Skip to main content

पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज..!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 03/05/2021 11:11 या दिवशी प्रकाशित केले.

आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषानुवर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.

देशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता ? आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून टाकलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.

जनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.

जगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.

भारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.

सध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.

भारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का ? वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.

सध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.

नाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही नेत्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि 'गीरे भी तो टांग उपर'करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू...!


वाचने 106266
प्रतिक्रिया 211

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचं सरकार बहुमताने येईल असे पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणाले होते
ते तर सर्वच म्हणतात, निवडणूक लढताना, मतदान झाल्यावर सर्वच पक्षांचे नेते असा दावा करतातच, अगदी मा. राहुल गांधीही लोकसभेला तसे दावे करतच होते. कार्यकर्त्यांत जोश भरायला तितकं करावंच लागतं.
पराभव हा पराभवच असतो
तुम्ही म्हणता तसं ह्या पराभवामुळे मोदींना बदलावं हा तर्क लावल्यास सर्वच नेत्यांना (इतर पक्षांच्या) बदलावं लागेलंच कारण प्रत्येकाने कधी ना कधी पराभव खाल्लेलाच आहे. अगदी तुमच्या दिदीसुद्धा नंदीग्राम मधून पराभूत झाल्याच मग तर त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच कामा नये, दो मई, दिदी गयी हे मोदींचं वाक्य ममतांनी नंदीग्राममधून हारुन सिद्ध करुन दाखवलं. बाकी आपल्याही मताचा आदर आहेच.

In reply to by प्रचेतस

पराभवामुळे मोदींना बदलावं हा तर्क लावल्यास.....
मा.मोदींंच्या बंगालमधील पराभवामुळे नेतृत्व बदलावे असे म्हणत नाही, तर एकूण राष्ट्रहिताच्या दृष्टीने, त्यांच्या धोरणांमुळे, संकटाच्या काळात एक अपयशी पंतप्रधान बदलून नवा चेहरा नवे नेतृत्व आणने गरजेचे आहे, हा मुळ विषय आहे. असे पक्षातील नवे नेतृत्व जे की सध्याच्या संकटकाळात जनतेला तारण्याचा प्रयत्न करतील. म्हणून प्रतिसादात उल्लेख आला तो गृहमंत्री यांचा, ते एक पुढे पंतप्रधान म्हणून येतील असे होते. पण गप्पांच्या -फेकाफेकीच्या बाबतीत तेही काही कमी नाही म्हणून निवडणूकीच्या काळातील त्यांच्या संदर्भांचा उल्लेख करावा लागला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

खरोखरच हसायला आले राव सर, ३ जागांवरुन ७५ जागा .... अहो कसली भलतीच अपेक्षा ठेवता तुम्ही प्रचेतस साहेब? एकवेळ मी., डॉक्टर खरे किंवा गुर्जी सारखे अंध मोदी भक्त सुद्धा म्हणतील कि शरद पवारांनी २-४ गोष्टी चांगलया केलया म्हणून! किंवा ओवेसी तसा बरा आहे ! पण ह्यांच्या कडून "भाजपने काही कमावले आहे अशी दखल मिळविणे ! अशक्य .. सतत नकारात्मक जिलब्या पाडायचे एवढेच ह्यांना जमते सुरवात मात्र "आदरणीय पंतप्रधान वैगरे" आणि "मोदींना बदला अशी जागतिक मोहीम " यांनी सुरु केली आहे तेवहा ३ चे ७७ झाले असल्या फालतू घटनेकडे कोण लक्ष देणार ...

In reply to by श्रीगुरुजी

हो पण ते तुमच्यावर आरोप करण्यासाठी नाही ... प्रोफेश्वरांना उद्देशून उपहासाने लिहिले होते ( असे अध्यहृत धरून कि आपण, मी डॉ खरे वैग्रे यांना काही मंडळी कदाचित अंध भक्त संबोधित असतील,,, आपण तसे आहात असे म्हणणे नाही -- संदर्भ लक्षात घ्या ) अर्थ असा कि अगदी मोदी अंध भक्त सुद्धा विरोधी पवार किंवा ओवेसी नच्य एखाद्या गुणाला मान्य करतील पण केवळ विरोधी लेखाचा रतीब घालणारे प्राध्यापक एकदाही "भाजपने काहीतरी बरे केले" म्हणण्याची दानत ठेवणार नाहीत .... असो तरी माझ्यहातून आपला उपमर्द झाला असेल तर क्षमा

