लसवन्तोsहम्

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in काथ्याकूट
11 Mar 2021 - 7:41 pm
गाभा: 

लाॅकडाऊन १.० पासून नाशिक जिल्ह्याच्या एका आदिवासीबहुल तालुक्यातील खेड्यात स्थलांतरित आहे. कालच ३ कि.मी. अंतरावरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जाऊन लस घेतली. पूर्वनोंदणी न करता जाणार असल्याने जाताना आधार व पॅन कार्डांचे फोटो मोबाईलमध्ये घेऊन गेलो होतो. PHC ला साजेशी अवस्धा इमारतीची होती. पाणी, पंखे, खुर्च्या यांची कमतरता असूनही कर्मचारी मन लावून काम करत होते. 3-4 रजिस्टर्समध्ये आधार पॅन ची नोंदणी, रक्तदाब, शरीर तापमान, आॅक्सीपल्स रीडिंगची नोंद वगैरे सर्व कामे हाती केली जात होती. लस देऊन झालेल्या जनतेला तासभर थांबवून पुन्हा एकदा सर्व रीडिंग घेत होते व क्रोसीनच्या चार गोळ्यांची पट्टी प्रत्येकाच्या हातात देऊन "दुसरा डोस घ्यायला विसरू नका, लस हे औषध नाही तेव्हा मास्क, सॅनिटायझर, साबण यांचा वापर करतच राहा, गर्दी टाळा" हे आवर्जून सांगत होते. काही उत्साही लोक्स लाॅबीमध्ये ठेवलेल्या एका सुशोभित चौकटीमागे ( जिच्यावर ठळक अक्षरात "मी लस घेतली आहे. लस पूर्णपणे सुरक्षितआहे" रंगविलेले होते) जाऊन जितं मया अविर्भावात फोटो काढून घेत होते.

PHC ला पोचल्यापासून २ तासात लसवंत होऊन निघालो. दुतर्फा मिर्ची व सूर्यफुलांची शेते असलेल्या पायवाटेने परतत असतानाच पुढील sms आला:

प्रिय xxxxxxxxxx,
अभिनंदन!
आपल्याला कोव्हीड-19 लसीचा 1st डोस PHC xxxxxx येथे XX-03-2021 रोजी XXX PM वाजता व्हॅक्सीनेटर xxxxx (मोबा.क्र. xxxxxx) द्वारे यशस्वीरीत्या देण्यात आलेला आहे. आपण आपले प्रोव्हीजनल प्रमाणपत्र https://xxxx येथून डाऊनलोड करू शकता. लसीकरणापश्चात काही चौकशी असल्यास, आमच्या हेल्प लाईनशी 1075 वर संपर्क साधा - CoWIN.

२४ तास उलटले तरी काही लक्षणीय त्रास झाला नाहीये. आता २८ दिवसांनी रिचार्जसाठी जायचंय.

इतर मिपाकरांनी आपले लसानुभव सांंगितल्यास कुंपणावर बसल्यांना इकडे की तिकडे उडी मारायची ते ठरवायला मदत होईल?

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2021 - 8:25 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच ! लसवंत झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

२४ तास उलटले तरी काही लक्षणीय त्रास झाला नाहीये.

हे ही आशादायकच !

असं काही वाचलं की आपल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणे विषयी खुप आश्वास्क वाटत राहतं, प्रामाणिकपणे काम करणार्‍या कर्मचार्‍यांविषयी आदर वाढतो !

मुक्त विहारि's picture

11 Mar 2021 - 9:05 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

लस नक्कीच घेणार....

बापूसाहेब's picture

11 Mar 2021 - 9:15 pm | बापूसाहेब

मुवि.. तुम्ही लस घेणार नव्हता ना???

मुक्त विहारि's picture

12 Mar 2021 - 7:12 am | मुक्त विहारि

पण, घेणार

Rajesh188's picture

11 Mar 2021 - 9:25 pm | Rajesh188

त्या लोकांना एकच डोस पुरेसा आहे दुसरा घेण्याची गरज नाही.
असे वाचनात आले आहे.

