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती? पुस्तकांबद्दल योग्य माहिती नसल्याने महाजालावर पुस्तके खरेदी करताना खुपदा गोंधळ होतो.
जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. कथासंग्रह, अनुवादित, कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, अनुवादित ई. प्रकार चालतील.

प्रतिक्रिया

रानी १३'s picture

30 Nov 2011 - 3:00 pm | रानी १३

तुमचे वय काय ? नाही म्हनजे तसे पुस्तके सन्गितलि जातिल .....(ह.घ्या.);)

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2011 - 11:08 pm | टवाळ कार्टा

+१ :)

किसन शिंदे's picture

30 Nov 2011 - 3:05 pm | किसन शिंदे

विरोप्याचा पत्ता द्या. आमच्या 'शब्दयात्री' पुस्तक भिषीची आख्खी यादीच पाठवून देतो, सगळीच वाचून काढा. :)

गवि's picture

30 Nov 2011 - 3:12 pm | गवि

१) शाळा
२) शाळा
३) शाळा
४) शाळा
५) शाळा

ही पुस्तकं आधी वाचून पहा.. तोसवर आणखी कळवतो.

तुम्हाला कोणत्या विषयांच्या पुस्तकांत रस आहे म्हणजे रहस्य कथा, वैचारीक पुस्तके, निसर्गमय पुस्तके ?

कोणतेही प्रकार चालतील...
रहस्य कथांना प्राधान्य :-)

धमाल मुलगा's picture

30 Nov 2011 - 6:30 pm | धमाल मुलगा

मराठीत रहस्यकथा वाचायच्या म्हणताय आणि ठौक नाय कोणती वाचावीत? ला हौल विलाकुवत!
सुहास शिरवळकर
बाबा कदम
शरश्चंद्र वाळिंबे
विजय देवधर (ह्यांनी केलेली अनुवादित)

ह्या लेखकांची पुस्तकं घ्या. :)

आनंदी गोपाळ's picture

1 Dec 2011 - 9:24 pm | आनंदी गोपाळ

गुरुनाथ नाईक कुठे गेले?

धमाल मुलगा's picture

2 Dec 2011 - 11:20 am | धमाल मुलगा

गुरुनाथ नाईकांना कसा काय विसरलो बरं? च्च च्च च्च्च.... मेजर अविनाश भोसले, कॅप्टन दीप, मारिया लोबो, हवालदार जंगम, शेख सगळी क्यारेक्टरं कशी वाचता वाचता नजरेसमोर उभी रहायची. :)

गुरुनाथ नाईकांचं 'मंतरलेलं चिलखत' नावाचं एक लै भारी पुस्तक आलं होतं. फार पुर्वी वाचलं होतं..उत्खननाच्या पार्श्वभूमीवर भुताटकीची ष्टुरी होती ती. मिळतंय काय ते अजुन? :)

आठवण करुन दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे हो गोपाळराव.

अवांतरः आता श्रीकांत सिनकर वगैरे यादी नका बुवा काढायला लाऊ. ;)

चिंतामणी's picture

2 Dec 2011 - 2:31 pm | चिंतामणी

रवीन्द्र गुर्जर यांची "अनुवादित" पुस्तके छान आहेत.

उदा. पॅपीलॉन.

आत्मशून्य's picture

30 Nov 2011 - 10:56 pm | आत्मशून्य

रहस्य कथा लेखक अल-स्टॅनले गार्डनर याचा जगप्रसिध्द मानस पूत्र पेरी मेसन च्या अनूवादीत कथांपासून वाचयला सूरूवात करा. हा व्यवसायाने वकील आहे पण गून्हा केवळ हूडकत नाही तर तो कोर्टात सबळ पूराव्याने सिध्दही करतो. याच्या प्रत्येक कथेचा शेवट कोर्टातच होतो. मतीगूंग करणारे व शेवट्पर्यंत खिळवून ठेवणारे कथानक व अत्यंत तर्कशूध्द व अचूक रहस्यभेद ज्याचा शेवट कायम कोर्टामधे न्यायाधिशांसमोरच होणार. जबर्दस्त कोर्टरूम ह्यूमर , दोन वकीलातील स्पर्धा, पोलिसांशी स्पर्धा वगैरे वगैरे.. एकदम सॉलीड स्टार्टर (ह्याचा मेन्कोर कधी घडला कळणारही नाही). बर्‍याच नामवंत अनूवादकांनी याच्या पूस्तकांचे अनूवाद केलेत लाब्ररीत जा व पेरी मेसन एव्हडच नाव घ्या.....

