चालू घडामोडी - जून २०२१ (भाग १)

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
2 Jun 2021 - 5:48 pm
गाभा: 

जून महिन्याच्या चालू घडामोडींचा पहिला धागा काढतोय.

गिधाडी_पत्रकारिता की गिधाडी_रुग्णसेवा

जिथे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश करू दिला जात नाही, प्रवेश मिळालाच तर मोबाइल बाहेर ठेवावे लागतात, तिथे माइक, कॅमेरे, लाइट्स इ घेऊन ही बाई मोकाट फिरते.

रुग्णालयेदेखील गिधाडी पत्रकारितेत सामील झाली आहेत का?

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Jun 2021 - 6:35 pm | चंद्रसूर्यकुमार

एका गोष्टीकडे मिडियातील किंवा अन्य क्षेत्रातील लोकांचे पाहिजे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी १० मार्चला शपथ घेतली. त्यावेळी ते उत्तराखंड विधानसभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून जाणे भाग आहे. म्हणजे त्यांच्याकडे आता तीन महिन्यांहून थोडासाच जास्त काळ राहिला आहे. पोटनिवडणुक घ्यायची एक प्रक्रीया असते. त्याप्रमाणे कोणा आमदाराने राजीनामा देणे, तो विधानसभा अध्यक्षांनी मंजुर करणे आणि निवडणुक आयोगाला ती जागा रिकामी झाली असे कळविणे आणि मग निवडणुक आयोग तिथे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो. त्यापैकी पहिली पायरीच पूर्ण झालेली दिसत नाही. तसेच उत्तराखंडमध्ये १५ ऑगस्टपर्यंत खूप पाऊस पडतो. त्यामुळे तोपर्यंत तरी पोटनिवडणुक व्हायची शक्यता खूपच कमी. आणि त्यानंतरही कोरोनामुळे पोटनिवडणुक होईलच याची खात्री नाही. तसे असेल तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोटनिवडणुक न झाल्यास तिरथसिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागेल. नवा मुख्यमंत्री नेमताना भाजपने उत्तराखंड विधानसभेतीलच एखादा सदस्य नेमायला हवा होता. उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. जर नवा मुख्यमंत्री नेमायची वेळ आलीच तर निवडणुकांना काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना आणखी नवा मुख्यमंत्री नेमणे पक्षाला जड जाऊ शकेल.

हीच गोष्ट बंगालमध्येही व्हायची शक्यता आहे. पण ममतांकडे ४ नोव्हेंबरपर्यंतचा म्हणजे आणखी जवळपास दोन महिन्यांचा अवधी आहे. आता दुसरी लाट थोडी कमी होत आहे अशी चिन्हे आहेत. समजा तोपर्यंत परिस्थिती आणखी नियंत्रणात आली तर बंगालमध्ये पोटनिवडणुक घेता येणे शक्य होईलही. पण तिरथसिंग रावतांची वाट थोडी कठिण दिसत आहे.

“तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात....

"Mumbai Mayor Kishori Pednekar Controversial Tweet BMC Global Tender sgy 87 | "तुझ्या बापाला," नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात | Loksatta" https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-mayor-kishori-pednekar-contr...

----------

काय बोलावं? ते सुचेना ....

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Jun 2021 - 12:17 pm | चंद्रसूर्यकुमार

काय बोलावं? ते सुचेना ....

शिवसेनेची खरी संस्कृती हीच आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर सभेत काढलेली अनेक वक्तव्ये अशी होती की माझ्यासारखा कोणी सामान्य माणूसही मिपासारख्या सार्वजनिक संकेतस्थळावरही ती देऊ शकणार नाही. अशी वक्तव्ये नेत्यांनी जाहीर सभेत केली होती. इतकी वर्षे वाजपेयी आणि अडवाणी शिवसेनेला मान द्यायचे म्हणून शिवसेनेचे असले प्रकार मान्य नसूनही मनापासून समर्थन कधी केले नसले तरी विरोधही करत नव्हतो. पण आता ते बंधन अजिबात नाही.

शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वगैरे परंपरेला काळीमा आहे हे नक्की.

Rajesh188's picture

3 Jun 2021 - 1:19 pm | Rajesh188

महाराष्ट्रात आहे म्हणूनच बाकी वचकून असतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Jun 2021 - 1:31 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2021 - 2:51 pm | श्रीगुरुजी

शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वगैरे परंपरेला काळीमा आहे हे नक्की.

+ ९९९९९९९९९...

जन्मापासून हा पक्ष असाच आहे व राहील.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Jun 2021 - 4:33 pm | अमरेंद्र बाहुबली

तसाच रहावा. तो तसा आहे म्हणूनच मराठी माणसाच्या मनात घर करून आहे. मोदी लाटेत ही ६३ आमदार मराठी माणसाने दिले त्याना. २०१९ ला भाजप ची सत्ता ऊलथवून त्यानी महाराष्ट्र वाचवला.

दिगोचि's picture

4 Jun 2021 - 10:11 am | दिगोचि

या बाई त्यान्च्या पूर्वीन्च्या वर्तनावरून उर्मट आहेत असा माझा समज झाला आहे. यानीच कन्गना रनौतचे घर पाडायला परवानगी दिली होती. आपल्या हातातील पॉवरचा दुरुपयोग करण्यात या पुढे आहेत. आता माझा फोन दुसर्याने वापरला असे खोटे सान्गून आपल्यावरचा आळ दुसर्यावर ढकलत आहेत. भारतात अनेक राजकारणी असेच उर्मट्पणे सामान्य लोकाबरोबर वागतात. उदा. अजित पवार व पाणी तुटवडा.

थोरले ठाकरे होते तेंव्हा ते कोणत्याही नेत्याला मैद्याचे पोते, बारामतीचा म्हमद्या , गॅस सिलेंडर अशी भाषा वापरत.
त्याबद्दल त्यांना कोणीच काही बोलू शकत नसे.
सामनाच्या अग्रलेखात अजित दादाम्बद्दल : मुतर्‍या तोंडाचे पवार " असा अत्यंत हीन उल्लेख केला गेला होता.
https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shi...

अजित दादा त्या नंतर त्याबद्दल बोलले नाही. हा खरेतर त्यांचा सुसंक्रुतपणा आहे.
पण असे कोणी सेने बद्दल बोलले तर सेनेने ते शब्द आजन्म लक्षात ठेवून व्यवहार केले असते.
सेनेची कदाचित हीच सुसंस्कृती आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Jun 2021 - 11:17 am | चंद्रसूर्यकुमार

थोरले ठाकरे होते तेंव्हा ते कोणत्याही नेत्याला मैद्याचे पोते, बारामतीचा म्हमद्या , गॅस सिलेंडर अशी भाषा वापरत.
त्याबद्दल त्यांना कोणीच काही बोलू शकत नसे.

मैद्याचे पोते वगैरे तरी खूप सुसंस्कृत शब्द झाले. त्यांनी जाहीर सभेत वापरलेले काहीकाही शब्द असे होते की ते मिपासारख्या पब्लिक फोरमवर लिहिता पण येणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2021 - 1:10 pm | श्रीगुरुजी

नारायण राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सामना अग्रलेखात जे लिहिले होते ते वाचूनच अत्यंत किळस आली होती. आपल्या अनेक वर्षांच्या सहकाऱ्याबद्दल इतके गलिच्छ किळसवाणे विचार कोणाच्या मनात असतील अशी कधी कल्पनाही केली नव्हती.

निर्लज्ज पणाचा कळस आहे हा ...
https://www.lokmat.com/mumbai/mumbai-mayor-kishori-pednekar-reaction-tro...

लोक निर्लज्ज असतात ... पण इतके? काय तर म्हणे माझ्या मोबाईल वरुन दुसर्‍या कुणी ट्वीट केले ...
हे लोक बाकी लोकांना काय मुर्ख समजतात काय ? मोबाईल या बाईचा ... ट्वीटर अकाउंट तिचे ... आनी ट्वीट म्हणे दुसर्‍याने केले ... आणी तो शिवसैनीकाचा राग होता ...
काय् च्या काय ...

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2021 - 2:49 pm | श्रीगुरुजी

ही महिला सेनेच्या उच्च परंपरेला साजेशी आहे.

इरसाल's picture

3 Jun 2021 - 4:54 pm | इरसाल

कार्यकर्त्याने केले म्हणे माझ्या मोबाईलवरुन. त्याची हकालपट्टी केली म्हणे. "माझा मोबाईल माझी जबाबदारी"
आता मा. उद्धव थाकेराय (टी एच ए सी के ई आर ए वाय) यांना राग नाही कां येणार कार्यकर्त्याची हकालपट्टी करतात म्हणजे काय????

सॅगी's picture

3 Jun 2021 - 6:24 pm | सॅगी

त्यांना जबाबदारी माहीतच नाही...जबाबदारीची वेळ आली की एकतर केंद्राकडे नाहीतर जनतेकडे बोट दाखवायचं.... =))

माझे राज्य...केंद्राची जबाबदारी

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2021 - 6:33 pm | श्रीगुरुजी

माझे राज्य...केंद्राची जबाबदारी

ते वाक्य "माझे खाद्य, जबाबदारी इतरांची" असे हवे.

यश राज's picture

3 Jun 2021 - 6:50 pm | यश राज

त्यांचं कसे आहे की झाडून वर पासून खाली पर्यंत सगळ्यांचा एकाच फंडा आहे की,

काम करायची वेळ आली की

"आलं अंगावर ढकल केंद्रावर"

केलेलं काम अंगावर शेकण्याची वेळ आली की,

"आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यावर"

बाकी बाईंचा साळसूदपणाचा आव म्हणजे एक नंबर

आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर; यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी'; मनसेचा महापौरांना टोला.....

