दिवाळी अंक २०२२ - मुघल-ए-आझम - एक रंगलेला किस्सा

मिडास's picture
मिडास in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 10:19 pm

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */

.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}

.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}

.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}

@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}

.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}
.mi-image {
max-width:100%;
height:auto;
margin-top:16px;
margin-bottom:16px;
box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19);}

र तुमचे जुन्या पिढीबरोबर कधी मतभेद होत नसतील, तर नव्या पिढीत जन्म घेऊन काही उपयोग नाही.

दिवाळी हा रांगोळीच्या रंगाचा, उटण्याचा सुगंधाचा आणि फटाक्यांच्या रोशणाईचा सण. मुघल-ए-आझम हा चित्रपट पडद्यावर प्रत्येक क्षणी दिवाळी साजरी करतो. भव्य चित्र चौकटी , रंगीबेरंगी वेशभूषा, अतिमधुर संगीत, शैलीबाज अभिनय आणि पल्लेदार संवाद यांनी हा चित्रपट अक्षरशः नटलेला आहे. सर्वार्थाने ज्याला larger than life म्हणता येईल असा हा चित्रपट. चित्रपटाची कथा म्हणाल तर खानदान की इज्जत विरुद्ध तरुण प्रेमकहाणी हा ८० टक्के हिंदी चित्रपटात गिरणीतल्या गव्हाला टक्कर देईल इतपत दळलेला विषय. पण हे साम्य इथेच संपतं. ही कुठल्या हिंदी सिनेमातल्या गावच्या ठाकूरची कहाणी नाही. ही कहाणी आहे हिंदुस्थानच्या बादशहाची. पण हे खूपच अवांतर झालं. मला विचारलं तर या सिनेमातले डायलॉग्ज हे संवाद नाहीत, तर खरोखर डायलॉग्ज आहेत. सैनिकापासून अकबर बादशहापर्यंत प्रत्येक जण एक से एक खतरनाक डायलॉग्ज अक्षरशः मारत राहतो. यातला एक एक डायलॉग अ‍ॅटम बॉम्बपेक्षा जोरात वाजतो.

मला मनापासून असं कायम वाटत राहिलं आहे की उर्दू ही फक्त प्रेमात वेड्या झालेल्या एखाद्या आशिकने आपल्या मेहबूबाच्या आठवणीत इजाद केलेली भाषा आहे. या भाषेतला एक एक शब्द म्हणजे मखमलीचा मुलायमपणाचा अभिमान धुळीत मिळवणारा आहे. पण मुघले आझम चे संवाद म्हणजे याला ढळढळीत अपवाद आहेत. उभा जन्म आम्ही आमच्या आईबापाचे टोमणे खात काढला, पण "हम अपने बेटे के धडकते हुए दिल के लिये हिंदुस्थान की तकदीर नहीं बदल सकते" याच्या तोडीचा एकसुद्धा टोमणा आमच्या नशिबात आला नाही. सध्याच्या सणासुदीच्या आणि विशेष म्हणजे जाहीर समारंभाच्या धामधुमीत "आजचे आपले मान्यवर पाहुणे, आपले सर्वांचे प्रेरणास्थान, आदरणीय *** साहेब यांचं टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करावं हि मी विनंती करतो" हे वाक्य सररास ऐकायला येतं, पण याच्या तुलनेत "निगा रख्खो मेहेरबान. मुगले रियासत, शहेनशाह जलालुद्दीन मोहंमद अकबर जलवा फरोश होते है" हा डायलॉग ऐकल्यावर हेन्री ओलोंगाने दात ओठ खात टाकलेल्या बाउन्सरला सचिनने सहज मैदानाच्या बाहेर टोलवलं होतं, त्याची आठवण येते.
Mugle Aazam

पण यातला कळस म्हणजे अनारकली आणि अकबर यांची जुगलबंदी. फटाक्यांची लड फुटावी तसे एकामागोमाग एक डायलॉग संवाद फुटत राहतात. उदाहरणार्थ एक प्रसंग बघू या. अकबर अनारकलीला तुरुंगात तिला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावतो आणि मग सुरू होते एक जुगलबंदी. एखाद्या बंदिशीच्या सुरुवातीला तंबोऱ्यातून सूर उमटावे आणि मग त्याची आठवणही राहू नये, तसा सुरुवातीला मानसिंग एक संवाद म्हणतो.