महत्वाचं :- याच्या पूस्ताकांसोबत जेम्स हॅडली चेस नावाच्या लेखकाची अत्यंत रद्दड व चिप कथानक/ प्रसंग असलेली व महत्वाचे म्हणजे अत्यंत टूकार रहस्य असलेली पूस्तके माथी मारायची काही लाब्ररीवाल्यांची जाम वाइट खोड आहे, तेव्हा या नालायक जेम्स हॅडली चेस पासून ४ हात लांब रहा बरका.. याच्या कथात रहस्यमय काय आहे याचे कदाचीत उत्तर मेल्या नंतरही आपल्याला भेटत नसल्याने याला रहस्य कथा लेखक म्हटले गेले असावे. "हैदोस" वगैरे पूस्तकातील कथांचे प्लॉट/वर्णनही सॉलीड भासतील इतकं टूकार ह्याचं कथा लेखन आहे.

हे काय पटलं नाय ब्वा.
आम्हाला पेरी मेसन टुकार वाटतो आणि जेम्स हॅडली चेस भारी.

मी-सौरभ's picture

30 Nov 2011 - 3:16 pm | मी-सौरभ

यांणी पुनर्जन्म घेतला म्हणायचा...

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 3:57 pm | मोहनराव

सध्या मी माझा व्यासंग वाढवतोय!! --- सखाराम गटणे ;)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

रंभा
उनाड मैना
मस्ताराम
चावट राघू
धिंगाणा
....

ही झाली की पुढची सांगतो.

कपिलमुनी's picture

30 Nov 2011 - 3:57 pm | कपिलमुनी

प्र का टा आ

पहा पहा.. "वाईट मनावर कोवळे संस्कार" चं उदाहरण..

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार

गविशेठ आयुष्यात शेवटी मी दिलेली पुस्तकेच कामाला येणार आहेत.

ह्यालाच्य व्यावसायाभीमुख शिक्षण म्हणतात ;)

पुस्तके कामाला येणार हे पटले पण मराठी अर्थाने की संस्कृत? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

उगाच तुमच्या शेजारी बसणार्‍या टंचनिकेचा आमच्याविषयी गैरसमज नको. :P

गवि's picture

30 Nov 2011 - 4:23 pm | गवि

शेजारी?? असो.. ;)

मृत्युन्जय's picture

1 Dec 2011 - 12:07 pm | मृत्युन्जय

व्यावसायाभीमुख शिक्षण

व्यवसाय काय आहे नक्की त्यांचा?

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2011 - 11:10 pm | टवाळ कार्टा

असतील तर मला दे ;)

१ . पाडस : राम पटवर्धनांनी केलेला एका एंग्रजी कादंबरीचा अनुवाद . मूळ लेखकाचे नाव आठवत नाही.
२.रथचक्र : श्री. ना.पेंडसे याची गाजलेली व ऊत्तम कादंबरी .
३.धर्मानंद : जयवंत दळवीं ची झकास कलाकृती / कादंबरी.
४.ठणठणपाळ : जयवंत दळवींचे विनोदी लेखन.
५.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकरांची ऊत्तम कादंबरी.
६. पुरुष : जयवंत दळवींचे नाटक ( नाटक "वाचण्यात" वेगळा मजा आहे )
७. पानिपत : विश्वास पाटील याची ऐतिहासिक कादंबरी.
८. आहे मनोहर तरी : सुनिताबाईंचे आत्मचरित्र.
९. बनगरवाडी : व्यंकटेश माडगुळरांची एक विगळीच वस्तु. ( कादंबरी )
१०. अ‍ॅडम : रत्नाकर मतकरींची ( अ‍ॅड्ल्ट ) कादंबरी .

