सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार !

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
17 Jun 2021 - 9:03 pm

सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार !
AW001

AW002

साहित्याचा वारसा लाभलेला एक संवेदनशील चित्रकार !
AW003

तुम्ही म्हणाल मी ही काय लिहिलंय ! त्याचं असं झाल, कालच्या रविवारी म्हंजे म्हणजे १३ जूनला संध्याकाळी फेसबुक नोटेशन वाजल. संध्याकाळी ५ वाजता चित्रकार अन्वर हुसेन लाईव्ह येणार होते ! कलापुष्प या संस्थे तर्फे बाळा साहेब पाटील आणि राजेंद्र महाजन हे अन्वर हुसेन यांची मुलाखत घेणार होते ! अन्वर हुसेन यांच्या कलाकारीचा चाहता म्हणून मला हा सुखद धक्का होता ! चार एक वर्षांपूर्वी मासिकात त्यांचं रेखाटन पाहिलं होतं, तेव्हा ते बेहद्द आवडलं होतं ! हळूहळू त्यांची स्केचेस पेंटिंग्ज हे सुद्धा सोशल मीडियातून पाहण्यात येऊ लागलं ! मग तर पक्का फॅन झालो मी त्यांचा ! दोन एक वर्षांपूर्वी अचानक त्यांचं पेंटिंग प्रात्यक्षिक पाहण्याचा सुंदर योग आला होता ! त्यांच्या कुंचल्यातून उतरणारे पोर्ट्रेट पाहून रोमांचित झालो होतो. त्यांच्याशी दोन-चार शब्द बोलून कृतकृत्य झाल्या सारखे वाटलं होतं. त्या आख्या दिवसाचा सुंदर अनुभव मी सुहास एकबोटे यांच्याकडील एक कल्लाड दिवस (http://misalpav.com/node/44353) या मिपा धाग्यात केला होता !

आणि आज परत मुलाखतीचा योग. उत्सुकतेने लॅपटॉपपुढे बसलो !

aw028

छोटे छोटे प्रश्न सुरु झाले आणि शांत, मितभाषी असलेल्या या चित्रकाराची खुलून बातचीत करणं सुरु झालं ! कारण मुलाखत घेणारे त्याला कॉलेजपासूनच बघत आलेले. त्याच्यातला "चाकोरीची वाट" सोडून आपली स्वतःचा मार्ग तयार करताना, उमलताना, फुलताना त्याला पाहिले होते !
तासादिड तासाची मुलाखत म्हणता म्हणता चक्क अडीच तासांपर्यंत रंगली ! चित्रकार, चाहते यांची लक्षणीय उपस्थिती होती. लाईक्स आणि कमेंट्सनी सत्र बहरत चालले होते ! कमेंट्स पैकी दोन आणि उरलेल्या कमेंट्स खाली दिल्या आहेत, त्यावरून कल्पना येईल !

अन्वरच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रांचे विषय आणि रंग लेपन हा आत्मा आहे

सोप्या साध्या विषयातून गूढ आणि गहनता चित्रातून जाणवते

सामान्य विषयांना असामान्य करण्याची क्षमता असलेला चित्रकार

साहित्यात दबदबा निर्माण केला आहे यांच्या "मुखपृष्ठांनी"

चित्रकार अबोल पण कलाकृती मात्र सबोल, सखोल....

दृष्यापलीकडचे खूप काही सांगणारी उत्कट चित्रे

त्यांची चित्र बघितल्यानंतर फक्त पाहणं न होता, चित्रात गुतंण होतं सर.....

आपल्या आकलनाच्या पलीकडील विश्वात सरांची चित्र घेऊन जाता -

सामान्य लोकांच्या मुक्या संवेदना चित्राच्या मुक्या माध्यमातून मांडणे ही कुशलताच.

खुप सुंदर ! संवेदना, साहस, सहजता, स्वतंत्र विचार, सहज शैली, रेषा-रंग यांबद्द्ल निश्चितता, खोल निरीक्षणशक्ती. या सर्वांचे सहृदय मिश्रण अन्वर यांच्या चित्रांमध्ये हळुवारपणे (शांत लयीत) प्रतिबिंबित होत आहे.

