दिवाळी अंक २०२२ - महासंधी ते महामंदी

आनंदा's picture
आनंदा in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 8:47 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */

.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}

.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}

.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}

@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}

.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}

सुमित हा एका आयटी कंपनीत काम करणारा सामान्य कर्मचारी. कंपनीच्या क्लाउड विभागात असणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांचे क्लाउड सुविधा सांभाळण्याचे काम तो करत असे.
दिव्या ही एका सर्व्हिस कंपनीत UX अभियंता म्हणून काम करत असे, कोणत्या तरी angular फ्रेमवर्कच्या लेगसी प्रॉडक्टवर bug fix करण्याचे काम ती मागची ३ वर्षे करत होती.

बऱ्यापैकी क्षमता असणारी ही मुले, आयटीमध्ये अफाट नाही, पण बऱ्यापैकी पैसे कमवत होती. परंतु अर्थातच २०१०पासून मार्केट हळूहळू बदलत होते, कृत्रिम बुद्धिमत्ता बऱ्याच नोकऱ्या काढून घेणार अशीदेखील चर्चा सुरू झाली होती आणि त्यामध्ये हे लोक जात्यात आणि सुपात नसले, तरी सध्याचे सुपातले लोक संपले की यांचा क्रमांक होता. त्यातच नो कोड किंवा लो कोड प्रणाली थेट यांच्या नोकरीवरच डोळा ठेवून होत्या.

आता तिसरे उदाहरण थोडे वेगळे. प्रणित हा एका स्टार्टअपचा प्रवर्तक होता, त्याने दोन मित्र बरोबर घेऊन एक ग्रोसरी डिलिव्हरी कंपनी सुरू केली होती, त्याला दोन राउंडमध्ये साधारण १० दशलक्ष डॉलर्सचे फंडिंगही होते. तो अत्यंत वेगाने नवीन नोकरभरती करत होता, दुसऱ्या कोणी बाजार खायच्या आधी आपल्याला ग्राहक मिळवायचे आहेत, हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. आत्ताच त्याचे बाजारमूल्य साधारण १०० दशलक्ष होते, आणि त्याला पुढच्या वर्षी युनिकॉर्न व्हायचे होते.

हे सगळे चालू असतानाच २०२०मध्ये एक अभूतपूर्व संकट आले आणि जग एका अनिश्चिततेत ढकलले गेले. एकावर एक lockdown लागायला लागले आणि भीतीचे सावट वाढू लागले. मंदीच्या भीतीने सगळ्या कंपन्या पैसे वाचवायचा मागे लागल्या. मार्केट कोसळले. सगळेच अचानक बदलले.
आक्रमक विपणन अचानक अतिसावध झाले, प्रत्येक पैसा जपून वापरायला लागले. संचारबंदी लागली आणि पहिले दोन आठवडे तर अत्यंत गोंधळात गेले. बऱ्याच कंपन्या दूरस्थ कामासाठी सज्ज नव्हत्या, अशा ठिकाणी तर चक्क काम ठप्प झाले.

रोज रुग्णांचे आकडे वाढायला लागले आणि लोकांच्या पोटातली भीतीदेखील. अशा परीस्थितीत लोकदेखील हातात आहे ते टिकवण्याच्या मागे लागले. साधारण एप्रिल २०२०च्या मध्यात बहुतांश टेक कंपन्या पूर्णवेळ रिमोट काम करत होत्या आणि पूर्वीच्या किंवा त्याहून अधिक उत्पादकता दाखवत होत्या. आणि एकंदरीतच हे सगळे असे सुचवत होते की किमान टेक कंपन्यांनी कोरोना पचवला आहे..

मग माशी शिंकली कुठे?
माशी कुठे शिंकली हे जाणून घ्यायच्या अगोदर आपण आणखी काही गोष्टी पाहू, म्हणजे त्याच्या संदर्भात आपल्याला बघणे सोपे जाईल. वर दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत, आणि असे वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक लोक धडपडत होते. २०१५/१६पासून भारतात खूप स्टार्टअप उघडत होत्या आणि त्यांना फंडिंगदेखील मिळत होते.

२०२०मध्ये कोरोना काळात जेव्हा सगळे सेक्टर मंदीचा सामना करत होते, तेव्हा काही सेक्टर जोमात होते.. त्यातल्या काही सेक्टरबद्दल आपण आधी बोलू या.

१. पाहिला सेक्टर होता फार्मा - अर्थातच हा सेक्टर कोरोनाचा सर्वात मोठा लाभार्थी होता आणि कोरोनामध्ये वेगवेगळी औषधे आणि त्याहीपेक्षा उपकरणे या माध्यमातून त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळाले, अर्थात शेअर मार्केटमध्येदेखील त्याचे प्रतिबिंब दिसले.

२. दुसरा महत्त्वाचा सेक्टर होता रिटेल - कोरोनामध्ये बहुतांश लोक घरात बसून होते आणि त्यामुळे बऱ्याच FMCG कंपन्यांचा खप वाढला. बऱ्याच लोकांनी लोकल किराणा दुकानदारांकडून डिलिव्हरी घेणे पसंत केले, तर काही लोकांनी D मार्टसारख्या रिटेल चेनमधून एकदाच मोठी खरेदी केले.. lockdownची अनिश्चितता लोकांना घरात जास्त माल भरायला प्रवृत्त करत होती, त्याचादेखील बर्‍यापैकी भाग यात होता.

३. तिसरा अत्यंत महत्त्वाचा सेक्टर होता ऑनलाइन - हा सेक्टर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण सध्याचा बुडबुडा समजून घ्यायचा असेल, तर या सेक्टरचा प्रवास समजून घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन सेक्टर मध्ये दोन-तीन भाग आहेत.
पहिला भाग आहे ईकॉमर्स - ईकॉमर्स हा मुळातच मागची दहा वर्षे सतत वाढणारा सेक्टर होता. प्रसूतीपासून अंत्येष्टीपर्यंत जवळजवळ सगळ्या गोष्टी हळूहळू ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर यायला लागल्या होत्याच. कोरोनाचा पहिला तडाखा पचवल्यावर आलेल्या मंदीत या कंपन्यांनी संधी साधली. कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीचे मार्केटिंग करत या ग्राहकांनी शहरी वर्गाला आपल्याकडे खेचले, यात ईकॉमर्स म्हणजे अ‍ॅमेझॉनपासून उबरपर्यंत सगळे आले. त्यातच लोक घरी बसलेले आणि घाबरलेले असल्यामुळे फार्मा आणि फूड या दोन भागांत तर प्रचंड transaction झाली.
Pharmeasy, netmeds अशा स्टार्टअप, किंवा झोमॅटो, swiggy अशा कंपन्यांनी आपला कस्टमर बेस यातून खूप वाढवून घेतला. अर्थात हा सगळा VCच्या जिवावरच. पण ते नंतर बघू या. उबर-ओलादेखील पहिल्या धक्क्यातून सावरल्यावर मेनस्ट्रीममध्ये आले. बिग बास्केट, ग्रोफर वगैरे तर आहेतच..

दुसरा वर्ग आहे कंटेंट - कंटेंटमध्ये देखील सोशल मीडिया आणि OTT असे दोन भाग पडतात. या दोनही इंडस्ट्री तशाही वाढतच होत्या, पण कोरोनामुळे लोकांचे फिरणे कमी झाले आणि स्क्रीन टाइम वाढला आणि या इंडस्ट्रीला याचा मोठा फायदा झाला.

कोरोनाचा तिसरा लाभार्थी असलेला मोठा भाग होता तो ed tech. मी स्वतः २०१९पासून एड टेकमध्ये काम करत होतो. कोरोनामध्ये ऑनलाइन ट्रेनिंगला प्रचंड मागणी आली आणि २०२०/२०२१मध्ये सगळ्या कंपन्यांनीदेखील onboardingसुद्धा ऑनलाइन केले आणि ट्रेनिंगदेखील. २०१८-२०१९पासूनच या क्षेत्रात गुंतवणूक वाढत होती आणि तीव्र स्पर्धादेखील तयार होत होती. २०१४-२०१८ हा फूड टेकचा जमाना होता, तर २०१८-२०२२ हा ed टेकचा होता. २०१९च्या आसपास शारुख बायजुची जाहिरात करायला लागला होताच, आणि नंतर मग मला वाटते अमिताभ वगैरे बरेच लोक वेगवेगळ्या कंपन्यात उतरले.

