लॉकडाऊन : पहिला दिवस

प्रशांत's picture
प्रशांत in काथ्याकूट
25 Mar 2020 - 12:29 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर्स,

कसे आहात? ... घरातच आहात ना?

कोरोनावर मात करण्यासाठी मा. पंतप्रधान यांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला त्याचा आज पहिला दिवस.
इतर देशात मुख्यता इटली, स्पेन, अमेरीका येथिल परिस्थिती वरुन आपल्याला अंदाज आला असेलच कि किति मोठ संकट आपल्यासमोर आहे.

या काळात काय करावे काय करु नये याबाबत विविध माध्यमातुन आपल्याला माहिती मिळत आहेच यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे बाहेर न पडणे. ही सुचना वारंवार मिळत असुन सुद्धा लोक बाहेर पडतच आहेत म्हणुन आज पासुन २१ दिवस लॉकडाउन घोषित केला आहे. सर्वांना विनंती आहे कि याचे स्वता पालन करा व आपल्या प्रियजनांना पण सांगा.

यावेळी आपण घरात राहुन काय काळजी घेतो, वेळ घालवण्यासाठी काय काय करतो यावर चर्चा येथे करु या.
तसेच व्यायाम, प्रानायम, पाकृ.... याची सुद्धा माहिती

कोरोना विषाणुविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारतीय बनावटीची कोरोना (कोविड १९) टेस्ट किट बनवण्यात मायलॅब कंपनीला यश मिळाले आहे या संशोधनात आपले मिपाकर श्री. शैलेंद्र कवाडे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे त्याबद्दल त्यांची टिम व त्यांना शुभेच्छा.

..

आणि हो.

नववर्षाच्या, पाडव्याच्या शुभेच्छा मंडळी.
इडा पिडा टळो, वैश्विक संकटाशी लढण्याचं बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभो.

- प्रशांत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांतसेठ, लॉकडाऊनचा पहिला दिवसा लै जड चालला आहे. करोनाच्या मेसेजेसनी वात आणलाय.
आज सकाळपासून मिपावरच पडीक आहे. पुस्तकं वाचायला मूड लागत नाही.
ज्या महिला केवळ घरीच असतात. फूल टाईम गृहिणी त्यांच्या वेदना समजायला या लॉकडाऊनने मदत केली.

कुटूंबाला वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. हे लिहावाचायला बरं असतं.

मला पुस्तकांचा पसारा काढावा वाटतोय. आणि उगाच पुन्हा अनुक्रमे लावत बसावे असे वाटतंय.
पण तेही अर्धवटच होईल. काही समजत नै ये. नेमकं काय करावे.

-दिलीप बिरुटे

प्रशांत's picture

25 Mar 2020 - 1:23 pm | प्रशांत

तुम्हि चेस मधे माहिर आहात अशी माहिती मिळाली.

घरच्या सोबत चेस खेळा, मज्जा येईल.

चेसचा एखादा आवडता डाव आठवत असेल तर सांगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 1:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोठ मोठे नेते काय करीत आहेत ते नेटवर पाहात होतो. मा.श्री शरद पवार साहेब लेकी सोबत चेस खेळत असल्याचे व ते जिंकल्याचा व्हीडीयो पाहिला.
संजयजी राऊत हार्मोनियम वाजवत असल्याचे दिसते.

पोरं सकाळपासून कॅरम बोर्डावर आहेत.

चेसचा एखादा आवडता डाव आठवत असेल तर सांगा.

आपले मिपाकर प्रचेतस यांच्याबरोबर मी नेहमी ऑनलाइन चेस खेळतो. ते नेहमी हरतात. मिपावर एकदा स्पर्धेत ते जिंकले तेवढीच त्यांची जिंकल्याची आठवण.
बाकी, आजही त्यांनी डाव लावायला लावला. वजीर मिळाला मला लवकर आणि पुढे ते गलपटले. धन्यवाद प्रचु.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

25 Mar 2020 - 1:31 pm | प्रचेतस

काहीही हं सर =))

अवघड परिस्थिती आहे आणि वाटली त्याहून वेगाने अधिकाधिक अवघड होत चालली आहे.

Nitin Palkar's picture

25 Mar 2020 - 1:24 pm | Nitin Palkar

लॉकडाऊनचा पहिला दिवस.... स्वतःपुरतं सांगायचं तर मी गेले तीन दिवस घराबाहेर पडलोच नाही. दूध घरपोच येतंय, किराणा महिन्याचा भरलेला असल्याने अजून आठ दहा दिवस तरी त्याची काळजी नाहीय. राहता राहिला भाजी पाल्याचा प्रश्न... त्यासाठी उद्या परवा दोघांपैकी (मी किंवा बायको) कुणाला तरी बाहेर पडावं लागेल.
एकवीस दिवस काय करायचं हा प्रश्न नक्की भेडसावतोय.
सध्या नजरेसमोर असलेले पर्याय, उपाय.... पुस्तकं, संगणकावर साठवलेले, तुनळीवर उपलब्ध असलेले जुने चित्रपट, नाटकं, आवडतं संगीत, शब्द कोडी, अंककोडी (अंतर्जालावर उपलब्ध) असलेली हे आहेत. नेटफ्लीक्सच्या वाटेला अजून गेलो नाही.... पत्ते खेळणे हा आणखी एक चांगला उपाय आहे पण त्यासाठी बायकोला पत्ते शिकवावे लागतील आणि तेवढी चिकाटी आता आपल्यात असेल का... हा एक प्रश्न आहे...
'Rest in home is better than Rest in Peace' हे वाक्य अधून मधून स्वतःला आणि जो ऐकेल त्याला सांगायचं. या कठीण काळात 'अंबानीचा डेटा' हा ही एक दिलासाच आहे.
शांत रहाणे, निश्चिंत रहाणे, हे स्वतःला आणि इतरांना सांगत राहणे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'अंबानीचा डेटा' हा ही एक दिलासाच आहे.

