करोना माफिया: Dollo-650

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
4 Aug 2022 - 12:11 pm
गाभा: 

आपल्या देशात उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, करोंना झालेल्या रुग्णांना ताप उतरविण्यासाठी हेच औषध सर्व डॉक्टर लिहीत होते. सर्व रुग्णांना वाटत होते करोंनाचा ताप फक्त याच औषधाने उतरणार. करोंना काळात मेडिकल माफियाने परिस्थितीचा लाभ घेऊन देशातील जनतेला लुटण्याचे कार्य केले, ह्याच मताचा मी होतो. आता करोंना माफियचे पितळ हळू-हळू उघडू लागले आहे. तशी बातमी सर्वच वर्तमान पत्रांत होती तरी ही वाचकांसाठी एक लिंक.

Dollo-650 tablet maker earns Rs 1,000 crore gift to doctors only | Dolo 650 manufacturing company micro labs tax evasion as distributed gift of Rs 1000 crore to medical professionals and doctors
https://timesofahmedabad.blogspot.com/2022/07/dollo-650-tablet-maker-ear...

एक प्रश्न मनात येतो, 1000 कोटी गिफ्ट देणार्‍या कंपनीने किती पैसा कमविला असेल. यावरून हे ही कळते देशाच्या मेडिकल क्षेत्रात काम करणार्‍यांचे किती अधपतन झाले आहे. करोंना काळात सर्वात जास्त विकणारी , निरुपयोगी औषधी निर्मात्याने किती खर्च केले असतील?

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

4 Aug 2022 - 2:01 pm | कपिलमुनी

साहेबांना अलोपथीवाल्याबद्दल एवढी पोटदुखी का आहे देव जाणे ?
अशीच जिलेबी कोरोनील बद्दल कधी पाडायचे ?

विवेकपटाईत's picture

4 Aug 2022 - 9:57 pm | विवेकपटाईत

मी कधीच एलोपैथीचा कधीच विरोध केला नाही. औषधीची कुठलीही पैथि नसते. मी मेडिकल माफियांचा विरोध अवश्य केला आहे.फक्त पैसे कमविण्यासाठी करोना काळात ते लोकांच्या जीवाशी खेळले. बाकी आता अमेरिकन मेडिकल जर्नल ही आयुर्वेद आणि कोविड वर पुस्तक प्रकाशित करू लागले आहेत. जर्मनीतील मेडिकल जर्नल कोरोनिलला कवर पानावर स्थान देऊन चुकला आहे. हर्बल औषधी करोना विरुद्ध प्रभावकारी ठरल्या आहेत.
https://benthambooks.com/book/9789815051186/contributors/

सालदार's picture

5 Aug 2022 - 12:46 pm | सालदार

चुकलाच आहे

आता अमेरिकन मेडिकल जर्नल ही आयुर्वेद आणि कोविड वर पुस्तक प्रकाशित करू लागले आहेत. जर्मनीतील मेडिकल जर्नल कोरोनिलला कवर पानावर स्थान देऊन चुकला आहे. हर्बल औषधी करोना विरुद्ध प्रभावकारी ठरल्या आहेत.
https://benthambooks.com/book/9789815051186/contributors/

पहिल्यांदा वाटले काय बाळकृष्णाने जर्नल टाकून लॅन्सेट बिन्सेट गाजवले की काय पण लिंक दिलीय ती मात्र बेन्थम बूक्स पब्लिशर ची. हे प्रकाशन आहे जनाब अता उर रहमान यांच्या मालकीचे. पाकीस्तानी. विकीपिडीया सांगते की १६९ एम्प्लॉयी त्यातले बहुसंख्य पाकीस्तानी असलेले हे प्रकाशन बर्‍याच गैरप्रकारांसाठी बदनाम आहे.
पतंजली बहुतेक सौदी आणि गल्फासोबत पाकीस्तनातही मार्केंटींग करु लागले की काय? असेलही. हलाल सर्टीफाईड मध आणि तूप विकायला काय प्रॉब्लेम आहे. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2022 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोरोनीलची बातमी आली होती, तेव्हा हे लोक आनंदाने वेडे व्हायचे बाकी होते.
काळच महाकठीण आला आहे.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

20 Sep 2022 - 10:42 am | सुबोध खरे

१५ वि विद्या आणि ६५ वि कला म्हणून जाहिरातकला प्रसिद्ध आहे.

“You can fool all of the people some of time;

you can fool some of the people all of the time,

but you can’t fool all the people all the time.”

Attributed to Abraham Lincoln १८८७

नव्या जमान्याचे बोध वाक्य असे आहे

“You can fool all of the people some of time;

you can fool some of the people all of the time,

AND

you CAN fool all the people all the time

PROVIDED YOU HAVE A VERY LARGE MARKETING BUDGET .”

भागो's picture

4 Aug 2022 - 6:16 pm | भागो

विवेकपटाईत
आपल्या पोष्टीशी पूर्ण सहमत.
माझा अलोपाथीवर पूर्ण विश्वास आहे पण डॉक्टरांवर आणि फार्मा कंपन्यांवर अजिबात नाही.
https://www.maayboli.com/node/65713 येथील चर्चा वाचा.

सुरिया's picture

4 Aug 2022 - 7:43 pm | सुरिया

करोंना झालेल्या रुग्णांना ताप उतरविण्यासाठी हेच औषध सर्व डॉक्टर लिहीत होते. सर्व रुग्णांना वाटत होते करोंनाचा ताप फक्त याच औषधाने उतरणार

डोलो ६५० ही करोनाचा ताप उतवण्यासाठी देत होते? खरेच?
करोना काळात चर्चा तर आर्सेनिक अल्बम, मग कोरोनील (आधी कोरोनावर उपाय म्हणून मग हळूच प्रतिकारशक्ती वाढवणारे म्हनून) मग रेमडेसीवीर, ऑक्सीजन आणि असेच दोन तीन नावे ऐकलेली.
डोलो ६५० चे नाव पॅरासिटेमॉल टब्लेट म्हणून आधीही माहीत होते पण लस घेतल्यानंतर ताप येऊन किंवा अंग दुखू नये म्हणून सगळेच डॉक्टर आणि लस केंद्रे डोलो घ्यायला सांगत तेंव्हापासून जास्त ऐकू येऊ लागले. बाकी करोनावर ऑषध म्हनून कुणी डोलो देत असेल किंवा स्वतः डोलो वाली कंपनी म्हणत असेल ह्यावर विश्वास नाही.