याशिवाय पेमेंट (paytm, भारत पे, क्रेड वगैरे) हादेखील एक लाभार्थी होताच, पण तो ट्रेंड अजून संपलेला नाही, त्यामुळे त्याचा मोठा गोषवारा घेत नाही.
आता गम्मत अशी होती, की यातले कोणीच स्वतःच्या पैशावर कंपनी चालवत नव्हते. हा सगळा पैसा होता VCचा. आमच्या भाषेत याला 'पैसे जाळणे' असा शब्द वापरला जात असे.. (burning investor's money).

आता हे सगळे कश्यासाठी चालू होते?

स्टार्टअप किंवा कोणताही उद्यमी नवीन धंदा सुरू करण्यापूर्वी समोर पुढील तीनपैकी एक किंवा दोन ध्येये समोर ठेवतो.

१. धंदा वाढवून आपली मोठी प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करणे, नंतर ती पब्लिक झाली तरी साधारण रिलायन्ससारखा एका कुटुंबाचा त्यावर वरचश्मा असतोच. हा पिढीजात व्यवसाय करणारा वर्ग.
२. IPO मधून आपली गुंतवणूक वसूल करणे - झोमॅटो किंवा Paytm यासारख्या कंपन्यांनी बाजारमूल्य वाढल्यावर ते मार्केटमध्ये वसूल करण्याचा प्रयत्न केला, तो किती सफल झाला हा भाग वेगळा. परंतु परदेशात फेसबुक, ट्विटर अशा कंपन्यांनी हा मार्ग वापरला होता.
३. सरळ कंपनी विकून मोकळे होणे - काही जण केवळ विकण्यासाठीच उद्योग सुरू करतात, त्यांना बहुतांशी serial enterprenuer असेच म्हणतात. टेस्लाचा एलोन मस्क हा यांच्यापैकीच. टेस्लापूर्वी त्याच्या बहुधा दोन यशस्वी स्टार्टअप होत्या. परंतु अशा लोकांना नेहमी नवीन आव्हान घ्यायला आवडते, त्यामुळे एखादा धंदा स्थिर झाला की ते लगेच तो विकून दुसऱ्या धंद्यात उडी मारतात.

परंतु exit घेताना पैसे मिळवणे किंवा बाजारातून अधिक गुंतवणूक मिळवणे हा valuationचा खेळ आहे, आणि तिथेच सुरू होते खरी मारामारी.
कोणत्याही धंद्याचे valuation दोन-तीन गोष्टींवर तरी अवलंबून असते.
१. सेक्टर चे valuation / growth potential
२. Product/ conceptची व्यवहार्यता
३. सध्याचा ग्राहक वर्ग आणि त्याचा ट्रेंड.
४. प्रत्यक्ष उलाढाल.

यातील सगळ्याच गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बाजारमूल्य ठरवण्यात मदत करतात. परंतु प्रत्येक उद्योगाचे वेगळे गणित असते आणि त्याप्रमाणे उद्यमी निर्णय घेतात. उदाहरण म्हणजे शेवटी प्रत्यक्ष उलाढाल प्रत्येकाला हवी असली, तरी काही जण सोल्यूशनच्या व्यवहार्यतेवर फोकस करून नैसर्गिकरित्या ग्राहक वाढवत जातात. यामध्ये काही ट्रेनिंग कंपन्या, झेरोधासारखी ब्रोकरेज फर्म दिसतात. काही कंपन्या फ्रीमियमचा मार्ग स्वीकारतात, ज्यामध्ये ग्राहकाला काही सेवा मोफत दिल्या जातात, पण गुंतागुंतीची प्रणाली वापरायची असेल तर पैसे घेतले जातात, यामध्ये काही टॅक्स consultingवाल्या कंपन्या, झूमसारख्या कंपन्या, बहुतांश एड टेक आणि काही इतर सेगमेंट आहेत.
तिसरा मार्ग असतो तो सरळ फ्री घुसखोरीचा, ज्यामध्ये ग्राहकाला ती सेवा फुकट किंवा अत्यल्प दरात दिली जाते आणि पैसे एक तर जाहिरात किंवा चक्क माहिती विकून गोळा केले जातात. फेसबुक हे त्याचे अत्यंत लोकप्रिय उदाहरण. परंतु हा अत्यंत धोकादायक खेळ असतो, कसा ते नंतर पाहूच.

आता हे सगळे का केले जाते? याचे कारण आहे exit चा गेम. जेव्हा गुंतवणूकदाराला या धंद्यातून बाहेर पडायचे असते, तेव्हा त्याला कोणीतरी नवीन गुंतवणूक करणारा शोधावा लागतो. त्याचे दोन प्रकार असतात. एक तर प्रतिस्पर्धी/ alley किंवा शेअर बाजार. प्रतिस्पर्धी जर विकत घेणार असेल तर तो बहुतांश वेळा ते प्रॉडक्ट विकत घेऊन त्याचा गळा दाबतो, तो भाग वेगळा, पण त्यासाठी आपण तेवढी भीती निर्माण करायला लागते. आणि ती निर्माण करायची असेल तर आक्रमक बाजारनीती किंवा जबरदस्त innovation असे दोन मार्ग असतात. जबरदस्त innovation किंवा disruption हे गोष्ट अत्यंत दुर्मीळ आहे, त्यामुळे यातील बाजारनीती हा मार्ग सररास अवलंबला जातो. आणि त्यामुळे फ्रीमियम किंवा पूर्ण फ्री हा मार्ग फंडेड स्टार्टअप निवडताना दिसतात.

आता फंडिंगच का? किंवा प्रत्येक जण आज इतका फंडिंगच्या मागे का लागला आहे? याचीसुद्धा काही कारणे आहेत . मी जेव्हा काहीतरी नवीन प्रॉडक्ट निर्माण करतो, तेव्हा जर ते B2C असेल तर ग्राहकांकडे जाण्यासाठी मला प्रति ग्राहक काहीतरी खर्च येतो, ज्याला aquisition cost असे म्हणतात. ग्राहकांची संख्या जितकी जास्त, तितका जास्त पैसे तुम्हाला ग्राहक मिळवायला आणि जाहिरात करायला लागणार.. ते नाही झाले, तर नैसर्गिकरित्या तेच वर्षभराचे growth target पूर्ण करायला तुम्हाला १० वर्षापर्यंतदेखील वेळ लागू शकतो.
आता मार्केट इतके बदलले आहे की एखादी नवीन चालणारी कल्पना दिसली की त्याची नक्कल करणारे दहा लोक सहज येतात, म्हणजेच एखादे inovation जरी तुम्ही केले असले, तरी तुम्हाला ते कॉपी करणाऱ्या दहा लोकांशी स्पर्धा करावी लागते. जर तुम्ही ग्राहक मिळवण्यात मागे पडलात, तर तुम्ही सहज स्पर्धेतून बाहेर पडता.
मग यावर उपाय काय? तर उपाय एकच दिसतो, तो म्हणजे इतर लोक नक्कल करण्यापूर्वीच आपण ग्राहक जोडण्यात खूप पुढे निघून जाणे. कारण ग्राहक हा बहुतांशी आपल्या सेवादात्याशी एकनिष्ठ असतो. उदा., गूगल पे वापरणारे शक्यतो फोन पे वापरत नाहीत. झोमॅटोवाले swiggy वापरत नाहीत. अर्थात अशा प्रकारे ब्रँड लॉयल्टी निर्माण करायलासुद्धा वेगळी रणनीती वापरली जाते, पण तो भाग वेगळा.
तर, एकंदर मार्केटमध्ये जिसकी लाठी उसकी भैस असा प्रकार असतो, त्यामुळे जो पैसे ओतू शकतो तोच ग्राहक वेगाने आणू शकतो. बरे, ज्याच्याकडे कल्पना असते त्याच्याकडे बऱ्याच वेळेस पैसे नसतात, त्यामुळे त्याला मार्केटमधून पैसे घ्यावे लागतात. कर्ज घेणे इतके सोपे नसते आणि धंदा बुडाला तर दिवाळखोर होण्याची खातरी, त्यामुळे गुंतवणूक घेणे हाच चांगला पर्याय ठरतो.. म्हणजे तुम्ही खरे तर प्रॉफिट आणि रिस्क पैशाच्या बदल्यात अन्य कोणाबरोबर तरी वाटून घेत असता.
परंतु हे असे इन्व्हेस्टर आले की ते त्याबरोबर अन्य काही गोष्टी घेऊन येतात.