नेट स्पीडही वाढलं पाहिजे, तेही गलपटून गेल्यासारखं आहे माझ्याकडे.

काल २१ दिवसाच्या लॉकडाऊनने घोषणेने निराशा आली होती. घरात बसायची सवय नाही.
कसं होईल असा धाक पडला होता. आता परिस्थिती निवळली आहे.

०दिलीप बिरुटे

मजकडे २० एमबीपीएस अमर्यादित इंटरनेट असल्याने हाय डेफिनेशन मध्ये सर्व काही बघता येतंय.

प्रशांत's picture

25 Mar 2020 - 2:07 pm | प्रशांत

२० एमबीपीएस अमर्यादित इंटरनेट पन दोन दिवसात स्पीद मिळात नाहि.

प्रचेतस's picture

25 Mar 2020 - 1:25 pm | प्रचेतस

मोदी अंकलने जरी आजपासून लॉकडाऊन केले असले तरी इथे पिंपरी चिंचवडमध्ये रविवारपासूनच सुरू आहे त्यामुळे सध्या arrow टीव्ही सिरीज बिंज करतोय, हॅरी पॉटर फिल्म सिरीज पुन्हा एकदा बघतोय आणि मारुती चितमपल्ली ह्यांचे चकवाचांदण हे आत्मचरित्र वाचतोय.

प्रशांत's picture

25 Mar 2020 - 1:36 pm | प्रशांत

मी ११ तारखेला फ्रान्स मधुन पळुन आलो, तेव्हा फासुन बेड-रूम मधेच लॉकडाउन आहे.

वर्क फ्रॉम होम सुरु आहे, सकाळी किंवा संध्याकाळी थोडा व्यायाम करतो.

सायकल ट्रेनर वर चढवली आहे आज चालवण्याचा मुहुर्त आहे.

नविन वेब सिरिज सुरु (बघायला) करायचा विचार आहे, अ‍ॅरो नाहि आवडलील, दुसरी कुठली सुचवता का.
एका मित्राने द स्पाय सुचवली..

प्रचेतस's picture

25 Mar 2020 - 1:42 pm | प्रचेतस

बिंज करताना शक्यतो ज्याचे सगळे सीजन्स सम्पले आहेत अशीच सिरीज बघा. तुम्हास सुपरहिरो सिरीज आवडत नाहीत असे दिसते. त्यामुळे प्राईमवर द मेंटालिस्ट ही डिटेक्टिव्ह सिरीज पहा, चांगली आहे.

समीर वैद्य's picture

26 Mar 2020 - 6:31 am | समीर वैद्य

पण जवळपास लॉकडाऊन सदृश परिस्थिती आहे. गेले 2 आठवडे घरूनच काम चालू आहे.

नेटफ्लिक्स वरची "हिटलर्स सर्कल ऑफ एविल" पाहतो आहे सध्या. भारी आहे.

हॉटस्टार वरती "स्पेशल ऑप्स" बघून झाली, ती सुद्धा उत्तम आहे.

लाल गेंडा's picture

26 Mar 2020 - 10:30 am | लाल गेंडा

प्रशान्त असुर बघ वुट वर.
छान आहे.
छोटी आहे बघुन होईल सहज.

लोकांनी आपापले अनुभव लिहावेत. तेवढीच जरा कोंडल्याची भावना कमी होऊ शकेल.

कंजूस's picture

25 Mar 2020 - 1:33 pm | कंजूस

अठरा पुराणे pdf download केली आहेत. त्यात काय लिहिलं आहे वाचतोय.
बरीच पाने वाढीव/प्रक्षिप्त असावीत आठव्या शतकानंतर. कारण मंदिर बांधले हे सापडते. पूर्वी फक्त तीर्थस्नानं होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 1:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचायला कामाला येईल.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

25 Mar 2020 - 4:09 pm | कंजूस

पुराणे pdf download sites
1)
https://vedpuran.net/download-all-ved-and-puran-pdf-hindi-free/

2)public library of india
https://archive.org/details/digitallibraryindia?&sort=-downloads&page=2

3) कल्याण मासिक, गीता प्रेस ,गोरखपूर
https://www.kalyan-gitapress.org/

४) pdf hindi books
https://pdfbooks.ourhindi.com/?s=Puran

सर्व scanned pdf आहेत. काही प्रती चांगल्या असतात. उदाहरणार्थ : देवी भागवत पुराण.

लाल गेंडा's picture

25 Mar 2020 - 2:14 pm | लाल गेंडा

युवल नोआ हरारी यांचं सेपियन्स वाचा.
काही गोष्टी पूर्वीच्याच लिहिल्या आहेत.
पण एकूण विचार करायची दिशा चांगली आहे आणि अभ्यासही बरा आहे.

