कॉमिक्सच्या दुनियेतील स्मरण भ्रमंती!

मार्गी's picture
मार्गी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

कॉमिक्सच्या दुनियेतील स्मरण भ्रमंती!

... कॉमिक्स! हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यासमोर वेगवेगळे चेहरे आणि चित्रं येतात आणि त्या चेहर्‍यांबरोबर, त्या चित्रांबरोबर आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो तो काळ! पुस्तकं वाचणार्‍या व वाचनाची आवड असलेल्याने कधी ना कधी कॉमिक्स वाचलेली असतातच. कॉमिक्सची एक दुनियाच असते, एक जग असतं. आजच्या मुलांचा हॅरी पॉटर असेल किंवा आधीच्या पिढीच्या बालपणातले वेगवेगळे सुपर हिरोज. माझ्या स्वत:च्या बाबतीत ह्या कॉमिक्सने माझं आयुष्य अनेक प्रकारे रंजक केलं आणि समृद्धही केलं. तेव्हा ह्या कॉमिक्सच्या जगातल्या अनेक चित्रकथांचं, अनेक पात्रांचं व त्यातील गमतींचं रसग्रहण करतो.

माझी कॉमिक्सची पहिली पहिली आठवण म्हणजे साधारण १९९१-९२चा काळ. माझा मोठा भाऊ तेव्हा कॉमिक्स वाचायचा आणि त्याचं बघून मीसुद्धा लवकरच कॉमिक्स वाचायला सुरू केलं. अगदी सात-आठ ह्या वयात पहिलं कॉमिक्स वाचलं. मला आठवतंय त्यानुसार तेव्हा डायमंड कॉमिक्सचे चाचा चौधरी आणि राज कॉमिक्सचे ध्रुव-नागराज आमच्याकडे सगळ्यांत लाडके होते. वुडू हे ध्रुवचं कॉमिक्स कदाचित मी वाचलेलं पहिलं कॉमिक्स असेल! आज हे आठवताना एका सेकंदात टाइम मशीनची किमया होऊन तो १९९१चा काळ आणि तेव्हाचा मी डोळ्यांपुढे येतो. परभणीसारख्या छोट्या शहरामध्ये तेव्हा टीव्ही फार रुळला नव्हता. लहान मुलांच्या दिनक्रमामध्ये त्यामुळे मोजक्याच गोष्टी होत्या. तेव्हा शाळाही आख्खा दिवस भरत नव्हती. त्यामुळे शाळा साडेपाच-सहा तास. शिवाय मोबाइल-व्हिडिओजचा तर संबंधच नाही. त्यामुळे तुलनेने आयुष्य खूप साधं आणि हलकं होतं. मोकळा वेळ भरपूर असायचा. त्यामुळे संध्याकाळी क्रिकेट-विटीदांडू असे खेळही व्हायचे आणि ते असूनही दुपार मोकळी असायची. शांती, स्वाभिमान अशा मालिका येण्यापूर्वीचा हा काळ. त्याच काळात माझ्या भावाच्या मित्रांकडून कॉमिक्सची ही मालिका सुरू झाली आणि पहिल्यांदाच जाणवलं, आपल्याला मराठी येतं म्हणजे हिंदीसुद्धा येतंच की! शाळेमध्ये हिंदी पाचवीमध्ये सुरू झालं, पण त्याआधीच कॉमिक्स वाचून हिंदी आलं होतं. किंबहुना औपचारिक शिक्षणापेक्षा किंवा औपचारिक माध्यमांपेक्षाही माझं हिंदी कॉमिक्स वाचूनच तयार झालं आणि हिंदीच नाही, तर वाचनाची आवड वाढण्यामागेही त्या कॉमिक्सचा बराच वाटा आहे.

