मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
12 Aug 2021 - 4:22 am

मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

नमस्ते
२००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते

बरेच ,९९% बंद पडले
त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही

बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ
मनोगत
मायबोली
मिसळपाव
इसाहित्य
मराठीमाती
ऐसी अक्षरे
मागे वळून पाहताना

बंद पडलेली

मीमराठी
भुंगा
मराठीप्रेमी
मराठीकिडे
काय वाटेलते

कृपया यात अधिक भर घालावी

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

दिगोचि's picture

12 Aug 2021 - 9:16 am | दिगोचि

अन्तराळ.कॉम व एकरेघ.ब्लॉगस्पॉट.कॉम

श्रीरंग_जोशी's picture

12 Aug 2021 - 9:17 am | श्रीरंग_जोशी

उपक्रम अजुन वाचनमात्र का होईना सुरू आहे.

लोकायत.कॉम बंद पडली

गुल्लू दादा's picture

12 Aug 2021 - 9:33 am | गुल्लू दादा

माहितगारांनी प्रत्येक संकेतस्थळाची काय वैशिष्ठपूर्णे आहेत यावर प्रकाश टाकावा ही विनंती. एखादे छान सदर/ विभाग असेल ते सुद्धा सुचवावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2021 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फक्त मिसळपाव आणि मायबोली चालू आहे, बाकी सगळी मृतपाय मराठी संस्थळे आहेत. (माणसंच नाही तर ती जीवंत कशी म्हणायची या अर्थाने) तर काही शेवटची घटका मोजणारी शरपंजीरी पितामह भिष्मासारखे निपचित पडून आहेत. असे माझे व्यक्तीगत मत आहे.

चर्चेला, यादीला, शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

सामान्यनागरिक's picture

12 Aug 2021 - 11:05 am | सामान्यनागरिक

मराठी माणसाची आपल्या भाषेबद्दलची अनास्था ही याला पण कारणीभूत आहे का?

चौथा कोनाडा's picture

13 Aug 2021 - 2:51 pm | चौथा कोनाडा

मराठी माणसाची आपल्या भाषेबद्दलची अनास्था ही याला पण कारणीभूत आहे का?

सामा, असं सरसकट म्हणता येणार नाही. मराठी भाषेची पडझड सर्वच पातळीवर चालू आहे. मिहिंलिश (मराठी+हिंदी+इंग्लिश) हा ट्रेण्ड आहे. सर्वजण या ट्रेंडच्या मागे पळताहेत. कदाचित नविन पिढीची भाषा हीच आहे. आणि कदाचित आपली ही पारंपरिक मराठी कालबाह्य देखिल होईल लवकरच.

आणि मिपावर एकावेळी तीस पेक्षा जास्तं सदस्य ऑनलाईन कधीच दिसत नाहित... हे एक कोडंच आहे.

माझा बिल्ला क्रमांक 36 हजारच्या पुढचा आहे म्हणजे मिपावर किमान ३६ हजार आयडी नोंदणी झालेली आहे... अन त्याच्या १ टक्का म्हणजे ३६० लोकही एकाच वेळी अथवा एका दिवशी ऑनलाइन असत नाहीत :(

रोज ३६० लोक त्यापैकी दहा टक्के लोकांनी जरी धागे काढले तर डेली ३० धागे नवीन हवेत पण ते ही होत नाही... खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे.

Bhakti's picture

12 Aug 2021 - 7:42 pm | Bhakti

खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे.
प्रतिलिपी,इरा इत्यादी व्यावसायिक संस्थळही भरपूर वाढत आहे.
मी अजून एक app वर लिहीते जमेल तेव्हा , Momspresso marathi व्यावसायिक नाहीये पण ठराविक लिखाण फेसबुकवर पेजला प्रकाशित करतात त्यामुळे वाचक मिळतात. ब्लॉग हा प्रकार म्हणजे हक्काचा आहे.ज्यांना चिंतनाची आवड आहे त्यांनी मराठी स्वभाषेत कुठेतरी लिहीत रहावे.

