Skip to main content

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग १)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 02/06/2021 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिन्याच्या चालू घडामोडींचा पहिला धागा काढतोय. गिधाडी_पत्रकारिता की गिधाडी_रुग्णसेवा जिथे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश करू दिला जात नाही, प्रवेश मिळालाच तर मोबाइल बाहेर ठेवावे लागतात, तिथे माइक, कॅमेरे, लाइट्स इ घेऊन ही बाई मोकाट फिरते. रुग्णालयेदेखील गिधाडी पत्रकारितेत सामील झाली आहेत का?

वाचने 36272
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मग माणसे पाठवून बदडलं असेल. राज सध्या तेच करतो. मनसे किंवा राज विरूद्ध कोणी काही लिहिले की राजची माणसे लिहिणाऱ्याला बदडून माफी मागायला लावतात.

विनोद दुआ, बरखा, राजदिप आणि रविष ह्या लोकांनी खरंच चूक केल्या असतील तर नक्कीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, पण उगाच त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल नाही केला पाहिजे. मुळात मोदींच्या उदया मध्ये ह्या लोकांच्या एकतर्फी reporting खारीचा का होइना पण वाटा आहे. ज्या चुका नेहरूंनी केल्या त्याच परत मोदींनी कशाला करायला पाहिजे? हे लोक जेव्हढ मोदी विरुद्ध बोलत जातील तेवढा जास्त फायदा मोदींना होईल.

In reply to by रात्रीचे चांदणे

ज्या चुका नेहरूंनी केल्या त्याच परत मोदींनी कशाला करायला पाहिजे?
मुद्दा हा की विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला केंद्र किंवा हिमाचलच्या भाजप सरकारने दाखल केला नसून कोणा स्थानिक टिनपाट भाजप नेत्याने अती उत्साहात दाखल केला आहे हा फरक आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

बरखा दत्त्/रविश कुमार हे लोकांचे प्रश्न पत्रकारितेतून मांडतात असे आमचे मत. ते तोरसेकर्/अनिल थत्ते हे दरबारी पत्रकारिता करतात. कोणी कुठे कट शिजवला? कोणी कोणाला टोला मारला? पवार-फडणवीस भेटीत नेमके काय घडले? वगैरे उत्तर प्रदेशात गंगेच्या किनार्यावर जेथे मृतदेह पुरण्यात येत होते, तेथे जाउन फिल्ड रिपोर्टिंग करणे हे धाडसाचे नाही का ?https://www.youtube.com/watch?v=7F5rXGSifzw की तेथे भाजपा सत्तेवर आहे म्हणून देशद्रोह म्हणणार? सुशांत सिंग रजपूत प्रकरणाचे काय झाले नक्की? सरकार अडचणीत आले की ड्रग्जचे सेवन केलेल्या फिल्मि लोकांना एन.सी.बी. ची नोटीस येते. किती दिवस हा पोरखेळ करणार?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

NCB तर ठीक आहे हो. निदान तिथे खरोखरचा गुन्हा तरी आहे. पण ते SSR खुनाचे प्रकरण कुठे हवेत जिरले काय माहित. बिहार निवडणुकीत सुशांतला न्याय मिळवून देण्याचे वचन दिलेले, काय झाले पुढे ?

In reply to by कॉमी

भाजपने सुशांतसिंग प्रकरणाचा वापर फक्त ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी केला. यातून आपल्याला काही तरी मिळेल व ते वापरून ठाकरेंवर दबाव आणून त्यांना पायउतार व्हायला भाग पाडू या भ्रमात फडणवीस-चंपा होते. हे प्रकरण सीबीआयकडे दोन महिन्यांनंतर गेले. दरम्यानच्या काळात त्यातील अडचणीचे पुरावे (असलेच तर) पोलिसांनी नक्कीच नष्ट केले असणार. त्यातूनही काही पुरावे शिल्लक राहिले असतील तर ऑक्टोबर मधील फडणवीस-राऊत यांच्या दोन तासांच्या भेटीनंतर त्यावर पडदा पडला असणार कारण त्या भेटीनंतर भाजप नेते एकदम गप्प झाले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