पहिली गोष्ट म्हणजे, इन्व्हेस्टर पैशाकडे बघतो, त्याच्यासाठी उद्योग म्हणजे पैसा कमावण्याची संधी असते. त्यामुळे प्रवर्तकाची प्रॉडक्टबरोबर जितकी attachment असते, त्यापेक्षा इन्व्हेस्टरची खूप कमी असते, बऱ्याच वेळेस त्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमावून बाहेर पडायचे असते, त्यामुळे तो प्रवर्तकांवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी दबावही टाकू शकतो. याचा एकंदर परिणाम मार्केटमधली स्पर्धा वाढण्यात होतो.

भांडवलशाहीबद्दल एक प्रसिद्ध वाक्य आहे -
Capitalism is where everyone wants to monopolise but no one actually can.
परंतु या मोनोपॉलीच्या मागे लागून बरेच लोक पैसे अक्षरशः जाळतात.

२०२०च्या मागेपुढे साधारण असेच चालू होते. फूड टेक, फार्म टेक, एड टेक, पेमेंट आणि अन्य बऱ्याच सेक्टरमध्ये अनेक कंपन्या एकमेकांशी स्पर्धा घेत होत्या.
याव्यतिरिक्त अनेक नवीन कंपन्या सुरू होत होत्या, इन्व्हेस्टर्स पैसे गुंतवण्यासाठी कंपन्या शोधत होते.
साधारण जर तुमच्याकडे एखाद्या मोठ्या कॉलेजची डिग्री असेल, किंवा मागची एखादी यशस्वी exit असेल, तर तुम्हाला गुंतवणूक मिळायची जवळजवळ हमीच होती, त्यामुळे बाजारात अधिकाधिक पैसा येत होता. आणि गम्मत म्हणजे यातली बहुतांशी स्पर्धा ही B2Cमध्ये होती. B2B त्या मानाने स्थिर होते, म्हणजे ते अशा आक्रमक व्यूहरचना करत नव्हते, त्यामुळे ते आपण सध्या सोडून देऊ.

स्पर्धा जिंकायची असेल तर आणखी ग्राहक हवेत, आणखी ग्राहक हवे असतील तर आणखी पैसे हवेत आणि आणखी पैसे हवे असतील तर फंडिंग हवे.. सीड, series A, B, C वगैरे करून जास्तीत जास्त पैसे आणण्यात प्रत्येकाला रस होता.
ज्याच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट तो मोठा असे साधारण चालू होते. आणि गरज नसताना जास्त पैसे मिळाले तर जे होते, ते हळूहळू होऊ लागले होते.

कंपन्यांमध्ये skilled labour मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली होती. बंगळुरूसारख्या शहरात लोकांचे पगार खूप वाढू लागले होते. स्टार्टअप हब झाल्यामुळे बरीच गुंतवणूकदेखील तिथे येऊ लागली होती आणि त्या प्रमाणात पगार आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढू लागले होते. २०१९मध्ये ३-५ वर्षे अनुभव असलेल्या हुशार अभियंत्याला बंगळुरूमध्ये २५ लाख पगार आणि सोबत शेअर्स असे पॅकेज होते. ३० ते ४०$ तासाला द्यायला बंगळुरूच्या कंपन्या अजिबात कचरत नसत. परंतु हे लोण बंगळुरूपुरते मर्यादित होते.

कोरोना आला आणि या चित्रात अचानक मोठा बदल झाला.
पुन्हा एकदा हे अधोरेखित करतो की पाहिले २-३ महिने अत्यंत गोंधळात गेले. त्यानंतरदेखील ४-४ महिने अनिश्चितच होते. या परिस्थितीत अनेकांनी नोकरी टिकवणे या गोष्टीला प्राधान्य दिले.
याव्यतिरिक्त अन्य काही गोष्टीदेखील या काळात होत होत्या.

१. ज्या कंपन्या कोरोनापूर्वी एक दिवसदेखील घरून काम करू देत नव्हत्या, त्या आता १०० टक्के घरून काम करू देऊ लागल्या.
२. लॉकडाउनमध्ये घरी बसलेल्या लोकांना खाणे-पिणे, चित्रपट बघणे आणि काम करणे याशिवाय अन्य काही करण्यासाठी नव्हते, त्यामुळे अनेक लोकांनी ७च्या जागी १२ तास काम केले. परिणाम म्हणून उत्पादकता प्रचंड वाढली.. म्हणजे वाढल्यासारखी दिसली, तरी प्रत्यक्षात वाढली का हे आपण नंतर बघू.
३. मूनलायटिंग हा एक नवीन प्रकार मोठ्या प्रमाणावर उदयाला आला. म्हणजे काय, त्याचा संदर्भ पुढे येईलच.
४. आपल्याला रिमोट वर्कर परवडतात हेदेखील बऱ्याच टेक कंपन्यांच्या लक्षात यायला लागले.

परंतु सामान्यपणे बघायला गेले, तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२०पर्यंत साधारण अशीच अवस्था होती.
२०२०च्या शेवटी लसीच्या चाचणीच्या बातम्या येऊ लागल्या, त्याचबरोबर शेअर मार्केट उसळले आणि लोकांच्या मनातली भीतीही ओसरायला लागली. २०२१च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले होते, पण भीती मात्र शून्य स्तरावर होती.

यानंतरच खरी धमाल सुरू झाली.

लस आली आणि मार्केटने चक्क कोरोना गेला असे समजून हालचाल सुरू केली. ज्या सेक्टरना कोरोनाने फटका बसला होता, त्यांनी पहिली हालचाल सुरू केली. कोरोनाचा फटका मुख्यत्वेकरून त्यांना बसला, जे डिजिटल रेडी नव्हते.

ज्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत ऑनलाइन पोहोचता आले नाही असे काही बिझनेस आणि ज्यांना डिजिटल असल्यामुळे ग्राहकांपर्यंत सहज पोहोचता आले, अशा दोघांनीही मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशनचा धडाका लावला.
याबरोबरच कोरोनाच्या काळात ज्यांना इन्फ्रावर ताण आला, त्यांनी क्लाउडवर जायला सुरुवात केली.

आता, मी असे अजिबात म्हणत नाहीये की यापूर्वी लोक क्लाउडवर जात नव्हते. पण कोरोनानंतर तो वेग अचानक वाढला. कारण या कालावधीत लोकांना जाणवलेले या तंत्रज्ञानाचे फायदे आणि हे तंत्र वापरायला असलेली सुलभता खूप जास्त होती.
त्याचबरोबर कोरोनाचे लाभार्थी ठरलेले ऑनलाइन सेक्टरदेखील आलेल्या ग्राहकांना टिकवायला आक्रमक व्यूहरचना करायला लागले.
त्याबरोबरच वर लिहिल्याप्रमाणे कोरोना काळात अडकलेला पैसादेखील पुन्हा मार्केटमध्ये आला, त्याचा परिणाम म्हणून विशेषतः क्लाउड, फ्रंट एंड आणि devops या भागात अनेक नवीन संधी निर्माण झाल्या.
अर्थात हे चक्र पुढे जायला आणखी काही गोष्टी कारणीभूत होत्या.

कोरोनाच्या पहिल्या काळात लोक घरात बसले होते, दुसरे काहीच करण्यासारखे नव्हते म्हणून लोकांनी काम केले आणि उत्पादकता वाढली असे दिसले. अर्थातच हे काही कायमस्वरूपी राहणार नव्हते, अनलॉक झाले आणि लोक फिरायला लागले, मग अर्थात ८ तास काम करणे हेदेखील कठीण होऊ लागले आणि उत्पादकता पूर्वीच्या जागेवर आली, पण बऱ्याच ठिकाणी कंपन्यांना हे पचले नाही, त्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणायला सुरुवात केली. अर्थात हा दबाव अधिकृत नव्हता, पण मॅनेजरकडून मेसेज वगैरे अशा प्रकारचा.. कायम रिमोट असल्यामुळे सहकाऱ्यांबरोबर भावनिक संबंध नव्हतेच.

