बुलेट ट्रेन ची गरज आणि आम्ही !

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
4 Dec 2019 - 9:30 pm
गाभा: 

E

२००९ साली औरंगाबाद आणि जालन्याचे काही उद्योजक चीन भेटीला गेले होते. त्यात मी देखील होतो. बीजिंग शांघाय गुनझावच इन्फ्रास्ट्रक्चर बघून आमचे डोळे अक्षरशः फाटले होते.

चीनच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांची बुलेट ट्रेन हा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे. जी, डी आणि सी नावाने रोज धावणाऱ्या २८०० बुलेट ट्रेन्स आहेत ज्या रोज ५५० शहरांना ३४ पैकी ३३ प्रॉव्हिन्समध्ये कनेक्ट करतात. बीजिंग शांघाय हे १३१८ किलोमीटरचे अंतर तुम्ही केवळ साडे चार तासात कव्हर करता. वूहानचे बुलेट ट्रेन मेन्टेन्स शेड तर अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार आहे. २९००० किलोमीटर्सचे बुलेट ट्रेन जाळे आहे आणि २४४० किलोमीटर लांबी असलेली जगातली सर्वात मोठी बुलेट ट्रेन बीजिंग ते हाँगकाँग दरम्यान धावते. चीनची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यांचा रेशीयो काढला तर आपल्या देशात एव्हाना २५०० बुलेट ट्रेन धावायला पाहिजे होत्या. २५०० जाऊ देत पण किमान १०० तरी धावायला हव्या होत्या.

भारत आणि चीनचा प्रवास एकाच कालखंडात सुरू झालेला. ते कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत? पूर, शेतमाल नुकसान, गरिबी, असाक्षरता असे प्रॉब्लेम त्यांना नसतील का? असतीलच, आहेतच. टोकाची गरिबी आणि अति श्रीमंती त्यांच्याकडे पण आहे. पण असे असतांना देशाची प्रगती कशी होईल ह्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. ह्या प्रोजेक्टचा पैसा त्या प्रोजेक्टला मग त्या प्रोजेक्टचा पैसा अजून तिसऱ्याच प्रोजेक्टला असे केले की सगळे प्रोजेक्ट बोंबलतात. चीनसारखी लोकशाही आपल्याला नकोच पण कंट्री फर्स्ट हे रुजवायला लागणार आहे आपल्याला.

मुंबईची खरी गरज ते शहर किमान पन्नास टक्के रिकामे कसे होईल हे बघणे अशी आहे. ते कोणी करू शकेल असे मला वाटत नाही. मग अश्या परिस्थितीत येणारी लोक मुक्काम करणार नाहीत इतके तर नक्की बघता येईल आपल्याला.

आपल्या पॉलिसीज बघता जगाला ब्रेन सप्लाय करणारा हा आपला देश एक दिवस अश्या ब्रेनड्रेनच्या भीषण गर्तेत अडकेल की त्यातून बाहेर यायला दोन चार पिढ्या खपवाव्या लागतील. माझा एक अमेरिकन मित्र ( ओरिजिनल, एनआरआय नाही ) मला २०१० साली म्हणाला होता, चीन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अमेरिकेच्या पन्नास वर्षे पुढे आहे. त्या हिशोबाने ते आपल्या किती पुढे असतील? घाला बोटे आणि मोजा.

एकंदर काय तर #औघड_आहे_आपले

बाय द वे,

१.कोणतेही सरकार बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बंद करू शकते, त्या प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वापरू शकत नाही.

२. गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायलाच हवी ह्यावर माझी संपूर्ण सहमती आहे.