Bhakti's picture

12 Aug 2021 - 7:42 pm | Bhakti

खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे.
प्रतिलिपी,इरा इत्यादी व्यावसायिक संस्थळही भरपूर वाढत आहे.
मी अजून एक app वर लिहीते जमेल तेव्हा , Momspresso marathi व्यावसायिक नाहीये पण ठराविक लिखाण फेसबुकवर पेजला प्रकाशित करतात त्यामुळे वाचक मिळतात. ब्लॉग हा प्रकार म्हणजे हक्काचा आहे.ज्यांना चिंतनाची आवड आहे त्यांनी मराठी स्वभाषेत कुठेतरी लिहीत रहावे.

टवाळ कार्टा's picture

13 Aug 2021 - 6:08 am | टवाळ कार्टा

यातले डुआयडी किती ते विचारात घेतले का?

Bhakti's picture

13 Aug 2021 - 9:22 am | Bhakti

@टकाजी
डुआयडी असलं तरी काय चुकीचे नाही,मुळ उद्देश आहे सहभाग मग तो दीर्घ लिखाणातील असो नाहीतर प्रतिसादासाठी असो.अगदी शेवटी वाचनमात्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2021 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१०० % सहमत. आयडी काय लेखन करतो हे महत्वाचं.
आभासी जगात, वरीजनल आयडी-डू आयडी या सर्व अंधश्रद्धा आहेत.

वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी
वगैरे करुन मोजके पण उत्तम अशा लोकांचे मराठी संस्थळ हे भविष्यात
करावे लागणार आहेत, मिपानेही काही प्रयोग करुन पाहावेत.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

13 Aug 2021 - 7:34 pm | गॉडजिला

वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी

लोकांचा खाजगी डाटा सांभाळने जोक नाही विशेषतः तुमची साईट युरोपमधून वगेरे access होत असेल तर :) नाहीतर भिक नको पण...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2021 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऑनलाईन आलात म्हणजे आपण नागडे झालो सॉरी आपला डाटा उघडा पडलाय असे समजायचे. आता भले भले डाटा लिक होतात, तेव्हा आपलं व्यक्तीमत्व लपवायचा काळ गेला. हं आता डू आयडी करुन आपलयाला हवं तसं व्यक्त होता येतं. शिव्यागाळ करता येतात वगैरे या जमेच्या बाजूच्या असल्या तरी भविष्यात विविध कारणांसाठी वरीजन्यालिटी लागणारच आहे.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

14 Aug 2021 - 3:29 pm | गॉडजिला

मी काय म्हणालो हे माझ्यामुळे(च) आपल्याला समजले नसणार असे गृहीत धरून पुन्हा सांगतो...

लोकांचा खाजगी डाटा सांभाळने जोक नाही विशेषतः तुमची साईट युरोपमधून वगेरे access होत असेल तर :) नाहीतर भिक नको पण...
ही बाब आयडीसाठी न्हवे मालकांसाठी लागू होते. कडक कायदे आहेत युजर प्रायाव्हसीचे सोप्या शब्दात Fines in case of non-compliance can reach up to 4% of the annual worldwide revenue or 20 million euros – whichever is higher. :)

बाकी शंभर वर्चुअल नंबर मिळतात एक हुडकायला गेलो तर... फुकट.
तेंव्हा OTP आला म्हणजे आपण नागडे झालो सॉरी आपली ऑनलाईन आयडेंटिटी उघडली पडते असे अजिबात नाही हो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2021 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मान्य. माझ्याकडून विषय संपला...!

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

14 Aug 2021 - 8:52 pm | गॉडजिला

कोणीही व्यक्ती कितिहि व्हर्चुअल नंबर्स वापरु शकतो रजिस्ट्रेशनसाठि त्यांमुळे ओटीपी ही व्यक्ती व्हेरीफाय करायची नामी युक्ती ठरत नाही. व्हर्चुअल नंबर्स वापरुन एकाच सिमकार्ड वरुन मी अनेक नंबर सदस्य बनण्यासाठी व लॉगीनसाठी वापरुन माझा मुळ सिमकार्डचा नंबर जाहीर न करता हवे तितके डुआयडी सहज बनवु शकतो...

पण नंबर्स गोपनीय राखायची जबाबदारी तेव्हडी मालकांच्या माथी येते.

टवाळ कार्टा's picture

16 Aug 2021 - 3:51 pm | टवाळ कार्टा

१०० % सहमत. आयडी काय लेखन करतो हे महत्वाचं.
आभासी जगात, वरीजनल आयडी-डू आयडी या सर्व अंधश्रद्धा आहेत.

वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी
वगैरे करुन मोजके पण उत्तम अशा लोकांचे मराठी संस्थळ हे भविष्यात
करावे लागणार आहेत, मिपानेही काही प्रयोग करुन पाहावेत.

-दिलीप बिरुटे

डुआयडीसाठी अश्या पायघड्या असतील तर १०-१५ वर्षांत फक्त ३६००० सदस्य असणे हे दारिद्र्यरेषेखाली असण्याचे लक्षण आहे =))

यातले डुआयडी किती ते विचारात घेतले का?

हो सर्वात आधी डुआयडीच शंका आली कारण इतके सदस्य असुनही फार कमी अ‍ॅक्टिव आहेत म्हणजे बरेच डुआयडी आहेत. बरेच म्हणजे अगदी सरासरी ३०,०००/१० जरी पकडले तरी १०,००० सदस्य हि फार मोठि झेप आहे. पण त्या हिशोबात धागे येत नाहीत अगदी खरडफळा देखिल ठरावीक सदस्य चालवतात... हे एक कोडेच आहे इतके मोठे की मुळातच मराठी माणुसच गुणवंत नाही की काय याची शंका यावी. खरे तर विविध मतमतांतरे, आवडीनिवडी लिहायची अपेक्शा, व्यक्त व्हायची क्षमता या बाबी ध्यानात घेता लिहते लोक अजुन असायला हवेत हे स्मजायला डेटा सायंटीस्ट असायची गरज नाही पण जो कोणी डेटासायंस व्यवस्थित समजत असेल त्याला मिपाचा लेखन प्रव्रुत्ति विदा खुला करुन त्याचे इनपुट्स घेउन आवश्यक ती ध्येयधोरणे जरुर राबवावीत. उपयोगी किती ठरेल माहीत नाही पण सहानाजींनी यात लक्ष घालुन त्यान्च्या सुचना अवश्य मांडाव्यात.. नुसते सदस्य बनणे सुलभ करुन फार साध्य काही झालेले वाटत नाही...

अनेक फोरम्स अथवा रीडीफ युट्युबच्या कॉमेंट्स देखील आवर्जुन वाचत असतो असे व्यक्त होणारे लोक रंजक असतात व कम्युनिटी विस्तारतात हे नक्कि. ट्विटरच्या धरतीवर, अगदीच समान नाही पण रंजक संकल्पना मिपावर असावी असे मला मनापासुन वाटते. खरडफळा माझ्या नजरेत नेहमीच वाट्सप ग्रुप प्रमाणे काम करत आला आहे आणी तो मिपावर भारतात वाट्सप प्रसिध्द असण्यापुर्वीपासुन अस्तित्वात आहे...

योगेश कोलेश्वर's picture

12 Aug 2021 - 10:17 am | योगेश कोलेश्वर

बिगुल नावाचे संकेत स्थळ होते ..बंद झाले आता

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2021 - 12:45 pm | चौथा कोनाडा

प्रबंध लिहिताय का ? व्वा, छानच.

"त्या" काळात लोकांच्या हाती मोबाईल नसल्याने व्हॉट्सॲप, फेसबुक वै मोजके लोकच वापरायचे. मोबाईल ॲप आल्यापासून असा वाचनीय मजकूर हातातल्या मोबाईल मध्ये मिळू लागला. वाचनीय मजकूर फेसबुक, व्हॉट्सॲप वर येऊ लागले त्यामुळे अशा हौशी मराठी संस्थळांचे प्रयोजन उरले नाही.

वरील पैकी मिपा, माबो, उपक्रम, मनोगत व्यतिरिक्त इतर संस्थळे क्वचित वाचली. बिगुल बरे होते.

कालाय तस्मै नमः

वाचनीय मजकूर फेसबुक, व्हॉट्सॲप वर येऊ लागले त्यामुळे अशा हौशी मराठी संस्थळांचे प्रयोजन उरले नाही
ब्लॉग असताना फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर जुने लोक दीर्घ ,भरमसाठ कविता का लिहीतात मला अजूनही नाही समजलं.असो.

कारण त्यांना इन्स्टंट लाईक्स, पब्लिकची वाहव्वा हवी असते म्हणून
ब्लॉगवर ते शक्य नै :)

;) मिनीटा मिनिटांचा दीर्घ वृतांत लिहिणारे नवे लेखकवृंद _/\_

गॉडजिला's picture

12 Aug 2021 - 10:07 pm | गॉडजिला

शतशब्दकथा रुपात जास्त चांगल्या पध्दतीने आकाराला आला.