विवेकपटाईत's picture

4 Aug 2022 - 9:40 pm | विवेकपटाईत

१००० कोटींचे गिफ्ट डॉक्टरांना दिले गेले. एवढे मोठे कमिशन दिल्यानंतर ग्राहकांना किती लुटले असेल याचा विचार करा. खबरदारी म्हणून हे औषध दिल्या गेले ९० टक्के रुग्णांना ताप नसताना ही. या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट त्यांच्या साईट वर जाऊन पाहू शकतात. फक्त गिफ्ट साठी प्रमाणापेक्षा जास्त डोज देऊन रुग्णांना मृत्यूच्या दाढेत पोहचविण्याच्या कार्यात ह्या औषधांचे ही योगदान आहे.काही काळ थांबा रुग्ण कोविड पेक्षा औषधांमुळे जास्त दगावले हे ही स्वीकार केले जाईल.

तुम्ही लेखातील शेवटच्या वाक्यात जाता जाता निरुपयोगी औषधी असा शब्द वापरला आहे. 1000 कोटी भेट म्हणून वाटले हे (खरे असेल तरी) फक्त डोलो गोळीच्या बाबतीत काहीतरी वेगळे घडले असे वाटत असेल तर या क्षेत्राची अधिक माहिती मिळवणे आवश्यक.

डोलो आणि इतर paracetamol रेणूयुक्त ब्रँड यांच्या किंमतीतला फरक, त्याची क्वालिटी आहे की नाही या अंगाने मांडणी केली असता त्याला वजन प्राप्त झाले असते. आता नुसताच प्रचारकी पर्दाफाश छाप व्हात्सापी लेख झाला.

सुरिया's picture

4 Aug 2022 - 11:58 pm | सुरिया

काका, काका, काका,
उगी पैलवानागत घुमू नका.
विषय कोरोनात केलेल्या लुटीचा काढलात की नाही तुम्म्ही?
मग लूट कशाला म्हणायची? गोळीची किमत आहे २ रुपये प्रति. अगदी सकाळ संध्याकाळ घेतली तरी चार रुपये दिवसाला. अ‍ॅक्टीव्ह करोनाचे दिड वर्ष पकडले तरी त्यात रेग्युलरली कुठेच डोलोचा गवगवा नव्हता. लसीकरण सुरु झाले तेंव्हा डोलो प्रिस्क्रीप्शन्स आणि सेल वाढला. तोपर्यंत क्रोसिन चा जितका सेल असेल त्यापेक्षा डोलोचा कमीच असणार. शिवाय पॅरासिटेमॉल ओटीसी दिले जाते. तेंव्हा करोनावर उपयोगी म्हणून हे ड्रुग खपवले हा तुमचा दावा निखालस खोटा आहे. अगदी लूट म्हणायची झाली तर रेमडेसीवीर कसे ब्लॅकने विकले गेले अगदी चौपट किमतीतसुध्दा तसे डोलोबाबतीत काहीही घडलेले ऐकीवात नाही. दोन रुपयाची गोळी ना कधी शॉर्ट झाली ना कधी तीन रुप्पयाला विकली गेली. एका रेमिडेसीवीरच्या तत्कालीन किमतीत वर्षभरांच्या एका माणसाच्या डोलो येऊ शकल्या असत्या. तेंव्हा लूट म्हणणे हेही खोटेच.
आता राहिला कंपनीचा आणि पडलेल्या धाडीचा प्रश्न. नॉर्मली लोकांना काही मोठ्या कंपन्या आणि काही ब्रॅन्डस माहीत असतात. मेडिकलचे इतके ब्रॅन्ड असतात की बरेचसे केमिस्ट त्यांचे कंटेटचे कुठलेतरी पुस्तक असते त्यात सुध्दा बघताना आढळतात तेंव्हा डोलो बनवणारी मायक्रो लॅब ही कंपनी फक्त डोक्टर्स आणि केमिस्ट ह्यांनाच जास्त माहीती असणार. शिवाय त्या कंपनीत माझे काहीही इंटरेस्ट आणि आपुलकी नसताना माहीती स्त्रोतांवर पाहता असे दिसते की कंपनीचे म्हणजे मायक्रो लॅब्जचे कित्येक प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय ही कंपनी सेल्स आणि मार्केटींग शिवाय एपीआय (अ‍ॅक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंटस) मध्येही कार्यरत आहे. इतके असताना त्यांचा व्यवहार मोठाच असणार आहे. फार्मा कंपन्या सेल्स आणि मार्केटिंग वर मोट्ठे बजेट खर्च करतात आणि त्याचा मुख्य मिडीया डॉक्टर्स हेच असतात हे आता सर्वानाच माहीत झालेले आहे. त्यासाठे त्यांनी केलेला खर्च अफाट असला तरी आणि त्यातही काही गैरप्रकार असले तरी फक्त करोना मध्ये केलेली ही लूट आहे आणि डॉक्टरांना फक्त डोलो ६५० लिहुन देण्यासाठी १००० करोडच्या गिफ्टस दिल्या गेल्या असे म्हणणे म्हणणे म्हणजे आधी बाण मारुन वर्तुळे काढणे आहे.
तुम्ही म्हणता तसे डोलोचे भयानक वगैरे साईड इफ्फेक्ट तसे ही दिसत नाहीये. इतर पॅरॉसिटेमॉल ड्रुग्ज चे जे साईड इफ्फेक्ट असतात तेच डोलोचेही दिसतात. प्रमाणाचा विषय घेतला तर अ ति सर्वत्र वर्ज्ययेत हे सगळीकडेच लागू होते. अगदी आयुरवैदिक औषधींनाही. पण त्याचे (डोलोचे) जास्त प्रमाण होऊन दगावले अशी एकही केस ऐकण्यात नाही. त्यामुळे फक्त अशा गिफ्टसाठी डॉक्टरांनी डोलोचा मारा करुन पेशंट मारले अशा अविर्भावात तुम्ही लिहित आहात त्याची पूर्ण माहीती पतंजलीचा चष्मा काढून घ्यावी ही नम्र विनंती.

काही काळ थांबा रुग्ण कोविड पेक्षा औषधांमुळे जास्त दगावले हे ही स्वीकार केले जाईल.

अशा बिनबुडाच्या भविष्यवाण्या करणारी प्रवृत्तीमागची धंदेवाईक मखलाशी आपणांस तरी समजून घ्यायची सध्या इच्छा नाही असे दिसते. तस्मात......निरोगी रहा...वाचत रहा....