त्यामुळे एक वर्ग असा होता, ज्याला यातून बाहेर पडायचे होते, पण संधी मिळत नव्हती. त्यांना २०२१मध्ये अचानक संधी मिळायला सुरुवात झाली. त्यात आपल्याकडे तीन महिने नोटिस आहे, त्यामुळे ऑफर हॉपिंग करत ही पहिली फळी बऱ्यापैकी चांगले पॅकेज मिळवू शकली.
त्यात आणखी एक गोष्ट होती.
बंगळुरूमधील आणि परदेशातील कंपन्यांनीदेखील संपूर्ण भारतातून कर्मचारी घ्यायला सुरुवात केली आणि या कंपन्यांसाठी मोठी पॅकेज म्हणजे फारसा प्रॉब्लेम नव्हताच.

परिणाम म्हणून पुण्यासारख्या शहरात, जिथे ५ वर्षे अनुभव असलेला जेमतेम १०-१२ लाखांवर काम करत असे, तिथे पहिली फळी साधारण १८/१९ लाखांवर स्विच करून मोकळी झाली.

आणि धरण फुटले!

अर्थातच हे धरण काही केवळ भारतातच फुटले नव्हते, ते फुटले होते जगभर.. प्रत्येकाने आपापल्या मताप्रमाणे याची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत, पण माझ्या मते याला केवळ कोरोना नाही, तर अन्य काही गोष्टीदेखील जबाबदार आहेत.
साधारण असे घडत गेले असावे -

१. कोरोनामुळे नोकरी बदलण्याचा प्लॅन असलेले, पण एक वर्ष थांबावे लागलेले लोक
२. रिमोट काम आणि त्यातून येणाऱ्या स्ट्रेसला कंटाळलेले लोक

या तीन गोष्टींमुळे बऱ्यापैकी कर्मचारी नवीन नोकरीच्या शोधात होतेच, त्यात या येणाऱ्या नवीन संधींची भर पडली आणि अचानक एका मोठ्या संख्येने लोकांनी राजीनामा दिला.

आणि तिथेच या प्रॉब्लेमने बाळसे धरायला सुरुवात केली. म्हणजे साधारण अशी परिस्थिती झाली की मार्केटमध्ये भरपूर नवीन प्रोजेक्ट आले आहेत, नवीन संधी उपलब्ध आहेत, पण अचानक दहा टक्के लोकांनी नोकरी सोडली..
आता जर ही असलेली लाइफटाइम संधी साधायची असेल तर कर्मचारी हवेत, पण जे आहेत ते जवळजवळ दुप्पट-तिप्पट पगारावर जातायत, मग अशा परिस्थितीत जे करायला हवे, तेच बर्‍याचशा कंपन्यांनी केले - कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ मिळवने आणि टिकवून ठेवणे.

आपले सुमित आणि दिव्या हेदेखील त्यापैकीच. आपल्या कोणत्यातरी मित्राने अचानक डबल पॅकेजची नोकरी मिळाली हे सांगितल्यावर मार्केटमध्ये आलेले..
ऑफर हॉपिंग करत ते १२ लाखावरून ३० लाखापर्यंत पोहोचले.. स्किल सेट? तोच. स्किल लेव्हल? तीच. पॅकेज? अडीच पट!!

आणि मग रांगच लागली. या रांगेत हौशे, नवसे, गवसे सगळेच होते. लोक काहीही पॅकेज मागत होते आणि HR खालमानेने मान्य करत होते. त्या काळात विनोदाने असे म्हटले जात असे की 'बहुतेक आता भारतातले पगार बघता भारतातल्या स्टार्टअप बे एरियामध्ये काम आउटसोर्स करायला सुरुवात करणार आहेत.'

हे झाले भारतात. परदेशातही साधारण हेच चालू होते, पण अमेरिकेसारख्या देशात याच कारणाव्यतिरक्त अन्य काही गोष्टीदेखील होत्या, त्यातील एक म्हणजे फेडने ओतलेला पैसे आणि दुसरे म्हणजे मिनिमम वेज. २०१६/१७पासून काही राज्यात मिनिमम वेज वाढत होते, आणि त्याचा परिणाम हळूहळू महागाईवर होत होता. बऱ्याच लोकांना आता जुना पगार पुरात नव्हता, पण नोकरी बदलायच्या वेळेसच नेमका कोरोना आला आणि ते प्लॅन एक वर्ष पुढे गेला.

साधारण ५/१० टक्के वाढलेल्या संधी, कोरोनामध्ये potantial लक्षात आलेल्या सेक्टरमधल्या नवीन स्टार्टअप आणि दोन वर्षे कंटाळलेले साधारण ३० टक्के कर्मचारी यांच्या मिश्रणातून एक अभूतपूर्व रसायन जन्माला आले, ज्याचे नाव होते The Great Resignation अर्थात महासंधी!!

महासंधीची पावले -
जेव्हा आपल्या सहकार्‍यांना दुप्पट पगाराची नोकरी मिळते हे दिसले, तेव्हा वर्षानुवर्षे जे एकाच कंपनीत काम करत होते ते पण संभ्रमित झाले. यातील काही लोक तर अत्यंत हुशार होते. त्यांनी दोन-तीन महिन्यांची नोटिस लक्षात घेऊन ऑफर न घेताच राजीनामा दिला, कारण मार्केट हे अर्ली जॉइनर्सचे होते. एखाद्याला ऑफर देऊन दोन महिने अडकवून ठेवणे जवळजवळ अशक्य होते. इथे माझे काही अनुभव सांगतो, म्हणजे थोडा अंदाज येईल.. योगायोगाने मी त्याच काळात एका कंपनीची संपूर्णपणे नवीन शाखा सुरू करत होतो, त्यामूळे मी या महासंधीच्या दुसऱ्या बाजूला होतो.

साधारण एप्रिल २०२१मध्ये आम्ही माणसे शोधायला सुरुवात केली. पहिले दोन महिने साधारण चांगले प्रोफाइल दिसत होते, लोक सेन्सिबल वाटत होते. जी प्रत्यक्षात दुसरी लाट होती.
पहिली लाट Q1 २०२१मध्ये झाली, ज्यात मोजक्या लोकांनी स्विच केले. दुसरी लाट, ज्यामध्ये हा सगळा quality crowd बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, त्यातदेखील चांगले लोक मिळत होते.

जुलै २०२१मध्ये तिसरी लाट आली आणि सगळे बदलले
एक तर एव्हाना बऱ्याच कंपन्यांचे पहिल्या-दुसऱ्या लाटेत कर्मचारी सोडून गेले होते, बऱ्याच कंपन्यांचे घेतलेले कर्मचारीही अन्य कंपन्यांनी पळवले होते आणि त्यामुळे कंपन्यांमध्ये बऱ्याच रिक्त जागा तयार झाल्या होत्या.
त्यातच अनेक स्टार्टअप त्यांना मिळालेल्या गुंतवणुकीमुळे अक्षरशः मागेल त्या पगारावर लोक घेत होत्या, कारण त्यांच्यासाठी टाइम टू मार्केट हा खूप संवेदनशील विषय होता.

कोरोनामध्ये एड टेकमध्ये भारतात तुफान गुंतवणूक आली. व्हाइट हॅटचे प्रसिद्ध ३०० मिलियनचे डील बऱ्याच लोकांना माहीतदेखील असेल. बायजूने चालवलेल्या अधिग्रहण साखळीच्या मागे हाच मार्केट फोर्स आणि मोनोपॉलीचा भाग होता, अर्थात तोच त्याच्या पतनाला कारणीभूत होणार आहे, असेदेखील म्हटले जाते.

बायजूसारख्या कंपन्यांनी पालकांना चक्क स्वप्ने विकली, त्या स्वप्नांचे भविष्य काय, आपला कर्मचारी वर्ग तितका प्रशिक्षित आहे का यांच्याकडे मात्र फारसे लक्ष दिले नाही. विशेषतः हाती असलेल्या अमाप पैशाच्या जोरावर बाजारमूल्य वाढवायचा खेळ खेळला. परंतु असे खेळ अंतिमतः उलटतात, असे आत्तापर्यंत तरी दिसले आहे.
बायजूच्या बाबतीतही असेच काहीतरी होईल असे वाटत आहे.

असो, तर साधारण २०२१च्या जुलै-ऑगस्टमध्ये एकंदरीतच सगळ्या HR विश्वात हे काहीतरी वेगळे चालू आहे अशी चर्चा सुरू झाली. मे महिन्यात पहिल्यांदा ग्रेट रेसिग्नेशन हा शब्द वापरला गेला, लंडन बिझिनेस स्कूलच्या अँथनी क्लॉझ यांनी याला ग्रेट रेसिग्नेशन, ज्याला मी मराठीत महासंधी म्हणतो अशी संभावना केली आणि जून-जुलैपर्यंत हे लोण जगभर पसरले.