त्या काळात आम्हाला मिळायची त्या कॉमिक्समध्ये अनेक पात्रं होती. एकीकडे चाचा चौधरी-साबू, बिल्लू-पिंकी अशी तुलनेने साध्या जीवनातली पात्रं होती, तर दुसरीकडे मँड्रेकसारखा विदेशी‌ हिरो होता. ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यांत जास्त आवडले ते अर्थातच नागराज, ध्रुव आणि साबू! काही वर्षांमध्येच चाचा चौधरी फार मिळमिळीत वाटायला लागले आणि नागराजपेक्षाही खरी गोडी वाटली ती ध्रुवमध्ये. आणि भारतीय कॉमिक्सच्या जगतात - किंबहुना भारतीय सुपरहिरोजच्या जगतामध्ये (अगदी चित्रपटांमधले क्रिशसारखे सुपर हिरोजसुद्धा लक्षात घेऊन) ध्रुव हा खरोखर एक अढळपद प्राप्त केलेला हिरो आहे. कोणतीही सुपर पॉवर नसलेला आणि अगदी साधा माणूस असलेला अशीच ध्रुवची ओळख! अगदी सामान्य माणूस असूनही अतिशय तीव्र बुद्धिमत्ता आणि शरीराची चपळता ह्या बळावर सर्व शत्रूंवर मात करणं त्याला सहज जमायचं आणि म्हणूनच तो नागराजपेक्षा जास्त अपील व्हायचा. किंबहुना ह्याच न्यायाने मला महाभारतातील अवतारी लोकांसारखे कोणीच कधी भावले नाहीत. कारण सगळेच जर ईश्वराचे पुत्र आहेत, अवतारी आहेत, तर त्यांचं प्रदर्शन असामान्य असणार, ह्यात काय आश्चर्य? तिथेही मला एकलव्यच नेहमी भावला.

Aawaz-Ki-Tabahi-17

ही कॉमिक्स मुळात आवडण्याची अनेक कारणं आहेत. किंबहुना आजच्या मुलांनाही हॅरी पॉटरची जी मोहिनी आहे, जे गारूड आहे, त्याचीही कदाचित अशीच कारणं असू शकतील. कशाही प्रकारचं किंवा कितीही सुखद आयुष्य असलं तरी एका लिमिटनंतर ते कंटाळवाणं होतं. त्यातलं 'थ्रिल' निघून जातं. आणि कितीही सुखद आयुष्य असलं तरी तिथेही समस्या असतातच व त्यांच्यावर मात करायची असते. त्यामुळे अशा चाकोरीतल्या आयुष्यात असं एखादं पात्र असेल, जे अनेक समस्यांना सामोरं जाऊन त्यावर मात करत असेल, तर सगळ्यांना आवडणारच, किंबहुना प्रेरणादायक ठरणार. मला कॉमिक्स आवडण्यामागे हे कारण होतंच. अनेक प्रकारे शक्तिशाली असलेल्या असंख्य व्हिलन्सना केवळ आपल्या बुद्धिचातुर्याने हरवणारा ध्रुव आवडता हिरो बनला! त्याबरोबरच ही सगळीच कॉमिक्स हे एका अर्थाने सतत सूचनांखाली दबलेल्या आणि 'डूज आणि डोन्ट्स'मध्ये अडकलेल्या बालपणातील विरंगुळ्याचे अविस्मरणीय क्षण होते आणि कळत-नकळत त्यातून अनेक गोष्टी कळत जायच्या. बाहेरचं जग, विज्ञानातल्या काही प्राथमिक गोष्टी, जिम किंवा मार्शल आर्ट्स असे व्यायाम प्रकार त्यातूनच कळले.

तात्पुरतं मनोरंजन किंवा विरंगुळा याच्या पलीकडे जाऊन मेहनत, चिकाटी, जिद्द, संघर्ष, देशभक्ती असे गुणही त्यामध्ये होते. मला एक कॉमिक्स आठवतं जे बहुतेक तुलसी किंवा मनोज कॉमिक्समधलं असेल. त्यामध्ये कालभैरव नावाच्या एका इन्स्पेक्टरची गोष्ट होती. एका ट्रेनच्या समोर सुरुंग लावलेला असतो. तो वाटेतल्या शत्रूंना हरवून वेळेशी लढत त्या ठिकाणी पोहोचतो आणि रक्ताळलेल्या लाल शर्टने इंजीन ड्रायव्हरला इशारा करून ट्रेन स्फोटकांच्या काही फूट अलीकडे थांबवतो! आणि अशाच आशयाच्या अनेक गोष्टी. ध्रुव जेव्हा बर्फाळ प्रदेशामध्ये शत्रूशी लढायला जातो, तेव्हा त्याची बहीण त्याला एक असं यंत्र करून देते, जे त्याला थंडी वाजू देत नाही! त्यामध्ये मला अनुभवायला न मिळालेलं बहिणीचं‌ प्रेम तर होतंच, त्याचबरोबर विज्ञानाची आवड - आज ज्याला इनोव्हेशन म्हणतात तसं काहीसुद्धा होतं. आणि लहानपणी कॉमिक्समध्ये बघितलेल्या गोष्टींचे अनेक प्रयोग करून झाले!

