११ सप्टेंबर, तो आणि आजचा

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
11 Sep 2021 - 8:52 am
गाभा: 

11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेतील न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डी. सी.मधील अनुक्रमे वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ‘पेंटॅगॉन’वर दहशतवाद्यांनी प्रवासी विमानांद्वारे हल्ले केले. त्यामध्ये तीन हजारांच्यावर लोकांचा बळी गेला. त्या हल्ल्यांना आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दहशतवादी हल्ल्यांना ओसामा बिन लादेनची अल-कायदा संघटना आणि तिला आश्रय देणारी अफगाणिस्तानातील तालिबानी सत्ता यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात अमेरिकेने ‘नाटो’च्या सहकार्याने ऑक्टोबर 2001 मध्ये जागतिक ‘दहशतवादविरोधी युद्धा’ला (War on Terror) सुरुवात केली.
‘दहशतवादविरोधी युद्धा’त अफगाणिस्तानातील तालिबानी सत्ता उलथवून टाकल्यानंतर तालिबान समर्थिक अनेक दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या अफगाण सीमेला लागून असलेल्या उत्तर वझिरीस्तान आणि वायव्य सीमांत प्रांतात आश्रय घेतला आणि तेथून आपल्या दहशतवादी कारवाया सुरूच ठेवल्या. त्याचवेळी अल-कायदा संघटनेने 2002 नंतर जगातील अन्य भागांमध्ये विशेषतः बांगलादेश, तसेच आफ्रिका आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये आश्रय घेतला. पुढील काळात आफ्रिकेतील मालीमधील तुआरेग बंडखोर, सोमाली चाचे आणि अल-शबाब दहशतवादी संघटना, फिलीपिन्समधील अल-बद्र, इंडोनेशियातील दहशतवादी गट आदींशी अल-कायदाचा संपर्क येत गेला. शिवाय लिबिया, सीरिया, इराकमधील बंडखोरांशी त्यांचा संपर्क येत आहे.

‘नाटो’च्या सैन्याने 2002 मध्ये तालिबानी सत्ता उलथवून टाकल्यानंतर अफगाणिस्तानात स्थापन झालेली लोकशाही, प्रजासत्ताक व्यवस्था फारशी बस्तान बसवू शकली नाही. या व्यवस्थेचे प्रभावक्षेत्र राजधानी काबूलच्या आसपासच मर्यादित राहिले. तेथे सर्वमान्य, मानवाधिकारांची कदर करणारे, उदारमतवादी आणि लोकशाहीवादी सरकार स्थापन करून तिथे शांतता आणि समृद्धी आणण्याचा अमेरिकेचा निश्चय होता. पण पाकिस्तानच्या सहानुभूतीमुळेच तालिबान आणि अन्य दहशतवादी गटांकडून ‘नाटो’ फौजा तसेच अफगाणिस्तानच्या पुनःउभारणीसाठी मदत करणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांच्या विरोधातही कारवाया होत राहिल्या.

सैन्य माघारीचे याआधीचे प्रयत्न
अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी निवडणुकीमध्ये अफगाणिस्तान आणि इराकमधून सैन्य माघारी घेण्याचे आश्वासन दिले होते. ‘अफ-पाक धोरणा’नुसार जुलै 2014 नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपल्या फौजा मागे घेण्याचे घोषणा केली होती. मात्र काही दिवसांनी अफगाणिस्तानातील लढाई दीर्घकाळ चालणार असून त्यासाठी आपल्याला तेथे जास्त काळ राहावे लागेल, असे वॉशिंग्टनने जाहीर केले. जुलै 2015 पर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि ‘नाटो’च्या फौजा माघारी घेण्यात येणार होत्या. मात्र अफगाणिस्तानात दीर्घकाळ राहता यावे, यासाठी द्वीस्तरीय सुरक्षा करार करण्याबाबत अमेरिकेने करझाई यांच्यावर बराच दबाव आणला होता. करझाई यांनी त्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे सैन्य माघार जुलै 2015 मध्ये होऊ शकली नव्हती.

