ई-बुक रिडर घ्यावे कि नाही?

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
4 Jan 2021 - 4:49 pm
गाभा: 

मला पुस्तके वाचणे परत सुरु करायचे आहे. सध्या पुस्तके बाजारात जाउन आणण्यापेक्षा लॅपटॉपवरच PDF डालो करुन वाचणे सुरु केले आहे. पण खाली लिहिलेल्या कारणांमुळे लॅपटॉपवर पुस्तके वाचणे सुसह्य नाही.

  • लॅपटॉपवर वाचताना ग्लॉसी स्क्रीनमुळे डोळ्यांवर ताण येतो
  • रात्री लाईट बंद करुन वाचले तर ब्राईटनेस जास्त वाटतो
  • जास्त वेळ वाचताना लॅपटॉप जड वाटतो

यामुळे ई-बुक रिडरबद्दल गुगलवर माहिती शोधत आहे. सध्यातरी काही ई-बुक रिडर शॉर्टलिस्ट केले आहेत पण "फक्त पुस्तके वाचणे" या उपयोगाच्या हिशोबाने त्यांची किंमत जास्त वाटते आहे. "नवीन शिकायचे असल्यास वेब्साईट आणि युट्युबला पर्याय नसतो" त्यामुळे टॅबसुध्धा विचारात घेतले आणि उपयोगाच्या हिशोबाने किंमत बर्यापैकी चालण्यासारखी आहे पण टॅबमध्ये वरच्या ३ पैकी पहिल्या २ अडचणी आहेतच.

सध्याचे ई-बुक रिडर पर्याय

अमेझॉन किंडल पेपरव्हाईट
ऑनिक्स
कोबो

याबाबत मिपाकरांचा अनुभव कसा आहे? वर लिहिलेले पर्याय सोडून आणखी दुसरे ई-बुक रिडर कोणी वापरतात का? असल्यास अनुभव कसा आहे?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Jan 2021 - 6:05 pm | प्रचेतस

किंडल पेपरव्हाईट वापरतो. उत्तम आहे, डोळ्यांना त्रास होत नाही. वाचनात सातत्य असेल तरच उपयोग होईल, नाहीतर पडून राहील :)

पॉइंट ब्लँक's picture

4 Jan 2021 - 6:34 pm | पॉइंट ब्लँक

+१

प्राची अश्विनी's picture

4 Jan 2021 - 6:49 pm | प्राची अश्विनी

+११११११
:)

बरीच फ्री apps आहेत. आणि epub format वाचतो.
Sepia tone आणि ब्राइटनेस कंन्ट्रोल असतोच. एकच वस्तू मल्टी फंक्शन.

( एका आर्किटेक्ट नातेवाइकाने सामसंग ट्याब ,4g sim घेतला पुस्तकं वाचण्यासाठी आणि नकाशे ओनसाईट पाहण्यासाठी.12k )happy.

* अर्थात किंडल पेपरव्हाईटला पर्याय म्हणून सुचवत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईलवर मी इझेडपीडीएफ रीडर वापरतो, पानं उलटायची फिलींग बरी वाटते.
बुकगंगावरचं एक पुस्तक घेतलं तर त्यांचं रिडर घ्यावे लागतं.

-दिलीप बिरुटे

डॅनी ओशन's picture

4 Jan 2021 - 8:59 pm | डॅनी ओशन

किंडल सहा वर्षे वापरतो आहे. खूप उत्तम अनुभव आला आहे. अगदी वर्थ वाटतं, इतकंच नाही तर आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट खरेदी वाटते.

डोळ्यांना त्रास नाही, वन टॅप डिक्शनरी, शब्दसंग्रह वाढवण्यासाठीची सोय,ईईई गोष्टी उपयोगी आहेत.

माझं किंडल पेपर्व्हाईटपेक्षाही जुनं मॉडेल आहे, तरी अजून उत्तम चालते, फक्त पे.व्हा. सारखं रात्री बिना दिव्याचे वापरता येत नाही.