-----------

https://m.lokmat.com/mumbai/mns-leader-sandeep-deshpande-has-taunt-mumba...

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Jun 2021 - 7:02 pm | अमरेंद्र बाहुबली

+1
केंद्र फक्त महाराष्ट्रातून भरभक्कम gst वसूल करण्यासाठी आहे हे गुलामांना कधी कळणार??

असेच व्यक्तव्य आम्ही केले असते तर काही नवीन IT कायद्याचा धाक दाखवून आम्हाला जेल मध्ये पाठवायला सरकारने कमी नसते केले. तिथे मग "फोन आणखी कुणी तरी वापरला" हा युक्तिवाद चालला नसता.

आम्ही सहन करून घेतो म्हणून हे सर्व चालते.

संजय पाटिल's picture

4 Jun 2021 - 1:37 pm | संजय पाटिल

एक वेळ मान्य करू कि हे खरं आहे.....
तरी राग कशाचा आला? याना साधे प्रश्न विचारले कि राग येतो? का?
तुम्हाला आम्हीच निवडुन दिलय म्हण्ल्यावर प्रश्न विचारायचा अधिकार आहे अम्हाला....
त्यावर असे उत्तर? तेही महपौर पदावरील व्यक्ती कडुन?
निर्लज्ज पणा आहे हा सगळा....

Rajesh188's picture

3 Jun 2021 - 1:17 pm | Rajesh188

मुख्यमंत्री झाल्या बरोबर वादग्रस्त विधाने करत होते ते.

मराठी_माणूस's picture

3 Jun 2021 - 2:03 pm | मराठी_माणूस
माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Jun 2021 - 6:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शिवसेनेत शिवीगाळ संस्कृती आधीपासुन आहेच. बाळासाहेब असताना मीडियावाले अशा विचाराना 'ज्वलंत विचार्/रोखठोक विचार' वगैरे म्हणत. 'काँग्रेस पक्ष म्हणजे हिजड्यांची फौज' आहे हे बाळासाहेबानीच २००९ मध्ये काढलेले उद्गार आहेत. असो.
त्या मेहुल चोक्सीची भानगड काय आहे? तेथील कोर्टाचा निकाल यायच्या आधीच "आम्ही त्याला आणायला विमान पाठ्वतोय" असे जाहीरपणे सांगण्याचा मूर्खपणा सरकारने केला? की ही बातमीच खोटी आहे?

"जिसकी लाठी उसकी भैस" ही म्हण तो पर्यंत प्रिय असते जो पर्यंत लाठी आपल्या हाती असते. तीच लाठी दुसऱ्याच्या हाती गेली कि अचानक "अहिंसा परमो धर्म" वाटायला लागतो.

कॉमी's picture

3 Jun 2021 - 7:11 pm | कॉमी

https://thewire.in/communalism/thrashed-for-phoning-delhi-police-helplin...

दिल्लीत एका व्यक्तीला १०० वर कॉल केल्यासाठी पोलिसांकडून मारहाण आणि धर्माधारीत शिवीगाळ झाल्याचा आरोप झाल्याचे वृत्त आहे. सदर व्यक्तीला स्पायनल सर्जरी करावी लागणार आहे असे वृत्तात दिले आहे. व्यक्तीने पोलिसांविरुद्ध २० मे ला तक्रार नोंदवली असून अजुन काहीही हालचाल झाली नाही असे दिसते आहे. घटना सुद्धा आजच समोर येते आहे.

https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/netanyahu-oppone...

बेंजामिन नेत्यानाहूंच्या विरोधकांनी युती करुन सत्तास्थापन करायचा मार्ग मोकळा केला आहे. नेत्यानाहू यांनी त्यांचा मित्र तात्यांच्या पावलावर पाऊल टाकून विरोधक कसे दुष्ट आणि अरब प्रेमी, आणि डावे वैगेरे नेहमीची रडारड चालू केली आहे. अजून नेत्यानाहूंकडे आठवडाभर वेळ आहे, त्यामुळे काय होते पाहायचे.

नाफ्ताली बेनेट २०२३ पर्यंत प्रधान मंत्री असेल, तर येर लापीद पुढे दोन वर्षे.

नाफ्ताली बेनेट हा कडवा उजवा आहे. त्याची पॅलेस्टाईन बद्दलची मते नेत्यानाहू पेक्षा अति जास्त कडवी आहेत.
येर लापीद हा सेक्युलर मताचा पुरस्कर्ता आहे.

या भागीदारीत एक राम (!) नावाची अरब संस्था सुद्धा आहे. उजव्या प्रबळ गटाच्या सरकारमध्ये सहभागी होणारी पहीलीच अरब संस्था.

कॉमी's picture

4 Jun 2021 - 10:45 am | कॉमी

सातत्याने खोट्या आणि द्वेषमूलक बातम्या पसरवण्यात हातखंडा दिसतोय. पुन्हा बंगालच्या खोट्या बातम्या सुरु केल्या.

हेच ते क्रेटली वाले जे हाथरस मध्ये सगळी डाव्यांची कन्स्पायरसी आहे म्हणणारे.
असल्या द्वेषमूलक साईटी तुम्ही वाचता ह्यात आश्चर्य काहीच नाही.
https://www.altnews.in/who-runs-kreately-alt-news-investigates-the-facto...

मदनबाण's picture

4 Jun 2021 - 11:28 am | मदनबाण

सातत्याने खोट्या आणि द्वेषमूलक बातम्या पसरवण्यात हातखंडा दिसतोय. पुन्हा बंगालच्या खोट्या बातम्या सुरु केल्या.
कॉमी तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता हे देखील उघड आहे, कारण बाकीच्या बातम्यां बद्धल तुम्ही सोयिस्कर मौन राखले आहेत ! एखादे पोर्टल खोटे आहे हे जरी मान्य केले [ ही माझी चूक मान्य करतो. ]तरी बाकीच्या बातम्यांचे काय ? मुस्लिम जज फकरुद्दिन आणि मुस्लिम उपराष्ट्रपती हमिद अन्सारी जे मोठ्या पदावर बसले होते यांच्या बद्धल तुम्ही का बोलायचे टाळले ? तिथे देखील तुम्हाला द्वेष दिसला काय ?तिथे तुम्हाला हिंदू द्वेष दिसला नाही का ? देश द्रोह दिसला नाही का ? योग्य बातम्यांना देखील न वाचण्याचा तुमचा हातखंडा आहे का ?

ही मागच्या वर्षीची बातमी देखील वाचा :- ‘Bengal recorded over 200 rapes, more than 600 kidnappings in August’: Governor Jagdeep Dhankhar
कोणाचे सरकार होते / आहे बंगाल मध्ये ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale

१. बंगाल मधील बलात्काराचे स्टॅटिस्टिक देऊन तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली असती तर मी आजिबात आक्रमक झालो नसतो. तुम्ही TMC च्या सहाय्याने/दुर्लक्षाने मुसलमान व्यक्ती करत आहेत असे मांडले. जे असत्य आहे. हे आधी एकदा मांडले होते, तरी परत तुम्ही तेच टाकले. पुर्निया मध्ये झालेल्या घटनेत सुद्धा संशयितांना अटक झाली आहे. TMC गुन्हेगारांचे रक्षण करत आहे असे त्या घटनेवरून तरी कसे म्हणू शकता येईल ?

२. तुम्ही चुकीच्या बातम्या टाकल्या तर त्या प्रतिसादातल्या योग्य त्या बातम्या दुर्लक्ष होऊ शकतात हे स्वाभाविक आहे.

३. कोणत्या बातमीवर टिप्पणी करायची, कोणत्यावर नाही हे ज्याचे त्याचे प्रिरोगेटिव्ह आहे. मी खात्री देतो, कि कोणताही गुन्हा मला समर्थनीय वाटत नाहीच. कोणत्याही धर्माच्या लोकांचा द्वेष सुद्धा मला समर्थनीय वाटत नाही. मिसळपाव वर हिंदू द्वेषाचा समाचार घेणारे भरपूर रथी महारथी आहेत. मी सुद्धा तेच करण्याची गरज नाही. पण इथे, याच साईट वर सरळसरळ शांतता प्रेमी ह्यांव आणि त्यांव करतात असे पडद्याआडचे द्वेषमूलक कंटेंट सतत आणि अत्यंत नॉर्मल म्हणून येत असते. आणि माझ्या इथल्या कारकिर्दीत जे पाहिले आहे ते बऱ्याचवेळा सरळ सरळ फेक बातम्यांवर आधारित असते, किंवा एखाद्या उदाहरणाने एक संपूर्ण समाज हिंदूनविरुद्ध मोठे षड्यंत्र रचतो आहे असे सुचवणारे असते. तिथे मी आणि कदाचित आणखी एखादे दुसरे लोकं असतील त्यांच्याशिवाय इतर कोणी चकार शब्द काढत नाहीत.

३. हे रॉ चे N K Sood हमीद अन्सारींवर देशद्रोहाचा आरोप करत आहेत का ? तसं असेल तर ट्विटर वर चिवचिव करण्यापेकशा कोर्टात जाऊन पुरावे देऊन अन्सारिना जेल मध्ये टाकावं. जर पुरावा नसेल किंवा देण्यात रस नसेल तर मग त्यांचे म्हणणे इग्नोअर केले जाईल. हे N K sood whatsaap university मधले ऍक्टिव्ह सदस्य आहेत असे दिसते.

