माती मुळाचा अंश - संजीवनी तडेगावकर

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

माती मुळाचा वंश

मी करणार नाही कधीच
माझ्या दु:खाचं भांडवल
की, मागणारही नाही हात पसरून
सांत्वनाची भीक
मी आहे, आणि राहणारच आहे, सतत इथे
हिरवळ बनून हे ठाऊक आहे मला..!
म्हणून तर
माझ्या सगळ्या ऋतूंसहित रुतून बसेन मी
तुमच्या डोळ्यांच्या बुबुळांमध्ये, काळासारखी,
आणि सलत राहीन काळजात.
वेदनेचं ठसठसतं कुरुप होऊन !
मी करणार नाही कुठलीच घाई.
मिटून जाण्याची किंवा बहरून येण्याची
पायाखालच्या भुईसारखी विस्तारत जाईन फक्त!
कारण,
माझ्या मुळांचा वंश
कळीकाळाच्या पाण्यावर पोसलेला आहे..!

**********

चहाडी

वाझोंट्या हातांना ! स्पर्शाची चहाडी !!
माथ्यावर फोडी । खापराला ॥

नित्य नवा ध्यास । लागतसे मनी ।
बेचैनी घेरुनी । तिन्हीकाळ ॥

कर्म-धर्म-योग । उलटे राशीला ॥
पदरी उरला । अनुताप ॥

सोईर्‍याच्या दारा । उफराटा कावा ॥
व्याकुळल्या जीवा |कोलदांडा ॥

***

परिचय : डॉ. संजीवनी तडेगावकर.  मराठी साहित्यातील  प्रसिद्ध अशा कवयित्री. १९८०नंतरच्या मराठी कवयित्रींच्या कवितेतील स्त्री जाणिवा हा अभ्यासाचा संशोधनाचा विषय. आशयघन त्रैमासिकाच्या संपादिका. महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ (मुंबई)च्या सदस्या आहेत. मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादच्या संचालिका. काव्यसंग्रह प्रकाशित : फुटवे (२००७) , अरुंद दारातून बाहेर पडताना (२०११) संदर्भासहित (२०१८), ललित संग्रह : चिगूर (२००९), मुलाखत संग्रह : पापुद्रे (२०११) , समीक्षा : आणि झरे मोकळे झाले. (२०१५) , विविध दैनिकांसाठी नियमित सदरे लिहीत असतात. विविध साहित्य संमेलनांत कवयित्री म्हणून सहभाग. साहित्यातील वीसेक पुरस्कार.  ३ रे 'झेप' राज्यस्तरीय साहित्य संमेलन (२०१७) औरंगाबादच्या साहित्य संमेलनाध्यक्ष, तर, १९वे अक्षरयात्री ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, सांगली (२०१७)  इथे त्या संमेलनाध्यक्ष होत्या.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:08 pm | यशोधरा

छानच लिहिले आहे.
आवडल्या कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2019 - 11:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या कवितेत बंड विद्रोह वगैरे असल्यासारखी वाटते, म्हणजे काही तरी विरोध दिसतो म्हणून ती आवडली.

दुस-या अभंगाच्या चौकट असणा-या रचनेत अजून मसाला हवा होता की काय असे वाटले.

-दिलीप बिरुटे

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 2:06 pm | अलकनंदा

दोन परस्परविरोधी भावना मांडणाऱ्या कविता. छान.

जॉनविक्क's picture

19 Nov 2019 - 6:55 pm | जॉनविक्क