अमेरिका आणि ‘नाटो’ने आपले सैन्य अफगाणिस्तानातून काढून घ्यावे अशी तालिबानची मागणी होती. माजी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हेही अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्यासाठी आग्रही होते. पुढे ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीची नवी योजना जाहीर केली. त्यानुसार एप्रिल 2021 पर्यंत ही माघार होणार होती. या हस्तांतरासाठी अमेरिका आणि तालिबानमध्ये कतारची राजधानी दोहा येथे चर्चा सुरू होतीच. त्यात अखेर सत्ता हस्तांतर होण्याबाबत निर्णय झाला आणि 20 वर्षांपूर्वी ज्या तालिबानविरोधात युद्धाची सुरुवात केली होती, त्याच तालिबानकडे 20 वर्षांनी पुन्हा सत्ता सोपवून अमेरिकन आणि ‘नाटो’चे सैन्य 31 ऑगस्ट 2021 पर्यंत अफगाणिस्तानातून माघारी गेले.

अफगाणिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित भूमी
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी तालिबानची सरशी होत असलेली पाहून देशातून पलायन केले आहे. आता अफगाणिस्तानातून अमेरिका आणि ‘नाटो’च्या फौजा माघारी गेल्यावर सत्तेवर आलेले तालिबान आणि त्यांच्या मदतीने अफगाणिस्तानात विविध दहशतवादी गटांना पाकिस्तानकडून होऊ शकणारी मदत यामुळे हा देश पुन्हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित भूमी होण्याची भीती जगातील सर्वच देशांना वाटत आहे. तसे होऊ नये यासाठी भारत, रशिया, अमेरिका, चीन, मध्य आशियाई आणि युरोपीय देश प्रयत्नशील आहेत. तरीही अलीकडे घडलेल्या काही घडामोडींमुळे ही भीती लवकरच खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालिबानकडे अफगाणिस्तानच्या बहुतांश भागाचे नियंत्रण आले असले तरी पंजशीर खोरे मात्र त्याच्या नियंत्रणाबाहेर रहिले होते. तालिबान आणि पंजशीर खोऱ्यातील गटांमध्ये लढाई होऊन तोही प्रदेश तालिबानच्या नियंत्रणाखाली आला आहे. त्यामध्ये पाकिस्तानी हवाईदलाने तालिबानला मदत केल्याची शंका व्यक्त होत आहे. तालिबानकडे सत्ता आल्यावर अल-कायदा अफगाणिस्तानात पुन्हा सक्रीय होण्याविषयीचे इशारे मिळू लागले आहेत. त्यातच ज्या हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला अमेरिकेने 50 लाख अमेरिकन डॉलरचं इनाम जाहीर केलं होतं, त्याच हक्कानीकडे सिराजुद्दीन हक्कानीकडे हंगामी अफगाण सरकारमध्ये गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या तसेच जगाच्या सुरक्षेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

लिंक - https://avateebhavatee.blogspot.com/2021/09/11.html

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Sep 2021 - 10:29 am | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचनिय.
अमेरिकेच्या ह्या 'लोकशाही वाचवण्याच्या' प्रयत्नांमागे तेल कंपन्या व शस्त्रास्त्रे बनवण्यार्या कंपन्या(military industrial complex) ह्यांचे अर्थकारण होतेच म्हणा.

अफगाणिस्तानात आणि कसले तेल ? "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे" हि म्हण अमेरिकेने अफगाण मध्ये खोटी ठरवली आहे. तेल साठे हे सध्या डेप्रीसिएटिंग असेट्स असून अमेरिकेने स्वतः आपले साठे निर्यात करायला सुरु केले आहेत. इराक मधील एकूण तेलाचे साठे फक्त ७T डॉलर्स चे असले तरी अमेरिकेने युद्धावर ४T आत्ताच खर्च केले आहेत.

