पावभाजी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2020 - 6:11 am

घरात पावभाजी चा बेत असल्याने जोशीकाकूंच्या लक्षात येतेकी पावाची लादी घेण्यास त्या विसरल्या आहेत
लगबगीने त्या समोरच्या जनरल स्टोअर मध्ये गेल्या व पाव लादी व दुधाची पिशवी आदी किरकोळ खरेदी केली
दुकानदाराने ते सामान पातळ प्ल्यास्टीक च्या पिशवीत भरले व काकूंना दिले
बाजूलाच भाजेवाला असल्याने त्यांनी भाजी खरेदी केली व पिशवीत भरली व सॊसायटी कडे त्या निघाल्या
वाटेत वजन जास्त झाल्याने प्ल्यास्टीक ची पिशवी फाटली अन पावाची लादिने जमिनीकडे झेप घेतला पण जोशी काकूने चपळाईने पाव पडू दिला नाही अन सारे सामान छातीशी पकडत घर गाठले -
मात्र यावेळी पावभाजीचा बेत असल्याने जोशी काकूंनी न विसरता पिशवी नेली अन सामान आणले
त्यांना मागचा प्रसंग आठवला व आज पिशवी आणली याचा आनंद झाला अन त्याच्या ओठावर गाणे आले
"आजकल पाव जमींपर नहीं पड़ते मेरे " असे त्या आपल्याच तंद्रीत गाऊ लागल्या
सोसायटीच्या गेटवर रानडे काका व पाठक काका उभे होते
कोण उभे असावे म्हणून जोशी काकू -आजकल पाव जमींपर नहीं पड़ते मेरे गुणगुणत रानडेकाका कडे पाहात त्या सोसायटीत शिरल्या
पाठक काका सूचक हास्य करत रानडे काका कडे बघत होते
त्या छद्मी हास्यांचा अर्थ समजल्या मुळे व हा पाठक मुलखाचा वाचाळ व पाचकणारा असल्याने व हे रानडे काकूंच्या कानावर गेले तर संभाव्य महाभारताचा अंदाज आल्याने रानडे काकांचे
पाव लटपटू लागले

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

18 Mar 2020 - 2:17 pm | प्रसाद_१९८२

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2020 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या.

०दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

19 Mar 2020 - 5:21 pm | गामा पैलवान

संभाव्य महाभारताचा अंदाज आल्याने रानडे काकांचे पाव लटपटू लागले.

पुढची इष्टोरी ऐका तर ....

पाव इतके लटपटू लागले की त्यांचे लादीपावासारखे दोन अवयव धाडकन जमिनीवर आपटले. आणि काकांना त्या दोन लादीपावांच्या दरम्यान भाजीचं अस्तित्व जाणवू लागलं.

अशा रीतीने साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2020 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असा एक विभाग सुरु करायला हवा.

-दिलीप बिरुटे
'बाहेरच्या जगात तुमच्या माझ्यावाचून कोणाचे काहीही अडलेले नाही, नीट घरी राहा. करोना विषाणु पासून दूर राहा'