आज मागे वळून बघताना कॉमिक्समध्ये अशा अनेक गोष्टी जाणवतात. ह्या सगळ्यांच्या बरोबर विशेषत: ध्रुवच्या कॉमिक्समध्ये क्रिएटिव्ह थिंकिंगसुद्धा होतं. वरवर बघता समोर अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये काहीही सुटकेचा मार्ग नाहीये, पण तिथे ध्रुव बरोबर मार्ग शोधून काढायचा. उदाहरण म्हणून दोन प्रसंग आठवतात. एकदा एका लहान मुलांच्या पार्टीमध्ये एक व्हिलन येतो. तो एका मुलाला गिफ्ट म्हणून एक गोरिला देतो. आणि बघता बघता हवा भरून तो गोरिला फुगत जातो आणि तोडफोड सुरू करतो. ध्रुव त्याला पकडायला जातो. ध्रुवची शक्ती आणि चपळता इथे उपयोगी पडत नाही आणि तो गोरिला त्याला पकडून हातांमध्ये आवळतो. ध्रुवचे हात आणि पाय त्याला गोरिलाच्या पकडीतून सोडवू शकत नाहीत. अशा वेळी ध्रुव विचारात पडतो की त्याला कसं थांबवावं. तेवढ्यात त्याला त्या गोरिलावर एक सॉकेट दिसतं व तिथून तो रिमोट कंट्रोलने चालवला जात असणार हे तो ओळखतो आणि जिमनॅस्टिक केलेल्या शरीराच्या एका स्टेपमध्ये तो पायाने तो सॉकेट उडवतो आणि परत तो फुगलेला गोरिला छोटा छोटा होतो! हे कॉमिक्स कोणतं ते ध्रुवच्या चाहत्यांना कळलं असेलच.

ध्रुवचा दुसरा एक किस्सा असा आहे की, हिमालयामध्ये एक सुपर व्हिलन त्याच्या अंगावर ब्लास्टर नावाचा एक बुलेटप्रूफ-ब्लास्ट प्रूफ पोशाखातला व्हिलन पाठवतो. त्याच्या हातामध्ये मोठा बाँब असतो आणि तो तीस सेकंदांनी फुटणार असतो. अशा वेळी ध्रुवच्या मदतीला फक्त ब्लॅक कॅट असते, जिची नखं मांजरीसारखी अणकुचीदार असतात. आणि ध्रुवला फक्त स्वत:ला वाचवायचं नसतं, कारण तिथे बाँब फुटला तर बर्फ वितळून मोठा पूर येणार असतो. अशा वेळेस ३० सेकंदांमध्ये ध्रुव काय करेल? हे मुलांना विचार करायला लावणारं एक छान प्रसंग-कोडं ठरू शकतं. ह्या वेळी ध्रुव जे करतो, ते अजूनही तितकंच लक्षात आहे. तो त्या ब्लास्टरशी लढतो. पण त्याचा पोशाख बुलेटप्रूफ असल्यामुळे त्याला ध्रुवचे वार लागत नाहीत. उलट ध्रुवला मात्र त्याचे वार खूप लागतात. तरी तो ते सहन करत असतो. कारण? कारण त्या वेळेत ब्लॅक कॅट तिच्या नखांनी ब्लास्टरच्या हेलमेटची झिप उघडत असते. काही क्षणांमध्येच ती त्याचं हेलमेट काढून टाकते. पुढच्या सेकंदाला ध्रुवचा एक ठोसा ब्लास्टरला बेशुद्ध करतो. पुढच्या चार सेकंदांमध्ये ब्लास्टरला त्याच्या पोशाखातून बाहेर काढून टाकलेलं असतं. पुढच्या चार सेकंदामध्ये बाँब भरून ब्लास्टरचा पोशाख त्यावर फिट करतात आणि त्या पोशाखाला दोघं शक्तीने उचलून दरीत ढकलतात आणि दरीत कोसळताना स्फोट होतो. पण ब्लास्टप्रूफ पोशाखाच्या आत स्फोट झाल्याने काहीच नुकसान होत नाही. ध्रुवच्या अशा असंख्य गोष्टी!

