शशक'२०२२ - चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2022 - 9:12 pm

म्हातारी भोपळ्यात बसली मुलीचा निरोप घेतला.
“ह्याचा ब्रेक आणि अॅक्सिलेटर कुठेय?”
“आई, हे गुगलचे मॉडेल आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते.”
“म्हणजे एआय ना?”
“”चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.” अस म्हटले कि गाडी पळायला लागते. ह्या गाडीला नॅचरल लँग्वेज इंटरफेस आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी पळवावी. बाय आणि टेक केअर.”
वाटेत वाघोबा दिसला. स्कूटरवर बसून वाटच बघत होता.
“म्हातारे, थांब. कुठं पळतेस?”
“आता काय झालं?”
“म्हातारे, ये भोपला मुझे दे दो.”
म्हातारीने कावा ओळखला, ऑर्डर दिली, “भोपळ्या, फास्ट फॉरवर्ड.”
सुसाट धावणाऱ्या भोपळ्यापुढे स्कूटरची काय कथा.
गंमत बघत असलेला कोल्हा म्हणाला, “वाघोबा, तू केव्हापासून भोपळ्याची भाजी खायला लागलास?”
“मूर्खा, ती भोपळागाडी पेट्रोलशिवाय धावते.”

प्रतिक्रिया

कथेचा शेवट काय झाला ते समजले नाही

प्रचेतस's picture

10 May 2022 - 9:23 am | प्रचेतस

+१

चांदणे संदीप's picture

10 May 2022 - 9:33 am | चांदणे संदीप

काहीतरी मिसींग आहे. भोपळा आणि म्हातारी हा विषय वाचल्यावर खरंतर अपेक्षा वाढल्या होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत.

सं - दी - प

अच्छा AI भोपळा !रोचक कल्पना +१

सौंदाळा's picture

10 May 2022 - 12:45 pm | सौंदाळा

+१

मोहन's picture

10 May 2022 - 1:18 pm | मोहन

+१

तर्कवादी's picture

11 May 2022 - 5:31 pm | तर्कवादी

पेट्रोल महाग झाल्याने वाघोबा स्कूटर सोडून पेट्रोलशिवाय चालणारा भोपळागाडी मागतोय असं असावं..
कथा खुसखुशीत झाली.. वाचून मस्त मनोरंजन झाले.

“म्हातारे, ये भोपला मुझे दे दो.

हे सर्वाधिक आवडलं..
अर्थातच +१

अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2022 - 7:59 pm | अमरेंद्र बाहुबली

काहीत समजली नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2022 - 8:00 pm | अमरेंद्र बाहुबली

कथेत ऊगा काहीतरीच म्हणून घेतलेला हिंदी डायलाॅग म्हणून -१

श्वेता२४'s picture

12 May 2022 - 2:00 pm | श्वेता२४

विनोदी कथा आवडली +१

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2022 - 2:29 pm | अमरेंद्र बाहुबली

मग +१

चौथा कोनाडा's picture

12 May 2022 - 2:26 pm | चौथा कोनाडा

+१

मस्त, खुसखूशीत.
झकास कल्पनारंजन !

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:48 am | तुषार काळभोर

तो एक म्हातारी अन् भोपळ्याच्या गोष्टीवरचा परिसंवाद आठवला!

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 1:41 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

सुधीर कांदळकर's picture

14 May 2022 - 8:39 pm | सुधीर कांदळकर

मस्त. वास्तवाला फारच जवळची. फारच आवडली.

पुष्कर's picture

17 May 2022 - 1:27 pm | पुष्कर

वाघोबाला ती गाडी हवी आहे, असा अर्थ वाटला मला. पेट्रोल नाही, खर्च कमी.

स्मिताके's picture

22 May 2022 - 4:39 pm | स्मिताके

+१