कंजूस's picture

13 Aug 2021 - 8:06 am | कंजूस

ओळखीचेच लोक असतात आणि आपला बब्या/ बाबी/बाबुकाका/बबुआत्या लिहितेय ना त्यास छान म्हणतात.

मिपा/मायबोली/ऐसीअक्षरे यावर अनोळखी लोक वाचतात, टिंगल टवाळकी टीका करतात ते आवडते.
काही इतर स्थळांवर लेखन लगेच प्रकाशित होत नाही. संपादक ते पाहणार मग दुसरे दिवशी येणार वगैरे पद्धतीत मजा येत नाही. किंवा लेखक म्हणून नोंद करा मग लिहा.

सरिता बांदेकर's picture

13 Aug 2021 - 7:18 am | सरिता बांदेकर

मराठीबोली नांवाचे एक संकेतस्थळ पाहण्यात आले.
स्वप्नील समेळ यांचे आहे.
दिवाळी अंक निघणार आहे.

कंजूस's picture

13 Aug 2021 - 10:29 am | कंजूस

हे पुस्तकविक्री स्थळ आहे, मिपासारखे संस्थळ नाही.

सरिता बांदेकर's picture

13 Aug 2021 - 1:32 pm | सरिता बांदेकर

मला फरक कळला नाही.पण त्यांनी सांगितलं तुमच्या कथा/कविता प्रकाशित करू शकता.

सहज तपासून पाहिले, मराठी बोली डॉट कॉम हे पुस्तक विक्रीचे दुकान आहे, आणि मराठी बोली डॉट इन हे लिहिण्याचे स्थळ आहे असे दिसते आहे.

कंजूस's picture

15 Aug 2021 - 5:01 am | कंजूस

चालू आहे.

मित्रहो's picture

13 Aug 2021 - 10:50 am | मित्रहो

मराठीसृष्टी या नावाचे एक संस्थळ होते आता चालू नाही बहुतेक
मराठी वेब दुनिया

मराठी_माणूस's picture

13 Aug 2021 - 11:31 am | मराठी_माणूस

उपक्रम का बंद झाले , कुणाला माहीती आहे का ?

सिरुसेरि's picture

17 Aug 2021 - 12:31 pm | सिरुसेरि

चाफा या नावाचे संस्थळ होते .

साहना's picture

13 Aug 2021 - 1:17 pm | साहना

आमचे एक मित्र bookstruck.app हे संकेतस्थळ आणि ऍप्प बराच काळ चालवत आहेत. माझे साहित्य सुद्धा जमेल तसे तिथे प्रकाशित होते. त्याशिवाय youtube वरून त्यांची ऑडिओबुक्स वगैरे प्रकाशित होतात.

पाहिले आणि काढले. कामाचे वाटले नाही.

काही उपयुक्त फीडबॅक असल्यास सांगा मी संस्थापकांना फॉरवर्ड करू शकते.

चौथा कोनाडा's picture

14 Aug 2021 - 4:44 pm | चौथा कोनाडा

मला तर वाटतं हाच फीडबॅक आहे.

कंजूस's picture

14 Aug 2021 - 4:49 pm | कंजूस

कारण संस्थळ काढणाऱ्यांना माहिती आहे की स्वप्रकाशन दिलं की किती लक्ष ठेवावं लागतं ते. त्यामुळे। ते तसं करणार नाहीत.

साहना's picture

18 Aug 2021 - 9:08 am | साहना

ह्याचा अर्थ काय ?

कंजूस's picture

18 Aug 2021 - 9:56 am | कंजूस

लेखन प्रथम संपादकांकडे पाठवायचं, मग ते तपासून प्रकाशित करणार अशी पद्धत असली की कंटाळवाणं होतं. काही लोक ब्लॉगच्या प्रतिक्रियांनाही मॉडरेशनच्या चिमट्यातून काढतात. मग तिकडे फिरकायला मजा येत नाही.

मिपावरील आपला धागा आपण दुरूस्ती करण्याची सुविधा का नाही? Technology का renew होत नाही?

