अंतोनी गाउडी

इन्ना's picture
इन्ना in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

अंतोनी गाउडी

आर्किटेक्चरच्या तिसर्‍या वर्षात 'वास्तुकलेचा इतिहास' असा एक विषय असायचा अभ्यासायला. अगदी गॉथिक, रोमनपासून ते अठरा-एकोणिसाव्या शतकातल्या युरोपातल्या रोमनस्क, बरोक शैलीतल्या विविध इमारती अन त्याच्या वास्तुविशारदांचा अभ्यास. पद्धतशीर माहिती अन रेखाटन काढून जर्नल्स बनवायचो आम्ही. त्या जर्नल्समध्ये या सगळ्या शैलींतल्या इमारती प्रामुख्याने चर्च कॅथिड्रल्सची आखीवरेखीव रेखाचित्रं काढताना, अवचित काही मुक्तछंदातल्या कविता असाव्यात अशा काही इमारती हाती लागल्या. शैली म्हणावी तर मॉडर्निझम, आर्ट नोव्हु, पण तरीही रंग माझा वेगळा म्हणणारी!! अन ती ह्या गाउडी महाशयांची पहिली ओळख. अंतोनी गाउडी! स्पेनचा वास्तुविशारद. देवाचा दूत म्हणून नावाजलेला अन निसर्गात देव शोधणारा. आजूबाजूच्या निसर्गातलं काव्य, रेषा, छंद, लय तरलपणे वास्तुकलेच्या माध्यमातून उतरवणारा हा अवलिया मी तेव्हा पुस्तकातली चित्रं अन आराखडे पाहून हे सगळं काम अद्भुत, विस्मयकारक ह्या खात्यात टाकलं अन तेव्हा माझी विचारपद्धत समकालीन मॉडर्निझमकडे झुकणारी होती, म्हणून बाजूलाही ठेवलं. मात्र गेल्या वर्षी बार्सिलोनामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहिली-अनुभवली गाउडीची जादू , तेव्हापासून जे गारूड झालंय, ते उतरत नाहीये!

१८५२मध्ये स्पेनच्या कॅटालान प्रांतात जन्माला आलेला हा अंतोनी. बॉयलर्स बनवण्याचा व्यवसाय करणारं त्याच कुटुंब. आजोबा-काका-वडिलांबरोबर लहानपणी त्याने वर्कशॉपमध्ये बरंच काम केलं. धातुकाम, जागा अन त्यातलं अवकाश ह्याबरोबर काम करण्याचे पहिले धडेच म्हणता येतील. एखाद्या पदार्थाचे अंगभूत गुण ओळखण्याचं कसब इथेच शिकला अंतोनी. ह्याचबरोबर ह्या दमेकरी पोराची तब्येत सुधारावी ह्यासाठी समुद्रकिनार्‍यावरचे मुक्काम त्याला निसर्गाचं निरीक्षण करायला शिकवत गेले. लाटा, समुद्री जीव, शंखशिंपले, तिथली झाडं-पानं-फुलं, सगळाच निसर्ग हा जगन्नियंत्याचा सर्वोच्च आविष्कार आहे याबद्दल खातरीच पटली तेव्हा त्याची. निव्वळ शंखांचा आकार, पानांचा रंग असं वरवरचं नाही, तर त्या आकृतिबंधांची भूमिती, त्यातली संरचना, झाडं फांद्यांचं वजन अन डोलारे तोलतात त्याचं गणित ह्या सगळ्या नोंदी त्याने मनोमन केल्या. पुढे वास्तुकला शिकतानाही निसर्गातल्या ह्या रचना, पॅटर्न्सचं सार, वास्तुकलाकार म्हणून त्याच्या विचारपद्धतीचा पाया झाला.

पुढे वास्तुकलेचं रीतसर शिक्षण घ्यायला महाशय बार्सिलोनाला पोहोचले. वर्गात उपस्थिती कमी असली, तरी अतरंगी लहानसहान कामं चालूच होती. ती पाहून शिक्षकांनीदेखील मदतनीस म्हणून बोलवायला सुरुवात केली. १८७८मध्ये बार्सिलोनामधून वास्तुकलेचं शिक्षण घेऊन बाहेर पडताना त्याच्या शिक्षकांनी, "आम्ही एका तर्‍हेवाइकाला की विलक्षण बुद्धिमान व्यक्तीला दिली आहे डिग्री, हे काळच सांगेल" असं म्हटलं होतं! अन खरोखरच त्याचं काम हे आधीच्या कोणत्याही पायंड्याबरहुकूम नसलेलं, निराळंच अन तरीही लक्षवेधी होतं.