N.K. Sood, former Research and Analysis Wing (RAW) officer and author of the book My Prime Minister Narendra Modi (Foreign Visits & Achievements) according to his Twitter bio (and yes, I verified the book title on Amazon), tweeted a picture of a sprawling building earlier this week with “This is the house of unemployed Ghulam Nabi Azad in Kashmir. See how much loot he has made." Within an hour someone had called him out, posting a screenshot of the same building from Booking.com. It was a popular hotel in Srinagar. This person had used a favourite tool of fact-checkers across the world.

त्यांच्या TL वर तो "British Herald" आणि मोदींचा व्हाट्सअप वरचा प्रसिद्ध फोटो पण आहे.

ह्याचा अर्थ असा नव्हे कि सूद गृहस्थांचे बोलणे कधीही गंभीरपणे घेऊ नये. पण जर फक्त ट्विटर वरून तोंड वाजवण्यात त्यांना रस असेल तर माझ्याकडून दुर्लक्षच होईल.
पुढील गोष्ट. एक सेकंड मानले अंसरींकडून काही चूक झाली. तुम्ही ताबडतोब त्यांच्या धर्माशी संबंध जोडला. का ? काय आधारावर ? जर हेच हिंदू व्यक्तीकडून झाले असते तर तुम्ही जोडला असता का धर्माचा संबंध ?

मदनबाण's picture

4 Jun 2021 - 2:12 pm | मदनबाण

बंगाल मधील बलात्काराचे स्टॅटिस्टिक देऊन तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली असती तर मी आजिबात आक्रमक झालो नसतो. तुम्ही TMC च्या सहाय्याने/दुर्लक्षाने मुसलमान व्यक्ती करत आहेत असे मांडले. जे असत्य आहे. हे आधी एकदा मांडले होते, तरी परत तुम्ही तेच टाकले.
सर्व प्रथम मी तुम्हाला आक्रमक होउन प्रतिसाद देत नाही, दुसरी गोष्ट मी एका विशिष्ठ समाजा विरुद्ध मी द्वेष पसरवत आहे हा जो बिनबुडाचा आणि चुकीचा आरोप करत आहात, ज्याला माझा आक्षेप आहे,असा आरोप पुन्हा करु नका ! टीएमसीच्या या आधीच्या काळात देखील बलात्कार झाले आहे आणि त्याचीही बातमी दिलेली आहे. जो स्त्रीचा व्हिडियो दिला होता त्याची देखील सत्यता तुम्हाला मान्य नाही [ यात माझा दोष नाही ] तुमची योग्य अयोग्य मोजमाप करणारी फुटपट्टी माझ्या जवळ नाही.

तुम्ही चुकीच्या बातम्या टाकल्या तर त्या प्रतिसादातल्या योग्य त्या बातम्या दुर्लक्ष होऊ शकतात हे स्वाभाविक आहे.
वा रे वा ! तुम्ही माझ्यावर द्वेष केले जाण्याचा खोटा आरोप करता आणि ही असली पळवाट घेता ? याला शुद्ध मराठीत सिलेक्टिव्ह रिडिंग म्हणतात.

पण इथे, याच साईट वर सरळसरळ शांतता प्रेमी ह्यांव आणि त्यांव करतात असे पडद्याआडचे द्वेषमूलक कंटेंट सतत आणि अत्यंत नॉर्मल म्हणून येत असते. आणि माझ्या इथल्या कारकिर्दीत जे पाहिले आहे ते बऱ्याचवेळा सरळ सरळ फेक बातम्यांवर आधारित असते, किंवा एखाद्या उदाहरणाने एक संपूर्ण समाज हिंदूनविरुद्ध मोठे षड्यंत्र रचतो आहे असे सुचवणारे असते. तिथे मी आणि कदाचित आणखी एखादे दुसरे लोकं असतील त्यांच्याशिवाय इतर कोणी चकार शब्द काढत नाहीत.
तुम्ही फक्त मुस्लिम समाजाच्या मुलाला मारहाण केली गेली ही बातमी देता, तेव्हा तुम्ही त्यांचे प्रवक्ते ठरता का ? नाही ना ? पण काही कंटेट चुकीचे दिले गेले असेल पण अन्य योग्य असेल त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही ना ! बरं मी माझी चूक स्पष्टपणे आणि इथेच उघडपणे मान्य केलेली आहे. मुळात बलात्कार ही कृती मुस्लिम आक्रमांकडुनच हिंदुस्थानात आलेली आहे.

हे रॉ चे N K Sood हमीद अन्सारींवर देशद्रोहाचा आरोप करत आहेत का ? तसं असेल तर ट्विटर वर चिवचिव करण्यापेकशा कोर्टात जाऊन पुरावे देऊन अन्सारिना जेल मध्ये टाकावं. जर पुरावा नसेल किंवा देण्यात रस नसेल तर मग त्यांचे म्हणणे इग्नोअर केले जाईल. हे N K sood whatsaap university मधले ऍक्टिव्ह सदस्य आहेत असे दिसते.
पुरावा देता येत नसेल म्हणजे गुन्हा झालाच नसतो काय ? तुम्ही ज्यांचे म्हणणे इग्नोर केले जाईल असे म्हणत आहात ते पिठाच्या गिरणीत काम करणारे नसुन रॉ सारख्या एजंन्सी मध्ये कामास होते आणि त्यामुळेच ते म्हणणे इग्नोर करण्या सारखे मुळीच नाही.

एक सेकंड मानले अंसरींकडून काही चूक झाली. तुम्ही ताबडतोब त्यांच्या धर्माशी संबंध जोडला. का ? काय आधारावर ? जर हेच हिंदू व्यक्तीकडून झाले असते तर तुम्ही जोडला असता का धर्माचा संबंध ?

हिंदू व्यक्ती किवा अन्य धर्माची व्यक्ती, देशद्रोहाचे काम करणारा हा देश द्रोहीच आहे. इथे अंसारी हे मुस्लिम आहेत तरी ते दोषीच झाले ना ? बरं हे धर्मा बाबतचे कारण तुम्ही मला चिकटवण्याचा प्रयत्न करताना धर्माने मुस्लिम असणार्‍या जज बद्धल आणि त्याने केलेल्या वक्तव्या बद्धल तुम्ही बोलत नाही ! मग मी तुम्हाला मुस्लिमांचे समर्थक म्हणायचे काय ?

माझ्यावर मुस्लिम द्वेषाचा खोटा आणि अयोग्य आरोप करण्या बद्धल, मीच लिहलल्या प्रतिक्रिया आता खाली देउन ठेवतो :-
https://www.misalpav.com/comment/508334#comment-508334
https://www.misalpav.com/comment/1005084#comment-1005084
https://www.misalpav.com/comment/1046393#comment-1046393

आता तुम्ही जर परत हा खोटा आरोप केलात, तर संपादक मंडळाकडे या आरोपाची तक्रार केली जाईल हे इथे स्पष्ट करुन ठेवतो.

जाता जाता :- छत्रपती शिवाजी महाराज की सगी चाची महाबत / महावत खां नाम के सरदारने जब वे त्रंबकेश्वर दर्शन करने गयी थी, तब दर्शन के समय उठाके ले गये. [३२:१५] अंबरीष फडणवीस :- शिवछत्रपती का हिन्दवी स्वराज्य

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale

जरुर तक्रार करा. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.

तुम्ही दिलेल्या सगळ्या गोष्टींवर मी माझे मत द्यायला मी बांधील नाही आहे.

जरुर तक्रार करा. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.
ठीक आहे, तक्रार करण्यात आलेली आहे.

तुम्ही दिलेल्या सगळ्या गोष्टींवर मी माझे मत द्यायला मी बांधील नाही आहे.
तुम्हीच केलेल्या खोट्या आरोपांना मात्र तुम्ही नक्कीच बांधील आहात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- Plato

महाराष्ट्र टाइम्स अशी बातमी कशी काय देउ शकते ?

https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/how-to-watch...

मटा वाले इतके भिकेला लागले आहेत का ?

सॅगी's picture

4 Jun 2021 - 9:58 am | सॅगी

त्यांची भीकेची पातळी इतकी खाली गेली आहे की आता दुसर्‍या मुखपत्रातील अ(ह)ग्रलेखावरही अवलंबून राहावे लागत आहे त्यांना..त्यावर बातमी देण्यासाठी..

कॉमी's picture

3 Jun 2021 - 8:12 pm | कॉमी

मोदींवर आणि केंद्र सरकारवर टिका केली म्हणुन हिमाचल भाजपाच्या एका जिल्हाप्रमुखाने विनोद दुआवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. सुप्रिम कोर्टाने आरोप उडवुन १९६२चा निर्णय अबाधीत ठेवला.
https://indianexpress.com/article/india/supreme-court-sedition-case-bjp-...

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 1:58 pm | श्रीगुरुजी

गुन्हा दाखल करून न्यायालयात गेले म्हणजे कायदा हातात न घेता कायदेशीर प्रक्रिया वापरली.

आपल्यावर टीका केली म्हणून किंवा एखादे आलेले व्यंगचित्र पुढे पाठविले म्हणून गुन्हा दाखल करणे वगैरे कायदेशीर सोपस्कार न करता गुंड पाठवून उचलून आणून बेदम मारहाण करून हाडे मोडणे, या प्रकाराविरूद्ध भोंदू पुरोगामी तोंडातून चकार शब्द काढत नाहीत.