इथे एकाहून अधिक गल्लती व सरसकटीकरण झालेले आहे.
ते तोरसेकर्/अनिल थत्ते हे दरबारी पत्रकारिता करतात. कोणी कुठे कट शिजवला? कोणी कोणाला टोला मारला? पवार-फडणवीस भेटीत नेमके काय घडले? वगैरे
भाऊ तोरसेकर व अनिल थत्ते एकाच तागडीत मोजणे हे सरसकटीकरण आहे. मोदी २०१४ साली सत्तेवर येण्याअगोदरपासून, म्हणजे २०१३ सालापासून भाऊ तोरसेकरांनी, मोदींच्या विजयाचे निदान केले होते. एक जुने व जाणते पत्रकार असल्याने सामाजिक व राजकिय घडामोडींचे संदर्भ त्यांच्या डोक्यात असतात-- म्हणजे त्यासाठी त्यांना गूगल करावे लागत नाही. त्या जोरावर त्यांना अनेक घटनांमधून पॅटर्न्स दिसतात, जे ते त्यांच्या विश्लेषणांतून मांडतात. अतिशय सीनियर असल्याने आता ते प्रत्यक्ष फील्ड रिपोर्टींग करत नाहीत, त्यांची भूमिका निव्वळ विश्लेषकाची आहे. आता गेल्या काही वर्षांतील त्यांची वक्तव्ये पाहिली, तर त्यांत ते कुठल्या एका पक्षाचे दरबारी आहेत असे अजिबात दिसत नाही. वेळोवेळी त्यांनी पवारांवर टिका केलेली आहे. पूर्वी मार्मिक व बाळासाहेबांच्या परिसरांत वावरल्यामुळे की काय, २०१९ च्या लोकसभा निवडणूका व नंतरच्या विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान, राज ठकरेंवर बरीच भिस्त ठेऊन होते. त्यांची तेव्हाची वक्तव्ये जणू काही राज ह्यांना सल्ले देत असावेत असे वाटावी अशी होती. नंतर सेनेचे सरकार आल्यानंतर ते अनेकदा सेनेचे सल्लागार होऊ इच्चितात की काय, असे वाटावे, अशा तर्‍हेची त्यांची वक्तव्ये असायची. हे खरे आहे की बहुधा ते मोदींना वाखाणतात. हे सगळे अशासाठी सांगितले, की ते जर कुणाचे दरबारी असतीलच, तर नक्की कुणाचे, मग? खरे तर जुन्या पिढीच्या गंभीर पत्रकारीतेचे ते आता शेवटचे दुवा आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. अनिल थत्तेने स्वतःच अलिकडे जाहीर सांगितल्याप्रमाणे तो ब्रँडींग करतो. 'प्रशांत किशोर अलिकडे जे करत आहे, ते मी केव्हापासूनच करतोय' हे त्याचेच वक्तव्य आहे. आणि त्याचे अलिकडे पुनरागमन झाल्यावर भाऊंनी त्याच्याबद्दल म्हटले होते, की अलिकडे मराठींत जी पत्रकारीता सुरू आहे, त्यांनी उगाच बाळशास्त्री जांभेकरांचे वगैरे नांव न घेता, अनिल थत्तेचे नाव घ्यावे. कारण त्यांचे जे काही आजकाल सुरू आहे, त्याचा महाराष्ट्रापुरता श्रीगणेशा थत्तेने, ८० च्या दशकांत, गगनभेदी चालवून केला.
बरखा दत्त्/रविश कुमार हे लोकांचे प्रश्न पत्रकारितेतून मांडतात असे आमचे मत.