IMG-4960

युरोपात १३-१४व्या शतकापासून - किंबहुना आधीही, राजे-उमरावांच्या नाहीतर चर्चच्या आश्रयाने चित्रकला, शिल्पकला, स्टेन्ड ग्लास, पॉटरी सिरॅमिक्स, धातुकाम, सुतारकाम, त्यावरचं ग्लेझिंग ह्या कला वाढीस लागल्या. एक टीम म्हणून ह्या सगळ्यांचा नवनिर्मितीत हातभार लागायचा. स्थापत्यविशारद ह्या सगळ्या टीमचा कप्तान. आधुनिक काळात वास्तुरचनाकार जसे स्वतंत्रपणे अन वरिष्ठ या भूमिकेतून काम करतो तसे नाही, तर ह्या सगळ्या कारागीरांच्या बरोबरीने काम करणारा कप्तान म्हणून गाउदी काम करायचा, अन इथेच त्याचं वेगळेपण उठून दिसतं.

निसर्गाला गुरू मानलं, म्हणजे निव्वळ पानातले, फुलांतले, प्रवाळावरचे आकॄतिबंध/पॅटर्न्स नाही, तर ते तसे का झाले? इतक्या खोलात गेल्यामुळे एका वेगळ्याच पातळीवर घडतं काम. हे वेगळेपण काय? प्रत्येक पदार्थाचं (मटेरियलचं) एक स्वभाववैशिष्ट्य असतं. तणाव (टेन्शन) अन संकुचन (काँप्रेशन), टणकपणा, धातूची ठोकून आकार देण्याची क्षमता वगैरे. ही क्षमता जोखून योग्य त्या ठिकाणी वापरणं हे गाउदीच्या कामाच खास वैशिष्ट्य. उदाहरणादाखल पार्क गुएलमधले छत तोलणारे तिरके दगडी खांब अथवा साग्रादा फॅमिलिया या चर्चमधील वेगवेगळ्या लोड बेअरिंगसाठी योजलेले वेगवेगळ्या दगडाचे खांब. मुख्य खांब जास्त घनतेचा ग्रॅनाइट अन इतर खांब मार्बलसदृश त्या मानाने कमी घनतेचे. कमानीचे दगड त्याहून कमी घनतेचे, शिल्प घडवायला योग्य.

१. पार्क गुएल

IMG-20190519-113514

IMG-20190519-113929

२. साग्रादा कॉलम्स

IMG-20190519-153156

३. नेटिव्हिटी फसाड

IMG-20190519-143031

IMG-4869

निसर्गातले घटकदेखील इतके सुंदर गुंफलेले विविध ठिकाणी, पाम ची पानं अन झेंडूसदृश लोकल फुलं पार्क गुएलच्या प्रवेशद्वारावर झळकतात.

४. गुएल गेट

IMG-4853

लोंबणार्‍या वेली अथव्या साखळ्या यांची भूमितीय रचना कॅटीनरी आर्चच्या स्वरूपात अत्यंत सरळ अन हलक्या (एका विटेच्या रुंदीच्या) कमानींची रांग कासामिलाचं छप्पर तोलते.

५. कासामिला

IMG-4948

मॉडर्निस्ट या चळवलीचा एक प्रमुख पुरस्कर्ता असला, तरी गाउडीची चौकट निराळीच होती, निसर्गाशी थेट संधान बांधणारी. आकाश, लाटा, मेडिटरेनियन समृद्ध निसर्ग, प्राणिमात्र, जलचर, इतकंच नाही, तर बार्सिलोना शहराशी निगडित मिथकातले दैत्य अन कल्पनेतले प्राणीदेखील. हे सगळे यथायोग्य विविध ठिकाणी, अवचित दिसत राहतात.

