एक शीतल आठवण

जुइ's picture
जुइ in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

एक शीतल आठवण

मंडळी, आज काही आठवणींबद्दल बोलावेसे वाटते आहे. आपल्या काही आठवणी ऋतूंशी निगडित असतात - उदा., वसंतात झाडांना नवीन पालवी फुटू लागते, वेगवेगळी सुगंधित फुले उमलू लागतात. उन्हाळ्यात मोगर्‍याचा सुगंध, कोकीळ पक्ष्याचे मधुर कूजन, कैरीच्या तिखटमीठ लावलेल्या फोडी, आंब्याचे निरनिराळे प्रकार. पावसाळ्यात जिकडेतिकडे फुललेल्या हिरवाईबरोबरच ओसंडून वाहणार्‍या नद्या आणि धबधबे. जोडीला कधी गरम कांदाभजी, आल्याच्या चहाचे घुटके. शिशिराची चाहूल लागताच दिवाळीचे आगमन होते. घरोघरी मातीच्या किल्ल्यांबरोबर फराळाच्या पदार्थ करायची लगबग सुरू असते. आपल्याला आईने, आजीने केलेल्या लाडू-चिवड्याचे वास खुणावू लागतात!

आता पुरेशी भूक चाळवली गेली असेलच, तर आपण मुख्य आठवणीकडे वळू या. सुमारे दीड दशकापूर्वी उन्हाळ्यात देहरादून गावी जरा मोठा मुक्काम करायचा योग आला. संध्याकाळ झाली असली तरी उन्हे तापलेली होती. आम्ही बाजारपेठेत चक्कर मारत होतो. कोणत्याही बाजारपेठेत असावी अशीच भरपूर गर्दी, अरुंद गल्ल्यांमधून रिक्षा, दुचाकीस्वार वाट काढत होते. आम्ही तिथे भटकत असताना बाजारपेठेला लागून असलेले तेथील ऐतिहासिक घंटाघर दिसले. १९५३ साली लालबहादुर शास्त्री यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले होते.

येथून जवळच मिठाई आणि नमकीनचे मोठे दुकान लागले. दुकानाच्या बाहेरच मोठी रांग. कुतूहलाने जरा जवळ जाऊन पाहिले तर दुकानाच्या बाहेर एका मांडणीवर एक भैय्या बसलेला दिसला. त्याच्या जवळ काही मोठी मडकी होती. तो अतिशय सराईतपणे एका मोठ्या मडक्यातून एक कुल्फीचा साचा काढी. दोन्हीही हातांमध्ये साचा रवीसारखा फिरवून त्यातून भलीमोठी कुल्फी काढून एका छोट्या बशीत ठेवी. सुरीने त्या कुल्फीचे काप करी. मग एका पातेल्यातून केशर घातलेले गार दूध कुल्फीवर वाढी. दुसर्‍या मडक्यातून बर्फाच्या पाण्यात ठेवलेल्या पिवळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या शेवया कुल्फीभोवती पसरी. अशा रितीने थंडगार कुल्फी फालुदा तुमच्यासमोर बशीत सादर होई. या कुल्फीचा एक घास खाऊन झाल्यावर जिभेवर जी काही स्वर्गीय चव जाणवली, त्याला अजून तरी इतक्या वर्षांत तोड मिळालेली नाही. संपूर्ण कुल्फी फालुदा खाऊन झाल्यावर पोटात एक प्रकारची शीतलता आली. खाऊन झाल्यावर जिभेबरोबर मनही तृप्त झाले. आज कित्येक वर्षांनी मिपा दिवाळी अंकासाठी ही पाककृती करायचा योग आला आणि आठवणींना उजाळा मिळाला.

साहित्य:

  • पाऊण लीटर घट्ट दूध
  • १ वाटी हेवी व्हिपिंग क्रीम
  • अर्धी वाटी खवा
  • पाऊण वाटी साखर
  • अर्धी वाटी भरडसर कुटलेले पिस्ते
  • १ टीस्पून वेलची पावडर
  • १०-१२ काड्या केशर
  • पांढर्‍या अन पिवळ्या रंगाच्या फालुदा शेवया. मी तयार आणल्या.

कृती:

एक छोटा चमचा दूध घेऊन ते कोमट करावे. त्यात केशराच्या काड्या घालाव्यात. त्या नंतर २ टे.स्पून दूध घेऊन ते गरम करावे. एक चमचा साखर घालावी. त्यात मग केशर घातलेले थोडे दूध मिसळावे. हे दूध पूर्ण गार करावे. शक्यतो साय जमा होऊ देऊ नये. मग पूर्ण गार झालेले दूध फ्रीजमध्ये ठेवावे.

त्यानंतर उरलेले सगळे दूध जाड बुडाच्या भांड्यात आटवायला ठेवावे. शक्यतो साय जमा होऊ देऊ नये. दूध चांगले गरम झाले की त्यात व्हिपिंग क्रीम आणि खवा घालावा. दूध सतत हलवत आटू द्यावे.

