श्रीराम आणि श्रीकृष्ण

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
4 May 2020 - 10:18 pm
गाभा: 

श्रीराम आणि श्रीकृष्ण

खूप दिवसांपूर्वी SVBC चॅनेल वर रात्री ११ वाजता प्रेमा पांडुरंग ह्यांचे भागवतावरचे प्रवचन लागायचे फारच ओघवत्या भाषेत आणि सुंदर रसाळ पद्धतीने सांगायच्या
(त्यांच्याबद्दल माहिती https://lightinnerlight.com/teachers/smt-dr-prema-pandurang/ इथे मिळेल )
त्यांच्याच प्रवचनात एकदा श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांच्या जीवनाची आणि कार्यपद्धतीची तुलना आली. अत्यंत साधी उदाहरण देऊन त्यांनी दोघांमधला फरक स्पष्ट केला होता
उदा. एखाद्या ठिकाणी श्रीराम गेले असतील तर ते शांतपणे सगळे अटेंड करतील पण तेच श्रीकृष्ण गेला तर स्वतःचा प्रभाव वापरून सगळ्यांना आपल्या मागे मागे करायला लावतील तसेच अवतारसमाप्तीच्या वेळेस रामाला कोणीही जाऊ देत नव्हते सगळे शोकात बुडाले होते पण श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीच्या वेळेस कोणाला माहिती सुद्धा नव्हते शांतपणे व्याधाचा बाण लागून अवतारसमाप्ती झाली
ह्यावरूनच श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांची तुलना करावीशी वाटली खूप लोकांनी केलीये माझा पण प्रयत्न

श्रीराम
मर्यादापुरुषोत्तम ,एकवचनी एकपत्नीव्रती आणि सगळ्या बाजूने आदर्श (सरळसोट )व्यक्तिमत्व. कुठेही नाव ठेवायला म्हणून इतकीही जागा नाही.
पण कुळाभिमान आणि वचनपूर्तीसाठी स्वतःच्या प्रिय व्यक्तींना पण जुंपले त्यांना सहन करावयास लावले काहीही चूक नसताना.
वरवर दुःखी असून देखील अंतर्यामी एक प्रकारची शांती आणि ठामपणा दिसून येतो (दुसऱ्यांच्या वचनपूर्तीसाठी त्रास सहन करावा लागण्यामुळे स्वतःवर काही दोष (guilt) नाही
तसेच पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब.(त्रेतायुग )
पूर्ण श्रीराम कथेत स्त्रियांवर अन्याय ठिकठिकाणी दिसून येतो. (अहिल्या उद्धारापासून ते सीतेच्या अग्निपरीक्षेपर्यंत )
सगळे गुण/महत्ता हे स्त्रियांच्या बलिदानावर आधारलेले वाटतात .
श्रीरामांसमोर प्रार्थना करताना आपण त्यांच्या perfectionism आणि गुणांसमोर नतमस्तक होतो पण आपल्याबाबतीत असे काही (वनवास इ. )होऊ देऊ नको असेच मागणे मागतो
श्रीकृष्ण
लहानपणापासून माखनचोर,धूर्त राजकारणी ,बहुपत्नीत्त्व आणि एक पाताळयंत्री manipulative (गुंतागुतीचे) व्यक्तिमत्व.
पण स्वतःसाठी प्रिय व्यक्तींना काहीही सहन करावे नाही लागले
नेहमी आयुष्यातील स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य देऊन त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले (राधा,कुंती, droupadi,अष्टपत्नी-रुक्मिणी ने प्रथम पुढाकार घेऊन
श्रीकृष्णांना पात्र पाठवले होते,सत्यभामेने त्यांचे दान केले अशा अनेक कथा आहेत)
सामर्थ्य असूनदेखील स्वतःच्या कुळाचा नाश बघावा लागला वरवर सुखी संपन्न असूनदेखील अंतर्यामी सदैव साऱ्यांची चिंता आणि duukh सहन करावे लागले
बरीच राजकारणे,कारस्थाने स्वतः केल्यामुळे एकप्रकारचा guilt
श्रीकृष्णकथेत स्त्रियांवर अन्याय झालेला दिसून येत नाही (जो काही झालाय तो त्यांच्या स्वतःच्या कर्मानुसार)
थोड्याश्या प्रमाणात स्त्रीप्रधान संस्कृतीची सुरुवात (द्वापारयुग)
श्रीकृष्णांसमोर प्रार्थना करताना आपण त्यांच्यासारखे का नाही हा प्रश्न पडतो

ह्याबद्दल इतरांची मते वाचावयास आवडतील (चावून चोथा झालेला तरीही एव्हरग्रीन विषय आहे)