In reply to by चौकस२१२

मला कुणी श्री मोदींचा (अंध) भक्त म्हटले तरी चालेल. पण गोऱ्या काकीचा किंवा तिच्या मतिमंद मुलाचा गुलाम किंवा चमचा नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे प्रोफेश्वरांचे नवीन टुमणे .. भाजपाला बदलता येत नाही ( लोकशाही कि काय पद्धतीने निवडून आलेत ना ) मग भाजपतील मुख्य चेहरा बदला म्हणे .... हे म्हणजे कसे ... "काही करून मोदी हटवा मग त्यासाठी वाजपेयी किती चांगले होते यावर बोलत राहायचे किंवा आता गडकरी किती चांगले " आणि एकदातरी थाळीनाद हा आलाच पाहिजे सरांचं भाषणात! तो हि आला वाचून धन्य वाटले ... बाकी बंगाल मध्ये लोकांनी ३ वरून ८० कि काय जागा दिल्या म्हणजे "नाकारले " हा कोणत्या अभ्यासक्रमातील तर्क कोण जाणे? गारगोटी विद्यालय कि काय

नंदाच्या लालाच्या गावात भागात गाईंचं काय होतं पाहा या विडिओत https://youtu.be/kqqd_CJBBQg 16:30 ते 23:30 साठ हजार भाकड गाईंना शेतकऱ्यांनी सोडले पण एका गोशाळेत संभाळतात. --------- कॉम्युनिझमच्या नावाखाली सिंगुरमधून कार कारखाना घालवला. भांडवलवाद आणि समाजवाद यात कुठेतरी सामंजस्य आणावे लागते. ------------- बाकी इकडे एन्रॉन किती वेळा डुबवले आणि वर काढले. ------------ केरळचे ओढे नाले नद्या खाड्या पर्यटनासाठी वाखाणतात कारण उद्ययोगधंदे नाहीत दुषित करायला. इकडे केमिकल उद्योगांचे घाण पाणी सोडून उल्लास नदीचे काय झाले पाहा.

ब्रेकिंग न्यूजः मोदी को बदनाम करने की आंतरराष्ट्रीय साजिश की मिपा पर दस्तक. देखते रहिये मिपातक.