MIC बद्दल मात्र १००% सहमत. आता MIC असली म्हणून हरकत नाही पण कार्यक्षम तरी असायला पाहिजे. अमेरिकन मिलिटरी अगदीच नालायक निघाली.

एकूण खनिज मालाची किंमत १ ट्रिलियन आहे आणि अमेरिकेने आधीच युद्धावर १ ट्रिलियन खर्च केले आहेत. अमेरिकेने स्वखर्चाने खनिज शोध घेऊन अफघाण सरकारला माहिती दिली आणि अफघाण सरकारने खाणकाम करण्याचे अधिकार चिनी आणि भारतीय कंपन्यांना दिले होते. १ ट्रिलियन खूप वाटले तरी हि एकूण किंमत असल्याने ते खनिज बाहेर काढून विकायला अनेक दशके लागतील. त्याशिवाय हा निव्वळ अंदाज आहे. अमेरिकन संरक्षण खात्याने उगाच दिशाभूल करण्यासाठी हे आकडे हवेत सोडले असण्याची सुद्धा शक्यता आहे.

अमेरिकेला तेथील खनिज च हवी असती तर इतके वर्ष ते तिथे होते कधीच उत्खनन करून घेवून गेले असते.
खनिज संपत्ती मुळे अफगाणिस्तान वर इतर देशांचा डोळा आहे हा युक्तिवाद च स्व बुध्दी असणाऱ्या व्यक्ती ल पटणार नाही.
मेंढर सारखी वृत्ती असणारे पण स्वतला बुद्धिमान समजणारे च असल्या फालतू युक्तिवाद वर विश्वास ठेवत असतात.
वर्तमान पत्र,विद्वान,नेते ,अभिनेते ,संशोधक सांगतील तेच खरे असे नसते .
स्वतःचे तर्क,स्वतःची बुध्दी पण वापरली पाहिजे..
Exa पण म्हणून .
नासा नी ब्रह्मांड विषयी जेवढी माहिती गोळा केली आहे त्या मधील १ टक्का पण माहिती त्यांनी लोकांशी शेअर केलेली नाही.
९९% माहिती त्यांनी कॉपी right च्या नावाखाली लपवून ठेवली असण्याची च शक्यता च जास्त आहे.

सुबोध खरे's picture

13 Sep 2021 - 12:23 pm | सुबोध खरे

अफगाणिस्तानात तेल नाही पण अत्यंत मूल्यवान खनिजे आहेत ज्यात महत्त्वाचे म्हणजे लिथियम आणि तांबे .
अमेरिकी संरक्षण खात्याच्या २०१० च्या अंदाजाप्रमाणे हि खनिजे ७५ लाख कोटी रुपयां च्या आसपास असावीत तर ताज्या अंदाजाप्रमाणे ती २२५ लाख कोटी रुपये इतकी असावीत.
साधारण अंदाज यावा या साठी भारताच्या निश्चलनीकरणात १५ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या होत्या त्याच्या ५ ते १५ पट.

https://www.aljazeera.com/news/2021/8/24/as-us-exits-afghanistan-china-e...

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 12:42 pm | गॉडजिला

पंजशीर देखील पडले… पाकिस्तानच्या मदतीने ? यावर कोणीच भाष्य करत नाही विशेषतः गौरव आर्य यांनी पंजशीर जिंकणे अवघड आहे असे जे विधान केले होते त्यामुळे फार उत्सुकता होती पण असे वाटते की यावेळी तालिबानचा होमवर्क फार अचुक झाला होता…

ह्यांचा विपुल साठा आहे आणि तो हस्तगत करण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तान वर हल्ल करून तो ताब्यात घेण्यासाठी अधीर आहे.
अफगाणिस्तान च्या भूमी खाली खूप मोठी संपत्ती आहे म्हणून भारता पासून रशिया ,चीन सर्व च देश अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी युद्ध करत आहेत..
अशा प्रकार ची मत मीडिया मांडत आहे.आणि त्याला इथले आयडी पण पाठिंबा देत आहेत.
हे खरे समजले तर तालिबानी ही देशप्रेमी संस्था आहे हे सिद्ध होते.
तालिबानी अफगाणिस्तान वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत असाच त्याचा अर्थ होतो.
त्यांच्या अतिरेकी वृत्ती मुळे तेथील नैसर्गिक संपत्ती अफगाणिस्तान जिंकून किंवा शांती च्या मार्गाने व्यापारी करार करून पण कोणाला हस्तगत करता येत नाही.
असा अर्थ होईल.तालिबानी हिरो ठरतील.
मग आपोआप त्यांची धर्मांध वृत्ती,अतिरेकी कारवाया पवित्र होतील.