अवांतर-श्रीराम म्हणजे शिस्तबद्ध पाश्चात्य तर श्रीकृष्ण म्हणजे जुगाडू भारतीय असे वाटते
तसेच श्रीरामावतारात जे काही राहीले त्याची सगळी कसर श्रीकृष्ण अवतारात भरून काढली असेही मानण्यास जागा आहे

प्रतिक्रिया

उत्खनक's picture

5 May 2020 - 12:25 am | उत्खनक

अंमळ अकारण आणि प्रयोजनशून्य धागा. याचा खफ झाला नाही तरच नवल!
आता काडी सारायचीच चुलाणात तर मग मीच पहिला होतो.. कसे? ;-)

माझ्या मते तुलना करणंच चुकीचं आहे. भिन्न व्यक्तीमत्त्व अन् कार्य पद्धती. तरीही -

- श्रीरामाचं आकलन करणं मानवीय दृष्टीकोनातून शक्य आहे, श्रीकृष्णाचं नाही. त्याच्या लीला आणि त्यामागची कारणं हा एक खूप मोठा आणि वेगळा विषय आहे.
- श्रीरामाचं चरित्र सरळसोट आहे, त्याबद्दल कितीही प्रयत्न केला तरी फार काही वेगळं लिहिता येत नाही. श्रीकृष्णाबद्दल प्रत्येकजण वेगवेगळं आकलन मांडू शकेल आणि तरीही ते अपूर्ण वाटेल.
- श्रीरामाला मानव म्हणता येऊ शकतं. श्रीकृष्णाला भगवंतच म्हणावं लागतं इतकं ते चरित्र अचंबित करणारं आणि लालित्यपूर्ण आहे. श्रीकृष्णही भगवंत असल्याचं स्वतः सांगतो.
- श्रीरामाला इतरांनी भगवंत म्हटलं तरीही स्वतः श्रीराम सामाजिक बंधनातच राहिलेत, अगदी अन्यायपूर्ण असलं तरीही. श्रीकृष्ण पदोपदी बंधनं झुगारत जातो. अगदी राज्यपदाचंही बंधन तो स्वतःला लावून घेत नाही.
- श्रीराम सर्व मर्यादांच पालन करून युद्ध करतात आणि जिंकतात. त्यांना इतरांची सोबत असते आणि ती तुल्यबळ वाटते. श्रीकृष्ण अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी कोणताही मार्ग त्याज्य मानत नाही. त्याला मदत कोण करणार? न पेक्षा त्याची मदत इतरांना सतत सर्ववेऴ होते.
- श्रीराम वचन देतानाही सरळ मार्गाने देतात आणि निभावतात. श्रीकृष्ण वचन मोडतो असं शक्यतो सापडणार नाही. पण जर कुणी लबाडीनं वचनात गुंतवायचा प्रयत्न केला तर त्याला त्याच मापानं उत्तर देतो, कधीच वचनात फसत नाही.
- श्रीराम कोणत्याही बाबतीत स्वतःवर आणि राज्यावर एकदाही कुणी टिप्पणी केलेली सहन करणार नाहीत, कारण राज्यपदाला सांभाळणं आणि त्याची प्रतिष्ठा राखणं त्यांचं आद्य कर्तव्य आहे. श्रीकृष्णानं संपूर्ण कार्यकाळात जितके राजे स्वतः मारलेत, तेवढे कदाचितच कुणी महाभारत युद्धाच्या आधी मारले असतील. पण तरीही रणछोडदास म्हटल्यानं त्याला फरक पडत नाही. किंबहुना सगळ्यांचे उरलेले सर्व हिशोब चुकते करण्यासाठीच जणू त्याचा जन्म आहे! :-)

आणिकही भरपूर आहे. तरीही जाता जाता एकच वाक्य कुठेसं वाचलेलं स्मरतं - "श्रीरामाचं चरित्र वाचून आचरण करण्याजोगं आहे, श्रीकृष्णाचं चरित्र वाचून आनंद घेण्याजोगं आहे, आचरण करण्याजोगं नाही.. कारण त्याला मानवीय दॄष्टीकोन लागूच होत नाही."

Prajakta२१'s picture

8 May 2020 - 11:42 pm | Prajakta२१

धन्यवाद
आजच्या बाह्य कॉर्पोरेट कार्यालयीन जगतात श्रीकृष्णाचे चरित्रच आचरण्याजोगे आहे असे वाटते
आणि वैयक्तिक जगतात श्रीरामाचे

संजय क्षीरसागर's picture

9 May 2020 - 12:25 pm | संजय क्षीरसागर

दुसऱ्याला वापरणं अनैतिकता आहे, आणि
स्वतःला वापरु देणं ही अगतिकता आहे !

तस्मात, हे दोन्हीही न होऊ देणं कायम श्रेयस ठरतं.

