आज मी पेढे केले

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
8 Aug 2022 - 5:41 pm

आज सकाळी फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे, महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का? उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो. आपण पण काही कमी नाही, मी उत्तर दिले, ही रेसिपी मी बनविणार, बघच तू. सौ. "मी मुळीच मदत करणार नाही, लक्षात ठेवा". आता चॅलेंज स्वीकार करणे भाग होते. या आधी पेढा सोडा, कधी साधा शिरा ही बनविला नव्हता.

पण म्हणतात ना, "जहाँ चाह, वहाँ राह". दोनशे ग्राम दुधाचे पावडर, 100 एमएल दूध, चार चमचे गायीचे तूप, अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा चमचा वेलची पूड तैयार करून ठेवली. स्टीलची कढई गॅस वर ठेवली. गॅस सुरू करण्यापूर्वी, दोन चमचे तूप, साखर आणि दूध कढई टाकून व्यवस्थित ढळवून घेतले. त्यानंतर 200 ग्राम गायीच्या दूधाचे पावडर त्यात मिसळून व्यवस्थित ढळवून मिश्रण एकजीव करून घेतले. नंतर गॅस सुरू केला. गॅस स्लो ठेवला. किमान पाच ते सात मिनिटे मिश्रण सतत ढळवत राहिलो. सौ.ची मागून कामेन्ट्री सुरू होती, व्यवस्थित ढळवत रहा, नाही तर खालून जळून जाईल. मला काम करताना पाहून, निश्चित तिला आनंद होत होता. एकदाचे न जळता मिश्रण घट्ट झाले. आता त्यात वेलची पूड टाकली आणि मिश्रण एका ताटात काढून ठेवले.

मिश्रण थोडे थंड झाल्यावर दोन चमचे तूप त्यावर घातले आणि हाताला ही लावले. पण या कामासाठी सौ.ची मदत घ्यावीच लागली. सौ, मी आणि चिरंजीवाने पेढे टेस्ट करून बघितले. चिरंजीवने आंगठा वर करून पेढे स्वादिष्ट झाल्याची ग्वाही दिली. मनातल्या मनात विचार केला, काहीही म्हणा आज, सौ.ची चांगली जिरवली. मनात असा विचार करत होतो, तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम तुम्ही करू शकता. आता डोक्याची फ्यूज लाइट पेटली. सौ.ने टाकलेल्या जाळ्यात मी अलगद अटकलो होतो. शेवटी तिने रिकामटेकड्या माणसाला कामावर लावले.
पेढे

प्रतिक्रिया

Bhakti's picture

8 Aug 2022 - 6:07 pm | Bhakti

छान!
बरोबर बेसन भाजायचा सराव झाला हे सौ.नी ओळखलं :)
साखर पिठी की साधी?

धर्मराजमुटके's picture

8 Aug 2022 - 6:14 pm | धर्मराजमुटके

पेढे पाहून तोंडाला पाणी सुटले.
या रेसिपीतील दुध, दुध पावडर आणि गायीचे तुप पतंजलीचे होते ना ?
:)

मुक्त विहारि's picture

8 Aug 2022 - 6:21 pm | मुक्त विहारि

तोंपासू

यश राज's picture

8 Aug 2022 - 6:27 pm | यश राज

पेढे मस्त दिसताहेत .

कंजूस's picture

8 Aug 2022 - 6:37 pm | कंजूस

पावडरी पेढे बाजारात भरपूर आहेत.
खव्याचे करा.

धर्मराजमुटके's picture

8 Aug 2022 - 6:42 pm | धर्मराजमुटके

करतील हो. थोडा वेळ द्या. पटाईत साहेबांनी वर लिहिले आहे ना की ते पहिल्यांदाच पेढे बनवत आहेत. आतापर्यंत त्यांनी शिरा देखील बनविला नव्हता.
दुसरा नंबर बेसन लाडूंचा आहे.
एकंदरीत सगळ्यांनी त्यांना बावर्ची बनवायचा निश्चय केलेला दिसतोय.

गृहस्वामिनीचे ऐकून बेसनाचे लाडू बनवायचे की खव्याचे पेढे?

मिपाकर कोड्यात टाकायला पटाईत आहेत....