३. फोटो, अंतरजालातून

साभार >> हर्षद शामकांत बर्वे, पुणे

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

4 Dec 2019 - 9:58 pm | श्रीरंग_जोशी

>> १.कोणतेही सरकार बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बंद करू शकते, त्या प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वापरू शकत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारलाही या प्रकल्पाच्या खर्चाचा (किंवा कर्जाचा) वाटा उचलायचा आहे. जर सरकारला हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पांढरा हत्ती वाटत असेल तर त्यातून अंग काढून तो निधी (कर्ज असल्यास भविष्यातली कर्जाची परतफेड करायला लागणारा निधी) इतर कुठल्याही अधिक महत्त्वाच्या गरजेसाठी / प्रकल्पासाठी वापरता येईल.

अवांतर - मिपावर या विषयावर चर्चा झाली असता, इतर कुणाची चेपू पोस्ट च्योप्य पस्ते करून नवा चर्चेचा धागा टाकण्याऐवजी जुन्या चर्चेच्या धाग्यावर नवी प्रतिक्रिया लिहिण्याचा पर्याय मी निवडला असता.

पाटीलबाबा's picture

5 Dec 2019 - 2:20 am | पाटीलबाबा

बुलेट ट्रेन साठी लागणारा शंभर कोटी रुपये खर्च हा जपान सरकार करणार असुन ते कर्ज भारत सरकार 50%,गुजरात25%,महाराष्ट्र25%अशी फेड करणार आहे.
हे कर्ज २० वर्षा नंतर फेडी साठी लागू होणार असून त्याचा व्याजदर 0.1असा आहे.
बुलेट ट्रेन निर्माण करणारी कंपनी हिच्या ताब्यात हा सर्व पैसा असणार आहे. त्या मुळे कुठल्याही सरकार च्या ताब्यात एक छदाम ही येनार नाही.
म्हणून तो पैसा इतरत्र वापरण्याचा प्रश्न च येत नाही.

100 करोड नाही तो 1 लाख 10 हजार करोड आहे : )
https://m.timesofindia.com/city/mumbai/uddhav-puts-brakes-on-bullet-trains

रमेश आठवले's picture

5 Dec 2019 - 6:16 am | रमेश आठवले

सध्याच्या त्रांगड महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी केंद्र सरकार कडेच भीक मागावी लागणार आहे.

तशी गरज कोणत्याच सुधारणांची नसते. ती त्या सुधारणा प्रत्यक्षात आल्यानंतर त्या गरजेची जाणीव निर्माण होते.

चंद्रावर जायची तरी तशी काय गरज आहे? आकाशात सॅटेलाईट सोडायची तरी काय गरज आहे? निरनीराळी औषधे प्रतीजैविके यांची तरी कय गरज होती. लोक तसेही रहात असतताच की. पण सुधारणा / नवी टेक्नॉलॉजी आल्या नंतर जीवन सुखकर होते. अर्थव्यस्थेला चालना मिळते. लोकांची निर्मीती क्षमता वाढते.
टीव्ही सिनेमा यांची तरी काय गरज होती. लोक जत्रेत खेळ खेळून मनोरंजन करायचेच की.

वामन देशमुख's picture

5 Dec 2019 - 6:13 pm | वामन देशमुख

तशी गरज कोणत्याच सुधारणांची नसते. ती त्या सुधारणा प्रत्यक्षात आल्यानंतर त्या गरजेची जाणीव निर्माण होते.

अगदी खरं बोललात!

जॉनविक्क's picture

5 Dec 2019 - 11:02 pm | जॉनविक्क

चंचलता हा स्वभावधर्म आहे, त्याच त्या गोष्टी तुम्ही रमुच शकत नाही त्यामुळं बदल व प्रगती होतच राहते

तशी गरज कोणत्याच सुधारणांची नसते. ती त्या सुधारणा प्रत्यक्षात आल्यानंतर त्या गरजेची जाणीव निर्माण होते.

हजारों कोटींचा खर्च करून, उभारलेल्या
सरदार पटेल यांच्या पुतळ्याबाबतीत पण , हेच लॉजिक लावावं काय ?

प्रदीप's picture

6 Dec 2019 - 11:04 am | प्रदीप

पर्फेक्ट बोललात, विजूभाऊ.

