आता पुरण्पोळीची कसली आलीय कृती. म्हणजे त्यात काय नवीन.
पण , कणीकेची सुद्धा तलम , मऊ अशी पोळी होते हेच ह्या विडिऑतून दाखवलेय.
शास्त्रीय दृष्ट्या ह्याला, ऑटोलाईझ म्हणतात. ह्यात कणीक ज्यास्त काळ भिजळ्याने, तिचा दाणा न दाणा भिजतो व त्यातील ग्लुटन वाढते. व हेच पोळीला मौ बनवते.
तर ह्या वर्षी, कणीक अश्या रीतीने भिजवून पुरणाची पोळी करून पहा.
मी कृती देत नाहीये तर तुम्ही विडिओ पहाच.
हा माझा विडिओ पुरणपोळीचा,
प्रतिक्रिया
15 Mar 2022 - 8:08 am | सरिता बांदेकर
छान आहे रेसीपी.
16 Mar 2022 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त. फुगलेली पोळी मस्तच आवडली. आपल्यालाही आवडते पुरण पोळी. खरं तर, पूरण-पोळी घरोघर बनत असेल. आणि आपली प्रत्येकाची एक शैली असते, आमच्याकडे त्याच्याबरोबर 'गुळवणी'केल्या जायची. आज ब-याच ठिकाणी त्याबरोबर दूध दिसते.
अजुन येऊ द्या रेसेपी.
-दिलीप बिरुटे
16 Mar 2022 - 12:23 pm | Bhakti
ऑटोलाईझ
वाह,ह्या पद्धतीने काम सोपं होईल .डाळपण भिजवायची पद्धत चांगली आहे.एक पोस्ट वाचली होती की डाळ शिजल्यावर मग मिक्सर मधून काढून नंतर गुळाचा चटका द्यायचा पण घरी चर्चा झाली की त्याने नीट नाही होणार.डाव उभा राहिला म्हणजे पुरण झालं ही पद्धत वापरते.
खुप छान! आवडली पाकृ!
17 Mar 2022 - 2:47 pm | Bhakti
या पद्धतीने पोळ्याही मऊ झाल्या,पुरणही लवकर शिजले.पण थोड्या पोळ्या फाटल्या.पण उपयोग झाला.
पुरणाची पोळी खाण्यासाठी पर्याय कटाची आमटी,दूध,काकवी आणि पिढीसाखर +तूप!
होळी पौर्णिमाच्या शुभेच्छा!
17 Mar 2022 - 3:03 pm | Bhakti
Autocorrect ना ;)
*पिठीसाखर
3 Apr 2022 - 10:02 pm | देवीका
सर्वांना धन्यवाद.
4 Apr 2022 - 12:28 pm | तुषार काळभोर
मिसिंग भजी & कुरडई-पापडी
4 Apr 2022 - 6:39 pm | Bhakti
हो ना, गुढीपाडव्याला पण होत सगळं :) ते पण मस्त chocolate रंगाचं पुरण झालं होतं.विशेष अनपोलिश्ड डाळ आणि खात्रीचा गुळ !सेम २०-२५ वर्षांपूर्वीची आठवण आली माझी आजी असंच गोड पुरण करायची!
पिवळ्या रंगाचं पुरण नाही आवडत.
16 Mar 2022 - 4:42 pm | Trump
होळी रे होळी, पुरणाची पोळी. म्हणले की पालुपद म्हणुन दुसरेच काही तरी आठवते.
17 Mar 2022 - 2:49 pm | सुरिया
ते बंदुकीची गोळी वगैरे तसले काही का?
17 Mar 2022 - 3:22 pm | Trump
ओळखलेत तुम्ही :)
17 Mar 2022 - 4:06 pm | गवि
साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी? (उगीचच बिचार्या साहेबाच्या जिवावर उठणे.
तसे आम्ही लहानपणी कोणाच्याही जिवावर निष्कारण बला आणत असू.
आयाम अ डिस्को डान्सर
तंबाखू खाऊन झाला कॅन्सर
.. त्यानंतर
कपिलने मारला सिक्सर, त्याला मिळाला मिक्सर .. वगैरे उत्तेजनार्थ बक्षीसही असे.. उ:शापच जणू.
डबे मे जोकर, तू मेरा नोकर
किंवा
डबे मे कापूस, तू मेरा बापूस
हे डबेही पुरणाच्या पोळीला जोडले होते की आणखी कशाला ते आठवत नाही.
फार पूर्वी इथे असले संकलन करण्याचा धागा प्रयत्न केला होता.
व्हाट इज धिस, कोंबडीचं पीस
थोबाडीत मारीन चूप बैस
हे आमचे सर्वात फेवरीट, प्राथमिक शाळेत.
यात लै जोरदार पंच होता. गाडीचा नंबर चार्सोबीस असाही एक भेद होता.
असो ssss
गेले ते दिवस, उरल्या त्या आठ्वणी.
18 Mar 2022 - 3:02 am | सुरिया
आपण फारच निरागस वगैरे होतात.
आम्ही आभाळात उडाले हेलिकॉप्टर, आणि कुठेतरी चढविण्यासाठी डॉकटर वगैरे यंमके जुळवत असू.
तुतारी मुतारी, चाकू डाकु आदी यमके हिट असायची.
18 Mar 2022 - 3:18 am | गवि
निरागसता जपण्याची धडपड चालूच असते. शिशुवयापासून.
अब वो तो गालिब और हमारा जमीर जानता है की त्या ओळी मुळात काय होत्या. साहेबाच्या गाडीत बंदुकीची गोळी अशी एक अनुस्वारविरहीत निरागस व्हर्शन आम्ही फॉलो करत असू आगोदर. पण गाडीत गोळी हे निरर्थक वाटे. शेवटी निरागसता आणि निरर्थकता यात संघर्ष होऊन साहेबाचे पोट टारगेट झाले असावे.
आणि तसेही गोळीचे मूळ गंतव्यस्थान हे शेवटी पोटच.. इकडून तिकडून.. तर ते एक असो.