गॉडजिला's picture

4 Jun 2021 - 2:05 pm | गॉडजिला

राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे असमर्थनिय, २००% चूक.

आणी कायदा हातात घेणे घोडचूक...

थोडक्यात सर्व एका माळेचे मणी असताना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणाऱ्या विरुद्ध चकार शब्द न काढणे संवेदनशील नागरिक्तवाचा बळी देणे होय कोर्टाचा, भारतीय संविधानाचा विरोध होय

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 2:18 pm | श्रीगुरुजी

गुन्हा दाखल केला म्हणजे कायदेशीर प्रक्रिया वापरली ना. जर गुन्हा दाखल खरणे ही चूक होती तर न्यायालयाने खटला दाखल करून न घेता तातडीने रद्द करायला हवा होता. परंतु त्यात सुरूवातीला तथ्य वाटल्यानेच न्यायालयाने सुनावणी करून शेवटी निकाल दिला. या प्रकरणात कोणी कायदा तर हातात घेतला नाही ना.

कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल करून न्यायालयात दाद मागणे आणि कायद्याला न जुमानता आपल्या विरोधकांना गु़डांची टोळी पाठवून उचलून घरी आणून बेदम मारहाण करणे यात १८० अंशांचा फरक आहे. त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे ही मारहाण करणारे निवांत असून मंत्रीपदावर विराजमान आहेत.

गॉडजिला's picture

4 Jun 2021 - 2:22 pm | गॉडजिला

त्याचाही विरोधच करायला हवा _/\_

चालायचंच कि हो गुरुजी.सगळे सगळ्या बाबीतीत बोलतील असे कसे होईल ? मी माझ्यापुरते बोलायचे तर नौसेनिकाच्या मारहाणी बद्दल निषेध नोंदवला आहेच.

भंपक भक्त सुद्धा भोंदू पुरोगाम्यांसारखेच वागतात हो. महाराष्ट्रात काही झाले की लगेच तांडव. हरियानाचा मुख्यमंत्र्याने थेट सांगितले की आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेइतके लसीकरण करत नाही आहोत तरी अळीमिळी गुपचिळी काही भक्त ठेवतातच कि नई ? तसेच हे. ज्या गोष्टी दुसरा पक्ष बोलत माही आहे त्याच आपल्याला बोलालयला लागतात. त्याचा अर्थ न बोललेल्या गोष्टीबद्दल सहमती आहे असा होत नाही.

भारतात खूपच लोक देशद्रोह करायला लागले आहेत.
१) लाच घेणे हा देशद्रोह नाही
२(बँका बुडवणे हा देशद्रोह नाही.
३)सरकारी योजना लाभार्थी नाहीत तरी पदरात पडून घेणे हा देशद्रोह नाही.
४)काळाबाजार करणे हा देशद्रोह नाही.
५)खोटी कागद पत्रे वापरून जमिनी ,फ्लॅट हडपने हा देशद्रोह नाही.
६)सांडपाणी ,मृत देह नदीत सोडून नदीचे पाणी दूषित करणे हा देशद्रोह नाही.
७) खोट्या डिग्री चा वापर करून व्यवसाय( डॉक्टर की इत्यादी) नोकरी करणे हा देश द्रोह नाही.
८) लोकांची काम लाच घेतल्या शिवाय करायचीच नाही अशी वृत्ती देशद्रोही नाही.
९) भेसळ करणे हा देश द्रोह नाही.
१०)प्रतेक सरकारी कामात कमिशन घेणे देश द्रोह नाही.
११) टॅक्स बुडवने हा देश द्रोह नाही.
असे खूप प्रकार आहेत त्या मुळे देशाला प्रचंड नुकसान होते पण तो देश द्रोह नाही .
पण सरकार वर टीका करणे हा मात्र देश द्रोह आहे .
अजब कायदा आहे.
सरकारी गुप्त माहिती शत्रू राष्ट्राला देणे हा देश द्रोह होवू शकतो.
विविध समाजात वितुष्ट निर्माण करणे हा देश द्रोह होवू शकतो.
सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव करणे हा देशद्रोह होवू शकतो.
पण सरकार वर,नेत्या वर टीका करणे हा देश द्रोह कसा असेल

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Jun 2021 - 10:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललास रे राजेशा. करोना व त्यातून ठप्प झालेली अर्थव्यवस्था ह्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले आहे. कोणत्याही देशात राष्ट्रिय संकट येते तेव्हा त्याची मुख्य जबाब्दारी देशप्रमुखावर व त्याच्या मंत्रीमंडळावर येते. तशीच ती मोदी सरकारवर आहे. त्यामुळे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर टीका ही होणारच. जेवढे राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल केले जातील त्याच्या कित्येक पटीने सुशि़क्षित मतदार भाजपापासुन दूर जातील.

अटी-शर्तींसह चित्रिकरणाला परवानगी द्या; मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी....

-------

"Allow Filming With Terms Demand For Entertainment Sector To The CM Uddhav Thackeray | अटी-शर्तींसह चित्रिकरणाला परवानगी द्या; मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी" https://marathi.abplive.com/news/mumbai/allow-filming-with-terms-demand-...

--------

आता बियरबार पण सुरू होतीलच.... सरकारचा खरा इंटरेस्ट, सिनेमा आणि बियरबार मध्येच दिसतो आहे...

कॉमी's picture

4 Jun 2021 - 12:26 am | कॉमी

हाय कोर्टासमोर सादर केलेल्या ड्रग नियंत्रकांच्या अहवालात गौतम गंभीरला परवाना नसताना औषधे साठवणे आणि वितरण करणे या बाबत दोषी मानलं गेलं आहे. ड्रग कंट्रोल ओथोरिटी ने याआधी काही दिवसांपूर्वी तुटवडा नव्हता असा निर्वाळा आणि गंभीरला क्लीन चिट दिली होती, तेव्हा हाय कोर्ट न्यायाधीश संतापले होते, कारण तपास झाला नव्हता.

कोर्ट म्हणाले की तुझा हेतू चांगला असला तरी तू जे केलंस त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली आणि तुटवड्यामध्ये भर पडली.
https://indianexpress.com/article/cities/delhi/unauthorised-purchase-dis...

भारतीय संस्कृतीत अत्यंत रूटेड असलेल्या आमच्या मराठी पर्यावरण मंत्र्यांचे ज्ञान खरोखर खूप छान आहे :
https://www.youtube.com/watch?v=Wumj9ptG6ug

कॉमी's picture

4 Jun 2021 - 9:21 am | कॉमी

हीही
This is concrete !

गॉडजिला's picture

4 Jun 2021 - 10:06 am | गॉडजिला

=)) =)) =))

पुणेकर शोभतो ?

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Jun 2021 - 12:15 pm | चंद्रसूर्यकुमार

१. एक प्रसिध्द कवी आणि बॉलीवूडमधील गीतकार आहे. त्याने पंतप्रधानांच्या काही धोरणांवर टीका करणारे भाषण दिले म्हणून त्या कवीला तुरूंगात टाकले गेले आहे. तो चांगला दोन वर्षे तुरूंगात राहिला.

२. एक पत्रकार आणि पुरोगामी नेता आहे. त्याने आपल्या नियतकालिकात पंतप्रधानांवर टीका करणारे लेख लिहिले म्हणून एका राज्यात त्या नियतकालिकाचे वितरण करायला बंदी आणण्यात आली आहे.

३. एक पुरोगामी नेता आहे. त्याने सरकारविरोधात भाषण दिले. जसे आपण इंग्रजांना भारतातून हाकलून दिले तसे आताच्या सत्ताधार्‍यांनाही हाकलायला हवे असे त्या भाषणात म्हटले. त्या नेत्याविरूध्द देशद्रोहाची केस एका राज्य सरकारने दाखल केली आहे.

४. एक व्यंगचित्रकार आहे. त्याने आपल्या व्यंगचित्रात संसदेची तुलना संडासाबरोबर केली म्हणून त्या व्यंगचित्रकाराविरूध्द एका राज्य सरकारने देशद्रोहाची केस दाखल केली आहे.

पुरोगामी डाव्या विचारवंतांनो, देशात कित्ती कित्ती असहिष्णुता वाढत चालली आहे ना? मग काय. सरकार अगदी पूर्ण असहिष्णुतेचे वातावरण देशात पसरवत आहे. आपल्याविरोधात एक शब्द बोललेला सरकारला खपत नाही. मग काय पुरोगामी विचारवंतांनो पिटणार टाळ्या?

पण थांबा. डाव्या विचारवंतांनो इतका अतीउत्साह दाखवू नका. हे सगळे प्रकार करणारे सरकार मोदी सरकार नाही बरं का. आणि या प्रकारांमध्ये ज्यांना तुरूंगात टाकले गेले त्यातील बरेचसे तुमच्याच विचारांचे समर्थक होते. ते कोण होते हे बघायचे का?

१. तो कवी आणि बॉलीवूडमधला गीतकार होता मजरूह सुलतानपुरी आणि ज्या पंतप्रधानावर त्याने टीका केली होती तो पंतप्रधान होता जवाहरलाल नेहरू.