पटकन आठवली ती लिहीली आहेत. पु.ल. चे "मुद्दाम" नाही लिहेलेले. सानिया ह्या लेखिकेच्या कथा ही छान असतात. भैरप्पांची , ऊमा कुळकर्णी नी अनुवादित केलेली साहित्य संपदा परमप्रिय. नेमसेक : झुंपा लाहिरीची कादंवरी जरूर वाचावी अशी .

आणि हो , कॅलिडोस्कोप : अच्युत बर्वे : ही कादंबरी वाचाच.

amit_m's picture

30 Nov 2011 - 5:18 pm | amit_m

यातील दोन-तीन पुस्तके वाचलेली आहेत.

मी-सौरभ's picture

1 Dec 2011 - 12:10 am | मी-सौरभ

मग आता उरलेली वाचा आणि समालोचन व्यनी करा त्यांना

विजुभाऊ's picture

30 Nov 2011 - 3:58 pm | विजुभाऊ

जी ए कुल्कर्णी ची
पिंगळावेळ
सांजशकुन
काजळमाया
हिरवे रावे

सर्वसाक्षी's picture

30 Nov 2011 - 4:06 pm | सर्वसाक्षी

अवश्य वाचा.

या इथेच मिपावर रामदास काकांचे लेखन वाचले आहे काय?

आणि कुणाला भेटच द्यायचं असेल तर ही लिंक फोर्वडही करु शकता. :)

किसन शिंदे's picture

30 Nov 2011 - 4:21 pm | किसन शिंदे

रामदास काकांच लेखन अवश्य वाचा.

sagarpdy's picture

30 Nov 2011 - 5:26 pm | sagarpdy

शशी भागवतांच्या कादंबऱ्या खूप चांगल्या आहेत असे ऐकले. त्यातील एक 'मर्मभेद' हि वाचली आहे. अतिशय सुंदर रहस्यकथा !
पण दुर्मिळ आहेत हि तीनही पुस्तके.

कपिलमुनी's picture

30 Nov 2011 - 6:05 pm | कपिलमुनी

सुंदर लिहितात ते
१. रत्न प्रतिमा
२. रक्त रेखा
३. मर्म भेद

शिवाय
वीर धवल, कलिकामुर्ती इत्यादी पुस्तके पण छान आहेत ..

धमाल मुलगा's picture

30 Nov 2011 - 6:23 pm | धमाल मुलगा

दोस्ताहो,
शशि भागवतांची जमतील तेव्हढी पुस्तकं हवी आहेत मला. जो कोणी मिळवून देऊ शकेल त्याचा मी आजन्म ॠणी राहीन रे. :)
फार शोधलं, नाहीच सापडत.

sagarpdy's picture

1 Dec 2011 - 11:22 am | sagarpdy

मीही उभा अप्पा बळवंत पालथा घातला - नाही मिळाली. नंतर majestic प्रकाशन ची प्रेस शोधली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हि पुस्तके अजूनही साधारण सहा महिन्याच्या कालावधीत एकदा प्रकाशित होतात. सध्याचा साठा संपला असल्याने मला पुस्तके मिळू शकली नाहीत. पुढच्या प्रकाशनाच्या वेळी बघू !

धमाल मुलगा's picture

1 Dec 2011 - 11:49 am | धमाल मुलगा

भली मोलाची माहिती दिलीत द्येवा. :)
मी तर आप्पा बळवंत चौक सोडाच, आठवले काकांकडंही पाहून आलो. जुनी, रद्दीत घातलेलीही नाही मिळत म्हणाले. हे मॅजेस्टिकचं एक बरं सांगितलंत. आता लक्ष ठेऊन राहतो. मला कळालं तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला मिळत असतील तर मला कळवा. :)

मृत्युन्जय's picture

1 Dec 2011 - 12:18 pm | मृत्युन्जय

धम्या मलाही रडारवर ठेव रे.

आधी मराठी संस्थळांवरचं लेखन वाचुन पचवुन दाखवा मग बघु पुस्तकांचं.

सुहास..'s picture

30 Nov 2011 - 5:56 pm | सुहास..

आधी मराठी संस्थळांवरचं लेखन वाचुन पचवुन दाखवा मग बघु पुस्तकांचं.