मिपावरील आपला धागा आपण दुरूस्ती करण्याची सुविधा का नाही? Technology का renew होत नाही?

तुषार काळभोर's picture

18 Aug 2021 - 12:15 pm | तुषार काळभोर

धागा संपादित करण्याचा ॲक्सेस मर्यादित आहे. भटकंती मधील धागे सदस्य स्वतः संपादित करू शकतात.
मात्र इतर धागे साहित्य संपादक संपादित करू शकतात. (फक्त धागे, प्रतिसाद नाही)
प्रतिसाद केवळ प्रशांत संपादित करू शकतात.

कंजूस's picture

18 Aug 2021 - 12:30 pm | कंजूस

पण ती कुलुपबंद करावी लागली पाच वर्षांपूर्वी. कारण राजकीय धाग्यांवर धुरळा उडवायचा मग प्रतिसाद आले की संपादित करायचा असा गैरवापर होऊ लागला. ( मायबोली डॉट कॉमवरही हाच प्रकार झाला.) तर आता भटकंती ,कलादालन फोटो आणि तंत्रज्ञान विभागांतील लेखांना संपादन आहे. प्रतिसादांना नाही. कारण अचूक माहिती लेखकास देता यावी / दुरुस्ती करता यावी हा उद्देश.

तुषार आणि कंकाका धन्यवाद.
बरोबर आहे प्रतिसाद दुरूस्ती अधिकार संपादक यांच्याकडेच असावे.धागा दुरूस्ती सुविधा नसल्याने, लिहीतांना तेवढंच Presence of mind वाढेल.

कंजूस's picture

18 Aug 2021 - 9:58 am | कंजूस

लेख आणि प्रतिसाद दिसतात. कंटाळा येतो वाचायचा.

भुजंग पाटील's picture

13 Aug 2021 - 7:19 pm | भुजंग पाटील

marathiworld.com १८-२० वर्ष सुरु आहे. मराठी सणवार, संत, साहित्यीकां बद्दल माहिती चांगली आहे. पण स्टॅटीक कंटेण्ट आहे सगळे.

rasik.com अन bookganga.com ही व्यावसायीक स्थळे सुरू आहेत.

स्मिताके's picture

13 Aug 2021 - 9:19 pm | स्मिताके

https://www.maitrin.com/
हे फक्त स्त्रियांसाठी आहे. यात काही लेखन फक्त सदस्यांसाठी आहे. मी अजूनतरी सदस्य नसल्यामुळे फार ठाऊक नाही. खरी माहिती/ओळख पडताळून घेऊन मग सदस्यत्व मिळतं असं मागे कधीतरी वाचल्याचं आठवतं.

पाषाणभेद's picture

13 Aug 2021 - 9:30 pm | पाषाणभेद

मराठी फोरम, खाजगी ब्लॉग अन फेसबुक यात फार मोठा परक आहे.
याविषयी बरेच काही लिहीण्यासारखे आहे. जे यात अभ्यासू आहेत त्यांनी केवळ संकेतस्थळांची यादी करण्यापेक्षा यातला फरक स्पष्ट लिहावा.

कंजूस's picture

14 Aug 2021 - 4:53 pm | कंजूस

स्वप्रकाशन असलेली आणि। नसलेली.

प्रतिसाद रिअल टाइममध्ये अपडेट होतो/ होत नाही. मे सगळी मजा जाते.

पाषाणभेद's picture

13 Aug 2021 - 9:58 pm | पाषाणभेद

marathiliha.com
marathibola.com
असा देखील प्रयोग झाला होता. ही संकेतस्थळे प्रसिद्ध होण्याची प्रसिद्धी केली गेली नाही, पण एक संकेतस्थळ कसे ऑपरेट होते, मराठी लिहीण्यात काय अडचणी येतात, लोकांची मानसिकता कशी असते, लोकं का लिहीत नाही, संकेतस्थळ सुरू होण्याअधीच मानपान, अपमान, रुसवे, फुगवे याबाबत सगळा अभ्यास झाला. मराठी संस्थळ अन त्याच्या अनुषंगांच्या विषयांचा पद्धतशीर अभ्यास होवू शकतो इतका अभ्यास झाला. टेक्नॉलॉजी मध्ये आपण कोठे कमी पडतो, अन नक्की काय आवश्यकता असायला हवी याबाबतही काही मते ठाम झाली.