कोबो सुद्धा चांगले आहे असे ऐकले आहे. विनासायास इपब फाईल उघडण्यासाठी कोबो जास्त चांगले. किंडलवर इपब थेट उघडता येत नाहीत, आणि इपबच सहजपणे मिळतात.

धर्मराजमुटके's picture

4 Jan 2021 - 10:42 pm | धर्मराजमुटके

ई-बुक रिडर पर्याय यासाठी चर्चा चालू आहे हे खरेच पण मराठी छापील पुस्तकांप्रमाणे जास्त पर्याय उपलब्ध नाहीत ह्याचे वाईट वाटते.

विंजिनेर's picture

5 Jan 2021 - 1:58 am | विंजिनेर

किंडल मस्त आहे - ई-इंक डिस्प्लेच्या मी सध्या तुफान प्रेमात आहे :) तासंतास वाचन करून सुध्दा डोळ्यावर ताण येत नाही !!
मला वाचताना पुस्तकं हाताळायला आवडायचं - त्याशिवाय वाचन झालं नाही असं वाटायचं पण करोनामुळे पुस्तकं मिळवणं दुर्लभ होऊ लागलं तेव्हा किंडलकडे वळलो.
अमेझॉन वरून पुस्तकं विकत घेता तर येतातच शिवाय, PDF आणि अमेरिकेत किंवा इतर देशातल्या सार्वजनिक ग्रंथालयांमधून इ-पुस्तकं घेऊन ती सुद्धा किंडलवर सहजी वाचता येतात (अधिक माहिती साठी बघा - लिबी अ‍ॅप ).

मराठी इ-पुस्तकांची एकूणच वानवा आहे ही खंत आहेच पण किंडल किमान इंग्रजी वाचनाची तहान निश्चित भागवेल.

शुभेच्छा!

दादा कोंडके's picture

5 Jan 2021 - 2:20 am | दादा कोंडके

रिमार्केबल पण छान आहे म्हणे.
पण पेपर टॅब्लेटच घ्या. मोठ्ठा स्क्रीन असावा जेणेकरून प्यान न करता मोठ्ठी पानं वाचता येतील.

भुजंग पाटील's picture

5 Jan 2021 - 3:23 am | भुजंग पाटील

गेली ८-१० वर्ष किंडल (सेकंड जेनेरेशन) वर वाचतोय.
डॅनी ओशन म्हणाले तसेच, माझी सुद्धा आतापर्यन्तची सर्वोत्कृष्ट खरेदी.

त्या किंडलला मुळीच ग्लेअर नसल्याने उन्हात बसून पण वाचता येते.
त्या शिवाय २-३ आठवडे सहज चालणारी बॅटरी, २-जि चा आजिवन डेटा पॅक (पुस्तक खरेदी अणि राउझिन्ग साठी), ऑडियो बूक रिडर, ई ई. फिचर्स आहेत.

फक्त त्या वर्जन ला पेव्हा सारखा स्वत:चा बॅकलाईट नाहिये, रात्री वाचन करण्यासाठी टेबललॅम्प (किंवा असला एलिडी https://www.amazon.com/TFY-Reading-Intensity-Readers-readers/dp/B06Y1T9M5K/ ) लागतो.

अजून एक ड्रॉबॅक म्हणजे इन्डीक फॉन्ट्सची कमतरता. बाकी ईपब चे कन्वर्शन अ‍ॅमॅझॉन फॉर्मॅट मध्ये करणे सोपे आहे.

भुजंग पाटील's picture

5 Jan 2021 - 3:26 am | भुजंग पाटील

पुस्तक खरेदी अणि ब्राउझिंग

किंडल पेपर व्हाइट मध्ये इंडिक फॉन्टस आहेत

सोत्रि's picture

5 Jan 2021 - 7:50 am | सोत्रि

मागच्याच महिन्यात ह्या प्रश्नाचे उत्तर मी माझ्यापुरते सोडवले.