हे करत असताना कंटाळा येत असेल तर एखादे मनपसंत गाणे अथवा संगीत ऐकावे. मी 'उठे सबके कदम' हे गाणे लावून दूध आटवले! दूध चांगले आटले की त्यात उर्वरित केशरयुक्त दूध आणि वेलची पावडर घालावी. मग साखर घालावी. त्यानंतर कुटलेला पिस्ता घालावा. दूध चांगले आटून घट्ट होऊ द्यावे.

आटवलेले दूध पूर्ण गार होऊ द्या. दूध गार व्हायला सुमारे तासभर तरी लागू शकतो. गार झालेले दूध मग कुल्फीच्या साच्यांत भरून फ्रीजर मध्ये ठेवावे. कुल्फी कमीतकमी ५ तास तरी फ्रीजरमध्ये ठेवावी. उकळत्या पाण्यात शेवया व्यवस्थित ५-६ मिनिटे शिजवाव्यात. मग निथळून बर्फाच्या पाण्यात बुडवाव्यात. त्यानंतर बर्फाच्या पाण्यात तशाच ठेवून कमीतकमी १ तास तरी फ्रीजमध्ये ठेवाव्यात, जेणेकरून त्या सेट होतात.

सेट झालेली कुल्फी फ्रीजरमधून बाहेर काढावी.

साचा हातात घेऊन चोळावा अथवा थोड्या गरम पाण्यात ठेवला तरी चालेल. कुल्फी अलगद काढून डिशमध्ये मांडावी. मग तयार केशरयुक्त दूध कुल्फीभोवती पसरावे. फ्रीजमधून शेवया काढून त्याही कुल्फीभोवती पसराव्यात. शेवटी कुटलेला पिस्ता कुल्फीवर भुरभुरावा. त्यानंतर काय? आपल्या कुटुंबासह, मित्रमंडळींसह आस्वाद घ्यावा!!

सर्व मिपाकरांना अन मिपा-वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2019 - 12:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तोपासू . फोटो आणि कलाकुसर अस्सल सुगरणीला शोभावे असेच. खुप आवडले.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 1:55 pm | यशोधरा

मस्त!

तुषार काळभोर's picture

26 Oct 2019 - 4:10 pm | तुषार काळभोर

सुंदर!!

नूतन सावंत's picture

27 Oct 2019 - 9:44 pm | नूतन सावंत

मस्त,मस्त,मस्तच ग जुई

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 8:59 pm | पद्मावति

आहा... क्लास्स!!
पाककृती आणि फोटो दोन्ही फारच आवडले.

स्रुजा's picture

28 Oct 2019 - 9:04 pm | स्रुजा

वाह !!

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 6:18 am | मीअपर्णा

मस्त दिसतंय आणि लिहिलंयही साग्रसंगीत. मला फोटोही दिसताह्त म्हणून आणखी आवडली ही पाकक्रूती.

सरनौबत's picture

29 Oct 2019 - 12:53 pm | सरनौबत

फोटू आणि पाकृ दोन्ही कातील! फोटोंबरोबर तुमचा सेल्फी टाकला असता तर 'सेल्फी विथ कुल्फी' कॅप्शन देता आलं असतं ;-)

सुमो's picture

29 Oct 2019 - 2:53 pm | सुमो

रुप नया है रंग नया है
कुल्फी का तो यहां ढंग नया है

किसे है खबर बढ़े कितनीभी शुगर
फालुदा खाने के लिये है हम रजामंद

- खूप छान पाकृ आणि छायाचित्रे.
आवडल्या गेले आहे.

"साखरेचे खाणार त्याला देव देणार"
फार मस्त रेसिपी आणि फोटोही झकास....

श्वेता२४'s picture

5 Nov 2019 - 12:30 pm | श्वेता२४

कुलाब्यात कैलाशपर्बत नावाचे हॉटेल आहे तीथे हा कुल्फी फालुदा पदार्थ खाल्ला होता. अक्षरश: पहिला घास खाल्ला आणि दिवस सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं इतकी स्वर्गीय चव. पण हा पदार्थ घरी करण्यापेक्षा बाहेरच खायला मजा येईल असे वाटते. धन्यवाद.

वा लगेच करुन बघाविशी वाटतेयं! शेवटचे २ फोटो फारच कातिल आलेत. :)

सुधीर कांदळकर's picture

12 Nov 2019 - 8:16 pm | सुधीर कांदळकर

मस्त झकास पाकृ. प्रचि तितकीच सुंदर. पण्त्यांच्या प्रकाशातली शेवटची दोन प्रचि सुंदर आणि तितकीच प्रसांगानुरूप समर्पक. धन्यवाद.

जुइ's picture

22 Nov 2019 - 9:08 am | जुइ

सर्व वाचकांचे अन प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद.
तुमच्या प्रतिक्रिया हुरूप वाढवतात.

स्मिताके's picture

22 Nov 2019 - 10:32 pm | स्मिताके

छान पाकृ, प्रचि फार सुंदर. (कधीतरी) करून पाहीन असे म्हणते आहे!

मुक्त विहारि's picture

22 Nov 2019 - 10:38 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

जॉनविक्क's picture

22 Nov 2019 - 10:45 pm | जॉनविक्क