श्रीगणेश लेखमाला २०२२
श्रीगणेश चतुर्थी हा आपल्या मिपाचा स्थापना दिन. त्या निमित्ताने दर वर्षी आपण गणेशोत्सवादरम्यान श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो.
विषयाचे काहीही बंधन नाही. फक्त श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेले लेखन इतर संकेतस्थळांवर वा सामाजिक माध्यमांवर पूर्वप्रकाशित नको. लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा.
sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com या ईमेल ॲड्रेसवरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. आपल्या घरच्या गणपतीचे फोटो, नैवेद्याच्या पाककृती, मिपाकरांनी किंवा कुटुंबीयांनी काढलेली चित्रे, गौरीपूजनाची सजावट हे नक्की पाठवा.
आलेल्या लेखनातील लेखमालेला साजेसे लेखन निवडून ते प्रकाशित केले जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय आयोजक मंडळाचा असेल.
श्रीगणेश लेखमाला गणेश चतुर्थीला - म्हणजे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहील. लेखन पाठवण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२२.
लेख अथवा फोटो पाठवण्यात काही अडचणी किंवा काही शंका असल्यास याच धाग्यावर प्रतिसादातून विचारू शकता.
प्रतिक्रिया
गणपती बाप्पा मोरया
वा !
२००७ साली गणेशचतुर्थीच्या
उत्तमोत्तम लेखांची मेजवानी १०
लेखमालेला, नवनवीन लेखकांना
लिहिणार.
धागा उघडत नाही-access denied
येथे या शब्दावर क्लिक
मिपाचा स्थापना दिन आणि श्री गणेश लेख मालिकेसाठी भरघोस शुभेच्छा!
ग.ले.मा.ची वाट बघतोय!
श्रीगणेश लेखमाला २०२२
गलेमामध्ये सुंदर लेखन येत