कॉमिक्सचं हे जगच खूप वेगळं होतं आणि रहस्य-रोमांच-नावीन्यपूर्णता-चमत्कार हे नेहमीच मुलांना आकर्षित करत राहतील. अर्थात ते वाचण्यातून की व्हिडिओमधून, हे मात्र सांगणं कठीण आहे. अनेक तज्ज्ञ म्हणतात की, व्हिडिओ बघणं ही कमी क्रिएटिव्ह गोष्ट आहे. कारण त्यामध्ये आपल्या मनामध्ये प्रतिसाद यायला वेळच मिळत नाही. मनाच्या क्रिएटिव्हिटीला व कल्पकतेला स्कोप मिळत नाही. टीव्हीवरच्या कॉमिक्सच्या संदर्भात एक भीषण आठवण आहे. टीव्हीवर कार्टून नुकते नुकतेच लागायचे. तेव्हा एका कार्टूनमध्ये एक मुलगी खोल खोल जमिनीमध्ये खड्ड्यात जाताना दाखवली गेली होती. इतकी खोल की जणू पृथ्वीच्या पोटात गेली. अगदी लहानपणी बघितलेला हा सीन मला फार धक्कादायक वाटला. अजूनही तो प्रसंग आठवला की ती भीती वाटते. पण व्हिडिओऐवजी जर ऑडिओ असेल, तर इतकं ते अंगावर येत नाही आणि नकळत आपण स्वत:हून मनामध्ये त्या गोष्टीला आणखी रंगवतो. आणखी विचार करतो. वाचनामध्ये हेच होत असावं. वाचनामध्ये त्याहूनही खूप गोष्टी होतात. आज जी गोष्ट हरवताना दिसतेय ती म्हणजे सलग एक, दोन, तीन तास एका गोष्टीवर लक्ष एकाग्र करण्याची सवय आणि आवड! वाचनाचं ते खूप मोठं देणं म्हणायला पाहिजे. एका अर्थाने हे त्या त्या वयातलं तल्लीन होऊन केलेलं ध्यानच होय. तेव्हा मनाला आपोआप एकाग्र किंवा फोकस होण्याची सवय लागत गेली. मला आठवताहेत ध्रुवच्या कॉमिक्सचे क्रमश: असलेले काही भाग. एक भाग वाचून झाला आणि दुसरा लायब्ररीतून आणायचा असेल तर फार तळमळ व्हायची. ‘पुढे कसं झालं असेल?’ ही तीव्र उत्सुकता खूप काही विचार करायला लावायची. कधीकधी तर इतकं डेस्परेशन वाटायचं की, कोणाची चालण्याची चाहूल आली, दार वाजलं तरी वाटायचं - कोणीतरी ध्रुवचं कॉमिक्स घेऊन आलं असेल! कॉमिक्सचं वेड किंवा प्रेमच होतं ते. मला आठवतंय, ध्रुवचाच एक खूप जबरदस्त भाग होता - मैने मारा ध्रुव को नावाचा. अनेक महिने ते कॉमिक्स कधी मिळेल असं झालं होतं. आणि जेव्हा ते वाचून झालं तेव्हा कळलं की त्याचा दुसरा भागही आहे! आली का पंचाईत! आता तो कधी मिळेल??? त्या वेळी मात्र मोठी मजा झाली. काही फंक्शननिमित्त नागपूरचा एक दूरचा भाऊ आला होता. मी सहज त्याला विचारलं, हे वाचलं का? आणि त्याने काढून मला ते कॉमिक्स दिलं! तेव्हा कॉमिक्सची इतकी तीव्र ओढ होती की, फक्त मी वाचून भागायचं नाही. बाबांनीही ती वाचली पाहिजेत, असा हट्ट करायचो!