कर्नलतपस्वी's picture

11 Mar 2021 - 10:53 pm | कर्नलतपस्वी

एकच संदेश
लवसंत व्हा औक्षवंत व्हा

कर्नलतपस्वी's picture

11 Mar 2021 - 10:56 pm | कर्नलतपस्वी

एकच संदेश
लसवंत व्हा औक्षवंत व्हा
टंकलेखननाचची चुक

चौकटराजा's picture

12 Mar 2021 - 6:55 am | चौकटराजा

आज ही मला खात्री आहे की ५० टक्के मानवजातीने नैसर्गिक रित्या कोविड १९ वर मात केलेली आहे लस न घेताही. पण अशी मात केली आहे की नाही .? याची खात्रीशीर चाचणी नसल्याने मी लस घेण्याचे कधीच ठरवले होते कारण मी को मोर्बिड मधे येतो. मी ८ मार्च रोजी लस घेतली. पहिल्यान्दा लस फुकट न घेता विकतच घ्यायची असा माझा एक मानसिक आग्रह होता पण आठ वेळा प्रयत्न करूनही लसीसाठी नम्बर न लागल्याने मी इंडिया ऐवजी भारतातून लस घेतली. एकूण साडेतीन तास लागले.

लस केंद्राला राजकीय लोकांची कीड लागलेली दिसली. काहीतरी करून " आपल्या" माणसांना मधेच घुसविण्याचे प्रकार चालू होते. भांडणे ,वादविवाद चालू होते. मी आज ६८ वर्षांचा आहे पण लसीच्य बाजूने व विरुद्ध अशा दोन्ही आघाड्या मानवजातीत बुद्धीभेद करीत असल्याचे मी पहिल्यांदा प्रथमच पाहात आहे.सोशल मीडियावर कुणालाही आपले तोंड उघडता येते याचा हा परिणाम आहे. रामदेव बाबानी तर कोविड लसीच्या दुष्परिणामांवर प्रभावी अशी आपल्या एका नव्या औषधाची जाहिरात करायला सुरुवात केली आहे ! बुद्धीभेद करण्यात सर्वात पुढे आहेत त्यात डॉक्टर ही आहेत हे विशेष !

"हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महीं" हे धोरण मी तरी लसी बाबत ठेवले आहे . लसीनेच जगलो तर आनंद आहे ! कारण जग फार सुंदर आहे ! लसीनेच मेलो तर तर या सुंदर जगात लसीने मरण देखील येते हे सत्य लोकांसमोर येईल !

गामा पैलवान's picture

13 Mar 2021 - 7:14 pm | गामा पैलवान

चौकटराजा,

बुद्धीभेद करण्यात सर्वात पुढे आहेत त्यात डॉक्टर ही आहेत हे विशेष !

बुद्धीभेद करण्यात मी ही काही मागे नाही. डॉक्टर नसलो तरीही. बघा माझे दोन धागे आहेत :

१. करोनाची लस : एक थोतांड :- https://www.misalpav.com/node/48431
२. करोना : काही प्रश्न :- https://www.misalpav.com/node/48514 ( धागा उडाला आहे )

आ.न.,
-गा.पै.

चौकटराजा's picture

16 Mar 2021 - 4:37 pm | चौकटराजा

रक्तात गुठळ्या झालेल्या काही केसेस आल्यामुळे युरोपात काही देशानी कोविशील्ड ही लस देणे थांबविले आहे. मला स्वतःला आढळलेला साईड इफेक्ट म्हणजे माझी अचानक रक्त शर्करा नेहमीपेक्शा १०० युनिटने वाढली आहे. लसीकरण व हायपर ग्लिसेमिया याचा संबंध अमेरिकेत संशोधनात आढळून आला आहे असे काही पेपर्स वाचल्यावर समजते. अर्थात त्यात सीझनल फ्लू शॉट व ईतर लसी यावर सर्वे झाला होता . थोड्याफार फरकाने कोविड १९ च्या बाबतीत तसे असू शकेल असे मला वाटते . माझी कधीही १८० चे वर ना जाणारी पी पी शर्करा २५० पर्यंत गेली आहे ! यात मला तार्किक गोष्ट अशी दिसते की कृत्रिम का होईना शरीरात रोगाचे चित्र उभे झाले की शरीर ताणात येते व ताण व शर्करा वृद्धी यांचा थेट संबंध असल्याने असे होत असावे . सध्यातरी " हेच बी ए वन सी " चा आकडा आल्यावर अधिक बोलता येईल !

गामा पैलवान's picture

16 Mar 2021 - 7:27 pm | गामा पैलवान

चौकटराजा,

जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन !

आ.न.,
-गा.पै.

सौंदाळा's picture

16 Mar 2021 - 7:59 pm | सौंदाळा

काका, "हेच बी ए वन सी " चा आकडा आल्यावर नक्की सांगा.
वडिलांना द्यायची आहे. शुगर, बीपी, प्रोस्टेट आहे. अँजिओप्लास्टी पण झाली आहे म्हणुन थोडा वेट आणि वॉच मधे आहे.
शुगर वाढणे - तुमचे लक्षण आणि रक्तात गुठळ्या झालेल्या काही केसेस - युरोपात हे वाचल्यापासुन अजुन भीती वाटत आहे. वडिलांसाठी किंवा अशा रुग्णांसाठी दोन्ही घातकच आहे.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2021 - 8:24 pm | मुक्त विहारि

इतर माणसां पासून दूर ठेवणेच उत्तम...

आमच्या सासूबाईंना, हार्टचा प्रोब्लेम आहे,

आम्ही, त्यांना घराबाहेर पाठवत नाही

काळजी घेणे उत्तम, (सरकारने तशीही जबाबदारी ढकलून दिली आहेच...)

चौकटराजा's picture

16 Mar 2021 - 9:40 pm | चौकटराजा

माझे लक्षण इतके गम्भीर नाही की लस घेण्याचे पुढे ढकलावे ! तुम्ही जर वेब मेड किन्वा मेयो क्लिनिक अशी वेब साईट पहाल व त्यात निर्निराळ्या औषधांचे साईड इफेक्ट वाचाल तर क्रोसीन देखील घेणार नाही. सर्व औषधान्चे साईड इफेक्ट असतात सर्व पॅथी वाले ते मान्य करीत नाहीत इतकेच ! आपण अलर्जी या विषयावर वाचन केले तर असे आढळेल की अन्जेओप्लास्टी झालेल्या रोग्याला जे रक्त पातळ होण्याचे औषध दिलेले असते ते जीवघेणे देखील ठरू शकते ,त्याचे नाव आस्पिरिन पण त्याचा समावेश आज जीवनरक्षक औधधात होतो . "मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे " अशी काहीची कायिक अवस्था असते त्याला कोण काय करणार ??

कर्नलतपस्वी's picture

19 Mar 2021 - 4:28 am | कर्नलतपस्वी

एकदम बरोबर, कुणाला कशाची अँलर्जी होईल सांगता येत नाही. जर गुगल डाँक्टर किवा व्हाट्स अप ग्राँजुएट सल्ला घेतला तर श्वास घ्यायला सुद्धा विचार करायला लागेल

घरोघरी(सोसायटीत )जाऊन लस दिल्याने, वडिलांनी ती लस घेतली..
काहि साईड इफेक्ट झाला नाही.

मी लस न घेण्याचा विचार केला होता.. पण आरोग्य खात्यातील मित्र घे म्हणत आहे, निदान ५०% सेफ्टी असे म्हणतोय.

इथल्या अनुभवा वरून पण विचार करेन...

मुक्त विहारि's picture

16 Mar 2021 - 9:45 pm | मुक्त विहारि

थोडे दिवस थांबा...

जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे...

मुक्त विहारि's picture

16 Mar 2021 - 9:47 pm | मुक्त विहारि

पण,

सध्या तरी, जनसंपर्क खूप नाही...

गणेशा's picture

17 Mar 2021 - 12:03 am | गणेशा

Yes, थांबतो आहे.

पण जनसंपर्क कमी नाहीऐ माझा,

कोविड सेंटर मध्ये काम करणारा आरोग्य कर्मचारी माझा मित्र आहे. आणि तेंव्हा मे पासून आम्ही भेटतो..
तसेच बाहेर जाणे.. जनसंपर्क.. चहा.. फलाना रेग्युलर आहे, फक्त मास्क वापरतो..

वजन खुप वाढले आहे, ट्रेक करता येईनात so gym पण लावली जस्ट. नाही तर करोना णी नाही वजनानी stress यायचा :-)

त्यामुळे करोना बिरोना इतका लाड मी केला नाही नंतर..

लस घेतली तरी टाइमपास म्हणुन घ्यायची म्हणुन घेईल.. उगाच त्याने करोना होणार नाही असले काही नाही..