बरखा दत्त, राजदीप इत्यादी पत्रकार कमी व भडक सेन्सेशनल काही सांगणारे असे होते व तसेच आहेत. त्यांतून, यूपीएच्या कारकीर्दींत त्यांच्या राजकीय उचापती उघड झालेल्या होत्या. तेव्हा हे लोक फिक्सर्सचेही काम करत होते. आता त्यांना ती संधी नाही. राहता राहिला प्रश्न त्यांच्या पत्रकारीतेचा. राजदीप त्याच्या कारकीर्दीत अनेकदा चक्क खोटे बोलला हे जगजाहीर झालेले आहे. एकदा तरी त्याने कोर्टांत माफी मागितली आहे. अलिकडेच त्याचे दोन रिपोर्ट्स (शेतकर्‍यांच्या 'आंदोलनां'तील एकाचा झालेला मृत्यूची बातमी, व राष्ट्रपतींच्या बंगाल दौर्‍यांत ते रवींद्रनाथांच्या खुर्चीवर बसल्याची बातमी) खोट्या/ अतिशयोक्त होत्या. ह्यांपैकी राष्ट्रपतींच्या विषयीच्या बातमीची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेऊन त्याच्या चॅनेलच्या मालकालाच लिहीले, त्यामुळे आपण दखल घेत काहीतरी करतोय, असे दाखवणे त्या मालकाला भाग पडले. ग्राउंड रिपोर्टीगचेही काही नियम असतात. काही 'बॉटम लाईन्स' असतात, त्या हे दोघेही वारंवार उल्लंघतांना दिसतात. (तुम्ही ज्या मृतदेह पुरण्याची बातमीचा उल्लेख केला आहे, त्याचे निराकरण नंतर झालेले होते. ही तेथील काही जमातींची नेहमीची प्रथा आहे. त्याचा कोव्हिडशी संबंध नव्हता. व ती प्रेते उकरून वर काढतांना एका माणसाला हातोहात पकडण्यात आले - त्याचे काम सीसीटीव्हींत बंदिस्त झालेले होते). हिंदूंच्या स्मशामांत जाऊन तेथे अनेक चिता जळत आहेत, ह्या पाश्वभूमीवर रीपोर्टींग करणे कितपत योग्य आहे? एकतर, ह्यांत त्या देहांचा, त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा सन्मान राखला जात नाही. दुसरे ही अशी दृष्ये परदेशी न्यूज चॅनेल्स आनंदाने उचलतात व तेथे दाखवतात. निव्वळ, भारतांतील कोव्हिडच्या पराकोटीची बातमी म्हणून ते जे जर असे करीत असतील, तर ह्या अगोदर, गेल्या वर्षी अमेरिका, इटली इत्यादी ठिकाणी जो असाच व इतकाच गंभीर हाहा:कार उडाला होता, त्यांच्याही रूग्णालयाच्या व्यवस्था कोलमडून पडल्या होत्या, प्रेते ठेवण्यासही जागा नव्हत्या- त्या सर्व वेळी आपण कुणी अशाच प्रकारची कव्हरेजेस पाहिली काय? मी परदेशांतील अनेक चॅनेल्स पाहू शकतो, व एकही असे काही भयंकर ( gory, morbid) वाटावे, असे दृष्य माझ्यातरी पहाण्यांत आलेले नाही. तेव्हा आक्षेप बरखाच्या फाजिल उत्साहाला आहे. 'जसे आहे, तसे आम्ही दाखवतो आहोत' हे जस्टिफिकेशन अतिशय चुकीचे आहे. साधे उदाहरण घ्या-- कुठलाही अपघात झाला, उदा. गाडीखाली कुणाचा चेंदामेंदा झाला, तर त्या मृत देहाचे दर्शन 'बातमी' म्हणून करू नये, ही साधी पत्रकारीतेची प्रथा आहे. हे सर्व बरखाच्या कव्हरेजेसमधे उल्लंघले गेले आहे. तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.