साधारणपणे जून ते डिसेंबर या कालावधीत इतका तुटवडा होता की सुमित आणि दिव्यासारखे सामान्य कर्मचारीदेखील अव्वाच्या सव्वा पॅकेज घेऊन जात होते. इन्फोसिससारख्या कंपनीचे ३० टक्के लोक नोकरी सोडून गेले, असे अधिकृत वृत्त सांगते.

याचे परिणाम काय झाले?
१. सर्वात सरळ समोर दिसणारा परिणाम म्हणजे कंपन्यांचा पगारावर होणारा खर्च खूप वाढला. कोरोना संपला, तेव्हा डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशनला येणारी मागणी लक्षात घेऊन २०२१मध्ये IT कंपन्यांचे शेअर्स उच्च पातळीवर होते. जसेजसे २०२१ संपत गेले, तसेतसे हा वाढलेला खर्च बॅलन्स शीटवर दिसू लागला आणि २०२१च्या शेवटच्या तिमाहीचे निकाल आल्यावर ITने खालची दिशा धरली, विप्रोसारखा शेअर एका महिन्यात जवळजवळ २० टक्के पडला. तेव्हाच पुढचे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले होते.
२. याचा सहज न दिसणारा दुसरा परिणाम होता मूनलायटिंग. मूनलायटिंग म्हणजे रात्रीच्या वेळेत अधिक कोणतेतरी काम करणे. याबद्दल मी अधिक लिहीत नाही, पण जर तुम्ही नोकरीत असाल तर तुमची निष्ठा त्या कंपनीकडे असते आणि कामाव्यतिरिक्त इतर तास तुम्हाला विसावा घेण्यासाठी दिलेले असतात, जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्ही उत्साहाने काम करू शकाल. मूनलाईटिंगचा थेट परिणाम तुमच्या उत्पादकतेवर होतो. त्यामुळे कंपन्यांना नुकसानदेखील होत असेलच, त्यामुळे तो विषय नंतर ऐरणीवर आला.

एकंदरीतच जास्त पैसे खर्च करूनसुद्धा अपेक्षित परिणाम मिळत नाहीयेत, अशा निष्कर्षावर येईपर्यंत २०२२ची पहिली तिमाही उजाडली.

ट्रिगर पॉइंट
२०२२च्या फेब्रुवारीमध्ये युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाले आणि जगभर महागाईची पहिली लाट आली. म्हणजे पहिले महागाई वाढतच होती, अमेरिकेसारख्या देशात महागाई दर जवळजवळ ८ टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मंदीचे संकेत दिसायला लागले. जागतिक बाजारदेखील पडले, बऱ्याच कंपन्यांनी नोकरभरती आवरती घ्यायला सुरुवात केली.

त्यातच मंदीच्या भीतीने बऱ्याच VCनी मार्केटमध्ये ओतलेला पैसा आवरता घ्यायला सुरुवात केली आणि इथेच मंदीचे पहिले पाऊल पडले.

कोरोनामध्ये एड टेक क्षेत्रात असलेली स्पर्धा, अधिग्रहण करण्यासाठी ओतलेला पैसा आणि अनलॉक झाल्यावर उघडलेले सगळे व्यवहार हे पाहता, मंदीचा पहिला फटका त्यांनाच बसणार हे अपेक्षित होते.

एप्रिल २०२२मध्ये layoffची पहिली बातमी आली, तेव्हा आम्ही तरी जोमाने नवीन भरती करत होतो. पण ती बातमी ऐकल्यावर ही लाट ओसरायला लागली आहे याची मात्र खातरीने जाणीव झाली. जून २०२२पर्यंत बहुतेक कंपन्यांनी नोकरभरती आवरती घेतलीच. सगळीकडून hiring freezeच्या बातम्या येऊ लागल्या.

मी स्वतः याच काळात नवीन नोकरभरती करत होतो. २०२१मध्ये hiringला सुरुवात केली, २०२२पर्यंत मला एकही एजन्सीने कंत्राटी कर्मचारी देण्यासाठी संपर्क केला नव्हता. मार्च २०२२नंतर मला हळूहळू एजन्सी अ‍ॅप्रोच होऊ लागल्या, त्या सगळ्या माझ्या जुन्या पोस्ट वाचून मला कंत्राटी कामगार हवे आहेत का असे विचारणाऱ्या होत्या. हे सर्व लोक मे २०२१ ते मार्च २०२२पर्यंत शांत होते, कारण त्यांच्याकडेदेखील पुरावठ्यापेक्षा मागणी जास्त होती.
एप्रिल २०२२पर्यंत आमची ऑफर सोडून दुसरीकडे जाणारे काही लोक जून-जुलैनंतर कपातीच्या भीतीने पुन्हा आमच्याशी संपर्कदेखील साधू लागले. अर्थात आमच्याकडूनदेखील वेळ निघून गेली होती, तो भाग वेगळा.

आणि नोकरकपात
युक्रेन युद्धानंतर VCनी पैसा आखडता घेतला, तेव्हा प्रत्यक्ष पैसे वाचवायला सुरुवात जरी झाली, तरी त्याचे दृश्य परिणाम समोर यायला जून उजाडला. जूनमध्ये Unacademyची पहिली बातमी आली. Unacademy ही बंगळुरूची आघाडीची एड टेक कंपनी होती.
अर्थात ही काही पहिली बातमी नव्हती, पण या कंपनीत जवळजवळ ६०० layoff झाले आणि त्यामुळे ही कंपनी चर्चेत आली. याबरोबर व्हाइट हॅट, मीशो यासारख्या कंपन्यांनीदेखील कपात केली. बेटर डॉट कॉमची तर खूप मोठी बातमी झाली होती.
साधारणपणे आतापर्यंत वेगवेगळ्या स्टार्टअप्सनी मिळून १२००० कर्मचारी कमी केले आहेत. हा तसा खूप मोठा आकडा आहे, विशेषतः जेव्हा स्टार्टअपना तितके फंडिंग मिळत नाहीये तेव्हा. एड टेक आणि ईकॉमर्स चे यात मोठे योगदान आहे, कारण हळूहळू पुन्हा वर्गात जाऊन शिकणे आणि दुकानात जाऊन खरेदी पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे.

पुढे काय?
यात माझ्या मते दोन शक्यता आहेत..

एक शक्यता अशी आहे की या वाढलेल्या किमती रुपयाचे अवमूल्यन करून भरून काढल्या जातील, अगदी १०० टक्के नाही, पण एखादा जॉब २००००$ वरून ४००००$वर गेला असेल, तर तो किमान ३००००पर्यंत येईल इतपत काहीतरी केले जाईल.. आणि हे सरकार नव्हे, तर बहुतांशी मार्केटच करेल, म्हणजे महागाई वाढणे वगैरे या माध्यमातून. त्याची चिन्हे आत्ताच दिसायला लागली आहेत.
दुसरी शक्यता अशी दिसते की भविष्यात मंदी जर अशीच वाढत गेली, तर हळूहळू सगळ्याच कंपन्या या कपातीमध्ये सामील होतील. २००६-७मध्ये जशा अमेरिकेत घरांच्या किमती फुगलेल्या होत्या, तसेच सध्या इथे कामगारांचे पगार आहेत. जर उद्या काही प्रमाणात skilled labour स्वस्तात मिळायला लागला, तर भारतात नोकऱ्यांच्या सब प्राइम येईल का?

Gaps या नेहमीच भरल्या जातात हा मार्केटचा नियम आहे. ही गॅप कशी भरली जाईल हे सध्यातरी अस्पष्टच आहे, या नोटवरच मी हा लेख थांबवतो.
हे सगळे सुमित आणि दिव्या त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होवोत, अशी नवीन वर्षात देवाचरणी प्रार्थना करतो.