सदर दोन्ही संकेतस्थळांमध्ये फोरमला आवश्यक असणारे अनेक नवी तंत्रे जोडली गेली होती. बरेचशी संस्थळे स्पर्धेतून तयार झाली, पण वरील दोन्ही संस्थळे हे एक प्रयोग म्हणून सिद्ध केले गेले होते. टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली.

उपक्रम, मिपा, माबो, मीमराठी.नेट, लोकायत, मराठीलिहा.कॉम, मराठीबोला.कॉम, दर्जेदार.कॉम इत्यादी संस्थळाच्या जन्माच्या कहाण्या, विकास, लय, लोप इत्यादी प्रक्रिया अगदी जवळून अभ्यासता आली.

अनेक जण आपले दिवसाचे अनुभवाचे लेखन म्हणजेच साहित्य आहे असा समज करून घेतल्याने अन लगेचच लाईक्स मिळणे या कारणामुळे फोरम्सला कालबाह्य समजू लागले आहेत.

काळाच्या शरण जाणे वेगळे अन काळाला वश करणे वेगळे.

मराठी लिहीणे वेगळे अन मराठी साहित्य लिहीणे अन ते प्रसारीत करणे या देखील भिन्न प्रक्रिया आहेत.

एखादा विद्यार्थी या विषयावर पीएचडी करू शकेल इतका अभ्यास केला गेला तर यातून पुढे काही निष्पन्न निघेल.

पाषाणभेद's picture

14 Aug 2021 - 9:55 am | पाषाणभेद

याच संकेतस्थळावर दुसरीकडे जर्मनीच्या भिंतीबद्दल धागा आहे. त्याचा संदर्भ घेवून स्पष्ट लिहीतो आहे, राग नसावा.

जर्मनीचे विभाजन तेथील भिंतीमुळे झाले होते. याविषयी लेखकाने येथे सुरूवातीचा परिच्छेद टाकून, येथे त्रोटक लिहून पुढील लेख
त्यांच्या खाजगी ब्लॉग असलेल्या ठिकाणची लिंक दिली आहे, जेणे करून येथून पुढच्या वाचनासाठी वाचक खाजगी संस्थळावर जावेत.

असले घोरण मराठी संस्थळाच्या फोरमला मारक आहे.

वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.

असल्या प्रकारांना संस्थळाच्या मॉडरेटर्सनी आळा घालायला हवा.

हे एक उदाहरण झाले.

कोणत्याही भाषीक लिहीणार्‍याची मानसिक स्थिती सारखीच असते. मानव सगळीकडे सारखाच आहे.

वर लिहील्याप्रमाणे प्रत्येक संस्थळ, फोरम, ब्लॉग, सामाजिक माध्यमे यांचे काही फायदे तसेच तोटे असतात. वाचक अन लेखक त्या त्या संस्थळाला वर नेत असतो. पण लेखकाचा उद्देश संस्थळाच्या भुमिकेचा विचार करणे नसते. त्याचा उद्देश त्याचा लेख लिहून प्रसिद्धी मिळविणे हा असतो.

असो.

या अनुषंगाने लिहीण्यासारखे अनेक मुद्दे आहेत.

वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.

सहमत.

शानबा५१२'s picture

14 Aug 2021 - 3:31 pm | शानबा५१२

आणि वरुन गुगल अ‍ॅड्स मिळत नाहीत मराठी ब्लॉगस्पॉटला तरीपण!

तुषार काळभोर's picture

14 Aug 2021 - 9:51 pm | तुषार काळभोर

सहमत..

सतिश गावडे's picture

14 Aug 2021 - 4:03 pm | सतिश गावडे

टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली.

यशस्वी संस्थळ बंद करण्यामागे काय कारण असावे? खर्च?

गॉडजिला's picture

14 Aug 2021 - 9:55 pm | गॉडजिला

फक्त टेक्नोलॉजी काय असते याचा अभ्यास यशस्वी झाला असावा म्हणुन बंद केले असेल ?

