तस म्हटले तर आपण सगळे पऱ्यांच्या राज्यात राहतो. आता, प्रत्येकाची आपापल्या परीला बघायची नजर वेगवेगळी असते. माझे म्हणाल मी पऱ्यांच्याच राज्यात (राजकुमार) आहे. कारण आमच्याकडे आधी Senior, Assistant Senior पऱ्या होत्याच नंतर नन्ही परी आली. मग नन्ही परीला जास्त एकट वाटू नये म्हणून अजून एक नन्ही परी आली (वय वर्ष २!!). आता हि जी Latest परी आहे ती Tinker category मधली आहे. तुम्ही म्हणाल Tinker च का? तर प्रत्येक गोष्ट उघडून बघायची तिला भारी हौस आणि त्यात ती भारी अनुकरण प्रिय आहे, एखादी गोष्ट लगेच उचलण्यात तिचा हातखंडा आहे.
या Lock Down मध्ये आमच्या Senior आणि Assistant Senior कडून या Tinker ला आंघोळ घालायची परवानगी मिळवली. त्याला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. अंघोळीच्या इतर बाबी उत्तम प्रकारे होत आहेत, पण आमची गाडी एका स्थानकात मात्र जामच अडकली आहे. त्याच होतंय अस कि तिला दात घासताना कितीही प्रकारे दाखवल तरीहि ती Toothpaste नेहमी गिळते, पण नंतर चूळ मात्र व्यवस्थित मारते. आमचे Seniors म्हणतात कि हा प्रकार माझ्यामुळे सुरु झाला आहे.
काय कराव बरं ?? अनुभवी जाणकारांनी आपले सल्ले जरूर द्यावेत.
प्रतिक्रिया
24 Aug 2020 - 5:43 am | कंजूस
टुथपेस्ट वापरू नका. ते एक फ्याड आहे.ब्रश करणे महत्त्वाचे.
24 Aug 2020 - 8:35 am | आनन्दा
सहमत.
बाजारात लवणभास्कर नावाचे एक चूर्ण मिळते. आम्ही मुलांसाठी ते वापरतो.
खाल्ले तर पोटाला चांगले. दात घासले तर त्यातल्या मिठामुळे दात छान होतात.
24 Aug 2020 - 8:41 am | आनन्दा
आणि मुलांसमोर मी स्वतः पतंजली चे दिव्या चूर्ण वापरतो.
24 Aug 2020 - 11:10 am | शेर भाई
लवणभास्कर चूर्ण हे नाव चुर्णाचे आहे कि उत्पादकाचे?
24 Aug 2020 - 1:06 pm | आनन्दा
चूर्णाचे नाव आहे
https://www.myupchar.com/medicine/dabur-lavan-bhaskar-p37121992.amp
माझे बाबा वैद्य असल्यामुळे ते घरातच बनवतात.. पण मुलांसाठी फारच छान आहे हे.
24 Aug 2020 - 11:06 am | शेर भाई
|टुथपेस्ट वापरू नका. ते एक फ्याड आहे.ब्रश करणे महत्त्वाचे.
लहान मुलांची टुथपेस्ट होती, आता नाही वापरणार. पण टुथपेस्ट गिळू नये यासाठी काय सुचवाल?
24 Aug 2020 - 5:11 pm | पिंगू
दात घासण्यासाठी टूथब्रशपेक्षा आघाडा किंवा कडुनिंबाची काडी वापरावी. आपले बघून मुलेपण वापरू लागतील.
24 Aug 2020 - 5:52 pm | शेर भाई
|दात घासण्यासाठी टूथब्रशपेक्षा आघाडा किंवा कडुनिंबाची काडी वापरावी. आपले बघून मुलेपण वापरू लागतील.
टूथपेस्ट असो कि आघाडा किंवा कडुनिंबाची काडी, तोंडातले द्रावण न गिळता बाहेर टाकायला लहान मुलांना कसे शिकवावे???
24 Aug 2020 - 7:29 pm | आनन्दा
आपण सांगू ते त्यांना समजेल इतके त्यांचे वय वय वाढू द्यावे..
माझ्या मुलीला आम्ही चौथ्या वर्षी टूथपेस्ट वापरायला शिकवले.. तोपर्यंत ती समजावण्याचा वयात आली होती..
घाई करायची गरज नाही असे माझे मत आहे.
बाकी तुम्ही ठरावा.
25 Aug 2020 - 6:01 pm | शेर भाई
|आपण सांगू ते त्यांना समजेल इतके त्यांचे वय वय वाढू द्यावे..
एकदम मान्य, उगीच घाई करत होतो.
24 Aug 2020 - 7:53 pm | अजया
१.अगदी छोट्या मुलांचे दात घासायला पेस्ट नाही वापरली तरी चालेल. तिला गाजर अॅपल असे तुकडे करुन खायला द्या म्हणजे प्लाक निघून जाईल. दात किडणार नाहीत.
२.दुसरे म्हणजे पेस्ट वापरताना ती जाहिरातीत दाखवतात तशी ब्रशवर आडवी पसरु नका. ते जाहिरातीत पेस्ट दाखवायला असते. पेस्ट उभी धरुन ब्रिसल्सच्या आत प्रेस करा. लहान मुलांना मुगाच्या डाळीएवढी पेस्ट खूप झाली.