मुक्त विहारि's picture

17 Mar 2021 - 9:29 am | मुक्त विहारि

जितके घरी थांबाल, तितके उत्तम...

माझ्या एका मित्राचे, 4-5 दिवसांपुर्वी निधन झाले, वय 57-58...

हा पदार्थ, थंड करून खा...

मुक्त विहारि's picture

17 Mar 2021 - 9:43 am | मुक्त विहारि

आठवड्याची मुलाखत : लस घ्याच आणि काळजीही....

https://www.loksatta.com/vishesh-news/weekly-interview-dr-avinash-supe-e...

तुझे आणि माझे, मतभेद एकाजागी, आणि, मैत्री एकाजागी ...

चौकटराजा's picture

17 Mar 2021 - 11:57 am | चौकटराजा

लस घेतल्यानंतर क र्णाचे कवच मिळाले असे समजायचे कारण नाही ! सबब मी तरी सुमारे वर्षभर सॅनिटायझर ,सोशल डिस्टनसिंग व मास्क यांचा वापर करणार !!

मुक्त विहारि's picture

17 Mar 2021 - 5:16 pm | मुक्त विहारि

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, "नको त्या गोष्टीच्या फार जवळ जाऊ नये."

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2021 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार

एकंदर परिस्थिती पहाता सॅनिटायझर ,सोशल डिस्टनसिंग व मास्क हीच आपली जीवनशैली बनून जाईल असे वाटते आहे.
अजून एक दोन वर्ष वापरु हे केवळ मनाचे समाधान करण्यासाठी म्हणण्याची गोष्ट झाली.
पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

18 Mar 2021 - 10:39 am | मुक्त विहारि

डोंबोलीत तरी, प्रत्येकाला करोना येउन गेला असण्याची शक्यता जास्त आहे...

किती टाळणार?

पेपर, दुधाच्या पिशव्या, किराणा मालाच्या पिशव्या, फळे, हे तर टाळू शकत नाही....

एक साधं निरीक्षण सांगतो ....

शहरांपेक्षा, गावांत करोनाची लागण, नगण्य आहे...

आमच्या कुटरे गावांत आणि परिसरांत, 3 ते 4 हजार माणसे राहतात, माणसे आता, चिपळूण, संगमेश्र्वर, सावर्डे इत्यादी ठिकाणी जा-ये करतात, पण अद्याप तरी, एकही रूग्ण दगावलेला नाही...

डोंबिवली मध्ये हेच प्रमाण, दहा हजारांत, 3-4 तरी असावे...

तुझे आणि माझे, मतभेद एकाजागी, आणि, मैत्री एकाजागी ...

नक्कीच...
मतभेद असावेच...प्रत्येक माणुस सारखाच विचार करत असणे शक्य नसतेच..
आणि मैत्री हि भांडणाने वाढतेच :-))

बाकी करोना कधीच होऊन गेला असेल मला...:-)
मागे १०३-१०४ ताप चार दिवस होता, निगेटिव्ह report आला होता पण करोना झालेलाच असेल..

असो..
पण काळजी नक्कीच घेतो, तुम्ही हि घ्या...

मुक्त विहारि's picture

18 Mar 2021 - 5:07 pm | मुक्त विहारि

मी पण 2-3 दिवस, सर्दीने आजारी होतो ...

आराम कर, परत भांडू या..

माझा धोरणांना विरोध असतो, तू मनावर घेऊ नकोस...

ते आपले मुख्यमंत्री म्हणाले होते ना, करोना आपल्या कडे यायच्या आत, आपण करोनापाशी, पोहोचले पाहिजे...तसेच झाले असावे....

भांडण करणे हा माझा आवडता गुण आहे, पण मिपा किंवा सोशल साईट वर मी शक्यतो भांडत नाही.. किंवा भांडण सौम्य असते, समोरासमोर खरी मज्जा :-)

बाकी ​धोरणांना विरोध समान असावा,
चूक केली तर पुढे कोण आहे हयावर मतं बदलू नयेत असे माझे मत आहे..अ

बाकी श्री. श्री. श्री. पंत प्रधान यांनी पण साखळी तोडण्या साठी हाच दिवस का निवडला, थाळ्या वाजवून, किंवा टाळ्या वाजवून वायरस कसा आपल्या जवळ येत नाही यात कसे लॉजिक आहे ह्या फेकाड गोष्टीं हि आहेतच..