प्रतिक्रिया

आपण सध्याच्या बाजाराचे उत्कृष्ट मूल्यमापन केले आहे.
शेवटी आपण जे सांगितले आहे की
एक शक्यता अशी आहे की या वाढलेल्या किमती रुपयाचे अवमूल्यन करून भरून काढल्या जातील, अगदी १०० टक्के नाही, पण एखादा जॉब २००००$ वरून ४००००$वर गेला असेल, तर तो किमान ३००००पर्यंत येईल इतपत काहीतरी केले जाईल.. आणि हे सरकार नव्हे, तर बहुतांशी मार्केटच करेल, म्हणजे महागाई वाढणे वगैरे या माध्यमातून. त्याची चिन्हे आत्ताच दिसायला लागली आहेत.
दुसरी शक्यता अशी दिसते की भविष्यात मंदी जर अशीच वाढत गेली, तर हळूहळू सगळ्याच कंपन्या या कपातीमध्ये सामील होतील. २००६-७मध्ये जशा अमेरिकेत घरांच्या किमती फुगलेल्या होत्या, तसेच सध्या इथे कामगारांचे पगार आहेत. जर उद्या काही प्रमाणात skilled labour स्वस्तात मिळायला लागला, तर भारतात नोकऱ्यांच्या सब प्राइम येईल का?

या नोट वर मला थोडेसे भाष्य करायला आवडेल. अर्थात आपले या क्षेत्रात असलेले ज्ञान आणि अनुभव माझ्याकडे नसेल कदाचित. पण ही सर्व अवस्था अनुभवणारा पण याच चक्रातला एक भाग म्हणून मला काही बाबींवर बोलावेसे वाटते आहे.

१. रुपयाचे अवमूल्यन - ही गोष्ट केवळ सरकार आणि सरकारच करु शकते. बाजारात ती शक्ती नाही. आणि सरकार ते करेन अशी मला कोणतीही आशा वाटत नाही. कारण देश चालवण्यापेक्षा सध्या सत्ता टिकवण्याकडे राजकारण्यांचा भर आहे.
२. वाढत्या महागाईचा बुडबुडा एक दिवस फुटणारच आहे. कारण लोकांकडे उत्पन्नच कमी असेल तर वाढत्या महागाईच्या भावाने वस्तू विकत घेणे परवडणार नाही.
३. केवळ महागाई वाढवल्यामुळे रुपयाचे अवमूल्यन होणे अवघड आहे. या अनुषंगाने अधिक विचार कमेंट च्या शेवटी मांडतो.
दुसर्‍या शक्यते बद्दल:
१. स्किल्ड लेबर स्वस्तात मिळणे: हे जर झाले तर न भूतो न भविष्यति असे महासंकट देशापुढे उभे राहीन असे माझे स्पष्ट मत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपली लोकसंख्या.
२. परिणामी नोकरीपेशा लोकांचे आधीच कमी झालेले उत्पन्न अजुन कमी होईल. उत्पन्न अनुषंगाने माझे विचार खाली मांडतो आहेच.

करोना महामारी मध्ये नोकर्या जाण्याचे प्रमाण जेवढे वेगवान होते , जेवढे ले ओफ्स झाले तेवढ्या वेगाने नोकर्‍या परिस्थिति सुधारल्यावर मिळाल्या नाहित ही वस्तुस्थिति आहे. दुप्पट तिप्पट पगाराच्या नोकर्‍या केवळ एका विशिष्ट वर्गालाच मिळाल्या. अधिक अनुभव असलेल्या कुशल कर्मचार्‍यांपुढे या महामारीचा फायदा घेऊन कंपन्यांनी दोनच पर्याय ठेवले होते. राजीनामा देऊन मिळतील ते पैसे घेऊन घरी बसा. किंवा ५० - ६० % एवढ्या कमी पगारात काम करा.
या वाचवलेल्या पैशांचा उपयोग या कंपन्यांनी २ वर्षे ते ६ वर्षे एवढाच अनुभव असलेले मनुष्यबळ (त्यांना कुशल मानुन) अधिक संख्येने बाजारातून रिक्रूट केले.
यामुळे काही समस्या उद्भवल्या आहेतः
१. अधिक अनुभव असलेल्या ३५+ वयोगटातील कुशल कर्मचार्यांना नवीन नोकरी मिळण्यासाठी ४ महिने ते १ वर्ष एवढा मोठा काळ विना उत्पन्नाचा बघावा लागला. शिवाय आधी पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सॅलरी वर नव्या ठीकाणी नोकरी करावी लागत आहे.
२. आपल्यापेक्षा कमी अनुभव आणि कमी कुशलता असलेल्या कर्मचार्‍यांना तेवढाच पगार बघून एक असुरक्षिततेची भावना या गटात निर्माण झाली आहे.
३. बाजारात वाढलेल्या वारेमाप महागाई मुळे लोकांनी पैसे वापरुन वस्तू जरी खरेदी केलेल्या असल्या तरी ते पैसे एक तर सेव्हिंग्स मोडून खरेदी केल्या आहेत. किंवा कर्ज घेऊन तरी. यामुळे बाजाराची गरज भागली तरी ही तात्कालिक आहे. हे पैसे संपल्यावर बाजाराला ओहोटी लागणे निश्चित आहे. परिणामी अधिक भयानक पद्धतिने ले ऑफ्स होण्याची शक्यता आहे. या करोना भीती मुळे ज्यांचे पगार वाढले आहेत त्यांच्यावर त्या मोबदल्या इतके काम करण्याचे दाबून प्रेशर आल्यामुळे आज ना उद्या या नव्या नोकरीतून हा वर्ग एक वेळ कमी पगार मिळाला तरी चालेल पण हा ताण नको या भावनेने स्वता:ची सुटका करुन घेणारच आहे.

या आणि अशा शेकडो समस्या आहेत ज्यांची उत्तरे केवळ सरकार चालवणार्‍या लोकांनाच शोधायची आहेत.
मागे आर्थिक मंदीच्या काळात चीनने (एकाधिकार शाही असल्याने) आणि जपान ने देखील ( किमान हमी उत्पन्न वाढवून आणि जनतेला झळ बसणार नाही या धोरणाने) स्वतःच्या करन्सी चे अवमूल्यन करवून घेतले होते.

२००८ साली आलेल्या जागतिक आर्थिक त्सुनामी मधून भारताची अर्थव्यवस्था वाचवण्याचे महत्वाचे ऐतिहासिक काम रुपयाचे अवमूल्यन न करता देखील तत्कालीन अर्थतज्ञ पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी करुन दाखवले होते.
आजची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाहिये असे मला वाटते. सध्याच्या सरकार मध्ये तेवढे तज्ञ लोक नाहियेत. ही एक कमकुवत बाजू आहेच. पण मुळात या सरकार कडे भविष्य काळात या आर्थिक अराजकामुळे दीर्घकालीन आणि कायमचे होणारे नुकसान ओळखण्याची क्षमता आहे की नाही. हा खरा महत्वाचा मुद्दा आहे.
मला आशा आहे की राजकीय हेतू साध्य करताना सरकार चालवणारे लोक देशाच्या नागरिकांना या येऊ घातलेल्या भयानक आर्थिक अरिष्टाच्या झळा बसू देणार नाहीत. पण ते या कसोटीवर खरे उतरु शकले नाहीत तर इतक्या वर्षांत जे आपण सर्वांनी कष्टाने कमावले आहे ते मातीमोल होण्याच्या दिशेने ही पाऊले जाताना दिसतील. त्यात उद्योग, नोकरदार वर्ग असे सर्वच भरडले जातील. रुपयाचे अवमूल्यन जे होत आहे ते याच दिशेने आपल्या देशाची वाटचाल होत असल्याचे संकेत मात्र नक्कीच देत आहेत. पण ही वेळ येणार नाही अशी आशा करुयात. आपल्या देशात अनेक हुशार लोक आहेत. कोणी ना कोणी मार्ग काढेनच.

प्रतिसादातल्या आशयाशी सहमत आहे.
परंतु मला वैयक्तिकरित्या यामध्ये कोणत्याही राजकीय किंवा सरकारी धोरणाला आणणे योग्य वाटत नाही.
सरकारने केवळ बाजाराला आपले काम करू द्यावे इतकेच सरकारचे धोरण असले पाहिजे असे माणणाऱ्यांपैकी मी आहे.

सरकारकडून समान संधी आणि सीमा सुरक्षा आणि अंतर्गत कायदा सुव्यवस्था या गोष्टी मिळाल्या तर भारतीय समाज आपली प्रगती आपण स्वतःच करेल असे मला वाटते, त्यामुळे यातील बऱ्याच गोष्टींना मी पास देतो.

बाकी वेतनाच्या बाबतीत आपण जे बोललात त्याच्याशी सहमत आहे. मला स्वतःला देखील काही प्रमाणात हा कॉम्प्लेक्स आहेच. मी कमी वेतनावर काम करत नाही, पण आजची पिढी जे सरळ सरळ मागते तसे मागायला अजूनही आमची जीभ धजावत नाही हा प्रॉब्लेम आहेच..