मला प्रत्यक्ष पुस्तक वाचायला प्रचंड आवडते. त्यामुळे इ-रीडर ह्या प्रकाराचे वावडे होते. पण दोन महिन्यांपूर्वी एका मित्राने एक पुस्तक वाचण्यास रेकमेंड केले आणि माझ्या मागेच लागला ते लवकरात लवकर वाचण्यासाठी. कोविड - १९ च्या काळात पुस्तके भारतातून इकडे मलेशियात मिळवणे कठीण झाले होते. म्हणून मग नाइलाजाने पुस्तकाचे कींडल व्हर्जन विकत घेतले आणि ते कींडल क्लाउड रीडर वापरून लॅपटॉपवर वाचले...

आणि अहो आश्चर्यम! २-३ दिवसात पुस्तक वाचून झाले आणि इ-रीडर ह्या प्रकाराबद्दलचा पूर्वग्रह दूर झाला. एकंदरीतच इ-पुस्तकं वाचणं सर्वदृष्टीने फायदेशीर आहे हे लक्षात आले.

मग कोणता इ-रीडर घ्यायचा ह्याचा विचार चालू झाला आणि रीसर्च चालू केला. रीसर्चअंती अ‍ॅमेझॉन कींडल हा उत्तम पर्याय आहे ह्या निष्कर्षापर्यंत आलो. कींडलचे ३ मॉडेल्स आहेत.

१. कींडल
२. कींडल पेपरव्हाइट
३. कींडल ओअ‍ॅसीस

पैकी कींडल पेपरव्हाइट हा पर्याय आर्थिक आणि उपयुक्तता ह्या दोन्हींबाजूने परफेक्ट आहे. अ‍ॅमेझॉन कींडल हा उत्तम पर्याय असण्याचे कारण म्हणजे अ‍ॅमेझॉन बुकस्टोअरशी असलेली संलग्नता. अ‍ॅमेझॉन बुकस्टोअरकडे सर्वात मोठा पुस्तकांचा साठा आहे. अ‍ॅमेझॉन कींडल अनलिमिटेड ह्या स्कीमने दर महिना रु. १६० मधे अमर्यादित पुस्तके वाचाण्याचा पर्याय आहे.

पण...

मला व्यक्तीशः कींडल घ्यायला गेलयावर, कींडल पेपरव्हाइट ६ इंच आकार लहान वाटला आणि ओअ‍ॅसिस, आकार (७ इंच)आणि डिझाइन ह्यामुळे आवडला पण त्याची किंमत खुपच जास्त होती, आयपॅडपेक्षाही कितीतरी जास्त. मग जरा विचार केल्यावर असं लक्षात आलं की फक्त वाचन हीच गरज असेल आणि आकार इश्यु नसेल तर कींडल पेपरव्हाइट बेस्ट आहे. पण मला आकार मोठा हवा होता आणि त्याचबरोबर व्हिडीयो बघणे ही ही एक युज केस होती.

ह्या दोन्ही गरजा भागवणारा आयपॅड हा पर्याय मला आवडला आणि तो मी निवडला. आयओएस कींडल अ‍ॅप आणि आयपॅडचा रॅटीना डिस्प्ले आणि ब्राईटनेस अ‍ॅडजस्मेंटने तो कींडल पेपरव्हाइट इतकाच चांगला अनुभव देतो आहे.

- (इ-रीडर झालेला) सोकाजी

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2021 - 4:57 pm | टवाळ कार्टा

इव्हने दिलेले सोडून इतरवेळी मला उष्टे सफरचंद आवडत नाही ;)
त्यामुळे शक्यतो तो पर्याय विचारात घ्यायचा नाहीये, पण तुम्ही लिहिले आहे तर एकदा चेकवून बघतो...नक्की कोणते मॉडेल घेतलेत?

सोत्रि's picture

5 Jan 2021 - 9:01 pm | सोत्रि

आयपॅड १०.२” - २०२० (10th Gen.)

- (ॲपल प्रोडक्टमय झालेला) सोकाजी

चौथा कोनाडा's picture

5 Jan 2021 - 1:20 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा आणि रोचक प्रतिसाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पीडीएफ पुस्तके सलग वाचन होत नाही, असे वाटते, अर्थात हा मोबाईलवरचा अनुभव. डोळ्यावर तान येतो आणि मग आपण ठेवून देतो.
चर्चेतील प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. बाय द वे, पीडीएफ पुस्तके ऑनलाईन सांभाळून ठेवता येतील अशा काही जागाही सांगाव्यात.

