श्रीगणेश लेखमाला २०२२

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
10 Jul 2022 - 4:25 pm
गाभा: 

श्रीगणेश चतुर्थी हा आपल्या मिपाचा स्थापना दिन. त्या निमित्ताने दर वर्षी आपण गणेशोत्सवादरम्यान श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो.
विषयाचे काहीही बंधन नाही. फक्त श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेले लेखन इतर संकेतस्थळांवर वा सामाजिक माध्यमांवर पूर्वप्रकाशित नको. लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा.
sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल ॲड्रेसवरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. आपल्या घरच्या गणपतीचे फोटो, नैवेद्याच्या पाककृती, मिपाकरांनी किंवा कुटुंबीयांनी काढलेली चित्रे, गौरीपूजनाची सजावट हे नक्की पाठवा.
आलेल्या लेखनातील लेखमालेला साजेसे लेखन निवडून ते प्रकाशित केले जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय आयोजक मंडळाचा असेल.

श्रीगणेश लेखमाला गणेश चतुर्थीला - म्हणजे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहील. लेखन पाठवण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२२.

लेख अथवा फोटो पाठवण्यात काही अडचणी किंवा काही शंका असल्यास याच धाग्यावर प्रतिसादातून विचारू शकता.

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2022 - 4:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

गलेमा झकास होऊन जाऊदे

पैजारबुवा,

कुमार१'s picture

10 Jul 2022 - 5:35 pm | कुमार१

शुभेच्छा !

सौंदाळा's picture

10 Jul 2022 - 7:43 pm | सौंदाळा

२००७ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी 'मिसळपाव' चालू झाले.
आता मिपाचा दीडदशकी वर्धापनदिन ३१ ऑगस्टला आहे.
श्रीगणेश लेखमालिकेची आतुरतेने वाट बघत आहे.

उत्तमोत्तम लेखांची मेजवानी १० दिवस मिळेल यात काहीच शंका नाही. मिपाकरांनी लिहिते व्हावे पटापट.

अनिंद्य's picture

14 Jul 2022 - 7:54 pm | अनिंद्य

लेखमालेला, नवनवीन लेखकांना शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2022 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गलेमासाठी नवं लेखन करीन. मागच्या वेळी रुद्रेश्वरावर लिहिलेले यावेळी आणखी एका लेणीवर लिहिण्याचा प्लॅन.
देवा गणेशा, लिहायला सपोर्ट कर. बाकी. हाय काय आणि नाय काय. मिपाला अ‍ॅडव्हानमधे शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

17 Jul 2022 - 7:38 pm | कर्नलतपस्वी

लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा.

प्रवेशिका म्हणून काही फार्म वगैरे आहे का? का सुरु लेखन पाठवलेत चालेल.

साहित्य संपादक's picture

17 Jul 2022 - 8:14 pm | साहित्य संपादक

येथे या शब्दावर क्लिक केल्यावर साहित्य संपादक आयडीला व्यक्तिगत निरोप पाठवण्याचे पेज थेट उघडते.
पर्याय दुसरा : साहित्य संपादक या आयडी नावावर क्लिक करा. आणि प्रोफाइल मध्ये निरोप या निळ्या बटणावर क्लिक करा.
पर्याय तिसरा : (मोबाईल वर खाली आणि संगणकावर उजवीकडे) संदेश वर क्लिक करा. "नवीन संदेश लिहा" या लिंकवर क्लिक करा. To या जागेत साहित्य असे टाईप केल्यावर खाली साहित्य संपादक हा पर्याय दिसेल*. त्यावर क्लिक करा. विषय आणि मजकूर लिहून पाठवा.

*हा पर्याय कोणत्याही सदस्याला व्य नि पाठवण्यासाठी उपयोगी आहे.

मिपाचा स्थापना दिन आणि श्री गणेश लेख मालिकेसाठी भरघोस शुभेच्छा!
आधीची लेखमालिका अपूर्ण राहिल्याने नवीन काही लिहिता येईल की नाही ह्याबद्दल साशंक असल्याने त्याबद्दल नक्की सांगत नाही पण प्रयत्न नक्की करणार!

अथांग आकाश's picture

11 Aug 2022 - 12:34 pm | अथांग आकाश

x
गणपती बाप्पा मोरया!!!

बिपीन सुरेश सांगळे's picture

12 Aug 2022 - 10:18 pm | बिपीन सुरेश सांगळे

श्रीगणेश लेखमाला २०२२

सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

बिपीन सुरेश सांगळे's picture

6 Sep 2022 - 8:27 am | बिपीन सुरेश सांगळे

गलेमामध्ये सुंदर लेखन येत आहे . प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो . पण साऱ्या लेखक अन संपादक मंडळींचं खूप कौतुक आहे .