सतिश गावडे's picture

14 Aug 2021 - 10:49 pm | सतिश गावडे

अरे हा टेक्नॉलॉजी म्हणत आहेत ते. POC केली असेल. :)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

14 Aug 2021 - 10:49 am | रावसाहेब चिंगभूतकर

याबाबत मला वाटते की
1. ज्या प्रकारे इथे तू तू मै मै चालते त्यामुळे बरेच जण नाउमेद होत असावेत. काही जण उगीचच स्पॅम करतात आणि मग काही जण त्याला रिप्लाय देतात. ते कधी तरी ठीक आहे, पण तेवढंच असणे इरिटेटिंग आहे.
2. मिपा चा फॉरमॅट ट्री स्ट्रक्चर पेक्षा sequential करता येईल का? एक दुसऱ्याला उगीचच प्रत्युत्तर देणे त्यामुळे कमी होईल. जे आपल्याला वाटते ते लिहिणे वेगळे. या पद्धतीने अनावश्यक प्रत्युत्तर कमी होण्यास मदत होईल आणि मोबाईल वरून वाचनीयता वाढेल.

पाषाणभेद's picture

14 Aug 2021 - 12:16 pm | पाषाणभेद

@रावसाहेब,
फोरम्स चा उद्देश खरे तर चर्चेसाठी आहे. अन मिपाचे किंवा मराठी संस्थळाचे बलस्थान चर्चा, रिप्लाय, प्रतिसाद, प्रतिवाद उपलेख आदी आहे.

अन्यथा अशा संस्थळाला ब्लॉगचे स्वरूप प्राप्त होईल.

बाकी तांत्रिक बदल करणे न करणे हे सर्वस्वी त्या त्या फॉर्मॅट्च्या अधीन असते.

मराठी संस्थालामध्ये असे संस्थळ आहे का जे विज्ञानकथा,भयकथा, गूढकथा, विचित्रकथा अश्या प्रकारांना वाहिलेले आहे?

कंजूस's picture

15 Aug 2021 - 8:25 pm | कंजूस

म्हणजे संध्यानंद.
आजचे विनोदाचे पान

विशेष सूचना - उद्या सुटी आहे.

आशु जोग's picture

24 Aug 2021 - 4:14 pm | आशु जोग

https://www.kolaj.in हे एक आहे
लेख असतात. चर्चा असतात का कल्पना नाही

चौथा कोनाडा's picture

26 Aug 2021 - 5:45 pm | चौथा कोनाडा

ही https://www.aksharnama.com/ सारखीच फिचर वेबसाईट आहे. मिपा / माबो सारखी धुडगुस कट्टा प्रकारची नाही
चर्चा दिसत नाहियेत, लेखांच्या खाली प्रतिक्रिया द्यायची सोय आहे, अर्थात आजकाल अस्ल्या साईटीवर कुणी प्रतिक्रिया द्यायचे कष्ट घेत नाहीत. कोणे एके काळी दै सकाळच्या साईटवर खाली प्रतिक्रिया वाचायला धमाल याचची. मला तर वाटायचं वात्रट मिपाकरच इथं पण लिहित असतील !

तुषार काळभोर's picture

26 Aug 2021 - 5:55 pm | तुषार काळभोर

ट्रोलिंगचा पहिला अवतार सकाळवरच दिसला होता. विशेषतः मुक्तपीठावर.

गॉडजिला's picture

27 Aug 2021 - 2:27 am | गॉडजिला

ओहोहो... रम्य त्या आठवणी... काय मॅजिकल पिरियड होता तो. ऑसम. काहीही करा कायद्याची भीती नाही एडमींनचा अनावश्यक बडगा नाही... फार थोर लोक तिथं येत असत मग हळुहळु त्याचे मुतपिठ होत गेले...

हस्तर's picture

27 Aug 2021 - 9:06 am | हस्तर

सो मि च्या उदयाआधी ?

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2021 - 12:46 pm | चौथा कोनाडा

मुक्तपीठ म्हंजे धमाल असायची ! तेथूनच "लुनावाले ब्रम्हे" जगप्रसिद्ध झाले ! ट्रोलींगचा कळस गाठला गेला होता !

😃

@हस्तर, हो... हे सो मि च्या प्रचलित व्ह्यायच्या आधी होतं !

हस्तर's picture

28 Aug 2021 - 6:17 pm | हस्तर

सो मि ???

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2021 - 5:12 pm | चौथा कोनाडा

सो(शल) मि(डिया) महान आहे !

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2021 - 7:40 pm | चौथा कोनाडा

ही एक नविन पाहण्यात आली.
सर्वसाधारणच दिसते
http://www.linkmarathi.com