सागर's picture

10 Nov 2022 - 4:54 pm | सागर

आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे.
भारतात सध्या तरी सरकार अनेक क्षेत्रात थेट हस्तक्षेप करते आहे. हे चित्र हळू हळू बदलेल अशी आशा आहे.

सुखी's picture

7 Nov 2022 - 10:04 pm | सुखी

Mahiripurvak लेख अन् प्रतिसाद

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 10:48 pm | मुक्त विहारि

करोनाच्या आधीचा काळ ते सध्याच्या परिस्थितीचे योग्य विश्लेषण ...

महागाई आणि मंदी, जगभरच वाढत आहे.

श्वेता व्यास's picture

8 Nov 2022 - 4:29 pm | श्वेता व्यास

विश्लेषण आवडले, माहितीत भर पडली, धन्यवाद.

परिंदा's picture

10 Nov 2022 - 8:55 am | परिंदा

खुप दिवसांनीअसं काही वाचायला मिळाले.
मी स्वतः आयटी क्षेत्रात काम करतोय. माझे एक निरीक्षण असे आहे की जे टेक लीड आहेत, ३५+ वयाचे आहेत, एकाच कंपनीत १०-१५+ वर्षे नोकरी करत आहेत, त्यांच्यावर अपरिपक्व (५-६ वर्षे अनुभव पण तेवढे स्किल नसलेल्या) टीम मेंबरर्सना सांभाळणुन घ्यायचा आणि आपले काम पुर्ण करण्याचा प्रचंड ताण आला आहे. त्यात कंपन्यांनी काही विशेष पगार वाढ दिलेली नाही त्यात नवीन आलेल्या अपरिपक्व पण तगडे पॅकेज असलेल्या लोकांना सांभाळा याला कंटाळून कामाच्या बाबतीत बॅक फुटवर जायला सुरुवात केलीय. त्यामुळे नवीन लोकांची (ज्यांना अनुभव आणि स्किल्स दोन्ही नसल्याने ) चांगलीच दमछाक होत आहे.
हे लोक आता लवकरच दुसरीकडे नोकरी पाहतील (भले कमी पगाराची का असेना) किंवा क्लाएंटकडुन तक्रार झाल्यामुळे नोकरीवरुन काढली जातील असा कयास आहे.

सुबोध खरे's picture

10 Nov 2022 - 11:46 am | सुबोध खरे

अभ्यासपूर्ण लेख

मधल्या काळात जेमतेम अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांना यात केवळ आय टी नव्हे तर इतरही क्षेत्रात दुप्पट तिप्पट पगाराच्या नोकऱ्या मिळायला लागल्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगातून कर्मचारी मोठ्या उद्योगात गेले. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगात फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली.

उदा. नुकताच बी टेक होऊन बाहेर पडलेला विद्युत अभियंता ३-४ लाख पगार घेत होता. त्याचा पगार तीन वर्षात वाढत वाढत ५ लाखापर्यंत गेला होता. त्यांना एकदम ८-१० लाखाच्या नोकऱ्या मिळाल्यावर हे लोक भराभर सोडून गेले. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगात व्यवस्थापकीय कर्मचारी आणि थेट कामगार मधले पर्यवेक्षक/ अभियंते नाहीच हि स्थिती निर्माण झालेली आहे. लघु आणि मध्यम उद्योगाना एकदम ८-१० लाख रुपये देणे परवडत नव्हते कारण करोनात ठप्प झालेले त्यांचे उत्पादन अजून मार्गी लागलेले नव्हते.

त्यातून या उद्योगांनी अशा अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आपले बहुमूल्य वेळ आणि पैसे खर्च केलेला असल्याने आता परत अशा लोकांना घेण्यास ते सहसा तयार नाहीत.

यामुळे मुनलाईटिंग करणारे लोक किंवा नोकरीतून डच्चू मिळालेले लोक आता ८-१० लाखावरून ६-८ लाखावर यायला तयार असले तरी लघु आणि मध्यम उद्योग आता त्यांना घ्यायला तयार नाहीत.

यापेक्षा हुशार कामगाराला पगार वाढवून कामावर तयार करणे त्यांना जास्त श्रेयस्कर वाटते आहे. हे कामगार त्यांचे विशिष्ट क्षेत्रातच कौशलय असल्याने सहजासहजी बाहेर जाऊ शकत नाहीत शिवाय मागे पदवी नसल्याने बाजारात सहजासहजी तेवढे पगार मिळत नाहीत.

याशिवाय नवीन अभियंत्यांना ३ लाखाचा पगार चार लाख करण्यास सुद्धा लघु आणि मध्यम उद्योग तयार नाहीत.

त्यातील एका हुशार सिंधी उद्योजकाने पगार तीन लाख आणि बोनस दोन लाख अशी शक्कल काढली. यामुळे नोकरी सोडून जाताना अभियंत्यांचा मूळ पगार तीन वर्षांनी सुद्धा चार लाखच दिसतो. भले त्याला बोनस तीन चार लाख दिलेला असो.

अर्थात हुशार अभियंते तरीही सोडून जातातच.

एकंदर नोकरी करणाऱ्यांचे दिवस जाऊन नोकरी देणार्यांचे दिवस परत येत आहेत असे दिसते.

आनन्दा's picture

11 Nov 2022 - 6:43 am | आनन्दा

हो बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, आम्ही पण त्यातच मोडतो..
याउपर अजून एक गंमत आहे, बऱ्याच कंपन्यांनी कर्मचारी सोडून जातील या भीतीने आगाऊ नोकरभरती केली, परंतु सोबत स्थानिक कर्मचारी वर्गाचे पगारही वाढवले.
त्यामुळे अशी स्थिती आली की होते ते सोडत नाहीयेत आणि नवीन नोकरभरती आज सरप्लस झाली आहे.
त्या कंपन्या या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतात हे बघणे देखील रोचक ठरणार आहे.

सुबोध खरे's picture

11 Nov 2022 - 11:12 am | सुबोध खरे

कंपन्यांना असे करणे फार कठीण नसते.

आय सी आय सी आय बँकेला आपली नोकर कपात करायची होती शिवाय त्यांचे इतर खर्च कमी करायचे होते.

तेंव्हा त्यांनी मुंबईतील कार्यालय (बॅक ऑफिस) हैदराबाद ला हलवले. नरिमन पॉईंट वरील कार्यालयाचे भाडे २ कोटी रुपये होते. त्याच्या पेक्षा दीड पट जागा हैद्राबाद मध्ये ३० लाख रुपये भाड्याने मिळाली.

नको असलेले कर्मचारी काढण्या ऐवजी त्यांना हैद्राबादला बदली दिली विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना. त्यांचे नवरे मुंबईत व्यवसाय/नोकरीत असल्याने त्यांना एकट्यानं हैदराबाद मध्ये जाणे कठीण होते. यामुळे बर्याच कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला.

बदली ही नोकरीतील मूलभूत अट असल्याने न्यायालयात ती टिकणारी नसतेच.

जेवढे कर्मचारी उत्तम होते त्यांना मुंबईतच बदल्या दिल्या. यामुळे अतिरिक्त आणि निकामी लोकांना डच्चू देता आला तो सुद्धा कुणालाही न दुखावता.

उद्या एखाद्या कंपनीला आपले पुण्यातील कर्मचारी कमी करायचे असतील तर त्यांनी अशा लोकांची भुबनेश्वरला बदली केल्यास बरेचसें कर्मचारी सोडूनच जातील कारण अशा ठिकाणी बस्तान बसवणे जास्त कठीण होते विशेषतः स्त्रियांना.

मुलांचा शाळा घर गॅस पासून सर्व गोष्टी बदलायच्या शिवाय दोन घरे चालवायची याचा खर्च डोक्यावर बसतो.

शिवाय येण्याजाण्यात बऱ्याचशा सुट्या आणि पैसा फुकट जातो.

ते तितकेही सोपे नाही, कारण कंपनीचे नाव खराब होते.
पण कंपन्या असे करतात.
2013 मध्ये एक कंपनीला भारतातला कर्मचारी वर्ग कमी करायचा होता.
कंपनीने 3 वर्षे पगरवाढच दिली नाही. 40 टक्के लोक कंपनी सोडून गेले. आणि 40टक्के म्हणजे जवळजवळ 50000 इतका आकडा होता, पण या कानाचे त्या कानाला कळले नाही.