चरित्रांचा अभ्यास निरुपयोगी आहे.

Prajakta२१'s picture

9 May 2020 - 11:25 pm | Prajakta२१

+१११

कोहंसोहं१०'s picture

5 May 2020 - 3:11 am | कोहंसोहं१०

पण स्वतःसाठी प्रिय व्यक्तींना काहीही सहन करावे नाही लागले ---> हे तितकेसे चपखल बसत नाही. श्रीकृष्णांच्या जन्माच्या आधीपासूनच वासुदेव आणि देवकी यांना बरेच सहन करावे लागले. आणि तो प्रकार कंसाच्या मृत्यूनंतरच थांबला. गोकुळ सोडल्यावर श्रीकृष्ण पुन्हा कधीच तिकडे गेले नाहीत त्यामुळे यशोदा माता, गोपी, सवंगडी यांना विरह सहन करावे लागला. फक्त श्रीकृष्णांना मारण्यासाठी लहानपणी कंसाने अनेक राक्षस पाठवले ज्यामुळे नंद, यशोदा यांच्यासकट गावकऱ्यांना पण मनस्ताप सहन करावा लागला. जेंव्हा श्रीकृष्णांनी इंद्रदेवाची पूजा नाकारली तेंव्हा इंद्राने क्रुद्ध होऊन संपूर्ण गोकुळ पाण्याखाली बुडवले होते. जरी श्रीकृष्णांमुळे गोवर्धन पर्वताखाली आश्रय मिळून जीवितहानी झाली नसली (नसावी हे गृहीत धरतो) तरी पाण्याखाली गाव बुडून बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले असणार गावकऱ्यांना. श्रीकृष्णांना मारण्यासाठी जरासंधाच्या १७ वेळा मथुरेवर आक्रमणे केली ज्यात सततच्या युद्धामुळे सैनिक आणि जनतेला बरेच सहन करावे लागले. याशिवायही अनेक उदा असतील.

महापुरुषांचा किंवा भगवंताचा जन्म एका मोठ्या कार्यासाठी असतो जे साध्य करण्यासाठी सामान्यांना/प्रिय व्यक्तींना सहन करावेच लागते त्याशिवाय मोठी कार्ये संपन्न होत नाहीत. त्याला स्वतः राम किंवा कृष्ण हेही अपवाद नाहीत.

वरवर सुखी संपन्न असूनदेखील अंतर्यामी सदैव साऱ्यांची चिंता आणि duukh सहन करावे लागले ----> हेही तितके बरोबर बसत नाही. श्रीकृष्णांसारखे अंतर्यामी शांत आणि समबुद्धी व्यक्तिमत्व शोधूनही सापडणार नाही (अर्थातच श्रीराम किंवा इतर जीवन्मुक्त लोक वगळता). ते सुख आणि दुःख याच्या पलीकडचे आहेत हे त्यांनी स्वतः गीतेमध्ये सांगितले आहे.

Prajakta२१'s picture

5 May 2020 - 3:32 pm | Prajakta२१

काही प्रमाणात सहमत

परंतु ती तात्कालिक दुख्खे होती वेळेनुसार कमी होत जाणारी
फक्त देवकी आणि वासुदेव ह्यांना बरेच काही सहन करावे लागले ह्याच्याशी सहमत
एका ठिकाणी वाचल्यानुसार आधी कंसाने त्यांच्या आठव्या अपत्यासच मारण्याचे ठरवून आधी त्यांना मोकळीक दिली होती पण
महर्षीं नारदांनीं त्याच्या मनात आठवेच अपत्य कशावरून? आधीचे कुठले पण पण तुझा काळ बनू शकते असे संशयाचे पिल्लू सोडले
त्यानंतर कंसाने देवकी आणि वासुदेव यांना कारावासात टाकले आणि सर्व अपत्ये ठार करायला सुरवात केली
श्रीकृष्णजन्माच्या वेळेस पण तो वाचावा ह्यासाठी त्याला दूर करावे लागले आणि नंतर तो परत आपल्याला भेटणारच आहे हा विश्वास देखील होता
तसेच गोकुळवासीयांवर जी काही संकटे आली .मनस्ताप झाला त्यात श्रीकृष्ण बरोबर होता त्यांच्या आणि श्रीकृष्णानेच त्यांना साह्य करून बाहेर काढले
पूर्ण बालपण त्यांच्या सहवासात घालवून मग कंसवधासाठी प्रस्थान केल्याने तसा विरह म्हणता नाही येणार (नंतर सुदामा भेटावयास गेला होताच की तसे हे पण जाऊ शकत होते)
ह्याउलट रामायणात सीतेला रावणाच्या कैदेत राहावे लागले आहे(रामाने रावणाचा वध करण्यास सबळ कारण हवे म्हणून) ,केवळ लोकापवादासाठी त्याग केले आहे नाजूक अवस्थेत असताना आश्रमात एकट्याने दिवस कंठावे लागले आहेत जरी रामाला आणि कुटुंबियांना तिच्या पवित्रतेचे खात्री होती तरी .
laxmanala भ्रातृप्रेमासाठी वनवास पत्करावा लागला आहे बिभीषणाला भक्ती करण्यासाठी घरभेदाचा कलंक स्वीकारावा लागला आहे (बिभीषण जवळच्या व्यक्तीत मोडत नसला तरी जवळचा भक्त होता)

