लाॅकडाऊन १.० पासून नाशिक जिल्ह्याच्या एका आदिवासीबहुल तालुक्यातील खेड्यात स्थलांतरित आहे. कालच ३ कि.मी. अंतरावरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जाऊन लस घेतली. पूर्वनोंदणी न करता जाणार असल्याने जाताना आधार व पॅन कार्डांचे फोटो मोबाईलमध्ये घेऊन गेलो होतो. PHC ला साजेशी अवस्धा इमारतीची होती. पाणी, पंखे, खुर्च्या यांची कमतरता असूनही कर्मचारी मन लावून काम करत होते. 3-4 रजिस्टर्समध्ये आधार पॅन ची नोंदणी, रक्तदाब, शरीर तापमान, आॅक्सीपल्स रीडिंगची नोंद वगैरे सर्व कामे हाती केली जात होती. लस देऊन झालेल्या जनतेला तासभर थांबवून पुन्हा एकदा सर्व रीडिंग घेत होते व क्रोसीनच्या चार गोळ्यांची पट्टी प्रत्येकाच्या हातात देऊन "दुसरा डोस घ्यायला विसरू नका, लस हे औषध नाही तेव्हा मास्क, सॅनिटायझर, साबण यांचा वापर करतच राहा, गर्दी टाळा" हे आवर्जून सांगत होते. काही उत्साही लोक्स लाॅबीमध्ये ठेवलेल्या एका सुशोभित चौकटीमागे ( जिच्यावर ठळक अक्षरात "मी लस घेतली आहे. लस पूर्णपणे सुरक्षितआहे" रंगविलेले होते) जाऊन जितं मया अविर्भावात फोटो काढून घेत होते.
PHC ला पोचल्यापासून २ तासात लसवंत होऊन निघालो. दुतर्फा मिर्ची व सूर्यफुलांची शेते असलेल्या पायवाटेने परतत असतानाच पुढील sms आला:
प्रिय xxxxxxxxxx,
अभिनंदन!
आपल्याला कोव्हीड-19 लसीचा 1st डोस PHC xxxxxx येथे XX-03-2021 रोजी XXX PM वाजता व्हॅक्सीनेटर xxxxx (मोबा.क्र. xxxxxx) द्वारे यशस्वीरीत्या देण्यात आलेला आहे. आपण आपले प्रोव्हीजनल प्रमाणपत्र https://xxxx येथून डाऊनलोड करू शकता. लसीकरणापश्चात काही चौकशी असल्यास, आमच्या हेल्प लाईनशी 1075 वर संपर्क साधा - CoWIN.
२४ तास उलटले तरी काही लक्षणीय त्रास झाला नाहीये. आता २८ दिवसांनी रिचार्जसाठी जायचंय.
इतर मिपाकरांनी आपले लसानुभव सांंगितल्यास कुंपणावर बसल्यांना इकडे की तिकडे उडी मारायची ते ठरवायला मदत होईल?
वर्गीकरण
वाचने
20328
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा, मस्तच ! लसवंत
माहिती बद्दल धन्यवाद
मुवि.. तुम्ही लस घेणार
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
लस लगेच घेणार नाही
In reply to मुवि.. तुम्ही लस घेणार by बापूसाहेब
ज्यांना covid झाला होता
अभीनंदन
एकच संदेश
लस ..अनुभव निरिक्षण ई ई
बुद्धीभेद
In reply to लस ..अनुभव निरिक्षण ई ई by चौकटराजा
साईड इफेक्ट
अभिनंदन !
In reply to साईड इफेक्ट by चौकटराजा
काका, "हेच बी ए वन सी " चा
In reply to साईड इफेक्ट by चौकटराजा
अशा रूग्णांना,
In reply to काका, "हेच बी ए वन सी " चा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
साईड इफेक्ट
In reply to काका, "हेच बी ए वन सी " चा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मज फूलही रुतावे हा दैवयोग
In reply to साईड इफेक्ट by चौकटराजा
घरोघरी(सोसायटीत )जाऊन लस
घरातून काम करत असाल तर,
In reply to घरोघरी(सोसायटीत )जाऊन लस by गणेशा
मी पण लस घेणार आहे
In reply to घरातून काम करत असाल तर, by मुक्त विहारि
Yes, थांबतो आहे.
In reply to घरातून काम करत असाल तर, by मुक्त विहारि
करोना हा, सांसर्गिक रोग असल्याने...
In reply to Yes, थांबतो आहे. by गणेशा
खास तुझ्यासाठी ....
In reply to करोना हा, सांसर्गिक रोग असल्याने... by मुक्त विहारि
लस घेतल्यानंतर ..
In reply to खास तुझ्यासाठी .... by मुक्त विहारि
सहमत आहे .....
In reply to लस घेतल्यानंतर .. by चौकटराजा
एकंदर परिस्थिती पहाता
In reply to लस घेतल्यानंतर .. by चौकटराजा
हो ... जीवनशैली बदलावी लागणार....
In reply to एकंदर परिस्थिती पहाता by ज्ञानोबाचे पैजार
तुझे आणि माझे, मतभेद एकाजागी,
In reply to खास तुझ्यासाठी .... by मुक्त विहारि
बाकी करोना कधीच होऊन गेला असेल मला.
In reply to तुझे आणि माझे, मतभेद एकाजागी, by गणेशा
भांडण करणे हा माझा आवडता गुण
In reply to बाकी करोना कधीच होऊन गेला असेल मला. by मुक्त विहारि
कालच आमच्या आईवडिलांना
बाबा वाक्यं प्रमाणं ....
In reply to कालच आमच्या आईवडिलांना by सुबोध खरे
बाबा वाक्यं प्रमाणं कशासाठी ?
In reply to बाबा वाक्यं प्रमाणं .... by मुक्त विहारि
तीन गोष्टी आहेत....
In reply to बाबा वाक्यं प्रमाणं कशासाठी ? by गामा पैलवान
खरे डॉक्टरांच्या आईवडिलांच्या
In reply to बाबा वाक्यं प्रमाणं कशासाठी ? by गामा पैलवान
लस घेण्यास विरोध करणारे
सक्तीची लसटोचणी कशासाठी?
In reply to लस घेण्यास विरोध करणारे by अनन्त्_यात्री
आपण, एका गोष्टीवर सहमत होऊ शकतो....
In reply to सक्तीची लसटोचणी कशासाठी? by गामा पैलवान
लशीचा नेमका फायदा काय
In reply to आपण, एका गोष्टीवर सहमत होऊ शकतो.... by मुक्त विहारि
विधानाला विदाचा आधार नाही....100% मान्य ....
In reply to लशीचा नेमका फायदा काय by गामा पैलवान
@गा.पै
In reply to लशीचा नेमका फायदा काय by गामा पैलवान
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात....
In reply to @गा.पै by Bhakti
ठीक आहे,
In reply to एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात.... by मुक्त विहारि
लस घेणे सक्तीचे झाले तर ती
In reply to लस घेण्यास विरोध करणारे by अनन्त्_यात्री
लस घेतली तर ..
छुपे खुनी
एखाद्याला ओपन क्षय रोग असेल
In reply to छुपे खुनी by Rajesh188
सहमत आहे
In reply to एखाद्याला ओपन क्षय रोग असेल by सुबोध खरे
परवा माझ्या आई-वडिलांनी लस
खोकल्याने विषाणू पसरतात तर ....