२. त्या पत्रकाराचे नाव होते रोमेश थापर आणि त्याने टीका केली होती तो पंतप्रधान होता जवाहरलाल नेहरू. त्याने लिहिलेल्या लेखांबद्दल त्या नियतकालिकाचे मद्रास राज्यातील राज्य सरकारने राज्यात वितरण रोखले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि रोमेश थापर विरूध्द मद्रास सरकार हा स्वातंत्र्यानंतर पहिल्या अगदी काही वर्षातील गाजलेला खटला होता. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मद्रास सरकारचा निर्णय अवैध आहे असे म्हटले. यावर जवाहरलाल नेहरू सरकारची प्रतिक्रीया काय होती? तर राज्यघटनेत पहिली घटनादुरूस्ती झाली त्यात रोमेश थापर यांचे प्रकरण ' reasonable restrictions on the freedom of speech' यात बसावे याप्रकारे बदल करण्यात आले.

३. तो नेता होता बिहारमधील कम्युनिस्ट नेता केदारनाथ सिंग आणि त्याने टीका केली होती तो पंतप्रधान होता जवाहरलाल नेहरू. त्याने पंतप्रधानांविरोधात टीका केली म्हणून बिहारमधील काँग्रेस सरकारने १९६० मध्ये त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला भरला. त्या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तो देशद्रोहाचा आरोप रद्द केला. यातही दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे परवा विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला भरला गेला होता तो रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने याच केदारनाथ सिंग विरूध्द बिहार सरकार या खटल्याचा संदर्भ दिला होता. त्या खटल्यामध्ये आपल्याच विचारांच्या एका नेत्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला गेला होता हे आता विनोद दुआवरील खटला रद्द केला म्हणून त्यावर टाळ्या पिटणार्‍या कॉमी विचारवंतांच्या गावी असते की नाही कोणास ठाऊक. दुसरी गोष्ट म्हणजे केदारनाथ सिंगवर तो खटला बिहारच्या राज्य सरकारने टाकला होता आणि विनोद दुआवर खटला भरणारा कोणी हिमाचल प्रदेशातील भाजप कार्यकर्ता आहे. या दोन गोष्टी समकक्ष कशा काय? केदारनाथ सिंगांवर १९६० मध्ये बिहार राज्य सरकारने देशद्रोहाचा खटला भरला म्हणून डाव्या विचारांचे लोक नेहरूंवर असहिष्णुतेचा आरोप करत असतीलही. पण आता तेच लोक नेहरू म्हणजे कित्ती कित्ती सहिष्णुतेचा पुतळा होते याचे गोडवे गात असतात. आणि त्या बरोबरच हिमाचलमधील कोणा टिनपाट भाजप कार्यकर्त्याने विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला भरला तरी त्याचा दोष मोदींवर येत असतो. आहे की नाही मज्जा?

४. ही घटना २०१० मधील आणि त्या व्यंगचित्रकाराचे नाव होते असीम त्रिवेदी. आणि त्याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला भरणारे सरकार होते महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार- तेच सरकार ज्याच्या कारकिर्दीत सहिष्णुतेचा महापूर वाहायचा.

कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे. त्यानिमित्ताने गोळा केलेल्या माहितीतून.

शाम भागवत's picture

4 Jun 2021 - 12:52 pm | शाम भागवत

👌
👍

शाम भागवत's picture

4 Jun 2021 - 12:53 pm | शाम भागवत

कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे.

👌
👍

कॉमी's picture

4 Jun 2021 - 12:55 pm | कॉमी

लगेच ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं, म्हणजे तुम्ही दुटप्पी आरोळ्या सुरूच !
मी कधी म्हणले-
१.मोदींचा दोष आहे
२. आधीचे सरकार सहिष्णू होते
३. आत्ताचे सरकार असहिष्णू आहे ?

एकही गोष्ट "कॉमी विचारवंत" म्हणजे बहुदा मी असें, मांडत नाही आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Jun 2021 - 1:06 pm | चंद्रसूर्यकुमार

एकही गोष्ट "कॉमी विचारवंत" म्हणजे बहुदा मी असें, मांडत नाही आहे.

धन्यवाद. मिपावरील एक सदस्य सोडून जगात एकही कॉमी विचारवंत नाही असा तुमचा म्हणायचा उद्देश असेल तर मी जो भेटेल त्याला पेढे वाटेन. डायनासोर बघितलेला कोणीही आताच्या काळात पृथ्वीतलावर नाही आणि डायनासोरविषयी केवळ त्या काळाशी संबंधित पुस्तकांमधूनच वाचायला मिळते तशी वेळ कधीतरी कम्युनिस्ट विचारवंतांविषयी यावी असे फार फार वाटते.

कॉमी's picture

4 Jun 2021 - 1:08 pm | कॉमी

ताकाला जाऊन भांडे छान लपवता कि !

तुम्ही तुमचे नाव बदलावे ही विनंती. तुम्ही फार जनरीक नाव घेतले आहे. त्यामुळे कम्युनिस्ट असं कुणाला लिहायचं असेल तर कॉमि आणि काँग्रेस वाल्याना काँगी, भाजप वाल्याना भक्त असं म्हणायचे प्रकार होत राहणार. आता एखाद्याने भक्त म्हणून नाव घेतलं तर त्याने स्वतःचं नाव घेतलं जाणे हा आरोप खरा असू शकतो किंवा नसू ही शकतो.

mayu4u's picture

5 Jun 2021 - 7:14 pm | mayu4u

डायनासोर बघितलेला कोणीही आताच्या काळात पृथ्वीतलावर नाही आणि डायनासोरविषयी केवळ त्या काळाशी संबंधित पुस्तकांमधूनच वाचायला मिळते तशी वेळ कधीतरी कम्युनिस्ट विचारवंतांविषयी यावी असे फार फार वाटते.

फु ट लो!

वामन देशमुख's picture

4 Jun 2021 - 1:07 pm | वामन देशमुख

कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे. त्यानिमित्ताने गोळा केलेल्या माहितीतून.

+१

प्रदीप's picture

4 Jun 2021 - 1:07 pm | प्रदीप

५. आणिबाणीच्या काळांत तत्कालिन आय. अँड बी. मिनीस्टर, व्ही. सी. शुक्ला ह्यांना वाटले की २० कलमी कार्यक्रमाची महती सांगणारे कार्यक्रम ऑल इंडिया रेडियो व दूरदर्शनवरून प्रसरीत करावेत, व ह्या कार्यक्रमांसाठी हिंदी चित्रपटसृष्टील कलाकारांचा समावेश असावा. त्यांत किशोरकुमारने सहभागी व्हायचे नाकारले. तेव्हा त्याच्यावर ह्या दोन्ही माध्यमांसाठी बंदी घालण्यांत आली. (चित्रपट गीते सर्वदूर जाण्यासाठी तेव्हा ही प्रमुख माध्यमे होती. कॅसेट्सचा जमाना नुकताच येत होता).

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Jun 2021 - 1:37 pm | चंद्रसूर्यकुमार

हो किशोरकुमारवर बंदी घातली होती हा मुद्दा विसरलोच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jun 2021 - 1:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चंसुकु, आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो . ट्रेन्स/बसेस वेळेवर सुटायच्या. लाच न देता सरकारी कामे व्हायची. गरीब वर्गाला मात्र अतिशय जाच झाला. ज्यामुळे काँग्रेस ७७च्या निवडणूकीत हरली.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 2:01 pm | श्रीगुरुजी

आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो .

गैरसमज आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Jun 2021 - 2:34 pm | चंद्रसूर्यकुमार

चंसुकु, आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो . ट्रेन्स/बसेस वेळेवर सुटायच्या.

ट्रेन्स्/बसेस वेळेवर सुटायच्या म्हणून मध्यमवर्गीय खूष असतील तर त्यांना सरकारी दमनचक्रामध्ये नक्की काय चालू आहे याविषयी काहीच माहिती कळत नव्हती त्यामुळे अशा वरवरच्या गोष्टींना भुलून खूष असतील. कोणालाही उचलून जबरदस्तीने नसबंदी केली जाईल ही भिती असेल तर १९ महिने ट्रेन्स्/बसेस वेळेवर सुटाव्यात यासाठी ती फार मोठी किंमत झाली नाही का? चित्रपट बघून बाहेर पडणार्‍या कोणालाही उचलून नसबंदी केंद्रात नेले गेले अशा घटना आणीबाणीत घडल्या आहेत. दिल्लीहून चंदीगडला बसने एका परिषदेसाठी चाललेल्या बुध्दीजीवी लोकांना पकडून चंदीगडच्या नसबंदी केंद्रात नेले गेले होते. अशा अनेक घटना घडल्या होत्या.

आणीबाणीत सी.चिट्टीबाबू हा खासदार तुरूंगात पोलिस मारहाणीत मरण पावला. आणि तो मरण पावला इतका मार त्याने खाल्ला कारण तुरूंगात एम.के.स्टालिनला (तोच स्टालिन-- सध्या तामिळनाडूचा मुख्यमंत्री असलेला) पोलिस मारत असताना तो त्याला वाचवायला गेला म्हणून पोलिसांनी चिट्टीबाबूंनाच बेदम मारहाण केली. जिथे खासदाराचा पोलिस मारहाणीत मृत्यू होऊ शकतो तिथे सामान्यांची काय कथा? स्नेहलता रेड्डीसारख्या अभिनेत्रीचा, विजयन नायर सारख्या कार्यकर्त्याचा असाच पोलिसांच्या अत्याचारांमुळे मृत्यू झाला. गौरकिशोर घोष यासारख्या पत्रकाराचा पोलिस कोठडीत हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला. तुर्कमान गेटविषयी काही बोलूच नका. अन्यथा झोपडपट्ट्या हटवायला लागल्यावर मेधा पाटकर वगैरे ढोंगी लोकांच्या बरोबरीने हे पुरोगामी लोक उच्चरवाने झोपडपट्टी रहिवाश्यांच्या बाजूने बोलत असतात तेच आता तुर्कमान गेट हटवताना तिथे गोळीबार करून दीड-दोनशे लोकांना इंदिरांच्या सरकारने ठार मारले तरी वर 'आणीबाणीत काहीच अत्याचार झाले नाहीत' असे वर तोंडाने बोलायचे ढोंग दाखवतात तेव्हा डोक्याला प्रचंड शॉट जातो.

