शशक'२०२२ - मलम

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2022 - 8:58 am

गावातील पट्टीच्या पोहनार्याने मृतदेह ओढून आणला. पोलिस गाडी नी पाठोपाठ ऐंब्युलन्स निघाली.
कोवळा मृतदेह पाहून डाॅक्टरना वाईट वाटले. “पोहता येत नाही तर खोल तलावात गेलाच का?”

पांढरे शर्ट नी काळी पॅंट घालून जमलेल्यात सरांचं जोरदार आगमन झालं. “कंपनीचं प्रोडक्ट विकून तुम्ही सप्लाय चेन चा एक भाग होनार, नंतर ज्याला प्रोडक्ट विकलंय त्याने पुढे विकलं की तुम्हाला त्यातले “क्षक्ष” टक्के मिळनार, हा पहा अजय ह्याने शिकत हे केलं नी आज त्याच्या अकाऊंटला ५ लाखांचा बॅलन्स आहे.”
“मी कर्जाने पैसे घेऊन हे प्रोडक्ट घेनार नी लोकांना विकून थोडे कमावेन, तेवढंच शिकता शिकता घराला हातभार.”
“आणी ईतके पैसे परत नाही फेडले गेले तर??”

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

9 May 2022 - 10:14 am | राजाभाउ

काही कळाल नाही, म्हणजे MLM मध्ये पैसे गुतंवले आणि फेडता आले नाही म्हणुन आत्महात्या केली असं आहे का?

एमी's picture

9 May 2022 - 6:57 pm | एमी

+0.5

लिहता नीट आली नाहीय पण कथाबीज चांगले आहे.

तर्कवादी's picture

11 May 2022 - 5:24 pm | तर्कवादी

+0.5

पण नियमाप्रमाणे तुमचे मत +१ म्हणून मोजले जाईल बहुधा

ब़जरबट्टू's picture

9 May 2022 - 7:54 pm | ब़जरबट्टू

ण अणि न चा लोचा झालाय !

सिरुसेरि's picture

10 May 2022 - 11:29 am | सिरुसेरि

+१ . सावध करणारी कथा .

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2022 - 11:35 am | अमरेंद्र बाहुबली

+१

कथा टाकण्याआधी लेखकाने स्वतः मुद्रितशोधन करणे गरजेचे आहे असे वाटते.

सौन्दर्य's picture

11 May 2022 - 11:11 pm | सौन्दर्य

वेगवेगळ्या कंपन्या लोकांना भुलथापा मारून त्यांचे मेम्बर करतात त्यांना प्रॉडक्ट विकतात. हे प्रॉडक्ट त्या व्यक्तीने आणखी तीन/पाच जणांना विकून त्यांना मेम्बर बनवून ही चेन पुढे वाढवायची. ह्यात सामील होणाऱ्या प्रत्येक नव्या मेंबरामागे अमुक एक कमिशन मिळणार वगैरे गाजर बांधले जाते. बहुतेक वेळा ह्यात फसगत होते, घेतलेले प्रॉडक्ट विकू शकत नाही व तो सर्व खर्च गळ्यात पडतो. जर ते प्रॉडक्ट विकत घ्यायला कर्जाने पैसे घेतले असतील तर मग फारच वाईट परिस्थिती होते. वरील कथा बहुतेक करून ह्याच अनुषंगाने लिहिली असावी..
जाता जाता - ही कथा मी लिहिली नाही, कृपया गैरसमज नसावा.

तुर्रमखान's picture

12 May 2022 - 2:05 am | तुर्रमखान

छान!

निनाद's picture

12 May 2022 - 8:31 am | निनाद

कथाबीज चांगले आहे, अजून चांगली लिहिता आली असती.

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:41 am | तुषार काळभोर

+०.९
१०० शब्दातच अजून चांगली करता आली असती, असं वाटतंय.
असो.
पांढरे शर्ट नी काळी पॅंट घालून जमलेल्यात सरांचं जोरदार आगमन झालं.
>>
त्यावर एक ब्लेझरपण असतं. असल्या सरांना पोकल बांबूने फोकलून काढायची लै इच्छा होते.
काही वर्षांपूर्वी बरेच नातेवाइक असल्या वेगवेगळ्या योजना घेऊन घरी यायचे. आमचे 'सर' येऊन समजावतील, असे सांगायचे.