दिवाळी अंक २०२२ - तिचा चहा

Primary tabs

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 2:24 pm

माझं-तिचं एकमेकांवर निरतिशय प्रेम आहे. पण मी चहा-कॉफीच्या थेंबालाही स्पर्श करत नाही आणि तिचा मात्र चहा हा जणू दुसरा प्रियकर आहे!

या पार्श्वभूमीवर, सौमित्रच्या 'गारवा'च्या चालीवर सुचलेल्या या ओळी -

तिचा चहा

त्याला चहा आवडत नाही, तिला चहा आवडतो
सकाळी उठल्यावर मग तो तिच्या तावडीत सापडतो
मी तुला आवडते, पण चहा आवडत नाही
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.

चहा पिऊन तोंड भाजतं, होते छातीत जळजळ
चहा म्हणजे उबदारपणा, जाते मनाची मरगळ
चहाने भूक मरते, चहा वैतागवाडी
चहाने फ्रेश वाटतं, चालायला लागते गाडी
चहा म्हणजे रेंगाळलेली कामं, चहा म्हणजे फालतू उगाच...
चहाच्या कपात हरवून जा, एकदा पिऊन बघाच

रोज सकाळी चहा होतो, रोज सकाळी असं होतं
चहावरून बोलणं होऊन घरामध्ये हसं होतं
चहा आवडत नसला, तरी ती त्याला आवडते
चहासकट आवडावी ती, म्हणून तीही झगडते

हसून मग ती हरवून जाते मस्त चहाच्या कपात
त्याचं-तिचं बोलणं असं रोजच्या रामप्रहरात

- वामन देशमुख

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2022 - 12:33 pm | प्राची अश्विनी

वा!

कुमार१'s picture

7 Nov 2022 - 7:42 pm | कुमार१

फक्कड (चहा) आहे !

पॉइंट ब्लँक's picture

10 Nov 2022 - 12:49 pm | पॉइंट ब्लँक

चहासकट आवडावी ती, म्हणून तीही झगडते

हे खतरनाक आहे एकदम!!!

रंगीला रतन's picture

10 Nov 2022 - 3:47 pm | रंगीला रतन

सही है!!!
एकदा पिऊन बघाच
या वरुन हे आठवल- करोड्पती चहा एकदा पिऊन पहा :=) :=) :=)

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 5:45 pm | कर्नलतपस्वी

चहा आवडत नसलेली बायको

असे विडंबन होऊ शकते.