जेम्स वांड's picture

8 Aug 2022 - 7:59 pm | जेम्स वांड

औषधी दिव्य गुण युक्त वगैरे करण्याचा अट्टाहास नसल्यास सरळ म्हशीच्या दुधाचे करावेत, फॅट पर्सेंटेज जास्त असल्यामुळे घोटल्यावर जास्त रवाळ होतात मिल्क सॉलिड अन् कणीदार उत्तम चवीच्या मिठाया होतात,

रच्याकने, मिठाई फक्त गायीच्या दुधाचीच करायची ह्या हट्टा पोटी बंगाली मिठाई मध्ये पेढे ह्या प्रकाराची व्हरायटी लक्षणीयरीत्या कमी असते असे वाटते एकंदरीत.

लेखही छान आणि पेढेही छान (फोटो).

हलके फुलके लेखन आवडले. दु दु मिपाकर म्हणजे धर्मराजमुटके, वान्डोबा हे तुम्हाला गायीचे तूप, पतन्जली वगैरे विषय काढून विचलित करु पाहताहेत. पण...

तुम्ही चित्तदशा स्थिर ठेवा. गेस्टाल्ट बदला. मग बघा कसा मझा येईल.

- गविसागर

गवि's picture

8 Aug 2022 - 8:33 pm | गवि

ता.क. (गायीचे)

शीर्षकही आवडले. नुसते पेढे किंवा पेढे पाककृती असे न लिहीता हे आवडले.

जेम्स वांड's picture

8 Aug 2022 - 10:44 pm | जेम्स वांड

गवि असं का हो तुमचं,

मी बोललेला एक शब्द खोटा असेल तर सांगा, फॅट टक्केवारी ते बंगाली मिठायांचे एनालीसिस, खोट असल्यास आम्हाला पावशेर पेढे लागू सर

&#128546 &#128546 &#128546

&#128540 &#128540 &#128540

गवि's picture

8 Aug 2022 - 10:56 pm | गवि

फक्त पावशेर पेढे?
तुमची म्हैस कोंकणातली दिसते.

बाकी या निमित्ताने अतिअवांतर. रत्नागिरीत एस्टीस्टँडास लागून पस्तीसेक वर्षांपूर्वी हेळेकर नावाचे शिक्क्याचे मोठे पेढे मिळत. आता माहीत नाही.

कुठून काय आठ्वेल सांगता येत नाही.

आणखी एक. कोंकणात लहानपण गेल्याने असेल पण व्यक्तिगत आवड म्हणजे साखरेचे प्रमाण सढळ असलेले ते खुटखुटीत गडद रंगाचे लहान चपटे पेढे. देवस्थानांच्या बाहेरील स्टॉल्सवर असतात. किंवा छोट्या गावातल्या स्वस्त मिठाई दुकान/ हाटेलातील बरणी इत्यादि ठिकाणी.

मलईदार, मऊ, अगोड असे पेढे जे रुढ अर्थाने दर्जेदार मानले जातात ते विशेश आवडत नाहीत.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 8:58 am | जेम्स वांड

मलईदार, मऊ, अगोड असे पेढे जे रुढ अर्थाने दर्जेदार मानले जातात ते विशेश आवडत नाहीत.

गोडमिट्ट, ब्राऊन, जिभेवर ठेवला पेढा की साखर कारखानाच आठवणार असला मामला, मला वाटतं महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक देवस्थानात असे पेढे मिळतातच, आजकाल नुसता घोटलेला खवा टाईप गोड मावा पण मिळतो अल्युमिनियम किंवा स्टीलच्या मोठ्या पातेलीत तो पाहिजे त्या वजनानुसार कापून देतात, तो पण मस्त लागतो गोड एकदम

चौकस२१२'s picture

9 Aug 2022 - 9:46 am | चौकस२१२

गोडमिट्ट, ब्राऊन, जिभेवर ठेवला पेढा की साखर कारखानाच आठवणार
एकदा वाईला देवळा समोरील दुकानात विचारले फिके पेढे आहेत का? .. "हो आहेत कि हे काय डार्क आणि फिके असे उत्तर मिळाले ... रंग फिका होता पण म्हणजे फक्त खवा कमी घोटलेला बाकी साखर तेवढीच ! घेऊन पस्तावलो

हे म्हणजे "सुती बंडी आहे की विचारले" ... तर दुकानदाराने ६५% पॉलिएस्टर / ३५% सुती बंडी दाखवली आणि म्हणाला " आहे कि सुती " ३५%