आदरणीय सरांचे विरोधासाठी विरोध हे राजकीय गणित ठरलेले असताना, लेखातील भूमिका आश्चर्याची नाही. राजकीय मंडळी असो दिल्लीतली असो वा सोशल मिडीयाच्या गल्लीतली, जळत्या सरणावरही राजकीय पोळी भाजतच असतात, स्वतःकडे नैतीक अधिकार असो वा नसो. आदरणीय सरांनी हा धागा काढण्यापुर्वी बरेच महिने जुलै २०२० मध्येच 'मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? ' या शीर्षकाचा धागा काढला होता, जेम तेम तीन प्रतिसाद आले होते. सरांना राजकारणातून फुरसत मिळाली तर त्यांनी आमच्या त्या धाग्यावर अजूनही आपले विचार मांडावेत. आम्ही स्व मेहनतीने मोदी तसेच उद्धवजी सरकारांच्या ईपोर्टलवरून सरांच्या राजकीय भावना लिहून आणि सोबत त्यांनी परिस्थिती कशी हाताळली असती याचा ईंग्रजी अनुवाद आणि सरांना राजकारण बाजूला ठेऊन कोविड परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी बहाल करावी असे आवाहन जरूर करू. कोविड हाताळण्याबाबत सत्तेतील राजकीय नेत्यांचा शहानिशा करण्यास काहीच हरकत नाही आणि जी मंडळी स्वतः जबाबदारीने वागतात त्यांना यशापयाची चिकित्सा करण्याचा नैतिक अधिकार आहे असे म्हणता येते. असा नैतिक अधिकार आपल्याकडे आहे का ? ह्याचे आत्मचिंतन ज्याचे त्याने करावे. माझ्याकडे स्वतःकडे हे प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार कुठून येतो ? मी विषाणू (व्हायरस) जन्य आजार, काही प्रश्न हा धागा काढला. राष्ट्रीय संकटाच्या वेळी शासकांसोबत जनतेची स्वतःची म्हणून काही एक नैतिक जबाबदारी असते जनता कोविडचा फैलाव होऊनये म्हणून काळजी घेण्यात कमी पडत असेल तर आतातरी भानावर या ह्या शीर्षकाचा धागा काढला पण मिपावरच काही मिपाकरांनीच आपल्या स्वतःच्या संवेदनाच बोथट झाल्याचे प्रदर्शन केले. धाग्याची जिलेबी म्हणून थट्टा कोण करत होते त्यातीलच कोणी येऊन ..... ज्यांनी कोविड साथ टाळण्यासाठी सुसंगत वर्तनास हातभार लागेल अशा भूमिका घेतल्या नाहीत त्यांनी त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी घेऊन 'राजी'नामे द्यावेत याची मागणी आम्ही ऑगस्ट २०२० मध्येच केली. मोदींचा राजीनामा जरूर मागा पण स्वतःच्या नैतिक जबाबदार्‍यांचे आकलन करून राजीनामे कोण कोण देणार आहेत? जिल्हापरिषद पालिकांच्या शाळांच्या मास्तरांना कोविड १९च्या सक्तीच्या ड्युट्यांना (आणि इतरही) जुंपले जाते. का? कारण जनता त्यांच्या कडे आदराने बघते . जनतेच्या पैशाने पगार काय केवळ शालेय शिक्षकच घेतात? असो. वर नमुद केलेल्या मागच्या माझ्या स्वतःच्या धाग्यातून साथीचे प्रकरण किमान दिडएकवर्षे चालेल असे म्हटले होते . कॉमनसेन्स होता. लस तयार होण्यासाठी आणि वितरणासाठी किमान दिड ते दोनवर्षे जाईल हे सर्वच शिक्षीतांना ठाऊक होते. मोदींनी मागच्या वर्षीच्या भाषणातून जनतेकडून केवळ काही आठवडे मागितले हे त्यांचे चुकलेच कारण दोनेकवर्षे जातील गावोगावच्या हॉस्पीटलात सुविधांचा अभाव असेल हा कॉमनसेन्स होता. मोदींचे शिक्षण कमी असेल आम्ही शिक्षीत आहोत की नाही आमची (किमान शिक्षीत जनतेची) स्वतःची म्हणून काही नैतिक होत्या आणि आहेत की नाही? आम्ही सर्व (जनता) जर नैतिक जबाबदारी पाळणारे असू तर दुसर्‍यांदा लॉकडाऊन लावण्याची पाळी का यावी? 'जनता' या शब्दात आमचा स्वतःचा सहभाग नेमका कितपत जबाबदारपणाचा राहीला आहे हे कोण बघेल? हे प्रश्न कोणतेही राजकीय नेता जनतेला विचारु शकत नाहीत कारण त्यांना जनतेला नेहमीच बरोबर म्हणण्या शिवाय पर्याय नसतो. जनतेला प्रश्न विचारणे आणि योग्य मार्गदर्शन करण्याची अंशिक जबाबदारी काही एक विचारवंत म्हणून प्राध्यापक वर्गाचीही असावयास हवी की नको ? की सातत्याने राजकीय खापरफोड करतच फिरायचे हे ज्याचे त्याने ठरवावे पण नैतिक अधिकार संपल्यानंतर जनता विचारवंत म्हणणे सोडून देते आणि मोदी किंवा अजून कुणी ते विचारवंताना न विचारता ठरवते त्या वेळी हा पंतप्रधान हवा आणि तो नको या विचारवंतांच्या म्हणण्याचा त्यांनी विचार करण्याची काही म्हणून एक कारण उरत नाही. प्रश्न मोदींचाच घ्यायचा झाला तर जनतेला किमान दोन वर्षांची कसरत आहे हे स्पष्ट सांगण्यास ते कमी पडले असतील. लॉकडाऊन आणि गर्दी नियंत्रण कदाचित अधिक स्मार्ट पणे करता आले असते कदाचित कुंभमेळा थांबवता आला असता कदाचित राजकीय सभा कमी घेता आल्या असत्या. आणि जनता नेहमीच आपले ऐकत नाही कदाचित कोविड टाळण्यासाठी लागणारे सुसंगत वर्तन सोडून आजारीपडूण मग ऑक्सीजन आणि रेम्डेसेव्हीर कमी पडले की राजीनामा मागेल हे लक्षात घेऊन कदाचित ऑक्सीजनच्या आणि रेम्डेसेवीर गरजेचा हिशेब अधिक चांगला मांडता आला असता. विरोधकांच्या चेष्टेचा विषय होऊ नये म्हणून दिवे लावले नसते आणि थाळ्या वाजवल्या नसत्या. पण (तुलना आमेरीका आणि ब्रिटनमधील मागच्यावर्षीच्या सत्तेतील नेत्यांच्या वर्तनाशी करा) याच मोदींनी जगातल्या इतर कोणत्याही राष्ट्रनेत्यापेक्षा साथीची दखल अधिक गांभीर्‍याने घेतली. लसींची उपलब्धता कमी पडेल हे लक्षात घेऊन तातडीच्या परवानगी देऊन लस अधिक लौकर आणाण्याचे त्यांचे प्रयत्न मिडीयातील त्यांच्या विरोधकांनी आणि टिकाकारांनीच हाणून पाडले. ममता बॅनर्जींप्रमाणे ऐन साथीच्या काळात राजकीय सभा घेण्याचा दोष मोदींकडेही जाईल पण देशात पुन्हा पुन्हा निवडणूका न होता सर्व निवडणूका सोबत व्हाव्यात हे म्हणणारेही मोदीच असतात. कुंभ मेळा भरवण्याचा दोष भाजपा राज्यसरकारकडे जाईलही पण कोविडसाथ टाळण्यस सुसंगत वागणे नसलेले शेतकरी मोर्चे भरवून साथ गावोगावी पोहोचवण्याचे काम करण्यात मोदींचे राजकीय विरोधकही मागे नसतात. कोविडला बळीजाणार्‍यांपैकी आणि आजारी पडणार्‍यांपैकी काही जणांनी स्वतःही व्यवस्थित काळजी घेतली नसेल पण त्या सोबत त्यांच्याशी संपर्कात येणार्‍या आप्त स्वकीय ते त्यांचे मित्र ते त्यांचे ऑफीस/कामावरचे साहेब साथी ते त्यांचे दुकानदार ते त्यांच्या परिसरातील अनेक व्यक्ती ते त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोडून केवळ राजकीय भाषा करत फिरणारे विचारवंत अशा सर्वांनीच सत्ताधिशांसोबत राजीनामे द्यावयास हवेत. प्रतिसाद कठोर वाटला तर क्षमा असावी पण सरण जळत असताना केवळ राजकारण नाही आपल्या देशाच्या व्यवस्था आणि तुटवड्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण आणिबाणीत स्वतःकाय काळजी घेतो तेही तेवढेच महत्वाचे असावे किंवा कसे?