khoonikhilone-48

बालपणाचा सुवर्णकाळ आणि ह्या कॉमिक्सचा सुवर्णकाळ जवळजवळ समांतरच होता आणि जसा प्रत्येक सुपरस्टारचा - चित्रपटातील किंवा खेळातील - एक सुवर्णकाळ असतो, तसाच ध्रुवचाही होता. १९८७पासून १९९८पर्यंतच्या दहा वर्षांमधील त्याची सुमारे ५० कॉमिक्स कधीही वाचली तरी नित्यनूतन वाटावी अशीच आहेत. १९९८नंतर बालपणही संपलं आणि ध्रुवचा सुवर्णकाळही संपला! हळूहळू ध्रुवने वेगवेगळे गॅजेट्स वापरायला सुरुवात केली, तेव्हाच तो 'बदलला!’ आणि नंतर तर एकेकाळी थोडी फँटसी पण जास्त मानवी आयुष्यातल्याच गोष्टी कॉमिक्समध्ये होत्या, ते सगळं बदलून पूर्णच फँटसी गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे अक्षरश: कोणाला जसा सुरैय्याबरोबरचा देव आनंद आणि झीनत अमानबरोबर देव आनंद हे अगदी वेगळे वाटतात, तसा ध्रुव परका होऊन गेला. नंतरही अधूनमधून ध्रुवची कॉमिक्स वाचायचो, कधी नवीन घेऊन तर कधी कॉम्प्युटरवर. पण जाने कहाँ गए वो दिन असं झालं! १९९८नंतर आणि आता अगदी २०१९मधला जो ध्रुव आहे - जी नवीन कॉमिक्स येत आहेत - तो कोणी तरी‌ वेगळाच वाटतो. त्याच्यासोबत रिलेटच करता येत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की, आजही ध्रुवला जगभरातला सुपर पॉवर नसलेला सर्वांत प्रसिद्ध हिरो म्हणून ओळखलं जातं. आणि १९८७मध्ये आलेलं त्याचं पहिलं कॉमिक्स आजही परत प्रिंट केलं जातं व खपतंसुद्धा!

आता त्या विषयाची दुसरी बाजू. माझ्यासारखाच ध्रुवचा चाहता असलेला माझा भाऊ आहे. त्याने नंतर इंग्लिशमधले सगळे सुपर हिरोजही वाचून संपवले. सुपरमॅन, बॅटमॅन, हॅरी पॉटर हे सगळे त्याला तितकेच आवडले आणि त्याने पूर्ण वाचले आणि त्याने मला सांगितलं की, ध्रुव हा बॅटमॅनवरूनच घेतलेला आहे! राज कॉमिक्सचे ध्रुवचे जन्मदाते अनुपम सिन्हा ह्यांनी म्हटलं आहेच की, बॅटमॅनवरूनच ध्रुव इन्स्पायर होता. पण हे तितकं मर्यादित नाही! ध्रुवमधली अनेक पात्रं - वेगवेगळे सुपर व्हिलन्स, त्याचे सुपर पॉवर असलेले मित्र, वेगवेगळ्या स्टोरीज हे सर्व अक्षरश: कॉपी पेस्ट आहे असं वाटावं अशी स्थिती आहे. अगदी हिरोजच्या आणि व्हिलनच्या ड्रेसिंगपासून. किंबहुना ध्रुव हा बॅटमॅनचं भारतीय रूपांतरण आहे, असंही म्हणता येऊ शकेल इतकं! हे जेव्हा कळलं, तेव्हा फार निराश वाटलं. तेव्हा अशी कल्पनाही केली नव्हती. तेव्हा ते क्रिएटिव्हिटीची कमाल वाटायचं. आजही वाटतंच. आणि एका अर्थाने असं भारतीयीकरण हेसुद्धा अवघड कामच मानलं जायला हवं! असो. ह्या वेळी आठवण होते ती आर.डी. बर्मन ह्यांची. अजोड आणि विलक्षण संगीत देणारा संगीतकार! परंतु नंतर कळलं की, आर.डीं.ची अनेक प्रसिद्ध व गाजलेली गाणी ही मुळात अशीच 'इन्स्पायर्ड' आहेत.... असो.