गाउडीच काम स्टुडिओपेक्षा त्या त्या इमारतीतल्या कार्यशाळेतच इतर कारागीरांबरोबर घडायचं. दगड धातू काच रंग सिरॅमिक्स या माध्यमातून आपल्या कारागीर मित्रांबरोबर निसर्गातल्या गमती उतरवणारा हा खरा हँड्स ऑन आर्किटेक्ट!

१८८३मध्ये त्याने साग्रादा फॅमिलिया या चर्चच्या रचनेचं काम स्वीकारलं. हे भलतंच मोठं काम होतं. त्यानंतर काही वर्षांत आपली इतर कामं संपवत, १९१०पासून संपूर्ण वेळ फक्त ह्या कॅथेड्रलच्या उभारणीला वाहिला. आपल्या हयातीत हे काम संपणार नाही, हे ओळखून त्यानी रेखाचित्रं, संकल्पना चित्रं, मॉडेल्स ह्या आधारे पूर्ण काम तयार करून ठेवलं, महत्त्वाचे भाग ज्याचं काम जातीने गाउडीलाच करायच होतं. ते आधी संपेल ह्या दृष्टीने सुरू केलं.

IMG-4875

IMG-4883

कॅथेड्रलच्या नेटिव्हिटी फसाडचं अन पॅशन फसाडचं काम त्यांच्या हयातीत संपूर्ण रेखाटन, मॉडेल्ससहित चित्रित करून ठेवलं. दिशा, तिथून येणारा प्रकाश, समुद्राची दिशा, जमिनीची दिशा त्याप्रमाणे प्रवेशद्वारावरचे प्राणी-पक्षी, समुद्री जीव, एखाद्या वनराईत गेल्यासारखे भासणारे खांब, वरचं छत अन त्यावरचे काचेचे दवबिंदू , वृक्षवल्ली, बायबलमध्ये उल्लेख केलेल्या कथा, निव्वळ येशूच नाही, तर तिथल्या सामाजिक जडणघडणीला साजेसं, पूर्ण कुटुंबाचं देऊळ, साग्रादा फॅमिलिया - पवित्र कुटुंब! मेरी जोसेफबरोबर मेंढपाळ, गुराखी, इतर अपोस्टल्स सगळेच भेटतात. गाउडीनंतर त्याच्या रेखाटनाबरहुकूम काम चालू ठेवलं त्याच्या सहकार्‍यांनी. स्पेनच्या यादवीमध्ये त्याने करून ठेवलेलं बरंचसं काम आगीत जळून खाक झालं, तरीही त्याच्या गाथेप्रमाणे काम गेली शंभराहून अधिक वर्षं चालू आहे. २०२६मध्ये त्याच्या शंभरव्या पुण्यतिथीला कॅथेड्रल पूर्ण करायचा प्रयास आहे. मूळ गाथेला, संकल्पनेला कोणताही धक्का लागू नये म्हणून गाउडीचे अनुयायी अन शिष्य स्वतःच निधी गोळा करून काम पूर्ण करताहेत. गाउडीने शंभराहून वर्षांपूर्वी जे सहज, सरळ उभं केलम, ते काम संपवताना आजचे वास्तुविशारद, तंत्रज्ञ तोकडे पडताहेत. आजही गाउडीनी उभं केलेलं काम अन आजचं यातला फरक लख्ख दिसून येतो. गाउडीचं काम आजही जिवंत भासतं, निसर्गातूनच उमललेलं वाटतं. मानवाने जेव्हा जेव्हा निसर्गावर कुरघोडी करून काही करू पाहिलंय, तेव्हा तेव्हा ते कुरूप, तोल बिघडवणारं ठरलंय. गाउडीचं निसर्गाला शरण जाणं, त्यात देवाला शोधणं अन तो देव सगळ्या जगाला दाखवणं आज तो गेल्यावर शतकानंतरही मनाला भावतं. त्याच्या त्या कलाकृतीला अनुभवताना डोळे भरून येतात, निसर्गातला देव भेटल्यासारखा वाटतो.

