शाम सवेरा

केडी's picture
केडी in पाककृती
18 Apr 2020 - 8:48 pm

1

ही पाककृती संजीव कपूर ह्यांच्या येलोचिली पुस्तकातली त्यांची सिग्नेचर डिश आहे।

पाककृती चा दुवा देत आहे. करताना मज्जा आली. खर सांगायचं तर ही करायला सोप्पी आहे फक्त वेळकाढू आहे, पण घरात पार्टी ला आदल्या दिवशी तयारी करून ठेवली तर आयत्यावेळी फक्त पालक चे कोफ्ते तळून ही करता येईल. [अर्थात लॉक डाऊन नंतरच्या आफ्टर पार्ट्यांबद्दल बोलतोय मी ]

महत्वाचा मुद्दा म्हणजे पालक कोफ्ते करताना ते मिश्रण चांगलं परतून घायचं आहे, अगदी त्याचा गोळा होईस्तोवर आणि पॅन सोडायला लागलं की समजावे ते तयार आहे. हे मिश्रण फ्रिज मध्ये लावावे, (मी आदल्या दिवशी करून रात्रभर फ्रिज ला लावलेले, कोफ्ते करण्या आधी २ तास बाहेर काढले आणि पुन्हा छान मळून घेतले.

आपल्या साध्या पोळी सोबत छान लागते पण तवा पराठा असेल तर अजून मज्जा येईल.

2

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

18 Apr 2020 - 10:19 pm | अनिंद्य

हुबेहूब !

यलो चिलित खाल्ले आहे हे प्रकरण :-)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2020 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा

यवत जवळच्या हाटीलात आगोबासह ही डिश पहिल्यानदा चाखली तेंव्हाच कायमची मनात जाऊन बसली होती. आज तीच चव तुम्ही परत दिली. धन्यवाद.
Calling :- आगोबा मचाणकर.

कंजूस's picture

19 Apr 2020 - 5:01 pm | कंजूस

अगदी हुबेहुब.
( पण मला ग्रावीवाले,पनीरवाले पदार्थ आवडत नाहीत.)

मदनबाण's picture

19 Apr 2020 - 5:35 pm | मदनबाण

लयं भारी !

[पनीर प्रेमी ] :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaathikkathottam... :- Thanneer Mathan Dinangal

जुइ's picture

20 Apr 2020 - 3:46 am | जुइ

बर्‍याच वर्षांपूर्वी एका पार्टीत हा पदार्थ खाल्ल्याचे आठवत आहे. पाकृ आवडली आहे करून बघण्यात येईल.

आत्ता घेऊन जेवावं वाटतंय :प