अशी ही कॉमिक्सची वेगळीच दुनिया. आजही जेव्हा कधी चाचा चौधरी-साबूचा किंवा बिल्लू-पिंकीचा विषय निघतो, तेव्हा एक वेगळीच गोड अनुभूती होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, जेव्हा मी माझ्या मुलीला किंवा पुतणीला ह्याच पात्रांची आजची कॉमिक्स घेऊन द्यायला जातो, तेव्हा त्यामध्ये ध्रुवइतकीच भ्रष्टता दिसते! लहान मुलांच्या कॉमिक्समध्ये ड्रग तस्करी करणारे व्हिलन! किंवा मारधाडीचे- मर्डरचे प्रसंग! त्यामानाने ध्रुवच्या किंवा नागराजच्या कॉमिक्समधले व्हिलनही काही अपवाद वगळता सोबर होते, काही अपवाद वगळता गोष्टी कुमारवयीन मुलांसाठीच्याच होत्या! आणि तीच गोष्ट चित्रांची - सादरीकरणाची. आजच्या कॉमिक्समध्ये भडकपणा आहे, रिच ग्राफिक्स आहेत. त्या काळात कॉमिक्समध्ये प्रताप मुळीकांसारखे चित्रकार चित्र काढायचे. चित्र मांडणीसुद्धा खूप सुंदर असायची आणि काही कॉमिक्स तर हस्ताक्षरामुळेही वाचनीय व्हायची. पण आता! Those were the days, असं म्हणावं लागतंय!

पण जेव्हा दिल्लीच्या ट्वेंटी ट्वेंटी टीमच्या कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग केव्हीन पीटरसनला साबू म्हणतो, तेव्हा मात्र आतून गुदगुल्या होतात, किंवा मनामध्ये ध्रुवच्या वुडू कॉमिक्सची स्मृती खूप खोलवर गेलेली असते. जाता जाता ह्या कॉमिक्सचीही कथा सांगण्याचा मोह होतो. आफ्रिकेतील एका आदिम जमातीमध्ये वुडू नावाची एक प्रणाली आहे. त्यामध्ये ज्या व्यक्तीचं भलं करायचं आहे किंवा नुकसान करायचं आहे, त्याचा एक छोटा पुतळा बनवतात आणि मंत्रोच्चार व काही प्रक्रिया करून त्याला 'चार्ज' करतात. मग त्या पुतळ्याला जे केलं जातं, तेच त्या व्यक्तीलाही होतं. त्यावर ध्रुवचं एक अतिशय जबरदस्त कॉमिक्स होतं - वुडू! आणि योगायोगाने मी वाचलेलं ध्रुवचं बहुतेक पहिलंच होतं ते. ही‌ आठवण नव्याने होण्याला एक कारण घडलं! ओशोंची 'मंदिर, तीर्थ, तिलक, मूर्तिपूजा' ह्या विषयांवरची 'गहरे पानी पैठ' प्रवचनमाला ऐकत होतो. तेव्हा चक्क त्यांनी त्यात वुडूचा उल्लेख केला. ओशोंनी सांगितलं की, डॉ. फ्रँक रुडॉल्फ ह्या वैज्ञानिकाने कोणतेही पूर्वग्रह न ठेवता चाळीस वर्षं त्या आदिवासींमध्ये राहून वुडूचा अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष आहेत की, वुडू ही प्रक्रिया खरी आहे! ओशो म्हणतात की, मूर्तीच्या माध्यमातून ज्याची मूर्ती आहे त्याच्याशी संपर्क केला जाऊ शकतो. आणि त्याच प्रवचनमालेत ओशो श्रीनिवास रामानुजमबद्दल म्हणतात की, रामानुजम जे गणित करायचे, जे उत्तर सांगायचे ते बुद्धीने नसून प्रज्ञेने सांगायचे आणि उत्तर सांगताना त्यांचे डोळे भ्रूमध्याकडे जायचे. रामानुजम ह्यांच्याकडे बुद्धी अशी म्हटली तर ती सामान्य होती, अनेक विषयांमध्ये ते उत्तीर्ण होऊ शकत नव्हते, पण गणिताच्या बाबतीत त्यांची प्रज्ञा विशेष होती. त्यामुळे गणित सांगितलं की ते बुद्धीच्या मार्गाने जाऊन स्टेप्स वगैरे न करता थेट उत्तर सांगायचे. असो!