कधीकधी वाटते की आणीबाणी कित्ती कित्ती चांगली होती हे म्हणणार्‍या समाजवादी ढुढ्ढाचार्यांना मोदी सरकारने खरोखरच अशी जबरस्तीने नसबंदी करायला पाठवावे नाहीतर कोणतेही कारण न देता अनिश्चित काळासाठी तुरूंगात डांबावे. या पुरोगामी पोपटांना तीच भाषा कदाचित कळत असेल.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 2:39 pm | श्रीगुरुजी

माझ्या शाळेतील दोन शिक्षकांना आणिबाणीच्या काळात २० महिने तुरुंगात डांबले होते कारण म्हणे त्यांचा संघाशी संबंध होता. ते सुद्धा मध्यमवर्गीयच होते.

सुबोध खरे's picture

5 Jun 2021 - 12:07 pm | सुबोध खरे

लाच न देता सरकारी कामे व्हायची

हा गैरसमज आहे. कोणतेही सरकारी काम तेंव्हा लाचे शिवाय झाले तर नाहीच परंतु लाच खायला भीती वाटत असल्याने कामे प्रचंड प्रमाणात प्रलंबित राहिली होती.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 1:54 pm | श्रीगुरुजी

अजून एक.

१९९३ मध्ये दूरदर्शनवर खून भरी मांग हा चित्रपट दाखविला होता. त्या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाची दृश्ये आली की चित्र एकदम स्तब्ध व्हायचे. संवाद ऐकू येत होते, पण चित्र स्थिर रहायचे. शत्रुघ्न सिन्हाचे दृश्य संपले की तेथून पुढे चित्रपट नेहमीच्या वेगाने चित्रपट दिसायला लागायचा. हा मूर्खपणा करण्याचे एकमेव कारण होते की शत्रुघ्न सिन्हा तेव्हा भाजपत होता. कलाकारांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे भंपक गप्पा ठोकणारे पवारांसारखे अनेक जण त्यावेळी नरसिंहराव मंत्रीमंडळात होते व त्यांनी या प्रकाराविरूद्ध चकार शब्द काढला नव्हता.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jun 2021 - 2:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राज ठाकरे ह्यांनी नरसिंह राव ह्यांची २/३ आक्षेपार्ह म्हणता येतील अशी व्यंगचित्रे काढली होती(मार्मिक्/सामना). मात्र देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही की राज ठाकरे ह्यांना ई.डी.ची नोटीस आली.

गॉडजिला's picture

4 Jun 2021 - 2:41 pm | गॉडजिला

असे वर्मावर बोट ठेऊ नका हो शर्मा दुखावेल

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 2:59 pm | श्रीगुरुजी

मग माणसे पाठवून बदडलं असेल.

राज सध्या तेच करतो. मनसे किंवा राज विरूद्ध कोणी काही लिहिले की राजची माणसे लिहिणाऱ्याला बदडून माफी मागायला लावतात.

रात्रीचे चांदणे's picture

4 Jun 2021 - 1:21 pm | रात्रीचे चांदणे

विनोद दुआ, बरखा, राजदिप आणि रविष ह्या लोकांनी खरंच चूक केल्या असतील तर नक्कीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, पण उगाच त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल नाही केला पाहिजे. मुळात मोदींच्या उदया मध्ये ह्या लोकांच्या एकतर्फी reporting खारीचा का होइना पण वाटा आहे. ज्या चुका नेहरूंनी केल्या त्याच परत मोदींनी कशाला करायला पाहिजे?
हे लोक जेव्हढ मोदी विरुद्ध बोलत जातील तेवढा जास्त फायदा मोदींना होईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Jun 2021 - 1:38 pm | चंद्रसूर्यकुमार

ज्या चुका नेहरूंनी केल्या त्याच परत मोदींनी कशाला करायला पाहिजे?

मुद्दा हा की विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला केंद्र किंवा हिमाचलच्या भाजप सरकारने दाखल केला नसून कोणा स्थानिक टिनपाट भाजप नेत्याने अती उत्साहात दाखल केला आहे हा फरक आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jun 2021 - 1:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरखा दत्त्/रविश कुमार हे लोकांचे प्रश्न पत्रकारितेतून मांडतात असे आमचे मत. ते तोरसेकर्/अनिल थत्ते हे दरबारी पत्रकारिता करतात. कोणी कुठे कट शिजवला? कोणी कोणाला टोला मारला? पवार-फडणवीस भेटीत नेमके काय घडले? वगैरे
उत्तर प्रदेशात गंगेच्या किनार्यावर जेथे मृतदेह पुरण्यात येत होते, तेथे जाउन फिल्ड रिपोर्टिंग करणे हे धाडसाचे नाही का ?https://www.youtube.com/watch?v=7F5rXGSifzw की तेथे भाजपा सत्तेवर आहे म्हणून देशद्रोह म्हणणार?

सुशांत सिंग रजपूत प्रकरणाचे काय झाले नक्की? सरकार अडचणीत आले की ड्रग्जचे सेवन केलेल्या फिल्मि लोकांना एन.सी.बी. ची नोटीस येते. किती दिवस हा पोरखेळ करणार?

कॉमी's picture

4 Jun 2021 - 3:24 pm | कॉमी

NCB तर ठीक आहे हो. निदान तिथे खरोखरचा गुन्हा तरी आहे.

पण ते SSR खुनाचे प्रकरण कुठे हवेत जिरले काय माहित. बिहार निवडणुकीत सुशांतला न्याय मिळवून देण्याचे वचन दिलेले, काय झाले पुढे ?

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 3:36 pm | श्रीगुरुजी

भाजपने सुशांतसिंग प्रकरणाचा वापर फक्त ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी केला. यातून आपल्याला काही तरी मिळेल व ते वापरून ठाकरेंवर दबाव आणून त्यांना पायउतार व्हायला भाग पाडू या भ्रमात फडणवीस-चंपा होते. हे प्रकरण सीबीआयकडे दोन महिन्यांनंतर गेले. दरम्यानच्या काळात त्यातील अडचणीचे पुरावे (असलेच तर) पोलिसांनी नक्कीच नष्ट केले असणार. त्यातूनही काही पुरावे शिल्लक राहिले असतील तर ऑक्टोबर मधील फडणवीस-राऊत यांच्या दोन तासांच्या भेटीनंतर त्यावर पडदा पडला असणार कारण त्या भेटीनंतर भाजप नेते एकदम गप्प झाले.

प्रदीप's picture

4 Jun 2021 - 4:25 pm | प्रदीप

इथे एकाहून अधिक गल्लती व सरसकटीकरण झालेले आहे.

ते तोरसेकर्/अनिल थत्ते हे दरबारी पत्रकारिता करतात. कोणी कुठे कट शिजवला? कोणी कोणाला टोला मारला? पवार-फडणवीस भेटीत नेमके काय घडले? वगैरे

भाऊ तोरसेकर व अनिल थत्ते एकाच तागडीत मोजणे हे सरसकटीकरण आहे.

मोदी २०१४ साली सत्तेवर येण्याअगोदरपासून, म्हणजे २०१३ सालापासून भाऊ तोरसेकरांनी, मोदींच्या विजयाचे निदान केले होते. एक जुने व जाणते पत्रकार असल्याने सामाजिक व राजकिय घडामोडींचे संदर्भ त्यांच्या डोक्यात असतात-- म्हणजे त्यासाठी त्यांना गूगल करावे लागत नाही. त्या जोरावर त्यांना अनेक घटनांमधून पॅटर्न्स दिसतात, जे ते त्यांच्या विश्लेषणांतून मांडतात. अतिशय सीनियर असल्याने आता ते प्रत्यक्ष फील्ड रिपोर्टींग करत नाहीत, त्यांची भूमिका निव्वळ विश्लेषकाची आहे. आता गेल्या काही वर्षांतील त्यांची वक्तव्ये पाहिली, तर त्यांत ते कुठल्या एका पक्षाचे दरबारी आहेत असे अजिबात दिसत नाही. वेळोवेळी त्यांनी पवारांवर टिका केलेली आहे. पूर्वी मार्मिक व बाळासाहेबांच्या परिसरांत वावरल्यामुळे की काय, २०१९ च्या लोकसभा निवडणूका व नंतरच्या विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान, राज ठकरेंवर बरीच भिस्त ठेऊन होते. त्यांची तेव्हाची वक्तव्ये जणू काही राज ह्यांना सल्ले देत असावेत असे वाटावी अशी होती. नंतर सेनेचे सरकार आल्यानंतर ते अनेकदा सेनेचे सल्लागार होऊ इच्चितात की काय, असे वाटावे, अशा तर्‍हेची त्यांची वक्तव्ये असायची. हे खरे आहे की बहुधा ते मोदींना वाखाणतात. हे सगळे अशासाठी सांगितले, की ते जर कुणाचे दरबारी असतीलच, तर नक्की कुणाचे, मग? खरे तर जुन्या पिढीच्या गंभीर पत्रकारीतेचे ते आता शेवटचे दुवा आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.