सुबोध खरे's picture

18 Mar 2021 - 10:38 am | सुबोध खरे

कालच आमच्या आईवडिलांना कोवॅक्सिन या संपूर्ण भारतीय बनावटीच्या लसीचा पहिला डोस देऊन आलो.

इतके दिवस कोव्हीड केंद्रावर खूप गर्दी असल्याने त्यांना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने नेले नव्हते.

कालच मुलुंडच्या जम्बो कोव्हीड केंद्रावर नेऊन तेथेच रजिस्ट्रेशन करून एकंदर एक तासात त्यांना परत घेऊन आलो.

अतिशय उत्तम व्यवस्था आहे.

महापालीकेच्या कर्मचाऱ्यांची जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.

एकंदर सरकारी अनास्थेच्या पार्श्वभूमीवर यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

वडिलांचे वय ८५ हृदयविकार मधुमेह आणि "इंटर स्टीशियल लंग डिसीज" हा फुप्फुसाचा आजार आहे ज्यावर त्यांना गेली तीन वर्षे स्टिरॉइड चालूआहे.

आई वय ७९ मधुमेह आहे आणि दीड वर्षांपूर्वी कर्करोगातून महत्प्रयासाने बरी झाली आहे.

दोघांना कोणताही त्रास नाही.

दोन्ही डोस पूर्ण झाल्यावर दोघांची सक्तीच्या स्थानबद्धतेतून सुटका होईल. अजून तरी दोघांची वये आणि इतर आजार पाहता मुक्तपणे बाहेर फिरता येत नाही. ते निदान गर्दी नसलेल्या ठिकाणी (उदा बागेत) मुखवटा घालून आणि अंतर ठेवून मोकळ्या मनाने फिरता येईल

माझा स्वतःचा कोव्हीशील्ड या सिरम इन्स्टिट्यूट चा पहिला डोस ६ फेब्रुवारीला घेऊन झालेला आहे. तेंव्हा दुसऱ्या दिवशी थोडा ताप आणि अशक्तपणा आला होता. बाकी काही नाही.

पूर्वी ऑगस्ट मध्ये कोव्हीड झालेला असल्याने मुळात मी निर्धास्त होतोच आता ३ महिन्यांनी दुसरा डोस घेणार आहे.

ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लस जरूर घ्यावी असाच सल्ला मी सर्वाना देतो आहे.

मुक्त विहारि's picture

18 Mar 2021 - 10:41 am | मुक्त विहारि

ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लस जरूर घ्यावी असाच सल्ला मी सर्वाना देतो आहे.

लस घेणार होतोच, पण आता लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतो....

गामा पैलवान's picture

18 Mar 2021 - 3:01 pm | गामा पैलवान

मुक्त विहारी,

कुठल्याही लशीने कुठल्याही रोगाची साथ आटोक्यात आल्याचा ठोस पुरावा नाही. त्यामुळे माझ्या मते या लशीची तुम्हांस जरुरी नाही. मात्र तुमची इच्छा बलीयसी.

खरे डॉक्टरांच्या आईवडिलांच्या बाबतीत त्यांनी अनाठायी धोका पत्करला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सक्तीच्या स्थानबद्धतेतून सुटका होण्यासाठी ती लस घेतली आहे. तिचा त्यांच्या आरोग्याशी कसलाही संबंध नाही.

आज ऐच्छिक असलेली लस हळूहळू सक्तीची होणार हे दिसतंय.

आ.न.,
-आ.पै.

मुक्त विहारि's picture

18 Mar 2021 - 3:56 pm | मुक्त विहारि

1. लस घेतल्याने वाईट तर नक्कीच होणार नाही

2. देवी, काॅलरा, पोलियो ह्या लसींमुळे रोग आटोक्यात आल्याचे, वैयक्तिक निरीक्षण आहे...

3. लस घेतली नाही तर, आमच्या गावात, 14-15 दिवस घरातून बाहेर पडू देत नाहीत...माझी सगळी कामे थांबतील...

शहरांपेक्षा गावात, ह्या बाबतीत, सुरक्षितता जास्त सांभाळली जाते..