नुसत्या वर्णनावरून फोटो पाहून न कळलेला गाउडी तिथे त्या अवकाशात गेल्यावर कळला. अगदी अढळपद. मॉडर्निझमचा इतका अद्भुत आविष्कार करणारा दुसरा नाही. आयुष्याची शेवटची दोन दशकं निव्वळ ह्या एका निर्मितीचा ध्यास घेतला अन अखेरही काम करत असतानाच बार्सिलोनाच्या रस्त्यावर ट्रामची धडक लागून झाली.

IMG-20190519-160859

आज त्याच्याच सर्वोत्तम कलाकृतीच्या तळघरात, साग्रादा फॅमिलीयामध्ये गाउडी चिरविश्रांती घेत आहे.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

26 Oct 2019 - 11:10 am | तुषार काळभोर

डॅन ब्राऊन याचं ओरिजिन हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी वाचताना स्पेनमधील मॉडर्न आर्ट आणि विविध वास्तुरचना विशेषतः Antony Gowdy याच्या La Sagrada Familia आणि Casa Mila या इमारती, यांच्याशी परिचय झाला होता.
casa mila

सुरेख. छान लेखन, उत्तम फोटो.

धन््यवाद यशोधरा अन पैलवान.
गाउडी च्या कामाबद्दल लिहीताना हिमालयाला कॅमेराच्या फ्रेम मघे पकडण्यासारख आहे! मावतच नाही! चार सहा लेखांइतक मोठ व्हायला लागल तेव्हा ही तोंडओळख लिहीली.
सविस्तर लिहीते यानंतर.

खेडूत's picture

27 Oct 2019 - 10:58 am | खेडूत

छान सविस्तर लेख. मराठीत याबद्दल प्रथमच वाचलं.
दोनच वर्षांपूर्वी स्पेन भेटीत हे पाहिलं आणि खूप आवडलं!

जेम्स वांड's picture

27 Oct 2019 - 9:51 pm | जेम्स वांड

एका मनस्वी कलाकाराची तितकीच मनस्वी ओळख, सबव्हर्ट द पॅराडाईम डिफाईन करणारी माणसे ही ! खल्लास आवडली ही ओळख....

सुधीर कांदळकर's picture

30 Oct 2019 - 12:02 pm | सुधीर कांदळकर

अशा कलाकृती दिसताहेत. वाटतं असं उठावं आणि सारं पाहून यावं. वर्णन्+प्रचि = एकूण लेखही तेवढाच असामान्य दर्जेदार झाला आहे. हे उलगडून सांगणेही येर्‍या गबाळ्याचे काम नोहे.

@पैलवानः डॅन ब्राऊनचे ओरिजिन आता वाचावे लागणार. व्हिन्सी कोडमध्ये त्याने सिस्टाईन चॅपलचे, एकूण व्हॅटिकनचेच किती चित्रदर्शी वर्णन केले होते.
अनेक अनेक धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

30 Oct 2019 - 4:09 pm | टर्मीनेटर

लेख आणि फोटो दोन्ही सुंदर!
पार्क गुएल आणि कासामिलाचे फोटो विशेष आवडले.

जेम्स वांड , सब्व्हर्ट द पॅरॅदाइम!! क्या बात कही !! पण प्रस्थापित बाबीना इतका बेमालूम छेद देतो हा अवलिया. सगळ निसर्गातूनच उमललेल दिसत ! वेगळ म्हणून खूपत नाही. गाउडीला मॉडर्निझम च्या चळवळीचे कॅटलोनियाचे प्रतोद म्हणायला हरकत नाही.
सुधीर कांदळकर , बार्सेलोनाला गेलात तर निदान दोन दिवस वेगळे ठेवा ह्यासाठी! मी अजून काही सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करते. १९००मधे बार्सेलोनातल्या रेसिडेन्शियल बिल्डिंग्स पण फारच अद्भूत आहेत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
टर्मिनेटर , धन्यवाद , मी ४ दिवसात जवळपास ६५० फोटो काढलेत .अन तरीही मावल नाहीये सगळ ! अन हा लेख त्याच्या कामाच्या विविधतेला अजिबातच न्याय देत नाही खरतर!

मुक्त विहारि's picture

20 Nov 2019 - 10:36 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ...

जॉनविक्क's picture

21 Nov 2019 - 7:30 am | जॉनविक्क

क्या बात, क्या बात... क्या बात.