छ्या ! अशी संस्थळावरील लेखकांची हेटाई पाहुन डोळे पाणावले ;)

इथे लेखकाना निगरगट्ट बनविले जाते तसेच त्यांच्यावर गेंड्याच्या कातडीचे अस्तर पांघरले जाते

हॅरी पॉटरचे सात मराठी भाग

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Nov 2011 - 8:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हॅरी पॉटर मराठीमध्ये वाचायचे म्हणजे, मराठी येत असून सुद्धा पु. ल. तामीळ मध्ये वाचण्यापैकी झाले. :(

सुनिल पाटकर's picture

30 Nov 2011 - 11:11 pm | सुनिल पाटकर

कादंबरी
श्यामची आई - साने गुरुजी
रणांगण - विश्राम बेडेकर
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
ययाती - वि. स. खांडेकर
कोसला - भालचंद्र नेमाडे
मृत्युंजय - शिवाजी सावंत
पार्टनर - व. पु. काळे
श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
तुंबाडचे खोत, गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
शहेनशहा - ना. सं. इनामदार
धग - उद्धव ज. शेळके
नॉट विदाऊट माय डॉटर - बेट्टी महमूदी

कथा
चिमणरावांचे चर्‍हाट - चिं. वि. जोशी
कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर
तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ
काजळमाया - जी. ए. कुलकर्णी

चरित्रे/आत्मचरित्रे
स्मृति-चित्रे - अक्ष्मीबाई टिळक
बलुतं - दया पवार
. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
आमचा बाप आन आम्ही - नरेंद्र जाधव
रातवा - चंद्रकुमार नलगे
सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - महात्मा गांधी
भोगले जे दु:ख त्याला ... आशा आपराद
मी वनवासी -सिंधूताई सपकाळ

संकीर्ण
व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
माणसं - अनिल अवचट
...........
द पेलिकन ब्रीफ : जॉन ग्रिशॅम
द काइट रनर - खालीद हुसैनी
गार्गी अजून जिवंत आहे - मंगला आठलेकर

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2011 - 11:16 pm | टवाळ कार्टा

बटाट्याची चाळ... पु.ल.
व्यक्ती आणि वल्ली...पु.ल.
पु.लं.चे कोणतेही पुस्तक
अनुदिनी...दिलिप प्रभावळकर

हेतू काहीही असला तरी
चर्चा तर होतेय

असो. सध्या http://www.pustakvishwa.com/ इथे जाऊन जमेल तितकं वाचा. आपोआप पुस्तकांबद्दल माहिती होत जाईल.

सागर's picture

23 Jan 2012 - 4:50 pm | सागर

ज्योति ताई

आधी तुम्ही हजेरी लावा की तिथे :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Dec 2011 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

१)विद्रोही तुकाराम>>>डॉ.आ.ह.साळुंखे...हे पुस्तक म्हणजे तुकाराम महाराजांचे खरेखुरे जीवनकार्य काय याची पूर्ण माहीती तर देतेच,शिवाय तुकारामां विषयीच्या सर्व वादग्रस्त मुद्यांचा अतिशय यथायोग्य परामर्श यात घेतला गेलाय

२)छत्रपती शिवाजी महाराज-जीवन रहस्य>>> नरहर कुरुंदकर...शिवाजी महाराजांवर आजपर्यंत अनेक ग्रंथ/पुस्तके,नाटके,चित्रपट तयार झालेले आहेत.या पुढेही होतील.पण या ४० पानी छोट्या पुस्तका सारखे दुसरे एकही इतके उत्तम पुस्तक माझ्या पहाण्यात आले नाही.हे पुस्तक वाचल्यावर तर माझं असं मत झालय,की शिवाजी विषयीची इतर सर्व पुस्तक वाचली/नाही वाचली तरी,हे पुस्तक चुकवलं तर खरा शिवाजी आपल्याला कधी कळणारच नाही...कारण महाराज युगप्रवर्तक होते म्हणजे काय होते?...रयतेचे राजे होते म्हणजे रयतेनी या माणसाला खरोखरच आपले का मानले?इश्वरी अवतार का मानले? ...भारताच्या समग्र इतिहासात शिवाजी सारख स्थान जनतेनी इतर कुणालाही का दिलं नाही? त्याच्या हयातीत आणी निधना नंतरही शत्रुकडुन वट्याला येणारे सगळे भोग/हालापेष्टा/छळ हे सोसुनही सगळी जनता एक दिलाने या माणसाच्या मागे अखंड का बर उभी राहीली? नक्की काय रहस्य आहे या विभुतीच? या आणी अश्या सर्व प्रश्नांच परिपूर्ण आकलन घडण्यासाठी/होण्यासाठी हे पुस्तक वाचलच पाहिजे असं आहे..हे नक्की