विवेकपटाईत's picture

9 Aug 2022 - 11:04 am | विवेकपटाईत

सूरीया जी, माझी भविष्यवाणी कधीच बिन बुडाची नसते. या फार्म कंपनीवर सीबीडीटी ने कंपनी वर केलेली कारवाई आहेत. करोंना काळात सर्वांना हेच औषध डॉक्टर का लिहीत होते याचे उत्तर आहे का? एका दिवसांत सहा सहा गोळ्या लिहल्या जात होत्या. बाकी तापासाठी दिवसातून एक किंवा दोन ही पुरेशी असतात. 100 पेक्षा कमी ताप असेल तर गोळी घेण्याची गरज ही नसते. पुढील काही वर्षानी रेमडेसीवीर आणि करोंना या विषयावर मेडिकल फील्डवालेच भरपूर लेख लिहतील. एक करोंनावर औषध नव्हते. ज्या औषध्या दिल्या गेल्या त्यांचे दुष्परिणाम जास्त होते. दिल्लीत एक म्हण एप्रिल आणि मई 2021 मध्ये प्रसिद्ध झाली. जे हॉस्पिटल गेले ते गेले, जे घरी राहिले ते वाचले. बाकी काही वर्षांत हे सत्य स्वीकारल्या जाईल.

सुबोध खरे's picture

5 Aug 2022 - 12:05 pm | सुबोध खरे

खबरदारी म्हणून हे औषध दिल्या गेले ९० टक्के रुग्णांना ताप नसताना ही. या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट त्यांच्या साईट वर जाऊन पाहू शकतात. फक्त गिफ्ट साठी प्रमाणापेक्षा जास्त डोज देऊन रुग्णांना मृत्यूच्या दाढेत पोहचविण्याच्या कार्यात ह्या औषधांचे ही योगदान आहे.

डोलो किंवा क्रोसीन यात मूळ औषध पॅरासेटामॉल हे आहे.

हे केवळ तापासाठीच नव्हे तर अंगदुखी डोकेदुखी यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तेंव्हा घरातील बाईला अंगात कणकण आहे, डोकं दुखत आहे. अंग दुखत आहे तरी तिला घरच्या माणसांची लहान मुलांची काळजी घ्यायलाच लागते

किंवा

अत्यावश्यक सेवेत असणारा माणूस, नोकरदार, व्यवसाय करणारा माणूस रजा घेऊ शकत नाही अशा वेळेस त्याला दिवसात तीन गोळ्या घेतल्याने कोणताही अपाय होत नाही असे अनेक दशकांच्या अभ्यासानंतर सिद्ध झालेले आहे.

एक दिवसात सहा गोळ्या पर्यंत पॅरासेटामॉल देणे हे नक्कीच सुरक्षित आहे.

हे औषध गरोदर स्त्रीला नवजात बालकास देण्यासाठी सुद्धा सुरक्षित आहे.

हे औषध जगभरात otc (over the counter) म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळते. याचे कारण हे जगातील एका अत्यंत सुरक्षित औषधांपैकी आहे हे सिद्ध झालेले आहे.

पॅरासेटामॉल चे (LD ५०) २००० mg/kg आहे म्हणजेच ७० किलोच्या माणसांनी २१० गोळ्या एकदम घेतल्या तर त्यातील ५० % माणसे दगावतील.

पॅरासेटामॉलची विषबाधा बहुसंख्य वेळेस आत्महत्या करण्याच्या हेतूने अतिरिक्त औषधे घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून येते.

तेंव्हा या औषधाचे भयंकर साईड इफेक्ट्स आहेत किंवा यामुळे रुग्ण मृत्यूच्या दाढेत पोचले हे सांगणे हि अतिशयोक्ती आहे यात शंका नाही.

वामन देशमुख's picture

5 Aug 2022 - 8:33 pm | वामन देशमुख

एक दिवसात सहा गोळ्या पर्यंत पॅरासेटामॉल देणे हे नक्कीच सुरक्षित आहे.

७५ किलो वजनाच्या पुरुषासाठी -

५०० मिग्रॅ की ६५० मिग्रॅ ?

सुबोध खरे's picture

6 Aug 2022 - 1:28 pm | सुबोध खरे

६५० मिग्रॅ

शाम भागवत's picture

16 Sep 2022 - 1:29 pm | शाम भागवत

५०० मिग्रॅ पर्यंतच्या गोळ्यांवर किंमत नियंत्रण व त्यापुढील गोळ्यांवर अजिबात निर्बंध नाहीत असे काही आहे का?

सुबोध खरे's picture

16 Sep 2022 - 8:20 pm | सुबोध खरे

नाही

पॅरासिटॅमॉल च्या ५०० मिग्रॅ च्या गोळ्या अत्यावश्यक औषध म्हणून DPCO drug price control order (DPCO) 2013,औषध किंमत नियंत्रण आज्ञावली खाली आणल्या.

यानंतर संशोधनात असे आढळले कि प्रौढ माणसांना ५०० मिग्रॅ डॉस कमी पडतो आणि ६५० मिग्रॅ डॉस ने कोणताही अपाय होत नाही त्यामुळे त्या डोसला जगभर मान्यता मिळाली.

परंतु या गोळ्या या आज्ञावलीत अजून आलेल्या नाहीत. म्हणून डोलो ५०० मिग्रॅ च्या एका गोळीची किंमत एक रुपया आहे आणि डोलो ६५० ची २ रुपये.
हीच किंमत क्रोसीन (जी एस के) किंवा पॅरासिप (सिप्ला) ५०० आणि ६५० ची पण आहे

फार्मा कंपन्या सरकारी संथपणाचा फायदा उठवणारच. (याशिवाय त्यांनी वेगाने काम करू नये म्हणून त्यांचे खिसे ओले करण्याचे काम सुद्धा कंपन्या करतातच)

आमच्या लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक (Director General Armed Forces Medical Services) यांच्या शब्दात "सरकारी संस्था या मतिमंद हत्ती सारख्या असतात. तुम्ही हत्तीला बसायची आज्ञा दिली तर तिची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ जातो आणि बसलेल्या हत्तीला लगेच उठ म्हणून आज्ञा दिली तरी हत्ती उठायला भरपूर वेळ घेतो. तसेच एकदा चालायला लागल्यावर तुम्ही हत्तीला फार तर २० अंश डावी उजवीकडे वळवू शकता लगेच उलटे वळायला सांगू नका. तसे सहज होत नाही."

