गूगल फोटोज वरून फोटोंचा बॅकअप कसा घ्यावा.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in तंत्रजगत
2 Aug 2020 - 12:47 pm

तुम्हाला फोटो काढायला आवडतात?

तुमच्या अँड्रॉइड किंवा आपलं फोनमध्ये काढलेले फोटोज कायम स्वरूपी आपल्यासोबत राहावेत असे तुम्हाला वाटते?

तुमचा फोन हरवला/खराब झाला तर हे सगळे फोटोज कसे मिळवायचे हा प्रश्न तुम्हाला पडतो का?

तुम्ही तुमचा फोन बदलला तर तुमचे महत्वाचे फोटो नव्या फोनमध्ये कसे घेता येतील?

या सगळ्या प्रश्नांवर उत्तर म्हणून गूगलचे एक ऍप आपल्याला वापरायचे आहे आणि आज आपण त्याच ऍप बद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया Google Photos Backup च्या मदतीने हे कसे शक्य आहे या प्रश्नांची सोपी उत्तरे.
गूगल फोटोज हे ऍप जवळ जवळ सगळ्याच अँड्रॉइड फोन्समध्ये आधीच अंतर्भूत केलेले असते. पण आपण वापरत असलेले बरेचसे फोन हे त्या त्या ब्रॅण्डने कस्टमाइज्ड अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरत असल्याने या ऍपचा वापर न करता आपण गॅलरी या ऍप चा वापर करतो. पण यामुळे आपण गुगलने पुरवलेल्या एका सुविधेचा लाभ घेण्यापासून दूर राहातो.

आज आपण Google Photo चा वापर करून आपल्या फोटोंना आपल्या सगळ्याच फोनमध्ये किंवा संगणकावर एकाच वेळी साठवून ठेवण्याची सोपी पद्धत बघू.
1) कदाचित जर तुमच्या फोनमध्ये हे ऍप नसेल ता ते इथे क्लिक करून डाउनलोड करा.
STEPUPMARATHI.COM 1

2) पहिल्यांदा हे ऍप उघडल्यावर तुम्हाला तुमचा Gmail आयडी यात निवडावा लागेल.
तुमच्या फोनमध्ये एकापेक्षा जास्त Gmail अकाउंट्स असतील तरी अडचण नाही. तुम्हाला हवा तो अकाउंट तुम्ही निवडू शकता.

3)आता तुम्हाला तुमच्या अकाऊंटच्या नावाखाली बॅकअप सेटिंग्स दिसतील.
शक्यतो यात बॅकअप चालू ठेवलेला असतो. हा पर्याय चालू ठेवलेला असल्यास गूगल आपोआपच तुमच्या फोनमध्ये काढलेले आणि व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून आलेले फोटो गुगल क्लाउड स्पेस वर साठवून ठेवील. पण एक गोष्ट लक्षात असुद्या की हा पर्याय चालू ठेवला तर तुमचे सगळेच फोटो, ज्यात बिनकामाचे आणि चुकून काढलेले/नीट न आलेले असे सगळेच फोटो सेव्ह होतील आणि आपल्याला कायम ठेवायचे फोटो त्यातुन शोधणे कठीण होऊन जाईल. यासाठी तुम्ही हा पर्याय बंद ठेवणेच सोयीस्कर राहील. याचा अजून एक फायदा असा की गूगल आपल्याला 15 gb एवढीच क्लाउड स्पेस विनामूल्य देत असल्याने उगीचच जास्तीच्या स्टोरेज साठी आपल्याला पैसे मोजावे लागू शकतात.

STEPUPMARATHI.COM 2

4)ऑटो बॅकअप बंद केल्यावर आपले फोटो क्लाउडवर साठवले जाणार तरी कसे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आता तुम्ही सेटिंग्स मधून बाहेर पडून आपल्या फोटोंकडे वळा.
त्यातील जो फोटो तुम्हाला साठवून ठेवावासा वाटत असेल तो फोटो उघडा आणि फोटोच्या वरच्या बाजूला तुम्हाला stepupmarathi.com दिसेल त्या आयकॉनला टॅप केले कि झाला तुमचा फोटो अपलोड.

अश्याप्रकारे तुम्हाला हवे तेवढे फोटोज आणि व्हिडीओज तुम्हाला हव्या त्या क्वालिटीत साठवून ठेवता येतील.