वरुण मोहिते's picture

1 Dec 2011 - 12:20 am | वरुण मोहिते

प्रकाशाची सावली- दिनकर जोशी,अनुवाद- स्मिता भागवत.
स्वामी-रनजीत देसाई
झोंबी-आनन्द यादव
हुतात्मा- मीना देशपाण्डॅ
एका दिशेचा शोध- सन्दीप वासलेकर
हेडहन्टर- गिरिस टिळक खुप आहेत आजुन् मला नीट टन्कता येत नाइ....व्यनी करा... ईन्ग्रजी आनी मराठी खुप सान्गेन

सचिन भालेकर's picture

1 Dec 2011 - 1:10 am | सचिन भालेकर

मराठी तल प्रत्येक पुस्तक हे वाचन्यासाठी अप्रतिमच असत................... :)

नजदीककुमार जवळकर's picture

1 Dec 2011 - 9:46 am | नजदीककुमार जवळकर

विजय देवधर यांचे (अनुवादित) डेझरटर वाचा.
संत चरित्र आवडते काय ?

सागर's picture

23 Jan 2012 - 4:27 pm | सागर

विजय देवधर यांचे (अनुवादित) डेझरटर वाचा.

मूळ लेखक गंथर बान्हमान याने जर्मन भाषेतून त्याचे अनुभव लिहिले होते. त्याची उत्तर आफ्रिकेतून केलेल्या पलायनाची ही चित्तथरारक युद्धानुभव कथा नंतर इंग्रजीत आय डेझर्टेड रोमेल या नावाने अनुवादित झाली आणि तिच्यावर अक्षरशः उड्याच पडल्या. विजय देवधर यांनी त्यातील थरार टिकवून मराठीतून अनुवाद केला आहे त्यामुळे 'डेझर्टर' हे अतिशय वाचनीय आहे. ब्रिटिश फौजांबरोबरच त्याला जर्मन फौजादेखील शोधत असतात. अशा सर्वांना तोंड देऊन तो कसा निसटतो ही एक अतिशय रोमहर्षक कथा आहे.

जरुर वाचावी. युद्धकथा वा पलायनकथा वाचायला आवडणार्‍या वाचकांचा अपेक्षाभंग होणार नाही हे खात्रीने म्हणू शकतो.

नजदीककुमार जवळकर's picture

1 Dec 2011 - 9:50 am | नजदीककुमार जवळकर

सचिन पिळगावकर यांचे आत्मचरित्र असेल तर बघा ..
कदाचित १०० रु. मिळेल .. खी खी खी

sagarpdy's picture

1 Dec 2011 - 11:50 am | sagarpdy

चंपक, ठक-ठक, चांदोबा, हिमगौरी आणि सात बुटके, ईसापनिती, हितोपदेश, प्रयोग करू विज्ञान शिकू, आपडी-थापडी, लोकप्रिय बडबड गीते, इत्यादी

चंपक, ठक-ठक, चांदोबा, हिमगौरी आणि सात बुटके, ईसापनिती, हितोपदेश, प्रयोग करू विज्ञान शिकू, आपडी-थापडी, लोकप्रिय बडबड गीते, इत्यादी

हायला ! हा पियुशा चा डुप्लीकेट आयडी आहे काय ? ;-)
शक्यता नाकारता येत नाही ....

sagarpdy's picture

1 Dec 2011 - 1:05 pm | sagarpdy

तो मी नव्हेच !

चिंतामणी's picture

2 Dec 2011 - 2:28 pm | चिंतामणी

तो?????