In reply to by प्रदीप

तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.
+९१

In reply to by प्रदीप

खरं आहे .. बरखा / रबीश / राजदीप ह्यांनी तटस्थ पत्रकारीतेला सुरुंग लावला. त्यांच्या उमेदीच्या काळात समाज माध्यमे जास्त नसल्यांमुळे ते जे बोलतील / दाखवतील ते सत्य मानले जाइ. आजकाल ते शक्य नाही ... कुठलीही चर्चा फिरुन फिरुन आपल्या अजेंड्यावर घेउन येणे हेच या लोकांचे ध्येय असते .. रबीश कुमार चा मोनोलोग तर अक्षरशः डोक्यात जातो. मागे दिल्लीत दलालांच्या आंदोलकांनी जो गोंधळ घातला त्या दिवशी राजदीप तर रस्त्यावर मस्त फिरत अजुन एका पत्रकाराबरोबर गप्पा मारत "सर्व काही ठीक आहे" वगेरे दाखवायचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या अपघातात मरण पावलेल्या शेतकर्‍याचा म्रुत्यु गोळी लागुन झाला आहे आनी त्याची जखम मी पाहीली आहे वगेरे धादांत खोटी माहीती त्याने दिली होती .. नंतर दिल्ली पोलीसांनी व्हीडीयो फुटेज सार्वजनीक केल्यावर त्याचे बिंग फुटले .. या लोकांचा अजेण्डा पत्रकार म्हणुन उल्लेख करायला हवा ..

In reply to by सुक्या

मागे दिल्लीत दलालांच्या आंदोलकांनी जो गोंधळ घातला त्या दिवशी राजदीप तर रस्त्यावर मस्त फिरत अजुन एका पत्रकाराबरोबर गप्पा मारत "सर्व काही ठीक आहे" वगेरे दाखवायचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या अपघातात मरण पावलेल्या शेतकर्‍याचा म्रुत्यु गोळी लागुन झाला आहे आनी त्याची जखम मी पाहीली आहे वगेरे धादांत खोटी माहीती त्याने दिली होती .. नंतर दिल्ली पोलीसांनी व्हीडीयो फुटेज सार्वजनीक केल्यावर त्याचे बिंग फुटले
हेच म्हणायचं होतं. अशा न-पत्रकारावर, त्याने केलेल्या कृत्याबद्धल (खोटी बातमी देणे = अफवा पसरविणे) जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? बंगालातील निवडणुकोत्तर हिंसाचारातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? दिल्लीतील न-शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराला चार महिने होऊन गेलेत; लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अवमान करणाऱ्याला / इतर दंगेखोरांना, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? आणि हं, विसरलोच... इसवीसन २०२० च्या जानेवारीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वेळी दिल्लीत दंगली झाल्या होत्या, त्यातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? मी इथे म्हटल्याप्रमाणे, मोदी-शहा त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग करण्यात पुरेसे कार्यक्षम नाहीत असाच याचा अर्थ होत नाही का? जनतेला दिसेल अशी कारवाई = गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्याची केवळ शिक्षा करून पुरेसे नसते, त्याला वेळेत आणि पुरेशी कडक शिक्षा झाली आहे हे जनतेला समजणे, हेही आवश्यक असते.

महामहिम अन्नदाता प्रधानसेवक राजयोगी मानवश्रेष्ठ पुरुषोत्तम सध्या पूर्णपणे आपल्याच मनोर्यात मग्न आहेत. सर्व चमचे सध्या शक्तिमान मधील "अंधेरा कायम रहे" प्रमाणे चाटुकारिता करण्यात पूर्णपणे मग्न आहेत. कॉलेज मध्ये असताना कुणी "कपल" निर्माण झाले कि फ्रेंड झोन मधून ते वर कधी येते ह्याची एक लिटमस टेस्ट होती. ती म्हणजे दोघेही एकमेकांच्या सानिध्यांत बिनधास्त पणे अपानवायु निष्कासन करू लागले तर हि मंडळी पिकॉक डान्स मधून बाहेर येऊन पूर्णपणे कपल झाली आहेत असे समजत असत. पण महामहिम नरपुंगव नेतृत्वश्रेष्ठ प्रधानसेवकांच्या इष्क मध्ये समस्त भक्तमंडळींनी सारी हदे पार केली आहेत. सध्या ह्या नारशार्दुलने अपानवायू बाटलीत भरून दिला तरी ह्याला साक्षांत कस्तुरीचा सुगंध येतो असे ह्यांचे कर्तव्यदक्ष मंत्रिमंडळ ट्विट करतील. चाटुकारिता कुठल्या लेव्हल ला पोचलीय पहा. 1 2 1 3 3 एका बाजूला वाईट वाटते आणि दुसऱ्या बाजूला हास्यास्पद. ह्यांतील बहुतेक मंडळी स्वयंप्रकाशित नाहीत. हि रेडियम प्रमाणे आहेत. स्वतःचा प्रकाश नाही त्यामुळे ज्याला प्रकाश आहे तो रिफ्लेक्ट करू कसे बसे आपले अस्तित्व जस्टीफाय करायचे. जावडेकर, रवी प्रसाद, स्म्रिती इराणी, निर्मला ह्यानी मला आधीच ब्लॉक केले असल्याने त्यांची चाटुकारिता मी शोधू शकले नाही पण त्यांनी सुद्धा चरणामृत प्राशन करून आपल्या अस्तित्वाची जाणीव महामाहीमना करून दिली असेलच. शोध घ्यावा.