एखाद्या मुलाला काबाडकष्ट करून वाढवले शिक्षण दिले आणि तो परदेशी गेला त्याचा पालकांना होणारा विरह आणि सगळे नीट असून केवळ संशयावरून नवऱ्याने दिलेला डिवोर्स ह्या दोन्हींच्या सहन करण्यात जो फरक आहे तोच वरच्या ठिकाणी आहे (हे फारच अवांतर झाले कृ भा स ह घ्या )

कोहंसोहं१०'s picture

5 May 2020 - 7:53 pm | कोहंसोहं१०

पूर्ण बालपण त्यांच्या सहवासात घालवून मग कंसवधासाठी प्रस्थान केल्याने तसा विरह म्हणता नाही येणार (नंतर सुदामा भेटावयास गेला होताच की तसे हे पण जाऊ शकत होते) ----> सहवासानंतरचा विरह हा अधिक तीव्रतेने जाणवतो. सहवासच नसेल तर विरह कसा येईल? गोपींनी श्रीकृष्णांना भेटण्याचे म्हणाल तर त्या काळी ते तितकेसे सोप्पे नसावे. गोकुळापासून गुजरातमधील द्वारकेपर्यंत प्रवास गावातील स्त्रियांना घरच्या सर्व जबाबदाऱ्या टाकून तेही कोणतीही जलद प्रवासाची वाहने उपलब्ध नसताना करणे हे अत्यंत अवघड असणार.

तसेच गोकुळवासीयांवर जी काही संकटे आली .मनस्ताप झाला त्यात श्रीकृष्ण बरोबर होता त्यांच्या आणि श्रीकृष्णानेच त्यांना साह्य करून बाहेर काढले >>> हो परंतु संकट टळेपर्यंत सहन करावे लागले हे नाकारता येणार नाही. गावातील लोक ही अत्यंत साधी माणसे होती. लक्ष्मण आणि सीता यांनी सहन केले यात दुमत नाही परंतु श्रीरामप्रमाणेच लक्ष्मण आणि सीता हेही अवतारच आहेत. संकटकाळात अवतारी पुरुष जेवढे शांत राहून सहन करू शकतात तेवढे सामान्य माणसे खचितच करू शकत नाहीत. त्यामुळे ' कोणामुळे सहन करावे लागले' हा मुद्दा असेल तर श्रीकृष्णांना वगळून चालणार नाही.

बाकी सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासाच्या म्हणाल तर वर म्हणल्याप्रमाणे ते दोघेही अवतारी होते आणि सामान्य माणसे आणि अवतारी पुरुष यांच्या सहन करण्यात बराच फरक असतो. आणि रामाबरोबर वनवासात यायचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला होता. वनवासातील आयुष्य कसे असेल याची कल्पना असतानांही. याउलट श्रीकृष्णांमुळे इच्छा असो व नसो अनेकांनी, ज्यातील बरीचशी सामान्य माणसे होती, बरेच सहन केले आहे.
बिभीषणाचे उदाहरण येथे अप्रस्तुत वाटते कारण रामाच्या असो वा कृष्णाच्या, त्यांच्या भक्तांनी जे सहन केले त्यात बिभीषणाचा नंबर बराच खालचा म्हणावा लागेल

टवाळ कार्टा's picture

5 May 2020 - 10:05 pm | टवाळ कार्टा

"श्रीराम म्हणजे शिस्तबद्ध पाश्चात्य तर श्रीकृष्ण म्हणजे जुगाडू भारतीय असे वाटते" हे लिहून स्वतःचा विनोद कांबळी करून घेतलात

गोंधळी's picture

9 May 2020 - 11:45 am | गोंधळी

श्रीराम व श्रीकृष्ण हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असे म्हणु शकतो का?...... तसे असेल तर तुलना नाही होउ शकत.

एकाच देवाचे दोन अवतार आहेत पण कालखंड वेगळा असल्याने एका नाण्याच्या दोन बाजू नाही वाटत

गोंधळी's picture

10 May 2020 - 7:49 pm | गोंधळी

ठिक आहे. पण सगळ्या अवतारांपैकी श्रीकृष्णाचा अवतार अधिक पुर्ण होता असे वाटते.