In reply to by माहितगार

>>> प्रतिसाद कठोर वाटला तर क्षमा असावी. नै नै प्रतिसाद कठोर वगैरे वाटला नाही. आपल्या लेखनाने नेहमीच सुसंस्कृत आणि सार्वजनिक संस्थळावरील सभ्यता पाळली आहे. ( असे वाटते) आपण नेहमीच नीसटलेल्या बाजूंवर सूक्ष्म, अतिसूक्ष्म, पद्धतीने निरीक्षण करुन वाचकांचे लक्ष वेधले आहे. विचारांच्या बाबतीत कोणी पारंपरिक असणे, सनातनी असणे,आधुनिक असणे एखाद्या गोष्टीला विरोध असणे, विरोधासाठी विरोध असणे, चांगली बाजू असणे, नसणे, नीसटलेल्या वगैरे बाजू, हे सर्व व्यक्तिपरत्वे विचारदृष्टीवर अवलंबून असते. बाकी, राजीनाम्यापेक्षा नेतृत्व बदलाने, नव्या व्यक्तिमुळे प्रशासनात गतिमानता येईल, येणार नाही. बदल झाले असते, नसते झाले वगैरे यावरही 'प्रतिसादातील' तिस-या बाजूपेक्षा मत मांडले असते तर तेही वाचायला आवडलेच असते. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेतृत्व आकाशातून थोडीच टपकते, सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्यांच्या गुण दोषांसहीतच हजर होत असते. आधी अंडे की आधी कोंबडी म्हणत जबाबदारी प्रत्येकजण केवळ नेतृत्वावर झटकत असेल तर एनीबडी, समबडी, नोबडीची अवस्था होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी सर्वच राजकीय नेतृत्व दर आठवर्षानी रिटायर व्हावे याची मांडणी करणारा माझा धागा लेख आहे पण एकुण धागा लेखांच्या संख्येत चटकन सापडला नाही तसेच राजकीय घराणेशाहीच्या विरोधातही दुसर्‍या धाग्यातून सुस्पष्ट भूमिका आहे. अशा सुस्प्ष्ट निष्पक्ष आधारांवर आपल्या लेखातील भूमिका आहे की राजकीय पुर्वग्रहांनी बाधीत आहे. बाधीत भूमिका ठेवण्याचा प्रत्येकाचा आधिकार आहे पण बाधित भूमिका असण्यापलिकडे अशा भूमिकांचे मुल्य जात नसावे किंवा कसे

पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, जसे २००+ आणि मग त्याहून अधिक, जशी गोव्यात सत्त मिळवली तसेच वर्षनुवर्षाच्य मेहनतीने ... पण ते ततुमच्या सारखया अंध विरोधकांना "मिया गिरे तो भी टांग उपर" असेच वाटणार... आपली नाकारत्मकता आता हास्यास्पद झाली आहे ..

काहीही हं प्रा.डॉ. आपले आदरणीय पंतप्रधान बदलण्याची काहीही गरज आहे असे वाटत नाही. गेल्या काही वर्षात मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने बरीच प्रगती केली आहे. सद्यपरिस्थितीपासून थोडे थोडे मागे पाहत जाऊ. 1. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये केवळ चार लाख पेशंट प्रतिदिन सापडत आहेत. भारताची लोकसंख्या लक्षात घेता ही संख्या फारच कमी आहे. भारताच्या आरोग्यमंत्र्यांपासून ते अनेक मुख्यमंत्र्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा कसा पुरेसा आहे याची वारंवार ग्वाही दिलेली आहे. काही तुरळक केसेसमध्ये ऑक्सीजनच्या अभावामुळे रुग्ण मरण पावल्याचे दिसते पण हे सगळे क्षुल्लक प्रकार आहेत. 2. दुसरी लाट येण्यापूर्वी मिळालेले सर्व इशारे गांभीर्याने घेऊन मोदींनी पुरेशी तयारी केली. लसीकरण, ऑक्सीजन व औषधांचा पुरवठा यासाठी विशेष प्रयत्न केले. सोशल डिस्टन्सिंग व गर्दी टाळणे (उदा. निवडणुकांच्या सभा), मास्क वापरणे हे सगळे स्वतःपासून सुरु करून एक उदाहरण नागरिकांसमोर ठेवले. हे सगळे केल्याने भारताला कोविडचा अतिशय कमी फटका बसला. 3. गेल्या वर्षी कोविडच्या पहिल्या लाटेपासून भारत सुरक्षित राहिला याचे कारण मोदी यांचे नेतृत्त्व. मोदींचे सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे केलेले तात्काळ लॉकडाऊन, ताली आणि थाली हे अभिनव उपाय आणि भारतीयांची अंगभूत इम्युनिटी ही त्यामागची कारणे. 4. 65 वर्षांचे कायम तुणतुणे लावण्यापेक्षा मोदींनी झटून आरोग्यसेवेला कायम प्राधान्य दिले. एखाद्या पुतळ्यावर हजारो रुपये कोटी खर्च करण्याऐवजी ते आरोग्यसेवेत गुंतवले. मंदिराऐवजी हॉस्पीटल्स व दवाखाने यांना प्राधान्य दिले. 5. 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा पाया निश्चलनीकरणापासून सुरु झाला. जुन्या नोटा बंद करुन नवीन नोटा आल्याने - नोटा छापणाऱ्यांना रोजगार मिळाला. निश्चलनीकरणापासून देशाच्या इकॉनॉमीने मोठीच भरारी घेतली आहे. 6. मोदींच्या राज्यात इंधनाचे दर आणि महागाई अतिशय कमी राहिली आहे. 7. देशात सामाजिक सौख्याचे आणि शांततेचे वातावरण वाढीस लागले आहे. जसं शोधत जाल तशी अनेक उदाहरणं सापडत जातील.

लेखनावर विषयानुरूप सहमती- असहमती आणि आपली मतं व्यक्त करणा-या सर्व मिपाकर, वाचक यांचे मन:पूर्वक आभार..! -दिलीप बिरुटे

कितीही मोठे, अभ्यासपूर्ण, मुद्देसुद प्रतिसाद दिले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की करोना प्रकरणात केंद्र सरकारची चूक झाली आहे, विशेषतः लशी च्या बाबतीत. अर्थात दुसरे कोणी असते तर चूक झालीच नसती असे मला म्हणायचे नाहीये. पण चूक झाली हे दिसत असताना , समर्थकांनी ते मान्य करण्यात काही कमीपणा नाही

In reply to by Vichar Manus

केंद्र सरकारने, आणीबाणी लागू करून, 100% लाॅकडाऊन किमान 3 महिने तरी करायला हवा होता .... नाहीतरी प्रत्येक वेळी केंद्रावरच बोट दाखवत आहेत ...