तु "तो" असणे शक्य नाहीच. कारण

पियुषा "ती" आहे.:p :-p :tongue:

मैत्र's picture

1 Dec 2011 - 12:32 pm | मैत्र

मागे पुस्तक आणि वाचनाचे काही धागे होते... मला वाटतंय सौरभच असावा.
त्याचा व्यासंग पाहून अगदी थोरामोठ्यांनीही दंडवत घातला होता..

नंदनचे पण एक दोन धागे होते असेच जबरदस्त..
कोणी जमल्यास त्याचा लिंका द्या... जुन्या वाचनखूणा उडाल्या आहेत.

आणि अमित -- नंदनचा ब्लॉग पहा...

marathisahitya.blogspot.com/

काय वाचावं आणि त्यात काय खरंच पहावं / शोधावं/ समजून घ्यावं याची काही दिशा मिळेल...
बरेच काही उगवून आलेले हा केवळ अप्रतिम लेख आहे...

अर्थात राहवत नाही म्हणून आवडलेल्या काही पुस्तकांची यादी -

१. गोनिदांची सगळीच -- विशेषतः माचीवरला बुधा, मृण्मयी, शितू, पडघवली, कुण्या एकाची भ्रमणगाथा, रानभुली, जैत रे जैत, दास डोंगरी राहतो, देवकीनंदन गोपाळा
२. पु. ल. देशपांडे -- काही सांगण्याची गरज नाही
३. आनंद यादव -- चार पुस्तकं आहेत टप्प्या टप्प्याने जाणारी आत्मकथा -- झोंबी, नांगरणी,चारभिंति आणि काचवेल.
४. प्रकाश नारायण संत -- लंपन ची सगळी पुस्तकं
५. ना. सं. इनामदार -- शहेनशहा, झुंज, राऊ
६. रणजित देसाई - स्वामी, श्रीमान योगी
७. गंगाधर गाडगीळ -- दुर्दम्य
८. विजय देवधर -- डेझर्टर
९. पॅपिलॉन
१०. विश्वास पाटील -- पानिपत, झाडा झडती, महानायक
११. शिवाजी सावंत -- युगंधर, मृत्युंजय, छावा
१२. साधनाताई आमटे - समिधा

आठवतील तशी लिहितो ...

आनंदी गोपाळ's picture

1 Dec 2011 - 9:36 pm | आनंदी गोपाळ

महाराष्ट्र दर्शन राहिलं!
अन नॉस्टाल्जिया म्हणूनः ते समिधा मला ८वीत शाळेत पहिला आलो म्हणून बक्षिस मिळालं होतं. :)

माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
रानवाटा - मारूती चितमपल्ली
पाखरमाया - मारुती चितमपल्ली
शब्दांचे धन - मारुती चितमपल्ली
जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
हसणावळ - द. मा. मिरासदार
हुबेहुब - द. मा. मिरासदार

सागर's picture

23 Jan 2012 - 4:21 pm | सागर

रम्या,

तुमच्या यादीत माडगूळकर पाहून सुखावलो तरी माडगूळकरांची अजून २ पुस्तके येथे सुचवावीशी वाटतात.

कोवळे दिवस आणि सत्तांतर या कलाकृती देखील त्याच तुलनेने सुंदर आहेत.
मला त्यांची सत्तांतर सर्वात आवडली ( यासाठीच व्यंकटेश माडगूळकरांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे)
एकही संवाद नसलेली सत्तांतर अगदी छोटी कादंबरी असली तरी एका बैठकीत वाचून पूर्ण होते इतकी चित्तथरारक आहे.
तीच गोष्ट कोवळे दिवसची देखील. :)

नक्की वाचा ..
हिंदु सर्वात शेवटी वाचा ( वाचुन झाला कि निरोप धाडा)

सागर's picture

23 Jan 2012 - 4:18 pm | सागर

भालचन्द्र नेमाडेची सर्व पुस्तके नक्की वाचा ..
हिंदु सर्वात शेवटी वाचा ( वाचुन झाला कि निरोप धाडा)

नेमाड्यांच्या इतर पुस्तकांतून जो बौद्धिक आनंद मिळतो तिथे हिंदू कमी पडते.
कोसला, बिढार ,हूल,,जरिल, आणि झूल या कादंबर्‍यांच्या दर्जाची तुलना हिंदूशी होते.
आणि मला वाटते त्यामुळेच अपेक्षाभंग होतो.
नेमाडे न वाचलेल्या वाचकाला कदाचित हिंदू वेगळी वाटू शकेल.
माझ्या संग्रहात भालचंद्र नेमाड्यांची जवळपास सर्व पुस्तके आहेत (हिंदू सोडून :) )
हिंदू नक्की घेणार आहे पण अजून काही दिवसांनी.