यामुळेच अनेक जगभर बंदी आणलेली औषधे भारतात बंदी येण्यासाठी किंवा जीवनावश्यक ठरलेल्या अनेक औषधांचा अत्यावश्यक सेवेत अंतर्भाव होऊन त्यावर किंमत नियंत्रण येण्यासाठी भरपूर काळ जावा लागतो

https://timesofindia.indiatimes.com/india/80-of-medicines-not-covered-by...

शाम भागवत's picture

17 Sep 2022 - 8:53 am | शाम भागवत

धन्यवाद.

कॉमी's picture

6 Aug 2022 - 3:55 pm | कॉमी

+१

औषधकंपन्या चोर असतात याविषयी काही गोष्टी वाचल्या आहेत. Phishing for Phools या पुस्तकात अमेरिकन औषधकंपन्यांविषयी दिले आहे ते वाचल्याचे आठवते. तेव्हा ही कंपनी फार साव असेल असे नाही. तरीही लेखातील काही गोष्टींचा मेळ लागत नाही.

सगळ्यात पहिले आपण दिलेली लिंक ब्लॉगस्पॉटवरील एका ब्लॉगची आहे. त्यापेक्षा विश्वासार्ह लिंक देता का? ब्लॉगवर कोणीही काहीही लिहू शकतो त्यामुळे ब्लॉगवर लिहिले आहे म्हणजे त्यावर विश्वास ठेवायचा का?

समजा ब्लॉगवर लिहिलेली ती गोष्ट सत्य आहे असे गृहित धरू. डोलो-६५० ची किंमत १५ गोळ्यांच्या स्ट्रीपची ३० रूपयांच्या आसपास आहे. म्हणजे एका गोळीची २ रूपये. ते सगळे २ रूपये कंपनीला अर्थातच मिळत नाहीत. त्यातला बराच वाटा मधल्या सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन चेनला जातो. अ‍ॅमवेसारखे लोक म्हणतात की ही मधली चेन ८०-८५% किंमत वाढवते. तरी सोयीसाठी डोलो-६५० साठी ते ५०% धरू. म्हणजे समजा एका गोळीमागे एक रूपया कंपनीला मिळाला. अगदी कंपनीला रेव्हेन्यु म्हणून मिळालेला प्रत्येक रूपया त्यांनी कमिशन म्हणून वाटला असे गृहित धरले तरी त्यांच्या १ हजार कोटी गोळ्या विकल्या गेल्या पाहिजेत. आणि हे सगळे कोरोना काळात म्हणजे समजा १ वर्षाच्या काळात. भारतात अगदी १० कोटी लोकांना डोलो-६५० घ्यायला सांगितली तरी प्रत्येकाला सरासरी एका वर्षात १०० गोळ्या विकत घ्यायला हव्यात.

त्यातही मिळालेला सगळा रेव्हेन्यु कंपनी कमिशन म्हणून देणे शक्य नाही. अगदी १०% कमिशन जरी दिले तरी मग १ हजार कोटी नाही तर १० हजार कोटी गोळ्या विकल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाला सरासरी एका वर्षात १००० गोळ्या. म्हणजे सरासरी दिवसाला साधारण ३ गोळ्या.

डोलो ही वेदनाशामक गोळी असते ना? अशा वेदनाशामक गोळ्या दररोज ३ या स्पीडने वर्षभर फस्त केल्या तर त्या माणसाची अवस्था काय होईल?

कुठेतरी आकड्यांचा मेळ लागत नाही.

१००० कोटी रूपयांचे कमिशन द्यायचे असेल तर रेव्हेन्यु किमान त्याच्या दहापट हवा

सुबोध खरे's picture

5 Aug 2022 - 11:08 am | सुबोध खरे

Dolo 650 has cornered sales of Rs 567 crore since March 2020, selling more than 350 crore pills and 7.5 crore strips of medicine.
https://www.businesstoday.in/industry/pharma/story/dolo-breaks-sales-rec...

जेम्स वांड's picture

5 Aug 2022 - 11:21 am | जेम्स वांड

पण मग ज्या गोळीची तडाखेबंद छप्परफाड विक्री सुद्धा ₹५६७ कोटींची(च) होते, त्यांना पेशंट लोकांच्या माथी मारायला (पटाईत काकांचे मत आमचे नाही) डॉक्टर्स वर १००० कोटी का दौलतजादा करेल कंपनी ??

एपीआय अन् इतर प्रॉडक्ट विक्री मधून आलेला रेव्हेन्यू इकडं का लावतील ते जेव्हा सेल्स फिगर त्यांच्या डोळ्यासमोर आहे अन् ती तडाखेबंद असूनही ५६७ कोटीच आहे ??

क्लिंटन's picture

6 Aug 2022 - 1:55 pm | क्लिंटन

ही जानेवारी २०२२ मधील लिंक आहे. तोपर्यंत ५६७ कोटींची विक्री आहे असे ती लिंक म्हणत आहे. बहुदा हा आकडा आपण केमिस्टकडून गोळ्या घेतो तेव्हा द्याव्या लागणार्‍या रकमेचा असावा- कंपनीला मिळालेल्या रेव्हेन्युचा नसावा. कंपनीच्या रेव्हेन्युचा असता तर तसा स्पष्ट उल्लेख त्या लिंकमध्ये असता. म्हणजेच कंपनीचा रेव्हेन्यु ५६७ कोटींपेक्षा कमी असावा- कदाचित ३००-३५० कोटी वगैरे असे म्हणायला जागा आहे. तेव्हा १००० कोटींचे कमिशन कंपनी कुठून देणार? १००० कोटी हा आकडा दिसल्यानंतरच हा आकडा खूपच जास्त फुगवून सांगितलेला आहे- प्रत्यक्षात तो आकडा तितका असणे संभवनीय वाटत नाही असेच वाटले होते.

विवेकपटाईत's picture

9 Aug 2022 - 11:07 am | विवेकपटाईत

त्या कंपनीवर कारवाई सीबीडीटी ने केली आहे. त्यात घापला आढळला आहे. बाकी सर्वच हीच गोळी का लिहीत होते. त्याचे मुख्य कारण हेच आहे. याचा अर्थ एकच निघतो, काही अपवाद सोडता अधिकान्श डॉक्टर मेडिकल माफियाचे सेवक झाले आहे. करोंना मृत्यूचे हे ही एक मुख्य कारण आहे.