कोणत्या नेत्याला काढावे आणि ठेवावे असे स्थूल मतप्रदर्शन केल्यावर कोणाचे मत बदलत नसते. त्यापेक्षा,सूक्ष्म बाबींवर चर्चा केल्यावर नेत्यांभोवतीची आभा कमी होते असा अनुभव आहे.

ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना मरायचं नसेल तर नवीन पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर एकेकाळी खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला ऑक्सिजन गेल्या सात वर्षात नाहीसा झाला हे माहित नव्हते. ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना मरायचं नसेल तर नवीन पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर. यातील खोडलेल्या जागी कोणतीही परिस्थिती घाला. या लोकांना त्या परिस्थितीशी काहीही घेणेदेणे नाही. तर नवीन पंतप्रधानांची गरज हे आपले म्हणणे पुढे दामटायचे हे महत्वाचे. उदय भास्कर या संरक्षण तज्ञाची मुलगी अशी का निघावी? अशी म्हणजे तुकडे तुकडे वाल्यांच्या बाजूची? https://maharashtratimes.com/entertainment/swara-bhaskar-says-india-nee…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वतःच्या राज्यात काय परिस्थिति आहे? ज्या राज्य सरकारांनी, करोनाची लागण थांबवली आहे.. त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलायचा अधिकार आहे ....

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वरा भास्कर, राजन वगैरे मंडळींचे प्रतिसाद जास्त मनावर घ्यायचे नसतात ...

''सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दुरदुष्ट्रीचा अभाव यामुळे करोनाचा दुस-या लाटेने देशात मोठे नुकसान केले अशी कठोर टीका रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली. सरकारमधील कोणी जगाकडे लक्ष दिले असते तर, इतरत्र कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले तर कदाचित भारतात वाईट स्थिती ओढवली नसती. पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळविल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला'' - रघुराम राजन. (बातमी) करोनासारख्या भयंकर महामारीत पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) पूर्णतः निरुपयोगी ठरल्याने या संकटविरोधी लढ्याचे नेतृत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना द्या असा सल्ला भाजपचे ज्येष्ट नेते; राज्यसभा सदस्य सुब्रण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना दिला आहे या सल्ल्याने हळुहळु नेतृत्व बदलाची चर्चा सुरु होईल का हे पाहणे रोचक ठरणार आहे. (बातमी) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रघुराम राजन यांसारखे उत्तम अर्थतज्ज्ञ हल्ली दुर्दैवाने खूप एकांगी झालेत असे म्हणावे वाटते.

In reply to by प्रचेतस

हल्ली म्हणजे काय ? ते आधीपासुनच एकांगी होते , तुम्हाला आत्ता उमगायला लागलं आहे , सॉरी सॉरी हल्ली उमगायला लागलं आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

=)) कुणाला मी डावा वाटतो, कुणाला मी उजवा वाटतो. :)

In reply to by प्रचेतस

कुणाला मी डावा वाटतो, कुणाला मी उजवा वाटतो. :)
कभी तू कम्युनिस्ट लगता है कभी तू सोशालिस्ट लगता है कभी कॅपिटलिस्ट लगता है कभी लिबर्टेरिअन लगता है. तू जो अच्छा समझे ये तुझपे छोडा है..... ह.घ्या.हे.वे.सां.न.ला

In reply to by चंद्रसूर्यकुमार

=))