खरे डॉक्टरांच्या आईवडिलांच्या बाबतीत त्यांनी अनाठायी धोका पत्करला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे

आपलं मत दुराग्रही आणि चुकीचं आहे एवढंच सांगेन

बाकी चालू द्या

अनन्त्_यात्री's picture

18 Mar 2021 - 3:57 pm | अनन्त्_यात्री

व इतरांस ती घेण्यापासून परावृत्त करणारे लोक्स लस घेणे सक्तीचे झाले तर ती घेतील की न घेतल्यास केल्या जाणार्‍या कायदेशीर कारवाईस सामोरे जातील हे पाहणे रोचक ठरेल.

गामा पैलवान's picture

18 Mar 2021 - 6:01 pm | गामा पैलवान

अनन्त्_यात्री,

लसटोचणी सक्तीची कशासाठी म्हणून? लशीचा नेमका फायदा काय?

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

18 Mar 2021 - 6:37 pm | मुक्त विहारि

दोन धृवांवर, दोघे आपण...

एक विषुववृत्तीय विचार मांडतो, पटत असेल तर बघा, नाहीतर सोडून द्या...

लस घेतली नाही तर, तोटा होण्याची शक्यता कमी आहे...

पण लस घेतलीत तर, लागण होण्याची शक्यता फारच कमी आहे. ही एक गोष्ट

आणि दुसरी गोष्ट अशी की, लस घेतलीत तर, घरच्यांना तुमच्या बरोबर बिंधास्त राहता येईल...

काही काही तत्वे किंवा विचार, घरच्या मंडळींना खूष करण्यासाठी, सगळेच करतात.

ह्या बाबतीत, दीवार, सिनेमातील एक डायलाॅग मस्तच आहे ...

मा, प्रसाद समझके देती है, तुम मिठाई समझके, खा लेना, रोज का झगडा खतम.

गामा पैलवान's picture

20 Mar 2021 - 2:42 am | गामा पैलवान

मुक्त विहारी,

वर तुम्ही म्हंटलंय की देवी, कॉलरा, पोलियो आदि रोग लशीमुळे आटोक्यात आले आहेत. या विधानाला विदाचा आधार नाही. या रोगांच्या साथी लशीकरणाच्या आधीपासूनच आटोक्यात आल्या होत्या.

लशीचा फायदा आणि तोटा यावर खुली चर्चा झालेली नाहीये. लशीमुळे अनेकांना पंगुत्व आलंय. आज जर तुम्ही लस घेतली तरी उद्या विषाणूत उत्परिवर्तन होऊ शकतं. मग लस घ्यायचीच कशाला? प्रतिपिंड वाढवायला? पण त्यासाठी तर शरीर समर्थ आहे. कृत्रिम हस्तक्षेपाची गरज नाही. लशीचा आग्रह नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो.

साधकबाधक विचार करून निर्णय घ्या, म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

पण,

पुर्वी, गावोगावी पोलियोचे रूग्ण होतेच की... आमच्या डोंबोलीत, तरी 2 जण माझ्या नेहमीच्या पाहण्यात होते... कुटुंबात, सख्खी आत्या पण, पोलियो ग्रस्त होतीच...

आता एकही रूग्ण नाही, 1970 ते 2020, ह्या दरम्यान डोंबिवली मध्ये जनसंख्या किमान 10 पट झाली...

देवीचे रूग्ण पण कमी झाले, आमच्या पिढीत तर जवळपास नाहीच.. आईच्या काळांत, गावात एक-दोन जण तरी असायचेच...

काॅलराची साथ आली की, सरकार लस वाटप करत होती...6 महिन्यांत साथ आटोक्यात होत होती ....

वरील सगळी निरीक्षणे आहेत... लिखीत पुरावे देऊ शकत नाही... कारण, आपल्या देशांत डाॅक्युमेंटेशनची बोंबाबोंब होती...

पटत असेल तर बघा.... नसेल पटत तर, एक गोष्ट करू शकता, तुमच्या आधीच्या पिढीला विचारा...

जाताजाता, अजून एक निरीक्षण नोंदवतो ....

1970 च्या सुमारास, गल्लोगल्ली बोर्ड लागत होते....

देवीचा रोगी कळवा आणि एक हजार रूपये मिळवा....

आता, देवाच्या रूग्णासारखाच, ह्या पाट्या पण नाहीश्या झाल्या...