AW005

त्यांची काही पेंटीग्ज :

AW006

AW007

AW0011

AW0012

AW0013

AW0014

AW0015

AW021

aw022

aw023

aw024

aw025

aw026

aw027

शाळेत असताना चित्रकला विशेष का आवडत नव्हती ? दहावीला चांगले मार्क पडून सुद्धा सांगलीच्या कलाविश्व या कला महाविद्यालयात प्रवेश घेणं कसं झालं ? कलाविश्व् मध्ये पुस्तकं आणि साहित्य यांचा कसा काय संबंध आला ? त्या सुमारास आजूबाजूचे वातावरण, भवताल कडे कसे आकर्षित झालात ? चित्रात चाफ्याचे झाड बऱ्याच वेळा का असते ? त्यावेळी कोणकोणत्या चित्रकाराचा प्रभाव पडला ? जीडी आर्ट नंतर चाकोरीबद्ध पेंटिंग कडे का वळलो नाही ? विविध पारितोषिके मिळून सुद्धा मुंबई-पुण्यात न जाताच गावाकडेच राहणार हे कसं ठरवलं ? सहसा कष्टकरी, सामान्य माणसांचं पेंटिंग का करावंसं वाटलं ? प्रचलित सुंदर वाटणारी लॅण्डस्केप्स, पोर्ट्रेट्स का करावीशी वाटली नाहीत ? नॉस्टल्जिया'' अलमिराज': कपाटे, 'मेमरीज', 'व्हिस्परिंग सायलेन्स' 'मुंबई डायरी' 'रोड स्टोरीज' अश्या विविध चित्र मालिका का कराव्या वाटल्या? काय पार्श्वभूमी होती? विविध पेंटिंग्जच्या मागच्या भूमिका, पुस्तकांची मुखपृष्ठ करण्याकडे कसे वळलात ? कविता संग्रहांचींची मुखपृष्ठ करताना स्वातंत्र्य, समाधान कसे लाभते ?

अश्या सर्व प्रश्नांमागची पार्श्वभूमी, भूमिका तपशिलात उघडून दाखवली !

अतिशय सुंदर अशी ही मुलाखत खलील लिंकवर आपणास पाहता येईल !
https://fb.watch/68jK2uTfIO/

मला खात्री आहे, ही मुलाखत तुम्हालाही खुप आवडेल !

अन्वर हुसैन यांचं फेसबुक पान : https://www.facebook.com/anwarhusainart
अन्वर हुसैन स्केचेस : https://www.youtube.com/watch?v=6ZZ2ElS408s

(प्रचि आणि इतर संदर्भ आंजावरून साभार)

रेखाटनलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

17 Jun 2021 - 9:11 pm | कुमार१

अतिशय सुंदर चित्रे व परीचय !

धर्मराजमुटके's picture

17 Jun 2021 - 9:33 pm | धर्मराजमुटके

अतिशय सुंदर चित्रे ! इथे दिल्याबद्दल धन्यवाद !

अप्रतिम चित्रे आणि परिचय!
धन्यवाद.

स्मिताके's picture

17 Jun 2021 - 11:52 pm | स्मिताके

अतिशय सुरेख चित्रे आणि लेख. आभार.

अभिजीत अवलिया's picture

18 Jun 2021 - 6:26 am | अभिजीत अवलिया

सुरेख.

प्रचेतस's picture

18 Jun 2021 - 7:48 am | प्रचेतस

व्वा...! काय सरस चित्रं आहेत एकापेक्षा एक. आणि मुख्य म्हणजे समजणारी आहेत. नुसतेच फराटे मारलेल्या अमूर्त चित्रांपेक्षा ही चित्रे खूपच सुंदर वाटतात.

गॉडजिला's picture

19 Jun 2021 - 2:44 pm | गॉडजिला

+१

सुंदर परिचय आणि सुरेख चित्रे आहेत

अनिंद्य's picture

18 Jun 2021 - 8:04 pm | अनिंद्य

@ चौको,

सुंदर चित्रे, सुरेख परिचय, मुलाखत नंतर बघतो सविस्तर.

इथे मिपावर त्यांची चित्रे देतांना कॉपीराईटचा इशू नसावा ही इच्छा - अपेक्षा (कलाकार माणसे ह्या विषयावर थोडी हळवी असतात म्हणून ही अगोचर विचारणा, माफ करालच मला)

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2021 - 5:35 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, अनिंद्य.
कॉपीराईटच्या इशूबद्दल मला फारसं सांगता येणार नाही. हा तर परिचयात्मक, रसग्रहणात्मक लेख आहे. याचा त्या चित्रकाराला फायदाच होऊ शकतो.
या लेखामुळे चित्रकार कदाचित आनंदीत होऊ शकतील अशी शक्यता आहे.
चित्रकाराची चित्रे मी इतर सार्वजनिक संस्थळावरुनच घेतलेली आहेत.

दुसर्‍याचे काही वापरून मी त्यावर पैसा कमवत असेन तर कॉपीराईट इशूचा प्रश्न येतो अशी माझी माहिती आहे. त्यामुळे अडचण येणार नाही अशी आशा आहे.

जाणकारांनी कृपया या संदर्भात प्रकाश टाकावा.