माझ्या शाळेच्या ग्रूप मधे एक लेख लिहीला. ज्यांच्या ज्यांच्या कडून जे काही शिकलो ते लिहून त्यासाठी आभार मानलेत. बाकीच्या सगळ्यांना ही त्यासाठी उद्यूक्त केलंय तसं लिहीण्यासाठी.
करोनाच्या चिंतना ऐवजी चांगल्या आठवणीत जाईल पुढचे दोन दिवस तरी. लोक लिहीतील असे वाटतय आत्ता तरी.

अमेझॉन पँट्रीपासून सर्वत्र लोकांनी तांदूळ, डाळी, बेसन, गहूपीठ वगैरे माल चाटून पुसून सप्पा केलंनीत. पॅनिक बाईंग.

अर्थात कालचा मा. पंतप्रधानांचा सूर ऐकून ही प्रतिक्रिया अपेक्षित होतीच.

पंतप्रधान ह्यांच्यापेक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती उत्तम तऱ्हेने हाताळली असे म्हणावे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 1:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रिकेटच्या सामन्यानंतर पहिल्यांदा मी आणि माझं कुटुंब मा.पंतप्रधान आज काय धक्का देतील याची प्रतिक्षा करीत होतो.

एकवीस दीवस लॉकडाऊन असे म्हटल्यावर कडू तोंड पडल्याचं फिलींग आलं होतं. आम्ही बर्‍याच वेळ एकमेकांशी बोललो नाही.
हायपर झालोय असे वाटले. बीपीच्या गोळ्या किती शिल्लक आहेत, हाही विचार पहिल्यांदा आला.

नंतर ट्वीट आलं की जीवनावश्यक वस्तू मिळतील, दुकानं उघडी राहतील. पण, भावा भाषणातच सांगायचं ना काय ते.
मरुन जाईल ना एखादा तुमच्या आठ वाजेच्या भाषण धक्क्याने. :(

-दिलीप बिरुटे

भाषणाच्या उत्साहाच्या भरात ते सांगायचं विसरले असावेत.
बाकी काळजी घ्या भो. मिपावर लेख वगैरे लिहा काही.

बीपीच्या गोळ्या किती शिल्लक आहेत, हाही विचार पहिल्यांदा आला.

साठा आधीच आणून ठेवल्या गेल्या आहे. रक्तदाबनियंत्रक, पित्तनाशक, मस्तकशूळनिवारक सर्व काही.

जीवनावश्यक वस्तू मिळतील, दुकानं उघडी राहतील. पण, भावा भाषणातच सांगायचं ना काय ते.
मरुन जाईल ना एखादा तुमच्या आठ वाजेच्या भाषण धक्क्याने. :(

करोनापायी याबाबत तुमच्याशी सहमत व्हावं लागतं यातच विषाणूची भीषणता आली.

तुषार काळभोर's picture

25 Mar 2020 - 1:51 pm | तुषार काळभोर

तरी बहुतेक वेळ टिव्हीवर/ऑनलाईन पिक्चर अन् वेबसिरिज बघण्यातच जाणार.
दोन आठवड्यापूर्वी hotstar च vip सदस्य घेतलय.
त्यावर एक स्पेशल ops sirij aloy ti बघा सिरीज आलीय ती बघायचा विचार करतोय. दोन दिवस त्यात जातील.

अधून मधून काम सुरू आहे. (उत्पादन क्षेत्रातील आयटी मध्ये असल्यामुळे घरून काम करणाऱ्या लोकांना सपोर्ट करावा लागतोय). (लोकांना vpn कनेक्शन पासून ते वेबेक्स कसं कनेक्ट करायचं ते समजावून सांगावं लागतं. तरी हे होईल अशी अपेक्षा असल्यामुळे सगळ्या गोष्टींचे डॉक्युमेंट तयार करून लोकांना पाठवले होते)
दोन प्रोजेक्टची डेड लाईन 31 ला आहे. त्यानंतर लायसन्सची भानगड होईल म्हणून ते काम संपवायचं आहे.

स्पेशल ops संपल्यावर मग कदाचित जॉन विक सिरीज बघेल. त्यात तीन दिवस जातील.

कुमार१'s picture

25 Mar 2020 - 2:25 pm | कुमार१

१. घरकामातील वाटा वाढवला. सकाळचा नाश्ता नेहमीच तयार करतो.
आज काही भांडी घासली.
२. दुधाच्या दुकानातून थोडे खाऊ आणले.

३. भाजीचे दुकान पूर्ण बंद होते. कल्पना होतीच.

५. काल ३ कडधान्ये आणली आहेत. एक आड एक दिवस ती मोड आणायला लावतोय.
६. बातम्या ‘बघत’ नाही. जालावर फक्त मथळे वाचतो.

७. छापील पेपर बंद झाल्याचे दुक्ख एकच – शब्दकोडे पेनाने सोडवता येत नाही. आता जाल्वरून फक्त इंग्रजी anagram सोडवतो.
८. ‘प्राईम’ वर चित्रपट पाहतो – २ दिवस एक पुरवतो. मराठी ‘सोहळा’ चांगला आहे.

प्रशांत's picture

25 Mar 2020 - 2:40 pm | प्रशांत

काल ३ कडधान्ये आणली आहेत. एक आड एक दिवस ती मोड आणायला लावतोय.