अनिल थत्तेने स्वतःच अलिकडे जाहीर सांगितल्याप्रमाणे तो ब्रँडींग करतो. 'प्रशांत किशोर अलिकडे जे करत आहे, ते मी केव्हापासूनच करतोय' हे त्याचेच वक्तव्य आहे. आणि त्याचे अलिकडे पुनरागमन झाल्यावर भाऊंनी त्याच्याबद्दल म्हटले होते, की अलिकडे मराठींत जी पत्रकारीता सुरू आहे, त्यांनी उगाच बाळशास्त्री जांभेकरांचे वगैरे नांव न घेता, अनिल थत्तेचे नाव घ्यावे. कारण त्यांचे जे काही आजकाल सुरू आहे, त्याचा महाराष्ट्रापुरता श्रीगणेशा थत्तेने, ८० च्या दशकांत, गगनभेदी चालवून केला.

बरखा दत्त्/रविश कुमार हे लोकांचे प्रश्न पत्रकारितेतून मांडतात असे आमचे मत.

बरखा दत्त, राजदीप इत्यादी पत्रकार कमी व भडक सेन्सेशनल काही सांगणारे असे होते व तसेच आहेत. त्यांतून, यूपीएच्या कारकीर्दींत त्यांच्या राजकीय उचापती उघड झालेल्या होत्या. तेव्हा हे लोक फिक्सर्सचेही काम करत होते. आता त्यांना ती संधी नाही. राहता राहिला प्रश्न त्यांच्या पत्रकारीतेचा.

राजदीप त्याच्या कारकीर्दीत अनेकदा चक्क खोटे बोलला हे जगजाहीर झालेले आहे. एकदा तरी त्याने कोर्टांत माफी मागितली आहे. अलिकडेच त्याचे दोन रिपोर्ट्स (शेतकर्‍यांच्या 'आंदोलनां'तील एकाचा झालेला मृत्यूची बातमी, व राष्ट्रपतींच्या बंगाल दौर्‍यांत ते रवींद्रनाथांच्या खुर्चीवर बसल्याची बातमी) खोट्या/ अतिशयोक्त होत्या. ह्यांपैकी राष्ट्रपतींच्या विषयीच्या बातमीची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेऊन त्याच्या चॅनेलच्या मालकालाच लिहीले, त्यामुळे आपण दखल घेत काहीतरी करतोय, असे दाखवणे त्या मालकाला भाग पडले.

ग्राउंड रिपोर्टीगचेही काही नियम असतात. काही 'बॉटम लाईन्स' असतात, त्या हे दोघेही वारंवार उल्लंघतांना दिसतात. (तुम्ही ज्या मृतदेह पुरण्याची बातमीचा उल्लेख केला आहे, त्याचे निराकरण नंतर झालेले होते. ही तेथील काही जमातींची नेहमीची प्रथा आहे. त्याचा कोव्हिडशी संबंध नव्हता. व ती प्रेते उकरून वर काढतांना एका माणसाला हातोहात पकडण्यात आले - त्याचे काम सीसीटीव्हींत बंदिस्त झालेले होते). हिंदूंच्या स्मशामांत जाऊन तेथे अनेक चिता जळत आहेत, ह्या पाश्वभूमीवर रीपोर्टींग करणे कितपत योग्य आहे? एकतर, ह्यांत त्या देहांचा, त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा सन्मान राखला जात नाही. दुसरे ही अशी दृष्ये परदेशी न्यूज चॅनेल्स आनंदाने उचलतात व तेथे दाखवतात. निव्वळ, भारतांतील कोव्हिडच्या पराकोटीची बातमी म्हणून ते जे जर असे करीत असतील, तर ह्या अगोदर, गेल्या वर्षी अमेरिका, इटली इत्यादी ठिकाणी जो असाच व इतकाच गंभीर हाहा:कार उडाला होता, त्यांच्याही रूग्णालयाच्या व्यवस्था कोलमडून पडल्या होत्या, प्रेते ठेवण्यासही जागा नव्हत्या- त्या सर्व वेळी आपण कुणी अशाच प्रकारची कव्हरेजेस पाहिली काय? मी परदेशांतील अनेक चॅनेल्स पाहू शकतो, व एकही असे काही भयंकर ( gory, morbid) वाटावे, असे दृष्य माझ्यातरी पहाण्यांत आलेले नाही. तेव्हा आक्षेप बरखाच्या फाजिल उत्साहाला आहे. 'जसे आहे, तसे आम्ही दाखवतो आहोत' हे जस्टिफिकेशन अतिशय चुकीचे आहे. साधे उदाहरण घ्या-- कुठलाही अपघात झाला, उदा. गाडीखाली कुणाचा चेंदामेंदा झाला, तर त्या मृत देहाचे दर्शन 'बातमी' म्हणून करू नये, ही साधी पत्रकारीतेची प्रथा आहे. हे सर्व बरखाच्या कव्हरेजेसमधे उल्लंघले गेले आहे.

तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.

वामन देशमुख's picture

4 Jun 2021 - 4:45 pm | वामन देशमुख

तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.

+९१

सुक्या's picture

4 Jun 2021 - 11:19 pm | सुक्या

खरं आहे ..
बरखा / रबीश / राजदीप ह्यांनी तटस्थ पत्रकारीतेला सुरुंग लावला. त्यांच्या उमेदीच्या काळात समाज माध्यमे जास्त नसल्यांमुळे ते जे बोलतील / दाखवतील ते सत्य मानले जाइ. आजकाल ते शक्य नाही ... कुठलीही चर्चा फिरुन फिरुन आपल्या अजेंड्यावर घेउन येणे हेच या लोकांचे ध्येय असते .. रबीश कुमार चा मोनोलोग तर अक्षरशः डोक्यात जातो.

मागे दिल्लीत दलालांच्या आंदोलकांनी जो गोंधळ घातला त्या दिवशी राजदीप तर रस्त्यावर मस्त फिरत अजुन एका पत्रकाराबरोबर गप्पा मारत "सर्व काही ठीक आहे" वगेरे दाखवायचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या अपघातात मरण पावलेल्या शेतकर्‍याचा म्रुत्यु गोळी लागुन झाला आहे आनी त्याची जखम मी पाहीली आहे वगेरे धादांत खोटी माहीती त्याने दिली होती .. नंतर दिल्ली पोलीसांनी व्हीडीयो फुटेज सार्वजनीक केल्यावर त्याचे बिंग फुटले ..

या लोकांचा अजेण्डा पत्रकार म्हणुन उल्लेख करायला हवा ..

वामन देशमुख's picture

5 Jun 2021 - 2:24 pm | वामन देशमुख

मागे दिल्लीत दलालांच्या आंदोलकांनी जो गोंधळ घातला त्या दिवशी राजदीप तर रस्त्यावर मस्त फिरत अजुन एका पत्रकाराबरोबर गप्पा मारत "सर्व काही ठीक आहे" वगेरे दाखवायचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या अपघातात मरण पावलेल्या शेतकर्‍याचा म्रुत्यु गोळी लागुन झाला आहे आनी त्याची जखम मी पाहीली आहे वगेरे धादांत खोटी माहीती त्याने दिली होती .. नंतर दिल्ली पोलीसांनी व्हीडीयो फुटेज सार्वजनीक केल्यावर त्याचे बिंग फुटले

हेच म्हणायचं होतं.

अशा न-पत्रकारावर, त्याने केलेल्या कृत्याबद्धल (खोटी बातमी देणे = अफवा पसरविणे) जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे?

बंगालातील निवडणुकोत्तर हिंसाचारातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे?

दिल्लीतील न-शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराला चार महिने होऊन गेलेत; लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अवमान करणाऱ्याला / इतर दंगेखोरांना, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे?

आणि हं, विसरलोच... इसवीसन २०२० च्या जानेवारीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वेळी दिल्लीत दंगली झाल्या होत्या, त्यातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे?

मी इथे म्हटल्याप्रमाणे, मोदी-शहा त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग करण्यात पुरेसे कार्यक्षम नाहीत असाच याचा अर्थ होत नाही का?

जनतेला दिसेल अशी कारवाई = गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्याची केवळ शिक्षा करून पुरेसे नसते, त्याला वेळेत आणि पुरेशी कडक शिक्षा झाली आहे हे जनतेला समजणे, हेही आवश्यक असते.

महामहिम अन्नदाता प्रधानसेवक राजयोगी मानवश्रेष्ठ पुरुषोत्तम सध्या पूर्णपणे आपल्याच मनोर्यात मग्न आहेत. सर्व चमचे सध्या शक्तिमान मधील "अंधेरा कायम रहे" प्रमाणे चाटुकारिता करण्यात पूर्णपणे मग्न आहेत. कॉलेज मध्ये असताना कुणी "कपल" निर्माण झाले कि फ्रेंड झोन मधून ते वर कधी येते ह्याची एक लिटमस टेस्ट होती. ती म्हणजे दोघेही एकमेकांच्या सानिध्यांत बिनधास्त पणे अपानवायु निष्कासन करू लागले तर हि मंडळी पिकॉक डान्स मधून बाहेर येऊन पूर्णपणे कपल झाली आहेत असे समजत असत.