In reply to by साहना

दहावी आणि १२ वी ची परीक्षा रद्द करणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. भविष्यात याचे गंभीर दुष्परिणाम दिसणार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

यंदा सर्वानी UPSC चे फॉर्म भरायचे आहेत परीक्षा रद्द झाली तर सर्वजण आपोआप IAS अधिकारी होणार.

In reply to by श्रीगुरुजी

लोन माफी प्रमाणे इथे सुद्धा स्पर्धा निर्माण होणार आहे. CBSE ने परीक्षा माफ केली तर सर्व राज्य बोर्ड कडे दुसरा पर्याय नाही कारण तुमच्या राज्यातील दहावी फेल मुलगा नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही पण CBSE तील ढकलून पास झालेला मुलगा करू शकेल. आधीच १० वि खालील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला होता आणि आता संपुन शिक्षणाचा बाजा वाजला आहे.

पंजाबच्या सरकारने, कोव्हॅक्सिनच्या १००,००० लशी, ४०० रु. प्रति लस ह्या दराने स्वतः खरेदी केल्या. त्यांतील किमान २०,००० लशी त्यांनी सी. एस. आर. च्या नावाखाली, खाजगी इस्पितळांना, १,०६० रू. प्रति लस, ह्या दराने विकल्या. त्या इस्पितळांनी त्या लशी, लोकांना, १,५६० रू.प्रति लस ह्या दराने टोचल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हिंदूस्तान टाईम्स ह्या काँग्रेसशी संलग्न मीडिया- घराने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. आता, ह्या गोष्टीचा गवगवा झाल्यावर पंजाब सरकारने त्या लिकल्या गेलेल्या लशी परत घेण्याचे ठरवले आहे.

In reply to by प्रदीप

खूप चुकीचे पाऊल होते. HT काँग्रेसवाल्यांच्या मालकीचा आहे माहीत नव्हते. मिंट पण त्यांचाच आहे हे सुद्धा माहित नव्हते. इथे बरीच माहिती मिळाली.

जुही चावला ला दंड . . https://www.pudhari.news/news/National/fined-Rs-20-lakh-to-Juhi-Chawla-… प्रसिध्दी साठी असले टुकार धंदे करुन वेळ वाया घालवल्याबद्दल असलीच शिक्षा झाली पाहिजे ..

अर्थशास्त्र हा एक कोड्यात टाकणारा विषय आहे. अनेक अर्थतज्ञ भारताची अर्थ्व्यवस्था कशी रसातळाला चालली आहे ते सांगत आहेत. जी डी पी कसा घसरत आहे हे ही सांगत आहेत. जी आकडेवारी ते देतात त्यावरुन ते पटते देखील. पण मग महाराष्ट्राचा मे २०२१ चा जी एस टी कर मे २०२० च्या तुलनेत ५९% जास्त आला. ह्याचा अर्थ काय ? https://www.indiatoday.in/business/story/gst-collection-hit-a-record-hi… गाड्यांच्या खपाच्या बाबतीतही तेच. विक्री १० ते १५% ने खाली आहे पण महिंद्राची/होंडाची विक्री ९% ने वाढली. https://www.carwale.com/news/india-car-sales-analysed-april-2021/ अर्थव्यवस्था रसातळाला चालल्याचे हे लक्षण बिलकूल नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

