[कविता' २०२०] - येवून जा जराशी..

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 10:25 am

येवून जा जराशी..येवून जा जराशी, भेटीची आस आता..
संगे तुझ्याच आहे, होतात भास आता..

तव स्मृतींचा पसारा, उरकून रात्र गेली,
ताजी पहाट मजला, वाटे भकास आता..

चिमणी उडून गेली टाकून त्या पिल्लांना,
माझ्या सवेच तेही, घरटे उदास आता..

दारातल्या कळीचे, जरी आज फुल झाले,
तरी त्यास नेहमीचा, नाही सुवास आता..

ढळणार ना कधीही, हा बांध भावनांचा,
आवरून मीही घेतो, माझ्या मनास आता..


प्रतिक्रिया

मोगरा's picture

19 May 2020 - 11:17 pm | मोगरा

+1

मन्या ऽ's picture

20 May 2020 - 7:13 am | मन्या ऽ

+१

सॅम's picture

20 May 2020 - 12:52 pm | सॅम

तव स्मृतींचा पसारा उरकून रात्र गेली

व्वा..काय उपमा आहे!
+1

मनिष's picture

20 May 2020 - 5:37 pm | मनिष

त्यावरून आठवले...

उरले उरात काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

~ सुरेश भट

प्रियाभि..'s picture

21 May 2020 - 1:18 pm | प्रियाभि..

भट साहेब तर भट साहेब आहेत.

कानडाऊ योगेशु's picture

20 May 2020 - 1:46 pm | कानडाऊ योगेशु

काही कल्पना उत्तम.
पण घाईगडबडीत लिहिल्यासारखी वाटतेय.

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 7:11 am | चांदणे संदीप

+१

"पिल्लांना" ऐवजी पिलांना ही चालले असते का? वाचताना तिथे थोड अडखळल्यासारखं झालं.

सं - दी - प

प्रियाभि..'s picture

21 May 2020 - 1:11 pm | प्रियाभि..

पिलांना योग्य आहे.

येवून जा जराशी, भेटीची आस आता..
संगे तुझ्याच आहे, होतात भास आता..

काय आर्त हाक आहे.. खुप आवडली गझल
या वरच्या ओळी /मतला तर खासच

+1

प्रियाभि..'s picture

21 May 2020 - 1:10 pm | प्रियाभि..

छान जमलीय गझल.

प्राची अश्विनी's picture

22 May 2020 - 11:35 am | प्राची अश्विनी

+1

प्रसाद साळवी's picture

22 May 2020 - 9:48 pm | प्रसाद साळवी

शब्दयोजना आणि घाट सुद्धा जमलाय.... +१

प्रसाद साळवी's picture

22 May 2020 - 9:48 pm | प्रसाद साळवी

शब्दयोजना आणि घाट सुद्धा जमलाय.... +१

तुषार काळभोर's picture

23 May 2020 - 11:46 am | तुषार काळभोर

+१

छान कविता.

g.priya's picture

23 May 2020 - 8:06 pm | g.priya

छान

प्रेमसागर's picture

23 May 2020 - 9:21 pm | प्रेमसागर

सुरेख