गुजराती रवी's picture

2 Jan 2020 - 5:17 pm | गुजराती रवी

सत्य वचन

मुक्त विहारि's picture

5 Dec 2019 - 8:24 pm | मुक्त विहारि

दळणवळण जितक्या लवकर होईल तितके उत्तम.

मग ह्यात संदेशवहन पण आलेच.

उद्या युद्धाच्या वेळी पॅसेंजरने सैनिक आणि रसद पुरवठा करणार? का बुलेट ट्रेनने?

जॉनविक्क's picture

5 Dec 2019 - 11:04 pm | जॉनविक्क

:D XD xd XD =))

अन चीनला कर्ज सुध्दादेउ.

असो. ..

पाटीलबाबा's picture

5 Dec 2019 - 8:32 pm | पाटीलबाबा

ट्र म्प साहेब, आकडा चुकला क्षमस्व!
दुरुस्ती बद्दल आभार!!

धर्मराजमुटके's picture

6 Dec 2019 - 8:55 am | धर्मराजमुटके

बुलेट ट्रेनची गरज कोणाला आहे ? भाजपाला आणि समर्थकांना !
बुलेट ट्रेनची गरज कोणाला नाही ? बाकी सर्व पक्षांना आणि त्यांच्या समर्थकांना !
बुलेट ट्रेन मधे बसून गुजराती मुंबई वर राज्य करणार असले मौलिक विचार सकाळ, मटा सारख्या वर्तमानपत्रात ऑनलाईन वाचक लिहितात. जणू काही बुलेट ट्रेनचे तिकिट देताना तुम्ही गुजराती असल्याचे प्रमाणपत्र मागणार आहेत.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 9:31 am | मुक्त विहारि

एक नंबर. ...

बुलेट ट्रेनला माझा केवळ एकाच कारणाने विरोध होता तो म्हणजे ज्या राज्यात दुचाकी चालवण्याच्या लायकीचे देखील रस्ते नाहीत तिथे बुलेट ट्रेन धावणे म्हणजे चेष्टा झाली. जसा बुलेट ट्रेनवर खर्च केला जाणार आहे तसाच तो राज्याच्या रस्त्यांवर देखील व्हावा. बुलेट ट्रेन ची जितकी गरज आहे तितकची किंवा त्यापेक्षा जास्त रस्त्यांची देखील गरज आहेच.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कि घुँघरू टूट गये... :- War

बुलेट ट्रेन अत्यावश्यक आहे.

1. वेगवान वाहतूक.

2. कमी लागणारी खनिज संपत्ती.

3. रस्त्यांच्या तुलनेत, कमी देखभाल खर्च.

रस्त्ये उत्तम हवेत हा तुमचा मुद्दा रास्त आहे. पण रस्ता, रेल्वे, जलवाहतूक आणि विमान वाहतूक, अशी तुलना होऊच शकत नाही.

शिर्डीला जर विमानतळ बांधू शकतात तर बुलेट ट्रेन का नको?

भारताला जर आर्थिक दृष्ट्या बलवान करायचे असेल आणि संरक्षण दृष्टीने दळणवळण करायचे असेल तर, बुलेट ट्रेन हवीच.

ज्या देशात प्राथमिक उपचाराची सुविधा नाही जेथे कुपोषण, संसर्गजन्य रोगांमुळे, मलेरिया, क्षयरोग यामुळे लोक मरतात.

त्या देशात कोणत्याही रुग्णालयाची काय गरज आहे?

सर्व रुग्णालये मोडित काढून तो पैसे गावोगाव प्राथमिक उपचार केंद्रे काढण्यासाठी वापरावा.