येथेही केशर घेताना असेच होते... बऱ्याच भारतीय दुकानात ते अगदी बाहेर इतर सुपारी बरोबर ठेवलेले असते .. असे ठेवले आहे म्हणजेच ते कमी दर्जाचे आहे हे कळते
खरे चांगले केशर सोन्यासारखे कोय=नंतर चाय मागे काडी कुलुपात असले तर ते खरे दर्जेदार केशर

पदराने घेतं पण बरेचदा असेच, शुद्ध कातडी आहे का ( लेदर आहे का ) असे विचहरले कि सरळ हो असे उत्तर येते पण असते कृत्रिम लेदर

असो पेढयांपासून चपलांपर्यंत गेलो क्षमस्व

परत पेढ्यांकडे वळू

लग्नातले पेढे आणि त्याची ते कागद आठवले
लग्नात दिले जाणार्या बुंदीच्या लाडवांपेक्षा ते पेढे जास्त आवडायचे का कोण जाणे ! खर तर गोड आवडणाऱ्याने असा भेदभाव करू नये म्हणा

चौकस२१२'s picture

9 Aug 2022 - 9:48 am | चौकस२१२

कोय=नंतर चाय मागे काडी कुलुपात
" काउंटर मागील कडी कुलुपात" असे वाचावे

गोकुळ खाल्ले आहेत की नाही?

आजही मी संधी मिळाली तर रत्नागिरीतून गोकुळ चे पेढे घेऊन येतो नुसते खायला..

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Aug 2022 - 8:45 am | ज्ञानोबाचे पैजार

कोल्लापुरात गेलो की हटकून गोकुळचे पेढे घेतोच,
गोकुळ सारखेच किंवा त्याहुन थोडेसे सरस कोयना डेअरीचे पेढे असतात,
कराडच्या अलिकडे हायवेवरच कोयना डेअरी आहे त्यांच्या आउटलेटला भेट दिल्याशिवाय गाडी पुढे जायला नकार देते.
हल्ली पुण्यातही बर्‍याच ठिकाणी हे पेढे मिळतात असे तिथेच कळाले होते पण कधी मिळाले नाहीत.
पैजारबुवा,

बरीच वर्षे रत्नागिरीस अजिबात जाणे न झाल्याने गोकुळ आणि रत्नागिरीचे काय नाते जुळलेय ते माहीत नाही. गोकुळ म्हणजे कोल्हापूर अशीच समजूत.

गोकुळ ब्रँड दुधाच्या बाबतीत आता खूप मोठा झालाय. मुंबईपर्यंत दूध येते. बाकी कोल्हापूर साईड्ला वारणा हा आणखी एक बाहेरही प्रसिद्ध झालेला ब्रँड. चितळेही भिलवडीचे.

खेरीज बाहेर न पसरलेले काही लोकल म्हणावेत असे यळगूड, थोटे वगैरे आहेत तिकडे.

प्रचेतस's picture

11 Aug 2022 - 9:12 am | प्रचेतस

कुंथलगिरी देखील आहे :)

इकडे कात्रजचे पेढे देखील भारी असतात.

डँबिस००७'s picture

8 Aug 2022 - 9:11 pm | डँबिस००७

विवेकजी,
छान प्रयत्न !!

चित्रगुप्त's picture

8 Aug 2022 - 11:07 pm | चित्रगुप्त

विवेकपंत, लेखन आवडले. पेढ्यापासून गोड सुरुवात केलीत हे उत्तम. आता पेढ्यांचे वेगवेगळे प्रकार, उदाहरणार्थ मथुरेचे खरपूस भाजलेले पेढे, कंदी पेढे, आणखी जे काय प्रकार असतील ते वगैरे.
अमूलचे 'भैस का दूध' वापरून खवा करण्यापासून सुरुवात करून बघितलीत, तर ते मिपावर नक्की टाका. शुभेच्छा.
.

चौकस२१२'s picture

9 Aug 2022 - 6:50 am | चौकस२१२

पुणे, ठाणे अनि मुम्बै येथे कमि गोड पेढे कुथे मिळतिल अनि ते सुध्हा पुर्ण दुधपसुन खव्याचे , दुध भुकटि चे नकोत
" फिके पेढे "

... तुमचा हा प्रतिसाद वाचून या अजरामर काव्याची आठवण झाली !!