अनेक गोष्टीची पुस्तकं, परीच्या गोष्टी, बालकथा आणि नंतर इतर पुस्तकांनी समृद्ध केलेलं बालपण जरी संपलं, तरी जीवनाचा कॅनव्हास पुढे सुरू आहे. आणि त्या काळी कॉमिक्स जशी सोबत द्यायचे, तसेच आजही देतात. आजही एखादं कॉमिक्स लॅपटॉपवर वाचलं तरी फ्रेश वाटतं! आजही अनेक वेळेस जिथे परिस्थितीरूपी व्हिलन्स मार्ग अडवतात, तेव्हा आठवणीतला ध्रुव मदतीला येतो! तिथले अनेक हसवणारे संवाद आणि भावा-बहिणीसारखे इमोशनल प्रसंगही हसवून जातात! आणि मुख्य म्हणजे अनेक कॉमिक्सच्या अनेक गोष्टी करून मुलीला सांगता येतात. बालपणही कुठेतरी काळाच्या पडद्याआड गेलं असलं, तिथे ह्या कॉमिक्सच्या आठवणींमध्ये ते सुरक्षित आहे हे जाणवतं!

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

25 Oct 2019 - 4:03 pm | चौकटराजा

म्हटले तर चांदोबा ला काहीसे कॉमिक्स म्हणता येईल .आमच्या पिढीने कॉमिक्स चा पुरेपूर उपभोग घेतला . पण बालवयात " इंद्रजाल कॉमिक्स" आमच्या आयुष्यात आले . वेताळ , डायना . जादूगार मँड्रेक, डेनकाली , लोथार ई नावे आज ५० वर्षानंतर ही आठवतात .

marathibana's picture

3 Nov 2019 - 12:50 pm | marathibana

+१

ध्रुव ची सगळी कॉमिक्स ब्याटमन ची कॉपी आहेत https://www.facebook.com/groups/Copy.Inspired.Talk.Show/ मध्ये एकदा बघा

जॉनविक्क's picture

25 Oct 2019 - 11:33 pm | जॉनविक्क

कॉपी तर 70% आर डी बर्मनही आहेत पण आपल्याला जे क्षण आशा कलांमधून मिळालेत ते अफलातूनच.

धन्यवाद.

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 7:52 am | जेम्स वांड

आवडता विषय , आमचं लहानपण गेलं ते सातारकडे एका खेड्यात पाचवी पर्यंत, पण कॉमिक्ससोबत आमची घट्ट वीण होती. आमचे आतोबा मिलिटरीत होते, अन आतेभाऊ बहिणी आत्या वगैरे दरवर्षी आमच्याकडे घरी येत तेव्हा भाऊ बहिणी आठवणीने त्यांनी वर्षभर साठवलेली कॉमिक्स माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी घेऊन येत, कधी पठाणकोटहुन येत कधी उधमपूरहून, कधी अंबाला, कधी कानपुर, कधी जोधपूर तर कधी जबलपूर, जवळपास प्रत्येक कॉमिक्सवर एका पानावर विक्रेत्यांचा रबरी शिक्का उमटवलेला दिसून येई त्यातून कळे हे कुठून घेतलं आहे ते. वर्षभरातली सगळ्या पात्रांची कॉमिक्स म्हणजे ती जवळपास १०० एक असत अन त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या मजेत जात असत. मी वाचलेली कॉमिक्स म्हणजे

१. डोगा
२. सुपर कमांडो ध्रुव
३. नागराज (पर्याय नाही)
४. बांकेलाल
५. चाचा चौधरी
६. बिल्लू
७. पिंकी
८. रमण
९. श्रीमतीजी
१०. (टीनेज म्युटंट निंजा टरटल्स प्रेरित) फायटर टोड्स

चिगो's picture

5 Nov 2019 - 5:07 pm | चिगो

वरीलपैकी सर्व..

मलापण कॉमिक्स वाचायला प्रचंड आवडायचं.. त्यातून काही माहितीपण मिळायची. उदाहरणार्थ, भारताच्या अंटार्क्टीक शोधशाळेचे नाव 'गंगोत्री' होते, हे मला एका कॉमिक्समधून कळले. मलापण ध्रुवच सगळ्यात जास्त आवडायचा..

अजूनही वाचतो कॉमिक्स अधेमधे, पण आता मजा येत नाही.. अब वो भी बदल गये हैं, और हम भी..

मार्गी, उत्तम लिहिलंय. आवडलं.