मदनबाण's picture

7 Dec 2019 - 11:51 pm | मदनबाण

एअर पोर्ट , बुलेट ट्रेन स्टेशन आणि रुग्णालय इथे पोहचण्यासाठी रस्ता लागतोच ! तोच रस्ता नीट नसेल तर तुमची फ्लाईट , तुमची ट्रेन मिस होउ शकते आणि रुग्णालयात नेला जाणारा रुग्ण दगाउ शकतो ! सामान्य नागरिक रोज फ्लाईट पकडत नाही नाही तो रोज बुलेट ट्रेन पकडणार आहे, पण नसलेल्या रस्त्यांमधुन नोकरीच्या स्थळी पोहचतानचा प्रयत्न करताना त्याचे रुग्णालयात मात्र पोहचण्याचे चान्सेन मात्र नक्कीच वाढले आहेत. चीन जपान मध्ये बुलेट ट्रेन बरोबर जागतिक दर्जाचे रस्ते आणि महामार्ग देखील आहेत हे आपण जाणिवपुर्वक विसरतो का ? बुलेटचे तंत्रज्ञान हवे मग चांगल्या दर्जाच्या रस्त्यांच्या तंत्रज्ञाना बद्धल मौन का ? हॉट मिक्स, कोल्ड मिक्स चे खड्डे बुजवणारे तंत्रज्ञान वापरुन करोडो रुपये खर्च केलेल्याच्या बातम्या येतात, परंतु रस्ता भिकार आणि भिकारच राहतो !

P1
बुलेट ट्रेनचा देश चीन मधला हा ५० लेनचा हायवे आहे ! तो सुद्धा ट्रॅफिक ने जाम. :) चायना / जपान यांच्या बुलेट ट्रेनशी स्पर्धा करायची असेल तर आधी त्यांच्या रस्त्यांशी आपण स्पर्धा करायलाच हवी ! नुसते मोठ्या प्रमाणात उत्तम दर्जाचे रस्ते, फ्लायओव्हरस आणि हायवेज जरी आपण बांधत सुटलो [ ज्याची आपल्या नितांत गरज आहे ] तरी अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम सहज करता येइल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कि घुँघरू टूट गये... :- War

गोंधळी's picture

7 Dec 2019 - 12:29 pm | गोंधळी

व्यव्हारीक द्रुष्टीने बघीतल तर नो टु बुलेट ट्रेन.

त्यापेक्षा हायपलुप ही व्यवस्था बुलेट ट्रेन पेक्षा स्वस्त व जलद वाटते आहे.

त्यामुळे हायपलुपचा विचार सरकारने करावा .

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 2:30 pm | मुक्त विहारि

हारपरलूप, म्हणायचे आहे का?

Hyperloop जर बुलेट ट्रेन पेक्षा जास्त वेगाने जात असेल, तर नक्कीच प्राधान्य दिले पाहिजे. ..

गोंधळी's picture

7 Dec 2019 - 3:28 pm | गोंधळी

हो.

गोंधळी's picture

7 Dec 2019 - 3:34 pm | गोंधळी

बुलेट ट्रेन मुळेच सुनील प्रभूंनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला असे ऐकले आहे.

अभिजित - १'s picture

7 Dec 2019 - 2:16 pm | अभिजित - १

मुंबईत दरवर्षी ५००० लोक उपनगरी रेल्वे अपघात होऊन मरतात . ते आम्ही सुधारणार नाही. पण बुलेट ट्रेन पायजेल म्हंजी पायजेलच . मेरा भारत महान !!

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 2:23 pm | मुक्त विहारि

चीनच्या प्रगतीचा आढावा घेतला तर, वेगवान दळणवळण, हे पण एक अंग आहे.

जपान महाराष्ट्रा एव्हढाही नाही. भारताचे डायनामिक्स अभ्यासून मग अनुकरण अपेक्षित आहे

अभिजित - १'s picture

7 Dec 2019 - 5:03 pm | अभिजित - १

"American roads are not good because America is rich, but America is rich because American roads are good," US President John F Kennedy once said famously.
रस्ते नीट करायला कोणी अडवलंय ? बुलेट ट्रेनच का पाहिजे ? मालवाहुतक करणार का बुलेट ट्रेन मधून ? तिचा दर काय असेल ? कि कृत्रिमरीत्या rates कमी ठेवणार ? किती दिवस ? आणि मग हि वाहतूक किती लोकांना परवडेल ?