बरी आठवण करुन दिलि

अमेझॉनवर राजमा शिल्लक दिसला. सोळा एप्रिल डिलिव्हरी म्हणे. कोणत्या देशातून येणार तो राजमा कोण जाणे.

प्रशांत's picture

25 Mar 2020 - 2:59 pm | प्रशांत

जवळच्या दुकानातुन घ्या हो उगा बाहेर पडु नका

अमेझॉन एक महिना आता त्याचा वापर फक्त व्हिडिओ आणि गाणी यासाठिच करा

मला नाही वाटत 21 दिवस घराबाहेर न पडणे विशेष कठीण जाईल माझ्या सारख्या कायम घरीच असणाऱ्यांसाठी.
आज गुढीपाडवा. गुढी तर उभारायची. घरात आहे त्या सामग्रीतच काम भागवायचे. घराबाहेर पडायचे नाही. मग काय गुढीसाठी घरीच बनवला साखर हार .
मस्त वेळही गेला आणि गुढीही उभारली गेली.

प्रशांत's picture

25 Mar 2020 - 2:43 pm | प्रशांत

मग काय गुढीसाठी घरीच बनवला साखर हार .

बेस्ट.

आधि कल्पना असती तर काहि मिपाकरांनी करुन बघितल असतं

बागेत काही भाजी वाढवणे शक्य आहे का? मेथीचा धागा इथे मागे आला होता.

घरात सामान्यतः उपलब्ध असलेलं काय बीज आहे की त्यातून महिन्याभरात किंवा अधिक जलद काही उगवेल.. ?

कंजूस's picture

25 Mar 2020 - 4:21 pm | कंजूस

होय. शक्य आहे.
पालेभाजीचे बी पाकिट आणून ते लावणे कामाचे नसते आणि आता नर्सरी बंदच राहतील.
पालेभाजीची जुडी/पेंडी मुळे असलेली आणि शक्यतो लहान झाडे असलेली मिळाल्यास ( आता कशीही भाजी मिळणेच दुरापास्त आहे म्हणा.) त्यांचा मुळांकडचा भाग अधिक तीन इंच घेऊन स्वच्छ धुऊन (गोगलगाय शंखांची अंडी असतात ती जातात) मातीत लावा. पहिले आठ दिवस उन्हापासून दूर उजेडात ठेवणे. पाने आल्यावर उन दाखवणे.
या पद्धतीने लाल/हिरवा माठ, अंबाडी , पालक, चुका, चाकवत, मेथी, चवळाई, सहज येते. थंड कोरडी हवा असल्यास कोथिंबीर.

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2020 - 5:57 pm | चौथा कोनाडा

एकानं मला सांगितलं की सब्जा बी (बाजारात मिळतं ते सब्जा पाकिट) कुंडीत टाकल्यास सब्जाची रोपं येतील.
कंजूस साहेब, आज टाकलंय बी कुंडीत, खरंच येईल का सब्जा ?

कंजूस's picture

25 Mar 2020 - 7:00 pm | कंजूस

येतो.
पण आता पुन्हा पाणी घालू नका. दमटपणावर दहा दिवसांनी फार बारीक रोपं उगवतील. तेव्हा चिमण्या वरची पाने खातात. जाळी टाकणे.
बाकी सबजाचे बरेच प्रकार आहेत. एखाद्या ठिकाणी मोठे झाड दिसले तर त्याचे चार इंची शेंडे लावूनही लगेच रोपे होतात.
Bassil परदेशातले वेगळे पण नर्सरिवाले सबजाची रोपेच baddal म्हणून देतात. तरी या पानांचा आपल्या पाककृतीत काय उपयोग होइल ते माहीत नाही. पुदिना/कोथिंबीर प्रमाणे नाही.

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2020 - 2:42 pm | मराठी कथालेखक

जपानची लोकसंख्या १२-१३ कोटी आहे, तर ईटलीची ६ कोटी. जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु होवून खूप दिवस झालेत (एक महिन्यापेक्षा जास्तच) , रुग्णसंख्याही थोडी थोडी वाढते आहे.. आता १२०० पर्यंत पोहोचली. पण तिथे अजूनही लॉक डाऊन नाही. फक्त शाळा बंद आहेत. कमी अधिक प्रमाणात लोक ऑफिसला जात आहेत. ट्रेन वगैरे चालू आहेत.
लॉक डाऊन वा कोणत्याही प्रकारची जोर-जबरदस्ती करता ही परिस्थितीवर नियंत्रण असणं हे जपानचं यश आहे असं मला वाटतं.. अर्थात त्यांनी हे नेमकं कसं साध्य केलं ते मला माहित नाही.

कंजूस's picture

25 Mar 2020 - 4:51 pm | कंजूस

ही दोन वाचणार.

सुबोध खरे's picture

25 Mar 2020 - 6:38 pm | सुबोध खरे

It would be like going on 21 days sailing , cut off from the World ....only water water everywhere . No land could be seen. There was no TV (no internet or mobile anyway)
But this time during this sailing , family is there onboard . Friends are in contact to enjoy the fun. No Rolling Pitching , No sea-Sickness . Fresh & hot food available....So it's faaar better than my naval sailing.

I remember my days on board INS vikrant in 1990. We were to sail for 21 days but returned to harbour after 46 days. There was no touching to any port except for first day to embark and last day to disembark aircrafts and the maintenance stores from Goa 6 hrs each time only.

