प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 4:22 pm

हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे.
माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?).

ok

आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श !
कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
....
माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित.

तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ......
लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू.

तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा.

उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला !
म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता.

मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो.

त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे.

अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात.
मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना.

तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी.
या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही.
दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे.

मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर !
पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल !

तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो.

माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले.

तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे.

तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला.
तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते.

त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा.
...
माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये !

अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो.
********************************

समाजलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

11 Jul 2022 - 10:03 am | कुमार१
गामा पैलवान's picture

11 Jul 2022 - 6:22 pm | गामा पैलवान

कुमारेक,

तसं बघायला गेलं तर गाव आणि स्थानक खूपदा वेगळ्या ठिकाणी असतात. कोलाड हे कोकण रेलवे वरचं पाहिलं स्थानक वरसगावात आहे. पुढील स्थानक इंदापूर हे तळाशेत येथे आहे. त्यापुढील स्थानक माणगाव हे माणगावाच्या बरंच बाहेर आहे.

आ.न.,
-गा.पै.

ही image खूपच कमी दर्जाची photoshopped आहे!

कुमार१'s picture

11 Jul 2022 - 6:33 pm | कुमार१

स्पष्टीकरणाबद्दल.
मलाही ते पटत नव्हते, परंतु बरेच ठिकाणी तसे संदर्भ मिळाले.

कुमार१'s picture

14 Jul 2022 - 10:57 am | कुमार१

या पुस्तकाचे शीर्षक रोचक वाटले.

ok

navvy = बांधकाम-मजूर.

कुमार१'s picture

15 Jul 2022 - 9:02 am | कुमार१

अखेर पुणे सोलापूर इंटरसिटी सुपरफास्ट इंद्रायणी चालू होणार 18 जुलैपासून…
https://www.punekarnews.in/pune-solapur-pune-train-services-to-be-resumed/
एकदाची खरोखर रुळांवरून जाऊ लागली म्हणजेच विश्वास बसेल :)
इतके ताणले होते.....

सिकंदराबाद शताब्दी १० ऑगस्टपासून चालू व्हायची बातमी काल आली आहे

कुमार१'s picture

19 Jul 2022 - 10:44 am | कुमार१

पुणे सोलापूर इंटरसिटी सुपरफास्ट या गाडीने आज प्रवास करतोय.
CC ला शताब्दी चे डबे लावलेत.
स्वच्छ व मोठ्या काचा.
छान सुधारणा

कुमार१'s picture

19 Jul 2022 - 2:10 pm | कुमार१

या नव्या चेअरकारची क्षमता 78 आहे. पूर्वीपेक्षा पाच ने वाढली आहे.
दोन्हींचे गणित गमतीदार आहे

१. पूर्वीच्या डब्यांमध्ये तीन बाय दोन पद्धतीच्या पंधरा रांगा असायच्या परंतु 3 व 73 क्रमांकच नसायचे कारण दोन्ही दाराजवळील मधले आसन काढून टाकले जायचे.

२.आताच्या डब्यात कुठलाही आसन क्रमांक गाळलेला नाही परंतु फक्त दोन्ही दारांजवळ दोन बाय दोन रचना आहे
16 रांगा >>> 78 आसने

कंजूस's picture

19 Jul 2022 - 4:49 pm | कंजूस

NTES, NTES SITE,
IRCTC SITE, APP गचाळ झालेली आहेत.

कुमार१'s picture

19 Jul 2022 - 5:00 pm | कुमार१

ॲप्सचा माझा अनुभव कधीच चांगला नाही.
त्यापेक्षा वेबसाईट बरी

कंजूस's picture

19 Jul 2022 - 5:19 pm | कंजूस

वारंवार फोन नं, इमेल अपडेट नाही असं येत राहतं. मग ते करायचं.
Ntes site https://enquiry.indianrail.gov.in/mntes/
या मध्येही खूप गोंधळ आणि चुका आहेत.
Twitter वर कळवलं पण सुधारणा नाही.