बुलेट ट्रेन पेक्षा त्याबरोबर फुकट मिळणारे तंत्रज्ञान आपल्याला जास्त उपयोगी आहे.

सध्या भारतात सर्वदूर वापरली जाणारे डिझेल इंजिने WDM २ / WDM ३ यांचे तंत्रज्ञान १९६२ सालचे आहे.

आपले त्यातल्या त्यात अद्ययावत असलेले WAP ७ हे इंजिन पण १९९८ चे म्हणजे २१ वर्षे जुने आहे.

अँबेसेडर आणि फियाट असे पर्यंत मुंबई पुणे प्रवास हा न थांबता होतच नसे. कारण लोणावळ्याला पोचायच्या अगोदर मेकॅनिक पॉईंट ला गाडी गरम झाल्यामुळे थांबवावी लागत असे. इंजिनात पाणी टाकावे लागत असे आणि मगच पुढचा प्रवास चालू होत असे. किंवा वाकडी करून किक मारल्याशिवाय बजाज ची स्कुटर चालूच होत नसे. उत्तम सेल्फ स्टार्टर असू शकतो हेच लोकांना माहिती नव्हते.

त्या जाऊन मारुती/ हिरो होंडा / कायनेटिक होंडा आल्यावर भारतीय वाहतुकीत जसा आमूलाग्र बदल झाला तसा रेल्वे तंत्रज्ञानात होणे आवश्यक आहे.

१ जुने १९३० साली चालू झालेली डेक्कन क्वीन तेंव्हा ३ तास १० मिनिटात मुंबई पुणे जात असे आज ९० वर्षांनंतरही मुंबई पुणे प्रवासाचा वेळ ३ तास १० मिनिटं पेक्षा कमी झालेला नाही यापेकीसह शरमेची बाब दुसरी नसेल.

गेल्या ५ वर्षात रेल्वेचे वेगळे बजेटच काढून घेतल्यावर रेल्वेची प्रगती किती झाली आणि त्याअगोदर काय स्थिती होती हे जाणून घ्या आणि मग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची का आवश्यकता आहे हे समजून येईल.

कोणाचेच बुलेट ट्रेन नको असे मत नाही, लोकांना फक्त पांढरा हत्ती पाळायचा नाहीये म्हणून त्यानुषंगाने चार शब्द येऊद्या अन्यथा मुवी सोबत चर्चा चालू आहे असा मला भास होणे नाकारता येणार नाही

आनंद मोरे यांची अभ्यासु व नितांतसुंदर लेखमाला बुलेट ट्रेन विषयावर इथेच मिपावर वाचली.
त्या लेखमालेवर इथल्याच भक्त कंपूने अनेक नाके मुरडली होती.
गोबेल्सच्या स्टाईलने "बुलेट ट्रेन / तंत्रज्ञान /देशाची प्रगती" वैगरे मुद्द्यावर प्रचारकी थाटाने, अजूनही गळे काढणे/ उमाळे
आजही चालू असल्याचे दिसत आहे.

अर्धवटराव's picture

8 Dec 2019 - 5:10 am | अर्धवटराव

ते जे काय शेअर मार्केटचं झंझाट गुजरातला हालवायचा घाट बांधला जातोय ते चटकन व्हावं. त्या सगळ्या शेठ लोकांची ये-जा करण्यासाठी बुलेट ट्रेन अवतरावी. इकडे समृद्धी महामार्ग तयार व्हावा आणि मुंबईची गर्दी विदर्भाकडे डायव्हर्ट व्हावी. हे सगळं २०२४ च्या अगोदर व्हावं. शक्य झाल्यास झो.पु. वगैरे योजना न झोपता कार्यरत व्हाव्या. मुंबई नावाची बकाल वस्ती आपल्या जुन्या राजसी रुपात पुन्हा नटावी.