In reply to by प्रचेतस

हल्ली? या महाशयांनी २०१३ , २१०१४ , २०१५ २०१८ आणि २०१९ मध्ये आर्थिक मंदी येईल असे भाकीत केले होते. २०१३ The economist who predicted the financial crisis just sounded another alarm—it would be wise to listen this time https://qz.com/126875/the-economist-who-predicted-the-financial-crisis-… २०१४ A Global Financial Guru Who Predicted the Crisis of 2008 Says More Turmoil May Be Coming https://time.com/3099587/india-central-bank-raghuram-rajan-global-finan… २०१५ Raghuram Rajan warns of repeating Great Depression mistakes https://www.livemint.com/Politics/rQi4UUuMHXQAyKEW2N1yXP/World-economy-… २०१८ Raghuram Rajan warns of another toxic build-up https://www.businesstoday.in/current/economy-politics/raghuram-rajan-wa… २०१९ India is in the midst of growth recession, says Raghuram Rajan https://scroll.in/latest/946168/india-is-in-the-midst-of-growth-recessi… असे अनेक दुवे आहेत. हि आर्थिक मंदी कुठे कुणाला दिसली तर कळवा. मी श्री रघुरामान राजन यांच्या वैयक्तिक आर्थिक मंदी बद्दल बोलत नाहीये त्यांना श्री मोदी यांनी हाकल्ल्यापासून केवळ प्रकाशात राहण्या साठी अशी भाकिते हे महाशय करत आले आहेत. सतत ८ वर्षे एखाद्याची आर्थिक भाकिते चुकत असतील तर त्याला अर्थतज्ज्ञ म्हणायचे का हा एक प्रश्न लोकांना पडला आहे

कोविड लसीच्या वेगवेगळ्या दराबद्दल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कारण विचारले होते, त्याबद्दल काही खुलासा केला का केंद्राने?

ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना मरायचं नसेल तर नवीन पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर
काल नळाला पाणी आले नाही.. नवीन पंतप्रधानांची गरज.. !!! एवढे tweet बघायचे बाकी राहिले आहे.. स्वरा भास्कर ही बिनडोक बाई आहे. हिच्या मुलाखती आणि विविध प्रश्नावरील मत ऐकली की डोक गरगरायला होत.. एवढी हाईप का दिली जाते अश्या लोकांना.. ??

आज काँग्रेसनेत्या सोनिया गांधी आणि अरुंधती रॉय यांनीही करोनाकाळात उपाययोजनाबाबत अपयशी ठरलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे केले आहेत. आता हळुहळु सर्वत्रच पंतप्रधान यांच्या करोनाकाळातील उपाययोजनांच्या बाबतीत कठोर टीका होत आहे, मा. सर्वोच्च न्यायालय तर दररोज केंद्रसरकारच्या तीस-या लाटेबाबतच्या उपाययोजनांच्या बाबतीत ताशेरे ओढत आहेत, सरकार म्हणून आपण काय करीत आहात असे प्रश्न सतत विचारत आहेत. अरुंधती रॉय म्हणतात- ''Hundreds of thousands of us will die, unnecessarily, if you don’t go. So, go now. Jhola utha ke. With your dignity intact. You can have a great life ahead, of meditation and solitude. You yourself have said that’s what you want. That won’t be possible if you allow this mass dying to continue. There are many in your party who can take your place for now. People who know they must get on even with political opponents in this moment of crisis. Whoever that person is – from your party, with the approval of the Rashtriya Swayamsevak Sangh – can head the government and a crisis management committee'' अधिक वृत्त (दुवा) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिचे काश्मीर वरचे तोडलेले तारे आणि पाकिस्तानची आणि नक्षलवादी लोकनची बाजू घेताना पाहिले /वाचले तर तिळपापड होतो. हिला देशद्रोहासाठी जन्मठेपच दिली पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. Recently in a video that is doing rounds on social media shows, Roy claiming that Pakistan has never deployed its military against its own people. She has divided opinion by speaking out in support of the Naxalite insurgency, for casting doubt on Pakistan's involvement in 2008 Mumabi attacks and on Jammu and Kashmir issue. https://www.oneindia.com/india/what-did-arundhati-roy-say-on-kashmir-th… बिरुटे सर मोदी द्वेषात तुम्ही इतकी अत्यंत खालची पातळी गाठली आहे कि तुम्हाला देशातील बहुसंख्य लोकांचे मत डावलून अरुंधती रॉय सारख्या देशद्रोही बाईचा सुद्धा आधार घ्यावासा वाटतो आहे. इतका पराकोटीचा द्वेष मी केवळ सुमार केतकर किंवा श्री जितेंद्र आव्हाड सारख्या लोकातच पाहिला आहे आणि त्यांची निष्ठा कुठे वाहिली आहे हे उघड आहे. (प्रतिसाद संपादित)