सुबोध खरे's picture

9 Aug 2022 - 12:11 pm | सुबोध खरे

काही अपवाद सोडता अधिकान्श डॉक्टर मेडिकल माफियाचे सेवक झाले आहे.

काही अपवाद कशाला सगळेच डॉक्टर मेडिकल माफियाचे सेवक झाले आहे असं म्हणा कि

करोंना मृत्यूचे हे ही एक मुख्य कारण आहे.

सगळ्या डॉक्टरांच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करून टाकू या

304 IPC
Causing death by negligence. --Whoever causes the death of any person by doing any rash or negligent act not amounting to culpable homicide, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.]

हा का ना का , काय म्हणताय?

पण मग calpol ची पण तडाखेबंद विक्री कशी काय झाली बुवा?

Dolo 650 clocked sales of Rs 28.9 crore in December 2021, up 61.45 per cent from the same month the previous year. However, its highest sales figures are from April and May 2021, at the peak of the second wave of Covid, when it witnessed sales of Rs 48.9 crore and Rs 44.2 crore respectively.

In comparison, sales of Calpol — the second most sold paracetamol brand in December 2021 — stood at Rs 28 crore, up 56 per cent from December 2020. Calpol was the most sold paracetamol at the peak of the second wave, with Rs 71.6 crore in sales in April 2021.

https://theprint.in/health/how-desi-dolo-650-outsold-mnc-gsks-crocin-bec...

प्रसाद_१९८२'s picture

5 Aug 2022 - 10:42 am | प्रसाद_१९८२

डोंबिवलीत डोलो ६५० या गोळ्या महानगर पालिकेचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, नगरसेवक व आमदार यांचे कार्यकर्ते लोकांच्या घरोघरी जाऊन, पाच गोळ्यांची स्ट्रीप फुकट वाटत होते. अर्थात करोनाच्या सुरवातीच्या काळात लोकांना जरासे ही अंग गरम वाटले (ताप असो वा नसो) तरिही ते या गोळ्या खात होते. एक वेळ अशी आली होती की मेडीकलमधे या गोळ्या मिळत देखील नव्हत्या यावरुन या गोळ्यांच्या विक्रिचा अंदाज यावा.

जेम्स वांड's picture

5 Aug 2022 - 10:50 am | जेम्स वांड

(डोंबिवलीत शहरातील सगळी मेडिकल तुम्ही जमेस धरल्याचे गृहीत धरून)

डोंबिवलीत ओटीसी/ ऑन prescription डोलो ६५० मिळत नव्हती ह्याचा अर्थ ती कुठेच ओटीसी/ ऑन prescription मिळत नव्हती असे म्हणता येईल का प्रसादजी ??

पटाईत काकांच्या मनात आधुनिक वैद्यकशास्त्र प्रॅक्टीस करणाऱ्या लोकांबद्दल मजबूत अढी बसलेली दिसतेय, कित्येकदा कट प्रॅक्टीस अनुभवायला पण मिळते पण ह्याचा अर्थ सगळेच डॉक्टर तसे नसतात इतके पटाईत काकांनी लक्षात घेतले तरी आनंद. शुभेच्छा.

सुरिया's picture

5 Aug 2022 - 12:29 pm | सुरिया

एक वेळ अशी आली होती की मेडीकलमधे या गोळ्या मिळत देखील नव्हत्या यावरुन या गोळ्यांच्या विक्रिचा अंदाज यावा.

दिलेल्या नावाचीच गोळी घ्यायची हि ग्राहक मानसिकता असते हे मान्य करुन सुध्दा डोलो ६५० च्या कमीतकमी २० ईक्वल सबस्टीट्युट बाजारात उपलब्ध तेंव्हाही होत्या आणि सध्यही आहेत.
आणि वाटायचे म्हणले तर अर्सेनिक अल्बमच्या डब्याही नगरसेवकांची स्टीकरं लावून वाटल्या गेल्या.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Aug 2022 - 8:13 pm | अत्रुप्त आत्मा

एकांगी आत्मकुंथक टणाटणी लेख !

जेम्स वांड's picture

12 Aug 2022 - 9:40 am | जेम्स वांड

&#129315 &#129315 &#129315 &#129315

कपिलमुनी's picture

12 Aug 2022 - 9:45 am | कपिलमुनी

पटाईत काका क्लीन बोल्ड झाल्याने धाग्याचे आयुष्य संपले आहे.

विवेकपटाईत's picture

14 Aug 2022 - 6:46 pm | विवेकपटाईत

कपिल मुनी सर, मी क्लीन बोल्ड केले आहे १००० कोटींचे गिफ्ट देणाऱ्यां मेडिकल माफियांचे इथे फक्त लंगडे समर्थन झाले आहे. १९८२ ते १९९७ साला पर्यंत मी उपभोक्ता मंत्रालयात होतो.बहुतेक १९९४ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने डॉक्टरांना उपभोक्ता सरक्षण कायद्यापासून वगळले होते. अधिकाऱ्यांच्या तोंडून प्रथमच मेडिकल माफिया हा शब्द ऐकला होता. तो किती शक्तिशाली आहे हे तेव्हा कळले. आजही बघा मेडिकल माफियाने गेल्या दोन वर्षात तीनशेहून जास्त मुकद्दमे त्यात डझनभर उच्च न्यायालयात, मोठे मोठे प्रसिद्ध वकील फक्त एका व्यक्तीच्या विरोधात. एवढा चारा समुद्रात फेकला आहे एखादा मासा गळाला लागू शकतो. आता तर सुप्रीम कोर्टात ही पोचले आहे. कारण करोना काळात हजारो कोटीचे नुकसान एका व्यक्ती मुळे झाले आहे.

जेम्स वांड's picture

15 Aug 2022 - 7:07 am | जेम्स वांड

मंत्रालयात असताना मेडिकल माफिया शब्द ऐकला, म्हणून आता तो आम्ही ऐकावा असे ? कळकळ वगैरे ठीक आहे पण हवेत गोळीबार छाप लेखन केले आहेत आपण अन् जनतेने, त्याठी डॉक्टर सुबोध खरेंसारख्या कवालिफाईड अन् निवृत्त आर्मी डॉक्टरने तुमचे लेखन तुमच्या पदरात घालूनही तुम्हाला गिरे तो भी टांग उप्पर बोलायचे असल्यास माझी हरकत नाही पण मग चर्चेचे प्रयोजन उरत नाही, कारण तुम्ही खरेच क्लीन बोल्ड झाले आहात

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 7:07 am | जेम्स वांड

ॲलोपेथी वर लोकांची दिशाभूल करू नका असे दिल्ली हायकोर्टाने बाबा रामदेव/ पतंजलीला सांगितले आहे.