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

मी गुगल मराठी वर टंकलेखन करतो आणि मग ते चिकटवतो... बरेचदा कहितरि विचित्र शब्द होतात .. मग परत टंकित करण्याचा कंटाळा येतो ... मुद्दामून विचित्र आणि बोबडं लिह्ण्याचा कोणताही विचार नसतो ,

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 9:34 am | जेम्स वांड

मग परत टंकित करण्याचा कंटाळा येतो

आळस अन् कंटाळा त्यागून टाका मातृभाषा उत्तम लिहिल्यास आपणांस व वाचकांस समसमान आनंद होईल असे म्हणतो.

मान्य पण गुगल टन्कन सोपे कसे करायचे ? उच्चाराप्रमाणे लिहितो बरेचदा "वर" लिहिताना "वॉर" होते !

बॅकस्पेस दाबून नको असलेले काना-मात्रा-उकार-वेलांटी काढून टाकायचे.

आणखी एक निरीक्षण, WAR लिहिल्यास वॉर येते, इंग्रजी शब्द समजून. पण VAR लिहिल्यास वर येते.

छे हो, तुमच्या लिखाणाबद्दल टिप्पण्णी करायची नव्हती. पण तुमची ओळ वाचली आणि झटकन तो धागा आठवला म्हणून लिंक दिली ईतकंच.

मराठीत टंकायला गमभन हा सर्वात उत्तम पर्याय आहे. ईथे, मिसळपाव वर, टंकून हवं तिथे डकवायचा उद्योग करावा लागतो खरा. पण दर पाच शब्दांमागच्या गुगल ईनपूटच्या झटापटीपेक्षा हे परवडलं.

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

कॉमी's picture

9 Aug 2022 - 9:43 am | कॉमी

छान खुसखुशीत लेख.
पेढे आवडत नाहीत.

विवेकपटाईत's picture

9 Aug 2022 - 10:18 am | विवेकपटाईत

प्रतिसादसाठी सर्वांना धन्यवाद। बाकी माझे चित्त स्थिर आहे। आमच्या स्वर्गीय वडिलांवर गांधीजी आणि संघाच्या स्वदेशी विचारधारेचा प्रभाव होता. पतंजलि जन्मापूर्वी पासून माझ्या घरात स्वदेशी वस्तूच येत होत्या. आता सर्व किराणा आणि घरातल्या वस्तु पतंजलि आणि स्वदेशी कंपन्यांच्या येतो (90 टक्केपेक्षा जास्त). पुढील पिढी बहुतेक स्वदेशी शिक्षा ग्रहण करेल. दोन फोटो आणखीन
पातळ मिश्रण मिश्रण

धर्मराजमुटके's picture

10 Aug 2022 - 10:09 am | धर्मराजमुटके

देख रहे हो ना (गवि) बिनोद ?
मै धागे को भटका नही रहा था !

मान गये.. चाराच नही उरा.

राघव's picture

17 Aug 2022 - 1:50 pm | राघव

प्रयोग उत्तमरित्या सफल झालेला दिसतोय! मस्त दिसताहेत पेढे.

स्वगतः आता पेढे खाणे आले! राघवा, पोटाचा घेर वाढण्यास मिपाच दोषी आहे असे म्हणू नकोस म्हणजे मिळवली! ;-)

कॅलक्यूलेटर's picture

9 Aug 2022 - 10:32 am | कॅलक्यूलेटर

वा! मस्त

श्वेता व्यास's picture

9 Aug 2022 - 12:07 pm | श्वेता व्यास

व्वा! छान दिसत आहेत पेढे.

MipaPremiYogesh's picture

9 Aug 2022 - 8:42 pm | MipaPremiYogesh

वाह मस्तच , अवांतर मला चाळीसगांव चे पेढे आठवले. चाळीसगांव चे दूध खूप अप्रतिम quality चे होते आणि त्याचे पेढे अशक्य रवाळ असायचे.. नंदन डेअरी..अजूनही कोणी चाळीसगांव वरून येणार असल्यास त्यांना आणायलाच लावतो.

पर्णिका's picture

10 Aug 2022 - 3:08 am | पर्णिका

एकदम बढिया !
एकदा मायक्रोवेव्हमध्ये करून बघा, झटपट होतात.

तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम तुम्ही करू शकता.

Lol

विजुभाऊ's picture

10 Aug 2022 - 10:05 am | विजुभाऊ

पेढे म्हणजे फक्त आमच्या सातारचे कंदी पेढे.
बाकी ठिकाणचे पेढे हे पेढेच नाहीतच नुसत्या खव्याचे भाजलेले गोळे.

या धाग्यावरही मोदी आणणे आवश्यक होते का? ;-)

जेम्स वांड's picture

11 Aug 2022 - 7:40 am | जेम्स वांड

कंदी पेढे कधीच आवडले नाहीत नुसते फिके फिके असतात कायतरी, कंदी पेढा बेस्ट उपयोग म्हणजे गोडमिट्ट घोटलेल्या दुधात चारपाच कुस्करून घालून ते अजून घट्ट करणे सोडून उपयोग नाही, पेढे खावे ते मथुरेचे मलई पेढे(च).

आमच्याकडे विषयानुरूप पण धागा भरकटवून मिळेल

(उद्योजक) वांडो

द्या टाळी. कंदी पेढे हा ओव्हररेटेड प्रकार आहे.

आणि मुळात सांगलीचे श्री. भगवानलाल कंदी यांचे पेढे हेच मूळ कंदी पेढे असे आम्ही मानतो. पेढ्यांचे नाव कंदी असताना बनवणार्याचे नाव कंदी असणेच जास्त सुसंगत. त्याचे नाव मोदी असल्यास कसे मानावे?

उपरोक्त परिच्छेद हा एक विनोद आहे. कंदी पेढ्यांचे मूळ जनक म्हणून मोदी* यांनाच मान्यता आहे हे माहीत आहे. बाकी खखोदेजा.

*घर घर मोदीवाले मा. मोदीजी ते वायले. हे वायले.

जेम्स वांड's picture

11 Aug 2022 - 9:50 am | जेम्स वांड

*घर घर मोदीवाले मा. मोदीजी ते वायले. हे वायले.

ये डर बना रहना चाहिए वरणा तुम लोक धागा भरकटाके पेढा कुस्करता हय वाटेल तैसा.

मोदी पण ओव्हररेटेड झालाय (पेढेवाला) सातारा आमचं असंही घरगुती गाव, उगाच घरी जाळ आमटी/ भात/ भाकरी/ श्याक असे काहीतरी झणझणीत करावे अन् दोनेक भाकरी मुरगळून नंतर तंबाखूचा बार लावून सिंपल पडून रहावे असे आमचे खरेखुरे उरलेले गाव असते.

कोल्हापुरात पण तिखट खातो ह्याचाच अतिरेकी प्रचार अन् हवा केल्याचे फील होते, सरासरी कोल्हापुरी खातं असेल त्याच्या तोडीस तोड खाणारे लोक साताऱ्यात सापडतील, त्याच्या दीडपट तिखट खाणारे सीमांध्र प्रदेशात अन् रायलसीमा भागात सापडतील अन् त्याच्या कैकपट जास्त तिखट खाणारे नागालँड/आसाम मध्ये सापडतील, ते एक असोच.

ये डर बना रहना चाहिए वरणा तुम लोक धागा भरकटाके पेढा कुस्करता हय वाटेल तैसा.

धन्य आहात प्रभू! _/\_ :-)

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 6:39 pm | जेम्स वांड

कल्याणमस्तू वत्स.

हे वायले.

जगप्रसिद्ध मिठाई शास्त्रज्ञ आहेत का हे?

pedhe

मदनबाण's picture

12 Aug 2022 - 5:39 pm | मदनबाण

वाह्ह...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 6:14 pm | रंगीला रतन

पेढे आवडले हो काका.

विवेकपटाईत's picture

17 Aug 2022 - 10:14 am | विवेकपटाईत

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार

कपिलमुनी's picture

17 Aug 2022 - 1:55 pm | कपिलमुनी

कोणत्या कंपनी ची ??

कर्नलतपस्वी's picture

17 Aug 2022 - 4:25 pm | कर्नलतपस्वी

आप्पा हलवाई आणी भद्रया मारूतीचे पेढे भारी चविष्ट.

चलत मुसाफिर's picture

30 Dec 2022 - 8:53 pm | चलत मुसाफिर

जरूर खाऊन पहा