-दिलीप बिरुटे

पिनाक's picture

5 Jan 2021 - 1:45 pm | पिनाक

Kindle वर pdf फॉरमॅट चालत नाही. त्यांचा स्वतःचा mobi आणि az3 फॉरमॅट आहे. Kindle मुळे डोळ्यावर ताण येत नाही कारण kindle स्क्रीन हा lcd , led प्रकारचा स्क्रीन नसून इलेक्ट्रॉनिक ink वापरतो.

सगळ्यात सोपी जागा म्हणजे गूगल ड्राईव्ह किंवा मायक्रोसॉफ्ट ड्राईव्ह

शा वि कु's picture

5 Jan 2021 - 2:38 pm | शा वि कु

पण किंडलवरचे formats, mobi आणि azw हे अमेझॉनच्या क्लॉउडवर मोफत साठवता येतात. याची साठवणूक क्षमता किती आहे कल्पना नाही, पण चार/पाच जीबी पर्यंत असली तरी हजार पुस्तके सहज मावतील.

चौथा कोनाडा's picture

5 Jan 2021 - 5:07 pm | चौथा कोनाडा

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
मोबाईलवर पीडीएफ वाचताना तुम्ही म्हण्ता तसं डोळ्यांवर येतो आणि मोबाईलचा ५-६ इंची अवकाश पुस्तकं वाचायला त्रासदायक वाटतो.
म्हणुन मी लॅपटॉप डेस्कवर ठेऊन वाचतो पीडीएफ. छान सवय झालीय आता.

सहमत, स्क्रीनच्या ५-६ इंची आकारामुळे वाचण्यातली मजा येत नाही. म्हणूनच कींडल मी टाळला.

पण मोठ्या स्क्रीनवर इ-बुक्स वाचायची सवय झाल्यावर मात्र वाचन सुलभ होऊन जाते, हा स्वानुभव!

- (इ-रीडर झालेला) सोकाजी

ज्या वेळी मिसळपाव हे ebook reader वर दिसू लागेल, त्यादिवशी तातडीने ऑर्डर करेन...

थोड्या पुस्तकांसाठी e book reader, काहींसाठी मोबाईल असं नको वाटतं

शा वि कु's picture

6 Jan 2021 - 9:37 am | शा वि कु

कॅलिबर आणि rss feed द्वारे हे पण होऊ शकते.

प्रयत्न करायला हवा.

( माझ्या एका jumpshare account वर अपलोड करून शेअर केलंय)
---------------
Azw3 format

https://jumpshare.com/v/icmrKovymsRfk0YJjUrA
---------------
Mobi format

https://jumpshare.com/v/OOJh9g0zSxa5MvvZO65Q

सुबोध खरे's picture

6 Jan 2021 - 11:42 am | सुबोध खरे

५-६ इंची

चुकून ५६ इंची वाचलं

आणि वाटलं बिरुटे सरांना हे काय झेपणार नाही.

राजाभाउ's picture

6 Jan 2021 - 12:29 pm | राजाभाउ

किंडल पेपर व्हाईट गेली २-३ वर्षे वापरत आहे, अनुभव उत्तम आहे. बाकीचे फायदे वर सगळ्यानी लिहीले आहेत, त्यामुळे ते परत लिहीत नाही.

किंडल पेपर व्हाईट मध्ये पण ३-४ पर्याय आहेत. परत वाय फाय आणि वाय फाय + ४ G असेही पर्याय आहेत. त्याची डिटेल तुलना Amazon वर बघता येईल. पण महत्वाचे फरक म्हणजे वॉटर प्रुफ अणि ppi (ऐकात १६७ आहे आणि बकिच्यात ३००) माझ्याकडे आहे त्यात ३०० ppi आहे पण मी असे वाचले कि फॉण्ट फार मोठा केला तरच ppi मधला फरक जाणवतो, नेहमीच्या वाचनासाठी फार काही फरक पडत नाही. ते एकदा बघुन घ्या.