ह्या संबंधी जज श्री अनुप जयराम भंभानी म्हणतात की

.

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2022 - 8:21 pm | प्रसाद गोडबोले

'त्यामुळं' डॉक्टर्स रुग्णांना लिहून द्यायचे Dolo 650; सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल

https://www.esakal.com/desh/big-scam-of-dolo-650-makers-rupees-1000-cror...

विवेक पटाईत साहेब, आपण धागा काढल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद ! स्वतः दहावी नापास असताना मेडीकल फिल्ड विषयी बोलणार्‍या लोकांच्या टिपण्णी कडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम !

आता सुप्रीम कोर्टाच्या कारवाई कडे लक्ष देऊ !

कपिलमुनी's picture

18 Aug 2022 - 8:27 pm | कपिलमुनी

व्यवसायाने डॉक्टर अस लोकांनी योग्य तो प्रतिवाद केला आहे.

तरीही वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या पक्षा सारखे राहायचे असल्यास पर्याय नाही

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2022 - 8:37 pm | प्रसाद गोडबोले

वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या पक्षा सारखे

हे तुम्ही सुप्रीम कोर्टाला कळवा ना जनहित याचिका करुन म्हणजे कोर्टाचा मुल्यवान वेळ वाचेल अन तुमचीही लाल होईल !

नाहीतर किमान सुप्रीमकोर्टाचा निर्णय येईपर्यंत संयम तरी बाळगा , अगदीच त्रास होत असेल तर डोलो-६५० घ्या एक दोन. हा.का.ना.का.=))))

https://maharashtratimes.com/india-news/for-prescribing-dolo-650-makers-...

पटाईत काकांचे म्हणणे अगदिच बीन बुडाचे नाहीये असे म्हणायला नक्की वाव आहे.

पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 11:24 am | सुबोध खरे

सध्या तरी १००० कोटी हा आकडा केवळ आरोप म्हणून आहे आणि त्याचा सज्जड पुरावा येणे आवश्यक आहे.

अर्थात सर्वच औषध कंपन्या डॉक्टरांना आणि केमिस्ट ना आपलाच ब्रँड लिहून देण्यासाठी विविध भेटवस्तू देत असतात हि सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.

दुर्दैवाने एकाच औषधाचे असंख्य ब्रँड असतील उदा (cotrimoxazole) या सल्फा औषधाचे ११० ब्रँड तर औषध कंपन्या आपलेच औषध लिहून द्या असे डॉक्टरना कसे सांगणार? साध्या पॅरासेटामॉल या औषधाचे ५० च्या वर ब्रँड आहेत. अशी असंख्य औषधे आणि त्यांचे असंख्य ब्रॅण्ड्स असतात.

त्यातून एम आर म्हणून काम करणारी तरुण पोरं सतत आमचा अमुक तमुक ब्रँड लिहून द्या म्हणून विनवणी करत राहतात. कारण विपणन (मार्केटिंग) शाखेत आपले काम चांगले झाले नाही तर नोकरीतून डच्चू मिळण्याची शक्यता असते.

खाजगी विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, यु एल आय पी, कर्जे देणाऱ्या कंपन्या यांच्याकडे जसे जास्त विक्री करणाऱ्याला जास्त कमिशन आणि आपले काम समाधानकारक नसेल तर नारळ मिळतो त्यामुळे जसे तेथे गैरमार्गांचा सर्रास वापर केला जातो तसेच येथे होत असते.

पण आपण डॉक्टर लोकांना उच्चासनावर नेऊन बसवले आहे. त्यामुळे वैद्यकीय शाखेत जरा काहीही झाले तरी डॉक्टरना सुळी चढवले जाते.

येथेच धागा लेखकाने

डॉक्टरांनी डोलो देऊन रुग्णांना मृत्युमुखी पाठवले

करोंना काळात सर्वात जास्त विकणारी , निरुपयोगी औषधी

फक्त पैसे कमविण्यासाठी करोना काळात ते लोकांच्या जीवाशी खेळले

काही काळ थांबा रुग्ण कोविड पेक्षा औषधांमुळे जास्त दगावले हे ही स्वीकार केले जाईल.

खबरदारी म्हणून हे औषध दिल्या गेले ९० टक्के रुग्णांना ताप नसताना ही. या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट त्यांच्या साईट वर जाऊन पाहू शकतात.

बाकी तापासाठी दिवसातून एक किंवा दोन ही पुरेशी असतात.

जे हॉस्पिटल गेले ते गेले, जे घरी राहिले ते वाचले.

अशी बेधडक आणी निखालस असत्य विधाने केलेली आहेत.

डोलो ६५० काय किंवा इतर कोणत्याही पॅरासेटामॉल मुळेच भारताच्या १४० कोटींपैकी किमान एक माणूस दगावला असे त्यांनी सिद्ध करून दाखवावे असे मी त्यानं आव्हान देतो.

बाकी "डोलो ६५०" साठी १००० कोटी ची खिरापत वाटली याचा पुरावा आहे कि नाही हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होईलच.

कॉमी's picture

21 Aug 2022 - 7:44 am | कॉमी

+१

Trump's picture

21 Aug 2022 - 11:39 am | Trump

डॉक्टरांनी डोलो देऊन रुग्णांना मृत्युमुखी पाठवले

डोलो ६५० काय किंवा इतर कोणत्याही पॅरासेटामॉल मुळेच भारताच्या १४० कोटींपैकी किमान एक माणूस दगावला असे त्यांनी सिद्ध करून दाखवावे असे मी त्यानं आव्हान देतो.

कदाचित लेखकाला वैद्यांनी रुग्णांना डोलो ६५० दिल्याने, रुग्ण आत्मसंतुष्ट झाले आणि त्यामुळे त्यांनी योग्य औषध घेतले नाही असे म्हणायचे असावे. त्यामुळे नक्कीच काही लोक मृत्यमुखी पडले असावेत.
बाकी तुमचे चालु द्यात.