Bhakti's picture

20 Mar 2021 - 9:24 am | Bhakti

@गा.पै
मी हा प्रतिसाद नव्हते लिहीणार,पण हे असं वाचून मला पुरतं पुरातन काळात गेल्यासारखं वाटतंय... आग्रह नक्कीच नाही..पण आतापर्यंत​च्या संशोधन accuracy नुसार अपेक्षा आहे... Prevention is better than cute.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2021 - 9:28 am | मुक्त विहारि

ते, त्यांची बाजू मांडत आहेत ....

उलट, त्यांची बाजू समजावून घेतांना, माझा माझ्या निरीक्षणाचे परिक्षण करता आले...

Bhakti's picture

20 Mar 2021 - 9:37 am | Bhakti

ठीक आहे,
मग त्यांनी ते थोडांत थोडांत वर लिहावे नाहीतर पाहिलेले कोवाक्सिनचे चांगले -वाईट अनुभव सांगावे..सगळ्याच लसींना का धारेवर धरले.. बाकी त्यांची मर्जी.

मराठी_माणूस's picture

19 Mar 2021 - 10:13 am | मराठी_माणूस

लस घेणे सक्तीचे झाले तर ती घेतील की न घेतल्यास केल्या जाणार्‍या कायदेशीर कारवाईस.....

असे तुम्हाला कुठे संकेत मिळाले आहेत का ? का ही तुमची अंतरीक इच्छा आहे ?

चौकटराजा's picture

18 Mar 2021 - 9:46 pm | चौकटराजा

लस घेतली तर तुम्हाला काही फायदा झाला नाही तरी तुमच्या पासून दुसर्याचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते . कोणताही त्रास नाही ,लक्षण नाही असा मुलगा पॉझि टीव्ह आहे आमच्या शेजारी पण मी को मॉर्बिड त्याच्या शेजारी आहे .अशी ८० टक्के लक्षणे नसलेली पण ज्याच्या शरीरात विषाणू आहेत अशी माणसे आहेत.त्यांना स्वतः:ला काही होणार नाही पण त्याचे वडील जर मधुमेही असतील तर त्याच्यामुळे वडिलाना तीव्र लक्षणे होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो.लस घेतल्याने अंगातील व्हायरल लोड कमी होतो असे आढळून आले आहे ! त्याचा फायदा तुमच्या आजूबाजूच्या " प्रोन " लोकांना होऊ शकतो. टेस्ट वाढल्या की असे छुपे खुनी बाजूला सारून इतर आजारी लोकांचे प्राण वाचविता येतात म्हणून ट्रॅक ,टेस्ट , ट्रीट ही त्रिसूत्री आली आहे !

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 11:07 am | Rajesh188

म्हणजे ज्यांची प्रतिकार शक्ती अतिशय उत्तम आहे त्यांना corona व्हायरस नी बाधित केले तरी ते व्हायरस त्या व्यक्ती चे काही बिघडवू शकत नाही.
अशा व्यक्ती खुनी.
काय शब्द प्रयोग आहे.

सुबोध खरे's picture

19 Mar 2021 - 11:49 am | सुबोध खरे

एखाद्याला ओपन क्षय रोग असेल आणि तो उपचार न घेता जिकडे तिकडे खोकून रोग पसरवत असेल त्याला तुम्ही काय म्हणणार?

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 12:14 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

मध्यंतरी, एका माणसाने, थुंकी लावून, बाजारात नोटा आणल्या होत्या

त्याला अटक करण्यात आली...

टर्मीनेटर's picture

19 Mar 2021 - 12:51 pm | टर्मीनेटर

परवा माझ्या आई-वडिलांनी लस घेतली आहे. ताप वगैरे आला तर घेण्यासाठी डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या होत्या. परंतु सुदैवाने दोघांना अजूनतरी कुठलाही त्रास झाला नाहीय.

गामा पैलवान's picture

20 Mar 2021 - 2:48 am | गामा पैलवान

लोकहो,

जर एखाद्याला ओपन क्षय रोग असेल आणि तो उपचार न घेता जिकडे तिकडे खोकून रोग पसरवत असेल तर त्याला रुग्णालयात भरती करून त्याच्यावर उपचार केले पाहिजेत.

रुग्ण जर खोकून रोग पसरवू शकतो, तर मग त्याला औषध द्यायला हव. आणि ते औषध वातावरणात पसरू द्यायचं. सबंध पब्लिकला एकसमान लस कशासाठी टोचायची?

आ.न.,
-गा.पै.