GDP पेक्षा आर्थिक वर्गीकरण केले तर चित्र जास्त स्पष्ट होईल . नाही तर श्रीमंत सरकार आणि गरीब जनता हाच प्रकार. १) )देशात वार्षिक दोन लाख कमावणारे किती आहेत. २) देशात वार्षिक तीन कमावणारे किती आहेत असे उत्पादनाच्या चढत्या क्रमाने वर्गवारी करून ती जाहीर केली पाहिजे आणि ते आकडे देशाची आर्थिक स्थिती कशी आहे हे दर्शवण्यासाठी वापरली पाहिजे. सातारा जिल्ह्यात मुकेश अंबानी राहण्यास गेले की सातारा जिल्ह्याचा gdp वाढेल पण लोकांची स्थिती आहे तीच असेल. GDP वरून देशाची अर्थ व्यवस्था माहीत पडेल लोकांची आर्थिक स्थिती नाही.

नव्या माहिती प्रसारण धोरण अंतर्गत आज केंद्रसरकारने ट्विटरला शेवटचं पत्र दिलं म्हणे. एकदा काय ते ठरवा आणि कळवा म्हणून. केंद्रसरकारच्या धोरणाविरुद्ध तशीही ट्विटरवर सतत टीवटीव चाललेली असते तेव्हा सरकारला अशा कोणत्या तरी हिताच्या आडून अशा मांध्यमावर नियंत्रण आणने गरजेचे होते. बघू या ट्विटर काय भूमिका घेते ते ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्विटर बरेच घाबरले आहे. Final.pdf म्हणून रवी शंकर प्रसाद ह्यांनी धमकी दिली आता ते Final_२.pdf लिहीत आहेत.

In reply to by साहना

आजचंच पत्र फायनल होतं. कारण यापूर्वी अनुक्रमे २६ आणि २८ ला केंद्रसरकारने पत्र पाठवले होते. आणि आज शेवटचं पत्र पाठवले. '' नियमावली न पाळण्यामधून भारतीयांना सुरक्षित अनुभव देण्याबद्दल ट्वीटरची बांधिलकी नसल्याचंच दिसून येत आहे. भारतात जवळपास दशकभरापासून कार्यरत असूनही भारतीयांना योग्य प्रकारे त्यांच्या तक्रारीरचं निवारण करता येण्यासारख्या व्यवस्थेला ट्वीटरनं विरोध करणे हे विश्वास न बसण्यासारखं आहे'' (संदर्भ लोकसत्ता) जर ट्वीटरने जर यंव नै केलं आणि त्यंव नै केलं तर आयटी अंतर्गत यंव कार्यवाही करण्यात येईल असा शेवटचा सज्जड दम भारतीय सायबर लॉच्या अधिका-या खलित्याने दिला आहे. ( ट्वीटरला पाठविलेला खलिता क्रमांक एक आणि दोन दुव्यावर वाचायला मिळतील) च्यायला, एवढी काळजी गेल्या दीड-पावने दोन वर्षात भारतीयांची घेतली असती तर जी काही जिवित आणि वित्त हानी भारतीयांची झाली ती झाली नसती असा एक विचार माझ्या 'मन की बात' मधे येऊन गेला. -दिलीप बिरुटे

नीती आयोगाच्या sustainable development goals (SDG) इंडेक्स मध्ये केरळने राज्यांमध्ये आपला अव्वल क्रमांक अबाधित ठेवला आहे. हा इंडेक्स आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणासंबंधीत निकषांवर आधारित असतो. हरियाणा, मिझोराम, उत्तराखंड हे मागील स्कोर पेक्षा सर्वात जास्त प्रगती करणारी राज्ये आहेत. केरळच्या जवळपास बरोबरच हिमाचल, तामिळनाडू, गोवा, उत्तराखंड, कर्नाटक आहे. हे राज्यांबाबतीत. UT मध्ये चंदिगढ आणि दिल्ली वर आहेत. चंदिगढचा स्कोर केरळ पेक्षा चांगला आहे. https://indianexpress.com/article/explained/niti-aayog-sustainable-deve…