सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


मटण दम बिर्याणी (व्हिडिओ सोबत)

Primary tabs

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
6 Dec 2020 - 1:30 pm

लागणारे जिन्नस:

 • मटण - १/२ किलो
 • बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम
 • जिरे पावडर - १ टीस्पून
 • धणे पावडर - २ टीस्पून
 • लाल तिखट - २ टीस्पून
 • दालचिनीच्या काड्या - ४
 • काळी मिरी - १ टीस्पून
 • तमालपत्र - २
 • मसाला वेलची - १
 • चक्रफुल - १
 • दगडफूल - १ चिमूट
 • लवंग - ६ ते ८
 • वेलची - १० ते १२
 • कांदे - ४
 • तेल - ४ टेबलस्पून
 • आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
 • दही - २ टेबलस्पून
 • पुदिना पानं - १/२ कप
 • कोथंबीर - १/२ कप
 • हिरवी मिरची - ३ ते ४
 • कोमट दूध - १/२ कप
 • केशर - १/२ टीस्पून
 • लिंबाची फोड - १
 • गहू पीठ १/५ कप
 • मीठ

क्रमवार पाककृती:
१. मटण चांगले धुऊन घ्या आणि मॅरिनेशन साठी त्यामध्ये मीठ, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, अख्खे मसाले, शेंगदाणा तेल, हिरवी मिरची आणि आल-लसूण पेस्ट घाला.
२. नंतर दही घाला.
३. मॅरिनेशन मटणाला चांगले चोळून घ्या आणि झाकून ठेवा. कमीत कमी ३ ते 4 तास किंवा रात्रभर फ्रिज मध्ये ठेऊन द्या. या पद्धतीमुळे मटण नरम होईल आणि लवकर शिजेल. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असेल तर इतर तयारी सुरू करण्यापूर्वी ते फ्रिज मधून काढून बाहेर ठेवा कारण गॅस वर चढवण्या आधी ते रूम टेम्परेचरला येणे आवश्यक आहे.
४. कांदे बारीक चिरून घेऊन ते मोकळे करा आणि गोल्डन ब्राऊन व कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्या.
५. कोथिंबीर आणि पुदीना पाने धुऊन छान कोरडी करून मग जाडसर चिरून घ्या.
६. मॅरीनेट केलेल्या मटनामध्ये १/२ तळलेले कांदे आणि १/३ चिरलेली पाने घाला.
७. केसर कोमट दुधात भिजवा आणि बाजूला ठेवा.
८. बासमती तांदूळ २ वेळा धुवा आणि ३० मिनिटे पाण्यात भिजवत ठेवा.
९. पीठ भिजवा आणि बाजूला ठेवा.
१०. भात करण्यासाठी पाणी उकळत ठेवा. त्यात मीठ, अख्खे मसाले, चिरलेला १/३ पुदीना आणि १/३ कोथिंबीर, लिंबाची फोड आणि थोडे तेल घाला.
११. उकळत्या पाण्यात तांदूळ घाला आणि भात ८०% पर्यंत शिजवा.
१२.जाड बुडाच्या पॅन मध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये सगळं मटण तळाशी घाला.
१३. भात गाळून घ्या.
१४. गाळलेला भात गरम असताना लगेचच मटणावर पसरवून टाका.
१५. भातावर आणि सर्व बाजूने तूप घालून घ्या.
१६. शिल्लक राहिलेले पुदिना आणि कोथंबीर पाने घाला.
१६. केशर भिजवलेले दूध घाला.
१७. तळलेले कांदे घाला
२०. भिजवलेली कणिक लावून भांड्याचे झाकण घट्ट बंद करा जेणेकरून वाफ जराही बाहेर जाता नये.
२१. प्रथम मोठ्या आचेवर ५ ते १० मिनिटे ठेवा.
२२. त्यानंतर आच कमी करा आणि मंद आचेवर ४० ते ४५ मिनिटं बिर्याणी दम होण्यासाठी ठेवून द्या किंवा तवा गरम करून त्यावरही हे पॅन ४० ते ४५ मिनिटांसाठी दम साठी ठेवून द्या.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

6 Dec 2020 - 4:30 pm | विजुभाऊ

आह्हाहाहा

मी_देव's picture

13 Dec 2020 - 6:36 am | मी_देव

खूप आभार .. पाकृ खरंच खूप सोपी आहे :)

मी_देव's picture

13 Dec 2020 - 6:33 am | मी_देव
मी_देव's picture

13 Dec 2020 - 6:34 am | मी_देव

पाहिलात ना? अहो मिपा वर कीबोर्ड बडवून तुमचं पुण्य वाढल्याचा हा संकेत आहे.. वाट कसली बघताय, करा celebrate :P

बाप्पू's picture

10 Dec 2020 - 11:13 pm | बाप्पू

मस्त रेसिपी.. धन्यवाद.
मटण जास्त खात नाही ( आवडत नाही म्हणून नव्हे तर सध्या पथ्यपाणी चालू आहे त्यामुळे ) पण काही दिवसात try करून बिर्याणी कशी झाली ते कळवेन.

मी_देव's picture

13 Dec 2020 - 6:35 am | मी_देव

नक्की करून बघा आणि कळवा.. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Dec 2020 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या पद्धतीने करुन पाहा असे सांगणे आले. आभार.

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

14 Dec 2020 - 5:57 pm | पियुशा

waah ! mi tr fan zaley tumchya editing chi n Pak कौशल्याची