सुबोध खरे's picture

13 Sep 2021 - 1:22 pm | सुबोध खरे

हे खरे समजले तर तालिबानी ही देशप्रेमी संस्था आहे हे सिद्ध होते.

तालिबानी अफगाणिस्तान वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत असाच त्याचा अर्थ होतो.

हायला

काय पण विश्लेषण आहे?

क ड क

Rajesh188's picture

13 Sep 2021 - 1:37 pm | Rajesh188

ची न्यूज ची लिंक देत आहात आणि त्यांच्या मताला पाठिंबा पण देत आहात.
Al Jazeera hi वृत अरेबियन वृत्त संस्था आहे
आणि कतार सरकार त्यांना funding करते.
असे गूगल सांगतो.
मग त्या न्यूज चॅनल वर तालिबानी लोकांना सोयीची च पडतील तशीच न्यूज आर्टिकल दाखवली जातील. कतार तालिबानी ना उघड पाठिंबा देतो.

सुबोध खरे's picture

13 Sep 2021 - 1:20 pm | सुबोध खरे

पंजशीर मधील उत्तरेकडील आघाडीचे सैनिक मुख्य भागातून आतल्या गल्ल्याबोळात गेलेले आहेत.

तालिबानला साहाय्य करण्यासाठी आय एस आयच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे लष्करच नव्हे तर कमांडो सुद्धा गेले होते परंतु त्यांचे काही अधिकारी आणि सैनिक सुद्धा मारले गेले असल्यामुळे आय एस आय च्या प्रमुखांना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी रावलपिंडीला बोलावून ताकीद दिली आहे अशी आतली बातमी आहे.

त्यातून तालिबान आणि पाक लष्करावर विमान हल्ला झाल्याची सुद्धा बातमी आहे. हा हल्ला ताजिक लष्कराकडून आहे कि त्याला भारतीय वायुदलाच्या सहाय्य आहे याबद्दल संदिग्धता आहे.

त्यामुळे दिसायला तालिबानचा विजय दिसत असला तरीही तसे नाही हे तालिबानला सुद्धा माहिती आहे.

बाकी तालिबानच्या हातात अमेरिकी शस्त्रास्त्रे सापडली तरी ती सहजगत्या वापरण्याइतकी तांत्रिक प्रगती त्यांनी केलेली नाही.

तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा तर मिळवला आहे परंतु दैनंदिन व्यवहारांसाठी त्यांच्याकडे पैसे अजिबात नाहीत आणि पाकिस्तान कडे मागावे तर उघड गेला नागड्याकडे अशी स्थिती आहे.

https://theprint.in/opinion/how-the-taliban-will-finance-their-new-afgha...

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 1:48 pm | गॉडजिला

पण आत गल्याबोळात गेले म्हणजेच दुर्गम पर्वतरांग (वॅली) गमावली जिथे रशियन/पुर्वीचे तालिबान पराभुत झाले होते असे म्हणता येइल ना ? असो, तालिबान सगळ्यांचे सर्व अंदाज चुकवत आहे असेच बाहेरुन वर वर पाहता वाटत आहे म्हणुन चिंता वाटते कारण आतिल समझोते आपल्याला माहित नाहीत आणी तालीबानची यशस्वी अशी खोटी प्रतिमा होणे देखिल मोरल डाउन करणारे वाटते अर्थात एकुणच भुराजकीय गुंतागुंत काय आहे याचा माझ्या सारख्या सामान्य दुरस्थाला अंदाज नाही हे खरेच.

