सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


खुलं मैदान

Primary tabs

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
30 Jul 2019 - 12:58 pm

एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे.
"साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली?

"बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो.
"गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला.
"गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात."

"चिअर्स" बाटल्या धडकवत आम्ही आरंभ केला. कधीतरीच प्यावी पण मोकळ्या मैदानात प्यावी अशी जाम ईच्छा होती. त्यात रमाकांत बऱ्याच दिवसांनी भेटला. एवढा सज्जन माणूस पितो म्हटल्यावर आम्हास कोण आनंद झाला. नाहीतर शाळेत असताना तो एका हुशार विद्यार्थ्याचं शेपूट म्हणूनंच मिरवत होता. आता मात्र तो खूप बदलला असं वाटत तरी होतं.

"तुला ती रश्मी माहित्येय का? आपला जाम जीव होता तिच्यावर.." जवळपास आरधी बाटली संफवल्यावर मी विसय काढला.
हा म्हायतीये ना. तो म्हणाला. जाम लफडी केलि तीनं म्हणाला. कॉलेचला गेली आणि नापासच झाली म्हणाला. दोन खाली पण केली आसं पन म्हणाला.

"सिग्गारेट दे.." आसं मी म्हाणालो. जाम चढलीय तुला, आस़ तो म्हणाला.
होता है यारर..
वारा पण पिल्यासारखा झोकांड्या खात वाहात होता.

तुझी बाटली आरधीच.. आसं मी म्हणालो. चल घे कश मार..

साली छिनाल. दोनदा खाली म्हणजे काय चेष्टा?

तू काय पहिल्यांदा पितोय काय रे. एवढी चढली तुला. रमाकांत घोट घेत बोलला.

नाय रे.. मी म्हणालो. मला आजिबात चढलि नाही. तूच थोडा वकडावाकडक बोलतोय.

बघ आकाशात किती छान चंद्रप्रकाश पडलाय. तो बोलला.

हा ना राव. मि म्हणालो, तुला म्हायतीये, इथं फलिकडं एक पडका वाडा हाय. तिथं एक बाई मेलीय. तिचं भूत इकडं फिरतं.

दोघं खदाखदा हसलो. ..

रमाकांत काय आता भेकडी बाई राहिला नाही.

बाटली संपवली आणि उभा राहिलो. बाटली लांब फेकून दिली.

रमाकांत म्हणाला, ती बाई तुझ्या पाठीशी उभी आहे.

पुन्हा दोघे खदाखदा हासलो. साल्याचे फालतू आनी बाळबोध जोक!

रमाकांतनं बाटली संपवली. मग जोरदार कश मारला. म्हणाला, कुठाय तो वाडा? जाऊ.
म्हणलं भोसडीच्या, खरंच तिथं कुणी आसलं तरं.

तो वैतागला. गाडीला किक मारत म्हणाला, भुतखेतं नसतात बे..

अबे, साडेअकरा वाजल्या चल आता घरी जाऊ. मी म्हणालो.

पण तो गेला. दूरवर जाऊन त्यानं गाडी थांबवली. गेट उघडल्याचा आवाज आख्खा माळावर चिरकत गेला.

चंद्रप्रकाश छान पडला होता. माळावर मी एकटाच उभा होतो. गार वार सुटलं होतं. जरावेळाने पुन्हा तोच गेटचा आवाज घुमला. आणि कसल्याशा अनामिक भितीनं मी गारठून गेलो.

गाडी घेऊन रमाकांत माझ्याकडे आला. उतरत म्हणाला, घंटा भेंचोद, तिथं कुणीच नाही.

आणि तो एकटाच खदाखदा हसत सुटला.

मध्येच थांबत तो म्हणाला, तू ना खरंच एक भेकडी बाई आहेस.

मी काहीच बोललो नाही. गप्पच बसलो. मला ते फारंच लागलं.
बसं आता याचं शेपूट बनून मिरवणं मी तिथेच कॅन्सल करून टाकलं.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

30 Jul 2019 - 3:53 pm | मास्टरमाईन्ड

तुमची नवीन कथा.
पण समजली नाही.

जॉनविक्क's picture

30 Jul 2019 - 5:02 pm | जॉनविक्क

सत्यकथा वाटत आहे

श्वेता२४'s picture

30 Jul 2019 - 10:56 pm | श्वेता२४

कुणाला समजलं तर स्पष्ट करा.

तुषार काळभोर's picture

31 Jul 2019 - 7:40 am | तुषार काळभोर

"रमाकांत"
??

प्रचेतस's picture

31 Jul 2019 - 8:23 am | प्रचेतस

जव्हेरगंज टच.
मस्त.

मित्रहो's picture

31 Jul 2019 - 7:29 pm | मित्रहो

कथा समजली नाही

लोथार मथायस's picture

1 Aug 2019 - 12:24 am | लोथार मथायस

कथा कळाली नाही

गड्डा झब्बू's picture

1 Aug 2019 - 1:34 am | गड्डा झब्बू

कैच्या काही...

चांदणे संदीप's picture

1 Aug 2019 - 8:18 am | चांदणे संदीप

प्यायच्या आधी नि पिल्यानंतर असं काहीसं आहे. अशाच आशयाची एक कविता व्हाट्ॲपच्या आधी मेलच्या जमान्यात वाचलेली. पण हे भारीय. :)

Sandy

उपेक्षित's picture

9 Aug 2019 - 7:53 pm | उपेक्षित

डोस्क्यावरून गेली कथा, कुणीतरी इस्काटून सांगाना राव.

अजिंक्यराव पाटील's picture

27 Jan 2020 - 6:03 pm | अजिंक्यराव पाटील

स्किझोफ्रेनिया ?