The only vegetables we were left were potato and yam(suran) for last 15 days.
The atta had small insects and was having a smell of expiry.
The cooks on board Vikrant were genius. They used to put ajwain (अजवायन) and make paranthas to mask the smell.

We used to have tomato soup made from tomato ketchup and corn flour.
But no one could make out.

Of course I was not married.))=((

If you are sea sick god help you. Your semicircular canals are in constant motion. So when you walk on land after coming back, you walk with a gait like drunkard because the brain is perceiving that you are still in motion.(46 days of constant motion in 3 dimensions)

तेंव्हा एवढं काही वाटलं नव्हतं.कदाचित मनाची तयारी होती किंवा जबाबदारी काहीच नव्हती किंवा अगतिकता पण होती.
चारी बाजूला समुद्रच फक्त दिवस रात्री उडणारी विमानं आणि हेलीकॉप्टर पाहणे आणि वैमानिकांशी गप्पा मारणे एवढाच विरंगूळा होता.

चौकटराजा's picture

25 Mar 2020 - 6:39 pm | चौकटराजा

मला अनेक विषयात रस आहे. त्यामुळे मला 21 दिवसांचा फारसा फरक पडणार नाही तो कसा......
मी होटेलमधे खायला जात नाही.
मी देवळात देवदर्शन करायला जात नाही.
मी कोणत्याही ज्येष्ठ नागरिक संघाचा मेम्बर नाही.
मी नुकताच भीमबेटका , ओरछा सहल करून आलो आहे. त्यामुळे प्रवासाची त्रुप्ती अजून सम्पलेली नाही.
मला विनोदाचा कमालीचा सेंस असल्याचे माझी मुलगी म्हणते अर्थात मी घराला सतत हसवीत असतो.
मी सिंथेसायज़र वर गजानन वाटवे यांच्या " मोहुनिया तुज संगे" पासून पहला नशा पहला खुमार असे काहीही वाजवतो. सकाळी भजने वाजवतो.
11 गाण्याचा एकेक असे संग्रह केले आहेत ते ऐकत रोज 35 एक मिनिटे चालतो. त्यात नौशाद, एन दत्ता, मदन्मोहन, ओपी, शंकर जय एस डी सर्व आहेत.
घरात वाटेल ती मदत करतो. मला अतिशय बारीक व उत्तम भाजी चिरता येते. रोज एकदा तरी सर्व टेबले टी पोय ई वरून साबणाचे पाणी फिरविण्याचा अलार्म लावला आहे.
सायंकाळी सर्व जन मिळून रेकोर्ड लावून डान्स करतो.
सर्वात मोठी समाधानाची बाब म्हणजे नेट चालू असल्याने निरानिराळे ख़ास करून टूरिसम ,किल्ले यांचे विडिओ पाहतो
करोना या विषयावरचा कोणत्याही स्पर्श झालेला चैनल किंवा तू नळी वरचा भय पसरवणारा व् बुद्धिभेद करणारा विडिओ सध्या मी क्वारंटाइन मधे पाठवले आहेत।
अध्यात्मिक लेव्हलवर अशी मनाची तैयारी केली आहे की इतकी माणसे जाताहैत त्यात समजा आपला नंबर लागला तर एरवी तो कधीतरी लागणारच आहे ना ?
जगात मी कोणत्याही धर्माला ,देवाला , देवावरच्या विश्वासाला निसर्गापेक्षा मोठा मानीत नाही त्यामुळे धावा ,मन्नत चा प्रश्न आपल्या बाबतीत अज़ाबात येत नाही। माझ्या मते १९१८ नंतर निसर्गाने हे आणलेले एक करेक्शन आहे. त्यात काही जनांची आहुती पड़णे अपरिहार्य आहे. सबब --
अनजाने सायोंका राहोंमे डेरा है
अनदेखी बाहोने हम सबको घेरा है
ये पल उजाला है बाकी अन्धेरा है
ये पल गवाना ना ये पल ही तेरा है। ........ याची दखल घेऊन मजेत दिवस जात आहेत

कंजूस's picture

25 Mar 2020 - 7:57 pm | कंजूस

मी नुकताच भीमबेटका , ओरछा सहल करून आलो आहे. त्यामुळे प्रवासाची त्रुप्ती अजून सम्पलेली नाही.

थोडी इकडे उधळा.

त्या अगोदर लेपाक्षी हम्पी असा चार भागाचा धागा टाकणार आहे.
बाकी इथे एक टाइमपास म्हणून सुचवितो - नीलेश तटकरी यानी अत्यंत वैशिष्य पूर्ण विषय व्ही ब्लॉग साठी निवडला आहे-ड्रायव्हर शेजारी बसून एस टी प्रवास त्यांत आपल्याकडील कशेड़ी ,आम्बा, मालशेज अशा घाटातून आपल्याला चकट फू प्रवास करायला मिळतो, त्यांचे सर्व विडिओ उपलब्ध आहेत, आता या क्षणी मी चिपलूण गुहागर प्रवासात आहे ! (??)

लेपाक्षी हम्पी लवकर टाका.