त्यापैकी एक म्हणजे "ब्रॅडशॉज रेल्वे गाईड"

ऑक्टोबर १८३९ ते मे १९६१ अशी ही गाईड पब्लिश झाली. ब्रॅडशॉज गाईड ह्या कॉंटिनेंटल (युरोप), ईजिप्त, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया ह्या देशांतील तसेच इंग्लंड स्कॉटलंड अँड वेल्स मिळून असलेल्या "ग्रेट ब्रिटन" मधील रेल्वे टाईमटेबल्स, फिरण्याच्या जागा, कनेक्टिंग ट्रेन्स इत्यादी प्रकाशित करत असत.

तत्कालीन भारतासाठी ब्रॅडशॉज गाईड प्रकाशित करणाऱ्या डब्ल्यु जे ऍडम्स अँड कंपनीने खालील "गाईड बुक्स" काढल्या होत्या.

१. ब्रॅडशॉज हँडबुक टू द बंगाल प्रेसिडेन्सी अँड वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (इसवीसन १८६४)

२. ब्रॅडशॉज हँडबुक टू द बॉम्बे प्रेसिडेन्सी अँड नॉर्थ वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (इसवीसन १८६४)

आणि

३. ब्रॅडशॉज इलस्ट्रटेड हँडबुक टू द मद्रास प्रेसिडेन्सी अँड द सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (१८६४)

ह्या गाईडबुक्स प्रकाशित केल्या होत्या.

मध्यंतरी टीपीकल ब्रिटिश गब्दूल गोट्या शोभणारा एक ट्रॅव्हलर ती गाईड बुक अन त्यातील वर्णन केलेल्या जागा व स्टेशने धुंडाळत भारत अन बांग्लादेशात फिरल्याची एक डॉक्युमेंट्री पण बीबीसी अर्थ वर आली होती (नाव विसरलो आता)

ब्रॅडशॉज गाईड अन टाईमटेबल्स जवळपास खालील प्रमाणे बांधणीचीच असत :-

.

.

कुमार१'s picture

17 Jul 2022 - 7:59 pm | कुमार१

ब्रॅडशॉज गाईड >>>
सुंदर माहिती.

मी ते घेणार होतो एक आठवण म्हणून (१५०रु)
पण तो विक्रेताच म्हणाला "अंकल मत लो, ये सब जानेवाला है। " मग त्याचा सल्ला धुडकावून खरेदी केले नाही.

जेम्स वांड's picture

19 Jul 2022 - 10:37 am | जेम्स वांड

ब्रिटनमध्ये उष्णतेच्या लाटेने झालेली अवस्था

ब्रिटनमध्ये टेम्प्रेचर्स इतकी वाढली आहेत की तिथल्या रेल ट्रॅकची प्री स्ट्रेस्ड टेम्प्रेचर रेझिस्टन्स लेव्हल पण क्रॉस झाली आहे, इंग्लंडमध्ये रेल्स (रूळ) लो टेम्प्रेचर्ससाठी प्री स्ट्रेस्ड असतात हायसाठी नाही त्यामुळे उष्मालाटेमुळे आता युके मध्ये रेल्वे स्पीड्स पण कमी केले गेले आहेत, नुसत्या रेल्स व्हलनरेब्ल होण्याची शक्यता नाही तर ओएचई केबल्स पण लोंबण्याच्या लेव्हल पर्यंत एक्सपांड होऊ शकतात म्हणे.

कुमार१'s picture

19 Jul 2022 - 2:12 pm | कुमार१

जागतिक तापमान बदलाचे वेगवेगळे परिणाम.....

जेम्स वांड's picture

19 Jul 2022 - 2:45 pm | जेम्स वांड

ते जागतिक तापमान वाढ वगैरे सगळ्या डाव्या विचारसरणीच्या अंधश्रद्धा अन थोतांडे असतात

गामा पैलवान's picture

19 Jul 2022 - 7:06 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

हो, खरं आहे. रेलवेच्या रुळांप्रमाणे डांबरावरही अनिष्ट परिणाम होतात. प्रसंगी मऊही पडतं. ते टाळण्यासाठी गेले काही दिवस रेती टाकताहेत.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

20 Jul 2022 - 11:50 am | जेम्स वांड

उन्हाळ्यात तर आपल्याकडेही विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणाच्या काही भागात हायवेवर डांबर वितळून त्यात ट्रकच्या चाकोऱ्या छापलेल्या बघायला मिळतात.