कॉमी's picture

21 Aug 2022 - 12:38 pm | कॉमी

लेखकाचे वक्तव्य-

या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट त्यांच्या साईट वर जाऊन पाहू शकतात. फक्त गिफ्ट साठी प्रमाणापेक्षा जास्त डोज देऊन रुग्णांना मृत्यूच्या दाढेत पोहचविण्याच्या कार्यात ह्या औषधांचे ही योगदान आहे.

या औषधांचे भयंकर साईड इफेक्ट त्यांच्या साईट वर जाऊन पाहू शकतात. फक्त गिफ्ट साठी प्रमाणापेक्षा जास्त डोज देऊन रुग्णांना मृत्यूच्या दाढेत पोहचविण्याच्या कार्यात ह्या औषधांचे ही योगदान आहे.

पेरासेटामॉल योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे घेतल्यास कोणतेही दुष्परिनाम होत नाहीत किंवा अतिशय कमी दुष्परिनाम होतात असे मला माहिती आहे.
मी सदर लेखकांची बिनासंदर्भ वक्तव्य बाजुला काढुन त्यांना काय म्हणयचे आहे ते समजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे.
धन्यवाद

सुरिया's picture

21 Aug 2022 - 9:30 pm | सुरिया

Trump आणि कॉमी म्हणजे Dolo 650 आणी calpol 650 दिसतात.
एकूणच प्रतिसादात असलेली निरसता, दुर्बोधता आणि शब्दबंबाळता हे साईड इफेक्ट सेम आहेत.
;)

सुबोध खरे's picture

22 Aug 2022 - 9:57 am | सुबोध खरे

लेखकाला वैद्यांनी रुग्णांना डोलो ६५० दिल्याने, रुग्ण आत्मसंतुष्ट झाले

कोणताही डॉक्टर डोलो ६५० ( पॅरासिटेमॉल) घेतल्याने तुमचा करोना बरा होईल असे सांगणे शक्य नाही.

तेंव्हा डॉक्टरांनी डोलो देऊन रुग्णांना मृत्युमुखी पाठवले हा दावा मुळातच फोल आहे.

विवेकपटाईत's picture

16 Sep 2022 - 10:04 am | विवेकपटाईत

तुमच्या म्हणन्यांनी सत्य बदलणार नाही. गरजेपेक्षा जास्त गोळ्या सर्वच करोंना रुग्णांना दिल्या गेल्या आहेत. सर्व निरर्थक औषधांचा दुष्परिणामाने करोंनाची मदत केली. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला माझे म्हणणे 100 टक्के पटले असेल तरीही सत्य बोलणे शक्य होत नाही. तुमची मजबूरी मी समजू शकतो.

कपिलमुनी's picture

16 Sep 2022 - 10:09 am | कपिलमुनी

औषधांचा दुष्परिणामाने करोंनाची मदत केली.

तुम्ही हे जे स्टेट्मेंट करत आहात , त्याचा डेटा तर तुम्ही देत नाही आणि नुसते बाण मारता.

सुबोध खरे's picture

16 Sep 2022 - 12:24 pm | सुबोध खरे

तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला माझे म्हणणे 100 टक्के पटले असेल तरीही सत्य बोलणे शक्य होत नाही. तुमची मजबूरी मी समजू शकतो.

पटाईत साहेब

उगाच हवेत वायबार काढू नका.

मला तुमचे म्हणणे १ % सुद्धा पटलेले नाही आणि माझी यात कोणतीही मजबुरी असायचे काहीही कारण नाही.

समाजात जितके गैरप्रकार चालतात तितकेच वैद्यकीय क्षेत्रात चालतात. त्याहूनही जास्त गैरप्रकार सरकारी कार्यालयात चालतात हे सर्वानाच माहिती आहे.

कोण्या एका कंपनीची तळी उचलायचे मला काहीही कारण नाही. डोलो नाही तर पोलो/ क्रोसीन/ पॅरासिप कोणती तरी पॅरासिटॅमॉलची गोळी डॉक्टरांनी दिलीच सती

पण पॅरासिटामॉल या औषधाने/ त्याच्या गैरवापराने माणसे मेली याचे एक तरी उदाहरण तुम्हाला दाखवता येईल का?

तुम्ही बेफाट आरोप कोणताही सज्जड पुरावा न देता करता आहात.

५६७ कोटी रुपयांची विक्री ( नफा नव्हेच) झालेल्या औषधासाठी १००० कोटी डॉक्टरांना दिले गेले या सारखा या हास्यास्पद दावा दुसरा नसेल.

हे कुठेही सिद्ध झालेले नाही किंवा होणारही नाही.

तुमचे आधुनिक वैद्यकशास्त्राबद्दलचे जे काही समज/ गैरसमज असतील ते निराकरण करण्याची मला अजिबात गरज वाटत नाही.

पण सार्वजनिक न्यासावर इतके बेफाट आणि बिनबुडाचे आरोप करत आहात त्याचे आश्चर्य वाटते.

सनईचौघडा's picture

7 Sep 2022 - 7:12 am | सनईचौघडा

पटाईत काका धन्यवाद हा लेख लिहल्याबद्दल औषधंच्या बाजारात जंगलराज

जनतेची मानसिकता अशी की डॉ लिहून दिलेलं निमूटपणे घ्यायचं.

Mark orl यांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांना खरच काही कळत नाही त्या भाबड्या लोकांनी वाचावं.

सुबोध खरे's picture

8 Sep 2022 - 7:34 pm | सुबोध खरे

डॉ गद्रे यांचा लेख संपूर्ण वस्तुस्थिती असली तरी तो आदर्शवादी स्थितीबद्दल चा लेख आहे आणि त्याची अंमलबजावणी होईल हा भाबडा आशावाद आहे . आपल्या आयुष्यभरात होईल असे वाटत नाही.

सध्या हेल्मेट सक्तीचा समोर दिसत असणारा नियम तुम्हाला कडक अमलबजावणी करता येत नाही तर औषध कंपन्या आणी डॉक्टर यांच्या न दिसणाऱ्या संबंधांवर तुम्ही कसे नियंत्रण आणणार?

आम्ही सर्वात स्वस्त ब्रँड लिहून दिला तरी ज्यात त्यांना जास्तीत जास्त कमिशन मिळते तो ब्रॅन्डच केमिस्ट रुग्णांना देतात असा आमचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. त्यातून माझ्या माहितीतील अनेक डॉक्टरांनी बोलून दाखवले आहे कि त्यांना सुद्धा असाच अनुभव येतो आहे.