मानसिंग - अनारकली, दस्तूर है की मरने वाले की आखरी आरजू पूरी की जाती है. अगर कोई आरजू हो तो महाबली को अर्ज करो.

एकदम साधी गोष्ट आहे की बाई, तू तर आता मरणार, काही शेवटची इच्छा राहिली असेल तर सांगून टाक. आता इथे अनारकली एक कनीज म्हणजे सामान्य दासी आहे. पण प्यार की ताकत वगैरे जे काही म्हणतात, त्याच्यामुळे सगळा घोळ होतो. परत आपण बीएला उर्दू घेतलं होतं हे दाखवायची संधी परत मिळणार नाही हे तिला माहीत आहे. त्याच भरात मॅडम बोलून जातात....

अनारकली - कनीज की आरजू जिल्ले इलाही के इख्तियार में नहीं .

मरताना पण बाई आपला attitude सोडायला कबूल नाहीत. आमचा अनुराग कश्यप असता, तर "तुमसे ना हो पाई" असं म्हणून गप्प बसला असता. पण इथे अकबर आहे. त्यांनी तर उर्दूमध्ये Phd केलंय. तो कसा काय शांत बसेल? साहेब कडाडले,

अकबर - हमारे रेहमो करम का दायरा इतना तंग नहीं की जिसमे एक कनीज की आखरी आरजू भी ना समा सके. बयान कर.

नेहले पे देहला म्हणतात यालाच. एखाद्या नाचणारीची शेवटची इच्छा पूर्ण न करण्याइतपत अकबर कोता नाही. बोल, काय पाहिजे तुला.

अनारकली - मरने से पेहले ये कनीज मालिका बनना चाहती है|

एवढं ऐकल्यावर अकबर I knew it म्हणून नाचायचा बाकी आहे. पण शेवटी तो मुघल बादशहा आहे. कुणाचा अपमान करतानाही "माफ किजीये, लेकिन खासें चुतीये है आप" अशी अदब सांभाळणाऱ्या पिढीचा तो आद्य पुरुष आहे. तो टोमणाही शुद्ध उर्दूमध्येच मारणार.

अकबर - अंजामतः. तेरे लबो पे आज तेरे दिल की आरजू आ ही गई. मौत की डरावनी रात मे भी तू हिंदुस्तान की मलिका बनने के सुनहरे ख्वाब को नही भूल सकी.

पण आता इथे अनारकली हुकमाचा एक्का बाहेर काढते.

अनारकली - कनीज की मजबूरी को आरजू ना समझीये जिल्ले इलाही.

या एका वाक्याने लखनौपासून ते इंदोरपर्यंतच्या कमीत कमी दहा शायरांच्या पोटापाण्याची सोय झाली.

(संदर्भ - 'कुछ तो मजबूरियाआँ रही होंगी, यूंहीं कोई बेवफा नही होता' इथपासून ते 'तेरी मजबूरिया दुरुस्त मगर तूने वादा किया था याद तो कर' आणि 'गम-ए- जमाना ने मजबूर कर दिया वर्ना, ये आरजू की बस तेरी आरजू करते'पर्यंत तमाम आरजू से मजबूर शेर.)

अनारकली (continued) - साहिबे आलमने मुझसे वादा किया था कि वो मुझे अपनी मालिका बनायेंगे. मै नही चाहती की उनका वादा झूटा निकलें और हिंदुस्तान का होनेवाला बादशहा जिंदगी भर एक अदना कनीज के सामने शरमिंदा रहे.

बाईंनी issue escalate केलाय. इथे अकबरालाही जाणीव होते की मॅटर हाताबाहेर चाललंय. इथे तो higher लेव्हलच्या परंपरेला जागून आय विल गेट बॅक टू यू म्हणून एक तात्पुरता वर्क अराउंड देतो.

अकबर - हम हिंदुस्तान के होनेवाले बादशहा को शरमिंदा नही होने देंगे. मानसिंग, सलीम को रिहा कर दो.