कुमार१'s picture

21 Jul 2022 - 8:32 am | कुमार१

उष्णतेचे ही लाट जर्मनीत पोचली आहे

तिथे तापमान 40 C पर्यंत गेल्याच्या बातम्या आहेत.

कुमार१'s picture

23 Jul 2022 - 4:29 pm | कुमार१

अन्य परिणाम बघा:

एक प्रवासी रात्री निघणाऱ्या गाडीत बसला व झोपून गेला. पहाटे उठून पाहतो तर काय?
गाडी आहे त्याच स्थानकातून निघालेली नव्हती !

कुमार१'s picture

26 Jul 2022 - 12:16 pm | कुमार१

युरोपमधील रेल्वे मार्गांचे अतिउच्च तापमानात संरक्षण कसे करता येईल याबद्दल इथे काही माहिती आहे :
https://interestingengineering.com/railroad-tracks-struggling-under-heat

Solid concrete slabs अशी यंत्रणा वापरावी असे त्यांनी दिले आहे. मात्र ही चौपट खर्चिक असते.

स्थापत्य अभियंता अधिक प्रकाश टाकू शकतील.

कुमार१'s picture

21 Jul 2022 - 7:30 pm | कुमार१

इंग्लंडमध्ये ट्रेनचे सिग्नल्स वितळत आहेत

उष्णतेची लाट चालूच आहे

https://www-newprocessfromhome-com.cdn.ampproject.org/v/s/www.newprocess...

कुमार१'s picture

22 Jul 2022 - 3:54 pm | कुमार१

भारतातील पहिली नदीखालून जाणारी मेट्रो लवकरच तयार होत आहे. बंगालमधील हुगळी नदीच्या खालून हा मार्ग आहे

भारतातल्या पहिल्या 'भुयारी' मेट्रो रेल्वेचा मान कोलकात्याकडे आहे, भवानीपूर ते एस्प्लनेड हा मार्ग १९८४ पासून वापरात आहे

आता हुगळीखालून शहराचे पूर्व-पश्चिम भाग जोडण्यात येतील.

गामा पैलवान's picture

22 Jul 2022 - 6:00 pm | गामा पैलवान

मुंबईत ठाणेखाडी व वसईखाडी यांच्याखालनं भुयारी मार्ग बांधले पाहिजेत. कितपत व्यवहार्य आहेत ते माहित नाही.
-गा.पै.

कुमार१'s picture

23 Jul 2022 - 8:46 am | कुमार१

मालगाड्यांमधून जो प्रचंड कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो तो वातावरणात जाऊन न देता तो पकडून त्याचे द्रव रूपांतर करून अन्य प्रकारे निचरा करता येईल.
या तंत्रज्ञानाबाबत इथे काही माहिती आहे

सर्व समजले नाही. या विषयातील तज्ञ अधिक सांगू शकतील.

कुमार१'s picture

26 Jul 2022 - 9:38 am | कुमार१

आता प्रगती एक्सप्रेसलाही विस्टा डोम कोच बसवले आहेत
https://www.punekarnews.in/pragati-express-third-train-between-pune-mumb...

जेम्स वांड's picture

26 Jul 2022 - 10:14 am | जेम्स वांड

म्हणे ट्रेन १८ उर्फ वंदे भारत ट्रेन सेट्स चालवणार आहेत ?

कुमार१'s picture

27 Jul 2022 - 8:40 pm | कुमार१

ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी भाड्यातील सवलत वयाच्या 70 वर्षानंतर करावी तसेच ती फक्त स्लीपर क्लास पुरती ठेवावी असा विचार रेल्वे बोर्ड करीत आहे

ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी भाड्यातील सवलत वयाच्या 70 वर्षानंतर करावी तसेच ती फक्त स्लीपर क्लास पुरती ठेवावी असा विचार रेल्वे बोर्ड करीत आहे