पण महामहिम नरपुंगव नेतृत्वश्रेष्ठ प्रधानसेवकांच्या इष्क मध्ये समस्त भक्तमंडळींनी सारी हदे पार केली आहेत. सध्या ह्या नारशार्दुलने अपानवायू बाटलीत भरून दिला तरी ह्याला साक्षांत कस्तुरीचा सुगंध येतो असे ह्यांचे कर्तव्यदक्ष मंत्रिमंडळ ट्विट करतील.

चाटुकारिता कुठल्या लेव्हल ला पोचलीय पहा.

1

2

1

3

3

एका बाजूला वाईट वाटते आणि दुसऱ्या बाजूला हास्यास्पद. ह्यांतील बहुतेक मंडळी स्वयंप्रकाशित नाहीत. हि रेडियम प्रमाणे आहेत. स्वतःचा प्रकाश नाही त्यामुळे ज्याला प्रकाश आहे तो रिफ्लेक्ट करू कसे बसे आपले अस्तित्व जस्टीफाय करायचे. जावडेकर, रवी प्रसाद, स्म्रिती इराणी, निर्मला ह्यानी मला आधीच ब्लॉक केले असल्याने त्यांची चाटुकारिता मी शोधू शकले नाही पण त्यांनी सुद्धा चरणामृत प्राशन करून आपल्या अस्तित्वाची जाणीव महामाहीमना करून दिली असेलच. शोध घ्यावा.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2021 - 3:07 pm | श्रीगुरुजी

दहावी आणि १२ वी ची परीक्षा रद्द करणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. भविष्यात याचे गंभीर दुष्परिणाम दिसणार आहेत.

यंदा सर्वानी UPSC चे फॉर्म भरायचे आहेत
परीक्षा रद्द झाली तर सर्वजण आपोआप IAS अधिकारी होणार.

लोन माफी प्रमाणे इथे सुद्धा स्पर्धा निर्माण होणार आहे. CBSE ने परीक्षा माफ केली तर सर्व राज्य बोर्ड कडे दुसरा पर्याय नाही कारण तुमच्या राज्यातील दहावी फेल मुलगा नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही पण CBSE तील ढकलून पास झालेला मुलगा करू शकेल. आधीच १० वि खालील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला होता आणि आता संपुन शिक्षणाचा बाजा वाजला आहे.

Bhakti's picture

5 Jun 2021 - 3:51 pm | Bhakti

खुपचं अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे.१०/ १२ ठिक पण प्रात्यक्षिक गरजेची असणार्‍या शिक्षणात काय होणार ?

प्रदीप's picture

4 Jun 2021 - 8:17 pm | प्रदीप

पंजाबच्या सरकारने, कोव्हॅक्सिनच्या १००,००० लशी, ४०० रु. प्रति लस ह्या दराने स्वतः खरेदी केल्या. त्यांतील किमान २०,००० लशी त्यांनी सी. एस. आर. च्या नावाखाली, खाजगी इस्पितळांना, १,०६० रू. प्रति लस, ह्या दराने विकल्या. त्या इस्पितळांनी त्या लशी, लोकांना, १,५६० रू.प्रति लस ह्या दराने टोचल्या.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हिंदूस्तान टाईम्स ह्या काँग्रेसशी संलग्न मीडिया- घराने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले.

आता, ह्या गोष्टीचा गवगवा झाल्यावर पंजाब सरकारने त्या लिकल्या गेलेल्या लशी परत घेण्याचे ठरवले आहे.

खूप चुकीचे पाऊल होते.

HT काँग्रेसवाल्यांच्या मालकीचा आहे माहीत नव्हते. मिंट पण त्यांचाच आहे हे सुद्धा माहित नव्हते. इथे बरीच माहिती मिळाली.

प्रदीप's picture

4 Jun 2021 - 9:14 pm | प्रदीप

मिंटही हिंदूस्तान मीडियाचेच आहे, हे मला माहिती नव्हते. दुव्याबद्दल धन्यवाद.

सिरम ला १५० रूपये पण मायबाप सरकार १००० रुपयांत विकेल.

सुक्या's picture

5 Jun 2021 - 2:26 am | सुक्या

जुही चावला ला दंड . .
https://www.pudhari.news/news/National/fined-Rs-20-lakh-to-Juhi-Chawla-b...

प्रसिध्दी साठी असले टुकार धंदे करुन वेळ वाया घालवल्याबद्दल असलीच शिक्षा झाली पाहिजे ..

अनन्त अवधुत's picture

5 Jun 2021 - 6:07 am | अनन्त अवधुत

जुही चावला पहिली आहे. ते पण ५जी न वापरता. :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Jun 2021 - 11:59 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अर्थशास्त्र हा एक कोड्यात टाकणारा विषय आहे. अनेक अर्थतज्ञ भारताची अर्थ्व्यवस्था कशी रसातळाला चालली आहे ते सांगत आहेत. जी डी पी कसा घसरत आहे हे ही सांगत आहेत. जी आकडेवारी ते देतात त्यावरुन ते पटते देखील.
पण मग महाराष्ट्राचा मे २०२१ चा जी एस टी कर मे २०२० च्या तुलनेत ५९% जास्त आला. ह्याचा अर्थ काय ?
https://www.indiatoday.in/business/story/gst-collection-hit-a-record-hig...
गाड्यांच्या खपाच्या बाबतीतही तेच. विक्री १० ते १५% ने खाली आहे पण महिंद्राची/होंडाची विक्री ९% ने वाढली.
https://www.carwale.com/news/india-car-sales-analysed-april-2021/
अर्थव्यवस्था रसातळाला चालल्याचे हे लक्षण बिलकूल नाही.

GDP पेक्षा आर्थिक वर्गीकरण केले तर चित्र जास्त स्पष्ट होईल .
नाही तर श्रीमंत सरकार आणि गरीब जनता हाच प्रकार.
१)
)देशात वार्षिक दोन लाख कमावणारे किती आहेत.
२) देशात वार्षिक तीन कमावणारे किती आहेत
असे उत्पादनाच्या चढत्या क्रमाने वर्गवारी करून ती जाहीर केली पाहिजे आणि ते आकडे देशाची आर्थिक स्थिती कशी आहे हे दर्शवण्यासाठी वापरली पाहिजे.
सातारा जिल्ह्यात मुकेश अंबानी राहण्यास गेले की सातारा जिल्ह्याचा gdp वाढेल पण लोकांची स्थिती आहे तीच असेल.
GDP वरून देशाची अर्थ व्यवस्था माहीत पडेल लोकांची आर्थिक स्थिती नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2021 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नव्या माहिती प्रसारण धोरण अंतर्गत आज केंद्रसरकारने ट्विटरला शेवटचं पत्र दिलं म्हणे. एकदा काय ते ठरवा आणि कळवा म्हणून.

केंद्रसरकारच्या धोरणाविरुद्ध तशीही ट्विटरवर सतत टीवटीव चाललेली असते तेव्हा सरकारला अशा कोणत्या तरी हिताच्या आडून अशा मांध्यमावर नियंत्रण आणने गरजेचे होते.

बघू या ट्विटर काय भूमिका घेते ते ?

-दिलीप बिरुटे

ट्विटर बरेच घाबरले आहे. Final.pdf म्हणून रवी शंकर प्रसाद ह्यांनी धमकी दिली आता ते Final_२.pdf लिहीत आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2021 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजचंच पत्र फायनल होतं. कारण यापूर्वी अनुक्रमे २६ आणि २८ ला केंद्रसरकारने पत्र पाठवले होते. आणि आज शेवटचं पत्र पाठवले. '' नियमावली न पाळण्यामधून भारतीयांना सुरक्षित अनुभव देण्याबद्दल ट्वीटरची बांधिलकी नसल्याचंच दिसून येत आहे. भारतात जवळपास दशकभरापासून कार्यरत असूनही भारतीयांना योग्य प्रकारे त्यांच्या तक्रारीरचं निवारण करता येण्यासारख्या व्यवस्थेला ट्वीटरनं विरोध करणे हे विश्वास न बसण्यासारखं आहे'' (संदर्भ लोकसत्ता) जर ट्वीटरने जर यंव नै केलं आणि त्यंव नै केलं तर आयटी अंतर्गत यंव कार्यवाही करण्यात येईल असा शेवटचा सज्जड दम भारतीय सायबर लॉच्या अधिका-या खलित्याने दिला आहे. ( ट्वीटरला पाठविलेला खलिता क्रमांक एक आणि दोन दुव्यावर वाचायला मिळतील)

च्यायला, एवढी काळजी गेल्या दीड-पावने दोन वर्षात भारतीयांची घेतली असती तर जी काही जिवित आणि वित्त हानी भारतीयांची झाली ती झाली नसती असा एक विचार माझ्या 'मन की बात' मधे येऊन गेला.

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

5 Jun 2021 - 9:27 pm | कॉमी

नीती आयोगाच्या sustainable development goals (SDG) इंडेक्स मध्ये केरळने राज्यांमध्ये आपला अव्वल क्रमांक अबाधित ठेवला आहे.
हा इंडेक्स आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणासंबंधीत निकषांवर आधारित असतो.

हरियाणा, मिझोराम, उत्तराखंड हे मागील स्कोर पेक्षा सर्वात जास्त प्रगती करणारी राज्ये आहेत. केरळच्या जवळपास बरोबरच हिमाचल, तामिळनाडू, गोवा, उत्तराखंड, कर्नाटक आहे.

हे राज्यांबाबतीत. UT मध्ये चंदिगढ आणि दिल्ली वर आहेत. चंदिगढचा स्कोर केरळ पेक्षा चांगला आहे.
https://indianexpress.com/article/explained/niti-aayog-sustainable-devel...