उधोजी राजेंची चरणी हिच विनम्र प्रार्थना. निदान आदित्यबाबासाठी एव्हढं करावच राजांनी.

झेन's picture

8 Dec 2019 - 12:36 pm | झेन

ते आत्ता कुठे आलेत टीम तयार व्हायची आहे तोपर्यंत तुम्ही डायरेक्टर पसायदान? : --)

Rajesh188's picture

8 Dec 2019 - 8:27 pm | Rajesh188
Rajesh188's picture

8 Dec 2019 - 8:28 pm | Rajesh188

भारतात धड टॅक्सी सर्व्हिस उत्तम रित्या चालवली जात नाही.
रिक्षा नियमाने चालत नाहीत.
कोणत्याच राज्याची परिवहन व्यवस्था जागतिक दर्जाची नाही.
भारतातील कोणत्याच शहरातील शहर बस दर्जेदार नाहीत.
रस्ते दर्जेदार नाहीत.
वाहतुकीचे नियम दर्जेदार नाहीत.
रेल्वे सेवा फक्त नावाला जगात मोठी आहे पण दर्जा पाकिस्तान पेक्षा कमी असेल.
आपली वाहतूक व्यवस्था प्राथमिक स्तरावरच आहेत जगात आपण वाहतूक व्यवस्थेच्या दर्जात कोठेच नाही.
तिथे बुलेट ट्रेन चे काय काम .
पहिला पाया मजबुत करा.
इथे पहीलीची शाळा नाही आणि चालले मेडिकल कॉलेज बांधायला

धर्मराजमुटके's picture

8 Dec 2019 - 8:54 pm | धर्मराजमुटके

मला वाटते की आपण ह्या सगळ्यांचे दर्जे तपासत बसण्यापेक्षा एक समाज म्हणून आपण किती दर्जेदार आहोत हे तपासले आणि त्यात सुधारणा केली तर वरील प्रश्न आपोआप सुटतील.

मुंबई,पुणे,बाकी महाराष्ट्र मधील शहर.
नवी दिल्ली(जुनी नाही)
बंगलोर,haydrabad,
महाराष्ट्र,गुजरात, कर्नाटका,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,पंडेचारी,गोवा

हे सर्व भाग सोडले तर तर भारतात 1947 chya मध्ये जगात ज्या दर्जाचे जीवन जगले जायचे त्या पेक्षा खराब अवस्था आहे..इथे बुलेट ट्रेन आणि त्यावर होणारा अवाढव्य खर्च करण्या साठी इसवी सन 3000 पर्यंत थांबावे लागेल

Rajesh188's picture

10 Dec 2019 - 1:21 pm | Rajesh188

बुलेट ट्रेन साठी जे कर्ज जपान सरकार देत आहे ते paid करण्याची जबादरी कोणाची आहे.
केंद्र सरकार,राज्य सरकार की बुलेट ट्रेन जी कंपनी ऑपरेट करणार आहे तिची.
80000 हजार करोड की काय कर्ज जपान देणार आहे अगदी 0.5 पर्सेंत व्याजनी.
तर 80000 हजार करोड रुपायचे 05 percent नी व्याज येईल ते पण 500 करोड तरी व्याज येईल दरवर्षी.परत maintance,कामगार चे पगार,बाकी खर्च हाच हजारो करोड मध्ये जाईल .
फक्त व्याज देण्या एवढं तरी फायदा बुलेट ट्रेन देवू शकेल का.
मुंबई जवळच्या सरकारी जागा त्यांची किंमत च लाखो करोड मध्ये जाईल ती जागा फुकट केंद्र सरकारच्या ताब्यात जावून राज्याचे नुकसान होईल ते वेगळे