Skip to main content

[कविता' २०२०] - येवून जा जराशी..

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 19/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

येवून जा जराशी..




येवून जा जराशी, भेटीची आस आता.. संगे तुझ्याच आहे, होतात भास आता.. तव स्मृतींचा पसारा, उरकून रात्र गेली, ताजी पहाट मजला, वाटे भकास आता.. चिमणी उडून गेली टाकून त्या पिल्लांना, माझ्या सवेच तेही, घरटे उदास आता.. दारातल्या कळीचे, जरी आज फुल झाले, तरी त्यास नेहमीचा, नाही सुवास आता.. ढळणार ना कधीही, हा बांध भावनांचा, आवरून मीही घेतो, माझ्या मनास आता..


वाचने 12276
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

+1

तव स्मृतींचा पसारा उरकून रात्र गेली
व्वा..काय उपमा आहे! +1

In reply to by सॅम

त्यावरून आठवले...
उरले उरात काही आवाज चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली! ~ सुरेश भट

काही कल्पना उत्तम. पण घाईगडबडीत लिहिल्यासारखी वाटतेय.

+१ "पिल्लांना" ऐवजी पिलांना ही चालले असते का? वाचताना तिथे थोड अडखळल्यासारखं झालं. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पिलांना योग्य आहे.

येवून जा जराशी, भेटीची आस आता.. संगे तुझ्याच आहे, होतात भास आता.. काय आर्त हाक आहे.. खुप आवडली गझल या वरच्या ओळी /मतला तर खासच +1

छान जमलीय गझल.

+1

छान

सुरेख