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, करोनाकाळात आदरणीय पंतप्रधानांच्या नेत्रुत्वाबद्दल मनात येणा-या लोकांच्या सहज भावना आहेत. एखाद्याचे मत आवडणे न आवडणे हाही व्यक्तीसापेक्ष असा विचार आहे, सहमती-असहमती येणारी मतं ही प्रसार माध्यमातील आहेत, त्यामुळे इथे प्रतिसादात त्यांचे संदर्भ घेतले आहेत. आपणास ते चूक वाटले असेल त्याचा आदर आहेच. आता ती मतं विचारांच्या बाबतीत योग्यतेची आहेत किंवा नाही तोही विचार व्यक्ती आणि समुहसापेक्ष आहेत असे वाटते. आपण केलेल्या व्यक्तीगत शेरेबाजीबाबत बोलण्यासारखं काही नाही. आपला तान समजू शकतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आय एस आय हा भारताची शत्रू असलेल्या संघटनेची भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला? धन्य आहे. याचा ताण अजिबात नाही तर संताप आहे.

In reply to by प्रचेतस

शँम्पेन पिऊन महालात बसून "गरीबांचे कसे होणार " याची चिंता करारी जी लोक असतात त्यातीलच ह्या अरुंधती रॉयम एकदा भर सभेत ( भारताबाहेरील ) त्यांना मी विचर्ल होत त्कि ( त्यावेळी विषय होता नर्मदा धरणाचा ) कि मॅडम आपलं विरोध नक्की कशाला आहे १) धरग्रस्तांचे नीट पुनरवसं झाले नाही त्याला कि २) धारण बनवणे या कल्पनेलाच बाईंचं उत्तर " धरणा म्हणजे जणू अणुबॉम्ब फोडणे " म्हणजे मूळ प्रक्षणाला बगल ... असो ठीक अंतर्गत प्रश्ना बद्दल मत वेगळे असू शकते पण जेवहा राष्ट्रीय सुरक्षा सारखया विषयवार जर हि व्यक्ती असले तर तारे तोंडत असेल तर त्याला क्षमा नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विद्यावाचस्पती प्राध्यापक, सुझन अरूंधती रॉय यांच्या मौलिक सूचनेला आपण अनुमोदन देऊन त्याचा गांभीर्याने पाठपुरावा करावा ही नम्र विनंती!

आता काही बातम्या वाचता वाचता मला एक आयडीया सुचली. त्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील. श्री.मोदी यांना पंतप्रधान या पदावरुन काढुन (ते संवैधानिकरित्या शक्य नाही तरीपण) त्यांच्या जागेवर श्री. उद्धव ठाकरे यांना बसवावे. भाजपवाल्यांनी मन मोठे करुन याचा स्वीकार करावा(आधी युती होती म्हणुन). त्याने काय होईल.... भारत देशाला नवा पंतप्रधान व महाराष्ट्राला ताज्या, तरुण, तडफदार नी फडफडीत रक्ताचा नवा मुख्यमंत्री मिळेल (मुलालापण वचन दिलेच असेल नां)

In reply to by इरसाल

आजच मोदी व ठाकरे यांंच्यात दूरभाष संभाषण झाले. केंद्राने महाराष्ट्रासाठी वेगळे आरोग्य ऍप बनवून द्यावे अशी ठाकरेंनी मागणी केली. आता साधे मोबाईल ऍप सुद्धा मोदींनीच बनवून द्यायचे का?

In reply to by श्रीगुरुजी

राज्याला आरोग्य ॲप बनवण्यासाठी केंद्राने परवानगी द्यावी असे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे. केंद्राचे कोवीन ॲप अगदी भिकार आहे, सारखे क्रॅश होते.

In reply to by आग्या१९९०

म्हणजे एनडीटीव्ही, मटा, सामना, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, सकाळ, आनंद बझार पत्रिका न्यूज, आजतक, हिंदुस्थान टाईम्स . . . हे सुद्धा पूर्ण असत्य सांगतात?

In reply to by आग्या१९९०

म्हणजे मटा, सामना, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, सकाळ, हिंदुस्थान टाईम्स, प्रिंट, वायर, क्विंट, तरूण भारत वगैरे अजूनही पूर्ण सत्य बातम्या देतात.

In reply to by आग्या१९९०

आणि नवीन ॲप बनवण्याच्या निमित्ताने केन्द्राकदे पैसे मागण्याची आणि त्यात गफला करण्याची पण सोय होइल.

In reply to by प्रसाद गोडबोले

ॲड हॉक कारभारी आता सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाने कारभार करणार ,त्यामुळे आता कितीही वर्षे राज्य केले तरी चालेल. शिकतील हळू हळू. https://www.ndtv.com/india-news/supreme-court-forms-task-force-to-look-…