अफगाण मधील रशियन हल्ल्यावर द बिस्ट नावाचा एक चित्रपट आहे. एक सोविएत रणगाडा वाट चुकून एकटाच अफगाणी प्रदेशांतून फिरत आहे आणि मुजाहिदीन नि त्याची बरीच धास्ती घेतली आहे. रणगाड्याचा कमांडर अतिशय शिस्तप्रिय आहे आणि उत्कृष्ट सैनिक आहे त्यामुळे रणगाडा एकटा असला तरी तालिबानी मंडळी त्यावर विजय प्राप्त करू शकत नाहीत. टॅंक सोबत एक अफगाणी भाषांतर करणारा माणूस आहे आणि एक रशियन कम्युनिस्ट सैनिक आहे ज्याला मुजाहिदीन बद्दल सहानुभूती आहे.

फार कमी लोक असले तरी अफगानी प्रदेश, लोक, तिथे युद्ध करण्यात येणाऱ्या अडचणी है सर्वांचे सुंदर चित्रण आहे आणि रेम्बो प्रमाणे अजिबात भडक आणि एकतर्फी चित्रपट नाही.

वॉशिंग्टन मध्ये तालिबान ने लॉबिंग साठी लोक शोधणे सुरु केले आहे. "माणुसकी म्हणून" अमेरिकन सरकारने जप्त केले अफगानिस्तानी अब्जावधी डॉलर्स तालिबान सरकारला परत द्यावेत आणि वरून मदत म्हणून पाकिस्तान द्वारे पैसे पाठवावेत अशी मागणी सुरु झाली आहे. आज USAID ने ६० दशलक्ष डॉलर्स पाकिस्तान मार्फत अफगाण ला मदत म्हणून घोषित केले आहेत.

येत्या काही दिवसांत नेहमीच्या डाव्या वर्तमानपत्रातून तालिबान चांगले, पाकिस्तान चांगले आणि भारत अमेरिका वाईट हा प्रचार सुरु होईल. तालिबान कश्या प्रकारे स्त्रीअधिकारांचे उन्नतीकरण करत आहे हे न्यूयॉर्कर ह्या अत्यंत डाव्या वर्तमान पत्राने लिहिले आहे [१]. एका वर्तमान पत्राने तर ISIS ला दूर ठेवायचे असेल तर तालिबान ला मिठी मारायला पाहिजे असे लिहिले आहे [३]

अमेरिकेन मिलिटरी आणि गुप्तचर यंत्रणा अत्यंत अकार्यक्षम आहे हे सर्वानाच ठाऊक असले तरी आता ते अधिकाधिक उघड होत आहे. तालिबानी अधिकाऱ्यावर हल्ला म्हणून अमेरिकन ड्रोन नि निरपराध कुटुंबावर हल्ला केला आणि त्यांनी ५ लहान मुले मारली गेली [२]. काबुल मधील बॉम्ब हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा द्रोण हल्ला अमेरिकेने केला होता आणि बायदान वगैरेंनी ह्याला "यशस्वी बदला" घोषित केले होते. पण थोडक्यांत हे धांदात खोटे होते असे स्पष्ट झाले आहे.

मेजर जनरल बक्षी (ह्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हे ठाऊक नाही) ह्यांच्या मते पाकिस्तान मध्ये बाजवा आणि isi प्रमुख ह्यांच्यांत जुंपली आहे. आता सुमारे ४०० जैश आणि LET दहशतवादी अफगाणिस्तानातून मोकळे झाले असल्याने त्यांना POK मध्ये आणले आहे आणि त्यांचे ट्रेनिंग सुरु आहे. हि मंडळी आता भारतात घुसतील.

[१] https://www.newyorker.com/magazine/2021/09/13/the-other-afghan-women
[२] https://reason.com/2021/09/13/military-drone-strike-that-killed-afghani-...
[३] https://www.wsj.com/articles/isis-taliban-afghanistan-bombing-11630014684