5)हे झाले फोटो साठवण्याबद्दल, आता पाहुयात हे फोटो आपल्याला कसे दुसऱ्या फोनमध्ये मिळवता येतील.
त्यासाठी तुम्ही तुमच्या नव्या किंवा दुसऱ्या फोनवर गूगल फोटोज हे ऍप उघडा आणि फक्त तुमचा ईमेल आयडी टाका. त्यासाठी वरील पायरी क्रमांक २ वापरा आणि दिलेल्या पर्यायांमध्ये Add Another Account हा पर्याय निवडा व आपला Gmail आयडी आणि पासवर्ड टाका. आता तुमचे क्लाउडवर साठवलेले फोटोज आपोआप या फोनमध्ये दिसतील. यासाठी तुमचे इंटरनेट जेवढे वेगवान तेवढा कमी वेळ लागेल.
STEPUPMAATHI.COM

6)हेच साठवलेले फोटोज जर तुम्हाला संगणकावर पाहायचे असतील तर संगणकावर आपल्या जीमेल अकाउंटमध्ये लॉगिन करा.
7)आता वरील बाजूला उजव्या कोपऱ्यात आपल्या प्रोफाइल पिक्चरच्या बाजूला असलेल्या Google Apps या आयकॉनवर क्लिक करा.
आणि तुम्ही क्लाउडवर साठवलेले तुमचे सगळे फोटो तुमच्या कम्प्युटरवर दिसतील.
STEPUPMARATHI.COM 6-7

आहे ना सोपं?

चला तर Google Photos च्या आणखी काही फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊ.
हे वापरायला खूप सोपं अप आहे.
यात कुठल्याही जाहिराती दाखवल्या जात नाहीत.
तुमच्या जुन्या आठवणी गूगल स्वतः दाखवतो.
यात तुम्हाला नेहमी लागणारे फोटो, आवडते फोटो ‘Favourite’ म्हणून मार्क करता येतात त्यामुळे पुढल्या वेळी त्यांना शोधणे सोपे जाते.
आपले फोटो आपोआप वर्गीकरण केले गेल्याने त्यांना शोधणे सोपे जाते.
उदा. Things मध्ये आपण सायकल, डॉक्युमेंट्स, मंदिर, सूर्योदय, तलाव आणि इतर गोष्टी.

तसेच Places मध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी फोटो काढलेत त्यानुसार ते दिसतात.

महत्वाचे म्हणजे आपण व्यक्तीनुसार फोटो बघू शकतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे सर्व फोटो एका क्लिकवर आपल्याला पाहायला मिळतात.

STEPUPMARATHI.COM PHOTOS

यात गूगल स्कॅन आणि गूगल लेन्स ही ऍप्स अंतर्भूत केलेली आहेत.
यातील फोटोज आपण थेट शेअर करू शकतो.
हे ऍप ऍपल फोनसाठी सुद्धा उपलब्ध असल्याने आपण जर अँड्रॉइड वरून ऍपल किंवा उलट असे ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन घेत असाल तरी हे तेवढेच कामी येते.

मूळ लेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Aug 2020 - 1:21 pm | कंजूस

वा!

तुषार काळभोर's picture

2 Aug 2020 - 10:19 pm | तुषार काळभोर

पाच सहा वर्षांपासून गुगल फोटो चा पुरेपूर उपयोग करतोय.
backup घेणे हा प्रकार आता बंदच केलाय.

माझ्या आणि बायकोच्या , दोन्ही मोबाईल मध्ये दोघांचेही जीमेल अकाउंट आहेत. फोटो अॅप मध्ये प्रत्येक अकाउंट मधून ते दुसऱ्या अकाउंट ला शेअर केले आहेत. त्यामुळे एका मोबाईल वर काढलेला फोटो आपोआप दुसऱ्या मोबाईल वर दिसतो.
(दोन्ही फोन स्टॉक अँड्रॉइड असल्याने गॅलरी प्रकार नाही. गुगल फोटोच आमची डिफॉल्ट गॅलरी आहे)

अमित लिगम's picture

2 Aug 2020 - 11:04 pm | अमित लिगम

पण उपलोड केलेल्या फोटोंची सुरक्षितता आणि गोपनीयता गुगल कडून जपली जाते का?

कंजूस's picture

3 Aug 2020 - 8:44 am | कंजूस

Backup केलेल्या फोटोंतून एखादा डाउनलोड करून पाहावा. त्याची साईज पाहावी. मूळ फोटोएवढी असावी. नसल्यास सेटिंग्ज मध्ये बदल करावा.
चार पाच एमबी साईजचा फोटो शंभर दीडशे केबीचा सेव save करून काही उपयोग नाही. तो पुढे वारसांना प्रिंट करावासा वाटल्यास मोठ्या साईजचाच हवा.

चौथा कोनाडा's picture

3 Aug 2020 - 12:46 pm | चौथा कोनाडा

मस्त माहितीपुर्ण धागा ! सर्वांसाठी उपयोगी !

पन मी म्हंतो:
ऑटोबॅक अप करुन ढगात कश्याला डिजिटल कचरा साठवायचा ?
फक्त अतिमहत्वाचे फोटो तेवढे बॅक अप करून ठेवायचे.

फक्त अतिमहत्वाचे फोटो तेवढे बॅक अप करून ठेवायचे.

होच. सहलीच्या शंभर फोटोंतील पाच प्रिंटस आणि पाच अपलोड करणे हा नियम केला आहे.