किंडल स्टोअर वर मराठी पुस्तक बरीच असली तरी ईंग्रजी च्या तुलनेने कमी आहेत, त्यातल्या त्यात जुनी पुस्तक ई बुक स्वरुपात फारशी नाहीत, त्यामुळे मराठी जास्त वाचणार असाल तर कॅटलॉग एकदा चाळुन घ्या, तसेच किंडल अनलीमीटेड (१६९ /महीना) मध्ये काही चांगली पुस्तके असतात पण कचरा पण बराच असतो, तेंव्हा आधी एक महीना फ्री ट्रायल घेउन बघा

राजाभाउ's picture

6 Jan 2021 - 12:34 pm | राजाभाउ

आणखी एक घेणार असाल तर सेल मध्ये घ्या किंडला ला चांगला डिसकाउंट असतो.

प्रचेतस's picture

6 Jan 2021 - 12:58 pm | प्रचेतस

अगदी.

रुस्तम's picture

12 Jan 2021 - 9:00 am | रुस्तम

टका मग काय ठरलं आणि काय विकत घेतलं?

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 11:33 pm | मुक्त विहारि

मला पुस्तके खरेदी करून वाचायला आवडतात,

नविन टेक्नालाॅजी पण छान आहे

आमचे, बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, ज्ञान मिळाल्याशी मतलब, माध्यमाची चिंता करायची नाही

मी सुचवेन की तुम्ही ईबुक रीडर ऐवजी टॅब घ्या.
मी स्वतः दोन्ही वापरले आहेत, back to back.

किंडल प्रॉडक्ट एकदा घेतल की ते हार्डवेअर पुन्हा update होणार नाही. मात्र ॲप सतत update होत राहतं, जे तुम्हाला टॅब वर वापरता येतं.

टॅब्लेट च्या तुलनेत kindle ची बॅटरी कहर चालते. जवळ जवळ 40 दिवस. पण मला आवडलेले टॅब चे फीचर म्हणजे काळया स्क्रीन वर सफेद टेक्स्ट. रात्रीच्या अंधारातही हवं तेवढं वाचूनही डोळ्यांवर ताण येत नाही आणि वेगळ्या लाईटची गरज भासत नाही. मराठी पुस्तकं सुद्धा वाचता येतात. हे ॲप चे फीचर आहेत जे फोन मध्ये ही बघू शकता.
मेल वर आलेले pdf , documents वाचणे, download केलेली पुस्तकं वाचणे , ह्या साठी खास मेहनत करावी लागत नाही. वाटेल तेव्हा प्राईम, Netflix बघणे हे फायदे आहेतच. शिवाय तेवढ्याच किंवा थोड्या कमी किमतीत टॅब मिळतो.
अगदीच वाटलं तर udemy चे कोर्सेस करायला पण उत्तम पर्याय आहे tablet. इतरही ॲप्स वापरता येतात.
मात्र टॅब घेणार असलात तर जास्त RAM चा आणि फास्ट असलेला घ्या. क्रोमा सारख्या ठिकाणी एकदा हाताळून स्पीड बघून घ्या. 1GB पेक्षा कमी ram असलेला घेऊ नका. मी लेनोवो M 10 HD tab वापरतो. टॅब्लेट जड असल्या मुळे झोपताना एका हातात धरून वाचता येणार नाही.

राजाभाउ's picture

20 Jan 2021 - 12:47 pm | राजाभाउ

टका, घेतला मग ? सध्या सेल चालू आहे बघ

शा वि कु's picture

10 Feb 2021 - 10:20 pm | शा वि कु

यापूर्वीही रंगीत ई-बुक रिडर्सचे प्रयत्न झाले आहेत, पण ते इतकेसे यशस्वी नाही झाले.
पॉकेटबुक कंपनीचा एक नवीन रंगीत ई बुक रीडर निघाला आहे, त्याचे परीक्षण-
https://youtu.be/OlnzrxaZViU