३. मुलांच्या दातांना तुमच्या बोटावर किंचित पेस्ट घेऊन चोळून घ्या. मग थंब ब्रशने घासून घ्या. लगेच थुंकायला लावा. पेस्ट अगदी कमी लागते.जास्त असेल तर मुलं गिळतात.
४. कोणतीही पावडर लहान मुलांच्या दातासाठी वापरु नये. ते coarse असल्याने दात झिजू शकतात. बिना पेस्ट चालेल पण पावडर नको
५ मुलांसाठी बनवलेल्या पेस्ट उत्तम असतात. त्यातले फ्लोराइड दाताचे रक्षण करते. कमी वापरणे हाच मंत्र आहे !
All the best
25 Aug 2020 - 1:35 am | एस
24 Aug 2020 - 7:53 pm | अजया
रात्रीच्या दीड वाजता डोळे चोळून तारीख पुन्हा तपासून घेतली. म्हटलं धागा नि प्रतिसाद जुनेच आहेत की काय? आणि शेवटी असलेले नाव पाहून लगेच लॉग इन केलं. काय म्हणता अजयाताई?
बादवे, अजयाताईंनी सांगितल्याप्रमाणे दात घासण्यासाठी खरबरीत पावडर वापरू नये. त्यासाठी अगदी थोडीशी फ्लूओराईड युक्त पांढरी टूथपेस्ट (जेल नको) आणि मऊ ब्रश वापरावा. त्याचबरोबर, (माझ्या मतानुसार) लवणभास्कर चूर्ण किंवा विको वज्रदंती पावडर ही अगदी हळुवारपणे फक्त हिरड्यांना थोडीशी चोळावी. त्याने हिरड्या घट्ट होतात आणि दातांना कीड लागण्याची शक्यता फार कमी होते हा स्वानुभव. हा सर्व प्रतिसाद मोठ्यांनाही तितकाच लागू आहे.
25 Aug 2020 - 5:28 am | अजया
नमस्कार एस भाऊ !
25 Aug 2020 - 6:10 pm | शेर भाई
|१.अगदी छोट्या मुलांचे दात घासायला पेस्ट नाही वापरली तरी चालेल. तिला गाजर अॅपल असे तुकडे करुन खायला द्या म्हणजे प्लाक निघून जाईल. दात किडणार नाहीत.
तोंडच्या स्वछ्तेचीच काळजी होती. आता हा प्रयोग नक्की करून बघतो.
अजयाG तुमच्या सविस्तर विवेचानासाठी मनापासून आभार!!!
24 Aug 2020 - 8:25 pm | आनन्दा
>> कोणतीही पावडर लहान मुलांच्या दातासाठी वापरु नये. ते coarse असल्याने दात झिजू शकतात. बिना पेस्ट चालेल पण पावडर नको
हे आज प्रथमच ऐकलं... अर्थात आम्ही चोळून चोळून दात घासत नाही, पण पेस्ट वापरत नाही हेपण खरे आहे..
25 Aug 2020 - 2:25 am | वीणा३
आमच्या कडे हाच प्रॉब्लेम आहे, आम्ही लहान मुलांची म्हणून वेगळी पेस्ट मिळते ती वापरतो. पण अगदी म्हणजे अगदीच कमी. आणि काहीही झाला तरी मुलगा पुढचे दात ब्रश ने घासू देत नाही, ओठ आवळून घेतो, बरं अजून वर्षभर तरी सांगून काही कळेल असं वाटत नाही, त्यामुळे सोडून देण्याशिवाय काही उपाय नाही.
25 Aug 2020 - 6:18 pm | शेर भाई
कंजूसG, आनन्दाG, पिंगूG, अजयाG आणि वीणाG आपले सगळ्यांचे मनापासून आभार.
आता आमचा हा आंघोळीचा खेळ म्हणजे माझा रोजचा Stress Buster झाला आहे. अर्थात आमच्या पऱ्यांची करडी नजर असतेच म्हणा.......
त्यामुळे हा खेळ अजून रंगवण्यासाठी आणखी काही क्लुप्त्या असतील तर जरूर सांगा.
1 Sep 2020 - 5:39 pm | चौथा कोनाडा
शेर भाई, तुम्ही हे G वापरत, ५ वेळा वापरून 5G तंत्रज्ञानात प्रवेश केला की !
2 Sep 2020 - 4:16 pm | शेर भाई
G च्या वापरासाठी आमचे प्रेरणा - स्थान म्हणजे Chennai Express मधला राहुल (आठवा श्रीलंकन तस्करा सोबतचा प्रसंग).
“नोकिया 8.35G” सोडून अजून कोणी 5G Support करतो का??
1 Sep 2020 - 9:25 am | विजुभाऊ
मजा आली वाचून
3 Sep 2020 - 2:29 am | कंजूस
जे तोंडात घालतात ते खाण्यासाठीच असतं असा बालमनाचा नव्हे शरिराचा स्वभाव असतो. दुधाचे दात पडूनच जाणार आहेत त्यासाठी खर्च का करायचा?