पुढच्या प्रसंगात अकबर आपल्या हाताने अनारकलीच्या डोक्यावर राजमुकुट चढवतो. तो मुकुट ठेवताना पृथ्वीराज कपूर यांचे हात थरथरलेत. मुकुट ठेवून झाल्यावर त्यांच्या मुठी गच्च आवळल्यात. समोर अनारकलीच्या रूपातली मधुबाला शब्दशः निर्जीव मूर्तीसारखी उभी आहे. त्याच थंडपणे ती शेवटचे बोलते,

अनारकली - शेहेनशाह की इन बेपनाह बक्शिशो के बदलेमे ये कनीज जलालुद्दीन मोहम्मद अकबर को अपना खून माफ करती है|
4

तिने अकबरला एक सणसणीत मुस्काटात मारली असती, तरी एवढा परिणाम झाला नसता, जेवढा त्या वाक्याने होतो. त्याच्यावर पृथ्वीराज स्तब्धतेत उभे राहून जो परिणाम साधतात, तो एखाद्या अजरामर स्वगतापेक्षा कणभरदेखील उणा नाही. त्याच्यापेक्षा ते घळाघळा रडले असते, तरी परवडलं असतं.

मुघले आझम बद्दल लिहिणं म्हणजे पु.लं.च्या बोरटाके गुरुजींच्या भाषेत सांगायचं तर "सुर्व्याने काजव्यापुढे चमकण्यासारखे आहे." बऱ्याच जणांच्या हृदयात या सिनेमासाठी एक विशेष कप्पा राखून ठेवलेला असेल. तिथे घुसखोरी करण्याचा हेतू नव्ह्ता. फक्त दिवाळीच्या निमित्ताने किंवा कुठल्याही निमित्ताने का असेना, या लेखाच्या बहाण्याने कुणाला मधुबालाचा सुंदर चेहरा जरी आठवला तरी दिवाळीचा फराळ पावला समजेन मी. आणि ज्यांना कुणाला हे मुक्तक आवडलं नसेल, त्यांच्याकरता मी जुबेर रिझवी यांचे शब्द उसने घेऊन इतकंच म्हणेन की मै अपनी दास्तान को आखिर ए शब तक तो ले आया, तुम इसका खूबसूरत सा कोई अंजाम लिख लेना.
3

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

5 Nov 2022 - 11:30 pm | सौंदाळा

मधुबालाचा सुंदर चेहरा जरी आठवला तरी दिवाळीचा फराळ पावला समजेन मी.
अगदी अगदी
अतीव सुंदर लिहिले आहे.
मुघल राजे, महाराजे, शायरांची भाषा असल्यामुळे उर्दू ऐकायला भारदस्त वाटते.

लिहिते राहा.

यांच्या मोहक अदाकारीचा नाच दाखवायला किती आटापिटा तो!
जुबेर चे मन सिझवी त मुगले आज़म चे दमदार संवाद भावले.

श्वेता व्यास's picture

14 Nov 2022 - 2:07 pm | श्वेता व्यास

छान लिहिलं आहे.
असे चित्रपट पाहताना ते उर्दू ऐकून खरं तर हसू येतं. पण ज्या काळात चित्रपट निघाला तेव्हा कदाचित परिणामकारक असेल.
बाकी गिरकी घेणाऱ्या मधुबालेला पाहत राहावंसं वाटत आहे.

ह्यातली सगळी गाणी आवडत असली तरी मी अजुन पर्यंत 'मुघल-ए-आझम' चित्रपट पाहीला नाहिये. आता ह्या प्रसंगाची क्लिप युट्युबवर आहे का ते शोधणे आले!
छोटेखानी लेख आवडला 👍

तुषार काळभोर's picture

14 Nov 2022 - 9:22 pm | तुषार काळभोर

मीही मुघल ए आझम पाहिलेला नाही.
त्यामुळे घरात कधी चर्चेत हा विषय निघाला तर आमचे जिल्ले सुभानी आमच्याकडे तुच्छतेने पाहतात!!

चांदणे संदीप's picture

18 Nov 2022 - 10:15 am | चांदणे संदीप

मुगले आजम या कलाकृतीतले दृश्य आणि पर्यायाने इतिहासातले (खखोदेजा) दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले.

सं - दी - प

श्वेता२४'s picture

18 Nov 2022 - 2:37 pm | श्वेता२४

पण तुमचा लेख वाचून हसू आले व हा सिनेमा पहावा असे वाटू लागलेय.