बाकी कपिलमुनींचा प्रतिसाद आवडला आणि ते म्हणत आहेत त्यात तत्थ्य नक्कीच आहे. माझीही भावना अगदी अशीच आहे :)

साबु's picture

23 Jan 2012 - 2:51 pm | साबु

grathalay.org मधे बघितले असता मुम्बइ येथील बर्याच ठिकणी (कळवा, ठाणे) येथील नगर वाचन मन्दिरात काहि प्रती आहेत...इछुकानी प्रयत्न करावा...जमल्यास मलाहि द्या वाचायला :)

साबु's picture

23 Jan 2012 - 2:52 pm | साबु

.

झुळूक's picture

27 Jan 2012 - 7:36 pm | झुळूक

बरीचशी पुस्तके इथे मिळतील-
http://www.flipkart.com/books/marathi
मी खुप वेळा order दिलेली आहे,cash on delivery option is good.
Reliable service

सुजित जाधव's picture

20 Nov 2022 - 7:08 pm | सुजित जाधव

पुस्तकांवर खूप दिवस झाले चर्चा झालेली नाही आणि मला पण काही पुस्तके घ्यायची आहेत म्हणून हा धागा उकरून काढतोय..

मी वपुंची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय, पार्टनर, बाई बायको कॅलेंडर ही पुस्तके वाचली आहेत, अजून कोणती वाचावीत.. त्यांची रंगपंचमी, सखी, रंग मनांचे, दोस्त, तप्तपदी ही पुस्तके कशी आहेत.. आधी कोणती वाचायला घेऊ.

पु. ल., वि. स. खांडेकर, रणजीत देसाई यांचे प्रसिद्ध साहित्य वाचलं आहे.

स्वामी, श्रीमान योगी ई. ऐतिहासिक पुस्तके वाचली आहेत. (सध्यातरी ऐतिहासिक पुस्तके वाचायला पुरेसा वेळ नाही त्यामुळे निवांत वेळ काढूनच वाचायचं ठरवल आहे.)

सुशिंची दुनियादारी, दास्तान, ऑर्डर ऑर्डर, समांतर ही पुस्तके वाचली आहेत, आणखी कोणती वाचू?
या व्यतिरिक्त उपरा, कोल्हाट्याचे पोर, शाळा, एक होता कार्व्हर हीपण वाचलीत.
२०० ते ३०० पानांची रहस्यमयी किंवा शाळा, दुनियादारी सारखी शालेय/महाविद्यालयीन जीवनाचे वर्णन करणारी कोणती पुस्तके सुचवाल?

याव्यतिरिक्त जी. ए. कुलकर्णी, गदिमा, विजय तेंडुलकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, विश्वास पाटील, दांडेकर, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगुळकर या लेखकांची कोणती पुस्तके/कादंबऱ्या सुचवाल..

एखाद्या जुन्या वाचनालयाचे सभासद व्हा. पुस्तके विकत घेण्यापेक्षा बरे पडेल.

श्रीगुरुजी's picture

20 Nov 2022 - 7:37 pm | श्रीगुरुजी

मुरलीधर खैरनारांची "शोध" ही खूपच उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरी आहे.

मला पण हा प्रश्न आहे पण मला अलीकडच्या काळातील लेखकांची नावे नावे पाहिजेत ( खालील यादीतील वगळून)
व्यनि करावा

माझी आवड खालील प्रकारचाय लेखकयांचं लेखनाची आहे
खानोलकर
प्रकाश नारायण संत
जयवंत दळवी
श्री ना पेंडसे
माड्गुळकर
जी ए कुलकर्णी
रहस्य कथेत फारसे गम्य नाही . प्रवास वर्ण पण नको
अम्तचरित्र= व्यक्तीवर अवलंबून
राजकीय चालेल