शशक'२०२२ - समाजप्रबोधनात अंधश्रद्धा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:19 pm

समाजप्रबोधन करणार्या साहेबांचं जोरात भाषण चालू होतं. आज साहेब धर्मावर बोलू लागले. रूढी, परंपरा, पूजा-अर्चा, देव सगळं खोटं आहे, आपण या अंधश्रद्धांमधून बाहेर पडलं पाहिजे. साहेबांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता. बसलेले श्रोते आणि मंचावरचे सर्व लोक आज साहेबांच्या या नव्या अवताराकडे आश्चर्याने बघत होते. साहेब जोषात होते. तेवढ्यात एक बाई मंचापाशी येऊन उभी राहिली. तिने साहेबांना हातही केला. साहेबांचं लक्षच नाही. मंचावर उपस्थित सहकार्यांनी बाईंना वरती बोलावलं. साहेबांना आश्चर्यच वाटलं. तू कशी काय इथं? बाई म्हणाली, आजची सभा दणक्यात व्हायला पाहिजे असा तुम्ही नवस बोललाय. तिथं सत्यनारायणाच्या पूजेची तयारी केली आहे. सभा संपली की लगेच या.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

12 May 2022 - 5:52 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

जव्हेरगंज's picture

12 May 2022 - 9:04 pm | जव्हेरगंज

=))
मजेशीर
+१

सुखी's picture

12 May 2022 - 10:18 pm | सुखी

+१

टामोलीयन's picture

13 May 2022 - 6:49 pm | टामोलीयन

फक्त समाजप्रबोधन शिर्षक पण चालले असते ..

प्राची अश्विनी's picture

15 May 2022 - 8:22 pm | प्राची अश्विनी

+1