ड्रायव्हर शेजारी बसून एस टी प्रवास

म्हणजे पुढचे दृष्य १८० अंशात पूर्ण बघायचे हा हेतू असेल तर महाराष्ट्र लाल एसटीत गुन्हा आहे. इतर सेमी लक्शरीत पुढे एक कंडक्टर सीट असते तिथे एकास बसता येते.
पण हे सर्व आणि अधिकृत उत्तम अनुभव आम्ही आताच्या दोन कर्नाटक ट्रिपात घेतला. रेड् बस (= कर्नाटक एसटी)मध्ये पुढे आठ सीट्सवरच्या लोकांना हा अनुभव मिळतो. शिवाय तो भाग खूप स्वच्छ असतो.( लाल केलेला नसतो.)एकदा एक ड्रायवर गपिष्ट होता.
बस सुरू करण्या अगोदर ड्रायवर पुढच्या काचेवर पाणी शिंपडणार, मग एक वर्तमानपत्र घेऊन अगदी निगुतीने स्वच्छ करणार. चकचकीत करणार. मग बस काढणार. एंजिनचाही फार आवाज नाही किंवा गिअर बॉक्समधूनही घाबरवणारे ध्वनि नाहीत. कडेला डावीकडे आरशाच्या कोपऱ्यात एक मोठी नळवालीपंधरा लिटर्सची पाण्याची बरणी ठेवलेली. एकदम प्रसन्न. आम्ही पुढेच बसतो.

आम्हाला मागील मंगळवार पासून सुट्या आहेत. तीन चार दिवस ऑफिस मधील कामे केली. आता निम्मा वेळ घरात सौ ना मदतीत जातो. काल श्री. भैरप्पा यांची आवरण कादंबरी वाचायला घेतली. कालच संपवली. भावाने नारायण धारप यांची काही जुनी पुस्तके पाठवली, आता ती वाचणार.

प्रचेतस's picture

25 Mar 2020 - 7:28 pm | प्रचेतस

आवरण जबरदस्त कादंबरी आहे.
भैरप्पांची 'सार्थ' ही कादंबरी पण आवर्जून वाचा असे सुचवतो.

प्रचेतससाठी
नागझिरा अनुभव

प्रचेतस's picture

25 Mar 2020 - 8:15 pm | प्रचेतस

व्वा..लेख मस्त आहे एकदम.
पण सालं नागझिरा दौरा आता रद्द होईल असे वाटतेय.

तेजस आठवले's picture

25 Mar 2020 - 7:59 pm | तेजस आठवले

घरून काम चालू आहे. पण २४ तास सगळी डोकी घरातच असल्याने मानसिक थकवा फार लवकर येतोय.
ह्या ३ आठवड्यात प्रदूषण किती कमी होईल ह्याचा विचार करून मनाला बरं वाटतंय.
पुस्तकं वाचतोय एकीकडे पण मूड लागत नाहीये. घरात लहान बाळ आहे, तिला दात येतायत आणि चिडचिड करतेय, त्यातच हवा विचित्र झाल्याने आणि उष्मा एकदम प्रचंड वाढल्याने तिला थोडा ताप वाटतोय. ह्या गोष्टीचे सगळ्यात जास्त टेन्शन आहे.
आमच्या कडे आज एकही दुकान उघडले नव्हते. काल आणि आज दूध मिळाले नाही. मुलीला पावडरचे दूध पाजतोय सध्या. परिस्थिती सुधारेल अशी आशा ठेवून आहे.

सुबोध खरे's picture

25 Mar 2020 - 8:02 pm | सुबोध खरे

घरातच स्थानबद्ध राहण्याच्या अशा स्थितीचा कुणालाच अनुभव नसल्याने लोकांची मने सैरभैर झाली आहेत.

अशी स्थिती मी लष्करात बऱ्याच वेळेस अनुभवली असल्याने यातून आपले मन काय स्थितीतून जाईल याचा एक आढावा घेत आहे.

अशा कठीण पेचप्रसंगात सुरुवातीला माणसाला
१) धक्का(shock) बसतो. हे असे का झाले हे समजत नाही. किंकर्तव्य विमूढता येते( काय करावे कळत नाही. यात मानसिक तणावाची भर पडते.त्यात स्त्रियांना आपल्या मुलाची नवऱ्याची काळजी वाटत असते तर पुरुषांना आपल्या आर्थिक नुकसानीची आणि कुटुंबाची वाताहत होण्याची भीती वाटत असते.

त्यानंतर
२)राग( anger) येतो. पण हा राग कुणावर काढायचा हे समजत नसते. नशिबावर कि राज्यकर्त्यांवर कि चीन देशावर किंवा त्यांच्या नागरिकांवर

३) विरोध( acceptance) यानंतर माणसाचे मन बदलाला विरोध करते. यामुळेच काहि माणसे हा बंदी हुकूम मोडून मी रस्त्यावर फिरणारच म्हणून आडमुठेपणा दाखवतात. काही जणांना यात वैफल्य(FRUSTRATION) पण येऊ शकते.

४) स्वीकार (acceptance) काही काळ गेल्यावर माणसाचे मन या बदलाला स्वीकारते. बऱ्याच वेळेस तुमचे मन सारासार विचार करून एका निर्णयाप्रत येते तर काही वेळेस उपाय नाही म्हणून(resolving to fate)

५)आशा/ जखम भरणे (hope/healing ) एकदा हा बदल स्वीकारला कि मानवी मनाला उभारी येते आणि परत आशेची पालवी फुटू लागते. मन परत आशादायी होऊ लागते आणि आपल्या जखमेची भरपाई सुरु करते आणि शेवटी संकट दूर होते किंवा मानवी मन आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारते.