व मूळ चित्रे विकून पैसा स्वतःच्या खिशात टाकत नसाल तर कसलाही प्रश्न उदभवत नाही...

मदनबाण's picture

18 Jun 2021 - 8:49 pm | मदनबाण

अप्रतिम...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

तुषार काळभोर's picture

19 Jun 2021 - 10:35 am | तुषार काळभोर

आपल्या सर्वसामान्य आयुष्यात दिसणारी दृष्ये असल्याने 'कनेक्ट' व्हायला सोपं जातं!

चित्रगुप्त's picture

20 Jun 2021 - 2:58 am | चित्रगुप्त

चित्रे आणि लिखाण दोन्ही आवडले.
चित्रकला, चित्रकार याबद्दल मिपावर लिखाण क्वचितच येते. हा उपक्रम असाच चालू ठेवावा, ही आग्रहवजा विनंती.

बबन ताम्बे's picture

20 Jun 2021 - 7:32 am | बबन ताम्बे

धन्यवाद चौको. सुंदर चित्रे . एका कलाकाराचा आपण सुंदर परिचय करून दिलात. चित्रकाराची शैली अफलातून आहे.
अशाच आणखी काही चित्रकारांचा आपण परिचय करून द्यावा ही विनंती.

कंजूस's picture

20 Jun 2021 - 10:41 am | कंजूस

छान!

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2021 - 12:59 pm | चौथा कोनाडा

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार !
चित्रकला & चित्रकारासंबंधीचा लेख आपणास आवडला, छान वाटले !

आज सापडले.

जहांगिर ग्यालरीला गेलो होतो २०१७ मध्ये तेव्हा एका मिपाकर आइडीचे प्रदर्शन होते. ( etching on Bronz plates). बाजूच्या दालनात अन्वर हुसेनचे प्रदर्शन होते. तेव्हा त्यांनी हे चित्रपुस्तक दिलेले. दहा चित्रे आहेत.

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2021 - 1:06 pm | चौथा कोनाडा

व्वा कंजूस साहेब,
झकासच !
अन्वर हुसेनचे चित्रपुस्तक भारी दिसतंय ! चित्रांची मेजवानीच दिली म्हणायची त्यांनी तुम्हाला !

पुस्तक पाठवेन तुमच्याकडे.
चित्रकाराचे नाव वाचल्यावर लक्षात आहे की याचे पुस्तक आहे माझ्याकडे . शोधल्यावर सापडले.
'७० - '८० दशकात माझी जहांगीरला महिन्याला एखादी फेरी असे. खूप प्रदर्शनं पाहिली. फोटोंचीही पाहिली. आता जात नाही फारसा.

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2021 - 3:52 pm | चौथा कोनाडा

पुस्तक पाठवेन तुमच्याकडे.
वा, वा, ही मेजवानीच असेल माझ्यासाठी, कंजूस जी. या निमित्तने ( कदाचित) भेट देखील होईल आपली.
आपण जहांगीरला खुप चित्रं, फोटो प्रदर्शनं पाहिलीत हे वाचून छान वाटले. असे अनुभव व्यक्तिमत्त्व समृद्ध करत असतात !

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Jul 2021 - 11:24 pm | बिपीन सुरेश सांगळे

चौको
फारच भारी
हुसेन यांच्याबद्दल मला काहीच माहित नव्हते
दोन वर्षा पूर्वी त्यांचं एक लेख वाचला अन चित्र, तेवढंच
पण आता तुमच्या मुळे हि चित्रं पाहायला मिळाली , हे भाग्यच
फारच सुंदर चित्र अन लेख
येऊ द्या अजून
आभार

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, बिपीन सुरेश सांगळे !

राघव's picture

8 Jul 2021 - 5:42 pm | राघव

मेजवानीच. :-)

चित्रकार भाष्य करतो म्हणतात ते काही खोटं नाही.

1

आता हे तुम्ही दिलेलं चित्र बघीतलं तर एखादी जुनी आठवण उफाळून आल्यावाचून राहत नाही. त्यावर आलेले आपले विचार आणि त्यातून स्फुरलेलं अफुट सार हे जरी आपले असलेत तरीही, ते मनाच्या एका कोपर्‍यातून ओढून वर आणण्याचं कसब हे त्या कुंचल्यात आहे! खूप सुंदर! धन्यवाद. :-)

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2021 - 3:46 pm | चौथा कोनाडा

अगदी खरं राघव.
या विषयावर त्यांनी 'व्हिस्परिंग सायलेन्स' ' ही चित्रमालिका केलीय. हे विषय कसे सुचले हे फार सुंदर रित्या उलगडून दाखवले आहे मुलाखतीत. मुलाखतीचा हा भाग पुन:पुना ऐकण्या सारखा आहे !
धन्यवाद !