टर्मीनेटर's picture

27 Oct 2019 - 2:53 pm | टर्मीनेटर

झकास लिहिलंय!

लहानपणी अनेक कॉमिक्स वाचली, पण ऑल टाईम फेवरीट म्हणजे 'चाचा चौधरी' आणि 'वेताळ'.

अनेक तज्ज्ञ म्हणतात की, व्हिडिओ बघणं ही कमी क्रिएटिव्ह गोष्ट आहे. कारण त्यामध्ये आपल्या मनामध्ये प्रतिसाद यायला वेळच मिळत नाही. मनाच्या क्रिएटिव्हिटीला व कल्पकतेला स्कोप मिळत नाही.

१००% सहमत! एखादी गोष्ट वाचून त्यातला प्रसंग मनःचक्षूंसमोर उभा करण्यात कल्पनाशक्तीला जेवढा स्कोप आहे तेवढा व्हिडिओ मधून थेट तयार प्रसंग बघण्यात नक्कीच नाही.

मस्त! बालपणीचा काळ सुखाचा!!

- (चाचा चौधरीन्चा पन्खा)

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 11:48 am | किल्लेदार

वा ...
बालपणीच्या आठवणी जाग्या केल्यात. माझाही आवडता सुपरहिरो ध्रुवच. नागराज जास्त पटला नाही. त्यातही या दोघांच्या एकत्र असलेल्या कॉमिक्स मध्ये नेहमी नागराजला झुकते माप मिळायचे तेव्हा तर प्रचंड राग यायचा. ध्रुव काढावा तो अनुपम सिन्हानीच. प्रताप मुळीकला ध्रुव नाही जमला.

माझे सगळ्यात आवडते म्हणाल तर खूनी खिलौने (अजूनही आहे माझ्याकडे) , किरीगी का कहर आणि ग्रँड मास्टर रोबो. बाकी तुम्ही म्हणालात तशी पहिली ३०-३५ सगळीच छान आहेत. नंतर मात्र ध्रुव परका झाला.

ध्रुव असेल कॉपी कदाचित पण मी बॅटमॅन कधी वाचले नसल्यामुळे नेहमीच त्या कल्पना मला ओरिजिनल वाटल्या. निदान अजून तरी तशा कथानकाचा हॉलिवूड चित्रपट बघण्यात आलेला नाही. किरगी का कहर, बर्फ की चिता सारखे कॉपी कसे असू शकतील हा ही प्रश्न आहेच. कारण सगळीच पात्र आपलीशी वाटतात....

मार्गी's picture

30 Oct 2019 - 12:02 pm | मार्गी

सर्वांना वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद!!! अतिशय सविस्तर प्रतिक्रिया आल्या आहेत, आवडल्या! :) अगदी सेम हीअर आहे! आणि संपादक मंडळास व यशोधराताईंना विशेष धन्यवाद, इथे लेख लिहिण्याची संधी दिलीत व लेख सजवलाही छान! :)

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 5:54 pm | गुल्लू दादा

विडिओ चा तेवढा खोलवर परिणाम होत नाही हे खरंय...धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2019 - 7:20 am | सुधीर कांदळकर

कॉमिक्स वाचली नाहीत. त्यामुळे नवी रत्ने ठाऊक नाहीत. परंतु चित्रवाणी येण्यापूर्वीच्या त्या काळी इंद्रजाल कॉमिक्स हे पाक्षिक होते अणि आम्ही आतुरतेने पुढच्या अंकाची वाट पाहात असू.

मस्त लेख, धन्यवाद.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 8:13 pm | श्वेता२४

हा काही आवडीचा विषय नव्हता. कधीकधी चाचा चौधरी वाचलेली आहेत. पण सगळ्यात आवडतं पुस्तक म्हणजे लहानपणी चांदोबा आवडायचा .बाकी लेख आवडला

उपेक्षित's picture

5 Nov 2019 - 6:51 pm | उपेक्षित

आपल्याला तर बाबा नागराज आवडायचा :) स्पायडी चा भारतीय अवतार गपा गप साप काय काढायचा, विष फुण्कार काय सोडायचा

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 3:22 pm | मुक्त विहारि

अप्रतिम

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 3:22 pm | मुक्त विहारि

अप्रतिम