अशी स्थिती माणसांची स्वतःला किंवा जवळच्या माणसाला दुर्धर आजार झाला किंवा एखादे भयानक संकट आले तरी होते.

अर्थात या पाच स्थिती एकामागोमाग एक अशाच येतात असे नाही तर एकाच वेळेस धक्का आणि राग किंवा धक्का राग आणि विरोध या दोन किंवा तीन स्थिती एकत्रही दिसू शकतात. किंवा आशादायी असणारे मन परत निराश होऊ शकते किंवा परत संताप होऊ शकतो.

याला मानसशास्त्रात SARAH मॉडेल म्हणतात SHOCK, ANGER,RESISTANCE, ACCEPTANCE आणि शेवटी HOPE/HEALING
आपण थोडे आत्मपरीक्षण केले तर आपल्याला आपले मन कोणत्या स्थितीत आहे हे समजून घेता येईल. आणि मग आपण करत असलेल्या विचित्र वागणुकीची संगती लावणे सोपे जाईल .

आपल्या नवऱ्या किंवा बायकोवर किंवा मुलांवर चिडचिड करणे, रडावेसे वाटणे, उदास वाटणे, एकदाच संपवून टाकावे असा विचार येणे (यात अगोदर मानसिक आजार असेल तर आत्महत्येचे विचारही मनात येतात).

अशा वेळेस आपले मानसिक तणाव कुणाला तरी बोलून दाखवावे असे स्त्रियांना वाटते तर पुरुष जास्त गप्प होतात.

अशा स्थितीत कुणाला तरी बोलून दाखल्याने आपल्या मनाचा निचरा(CATHARSIS) होतो. जसे सासू देवळात बसून आपल्या मैत्रिणीला सुनेचे गार्हाणे सांगत असते त्याने निष्पन्न काहीही होत नाही परंतु सासूचे मन हलके होते.

असे विचार मनात येत असतील तर आपण काम करत असताना देवाचे/आपल्या गुरूंचे/इष्टदेवतांचे नाव घ्यावे( आपण आस्तिक असलात तर) किंवा आपल्या गत आयुष्यात झालेल्या सुंदर गोष्टींच्या आठवणी काढत राहावे उदा. आपल्या बाळाचे लहानपण, शाळेतील मित्रमैत्रिणींबरोबर केलेली मौजमजा, आपल्या विवाहाच्या अगोदरचे किंवा त्याकाळचे दिवस आठवून पहा.

एकदा करून पहा तुम्हाला त्या वेळच्या बारीक बारीक किती गोष्टी आठवतील. याने आपले मन बरेच हलके होते.

हे संकट नक्कीच जाणारे आहे. फक्त त्यातून जाताना होणार त्रास हा ज्याचा त्याने सोसायचा आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Mar 2020 - 10:00 pm | अनिरुद्ध.वैद्य

बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा वर! आमचं वर्क फ्रॉम होम सुरुय! सो नेहमीप्रमाणेच रुटीन!

फुटूवाला's picture

26 Mar 2020 - 12:21 am | फुटूवाला

घरी थांबणे माझ्यासाठी नवीन नाही. मी वर्षभरातले जास्तीत जास्त ८०-९० दिवस लग्नसमारंभात बाहेर असतो. त्यानंतर घरी मी माझं एक डिजाईन युनिट सेटअप केलंय. ज्यावर मी अल्बम डिझाईनचे काम करतो.
आता फरक इतकाच आहे कि इतर वेळी मी संध्याकाळी दोन तीन तास कामानिमित्त, विरंगुळा म्हणून बाहेर जायचो मुख्य मार्केट ला. आता ते बंद झालं. आता काम तर नाहीच पण लोडशेडिंग चालू आहे. गेल्या महिनाभरात दररोज ३-४ तास लोडशेडिंग होती. आता ६-७ तास लाईट जातेय याचा खूप वैताग येतोय.
बाकी सगळं जैसे थे. भाजीपाला मिळतोच. दूध घरापर्यंत येत. आता ईश्वरचरणी प्रार्थना आहे कि खरच १४ एप्रिल ला संपून १५ एप्रिल पासून मोकळीक मिळावी. नाहीतर ज्या लगनसराईची वर्षभर वाट पाहतो ती हातून निसटायची भीती आहे.