आमच्या दवाखान्याच्या शेजारचा केमिस्ट तर रुग्णांना हागवणी पासून सर्दी पर्यंतच नव्हे तर रक्तदाबाचे औषध देताना आढळला. रक्तदाबाबद्दल औषध देताना दिसल्यावर त्याला विचारल्यावर त्याने उद्धट उत्तरे दिली. त्यावर तुझ्या विरुद्ध माझे कॉन्टॅक्ट वापरून फार्मसी कॉन्सिल कडे तक्रार करून तुझे लायसन्स रद्द करेन म्हणून सज्जड धमकी दिली त्यानंतर त्याची अक्कल ठिकाणावर आली. ( २२ वर्षे सरकारी नोकरी केल्यामुळे नियम आणि कायदे चांगले माहिती असल्यामुळे मी हे करू शकलो असे काही करता येते हेच मुळी अनेक डॉक्टरांना माहिती नाही).

कोव्हीड काळाच्या अगोदर मोठा गाजावाजा करून ८० % सवलतीत जेनेरिक औषधे विकण्याचा दावा करणारी जेनेरिक औषधांची दुकाने आता इतर केमिस्ट सारखीच ज्यात त्यांना जास्तीत जास्त कमिशन मिळते तो ब्रॅन्डच ठेवताना मला स्वतःला आढळून येत आहेत.

कमी किमतीची औषधे विकत घेऊन केमिस्ट कडून जास्ती किमतीची बिले घेणारे रुग्ण तर सर्रास दिसतात.

कुठे कुठे आणि किती ठिगळे लावणार आहात?

आग्या१९९०'s picture

11 Sep 2022 - 7:38 am | आग्या१९९०

मायक्रो लॅबला क्लीन चिट मिळाली.

https://www.moneycontrol.com/news/business/companies/micro-labs-gets-cle...

विवेकपटाईत's picture

16 Sep 2022 - 10:13 am | विवेकपटाईत

फ्री बी देण्याची नोंद कागद पत्री नसते. डॉक्टरांना कमिशन दिल्याची नोंद कधीच नसते. दोष सिद्ध करणे कठीण असते. दिल्लीत सर्वच टेस्ट मध्ये 50 टक्के कमिशन डॉक्टरांना मिळते. जीवन रक्षक औषधीत (30 हजार देतो , डॉक्टरला/ हॉस्पिटलला तीन ते पाच हजाराला मिळते ) 50 ते 80 टक्के कमिशन असते. बाकी एका गोळीच्या जागी दहा गोळ्या करोंना रुग्णाच्या माथी भीती दाखवून मारल्या गेल्या आहे, हे ही सत्य आहे.

आग्या१९९०'s picture

16 Sep 2022 - 11:00 am | आग्या१९९०

दिल्लीत सर्वच टेस्ट मध्ये 50 टक्के कमिशन डॉक्टरांना मिळते.
सर्व तपासणी केंद्रं चाचण्यांना आकरलेल्या दरांच्या पावत्या देत असतात. ५० टक्के कमिशन देण्यासाठी ताळेबंदात इतका मोठा खर्च दाखवणे शक्यच नाही.

सुबोध खरे's picture

16 Sep 2022 - 12:32 pm | सुबोध खरे

बऱ्याच डॉक्टरांना या ना त्या स्वरूपात कमिशन/ भेटवस्तू दिल्या जातात हि वस्तुस्थिती आहे. त्यापेक्षा जास्त कमिशन केमिस्टना मिळते.

एल आय सी पासून बँका विमानाची रेल्वेची तिकिटे या सर्व सेवांमध्येसुद्धा कमिशन दिले जाते

पण ५६७ कोटी विक्री( नफा नव्हेच) असलेल्या औषधासाठी १००० कोटी डॉक्टरांना दिले गेले या सारखा या हास्यास्पद दावा दुसरा नसेल.

आणि करोना मध्ये पॅरासिटॅमॉल दिल्याने रुग्ण दगावले याच्यासारखा भंपक बिनबुडाचा दावा दुसरा नसेल. याचा निदान एक तरी खात्रीलायक पुरावा तुम्हाला देता येईल का

मदनबाण's picture

11 Sep 2022 - 7:09 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein

कपिलमुनी's picture

11 Sep 2022 - 11:34 pm | कपिलमुनी

धागा काय ? प्रतिसाद काय ?
कुठेही दिसला धागा , आपलीच जागा आणि कसेही *गा

मदनबाण's picture

12 Sep 2022 - 8:24 am | मदनबाण

काय मुनी, इतका सिंपल इनोद कळला नाय ?
सबको है ना क्रोसिन नही तो Dollo-650 दो, तिकीट के साथ में. असं व्हिडियोतील स्त्री सांगताना दिसते.
अपरोक्षपणे त्यांनी Dollo-650 चा प्रभाव काय मिळेल आणि त्या गोळीचा प्रसार देखील केला म्हणुन प्रतिसादाचे Dollo-650 चा प्रभाव आणि प्रसार !

स्वगत :- बाणा, हा तुझा आता सध्य काळातला शेवटचा प्रतिसाद असला पाहिजे. आता काही दिवस मिपावरुन ब्रेक घे ! वाचनमात्र देखील राहु नकोस.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raat Kali Ek Khwab Mein... :- Buddha Mil Gaya (1971)

मुक्त विहारि's picture

12 Sep 2022 - 9:29 am | मुक्त विहारि

तुमचे प्रतिसाद, माहिती पुर्ण असतात...

सागरसाथी's picture

19 Sep 2022 - 7:06 am | सागरसाथी

यात नवीन काही नाही, दरवर्षी डॉक्टरांना परदेशी ट्रिप गेली कित्येक वर्ष दिली जात आहेच.
पॅथॅलॉजी लॅब पण डॉक्टरांना गिफ्ट देत असतातच आणि डॉक्टरपण त्या लॅबचेच रिपोर्ट ग्राह्य मानतात. ते लॅबवाले तर तुमच्या आमच्यातलेच असतात.
ऑफिसमधील स्टेशनरी ठराविक ठिकाणाहूनच खरेदी होते, अगदी कॉलिटी कितीही खराब आणि किंमत कितीही जास्त असली तरी.
तळे राखील तो पाणी चाखील या म्हणीने आपले अतोनात नुकसान केले आहे, या भ्रष्ट आचाराला नैतिक आधार देवून ठेवलाय.