तुषार काळभोर's picture

11 Nov 2022 - 5:24 pm | तुषार काळभोर

खूप दिवसांनी असा सद्यकालीन नोकऱ्यांच्या स्थितीवरील विश्लेषणात्मक लेख वाचायला मिळाला.
उत्पादन क्षेत्रातील माझी काही निरीक्षणे..
मी काम करत असलेल्या ठिकाणी साधारण वीस विभागप्रमुख, वीस वरिष्ठ व्यवस्थापक, पन्नास वरिष्ठ अभियंते, शंभर ०-३ वर्षे अनुभव असलेले अभियंते+पर्यवेक्षक, दीडशे कायम कामगार आणि साधारण सहाशे कंत्राटी कामगार असं स्वरूप आहे. कंपनी Autocomponent manufacturing मध्ये आहे.

२०२० मध्ये २२ मार्च ते १० मे उत्पादन बंद होतं. केवळ १०% कपात करून (कंत्राटी सोडून इतरांचा) पगार चालू होता. त्यावर्षी वार्षिक पगारवाढ झालीच नाही. मार्च ते ऑक्टोबर १०% पगारकपात होती. सप्टेंबरपासून अचानक वाहन निर्मिती कंपन्यांकडून अभूतपूर्व मागणी वाढली. कोरोनापूर्व काळापेक्षा २०% अधिक विक्री सप्टेंबरपासून होऊ लागली. मात्र काळ अनिश्चिततेचा असल्याने २०२१ ची वेतनवाढ लांबली. लोकांना दिसत होते की कंपनीची विक्री वाढलीय, आजूबाजूला इतर परिचित, इतर कंपन्यांतील लोक धडाधड नोकऱ्या सोडताहेत आणि ५०-१००% पगारवाढ घेऊन दुसरीकडे जाताहेत. पण आमच्या इथे २०१९ चाच पगार चालू असल्याने त्या कमी आकड्यावर स्विच करणे खूप जण टाळत होते. सप्टेंबर २०२१ मध्ये शेवटी पगारवाढीची पत्रे मिळाली आणि धरण फुटल्यासारखे लोक बाहेर पडले. सरासरी दरमहा दोन तीन जणांचे येणेजाणे सामान्य होते, पण सप्टेंबर २०२१ ते एप्रिल २०२२, सरासरी ८-१० जण दरमहा बाहेर जर होते आणि येण्याचे प्रमाण कमी होते, कारण येणाऱ्यांची अपेक्षा खूप जास्त होती.
विशेषतः २-५ वर्षे अनुभव असलेल्या अभियंत्यांनी या ६-८ महिन्यात दोन नोकऱ्या बदलून पगार दुप्पट ते अडीचपट करून घेतले.

मागील दोन महिन्यात इनकमिंग परत सुरू झालंय. आधी इतक्या अग्रेसिवली नोकरभरती होत नाही, त्यामुळे वाढलेल्या पगाराची सूज कमी होतेय हळूहळू. जे पगार वाढवून आलेत किंवा थांबले आहेत, त्यांच्यावर आता तो पगार जस्टिफाय होण्याइतकं प्रेशर आहे.

सुरुवात आयटी ने केली आहे, पण लोण सगळीकडेच पसरणार आहे.
सध्या मेंदूची किंमत खूप वाढली आहे. साधारणपणे सगळीकडे 50टक्के महागाई वाढली की हे स्थिरावेल असे वाटते.

इतका मोठा लेख आधी पूर्णपणे वाचून मग त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या साऱ्यांचे आभार!

टर्मीनेटर's picture

12 Nov 2022 - 12:46 pm | टर्मीनेटर

प्रतिसाद क्रमांक १ : पोच.
अभ्यासपूर्ण लेख आणि त्यावरचे प्रतिसादही आवडले. दोन्हीतून 'एम्प्लॉईज'च्या बाजूची परिस्थिती व्यवस्थित विशद केली आहे.
एक 'एम्प्लॉयर' म्हणून ह्या घटनाक्रमाकडे बघताना अनुभवलेल्या / जाणवलेलया काही गोष्टी आणि निरीक्षणे नमूद करणारा दुसरा (दिर्घ 😀) प्रतिसाद लवकरच लिहितो, तूर्तास हि फक्त पोच आहे!

फार छान मुद्देसूद लेख आवडला.

आत्ता हे सगळं चालू असतानाच ट्विटर आणि मेटाच्या कर्माचरी कपातीचि बातमी येत आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Nov 2022 - 5:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी स्वतः आय टी क्षेत्रात असल्याने (आणि दोन्ही बाजुला असल्याने :) म्हणजे नोकरी शोधणे आणि देणे) काही मुद्दे मांडतो
१. २०१९ पर्यंत माझ्या प्रोजेक्ट्मधील चांगले टेक्निकल लोक (म्हणजे २-३ वर्षे टिकलेले आणि ५-९ वर्षे अनुभव असलेले) प्रमोशन शिवायही तग धरुन होते. आम्ही त्यांना जमेल तसे बोनस वगैरे देउन आणि ऑफिसच्या पार्टी वगैरे मार्गाने खुश ठेवत होतो. २०२० ला करोना आल्याने वर्क फ्रॉम होम सुरु झाले, आणि एकुणच भितीच्या वातावरणात लोक आहे त्या नोकर्‍या टिकवण्याकडे लागले. त्या वर्षी पगारवाढही फार झाली नाही, पण बरेच लोक आपापल्या मूळ गावी परतले त्यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी झाली आणि बचत वाढली. शिवाय प्रवासाचा वेळ्,खर्च वाचला. कुटूंबाला वेळ देता येउ लागला त्यामुळे आलबेल चालले होते.
२. २०२१ च्या सुरुवातीला कोविड्ची भिती कमी झाली आणि मार्केट एकदम ओपन झाले, सगळ्या कंपन्या सक्रिय झाल्या आणि भरती चालु झाली. आमची कंपनीही तोंडाला येइल तो पगार देउन लोकांना टिकवुन ठेवु लागली. मग लोक दुसर्‍या कंपनीची ऑफर घेउन राजीनामा देऊ लागले. त्यांना काऊंटर ऑफर म्हणुन काही जणांना तर ७०-८० टक्के पगारवाढ दिली किवा मग प्रमोशन केले. काही लोक प्रमोशन्/पगारवाढीची वाट बघुन ते घेउन मग त्यावर अजुन मोठी ऑफर घेउन सोडुन गेले. काही लोक २-३ ऑफर घेउन जो सगळ्यात जास्त पगार देइल तिकडे गेले.
३. २०२२ च्या सुरुवातीला युक्रेन युद्ध सुरु झाले आणि हळुहळु ओहोटी लागली. हे वर्ष आहे ती नोकरी टिकवण्याचे आणि वाढलेला पगार जस्टिफाय करण्याचे आहे. सगळीकडे कॉस्ट प्रेशर आहे .पिरॅमिड रेफ्रेश, ऑटोमेशन,फ्रेशर लोक घेण्याची सक्ती मिळेल त्या मार्गाने ऑपरेटिंग कॉस्ट कमी करायचे टार्गेट आहे. शेवटचा उपाय म्हणजे ट्विटर्,अमेझॉन सारखी कर्मचारी कपात (जे अजुनही दृष्टीपथात नाहीये --देवाची कृपा)

२००१, २००९ आणि २०२० अशी मंदीची ३ चक्र बघितली. पण कदाचित ज्युनियर लेव्हलला ती तेव्हढी जाणवली नव्हती जी आता जाणवतेय. लवकरच ही परिस्थिती सुधारो आणि आनंदी आनंद होवो हीच सदिच्छा!!

आनन्दा's picture

18 Nov 2022 - 5:50 pm | आनन्दा

2001 ला माझे काही सिनियर ज्युनिअर लेव्हल ला जॉब बघत होते, त्यांचे बेकार हाल झाले होते.
2008 ला फक्त जॉइनिंग पुढे ढकलली होती.
2019 ला मी प्रत्यक्ष मंदी अशी बघितली नव्हती, ते बहुधा अजून 2 वर्षांनी दिसेल..

जेव्हा सगळे लोक मंदी मंदी ओरडत असतात तेव्हा मंदी येत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
मंदी नेहमी चोर पावलांनी येते आणि जाते.