शैलेंद्र -खूप खूप अभिनंदन आणि कौतुक__/\__

घरी सगळ्यांचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. दोन्ही मुलींच्या शाळा ऑनलाईन आहेत. अगदी नेहमीच्या वेळापत्रकानुसार त्यांचे वर्ग, अभ्यास सुरु आहे. सकाळी जेवणाच्या ब्रेक मधे सगळे एकत्र असतो हा एक वेगळाच अनुभव.
आम्ही पुढचे एकवीस दिवस नव्हे तर अजून बरेच दिवस / महिने घरात राहावं लागणार याची मानसिक तयारी केली आहे. घरात कणीक, तांदूळ आणि डाळी भरपूर आहे फक्त आता भाज्या आणि दुधाची काळजी आहे. दुकाने सुरु आहेत पण त्या गर्दीमध्ये जाणं कटाक्षाने टाळतोय. घरपोच सेवा आहे मदतीला पण त्याचे टाइम स्लॉट्स मिळणे दुरापास्त होऊन बसलेय. लोकांनी गेल्या महिन्याभरात इतकी वेड्यासारखी खरेदी केली कि सुपरमार्केट्स ना सगळ्यांना पुरवठा करण्यात नाकी नऊ येताहेत. आता त्यांनी वस्तूंच्या विक्रीवर लिमिट घातलीय. एखादि गोष्ट एका व्यक्तीला फक्त दोन किंवा तीनच्याच संख्येने विकत घेता येतील. हे अतिशय योग्य पाऊल आहे.
घरात भाज्या, दूध नियमित यायला लागले कि घरी बसून राहण्याचा फारसा प्रॉब्लेम नाही. हळूहळू गाडी रुळावर येईल.
विकांताला रात्री नेटफ्लिक्स वर एखादा चित्रपट आणि वीकडेज मधे एखादी सिरीज बघतोय. सध्या ' द अमेरीकन्स' नावाची मालिका सुरु आहे.

सुट्टी असल्याने घरातली इतकी कामं करता येतील पण उत्साहचं वाटत नाहीए, झोप खूप येते आहे.
पण एखादी भाषा शिकणार आहे.

चौकटराजा's picture

26 Mar 2020 - 9:22 am | चौकटराजा

प्रतिलिपी नावाचे एक अ‍ॅप सापडले आहे त्यावर आजच्या तरूणाईने लिहिलेल्या अनेक प्रकारच्या कथा आहेत . त्यातील नुकतीच " ईन्सेप्शन " ही गूढ कथा वाचली.

चौकटराजा's picture

26 Mar 2020 - 9:28 am | चौकटराजा

बाहेर वडापाव ई पटकन मिळत असल्याने तोच खायची सवय झाली होती. नुकतेच घरी बटाटे वडे केले अन इतके दिवस आपण बाहेरचे किती थर्डक्लास वडे रुचकर मानून खात होतो याचा प्रत्यय आला. घरी केलेली मिसळ ही बाहेर पेक्शा उत्तम होत आहे ! आता पाव मात्र मिळेनासे झालेत.

चौकस२१२'s picture

26 Mar 2020 - 9:37 am | चौकस२१२

गड्डा झब्बू , बदाम सात, पाच तीन दोन, ३०४ हे खेळ आंतरजालावर उपलब्ध आहेत का? जिथे अपरिचितांशी खेळता येईल!

प्रचेतस's picture

26 Mar 2020 - 9:50 am | प्रचेतस

३०४ लै जबरदस्त आहे, जाम मजा येते. गोटूला ३०, नव्वीला २०, एक्क्याला ११ आणि राजा राणीला ३ व २, त्यात मॅरेजेस.

अमिताभ - गड्डा झाब्बू
सचिन तेन्डूलकर - लॅडिस
सचिन पिळगावकर - पाच तीन दोन
विराट कोह्ली - भिकार सावकार
सलमान - डाव लावणे
मुकेश अम्बानी - मेंढी कोट
राहुल व मम्मी - तीन पत्ती
मोदी - फक्त पत्ते पिसणे
शरद .अजित सुप्रिया पवार ------ बदाम सात

चौकटराजा's picture

26 Mar 2020 - 10:24 am | चौकटराजा

कोणता तरी एक पत्ता अडवून धरणे यात माहीर !

मिपावर पूर्वी एका धाग्यात पत्यांतील गोल्फ नावाच्या खेळाची माहिती दिली होती. हा फार मनोरंजक खेळ आहे. सापडला धागा तर खेळ अवश्य ट्राय करावा. आत्ता लिंक हाताशी नाही. एका युट्युब चॅनेलविषयी धागा आहे.

स्वलिखित's picture

26 Mar 2020 - 10:31 am | स्वलिखित

कमाल आहे , मिपाकरानी कोरोना ला अजुन मिपाचे नाव दिले नाही....

आॅफिस मधील कलिगची मुलगी फ्रान्सवरून

15-16 तारखेला आली , तिची कोरोना टेस्ट निगेटीव्ह होती, कलिग आॅफिसला येत होती,हे आम्हाला चारपाच दिवसांनी कळाले त्यामुळे डोक्यात शंका वळवळू लागल्या. अजूनही टेन्शन आहे. तिने असे कसे केले. आॅफिसला यायला नको होते असे वाटते.

उपेक्षित's picture

26 Mar 2020 - 7:57 pm | उपेक्षित

काल गुढीपाडवा होता पण लॉकडाऊनमुळे तसा मूड नव्हता पण सर्वांचे मनोधैर्य टिकवणे आणि सकारात्मक वातावरण टिकवणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन असूनही माणसे मुर्खासारखी वागत आहेत म्हणून डोक्यात एक किडा आला तसाही वेळ होता आणि चैत्रपाडव्याचा मुहूर्तही होता म्हणून आमच्या बायडीचा एक विडीयो काढून टाकला सामाजिक संदेशपर.

https://youtu.be/xkM0EFuYg3k

गणेशा's picture

14 May 2020 - 8:46 pm | गणेशा

मायलॅब ला सलाम..
सिरम ने त्यांना नंतर अर्थ पुरवठा केला आहे जास्त असे ऐकण्यात आले..
----
बाकी कोसारा मध्येच का आले कोणी सांगेल का..

बाकी या धाग्याबरोबर आम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व धागे वाचले..

आभार