चमकोगिरीचे उत्तम उदाहरण !
मी पहिला जिथे राहत होतो तिथे एक राजकारणी जून महिना आला की मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करायचा. त्यासाठी महिनाभर जिकडे तिकडे जाहिरातबाजी करायचा. मग वह्यावाटपाच्या दिवशी पोरे पोरी चांगली दोन चार तास उन्हात तापेपर्यंत रांगेत उभी राहत. चांगली भाषणे झोडून झाली की मग प्रत्येकी एक किंवा दोन वह्या असे मोफत वही वाटप व्हायचे. त्यातही ओळखीतल्यांना मिळायचा आणि अर्धी जनता तशीच बोंबलत निघून जायची. इतका राग यायचा म्हणून सांगू त्याचा की विचारता सोय नाही. ही फुकटची नाटके करण्यापेक्षा एक दोन गरजु मुलांना दत्तक घेऊन त्यांचा खर्च केला असता तर त्यांचे आयुष्य तरी मार्गी लागले असते पण यांना झळकायची खाज फार !
आतापर्यंत बायका रेल्वेत ५८ व्या वर्षी जेष्ठ नागरीक होतात, बाप्ये ६० वर्षी. हिच माणसे महाराष्ट्र एस.टी .मधे ६५ वर्षी जेष्ठ नागरीक होतात. दुसर्‍या राज्यात गेले की परत वयात बदल.

उद्या ९० वर्षे वयाच्या प्रवाशाला रेल्वे प्रवासभाड्यात ९०% सुट देणार किंवा १०० वर्षे वयाच्या प्रवाशाला १००% सुट असली बिनकामाची योजना देखील प्रत्यक्षात आली तर नवल वाटायला नको.

कोकणात गणपती साठी जाणार्‍यांना टोल मधे माफी, पंढरपूर ला वारी ला जाणार्‍यांना टोल माफी, हज ला जाणार्‍यांना अजून काही वेगळे अनुदान. नुसता पोरखेळ आहे.

जेम्स वांड's picture

27 Jul 2022 - 10:45 pm | जेम्स वांड

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या काही छबी

.

.

काही उत्तम अभियांत्रिकीच्या नमुन्यात मोडणाऱ्या ब्रिटिशकालीन महिरपी, ट्रसेसचा कलात्मक उपयोग, आणि टिकण्यासाठी बनवलेले स्ट्रक्चर.

.

ह्या जुन्या स्ट्रक्चरला कालानुरूप आधुनिकतेचा फील देणारा हा पॉड हॉटेलचा निऑन बोर्ड

.

.

मागच्या जेनरेटरचा प्रचंड आवाज होतो.

जेम्स वांड's picture

31 Jul 2022 - 12:48 pm | जेम्स वांड

मुंबई सेंट्रल - इंदौर अवंतिका एक्सप्रेस होती, तिच्यावरच सोडायला आलो होतो काही कंपनीच्या क्लायंट लोकांना.

कुमार१'s picture

30 Jul 2022 - 5:52 pm | कुमार१

छानच. धन्यवाद.
….
ऐकावे ते नवलच !
बहुतेक जग अधिकाधिक वेगवान रेल्वे गाड्या तयार करण्याच्या मागे आहे परंतु अमेरिकेतील ही भन्नाट कल्पना बघा.
१९४० मध्ये त्यांच्या ट्रेन्स ज्या वेगाने धावत होत्या त्यापेक्षा कमी वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स त्यांना आता चालू करायच्या आहेत !

कुमार१'s picture

31 Jul 2022 - 6:38 pm | कुमार१

सध्या उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्पाचे काम जोरात चालू आहे.
या मार्गावर एकूण 38 बोगदे असणार आहेत.
त्यातील एक महत्त्वाचा बोगदा आत्ता पूर्ण झाला
ok

या पुढचा एक बोगदा १२.७५ किलोमीटर लांब असणार असून तो भारतातील सर्वात लांब बोगदा असेल.

कंजूस's picture

31 Jul 2022 - 6:56 pm | कंजूस

जोडणेच मोठे काम आहे. कोरोना बंदीमुळे लांबले. ते २०२५ पर्यंत होईल.

जुनी मुंबई - पुणे इंद्रायणी काही काळ सोलापूरपर्यंत चालवत होते ती एकाच नंबराने पुन्हा चालू करायला हवी. उरुळी स्टॉपसह.

