Skip to main content

शाम सवेरा

लेखक केडी यांनी शनिवार, 18/04/2020 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
1 ही पाककृती संजीव कपूर ह्यांच्या येलोचिली पुस्तकातली त्यांची सिग्नेचर डिश आहे। पाककृती चा दुवा देत आहे. करताना मज्जा आली. खर सांगायचं तर ही करायला सोप्पी आहे फक्त वेळकाढू आहे, पण घरात पार्टी ला आदल्या दिवशी तयारी करून ठेवली तर आयत्यावेळी फक्त पालक चे कोफ्ते तळून ही करता येईल. [अर्थात लॉक डाऊन नंतरच्या आफ्टर पार्ट्यांबद्दल बोलतोय मी ] महत्वाचा मुद्दा म्हणजे पालक कोफ्ते करताना ते मिश्रण चांगलं परतून घायचं आहे, अगदी त्याचा गोळा होईस्तोवर आणि पॅन सोडायला लागलं की समजावे ते तयार आहे. हे मिश्रण फ्रिज मध्ये लावावे, (मी आदल्या दिवशी करून रात्रभर फ्रिज ला लावलेले, कोफ्ते करण्या आधी २ तास बाहेर काढले आणि पुन्हा छान मळून घेतले. आपल्या साध्या पोळी सोबत छान लागते पण तवा पराठा असेल तर अजून मज्जा येईल. 2

वाचने 6785
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

यवत जवळच्या हाटीलात आगोबासह ही डिश पहिल्यानदा चाखली तेंव्हाच कायमची मनात जाऊन बसली होती. आज तीच चव तुम्ही परत दिली. धन्यवाद. Calling :- आगोबा मचाणकर.

बर्‍याच वर्षांपूर्वी एका पार्टीत हा पदार्थ खाल्ल्याचे आठवत आहे. पाकृ आवडली आहे करून बघण्यात येईल.