कुमार१'s picture

4 Aug 2022 - 7:23 am | कुमार१

लोणावळा पुणे दौंड मार्गावरील रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी संबंधित मार्गावर थिकवेब स्विच बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर इथून जाणाऱ्या गाड्यांची गती वीस किलोमीटर प्रतितास वाढेल. तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना बसणारे झटकेही कमी होतील.

( बातमी : छापील सकाळ ३/८/२२)

गेली दोन वर्षे आयआयटी मुंबईने विशेष अभ्यास करून भारतीय रेल्वेसाठी "शून्य बेस वेळापत्रक" योजले होते. त्यामध्ये रेल्वेला होणारा तोटा कमी करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले होते:
१. रेल्वे थांबा कमी करणे
२.पॅसेंजर गाड्या कमी करून त्यांचे एक्सप्रेस मध्ये रूपांतर करणे आणि
३.कमी उत्पन्न असणाऱ्या गाड्या बंद करणे

परंतु सध्या तरी या सूचना पूर्णपणे गुंडाळून पूर्वीप्रमाणेच कारभार चालू आहे.

कुमार१'s picture

10 Aug 2022 - 8:26 pm | कुमार१

आता पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला विस्टाडोम कोच लावला आहे.
असा कोच असणारी मध्य रेल्वेची ही पाचवी गाडी आहे

जेम्स वांड's picture

10 Aug 2022 - 10:04 pm | जेम्स वांड

हे विस्टाडोम कोचेस आता पैसा कमविण्यासाठी केलेला पाजीपणा वाटू लागला आहे, कोकण रेल्वे, पूर्वोत्तर सीमा रेल्वे, ईस्ट कोस्ट रेल्वे वगैरे प्रेक्षणीय रूट किंवा मुंबई पुण्यासारख्या प्रवासात विस्टाडोम लावले तर समजू शकतो, पण वाटेल तिथं कश्याला लावतात ? बरं पैसा प्रीमिअम भरून बसायचं ह्यात, onward journey ला ठीक आहे return मध्ये तर कित्येकदा रेक अरेंजमेंट करण्यातही कंटाळा रेल्वेला म्हणजे premium charges भरून पूर्ण प्रवासात लॉबी मध्ये उभं राहून बघायचं तरी काय ? तर लोकोमोटिवचे डब्याला जोडलेले ढुंगण...

काय अर्थ ह्याला !

गामा पैलवान's picture

13 Aug 2022 - 12:36 pm | गामा पैलवान

अलिशान अंगणवाडी नाही म्हणून अतिरिक्त पैसे मोजून अलिशान ढुंगणवाडी बघा.
-गा.पै.

कुमार१'s picture

13 Aug 2022 - 10:31 am | कुमार१

प्रवाशाचे उतरायचे स्थानक जर मध्यरात्री येत असेल तर रेल्वेने पूर्वसूचना फोनकॉलची सोय केली आहे. नोंदणी करावी लागते. २० मिनिटे आधी फोन येईल.

कुमार१'s picture

14 Aug 2022 - 2:20 pm | कुमार१

येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या बेडशीट्स राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्गाच्या एसी कोचमध्ये 15 ऑगस्टपासून पुरविल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

कुमार१'s picture

14 Aug 2022 - 2:30 pm | कुमार१

डिझेल इंजिनच्या जागेत स्वच्छतागृह नसल्याने चालकांची गैरसोय होते. आता १२० विद्युत इंजिनात ती सोय केली आहे.
महिला चालकांची संख्या आता १०००वर पोचल्याने हा विषय महत्वाचा ठरला आहे.

कुमार१'s picture

17 Aug 2022 - 12:46 pm | कुमार१

भारताची सर्वात लांब (२९५ वाघिणी ) व २५९६२ टन वजन वाहणारी मालगाडी.
इथे पाहू शकता

अनिंद्य's picture

17 Aug 2022 - 1:42 pm | अनिंद्य

लांबलचक मालगाडीला 'वासुकी' नाव ... कल्पक !

कुमार१'s picture

19 Aug 2022 - 11:28 am | कुमार१

या भागाला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवा धागा काढत आहे.
भाग २

सर्वांचे तिकडे स्वागत !